Home Blog Page 117

दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय: आशुतोष शर्माची तुफानी खेळी

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २४ मार्च २०२५– इंडियन प्रिमियर लीगच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर अविस्मरणीय विजय मिळवला. २१० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने १९.३ षटकांत ९ विकेट्स गमावत २११ धावा करत रोमांचक विजय मिळवला. आशुतोष शर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकाने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०९/८ अशी भक्कम धावसंख्या उभारली. निकोलस पूरनच्या ७५ (३०) आणि मिचेल मार्शच्या ७२ (३६) धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. दिल्लीच्या मिचेल स्टार्कने ४ षटकांत ४२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. ७ धावांवर ३ विकेट्स पडल्याने संघ अडचणीत होता. मात्र, आशुतोष शर्मा (६६ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) आणि विप्राज निगम (३९ धावा, १५ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकांत दिल्लीला ८ धावांची गरज असताना त्यांनी ३ चेंडूत सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा १ गडी राखून पराभव केला. आशुतोष शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा रोमांचक सामना चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या आगामी सामन्यांसाठीही अशीच उत्कंठा टिकून राहणार आहे.
उद्याचा सामना:-गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज  संध्याकाळी ७:३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

महाराष्ट्रात घटस्फोटांचे वाढते प्रमाण : नात्यांच्या तुटकाव्यावर एक चिंतन – सौ शितल महाजन

1

Loading

नुकतीच एक धक्कादायक बातमी वाचनास मिळाली देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून एक गंभीर सामाजिक चिंता व्यक्त करणारे होतेच त्यासोबत चिंतन करणारे होते कारण   भारतीय समाजव्यवस्थेत विवाह ही एक केवळ सामाजिक रचना नव्हे, तर ती एक भावनिक, सांस्कृतिक आणि नैतिक बांधिलकी मानली जाते. विवाहसंस्था ही आपल्या जीवनातील स्थैर्याचा केंद्रबिंदू मानली गेली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत, आधुनिकतेच्या नावाखाली झपाट्याने बदलणाऱ्या मूल्यव्यवस्थेमुळे आणि भावनिक गुंतवणुकीच्या कमतरतेमुळे ही संस्था आज मोठ्या संकटात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेला एक संशोधनात्मक अहवाल, ज्यामध्ये भारतात घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट केले आहे.                                                 या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून एक गंभीर सामाजिक चिंता व्यक्त करणारे आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरात घटस्फोटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये 11.7 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 8.2 टक्के, दिल्लीमध्ये 7.7 टक्के, तमिळनाडूमध्ये 7.1 टक्के, तेलंगणामध्ये 6.7 टक्के, केरळमध्ये 6.3 टक्के तर राजस्थानमध्ये 2.5 टक्के घटस्फोटांची प्रकरणं नोंदवली जात आहेत. हे आकडे दर्शवतात की वैवाहिक जीवनात स्थैर्य टिकवण्याचे आव्हान सर्वत्र वाढले आहे.विशेष लक्षवेधी बाब म्हणजे घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये 25 ते 34 वयोगटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही वयोमर्यादा अशी आहे की जिथे आयुष्याच्या अनेक जबाबदाऱ्या एकत्रितपणे येतात — करिअर, आर्थिक नियोजन, कौटुंबिक अपेक्षा, पालकत्व, सामाजिक जबाबदाऱ्या यांमध्ये तोल सांभाळणं खूप कठीण होतं. यामुळे अनेकदा वैवाहिक नात्यांमध्ये तणाव वाढतो आणि शेवटी तो तुटण्याच्या टप्प्यावरपोहोचतो.                                           