दिनांक :- 14 /10/2019 रोजीचे 08:00 वाजेच्या दरम्यान
बोदवड शहरात जामठी रोडवर नम्र फायनान्सु लिमिटेड मध्ये सुमारे 12,08,252 /- रुपये किमतीचे
ऐवज ( रोख रुपये )चोरुन नेला होता.त्याअनुषंगाने बोदवड पोलीस स्टेशन भाग -5 गुरन. 125/2019
भादवि.क.457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आठा होता.
पोलीस अधीक्षक श्री.डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके,
SDPO श्री.सुरेश जाधव, मुक्ताईनगर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . बापु रोहोम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस
उपनिरीक्षक श्री.सुधाकर लहारे, स.फौ. अशोक महाजन , पोहेकॉ रविंद्र पाटील, अनिल जाधव,
सुधाकर अंभोरे, अशरफ शेख,दिपक पाटील, दादाभाऊ पाटील, रणजित जाधव, इंद्रीस पठाण
अशोक पाटील , मुरलीधर बारी, शरद भालेराव, गफुर तडवी, संदीप सावळे, वहीदा तडवी, वैशाली
महाजन अशांचे पथक मुक्ताईनगर, बोदवड , बुलढाणा, मलकापुर भागात रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बोदवड
शहरात जामठी रोडवर नम्र फायनान्स् लिमिटेड मधील घरफोडी किशन उर्फ शेंडया कैलास सोनवणे
रा.बोदवड याने व त्याचे साथीदार यांनी केलेली आहे. त्याअनुषंगाने वरील पथकाने सदर गुन्हयात
1) किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे वय – 22 वर्षे रा. भिलवाडा, बोदवड, 2) विलास मधुकर पवार
वय-24 वर्षे ,रा.भिलवाडा, बोदवड, 3) प्रविण सुखा धुलकर उर्फ लहाण्या रा.भिलवाडा. बोदवड , 4)
गणेश सोपान पवार वय -25 वर्षे ,रा.भिलवाडा, बोदवड , 5) प्रदीप किशोर सोनवणे वय 20 वर्षे,
रा.भिलवाडा, बोदवड यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सांगीतले की, नम्र फायनान्स कंपनीचे फिल्ड
ऑफिसर 6) सुनिल कडु इंगळे वय – 30 वर्षे, रा.निमखेडी बु.ता. मुक्ताईनगर ह.मु.शारदा
कॉलनी,बोदवड यांचे सांगण्यावरुन सदर घरफोडी केली आहे.
सदर आरोपीताकडुन चोरीचे पैश्यातुन विकत घेतलेली बजाज पल्सर काळया रंगाची , 70
हजार रुपये रोख तसेच एक रेड मि कंपनीचा मोबाईल असे एकुण 1,57,000/- रुपये किमतीचा ऐवज
जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात नम्र फायनान्स कंपनीचे फिल्ड ऑफिसर सुनिल कडु इंगळे यांनी फायनान्स
कंपनीतील सर्व माहिती वरील आरोपीतांना देवुन बॅकेत घरफोडी करणे बाबत माहिती पुरवीली
होती.वरील सर्व आरोपीना पुढील तपास कामी बोदवड पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आलेले
आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.