पाचोरा: बांबरूड (राणीचे) येथील माजी सरपंच आणि
सदस्य राजेंद्र ओंकार वाघ यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदी मधुकर ओंकार वाघ यांची बिनविरोध निवड झाली.
आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी केवळ मधुकर ओंकार वाघ यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. मधुकर ओंकार वाघ यांच्याशिवाय इतर दोन अर्ज देखील सदस्यपदासाठी भरण्यात आलेले होते परंतु आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मधुकर ओंकार वाघ यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. मधुकर ओंकार वाघ हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून माजी आमदार कै. ओंकार नारायण वाघ यांचे ते चिरंजीव असून माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांचे ते बंधू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल
दगाजीराव वाघ तसेच संजय ओंकार वाघ, ललित वाघ,
प्रभारी सरपंच जरिफ तडवी,झुंबरलालजैन ,
संग्रामआढाव ,सुधाकर वाघ,मनोज वाघ,दयाराम कोळी, सदाशिव नरवाडे, रविंद्र पाटील,जिभाऊ वाघ सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच बांबरुड येथील विविध संस्थांचे पदाधिकारी,मान्यवर,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.