Home Blog Page 138

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धामुंबई केंद्रातून इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून मोरया प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई या संस्थेच्या इन्शाअल्ला या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (१६ जानेवारी) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-     
प्रवेश कला क्रीडा मंच या संस्थेच्या तुझ्या रुपात मी…या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक महेंद्र दिवेकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक सुशील इनामदार (नाटक- इन्शाअल्ला), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रसन्न निकम                (नाटक- इन्शाअल्ला), द्वितीय पारितोषिक – श्याम चव्हाण (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), नेपथ्य : प्रथम पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक-इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक- कायाप्पाचा पाडा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक राजेश चव्हाण (नाटक- मी तर बुआ अर्धा शहाणा), द्वितीय पारितोषिक अनिल कासकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशील इनामदार (नाटक -इन्शाअल्ला) व समृध्दी कोटगी (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अक्षता सुर्वे (नाटक- इन्शाअल्ला), शांती बावकर (नाटक- तुझ्या रुपात मी…), अपूर्वा बावकर (नाटक- घर त्या तिघांचं), अमिषा घाग (नाटक- तुझ्या रुपात मी…), अंकिता आग्रे (नाटक- संघर्ष जगण्याचा – लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा), सुशील पवार (नाटक- तुझ्या रुपात मी…),  हेमंत घाटगे (नाटक- इम्युनिटी द व्हाईस ऑफ टॉलरन्स), आत्माराम धर्णे (नाटक- धुमशान), प्रणय भुवड (नाटक-मोक्ष), श्वेत बगाडे (नाटक-द हंग्री क्रो).

२३ डिसेंबर, २०२४ ते १४ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमाकांत भालेराव, विवेक खेर आणि प्रतिभा तेटु यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर वाशी, नवी मुंबई केंद्रातून ‘न्युटनचा लायन’ प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत वाशी, नवी मुंबई केंद्रातून गुरुकुल द डे स्कूल या संस्थेच्या न्यूटनचा लायन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच झुपर्झा, कल्याण या संस्थेच्या ठोंब्या ठोंबीची गोष्ट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वाशी, नवी मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक वृशांक कवठेकर (नाटक-न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक रश्मी घुले (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट), प्रकाश योजनाः प्रथम पारितोषिक विनोद राठोड (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक शंतनु साळवी (नाटक-वाचवाल का ?), नेपथ्यः प्रथम पारितोषिक वैष्णवी देव (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक संदेश पडवळ (नाटक- रोज हवे नवे नवे), रंगभूषाः प्रथम पारितोषिक श्रृती गणपुले (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक दिपक कुंभार (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकः दिया गीते (नाटक- न्युटनचा लायन) व मानस तोंडवळकर (नाटक-संग बांधे डोर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तनिष्का अपणकर (नाटक- शॉटकट), समिक्षा सोनावणे (नाटक- शपथ), हर्षिका वर्तेकर (नाटक- आदिबांच्या बेटावर), रिदीमा सातवे (नाटक-फुलराणी), प्रणती थोरात (नाटक-सरणार कधीत तम), अर्जुन आमडेकर (नाटक- केअर इज), स्वरांग दाबके (नाटक- न्युटनचा लायन), लाभ घुले (नाटक- ठोंब्या ठोंब्याची गोष्ट) धनुष पाटील (नाटक- राखेतून उडाला मोर) अंगद सिनलकर (नाटक-एका माळेचे मणी)

दि. ६ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत सैंदाने, जुई बर्वे आणि  विजय शिंगणे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुख्य समन्वयक राकेश तळगावकर, मुकुंद जोशी, प्रियंका फणसोपकर, सचिन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

‘मी’ चा प्रवास हा मराठी आत्मकथनातून अधिक जवळून कळतो – प्रा. प्रदीप पाटील

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभागातील ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२५’ आणि ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अशा उपक्रमातून महाविद्यालयात विविध व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन मराठी विभाग आणि जी ओ शाह ग्रंथालयाने आयोजित केले आहे. जास्तीतजास्त विद्यार्थिंनी यात सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी केले व मराठी विभागास शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मराठी  विभागाने आयोजित केलेल्या ‘आत्मकथनातील ‘मी’चा प्रवास’ या विषयावर श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभागातील प्रा. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थिंनीना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, ‘कुठलीही महान व्यक्ती वाचनामुळेच महान बनू शकते हे त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतरच समजते. ज्याला वाचनाची आवड आहे त्याला कुठेही कोणत्याही वेळी कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कितीही लांबचा प्रवास असो. हातातील पुस्तक त्या प्रवासाचा कंटाळा आणून देत नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण अशा थोर व्यक्तींना आपल्या जीवनातील बराच काळ तुरुंगात काढावा लागला. तेथे वाचन या छंदाने त्यांना उत्तम साथ दिली. आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे वाचनातूनच आपल्याला कळते. आयुष्यातील वेगवेगळ्या दिशांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य वाचनातून प्राप्त होते. चरित्र व आत्मचरित्र यातील फरक व आत्मचरित्र व आत्मकथन यातील फरक त्यांनी विद्यार्थिंनींना समजावून सांगितला. ‘मी’ चा प्रवास हा मराठी आत्मकथनातून अधिक जवळून कळतो. तसेच आत्मकथनात ‘मी’ बरोबर त्याच्या समाजाचे चित्रण कसे केले जाते याचेही त्यांनी अनेक आत्मकथनांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. यावेळी आवर्जून ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’, लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतीचित्रे’, दया पवार यांचे ‘बलुतं’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशा अनेक आत्मचरित्रांचा त्यांनी आढावा घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ह्या व्याख्यानास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