या संशोधनातून समोर आलेली एक गंभीर बाब म्हणजे सोशल मीडियाचा विवाह नात्यांवरील वाढता दुष्परिणाम. डिजिटल युगात सोशल मीडियावरील ओढ अधिक झाल्याने प्रत्यक्ष संवाद मागे पडला आहे. अनेकदा सोशल मीडियावरील आभासी आकर्षणं, अनोळखी लोकांशी वाढलेली मैत्री, किंवा जोडीदाराच्या पोस्टवरील प्रतिक्रिया या गोष्टी नात्यांमध्ये संशयाची बीजे पेरतात. यामुळे भावनिक अंतर वाढते आणि नात्यांची वीण सैलावते. काही वेळा सोशल मीडियावर आलेल्या गुप्त मैत्री, चुकीच्या संवादांची माहिती मिळाल्यानंतर नात्यांमध्ये विश्वास हरवतो, जे घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी एक ठरत आहे.याशिवाय आधुनिक जीवनशैलीमुळे आलेली धावपळ, जोडीदाराला न मिळणारा वेळ, करिअरमुळे निर्माण होणारा ताण, सतत वाढणारी महागाई आणि कर्जबाजारीपणा या सर्व कारणांनी वैवाहिक जीवनावर मोठा ताण येत आहे. आजच्या युगात दोघेही नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या जीवनात वेळेची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. नात्यांमध्ये भावनिक सहवासासाठी आणि संवादासाठी आवश्यक असलेला वेळ उपलब्ध नसल्यानं, बऱ्याचदा गैरसमज आणि अंतर वाढू लागते.    अनेक दाम्पत्यांमध्ये नात्यांबाबत असलेल्या अपेक्षा, जबाबदाऱ्यांविषयी दृष्टिकोन यामध्ये फरक असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या जागृतीनंतर अनेक स्त्रिया स्वाभिमानाने, आत्मनिर्भरतेने निर्णय घेऊ लागल्या आहेत. काहीवेळा हे स्वातंत्र्य नवऱ्यांना पचत नाही आणि तिथेच संघर्ष सुरू होतो. संयुक्त कुटुंबातील हस्तक्षेप, सासरच्यांचा वर्चस्ववादी हस्तक्षेप, यांसारख्या सामाजिक गोष्टी देखील नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण करतात.मानसिक आरोग्य हा घटस्फोटाच्या वाढीमागील आणखी एक गंभीर घटक ठरतो आहे. वैवाहिक जीवनात ताण-तणाव, नैराश्य, असमाधान यावर वेळेवर उपाय न केल्यास, ते नात्याच्या आरोग्यावर परिणाम करते. दुर्दैवाने आपल्या समाजात मानसिक आरोग्याविषयी अजूनही आवश्यक ती जागरूकता नाही. संवादाऐवजी मौन, सहकार्याऐवजी तणाव आणि समजुतीऐवजी अहंकार – या प्रवृत्ती विवाहसंस्थेला खिळखिळं करत आहेत.                                             या सर्व समस्यांवर उपाय म्हणून समुपदेशनाची गरज अधोरेखित होते. विवाहपूर्व समुपदेशन, विवाहानंतर नियमित सल्ला, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, कुटुंबसंस्थेच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम आणि भावनिक संवाद वाढवण्यावर भर देणे ही काळाची गरज आहे. शिक्षणपातळीवर ‘नातेसंबंध व्यवस्थापन’, ‘संवाद कौशल्ये’ यांसारखे अभ्यासक्रम राबवले पाहिजेत. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये नात्यांविषयी समज, सहिष्णुता आणि समजूतदारपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा.      आज समाज एका वळणावर उभा आहे. विवाहसंस्था टिकवण्यासाठी केवळ कायदेशीर नियम नव्हे, तर भावनिक समृद्धीची आवश्यकता आहे. नात्यांची वीण केवळ संस्कारांनी जपता येत नाही, तर त्यासाठी परस्पर संवाद, विश्वास, समर्पण आणि सहकार्यही तेवढंच महत्त्वाचं असतं. घटस्फोट हे केवळ दोन व्यक्तींचं वेगळं होणं नसतं, तर ते संपूर्ण सामाजिक साखळीवर परिणाम करतं. त्यामुळे याचा विचार व्यक्तिगत न राहता सामाजिक म्हणून केला पाहिजे.समाज म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की घटस्फोटाची संख्यात्मक वाढ ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ती आपल्या मूल्यव्यवस्थेतील बदलांचे प्रतिबिंब आहे. विवाहसंस्थेचे महत्व जपायचं असेल तर आपल्याला नात्यांमध्ये नवसंवादाची सुरुवात करावी लागेल. कारण नात्यांची वीण फक्त एका विधीने घट्ट होत नाही, ती रोजच्या सहवासाने, संवादाने, समजुतीने आणि प्रेमाने टिकते. हीच जाणीव नव्या पिढीला करून देणे, हे काळाचे खरे आव्हान आहे.                                                  लेखकसौ शितल संदिप महाजन,        (उप- शिक्षीका श्री गो.से. हायस्कूल पाचोरा) MO.7588645908

