Home Blog Page 17

अजितदादा सर्वार्थाने लोकनेते – महाराष्ट्राने हरपला एक नेतृत्वाचा आधारस्तंभ

0

Loading

पाचोरा — स्वर्गीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वार्थाने लोकनेते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने एक कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेला आणि सामान्य माणसाशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावला आहे. ही उणीव महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी आहे, असे भावनिक उद्गार माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी काढले. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री. गो. से. हायस्कूल येथील कलादालनात श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अजितदादांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. वाघ परिवार व संस्थेशी असलेले अजितदादांचे स्नेहपूर्ण आणि आपुलकीचे संबंध त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. अजितदादांची कार्यशैली नेहमीच परिणामकारक, निर्णयक्षम आणि लोकहिताला केंद्रस्थानी ठेवणारी होती. पद, पक्ष किंवा राजकीय समीकरणांपेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न सोडविणे हेच त्यांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात अजितदादांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अजितदादांनी वेळोवेळी उपस्थित राहून दिलेले मार्गदर्शन हे संस्थेसाठी दीपस्तंभ ठरल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षीय आणि जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी सामान्य माणसाला आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संस्थेचे शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख, संचालक प्रा. भागवत महालपुरे, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, भडगाव विद्यालयाचे प्राचार्य एन. एन. गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करत अजितदादांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, श्री. गो. से. हायस्कूलच्या तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक सतीश आप्पा चौधरी, योगेश पाटील, डॉ. पितांबर पाटील, जगदीश सोनार, सौ. मनीषा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, श्री. एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एच. पवार, एस. एस. चौधरी, विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, संस्थेतील माजी मुख्याध्यापक, विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले. एकूणच ही शोकसभा केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित न राहता, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी वारशाचा गौरव करणारी ठरली.

आज दि.07/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष (Aries):
आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने व नियोजनाने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च नियंत्रणात ठेवा. कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ (Taurus):
आज स्थिरता व सुरक्षिततेची भावना वाढेल. व्यवसायात छोटा पण निश्चित लाभ होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: फिकट हिरवा

मिथुन (Gemini):
आज संवाद कौशल्यामुळे अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. प्रवासाचे योग संभवतात. मन आनंदी राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क (Cancer):
आज भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामात लक्ष केंद्रित केल्यास प्रगती होईल. कुटुंबात शांतता राहील. आर्थिक परिस्थिती मध्यम राहील.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह (Leo):
आज नेतृत्वगुण अधोरेखित होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. मात्र बोलताना शब्द जपून वापरा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या (Virgo):
आज नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल. आरोग्याबाबत जागरूक रहा. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा

तूळ (Libra):
आज वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधावा लागेल. नवीन संधी समोर येतील. नातेसंबंधात सकारात्मक बदल होतील. खर्चावर लक्ष ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक (Scorpio):
आज आत्मविश्वास आणि धाडस वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस योग्य आहे. आर्थिक लाभ संभवतो. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: मरून

धनु (Sagittarius):
आज शिक्षण, अभ्यास किंवा नवीन कौशल्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रवासातून अनुभव मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: पिवळसर

मकर (Capricorn):
आज मेहनत आणि चिकाटी यांचे फळ मिळेल. नोकरीत स्थैर्य जाणवेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ (Aquarius):
आज नवीन विचार आणि योजना प्रत्यक्षात आणता येतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. मित्रमंडळींचा पाठिंबा मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर

मीन (Pisces):
आज अंतर्मुख होऊन निर्णय घेण्याचा दिवस आहे. अध्यात्मिक विचार वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तीकडून आधार मिळेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.04/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज निर्णय घेताना स्पष्टता राहील. कामात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आत्मविश्वासाच्या जोरावर अडचणी दूर होतील. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ
आज स्थैर्य आणि व्यवहारकौशल्य उपयोगी पडेल. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवता येतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास लाभ होईल. दिवस समाधानकारक आहे.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन
संवाद आणि विचारांची देवाणघेवाण आज महत्त्वाची ठरेल. नवीन माहिती किंवा संधी मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात. उत्साह टिकून राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क
आज भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. कामात लक्ष दिल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. घरगुती वातावरण सुधारेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह
आज तुमच्या नेतृत्वगुणांना संधी मिळेल. वरिष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या
आज बारकावे आणि शिस्त महत्त्वाची ठरेल. कामात सातत्य ठेवल्यास प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. अनावश्यक टीका टाळा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
नातेसंबंधात समतोल साधावा लागेल. निर्णय घेताना मन आणि व्यवहार दोन्हींचा विचार करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज गुप्त योजना किंवा विचार प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. संयम ठेवल्यास फायदा होईल. मेहनतीचे फळ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
आज आशावाद आणि उत्साह वाढलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल दिवस आहे. शिक्षण आणि प्रवासासाठी चांगला काळ आहे.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळा

मकर
आज जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक राहील. शिस्त आणि मेहनतीमुळे कामात प्रगती होईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राखले जाईल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ
नवीन विचार आणि प्रयोग यामुळे यश मिळू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. बदल स्वीकारल्यास दिवस लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन
आज सर्जनशीलता आणि संवेदनशीलता वाढलेली राहील. कला, लेखन किंवा ध्यानासाठी योग्य दिवस आहे. मनःशांती अनुभवता येईल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.03/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज कामात गती येईल आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. अडथळे दूर करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार करताना घाई टाळा.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ
आज स्थिरता आणि संयम राखणे गरजेचे आहे. नियोजनपूर्वक काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. घरगुती विषयात समजूतदार भूमिका घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन
संवादकौशल्यामुळे आज अनेक प्रश्न सुटू शकतात. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास किंवा बदलाचे संकेत आहेत. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क
आज भावनिक संवेदनशीलता वाढलेली राहील. कामात लक्ष केंद्रित केल्यास समाधान मिळेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवा. आर्थिक बाबतीत सावध रहा.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह
आज नेतृत्वगुण पुढे येतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवल्यास यश वाढेल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या
आज बारकाईने काम करण्याची गरज आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास ताण कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक चिंता टाळा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
नातेसंबंधात संतुलन राखावे लागेल. निर्णय घेताना घाई नको. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. दिवस मध्यम पण स्थिर आहे.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस आहे. गोष्टी शांतपणे हाताळल्यास फायदा होईल. मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू लागतील.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
आज उत्साह आणि आशावाद वाढलेला राहील. नवीन संधी तुमच्याकडे चालून येऊ शकतात. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळा

मकर
आज जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. कामात शिस्त ठेवल्यास प्रगती होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ
नवीन कल्पना आणि वेगळा दृष्टिकोन आज फायदेशीर ठरेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक बदल स्वीकारावे लागतील. मन सकारात्मक ठेवा.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन
आज सर्जनशील विचारांना चालना मिळेल. भावनांना योग्य दिशा दिल्यास मनःशांती लाभेल. विश्वासू व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: जांभळट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अतिवृष्टीग्रस्त बहिरम नगरमधील नागरिकांना मदतीचे आदेश; नुकसानभरपाई व योजनांवर तहसीलदारांची तातडीची दखल

0

Loading

पाचोरा – शहरात 22 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे बहिरम नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वित्तीय व जीवनावश्यक नुकसानीची झळ नागरिकांना बसली होती. घरांमध्ये पाणी शिरणे, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, भिंती व छतांना तडे जाणे, तसेच काही ठिकाणी अन्नधान्य साठा व कागदपत्रे भिजून खराब होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर होणारी नुकसानभरपाई अद्याप काही नागरिकांना मिळालेली नसल्याने परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बहिरम नगरमधील बाधित नागरिकांनी एकत्र येत माननीय तहसीलदार पाचोरा यांना लेखी स्मरणपत्र सादर केले. स्मरणपत्रात नुकसान झालेल्या घरांची पाहणी, पंचनामे पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. स्मरणपत्र प्राप्त होताच तहसीलदार साहेबांनी विषयाची गंभीर दखल घेत संबंधित महसूल अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. प्रलंबित अहवालांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासोबतच परिसरातील अनेक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित रेशन मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबतही नागरिकांनी तक्रारी मांडल्या. काहींची रेशन कार्डे अद्ययावत नसणे, नावनोंदणीतील त्रुटी, तर काहींच्या कुटुंबीय बदलांमुळे लाभ थांबले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या संदर्भात तहसीलदार साहेबांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी समन्वय साधून पात्र नागरिकांना त्वरित रेशन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार कुटुंबांसाठी महत्त्वाच्या असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. अर्जांची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना नियमित सहाय्य सुरू करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. यामुळे अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीदरम्यान ॲड. अंबादास गोसावी, श्याम पाटील, गणेश भोसले उपस्थित होते. त्यांनीही बाधित नागरिकांच्या समस्या मांडत प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे स्वागत केले. प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत होऊन प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बहिरम नगरमधील नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करत, पुढील काळातही समस्यांवर संवेदनशीलतेने कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