सुसज्ज आणि उत्तमरित्या कार्यरत जिल्ह्यातील एक आदर्श संघ – ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांचे गौरवोद्गार

0

Loading

चोपडा – चोपड्यातील ज्येष्ठ नागरिक संघाने जिल्ह्यातील अग्रगण्य संघ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. संघाच्या सभागृहाचे उद्घाटन आणि खुल्या व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना अध्यक्ष व ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. “चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ चोपडाच नव्हे, तर जिल्ह्यातील एक आदर्श संघ आहे. याठिकाणी उत्तम सोयीसुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, आणि व्यायामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संघाने सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सेवा उपक्रम राबवले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.  ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अशा या संघाचे मुख्यालय कै. मगनलाल रामदास बडगुजर (साळुंखे) सभागृहात आहे, जे विद्यमान आमदार प्रा. आण्णासो. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या तत्कालीन निधीतून उभारण्यात आले आहे. सभागृहाच्या उभारणीत बडगुजर कुटुंबीयांनी मोठे योगदान दिले आहे.
सहकार्याची कृतज्ञता व्यक्त करताना जिल्हा क्रीडा विभाग व नगरपालिका चोपडा यांचे मोलाचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या नागरिकांनी संघाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघाचे कार्यालय आणि खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार प्रा. आण्णासो. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, मुंबईत महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे लागल्याने त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून संघाच्या यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात विनय पाठक यांच्या बासरी वादनाने झाली, ज्यामध्ये गणेश वंदनेचे सुमधुर सादरीकरण करण्यात आले. जिजाबराव नेरपगारे यांच्या प्रार्थनेने सोहळ्याला आध्यात्मिक प्रारंभ झाला.         या उद्घाटन सोहळ्यात न.प. मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील, कृ.उ.बा. संचालक श्री. गोपाल पाटील, बंधन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. भरत पवार, माजी नगराध्यक्ष श्री. रमणलाल गुजराथी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामात मोलाचा वाटा उचलणारे संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जे.एस. नेरपगारे, सहसचिव इंजि. विलास पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील यांची देखील उपस्थिती होती. संघाच्या कार्यकारिणीत माजी कोषाध्यक्ष मुख्या सुभाष पाटील, एम.डब्ल्यू. पाटील, मधुकर पाटील यांचेही मोलाचे योगदान आहे.                                                डॉ. विकास हरताळकर यांनी आपल्या भाषणात मधुमेहाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली. “मधुमेह हा एक मूक शत्रू असून तो हळूहळू डोळ्यांना, किडनीला आणि शरीराच्या विविध अवयवांना हानी पोहोचवतो. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि वैद्यकीय तपासणीची आवश्यकता आहे,” असे त्यांनी सांगितले.        चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने आजवर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, व्यायाम सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. संघाच्या कार्याचा आवाका विस्तृत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय आहे.                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सचिव एन.डी. महाजन यांनी केले. त्यांनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला आणि पुढील कार्यासाठी दिशादर्शन केले. प्रा. श्याम गुजराथी यांनी आभार प्रदर्शन केले आणि उपस्थितांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने करण्यात आला.                                     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका फेस्कॉम सचिव शांताराम पाटील यांनी केले. त्यांना संघ सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी साथ दिली. या उत्सवमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचेआणि अभिमानाचे भाव होते.                                            चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने जिल्ह्यातील इतर संघांसाठी एक आदर्श उभा केला आहे. उत्तम व्यवस्थापन, नवनवीन उपक्रम, आणि समाजसेवेच्या कटिबद्धतेमुळे संघाची प्रतिष्ठा दिवसेंदिवस उंचावत आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी यापुढेही असेच एकत्रित राहून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.                                  चोपड्यातील या अग्रगण्य संघाने सामाजिक सेवेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचा वसा घेतला आहे, जो खरोखरच प्रेरणादायी आहे.

ॲड.सुनील आत्माराम पाटील यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती दिली आहे

