जळगाव – येथील दि जळगाव पिपल्स को-ऑप बँकेच्या चेअरमनसह 7 अधिकारी व कर्मचार्यांवर शहर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकावणे व बँकेच्या विरुध्द बातम्या प्रसिध्द करु नये यासाठी आटापिटा करणार्या चेअरमन भालचंद्र पाटील सह 7 अधिकार्यांविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी येथील दि जळगाव पिपल्स को-ऑफ बँकेस रिझर्व्ह बँकेने 25 लाखाचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी दै. बातमीदारसह बहुसंख्य प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने वस्तुस्थिती जन्य बातम्या प्रसारीत केल्या होत्या व यासंदर्भात बँकेचा खुलासा देखील प्रसिध्द केला होता. याचा राग येऊन, आकस बुध्दिने दि. 31 ऑक्टोबर 2019 रोजी दै. बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्या विरुध्द शहर पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद देवून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार बँकेचे चेअरमन संचालक मंडळ व प्रशासनाने केला. तसेच सोशल मिडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल करुन बँकेच्या प्रशासनाने आकांडतांडव करीत या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्यास बँक प्रशासनाकडून अप्रत्यक्षपणे कायदेशीर कारवाईची धमकी देत बँक ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणार्या बातम्या प्रसिध्द करु नये या कारणास्तव वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार केला आहे.
या प्रकरणी दै.बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांनी शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर 2019 रोजी फिर्याद दिल्याने चेअरमन भालचंद्र पाटील, दिलीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, राजेंद्र सोनार, सतिष लिंगे, सागर बारी व अन्य एका विरुध्द भादंवि कलम 143, 323, 501, 504, 506 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय उल्हास चर्हाटे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान बँकेच्या विरुध्द रिझर्व्ह बँकेने केलेली दंडात्मक कारवाई व आज दाखल झालेला गुन्हा यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच दै. बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्याविरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे जळगांव जिल्हापत्रकार संघ व भारतीय पत्रकार महासंघातर्फे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरुडे यांच्यासह राकेश कोल्हे (दै.साईमत),भगवान सोनार (अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, केसरीराज ), दिपक कुमार गुप्ता ( दर्शन पोलीस टाइम्स), सागर ओतारी ( शौर्य मराठी ), दिपक सपकाळे (दै. नजरकैद),ज्ञानेश्वर वाघ(दै. देशदूत), अभिजित पाटील ( आवाज मराठी), धर्मेंद्र राजपूत ( आप तक), सुनील भोळे ( मराठी सेवन), संतोष धिवरे (साईमत लाईव्ह),हेमंत पाटील ( मराठी वन),चेतन निंबोळकर( सत्यमेव जयते), नितीन नांदूरकर ( झिअम न्यूज),भारत ससाणे ( सिटीझन मिरर), गुरुनाथ सैंदाणे ( पोलीस चौफेर), चंद्रकांत वारके, गणेश पाटील, संदीप जाधव
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.