जळगाव जिल्हा परिषद–पंचायत समिती राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील यांची निर्णायक भूमिका केंद्रस्थानी

0

Loading

जळगाव – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस अधिक बळावत चालली आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप–शिवसेना शिंदे गटाचे युती सरकार असल्याने, त्याच राजकीय समन्वयाचे प्रतिबिंब जिल्हा व तालुका स्तरावरही उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रांच्या निवडणुकांमध्ये आपापसातील संघर्ष टाळून समन्वयाची भूमिका घेण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे एकतर्फी वर्चस्व असून, जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवण्यात त्यांचे नेतृत्व निर्णायक मानले जाते. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात होणारे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या भूमिकेभोवती फिरताना दिसत आहेत. आजवरच्या जळगाव जिल्हा परिषद राजकारणाकडे पाहिले असता अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे राहिलेले आहे. हे राजकीय गणित अनेक वर्षे टिकून असून, आगामी निवडणुकांमध्येही त्यात फारसा बदल होईल असे संकेत सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर सत्तेची वाटणी ही युतीतूनच ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांबाबतचा निर्णय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या भूमिकेनुसारच होईल, अशी राजकीय चर्चा आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्त्व केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद, संघटनात्मक पकड आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळेच भाजपकडूनही पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात “एक घर ते पण सोडून द्यावे” अशी व्यवहार्य भूमिका घेतली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. म्हणजेच, ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे, तिथे भाजप अनावश्यक संघर्ष टाळेल आणि जिथे भाजप मजबूत आहे, तिथे शिवसेना शिंदे गट समन्वयाची भूमिका घेईल, असा परस्पर समजुतीचा फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. निवडणूक खर्च हा या सगळ्या चर्चेतील कळीचा मुद्दा ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचा अनुभव सर्वांनी पाहिला आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी युतीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे बोलले जात आहे. आपसात लढून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा सोयीने युती करून निवडणूक लढवली तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नेत्यांचे पैसे वाचतील, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पक्षालाही राज्यस्तरावर निधी व श्रम वाचवता येतील, असा व्यवहार्य विचार पुढे येत आहे. ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांची पारंपरिक भूमिका या संदर्भात पुन्हा चर्चेत आहे. “आमच्याकडे मोठा पैसा नाही, जेवढे भेटतील तेवढे आमच्या हिश्याचे” अशी भूमिका अनेक ठिकाणी कार्यकर्ते घेत असल्याचे दिसते. युती झाल्यास या कार्यकर्त्यांवर आर्थिक ताण कमी होईल आणि निवडणूक ही पैशांच्या जोरावर नव्हे तर संघटनात्मक ताकदीवर आणि नेतृत्वावर आधारित राहील.विशेष म्हणजे उमेदवारी देताना आर्थिक निकष न लावता पक्षासाठी कोण निष्ठावंत व कोणी आतापर्यंत संघटनेसाठी परिश्रम घेतले यांना निश्चितच तिकिटाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार किशोर आप्पा पाटील यांची संयमी आणि समन्वयक भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकांप्रमाणे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. उलट काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होतील, तर काही ठिकाणी पूर्वी तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत गेलेली एका मताची किंमत आता थेट दोनशे ते तीनशे रुपयांच्या गणितावर येऊ शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या बदलामागे युतीचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाचा दबदबा कारणीभूत ठरणार आहे. एकूणच, जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील हे केंद्रबिंदू ठरत आहेत. भाजप–शिवसेना शिंदे गट युतीची दिशा, जागावाटपाचे गणित, खर्चावर नियंत्रण आणि बिनविरोध निवडणुकांची शक्यता या सर्व बाबी त्यांच्या निर्णयांभोवती फिरताना दिसत आहेत. अंतिम निर्णय अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला, तरी जळगावच्या ग्रामीण राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील यांची वरचढ भूमिका आणि निर्णायक नेतृत्व आगामी काळात महत्त्वाची ठरणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