0

Loading

पाचोरा – येथील सुप्रसिद्ध विधीतज्ञ सुनील पाटील ( MO . 9960734153 ) यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती दिली आहे                                                           त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे कै. आण्णा साहेब आत्माराम नारायण पाटील यांचे ते सुपुत्र त्यांच्या वडिलांचा जीवनप्रवास आणि त्यांचा समाजात केलेला योगदान अतिशय गौरवपूर्ण आणि आदर्श आहे. ते पेशाने वकील होते तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व एक शाही नेतृत्वाचे उदाहरण आहे. पाचोरा तालुक्यात त्यांचे कार्य आणि त्यांची भूमिका समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अत्यंत महत्त्वाची होती.
    स्व आत्माराम नारायण पाटील हे मौजे घोसला, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजी नगर (माजी औरंगाबाद) येथील रहिवासी होते. ते एक अत्यंत साधे, प्रगल्भ आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व असलेले होते. सन 1969 मध्ये वकिलीची पत्करली आणि पाचोरा येथील वकिली व्यवसाय सुरू केला. या कालावधीत, त्यांनी केवळ न्यायालयातच नव्हे, तर समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले.
    आण्णासाहेब पाटील यांचे जीवन तत्त्वज्ञान नेहमीच इतरांमध्ये उत्तम गुण निर्माण करण्याचे होते. त्यांनी वकिलीच्या व्यवसायात ज्या प्रकारे प्रामाणिकपणाने कार्य केले, त्यावरून त्यांच्या कार्याची उंची स्पष्ट होते. ते केवळ वकील म्हणूनच ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांचे नाव आजही पाचोरा आणि आसपासच्या परिसरात आदराने घेतले जाते.
       त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा समाजासाठी त्यांनी दिलेला संघर्ष. पाचोरा तालुका मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांचा संघर्ष मराठा समाजाच्या न्याय, समानता आणि विकासासाठी नेहमीच उभा होता. त्यांचे नेतृत्व पाचोरा शहरात खास ओळखले जात होते. ते शहरातील विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होते आणि त्यांच्यावर समाजातील प्रत्येक घटकाचे प्रेम आणि आदर होता.
  विशेषतः त्याकाळातील मराठा चहाचे नांव बदल पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. पाचोरा शहरातील प्रमुख चौकात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांचा एक आदर्श कार्याचे प्रतीक बनले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी आण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक आंदोलन उभारले गेले होते, ज्याने नफ्याचे किंवा स्वार्थाचे लक्ष न ठेवता, एक ऐतिहासिक कार्य म्हणून समाजात आदर मिळवला. त्यांचा हा संघर्ष आजही पाचोरा व आसपासच्या पंक्रोशित आठवला जातो.
   स्व आण्णासाहेब पाटील यांची समाजसेवा आणि नेतृत्व हे त्यांच्या कुटुंबातही झळाळून दिसत होते.
     त्यांचे सुपुत्र, अँड. सुनील आत्माराम पाटील ( MO . 9960734153 ) यांनीही त्यांच्या वडिलांच्या कार्याचा वारसा चालवला. अँड. सुनील पाटील यांनी सन 1995 मध्ये वकिली व्यवसाय सुरू केला आणि पाचोरा व भडगाव येथील न्यायालयात मोठे यश प्राप्त केले. त्यांना भारत सरकारने त्यांच्या कृतिशील कार्यासाठी नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती दिली आहे, जी त्यांच्या वकिली व्यवसायातील उच्चतम ओळख दर्शवते
     पाचोरा येथील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते, एडवोकेट सुनील आत्माराम पाटील   ( MO . 9960734153 ) यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती दिली आहे. ही नियुक्ती त्यांच्या कायदेशीर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि समर्पणाचा मान असलेल्या एक विशेष ओळख म्हणून मानली जात आहे. त्यांनी पाचोरा, भडगाव आणि आसपासच्या न्यायालयांमध्ये वकिलीच्या क्षेत्रात अत्यंत पारदर्शक आणि प्रगल्भतेने कार्य केले आहे. या नव्या जबाबदारीने त्यांची कायदेशीर प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे, तसेच समाजातील एक महत्त्वपूर्ण दृष्टीकोन आणले आहे.
ॲड. सुनील पाटील  ( MO . 9960734153 ) यांनी पाचोऱ्यातील श्री एम. एम. महाविद्यालयात त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. तेथेच त्यांचे विचारशील आणि अभ्यासशील व्यक्तिमत्त्व घडले. त्यांचा शालेय जीवनात उत्कृष्ट शैक्षणिक वर्तन आणि सामाजिक कार्यातील रुची प्रकटली,आपले पिताश्री अण्णासाहेब स्व आत्माराम पाटील यांची प्रेरणा जी त्यांना वकिली क्षेत्रात आपला करिअर निवडण्यास प्रेरित करीत होती.
  महाविद्यालयीन जीवनानंतर त्यांनी जळगाव येथील मणियार लॉ कॉलेजमधून कायदा शिक्षण पूर्ण केले. येथे त्यांनी कायद्यातील विविध क्षेत्रांमध्ये सखोल ज्ञान मिळवले आणि वकिली व्यवसायात करिअर सुरू करण्याची प्रेरणा मिळवली. 1995 मध्ये, लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून त्यांनी पाचोरा आणि भडगाव येथील न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला.
     वकिली व्यवसायाच्या प्रारंभातच, सुनील पाटील यांनी आपल्या मेहनतीने आणि नैतिकतेने न्यायालयात एक विशिष्ट स्थान निर्माण केले. त्यांना त्यांच्या कामामुळे ना केवळ पाचोरा, भडगाव किंवा आसपासच्या भागात, तर संपूर्ण जिल्ह्यात आदर मिळाला. त्यांनी आपल्या वकिलीच्या व्यवसायात नेहमीच पारदर्शकता आणि न्यायप्रियतेला महत्त्व दिले. त्यांच्या वकिलीमध्ये कायदेशीर प्रक्रियांचा सुस्पष्ट आणि परिपूर्ण पालन केला ज्यामुळे त्यांना ग्राहकांच्या विश्वासाचा ठोस आधार मिळाला.
   त्यानंतर सुनील पाटील यांनी ना केवळ वकिलीचे कार्य केले, तर विविध सामाजिक चळवळींमध्येही सक्रियपणे भाग घेतला. पाचोरा व भडगावातील समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या कामामुळे ते केवळ एक वकील म्हणून प्रसिद्ध नाहीत, तर समाजसेवक म्हणूनही ओळखले जातात.
    त्यांनी पाचोरा तालुक्यात समाजातील दुर्बल वर्गाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम राबवले. तसेच, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या हितासाठी काम करणारे असे नेतृत्व त्यांनी दाखवले. त्यांचे नेतृत्व, विचारशक्ती आणि कार्ये पाचोरा आणि आसपासच्या परिसरात आदराने घेतले जातात.
        अलीकडील भारत सरकारच्या निर्णयानुसार, एडवोकेट सुनील पाटील यांना नोटरी पदी नियुक्त केले आहे. नोटरी म्हणून त्यांची नियुक्ती त्याच्या कायदेशीर क्षेत्रातील निपुणता आणि समाजातील कर्तृत्वाची एक मोठी ओळख आहे. नोटरी म्हणजे काय? एक नोटरी कायद्याने अधिकृत केलेली एक व्यक्ती आहे, जी विविध कायदेशीर दस्तऐवजांची प्रमाणीकरण आणि सत्यतेची पुष्टी करते. एखादी कायदेशीर कागदपत्रं किंवा करार प्रमाणित करण्यासाठी नोटरीची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
      नोटरी म्हणून नियुक्ती मिळाल्यामुळे सुनील पाटील यांना कायदेशीर दस्तऐवजांची प्रमाणीकरण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या नवा कार्यक्षेत्रामुळे लोकांच्या आणि व्यवसायांच्या कायदेशीर कामकाजात सहकार्य मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. यामुळे पाचोरा आणि आसपासच्या क्षेत्रातील लोकांना न्यायालयीन कार्यवाहीमध्ये अधिक मदत मिळणार आहे.
     ॲड सुनील पाटील यांचे कुटुंब नेहमीच त्यांच्या कार्यात पाठींबा देत राहिले आहे. त्यांचे पिताश्री कै. आण्णा साहेब आत्माराम नारायण पाटील यांचे नेतृत्व आणि कार्य ही त्यांची प्रेरणा आहे. आण्णासाहेब पाटील यांचा वकिली व्यवसाय आणि समाजसेवा त्यांनी चालवलेली दृष्टी त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहिली. त्यांच्या पितृकार्याचा वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते.
  ॲड सुनील आत्माराम पाटील यांना भारत सरकारने नोटरी पदी नियुक्त केलेली आहे, हे एक ऐतिहासिक टप्पा आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्य समाजासाठी एक आदर्श बनला आहे. वकिली, समाजसेवा आणि कायदेशीर क्षेत्रातील कार्यांमुळे त्यांनी आपल्या कुटुंब, समाज आणि देशासाठी अपार योगदान दिले आहे. त्यांची नोटरी म्हणून नियुक्ती निश्चितच पाचोरा आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी एक मोठा आत्मविश्वास आणि प्रेरणा ठरली आहे म्हणुनच ॲड सुनिल पाटील यांचे कार्य आणि जीवनप्रवास पाचोरा शहरासाठी एक अमूल्य देणगी आहे.

