पाचोरा महसुल प्रशासन आणि गौण खनीज चोरी & त्यानंतर परस्पर होणारी तोडी पाणी सध्या स्थितीत पाचोरा महसुल प्रशासनाचा चर्चेचा विषय झाला आहे. अगदी पाचोरा महसुल कार्यालया पासुन १५ कि मी अंतरावर ३००/३५० ब्रास चा थप्पा मारला जातो काय? जेसीबी ने त्याची उचल होते काय? नावापुरता कारवाईसाठी भरारी पथक जाते काय? जेसीबी तेथुन भरधाव वेगाने? पळून जाते त्यानंतर त्याची जप्तीसाठी चुप्पी असे एक ना अनेक रंगीत- संगीत किस्से असतांना काल दि.9/12/2019 रोजी रात्री 1-30 च्या सुमारास DYSP सारखी उच्च पदस्थ अधिकारी जिवाची पर्वा न करता रात्री दीड वाजता जेव्हा वरखेडी रोडवर दोन ट्रॅक्टर पकडले. नव्हे तर त्या ट्रॅक्टरांना पोलीस लाईनीत लावण्यात आले आहेत (महसुल कार्यालयाच्या आवारातुन गेटवरुन ट्रॅक्टर गायब होत असावेत म्हणून) आज ते ट्रॅक्टर आहे तेथेच असले तरी महसुल प्रशासन त्यावर कारवाई का? करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
विशेष बाब म्हणजे सध्या दुचाकी वाहनांवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईचे सत्र सुरु आहे त्यामुळे अशी विना नंबर शिवाय शेती सवलतीचा लाभ घेऊन गौण खनीज चोरणाऱ्या वाहनांवर महसुल प्रशासन काय? कारवाई करते की DYSP साहेबांच्या मेहनतीला ठेंगा दाखवते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.