आज दि.02/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज निर्णयक्षमता वाढलेली राहील. रखडलेली कामे पुढे सरकतील. कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाबतीत सावध पण सकारात्मक दिवस आहे.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: तांबडा

वृषभ
आज संयम आणि व्यवहारकौशल्य उपयोगी पडेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास ताण कमी होईल. आरोग्य स्थिर राहील.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: गडद हिरवा

मिथुन
संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. प्रवास किंवा बदलाचे संकेत आहेत. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळसर

कर्क
आज भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. घरगुती विषयात समजूतदारपणा दाखवा. आर्थिक स्थिती मध्यम राहील.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: शुभ्र

सिंह
आज आत्मविश्वासामुळे अडचणी सहज पार होतील. नेतृत्वाची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. अहंकार टाळणे हितावह ठरेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: सोनेरी

कन्या
कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. नियोजन केल्यास वेळेचा योग्य उपयोग होईल. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. अनावश्यक चिंता टाळा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
नातेसंबंधात स्पष्टता ठेवावी लागेल. निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा विचार करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. दिवस समाधानकारक आहे.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: निळसर

वृश्चिक
आज गुप्त योजना किंवा विचार प्रत्यक्षात आणता येतील. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वादविवाद टाळल्यास लाभ होईल.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
नवीन कल्पना आणि आशावाद यामुळे दिवस उत्साही जाईल. शिक्षण करिअरविषयक निर्णय अनुकूल ठरतील. प्रवासाचे योग संभवतात.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: आकाशी

मकर
आज जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक राहील. कामात स्थिर प्रगती होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: राखाडी

कुंभ
नवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. अचानक खर्च संभवतो, त्यामुळे काळजी घ्या. विचार सकारात्मक ठेवा.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळा

मीन
आज सर्जनशीलता आणि संवेदनशीलता वाढलेली राहील. कला, लेखन किंवा संगीतासाठी योग्य दिवस आहे. मनःशांतीसाठी एकांत उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.01/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ
आज संयम आणि स्थैर्य राखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन
नवीन कल्पना आणि संवादकौशल्य यामुळे दिवस यशस्वी ठरेल. मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा फलदायी ठरेल. प्रवासाचे योग संभवतात. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क
घरगुती वातावरण आज सुखद राहील. भावनिक निर्णय टाळावेत. कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह
आज नेतृत्वगुणांना वाव मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. मान-सन्मान वाढण्याचे योग आहेत. अहंकार टाळल्यास लाभ होईल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या
आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. लहान गोष्टींकडे जास्त लक्ष द्याल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. संयम ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. काम आणि वैयक्तिक आयुष्यात ताळमेळ साधावा लागेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस आहे. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. शिक्षण, प्रवास किंवा नवीन शिकण्यास अनुकूल दिवस आहे. उत्साह टिकवून ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळा

मकर
जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थैर्य राखले जाईल. संयम महत्वाचा आहे.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ
नवीन विचार आणि वेगळा दृष्टिकोन आज फायदेशीर ठरेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो, त्यामुळे नियोजन ठेवा.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन
आज संवेदनशीलता वाढलेली राहील. सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस आहे. मनःशांतीसाठी वेळ काढा. विश्वासू व्यक्तीकडून मदत मिळेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: जांभळट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पार्थ राजपूतचा रोलर स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम; धुळ्यात ऐतिहासिक कामगिरी