समाजसेवेचा प्रवक्ता : संतोष पाटील यांची अखिल भारतीय बळीराजा संघटना भारतच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड

0

Loading

सामाजिक बांधिलकीची जाणीव, वैचारिक योगदान, समाजप्रबोधनाची तळमळ आणि शिक्षण क्षेत्रातील अखंड निष्ठा या साऱ्या गुणांची सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संतोष पाटील गोराडखेडेकर. समाजासाठी जीवन समर्पित करणाऱ्या या कार्यकर्त्याची सामाजिक व वैचारिक भूमिकेची दखल घेत अखिल भारतीय बळीराजा संघटना भारत या प्रमुख संघटनेने महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदाची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील आणि त्यांच्या कार्यकारिणीने अधिकृतरित्या केली असून, नुकतेच नियुक्तीपत्र संतोष पाटील यांना प्रदान करण्यात आले.
     संतोष पाटील हे केवळ एका संघटनेचे प्रवक्तेपद भूषवणारे व्यक्ती नाहीत, तर त्यांची वैचारिक जाणीव आणि जनतेशी असलेली संवादशैली ही अनेक वर्षांपासून समाजमनात जागृती निर्माण करणारी आहे. व्याख्यानांद्वारे समाजात प्रबोधन करणे, विचारवंतांची शिकवण पोहचवणे आणि सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका मांडणे हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या वाणीमध्ये प्रेरणा असते, आणि त्यांच्या लेखनात दिशा असते. त्यामुळेच त्यांचे व्याख्यान कुठेही असो, ते प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम ठरते.
          संतोष पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंभई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नुसते ज्ञान न भरवता त्यांच्यात मूल्यसंस्कार रुजवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. शिक्षकी पेशात असूनही त्यांनी नेहमीच आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला आहे. ते केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, पालकांचे सल्लागार आणि समाजाचे सजग शिक्षक आहेत. त्यांच्या वर्गातून शेकडो विद्यार्थी जीवनात मार्गक्रमण करत आहेत आणि त्यांच्या विचारांची बीजे आज समाजाच्या विविध स्तरांमध्ये रुजत आहेत.
      संतोष पाटील यांचे कार्य हे शिक्षणपुरते सीमित नाही. त्यांची समाजसेवा ही त्यांची खरी ओळख आहे. ते शोभाई निराधार वृद्धाश्रम, कुरंगी (तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) येथे सचिव म्हणून कार्यरत आहेत. वृद्धाश्रमातील अनेक वृद्धांना त्यांची साथ म्हणजे आधार वाटते. या सेवाभावी संस्थेमार्फत त्यांनी अनेक गरजू आणि निराधार व्यक्तींना नवा विश्वास दिला आहे. सामाजिक कार्यात ते केवळ सहभाग घेत नाहीत, तर त्याचा केंद्रबिंदू होतात.
    खास बाब म्हणजे संतोष पाटील हे आपल्या व्याख्यानातून, सल्लागिरीतून किंवा शैक्षणिक कार्यातून मिळणारे मानधन स्वतःसाठी वापरत नाहीत. त्यांना जे काही मिळते, ते ते पुन्हा समाजकार्यास अर्पण करतात. या वृत्तीमुळे त्यांच्या कार्यात अधिकच पावित्र्य निर्माण झाले आहे. समाजाप्रती असलेली ही बांधिलकीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान देते.
      अखिल भारतीय बळीराजा संघटना भारत ही एक देशव्यापी संघटना असून शेतकरी, कामगार, समाजातील वंचित घटक आणि ग्रामीण जनतेच्या हक्कासाठी कार्य करणारी प्रमुख संस्था आहे. अशा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी संतोष पाटील यांच्यावर सोपवली जाणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. ही निवड त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेवर, भाषिक प्रभावावर आणि जनतेशी संवाद साधण्याच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास आहे. त्यांनी या भूमिकेतून राज्यभरातील बळीराजाचा आवाज अधिक बुलंद करण्याची संधी मिळाली आहे.
    संतोष पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, सामाजिक संस्था, पत्रकार, साहित्यिक, राजकीय कार्यकर्ते – सर्वांच्याच प्रतिक्रिया एकाच स्वरात आहेत : “हा योग्य व्यक्तीला मिळालेला सन्मान आहे.” ही निवड फक्त एका पदाची नसून एका विचारांची, एका प्रवृत्तीची आणि एका सेवाभावाची मान्यता आहे.
      संतोष पाटील हे अनेक तरुणांसाठी आदर्श आहेत. त्यांनी कधीही प्रसिद्धीच्या मागे धाव घेतली नाही, पण त्यांचे कार्य त्यांना प्रसिद्धी देत गेले. ते समाजसेवेचे एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी प्रत्येक भूमिकेतून समाजहिताच केंद्रस्थानी ठेवले आहे. शिक्षक, लेखक, व्याख्याते, समुपदेशक, कार्यकर्ते आणि आता एक प्रभावी प्रवक्ता — ही सर्व रूपे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहेत.
    या नव्या प्रवक्तेपदाच्या निमित्ताने त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी येऊन ठेपली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद, संघटनेच्या भूमिका माध्यमांमार्फत स्पष्ट करणे, जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे, धोरणांचे सादरीकरण करणे आणि बळीराजाचा आवाज बुलंद करणे यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांनी आपल्या विचारांद्वारे आणि सेवाभावाने ही भूमिका साकारल्यास, संघटनेला अधिक बळ मिळेल आणि समाजाला नव्या उमेदीची दिशा.
    या निवडीमुळे सामाजिक चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून, संतोष पाटील यांचा प्रवक्ता म्हणून प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, याबाबत शंका नाही.

कर्तृत्वाची शिदोरी — मुख्याध्यापक सुकदेव गिते यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