पाचोरा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात तरुणाईचा जल्लोष, शेलापागोट्यांनी केली धमाल

0

Loading

पाचोरा येथील पीटीसी संस्थेच्या एम. एम. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांची मुक्तपणे प्रदर्शना केली. विशेषतः शेलापागोट्यांच्या कार्यक्रमाने एक अनोखी धमाल उडवली. विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पाहुणे यांच्याद्वारे समारंभाची साजशृंगारिकता आणि चैतन्यपूर्ण वातावरण यामुळे स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
    या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालय समितीचे चेअरमन प्रा. सुभाषजी तोतला, गोसे हायस्कूलचे चेअरमन खलील देशमुख, पोलिस उपनिरीक्षक दिनेश भदाने साहेब, गझलकार डॉ. सदाशिव सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळेसाहेब, पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष नाना साहेब व्ही. टी. जोशी, संचालक आण्णा साहेब दगाजी वाघ, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. वासुदेव वले, डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. जी. बी. पाटील, एस. एस. पाटील, डॉ. श्रावण तडवी, डॉ. अतुल सूर्यवंशी आदी हे उपस्थित होते. यावेळी स्नेहसंमेलनाच्या उद्दिष्टांवर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी स्नेहसंमेलनाला शुभेच्छा देताना या प्रकारच्या कार्यक्रमांचा विद्यार्थी जीवनातील महत्त्व अधोरेखित केला.
     उद्घाटन सोहळ्यानंतर विविध स्पर्धांचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकूण 12 प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. वैयक्तिक आणि सामूहिक नृत्य, गीत गायन, बुद्धिमापन, वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, डिश डेकोरेशन आणि वेशभूषा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला आणि कौशल्य दाखवले. विविध रंगारंग सादरीकरणांनी या कार्यक्रमाला एक नवा आयाम दिला. विद्यार्थ्यांनी तासन्तास रंगलेल्या या स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांचे अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांसमोर ठेवले.
      लावणी आणि लोकगीतांवरील नृत्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कलेची उंची गाठली. सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा दिली. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’ च्या गजराने कार्यक्रमात एक निराळी मजा आणली. यामुळे संपूर्ण वातावरण रंगून गेले आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वर्धित झाला.
     विशेष उल्लेख करण्याजोगा कार्यक्रम म्हणजे शेलापागोटयाचा मनोरंजक कार्यकम. विद्यार्थ्यांनी या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महत्त्वपूर्ण परंपरांना जपण्याचा आणि प्रकट करण्याचा अनोखा प्रयोग केला. या कार्यक्रमाने न फक्त आनंद दिला, तर विद्यार्थ्यांमध्ये परंपरेबद्दलच्या आदर आणि कुतूहलाला चालना दिली. शेलापागोटे परिधान करून गायक, नर्तक, कवी आणि कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करत असताना एक अनोखी दृश्य निर्माण झाली. शेलापागोट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या संस्कृतीला जपले आणि आपल्या समजाचा एक वेगळा आयाम दाखवला.
      कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस उपअधीक्षक धनंजय येरुळे साहेब यांनी मोबाईलच्या जबाबदारीपूर्ण वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांचा संदर्भ दिला आणि विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेसाठी टिप्स दिल्या. “सोशल मिडियाचा योग्य वापर करा आणि त्यावर होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी जागरूक रहा,” असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
      गझलकार डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी मराठी व अहिराणी गझल सादर केली. त्यांच्या गझलांनी उपस्थितांना एक भावनिक अनुभव दिला. आई, वडील आणि बहिण यांच्याशी असलेल्या प्रेमाचे विविध भावनिक वृतांत गझलेच्या माध्यमातून व्यक्त केले. विशेषतः त्यांची “माय” आणि “शेतकरी आत्महत्या” या गझलांनी उपस्थितांना खूप प्रभावित केले. त्यांनतर गझलांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आणि प्रत्येकाने आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.
      कार्यक्रमाच्या दिवशी, संस्थेतील गुणवंत प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. डॉ. योगेश पुरी, डॉ. डी. एस. पाटील, डॉ. सरोज पटवारी, डॉ. माणिक पाटील, आणि डॉ. शरद पाटील यांचा उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. संस्थेतील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विकासाला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांच्यावरचा सन्मान विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरला.
     स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन प्राध्यापकांनी लिहिलेल्या विद्यापीठ अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशनाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात गती आणणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे आहे.
      याच वेळी, विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीला मान्यता देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने बक्षिसे ठेवली होती.