0

Loading

धुळे – जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व प्रिन्स रोलर स्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी रोजी कमलाबाई कन्या हायस्कूल, धुळे येथे वर्ल्ड रेकॉर्ड कॉम्पिटिशन व एज ग्रुप कॉम्पिटिशनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील बाल खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले धुळे येथील रहिवासी बाल खेळाडू पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने केलेली ऐतिहासिक कामगिरी. पार्थ मनमोहनसिंग राजपूत हा पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी, माजी जळगाव जिल्हा परिषद सदस्य पदमबापू पाटील यांची कन्या सौ. मोनिका मनमोहनसिंग राजपूत व सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर मनमोहनसिंग विजयसिंग राजपूत यांचा सुपुत्र असून, तसेच तो पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी व माजी जळगाव जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग राजपूत यांचा नातू आहे. पार्थचा हा सामाजिक, कौटुंबिक व राजकीय पार्श्वभूमीशी असलेला संबंध त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक बळ देणारा ठरत असून, कुटुंबातील शिस्त, संस्कार व क्रीडाप्रेमाची परंपरा त्याच्या यशामागे ठळकपणे दिसून येते. या स्पर्धेत पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने स्केटिंग मॅरेथॉन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या लहान वयात पार्थने एक तास २६ मिनिटे २६ सेकंद असा विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे धुळे जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. स्पर्धेदरम्यान पार्थने दाखवलेली एकाग्रता, चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्ती उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. सलग दीर्घकाळ स्केटिंग करताना आवश्यक असलेले संतुलन, वेग आणि सहनशक्ती यांचे उत्कृष्ट दर्शन त्याच्या कामगिरीतून घडले. एवढ्या कमी वयातही कोणताही थकवा न दाखवता त्याने संपूर्ण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे परीक्षकांनीही त्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत त्याला प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरवले. पार्थला या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा तसेच संपूर्ण कुटुंबाचा मोठा पाठिंबा लाभला आहे. वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून पार्थने खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यास सुरुवात केली असून, नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य मार्गदर्शनामुळे त्याची प्रगती सातत्याने होत आहे. सौ. मोनिका मनमोहनसिंग राजपूत व मनमोहनसिंग विजयसिंग राजपूत यांनी मुलाच्या क्रीडागुणांना ओळखून त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले आहे. सरावासाठी वेळ देणे, आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, तसेच विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देणे ही भूमिका त्यांनी कायम सकारात्मकपणे निभावली आहे. याच कौटुंबिक पाठबळाचा परिपाक आजच्या या जागतिक विक्रमाच्या रूपाने सर्वांसमोर आला आहे. या दैदीप्यमान यशामध्ये पार्थला मार्गदर्शक अर्थात कोच म्हणून धनंजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कोच धनंजय पाटील यांनी पार्थच्या कौशल्याला योग्य दिशा देत त्याच्या तांत्रिक क्षमतेवर विशेष भर दिला असून, सातत्यपूर्ण सराव, योग्य फिटनेस ट्रेनिंग, मानसिक तयारी आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज या जागतिक विक्रमातून स्पष्टपणे दिसून येत आहे. पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून अनेक वेळा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर यापूर्वीच गिनिश बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड अमेरिका बुक रेकॉर्ड या तीनही बुक रेकॉर्डमध्ये भारतीय सहभागाची नोंद आहे. या विक्रमांमुळे तो देशपातळीवर ओळखला जाऊ लागला असून, धुळे जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाला अभिमान वाटावा अशी त्याची वाटचाल सुरू आहे. या स्पर्धेत सहा ते आठ वयोगटातील खेळाडूंसाठी विशेष गट ठेवण्यात आला होता. या गटात पार्थने सुवर्णपदक व आकर्षक ट्रॉफी पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. पारितोषिक वितरण समारंभात धुळे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व धुळे जिल्हा स्केटिंग परिवाराच्या वतीने पार्थचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आयोजकांनी त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करत, अशीच मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम ठेवण्याचा सल्ला दिला. स्पर्धेच्या निमित्ताने धुळे शहरात क्रीडाप्रेमी वातावरण निर्माण झाले होते. पालक, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः एवढ्या कमी वयात जागतिक विक्रम करणाऱ्या पार्थच्या कामगिरीने अनेक पालकांना आपल्या मुलांना खेळांकडे वळवण्याची आणि प्रोत्साहन देण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. धुळ्यातील हा कमी वयाचा खेळाडू सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. पार्थच्या या दैदीप्यमान यशाबद्दल झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांच्यातर्फे त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