0

Loading

पाचोरा- शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचे बीज पेरून त्यांचे भविष्य उज्ज्वल करतो. शिक्षणाच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसतात, तर मूल्यसंस्काराचे दीपस्तंभही असतात. अशाच एका कर्मयोगी शिक्षकाचा सेवापूर्तीचा प्रसंग म्हणजे त्यांच्या कार्याचे गौरवगान आणि समाजाचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची एक सन्माननीय संधी असते.                 गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा संचलित कै. परशराम कोंडिबा शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड, पाचोरा येथे अशाच एका गौरवशाली शिक्षकाच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सुकदेव विठ्ठल गिते हे नियत वयोमानानुसार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती सत्कार सोहळा हा त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळातील कर्तृत्वाला अभिवादन करण्याचा एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.                                                                 मा. सुकदेव विठ्ठल गिते यांनी आपल्या शिक्षक म्हणून सुरुवातीच्या दिवसांपासूनच एक आदर्श भूमिका पार पाडली आहे. त्यांनी केवळ शालेय अभ्यासक्रम शिकविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये, सामाजिक जाणीवा आणि राष्ट्रनिष्ठा जागवण्याचे कार्य केले. त्यांच्या तत्त्वनिष्ठ शिक्षणपद्धतीने शेकडो विद्यार्थी घडवले आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करण्यास सक्षम केले.                                           मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्य केले. शाळेच्या भौतिक सुविधांपासून शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत त्यांनी ठोस पावले उचलली. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसोबत सुसंवाद ठेवून एक संघभावना निर्माण केली आणि संस्थेच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिले                                                    या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव परशराम शिंदे भूषवणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाचा गजर केला आणि सामाजिक प्रबोधनाला दिशा दिली आहे.           कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सुधीरजी तांबे (माजी विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमात वेगळेच तेज निर्माण होईल.         त्याचप्रमाणे मा. बापूसाहेब सतिष परशराम शिंदे आणि मा. भाऊसाहेब अमोल पंडीतराव शिंदे (चेअरमन, गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था, पाचोरा) हेही या गौरव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.                                                   या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागातील विविध मान्यवर अधिकारी व व्यक्तीमत्त्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.त्यामध्ये मा. श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. जळगाव मा. विकास पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. जळगाव मा. समाधान एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी, पाचोरा मा. श्रीमती सरोज आर. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी, पाचोरा मा. अॅड. जे.डी. काटकर, सचिव, गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा मा. शिवाजी बी. शिंदे, सहसचिव, गिरणाई शिक्षण संस्था मा. निरज पी. मुणोत, उपाध्यक्ष, गिरणाई शिक्षण संस्था मा. अभिजीत ए. खैरनार, केंद्रप्रमुख, भातखंडे तसेच गिरणाई शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे मान्यवर या मान्यवरांची उपस्थिती म्हणजे मा. गिते सरांच्या कार्याबद्दल समाजातील प्रत्येक स्तरातून मिळणारा सन्मान आहे.                                 कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सन्मानपूर्वक, भावनिक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात होणार आहे. यामध्ये मा. गिते सरांच्या कार्याचा आढावा, त्यांचे अनुभवकथन, सहकार्यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेली मनोगते, विद्यार्थ्यांच्या भावना, शाळेच्या प्रगतीचा आलेख आणि त्यांच्या सेवेतील प्रेरणादायी क्षण यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासोबतच पुढील पिढ्यांना आदर्श निर्माण करण्याचे कार्य होणार आहे मा. सुकदेव विठ्ठल गिते यांनी आपल्या सेवेनिष्ठा, शिस्तप्रियता, विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जे योगदान दिले आहे, ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस केवळ एक कार्याचा शेवट नाही, तर एका आदर्श शिक्षकाच्या गौरवाचा दिवस आहे. अशा सेवाभावी शिक्षकाच्या जीवनप्रवासावर आपले श्रद्धा-सुमन अर्पण करत, त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देणे हे सर्वांच्याच कर्तव्याचे ठरेल.        सेवापूर्ती सत्कार समिती, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, तसेच गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत मनोभावे आणि सन्मानपूर्वक करण्यात आले आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी थरारक विजय मिळवत मोसमाची दमदार सुरुवात केली. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५५/९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने १९.१ षटकांत ६ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले.
मुंबई इंडियन्सचा डाव अपेक्षेप्रमाणे सुरू झाला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव (२९ धावा) आणि तिलक वर्मा (३१ धावा) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा (०), रॉबिन मिन्झ (३) आणि विल जॅक्स (११) लवकर बाद झाले. शेवटी, दीपक चहरच्या १५ चेंडूंतील २८ धावांच्या खेळीमुळे मुंबईला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली.
चेन्नईच्या फिरकीपटू नूर अहमदने प्रभावी कामगिरी करत ४ षटकांत केवळ १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्यांच्या साथीला खलील अहमद (३/२९) आणि नथन एलिस (१/३८) यांनी भक्कम साथ दिली. 
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या राचिन रवींद्र (६५*) आणि ऋतुराज गायकवाड (५३) यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. गायकवाडने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत २०३.८५ स्ट्राईकरेटने खेळ केला. रवींद्रने संयमी खेळ करत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला.
मुंबईकडून विघ्नेश पुथूरने ४ षटकांत ३२ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. विल जॅक्स आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, चेन्नईच्या आक्रमक खेळासमोर ते अपुरे पडले.
अत्यंत प्रभावी गोलंदाजीसाठी नूर अहमदला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या अचूक फिरकीमुळे मुंबईचे फलंदाज अडचणीत आले आणि चेन्नईच्या विजयाचा पाया रचला गेला.