    संस्थेचे चेअरमन नाना साहेब संजय वाघ यांनी संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीचा आणि गुणवत्तेचा लेखाजोखा मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शिक्षणाची महत्त्वाची बाब समजावून सांगितली. “आपल्या महाविद्यालयाने विद्यार्थींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि हे स्नेहसंमेलन याच उद्देशाला दर्शवते,” असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि भविष्यातील कार्यप्रणालीविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माणिक पाटील, डॉ. सुनिता पाटील, आणि प्रा. वैशाली बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्रावण तडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांची उत्साही प्रतिसाद व त्यांची सक्रिय भागीदारी यांनी कार्यक्रमाला एक नवा आयाम दिला.
       पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला, त्यांना स्वतःचा आत्मविश्वास मिळवून दिला आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श प्रस्तुत केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेच्या, विचारांच्या आणि सामाजिक योगदानाच्या क्षेत्रात एक नवीन स्तर गाठला आहे. याचा भविष्यकाळातही सकारात्मक प्रभाव पडेल.
      स्नेहसंमेलनाच्या या आयोजनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे आणि त्यांचे जीवन परिवर्तनाच्या दिशेने पुढे जात आहे.

पाचोरा येथे शारदीय व्याख्यानमाला: 60 वर्षांची गौरवशाली परंपरेला 20 जाने. ला प्रारंभ

0

Loading

पाचोरा – येथील नगरपालिकेच्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमाला सोमवार, 20 जानेवारीपासून सुरु होत आहे. या व्याख्यानमालेने आपली 60 वर्षांची अखंडित परंपरा टिकवून ठेवत अनेक नामवंत व्यक्तींच्या व्याख्यानांद्वारे श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदा ही व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक प्रांगणात, 20 ते 24 जानेवारी दरम्यान रोज रात्री 8.30 वाजता होणार आहे.
उद्घाटन समारंभ
शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार, 20 जानेवारी रोजी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला शहरातील मान्यवर, अधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रमांचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन
पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रबोधन, मनोरंजन आणि समाजप्रबोधन यांचे विविध विषयांवर आधारित कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यंदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कलावंत यांची उपस्थिती यामुळे व्याख्यानमालेचा दर्जा अधिक उंचावणार आहे.
सोमवार, 20 जानेवारी – भारतीय संविधान
पहिल्या दिवशी नागपूरचे प्राचार्य जावेद पाशा ‘भारतीय संविधान: सन्मान, सुरक्षा आणि अंमलबजावणी’ या विषयावर व्याख्यान देतील. या सत्रात भारतीय संविधानाच्या विविध पैलूंवर चर्चा होणार असून, सध्याच्या काळात त्याचे महत्त्व कसे वाढले आहे, यावर सखोल प्रकाश टाकला जाणार आहे.
मंगळवार, 21 जानेवारी – पुणेरी तडका
दुसऱ्या दिवशी पुण्याच्या मोनिका जोशी यांचा ‘पुणेरी तडका’ हा विनोदी कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या विनोदातून पुणेरी परंपरा, राहणीमान, आणि संस्कृती यांवर भाष्य केले जाईल. हा सत्र श्रोत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
बुधवार, 22 जानेवारी – गझलदीप
तिसऱ्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर ‘गझलदीप’ हा कार्यक्रम सादर करतील. यामध्ये श्रोत्यांना गझलेच्या सुरेल प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.
गुरुवार, 23 जानेवारी – मुलांच्या मोबाईलचे काय?
चौथ्या दिवशी पुण्याच्या मुक्त चैतन्य ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ या विषयावर व्याख्यान देतील. या सत्रात पालकांसाठी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
शुक्रवार, 24 जानेवारी – जगण्यातील आनंदाच्या वाटा
शेवटच्या दिवशी अहमदनगरचे डॉ. संजय कळमकर ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान देतील. या सत्रात सकारात्मक जीवनशैली कशी ठेवावी यावर मार्गदर्शन होईल.
   महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, प्रशासकीय अधिकारी चैतन्य राऊत, लेखापाल संजय बाणाईत, सहाय्यक ग्रंथपाल श्याम ढवळे, ललित सोनार, गजानन पाटील आणि इतर सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांनी पाचोरा आणि परिसरातील नागरिकांना या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
      गेल्या सहा दशकांपासून ही व्याख्यानमाला पाचोरा येथील सांस्कृतिक आणि बौद्धिक वातावरणाचा एक अविभाज्य भाग राहिली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी या व्यासपीठावरून समाजाला मार्गदर्शन केले आहे. या व्याख्यानमालेचा उद्देश नागरिकांच्या वैचारिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणे आहे.
    शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक या व्याख्यानमालेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, नोकरदार, तसेच ज्येष्ठ नागरिकही या व्याख्यानांचे आनंदाने स्वागत करतात. व्याख्यानमालेच्या विषयांची विविधता आणि गुणवत्ता यामुळे ती प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते.
     पाचोरा येथील शारदीय व्याख्यानमाला ही केवळ एक परंपरा नसून, ती समाजाला ज्ञान, मनोरंजन, आणि प्रेरणा देणारा एक माध्यम आहे. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केले आहे. श्रोत्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर टाकावी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.

पाचोऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळाले ‘स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी’ यांचे नाव: एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव

0

Loading

पाचोरा – दि. 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता व नाविन्य विभागाने राज्यातील 132 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी केले. पाचोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला “स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा” असे नाव देण्यात आले. हे नाव वाचताच कुतूहल निर्माण झाले. पाचोरा पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात शोध घेतल्यानंतर स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी यांचे नाव उलगडले. त्यांच्या संघ समर्पित जीवनप्रवासाचा एक थक्क करणारा इतिहास आहे.
1985-86 च्या काळात साप्ताहिक

विवेक या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वृत्तपत्राने अनेक तरुणांना संघ विचारधारेकडे आकर्षित केले. मी संदीप महाजन यांच्या वाचनाची सुरुवातही याच साप्ताहिकातून झाली. त्यावेळी सध्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हयाचे ज्येष्ठ नेते सदाशिव (आबा) त्र्यंबक पाटील यांच्या माध्यमातून साप्ताहिक विवेक या वृत्तपत्राचा परिचय झाला. त्यांच्या प्रेरणेने हिंदुत्वाशी परिचय झाला
विवेक साप्ताहिकाच्या प्रेरणेने मी संदीप महाजन संघशाखा आणि संघटनेत सक्रीय सहभाग घेतला.
शालेय जीवन जगत असताना श्री गो से हायस्कूल मधील शिक्षक आदरणीय बी एस कुलकर्णी सर हे आर एस एस शाखेचे प्रचार होते व त्यांचे पुतणे उदय कुळकर्णी आणि आमचे मित्र अ‍ॅड. सुनील पाटील, दिनेश भि. पाटील, मनीष काबरा, आणि स्व. सुनील सराफ हे मित्र मंडळ शाखेत नियमित सहभागी होत.
अमळनेर येथे आयोजित हिवाळी शिबिरात थंडीत टेंटमध्ये राहणे, शाखेतील दिनचर्या, आणि संघाच्या

शिस्तबद्ध जीवनशैलीचा अनुभव त्यांनी घेतला. याच काळात स्व काळे गुरूजी   यांच्यासह स्व कमळे गुरुजी , बी एस कुलकर्णी सर, यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली.
     पाचोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला जे नाव देण्यात आले ते संघ समर्पित जीवन स्व.विश्राम रावजी काळे गुरूजी. यांच्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जे काही फोटोज व माहिती प्राप्त झाली ती पुढीलप्रमाणे –
स्व. विश्राम रावजी काळेगुरूजी संघ समर्पीत जीवन
(जन्म :दि. १६ फेब्रुवारी १९२५ मृत्यु: दि.३१ जुलै२०११)
स्व. विश्राम रावजी काळे तथा काळे गुरुजी याांचा जन्म १६ फेब्रुवारी १९२५ रोजी साकेगाव ता. भुसावळ जिल्हा
जळगाव येथे झाला. त्याांचे प्राथमिक शिक्षण साकेगाव येथे झाले. १९४२ साली ते फायनल म्हणजे त्यावेळची इ.७वी
बोर्ड परीक्षा उत्तीर्ण  झाले. आणि १९४२ला ते भुसावल येथे लोकल बोर्डच्या शाळेत मास्तर ( शिक्षक) म्हणुन कन्या
शाळा क्रमाांक १ येथे रुजु झाले. इयत्ता ५ वीत असताांना त्यांचा १९३९ मध्ये त्यांचा संघांच्या शाखेशी संपर्क आला. त्यांनी
साकेगाव येथे १९४० ला सायं शाखा सूरू केली. १९४२ ते १९४५ पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होत असत
सन १९४५ तो १९४८ पर्यंत ते संघाचे विस्तारक म्हणुन मुक्ताईनगर, वरणगाव, नाडगांव बोदवड येथे दर शनीवार व रविवार
प्रवास करत. सन १९४८ ला ते अमळनेर तालुक्यात विस्तारक म्हणून शनिवार रविवार जायचे, सन १९४८ च्या प्रथम
संघबंदित त्याांनी संघ सत्याग्रहात भाग घेतला तसेच त्या काळात महात्मा गांधी यांची झालेली हत्या आणि त्यामुळे संघ व ब्राम्हण समाजा विरुद्ध उफळलेला व्देश

