Dhyeya News चे नम्र आवाहन निवडणुका संपल्या शेतकरी समस्या वाऱ्यावर स्थानीक युवक & पत्रकारांनी पुढे येण्याची गरज

0

अवकाळी अतिवृष्टीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने युध्द पातळीवर पंचनामे करणे देखील प्रारंभ केले आहे पंरतु ती यंत्रणा पाहीजे तशी यशस्वी होईल & प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्या पर्यंत वेळेच्या आत पोहचू शकेल असे वाटत नाही. प्रत्येक शेतकरी तेवढा चाणाक्ष व जागरुक राहून आपल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासना मार्फत करून घेईल याची शाश्वती नाही. या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाच्या मदतीसाठी एखादया राजकीय पक्षाने मतदान बुथप्रमाणे प्रत्येक गावात निदान मदत किंवा मार्गदर्शन दालन उभारणे आवश्यक होते जेणे करून शेतकऱ्यांच्या संकटकाळी ते शासन व शेतकरी यांच्यातील स्वयंसेवेचा दुवा ठरू शकले असते परंतु आता निवडणुक नसल्यानं त्यांना गरज नाही म्हणुन गावातीलच शिक्षीत युवकांनी जात, धर्म, पक्ष्, संघटना यांची भिंत व भिती न बाळगता स्थानीक पत्रकार बांधवांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावात मदत & मार्गदर्शनाचे दालन उभारणे गरजे चे आहे. तालुक्या स्तरावरून काही अडचण असल्यास त्यासाठी शहरातील प्रिंट & इले. मिडीया देखील आपली जबाबदारी स्विकारायला तयार राहील

उद्देश एकच शेतकऱ्यांना कोणताही आर्थीक भुर्दंड न लागु देता नुकसानीचा लाभ त्यांचा पदरात पाडून देण्यासाठी प्रयत्न कऱणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here