*उद्याचा सामना: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स*

२४ मार्च २०२५ रोजी आयपीएल २०२५ च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येतील. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखरा रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात असतील, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

विरारमध्ये ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीला उत्साहपूर्ण मानवंदना

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विरार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रोत्साहनाने हा विशेष सोहळा विजयानंद पाटील रंगायतन, जुने विवा महाविद्यालय येथे २१ मार्च २०२५ रोजी संपन्न झाला.

अहिल्यादेवींच्या जीवनगाथेचे नाट्यमय सादरीकरण: बाल अहिल्येची भूमिका कु. स्नेहा घाडगे हिने साकारली, तर मोठ्या अहिल्येची भूमिका कु. अनुश्री शिंदे हिने सादर केली. त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

नृत्य, संगीत आणि साहसदृश्यांची अनुपम मेजवानी: ऐतिहासिक करपल्लवी प्रकारात नवनाथ शिंदे व अमित शिंदे यांनी गुप्त कलांचे सादरीकरण केले.

छावा चित्रपटाचे साहसदृश्य दिग्दर्शक भार्गव शेलार यांच्या मर्दानी खेळांनी प्रेक्षक स्तिमित झाले. संगीताची जबाबदारी सिद्धेश लाड आणि श्री संजय बालसाने यांनी उत्तम प्रकारे सांभाळली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन परेश दाभोळकर यांनी केले. सुप्रसिद्ध गायक विजय कर्जावकर, पूजा सावंत (जय जय महाराष्ट्र फेम) आणि दिनेश नाडकर यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गिनीज रेकॉर्ड होल्डर भावना चौधरी पाटील यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स, भारत संस्थेच्या नर्तकांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य संचलनाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घडवून आणण्यात आला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमेय पाटील यांनी या कार्यक्रमाचे देखणे दिग्दर्शन केले.

श्री विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य लाभले. ट्रस्टचे श्री. पिंगुळकर, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या श्रीमती परांजपे, प्राचार्या मुग्धा लेले, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. कोमल पाटील आणि सृजनचे संदीप पाठक यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. विरारमधील अनेक मान्यवर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उत्सव नव्हता, तर स्त्रीशक्तीचा जागर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला सन्मानपूर्वक अभिवादन होते.

कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय साहित्य व फळवाटप कार्यक्रम

0

Loading

अमळनेर – ढेकू सिम, ता. अमळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांप्रती आपुलकी आणि शिक्षणप्रेम यांचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या भावपूर्ण श्रद्धांजली सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करणारे शब्द उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनाही अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्यात आली, ज्यातून त्यांना प्रेरणा मिळेल, असा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी. बी. भोसले सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती दिली. त्यांनी सामाजिक न्याय, संघटन आणि शैक्षणिक मूल्य यांचा उहापोह करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, आणि अण्णासाहेब पाटील यांचे जीवन त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.”
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. विश्वास पाटील सर यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनचरित्रावर सखोल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “सामाजिक न्यायासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, समाज संघटनासाठी अविरत झगडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार अण्णासाहेब पाटील. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा समाजकल्याणासाठी समर्पित केली होती.”
श्री. विश्वास पाटील सर यांनी त्यांच्या भाषणात असेही सांगितले की, “अण्णासाहेबांनी आपल्यात संघटनशक्ती निर्माण करून समाजाच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांनी वेळप्रसंगी आपल्या जीवाचेही बलिदान दिले, जेणेकरून पुढील पिढ्यांना सामाजिक न्याय आणि समतेचा लाभ मिळू शकेल.”
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त करत अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली. सरपंच सौ. सुरेखा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अशा थोर व्यक्तिमत्त्वाचे पुण्यस्मरण करताना आपण त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे ही खरी श्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमात शरद पाटील (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अमळनेर), किशोर पाटील (उपसरपंच), गोकुळ पाटील (पिंपळे), आर्डी शरद पाटील (तालुका अध्यक्ष), पुरुषोत्तम चौधरी (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर यांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांप्रती दाखवलेली जबाबदारी. ढेकू सिम येथील जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन करत उत्कृष्ट नियोजन केले. त्यांचे अथक प्रयत्न आणि नेतृत्वामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चौधरी सर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले. त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या शब्दांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.
आभारप्रदर्शन उमेश पाटील यांनी करत सर्व मान्यवर, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सामाजिक न्यायाची प्रेरणा : कै. अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांची उजळणी करण्यात आली.
शालेय साहित्य वाटप : गरजू विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पुस्तके, पाटी, दप्तर, व अन्य शालेय साहित्य देण्यात आले.
फळवाटप उपक्रम : आरोग्यविषयक जागरूकतेसाठी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन : कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिक्षणाची आवड आणि सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. संघटन शक्तीवर भर : समाज संघटनाचे महत्त्व, एकत्रितपणे संघर्ष करण्याची गरज यावर विस्तृत भाष्य करण्यात आले.
कै. अण्णासाहेब पाटील हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक सामाजिक विचारवंत, संघटक आणि समाजसेवक होते. मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. त्यांचा आवाज हा केवळ संसदेत नव्हता, तर जनतेच्या मनात होता. त्यांनी बहुजन समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य केले आणि आपल्या कृतीतून सामाजिक न्यायाला सर्वोच्च स्थान दिले.
त्यांचे विचार आणि कृती आजही नव्या पिढीला दिशा देणारे ठरतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची स्मृती जपली जाते, आणि समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रेरणा दिली जाते.
या कार्यक्रमाने सामाजिक संवेदनशीलता आणि समाजाभिमुख शिक्षण यांचे सुंदर उदाहरण घालून दिले. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना मदत करून, त्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा देण्याचा उद्देश पूर्णपणे साध्य झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाने सामाजिक बांधिलकीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.

