पाचोरा शिवसेनातर्फे शेतकरींना जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी जारगाव चौफुली येथे रास्तारोको

    0

    शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकरसह शिवसैनिकांनी मा.उपविभागीय अधिकारी कचरेसाहेब व मा.तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिले लेखी निवेदन

    पाचोरा – शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम जास्तीची मिळावी यासाठी दि.२०/११/२०१९ रोजी सका जारगाव चौफुली वर रास्ता रोको सकाळी ११:०० वाजता आंदोलन पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे.

    पाचोरा भडगाव तालुक्यातील १००% टक्के शेतकरी या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी च्या पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्या शेतातील पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे याबाबत शासनाचे आदेशाने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून तसा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे विद्यमान परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती शासन असल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची संपूर्ण अधिकारी माननीय राज्यपाल साहेब यांना आहेत वरील परिस्थिती असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसानीची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून त्याची मनस्थिती आत्महत्या कडे चुकत आहे माननीय राज्यपाल महोदयांनी .८००० रु मदत देऊ केली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे म्हणून शासनाने तथा माननीय राज्यपाल साहेब यांनी शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत जमा करावी या मागणीसाठी आम्ही शिवसेना व युवासेना तर्फे दिनांक २० नोव्हेंबर २०१९ बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता जारगाव चौफुली पाचोरा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी याबाबत आपण नोंद घ्यावी शेतकऱ्यां चे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना माननीय राज्यपाल साहेब यांच्या पर्यंत पोहोचवाव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब पाचोरा यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नगरसेवक बापू हटकर ,विशाल राजपूत, जितू पेंढारकर ,गणेश चौधरी ,संतोष हटकर ,वैभव राजपूत ,दीपक पाटील ,नितीन पाटील, रवींद्र हटकर, हेमराज पाटील, विठ्ठल शिरसाठ, विनोद पाटील, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, निलेश मराठे, अतुल मराठे, अनिकेत सूर्यवंशी, प्रदीप पाटील, खंडू सोनवणे, विजय पाटील, सुनील महाजन, हरिभाऊ पाटील, मतीन बागवान हे उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here