त्यात काळे गुरुजी जरी पाथरवट समाजाचे होते तरी ते संघाचे व नांव ब्राम्हण साम्य असल्याने शिक्षकाची नौकरी त्याांना गमवावी लागली. त्यानांतर १९४८
ते १९५२ ते पुर्ण वेळ संघाच्या कार्या साठी नासिक येथील तीळ भांडारेश्वर गल्लीतील संघ कार्यालयात राहु लागले. १९५२
ते १९५८ पर्यत त्याांनी विविध उद्योग करून पाहिलेत सायकल रिपेअर, फोटो फ्रेमींग पण यश येई ना. काही काळ
तर त्यांनी  बाांबरूड ता. पाचोरा येथे त्याांचे सासरे कै. आनंदा चौधरी याांचे सोबत  दगडाच्या खाणीव दगडही फोडले
त्यावेळेच्या आमदाराने त्यांचा  प्रश्न विधान सभेत मांडला व त्यांनां पुन्हा शिक्षक म्हणुन पुन्हा  नियुक्ती मिळाली व ते
१९५८ ला वेरूळी ता. पाचोरा येथे रुजु झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी गाळण नगरदेवळा आणि सांगमेश्वर येथे ज्ञानदानाचे
कार्य केले व हजारो विद्यार्थी घडवले नगरदेवळा येथील वास्तव्यात १९७७ ला संघ शाखा सुरू केली नगरदेवळा मंडळात
त्यावेळी सात ते आठ शाखा लागत. अनेक शिबीरांना ते बाल व तरुणाांना घेवुन जात. रा.स्व. संघांच्या विविध  पदांचे दायीत्व
त्याांनी सांभाळले. पाचोरा व भडगाव तालुक्याचे कार्यवाह म्हणुन ही दायीत्व पार पाडले  सन १९८९ नगर देवळा येथुन
पाचोरा येथे आल्यावर मा. बाळकृष्ण कुलकणी सर यांच्या समवेत त्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक संस्था परधाडे ची
स्थापना केली त्या संस्थेचे स्व काळे गुरुजी संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेच्या विवेकानंद टेक्नीकल इंन्स्टीटयुट मार्फत कमी
पैशात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ताांत्रीक ज्ञान उपलब्ध करून दिले. त्यावेळी संस्थेच्या उद्घाटनासाठी स्व. मा. नानाजी देशमुख आले होते. ग्रामीण भागात त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता.सन १९८९ ला व सन १९९२ ला अस दोन्ही वेळेस ते वय
व प्रकृतीची तमा न बाळगता रामजन्मभुमी आंदोलन व कारसेवेत सहभागी झाले होते त्यावेळेस ते झाशी जेल मध्ये पंधरा
दिवस होते. अखिर भारतीय पाथरवट

समाज महासंघाचे ते मार्गदर्शक होते. ते साप्ताहिक विवेकचे अभिकर्ता
प्रतीनीधी होते. दि. ८ डिसेंबर २००२ ला त्यांचा सरसांघचालक सुदर्शनजीच्या उपस्थित नागपुर येथे संकल्पयात्री म्हणुन
त्याांना गौरवण्यात आले होते. त्या काळात तडवी भिल्ल याांच्या मुलाांसाठीची वसतीगृह पाचोरा,येथील विवेकानंद
टेक्नीकल इंन्स्टीटयुट  मध्ये मा. नंदुजी गिरजे या  या प्रचारकांच्या सहायाने सुरू केले होते.सन २००४ पासुन ते संघचालक होते.
पाचोरा येथील कै. कमळेगुरूजी ,बाळकृष्ण कुलकणीसर, कै सुनिल सराफ , मनिष काबरा, संचेती परीवार ,नाना वाणी, रमेश मोरे
यांचा त्यांच्याशी विशेष स्नेह होता. शेवटच्या श्वासापर्यत संघकार्य हे त्याचे  जीवनध्येय होते ते  त्यांनी निष्ठेने पार पाडले दि.३१ जुलै २०११ ला श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्याांनी इहलोकात यात्रा संपवली तरी ते
अजुनही अनेकाांचे प्रेरणा स्त्रोत व स्मृतीत राहीले आहेत.
सदरची माहिती त्यांची सुपुत्र व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषद महाराष्ट्र प्रदेशचे नाशिक अध्यक्ष उद्धवराव विश्राम काळे यांच्याकडून घेतली आहे अशा या स्वर्गीय विश्राम रावजी काळे गुरुजी यांचे नाव महाराष्ट्र शासनाने पाचोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला म्हणजे त्यांच्या कार्याला एक अभिवादन आहे