आयपीएल इतिहासात नवा विक्रम! एसआरएचने नोंदवली सर्वोच्च धावसंख्या

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये २३ मार्च २०२५ रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाने धावांचा पाऊस पाडत एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्धच्या सामन्यात एसआरएचने अवघ्या २० षटकांत २८६/६ धावा फटकावत आयपीएल इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवली.

ईशान किशनचे वादळी शतक एसआरएचच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ईशान किशनने केवळ ४७ चेंडूत १०६ धावांची वादळी खेळी साकारली. ११ चौकार आणि ६ षटकारांनी सजलेल्या या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २२५.५३ होता. त्याला ट्रॅव्हिस हेड (६७ धावा, ३१ चेंडू) आणि हेनरिक क्लासेन (३४ धावा, १४ चेंडू) यांचे दमदार साथ लाभली.

प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सनेही जोरदार प्रयत्न केला, पण २४२/६ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकले. संजू सॅमसन (६६ धावा) आणि ध्रुव जुरेल (७० धावा) यांनी संघाला उभारी देण्याचा प्रयत्न केला, पण एसआरएचच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा प्रतिकार अपुरा पडला.

एसआरएचच्या सिमरजित सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. राजस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चक्क एकही बळी घेऊ शकला नाही.

या विजयासह एसआरएचने आयपीएल २०२५ मधील आपली मोहीम दमदार विजयानिशी सुरू केली. ईशान किशनच्या तडाखेबंद खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या सामन्याने आयपीएलच्या चाहत्यांना धमाकेदार सुरुवात मिळाली असून, यंदाचा हंगाम अधिक रोमांचक होणार हे निश्चित आहे!

“अवैध धंद्यांची अघोषित स्पर्धा : पत्रकार व पोलिस यांच्यातील शितयुद्धाचे पडसाद”

