पाचोर ( मनोज बडगुजर )-जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमात “फिल्ड व्हिजीट” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जीवनातील प्रशासन आणि शासकीय यंत्रणांचा अनुभव मिळवून देणे हा होता. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी तहसील



कार्यालय, पाचोरा येथे भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची आणि प्रशासन यंत्रणेची प्रत्यक्ष माहिती घेतली. या शैक्षणिक भेटीमध्ये विद्यार्थ्यांना तहसीलदार विजय बनसोडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत निवडणूक यंत्रणेच्या कार्यप्रणालीबद्दल सखोल माहिती दिली. श्री बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय, तिचे महत्त्व काय, भारतात लोकशाहीची रचना कशी आहे, या गोष्टींचे विस्तृत विवेचन केले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा म्हणजे काय, त्यांचे कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या काय असतात, राज्याचे प्रमुख कोण असतात, राज्यपाल व मुख्यमंत्री यांची भूमिका काय असते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, ग्रामपंचायत ते महानगरपालिका यांतील निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातात, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. मतदान यंत्रणा कशी काम करते, ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) कसे कार्य करते, व्हीव्हीपॅट यंत्रणा कशी वापरली जाते, एक मतदार मतदान करताना त्याच्या मताची गोपनीयता कशी राखली जाते यासंबंधी त्यांनी प्रत्यक्ष यंत्र दाखवून विद्यार्थ्यांना समजावले. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रांचे नियोजन, मतमोजणी प्रक्रिया, मतपत्रिकांचे सुरक्षिततेचे नियम, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व जबाबदाऱ्या यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मतदारसंघ म्हणजे काय, तो कसा ठरवला जातो, जनगणना व भौगोलिक रचनेच्या आधारे मतदारसंघाचे पुनर्रचनेचे कार्य कसे केले जाते, याबाबत त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले. भारतात खासदार आणि आमदार निवडले जातात ती संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजून घेतली. लोकशाही ही केवळ एक राजकीय व्यवस्था नसून ती एक जीवनशैली आहे, हे अधोरेखित करत बनसोडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधान आणि लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण केली. विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. “जर कोणी मतदान न केल्यास काय परिणाम होतो?”, “मतदानासाठी काय पात्रता लागते?”, “नवीन मतदार नोंदणी कशी होते?”, “मतदान प्रक्रियेत अपंग मतदारांसाठी काय सुविधा आहेत?”, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि बनसोडे यांनी त्यांना अचूक व समर्पक उत्तरे देत त्यांची उत्सुकता शमवली. या भेटीत निवडणूक नायब तहसीलदार रणजीत पाटील आणि संगणक तज्ज्ञ जयंत जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, ई-गव्हर्नन्स प्रणाली, डिजिटल नोंदणी, ऑनलाइन मतदार यादी तपासणी इत्यादी आधुनिक प्रणालींची माहिती दिली. तहसील कार्यालयात चालणाऱ्या विविध विभागांची कार्यपद्धती, महसूल नोंदणी, जमीन अभिलेख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आदी बाबींची विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेशशेठ बोथरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपाध्यक्ष गिरीषनाना कुलकर्णी, सचिव जिवनभाऊ जैन, सहसचिव संजयशेठ बडोला, खजिनदार तथा खिलोशिया उपहारगृहाचे मालक जगदीशशेठ खिलोशिया, स्कूल कमिटीचे चेअरमन लालचंदशेठ केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशशेठ ललवाणी, संचालक संजयभाऊ चोरडिया, गुलाबभाऊ राठोड, गोपालशेठ पटवारी, प्रीतीजी जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांचेही मार्गदर्शन व उपस्थिती लाभली. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व शाळेचे सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शाळेतील शिक्षिका निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रूपाली जाधव, प्रीती शर्मा, शितल तिवारी, दीपिका रणदिवे, योगिता शेंडे, पूजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राह्मणकर, विद्या थेपडे, पिंकी जैन, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, संगीता पाटकरी, पूजा अहिरे, कल्पना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. याशिवाय, शिक्षक वाल्मीक शिंदे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदीप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राह्मणे, शिवाजी पाटील, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनीषा पाटील, विकास मोरे यांचे देखील या उपक्रमात मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमामागे इयत्ता 8 वीचे वर्गशिक्षक किरण बोरसे यांची कल्पक संकल्पना होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत कल्पकतेने राबवला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाचा अनुभव मिळावा, त्यांना शालेय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष जीवनाशी सुसंगत उदाहरण मिळावे या उद्देशाने त्यांनी ही भेट आखली. या भेटीतून विद्यार्थ्यांनी फक्त निवडणूक प्रक्रिया नव्हे तर प्रशासनाची कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये, संविधानाचे महत्त्व आणि एक जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे गहन बोध घेतले. अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढते, त्यांचा आत्मविश्वास बळावतो आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होते.निश्चितच, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाला व्यवहार्य संदर्भ मिळतो, आणि ते उद्याचे सजग, प्रगल्भ व जबाबदार नागरिक बनतात.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.