‘महा’ चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर दक्षिणेकडून उत्तरेकडे ‘महा’ चक्रीवादळ सरकत असून त्याचा परीणाम येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 तारखेनंतर पुण्याला पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं दिला आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.