0

Loading

पाचोरा -पाचोरा शहर, तालुका स्पेशली पिंपळगाव, नगरदेवळा या परिसरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांची वाढती चलती व तीव्र होत चाललेली व्यावसायिक स्पर्धा ही स्थानिक प्रशासनासाठी व सभ्य नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या धंद्यांच्या आर्थिक लाभामागील शर्यत इतकी तीव्र झाली आहे की, केवळ कायद्याचे उल्लंघनच नव्हे, तर या अवैध धंद्यांचे चालक एकमेकांच्या पाय ओढण्यासाठी स्थानिक माध्यमांचा आणि पत्रकारांचा वापर करत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
हे चित्र केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून सामाजिक स्वास्थ्य व पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यामुळे, या सर्वच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत निष्पक्ष भूमिका घेणे अत्यावश्यक ठरत आहे.
पाचोरा, पिंपळगाव व नगरदेवळा या ग्रामीण-नगर मिश्रित परिसरांमध्ये बेकायदेशीर धंद्यांचा विस्तार विविध स्वरूपात वाढताना दिसतो. त्यामध्ये बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री, जुगार अड्डे, सट्टा व्यवसाय, चक्री, पोटली ,गुटखा, तंबाखूचे प्रतिबंधित उत्पादन, वाळू तस्करी, तसेच परवाना नसलेली बार व लॉजेस चालवणे , गावठी कट्टे यांचा समावेश आहे.
हे सर्व व्यवसाय केवळ सामाजिक स्वास्थ्याला धोका देणारे नाहीत तर स्थानिक तरुणवर्गाला दिशाभूल करणारे आहेत. यामागे असलेले कमी वेळात जास्त ‘आर्थिक आकर्षण आणि गुन्हेगारीच्या साहाय्याने मिळणारा अवैध लाभ यामुळे हे धंदे अधिकाधिक फोफावत आहेत.
या अवैध धंद्यांच्या चालकांमध्ये आता फक्त अधिक कमाईची स्पर्धा उरलेली नसून, एकमेकांचा धंदा बुडवण्यासाठी सत्ताधारी व प्रभावशाली माध्यमांचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी असेही उघड झाले आहे की, एक प्रतिस्पर्धी दुसऱ्याविरुद्ध ठोस पुरावा देण्याऐवजी, पत्रकार किंवा स्थानिक न्यूज पोर्टल्सकडून बातम्या प्रसिद्ध करून दुसऱ्याचा धंदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे प्रकार इतके सूक्ष्मपणे रचले जातात की, बातम्यांच्या मथळ्यांतून किंवा विशिष्ट पत्रकारांमार्फत मुद्दाम विशिष्ट व्यक्ती व व्यवसायाचाच उल्लेख करून बातमी प्रसिद्ध केली जाते. यामुळे त्या व्यवसायावर अचानक पोलिसांची नजर जाते, तपास होतो आणि धंदा बंद होतो. दुसऱ्या धंद्यावाल्याला याचा फायदा होतो.
या प्रकारांमुळे पत्रकार आणि पोलीस यांच्यातील सहकार्याची पारंपरिक साखळी तुटू लागली आहे. पोलिसांच्या दृष्टीने पत्रकारांच्या माहिती मधील वस्तुस्थितीपेक्षा हेतू महत्त्वाचा वाटू लागला आहे, तर पत्रकारांच्या बाजूने पोलीस कारवाईतील निवडकपणा आणि ढिलाईवर बोट ठेवले जात आहे.
या परस्परसंशयामुळे एकप्रकारचे ‘शितयुद्ध’ निर्माण झाले आहे. पोलिसांना वाटते की पत्रकार एखाद्याच्या सांगण्यावरून बातमी करत आहेत, तर पत्रकारांना वाटते की पोलीस निवडक कारवाई करत एका गटाला वाचवत आहेत. अशा स्थितीत दोघांमधील विश्वास हरवून स्थानिक गुन्हेगारीला अप्रत्यक्षपणे संधी मिळत आहे.
ही समस्या केवळ स्थानिक पातळीपर्यंत मर्यादित न ठेवता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नियमित गुप्त तपास, सूत्रबद्ध माहिती संकलन, आणि निष्पक्षता यावर भर देऊन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे.
विशेषतः एखाद्या पत्रकाराच्या बातमीच्या आधारावर कारवाई करताना पोलीस प्रशासनाने त्या बातमीतील माहितीची खातरजमा करणे व अन्य अवैध धंद्यांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा हे एकपक्षीय कारवाईचे रूप घेतल्यास त्याचे सामाजिक व प्रशासकीय दुष्परिणाम मोठे होऊ शकता
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. त्यामुळे तिचा वापर केवळ आर्थिक व व्यक्तिगत हितसंबंधांसाठी झाल्यास पत्रकारितेचा धर्मच लोप पावतो. पत्रकारांनी कोणतीही बातमी देताना निष्पक्षतेचे भान ठेवणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे संपादक व न्यूज पोर्टल्सचे मालक यांच्यावरही सामाजिक उत्तरदायित्व आहे. एकतर्फी आरोपांच्या बातम्या प्रसिद्ध करण्याऐवजी वस्तुनिष्ठ माहिती, दोन्ही बाजूंनी मते घेऊन सखोल विश्लेषणासह बातम्या द्याव्यात.
अवैध धंद्यांमुळे समाजाची नैतिक मूल्ये ढासळत आहेत, तर स्पर्धेच्या नावाखाली माध्यमांचा गैरवापर होत आहे. अशा वेळी पत्रकार व पोलीस यांनी एकमेकांवर संशय ठेवण्याऐवजी एकमेकांचे साथीदार म्हणून काम करणे गरजेचे आहे.
दोघेही समाजासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने सर्व अवैध धंद्यांवर एकाच निकषाने कारवाई व्हावी, आणि पत्रकारिताही निष्पक्ष व मूल्याधिष्ठित राहावी, हीच अपेक्षा.

काव्य पाठ प्रतियोगिता में एम. एम. महाविद्यालय की छात्राओं — चेतना हिरे और सायमा सय्यद का सम्मान

