हा केवळ एक फोटो नाही, ही वास्तवाची भाष्य करणारे चित्र आहे.
डोळ्यांत उतरलेली ही झोप — त्यामागे शेतमजुराचे कष्टाचे वास्तव आहे.
उन्हाच्या झळा, अंगावर पडलेली धूळ, आणि तरीही या निष्पाप जीवाची शांत झोप…
मातीवरची चादर, जनावरांच्या चाऱ्यावरची बिछान — जीवनाची अस्सल व्याख्या.
फोटोग्राफर राजेंद्र पाटील यांनी टिपलेला हा क्षण म्हणजे पत्रकारितेची जिवंत ताजी साक्ष.
हे फक्त दृश्य नाही, ही हजार शब्दांची किंचाळी आहे.
आई शेतात राबतेय, मूल झोपलेय पिशव्याच्या सावलीत — याहून मोठं बलिदान काय असू शकतं?
कुठल्याही सेटिंगशिवाय, कुठलाही अभिनय न करता वास्तवाची पानं उलगडणारा हा फोटो आहे.
गरिबीची झाक, मातृत्वाची माया आणि देशाच्या कृषिप्राण अस्मितेचा खणखणीत आरसा.
बाळ झोपलेलं असलं तरी फोटो बघणाऱ्याची झोप उडवणारा क्षण.
शेतकऱ्याच्या लेकराची शय्या म्हणजे कधी उरलेलं पीक, तर कधी मातीचं गादीदेखील.
राजेंद्र पाटील म्हणजे पत्रकारितेचं खऱ्या अर्थानं सामाजिक भान जपणारा फोटोग्राफर.
राजेंद्र पाटील यांनी दाखवलेली ही कलात्मकता म्हणजे फोटोच्या पलीकडची जाणीव.
एका झोपेच्या चित्रात संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था दिसते.
सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा, कोणतेही भाष्य न करता अंतर्मनात भिडणारा हा फोटो.
फोटोग्राफरने टिपलेला क्षण म्हणजे काळजाच्या तारांना स्पर्श करणारी संजीवनी.
हे चित्र समाजाला विचार करायला भाग पाडणारं आहे.
एक क्षण, एक झोप, आणि असंख्य भावनांचं आकाश.
गरिबी, कष्ट, वात्सल्य आणि समाजाची उदासीनता — या साऱ्यांची उपस्थिती इथे आहे.
काळजावर ओरखडे उमटवणारा, पण डोळ्यांत वास्तवाचं पाणी आणणारा क्षण.
बालपणाचा हा चेहरा, माणुसकीच्या प्रश्नांची आठवण करून देणारा.
कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं असं यश म्हणजे अशा क्षणाचं दस्तऐवजीकरण.
चित्र दाखवतं आणि शांतपणे काहीतरी सांगून जातं — हेच आहे छायाचित्रणाचं सामर्थ्य.
राजेंद्र पाटील यांच्या संवेदनशीलतेस आणि निरीक्षणशक्तीस सलाम.
हे चित्र काळजावर कोरलं जातं आणि प्रश्न विचारतं — “आपण कितपत जागरूकआहोत? सॅल्युट –“सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.