जळगाव ग्रामीण मध्ये नुकसान झालेल्या क्षेत्राची राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पाहणी

0

जळगांव ग्रामीण मधिल धरणगाव व जळगाव तालुक्यातील चांदसर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधपर्यंत पोहचून शेतकऱ्यांशी नुकसानी बाबत संवाद साधला.परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहितीचा घेऊन दोन्ही तालुक्यांचा सुमारे 68 हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने ना.गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. निवडणुक निकाल जाहीर होताच अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे निर्देश दिले होते.त्या नुसार दोन्ही तालुक्यात युद्ध पातळीवर संबधित यंत्रणेमार्फत पंचनामे सुरू झाले आहेत. शेतकऱ्याशी संवाद साधून प्रसंगी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे गुलाबराव पाटील यांनी सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने खूप मोठे अस्मानी संकट उभे राहीले आहे.
कापूस, सोयाबीन,ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही इतके नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या भयावह परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दि.2/11/2019 रोजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी,तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व इतर यंत्रणा समावेत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधून पिक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ विमा क्लेम मिळावे याबाबत जिल्हाधिकार्‍यांना व विमा कंपनी प्रतिनिधी यांना सूचना केली.

जिल्हाधिकारी यांनी देखील संबंधित प्रशासनाला याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळेल अशी खात्रीही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जळगाव / धरणगाव तालुक्यात 68 हजार हेक्टर क्षेत्र बाधित

जळगाव तालुक्यात 55 हजार 302 हेक्टर क्षेत्रापैकी 42 हजार 345 हेक्टर तसेच धरणगाव तालुक्यातील 37 हजार 915 हेक्टर क्षेत्रापैकी पैकी 25 हजार 760 हेक्टर क्षेत्रात म्हणजे एकूण जळगाव मतदारसंघात 68 हजार 105 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे व्यक्त केला आहे. यात ज्वारी मका सोयाबीन कापूस जिरायत व बागायत व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरळ मुंबईहून मतदारसंघात येऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

धरणगाव तालुक्यातील पाळधी गावच्या परिसरातील सावदा शिवार खेडी – कढोली शिवार. पोखरी तांडा शिवार . चांदसर शिवार, दोनगाव. पथराड, टाकळी या शेत- शिवारात अधिकाऱ्यांसोबत घेऊन सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील पाहणी केली.

प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी . तहसिलदार देवरे,नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ. तलाठी,ग्रामसेवक, सरपंच चंदू माळी, आबा माळी, सतीश पाटील, आप्पा धनगर, असंलंम शेख, राहुल शिरोळे, प्रकाश कोळी, शुभम पाटील,दिगंबर माळी, अजित शेख, बाळू पाटील यांच्यासह यावेळी लोकप्रतिनिधी, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here