0

Loading

पाचोरा – विद्यार्थियों में सृजनशीलता का विकास करना, भाषा की सुंदरता को आत्मसात करना और अभिव्यक्ति के लिए एक उपयुक्त मंच प्रदान करना — इन्हीं उद्देश्यों को लेकर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के अंतर्गत कार्यरत भाषा अध्ययन प्रबोधिनी एवं अनुसंधान केंद्र, हिंदी विभाग तथा बैंक ऑफ बड़ौदा के संयुक्त तत्वावधान में दिनांक 21 मार्च 2025 को एक विशेष और प्रतिष्ठित शैक्षणिक एवं साहित्यिक आयोजन ‘राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन प्रतियोगिता’ एवं ‘स्वतंत्र काव्य पाठ प्रतियोगिता’ का सफलतापूर्वक आयोजन किया गया।
इस प्रतियोगिता में संपूर्ण भारत के विभिन्न महाविद्यालयों के प्रतिभाशाली छात्र-छात्राओं ने सहभागिता की। इस राष्ट्रीय स्तर के मंच पर श्री. सेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान एवं वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा की दो छात्राओं ने अपनी प्रतिभा की चमक दिखाकर महाविद्यालय का नाम गौरवान्वित किया है।
काव्य पाठ प्रतियोगिता में द्वितीय वर्ष साहित्य वर्ग की छात्रा कु. चेतना रणदीप हिरे ने अत्यंत प्रभावशाली और सृजनात्मक शैली में “उठो द्रौपदी शस्त्र उठा लो” कविता का पाठ किया। इस कविता में केवल शब्द नहीं थे, बल्कि स्त्रीशक्ति की पुकार, न्याय की मांग और सामाजिक परिवर्तन की प्रेरणा समाहित थी। उनके ओजपूर्ण पाठ ने न केवल उपस्थित परीक्षकों को प्रभावित किया, बल्कि श्रोताओं के हृदय को भी गहराई से स्पर्श किया।
उनकी दमदार प्रस्तुति के बल पर उन्होंने राष्ट्रीय काव्य पाठ प्रतियोगिता में प्रथम स्थान प्राप्त किया और एम. एम. महाविद्यालय का परचम राष्ट्रीय स्तर पर लहराया। यह कविता केवल प्रस्तुति नहीं, बल्कि सामाजिक चेतना का आह्वान बन गई।
इस प्रतियोगिता की एक और उल्लेखनीय उपलब्धि रही प्रथम वर्ष साहित्य वर्ग की छात्रा कु. सायमा शफी सय्यद की सहभागिता। उन्होंने “एकता और सांस्कृतिक गौरव की वैश्विक आवाज” विषय पर अत्यंत विचारोत्तेजक, अनुसंधानपरक और भावनात्मक रूप से समृद्ध निबंध प्रस्तुत किया।
सायमा ने अपने निबंध में भारतीय संस्कृति की समावेशिता, एकता और वैश्विक मूल्यों की तार्किक एवं भावनात्मक व्याख्या की। उनके लेखन में राष्ट्रप्रेम, सांस्कृतिक आत्मगौरव और युवा पीढ़ी के लिए प्रेरणा की भावना प्रबल रूप से दिखाई दी।
इस उत्कृष्ट लेखन के लिए उन्हें राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन प्रतियोगिता में तृतीय स्थान प्राप्त हुआ, जिससे महाविद्यालय की शैक्षणिक गुणवत्ता और साहित्यिक योगदान को देश स्तर पर मान्यता मिली।
इस उल्लेखनीय उपलब्धि के उपलक्ष्य में महाविद्यालय में एक विशेष सम्मान समारोह आयोजित किया गया, जिसमें महाविद्यालय के चेयरमैन माननीय श्री नानासाहेब संजय वाघ तथा उप-चेयरमैन माननीय श्री नानासाहेब वी. टी. जोशी के करकमलों से चेतना हिरे और सायमा सय्यद का शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह और प्रमाणपत्र देकर सार्वजनिक रूप से सम्मान किया गया।
इस अवसर पर संस्थान के अध्यक्ष एवं पूर्व विधायक माननीय भाऊसाहेब दिलीप वाघ, मानद सचिव एडवोकेट माननीय दादासाहेब महेश देशमुख, कनिष्ठ महाविद्यालय प्रबंधन समिति के चेयरमैन प्रो. दादासाहेब सुभाष तोतला, संस्थान के अन्य पदाधिकारी, संचालकगण, प्राध्यापकगण एवं छात्र-छात्राएं बड़ी संख्या में उपस्थित थे।
इस सफलता पर प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. वी. पाटील, डॉ. क्रांति सोनवणे, प्रो. जयश्री वाघ आदि शिक्षकों ने छात्राओं का अभिनंदन किया और उन्हें भविष्य के लिए शुभकामनाएं दीं।
उन्होंने कहा, “यह उपलब्धि केवल छात्राओं की व्यक्तिगत सफलता नहीं है, बल्कि यह महाविद्यालय के समर्पित शिक्षण, मार्गदर्शन और छात्रों के सर्वांगीण विकास के प्रति प्रतिबद्धता का प्रत्यक्ष प्रमाण है।”
कु. चेतना हिरे ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा, “मैं हमेशा साहित्य के माध्यम से सामाजिक संदेश देने का प्रयास करती रही हूँ। इस प्रतियोगिता ने मुझे राष्ट्रीय स्तर पर अपनी अभिव्यक्ति प्रस्तुत करने का अवसर दिया — यह मेरे लिए अत्यंत गर्व की बात है।”
कु. सायमा सय्यद ने भी अपनी खुशी प्रकट करते हुए कहा, “मेरे निबंध लेखन का उद्देश्य भारतीय संस्कृति की महानता को वैश्विक स्तर पर प्रस्तुत करना था। यह पुरस्कार मेरे शैक्षणिक जीवन की एक महत्वपूर्ण उपलब्धि है।”
इस राष्ट्रीय स्तर की सफलता से एम. एम. महाविद्यालय, पाचोरा की शैक्षणिक, साहित्यिक एवं सांस्कृतिक पहचान को एक नई ऊंचाई प्राप्त हुई है। छात्राओं की यह प्रेरणादायक उपलब्धि अन्य विद्यार्थियों के लिए प्रेरणास्त्रोत बन चुकी है।
शिक्षा केवल पाठ्यपुस्तकों तक सीमित न रहकर यदि सोच, सृजन और सामाजिक योगदान का माध्यम बन जाए — तो यही असली सफलता है। इस अवसर ने इस विचार को प्रत्यक्ष रूप से सिद्ध कर दिया है।

ताज्या बातम्या

error: Content is protected !!