सकारात्मक ऊर्जेचा ‘स्पंदन’—आकाशवाणी जळगाववर रेकी आचार्य प्रा. जयश्री कोमल वाघ यांची प्रेरणादायी मुलाखत

0

Loading

पाचोरा – बहुजनहिताय, बहुजनसुखाय या ब्रीदवाक्याला अनुसरून प्रसार भारती अंतर्गत कार्यरत असलेल्या आकाशवाणी जळगाव केंद्रावर श्रोत्यांसाठी नेहमीच समाजोपयोगी, सकारात्मक आणि मार्गदर्शक कार्यक्रम सादर केले जातात. याच परंपरेचा भाग म्हणून आकाशवाणी जळगाववरील ‘स्पंदन’ या विशेष कार्यक्रमात वृत्त आणि व्यक्तींच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा, मानसिक संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैली या विषयांवर आधारित एक महत्त्वपूर्ण मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात रेकी आचार्य प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) यांची विशेष मुलाखत घेण्यात येणार असून ही मुलाखत वैदेही नाखरे यांनी घेतलेली आहे. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा, मानसिक अस्वस्थतेवर कशी मात करावी, तसेच तणावमुक्त आणि संतुलित जीवनशैली कशी अंगीकारावी, याबाबत प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती मानसिक तणाव, चिंता, नैराश्य आणि अस्वस्थतेला सामोरी जात आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि सततची धावपळ यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत अंतर्मुख होणे, स्वतःशी संवाद साधणे आणि सकारात्मक ऊर्जेचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत त्या व्यक्त करणार आहेत. रेकी ही केवळ उपचारपद्धती नसून ती एक जीवनशैली असल्याचे त्या सांगणार आहेत. औषधांशिवाय, नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य मिळवणे शक्य आहे. रेकीच्या सरावामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात, आत्मशक्ती जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनते, याविषयी त्या सोप्या आणि सहज शब्दांत माहिती देणार आहेत. या मुलाखतीत त्या आपल्या वैयक्तिक अनुभवांद्वारे रेकीचा उपयोग कसा करता येतो, दैनंदिन जीवनात मानसिक संतुलन कसे राखता येते, तसेच तरुण पिढीने तणावमुक्त जीवनासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, यावर विशेष भर देणार आहेत. विशेषतः आजच्या तरुणांमध्ये वाढत चाललेल्या तणाव, अपयशाची भीती आणि अस्थिरतेवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक ऊर्जा किती आवश्यक आहे, हे त्या अधोरेखित करणार आहेत. प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक मधुकरअण्णा ओंकार वाघ यांच्या स्नुषा असून श्री गो से हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. प्रमिला मधुकर वाघ यांची सून आहेत. तसेच त्या कोमल मधुकर वाघ यांची पत्नी आहेत. संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जाणिवांनी समृद्ध असलेल्या या कुटुंबातील मूल्यांचा त्यांच्या विचारसरणीवर आणि कार्यावर मोठा प्रभाव असल्याचे या संवादातून स्पष्ट होणार आहे. ही मुलाखत केवळ माहितीपर न राहता श्रोत्यांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारी ठरणार आहे. सकारात्मक ऊर्जा म्हणजे केवळ संकल्पना नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यास जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो, हा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. ‘स्पंदन’ कार्यक्रमाचे सादरीकरण विजय भुयार करणार असून हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. सदर कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्रावर १०२.१ एफएमवर तसेच newsonair या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. सकारात्मक विचार, मानसिक आरोग्य आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणारा हा ‘स्पंदन’ कार्यक्रम श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!