“न्यायालय आपल्या दारी” संकल्पनेवर आधारित विधी सेवा महाशिबिर – पाचोऱ्यात भव्य आयोजन

0

Loading

पाचोरा, जि. जळगाव – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; तसेच तालुका विधी सेवा समिती पाचोरा आणि पाचोरा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
           या उपक्रमाच्या अनुषंगाने दि. १३ जानेवारी रोजी पाचोऱ्यातील दिवाणी न्यायालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत या महाशिबिराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी दिवाणी न्यायाधीश मा. जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मा. एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील आणि इतर वकील बांधव उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मा. जी. बी. औंधकर यांनी या कार्यक्रमाच्या स्वरूपाचा आढावा घेत न्यायालयीन यंत्रणांद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ कसा पोहोचवता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
        “न्यायालय आपल्या दारी” ही संकल्पना समाजातील प्रत्येक घटकाला न्यायव्यवस्थेचा आणि शासकीय सेवांचा लाभ सहजपणे मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर तयार केलेल्या या उपक्रमामुळे वंचित आणि गरजू नागरिकांना कायदेशीर सल्ला, मदत आणि शासकीय योजनांची माहिती एका ठिकाणी मिळू शकणार आहे.
      महाशिबिराच्या उद्घाटनासाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मंगेश एस. पाटील आणि सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. अभय एस. वाघवसे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावचे अध्यक्ष मा. श्री. एस. क्यु. एस. एम. शेख असणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी आयुष प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे पालक सदस्य अॅड. अमोल सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      या महाशिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारले जातील, जिथे नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती, अर्ज प्रक्रिया, आणि लाभ मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन केले जाईल. महसूल, कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण, परिवहन, आणि पालिका विभागासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी नागरिकांना थेट संवादाद्वारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित राहतील.
             महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महाशिबिरात नागरिकांना वीज बिल सवलत, कृषी अनुदान, शिक्षणविषयक योजना, महिलांसाठी आरोग्य व कल्याण योजना, दिव्यांग सेवांसारख्या अनेक योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
       या उपक्रमासाठी जिल्हा व तालुक्यातील विविध न्यायाधीश, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि आरटीओ यांसारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
              महाशिबिराचा उद्देश हा प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना आणि न्यायालयीन सहाय्य पोहोचवणे हा आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
        महाशिबिराबाबत अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य, वकील संघाचे प्रतिनिधी किंवा शासकीय विभागांशी संपर्क साधावा.
     या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना न्यायालयीन व शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

योगेश सुनील नागणे: प्रयत्नशीलतेच्या बळावर यशस्वी सी आय एस एफ अधिकारी

0

Loading

      योगेश सुनील नागणे हे नाव आता शिंदे शाळेपासून ते सीआयएसएफसारख्या देश सुरक्षेच्या दलापर्यत पोहोचले आहे. आपल्या मेहनतीने व चिकाटीने त्यांनी या प्रवासाला आकार दिला. योगेश यांची ही कथा केवळ त्यांचे यश नव्हे, तर स्वप्नांसाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी आहे.
  योगेश यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पि के शिंदे शाळेत झाले. या शाळेत शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेची चुणूक दाखवली होती. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण यथासांग पूर्ण केले. शिक्षणप्राप्तीच्या या टप्प्यावर त्यांनी आपली ध्येयसंधानाची वृत्ती कायम ठेवली                                                            .योगेश यांची सीआयएसएफमध्ये भरती होण्याची कहाणी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. मुंबईत भरती प्रक्रियेदरम्यान त्यांनी आपली मेहनत व जिद्द दाखवत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. वयाच्या २४ व्या वर्षी मिळालेले हे यश त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलित होते. यामध्ये त्यांचे काका श्री तात्या नागणे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. काकाश्री तात्या यांनी वेळोवेळी योग्य सल्ला देऊन योगेश यांना प्रेरित केले.
   सीआयएसएफच्या सेवेत दाखल झाल्यानंतर योगेश यांना ओंकारेश्वर जवळील  बडवा, प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी जाणार आहे. हे प्रशिक्षण कठोर असूनही ते आपल्या कौशल्य व शारीरिक क्षमतांद्वारे उत्कृष्ट कामगिरी करून त्यांच्या मेहनतीमुळे ते लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतील.
    योगेश यांचा प्रवास संघर्षमय होता. तीन वर्षांपूर्वी वडील सुनील नागणे यांचे निधन झाले. या दु:खद प्रसंगानंतरही त्यांनी स्वतःला सावरून आपल्या ध्येयासाठी झगडण्याचा निश्चय केला. त्यांच्या आईने या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावली. भावानेही त्यांच्या यशासाठी प्रोत्साहन दिले.
     योगेश याच्या यशामागे त्यांच्या मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मित्रांनी वेळोवेळी त्यांना प्रोत्साहित केले. हे प्रोत्साहन त्यांच्या जिद्दीला नवी ऊर्जा देणारे ठरले.
    योगेश नागणे यांचा प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सीआयएसएफसारख्या प्रतिष्ठित दलात अधिकारी बनणे ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे.
    योगेश यांची ही कहाणी हेच सांगते की, यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि जिद्द आवश्यक असते. त्यांनी आपल्या ध्येयासाठी झगडून जे यश संपादन केले आहे, त्याला सलाम!

ताज्या बातम्या

error: Content is protected !!