Home Blog Page 21

पाचोरा शनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या तक्रारींना दिलासा; पाणी टँकर व गटारी स्वच्छतेचे काम सुरू

0

Loading


पाचोरा – शहरातील शनी मंदिर परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने दखल घेत तातडीने उपाययोजना राबविण्यात आल्या असून, या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्ष सौ सुनिताताई पाटील, गट नेते सुमित पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक यांच्या प्रयत्नातून पाणी टँकर उपलब्ध करून देणे तसेच गटारी स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील शनी मंदिर परिसर हा दाट लोकवस्तीचा भाग असून, येथे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई व गटारींच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता, तसेच साचलेल्या घाण्यामुळे दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या. नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच नगरसेवक रफिक भाई बागवान यांनी तत्काळ परिस्थितीची पाहणी केली. पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे लक्षात येताच तातडीने पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली. या टँकरमुळे परिसरातील नागरिकांना नियमित स्वरूपात पाणी उपलब्ध होऊ लागले असून, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी मिळविण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर परिसरातील गटारींची स्वच्छता मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून साफसफाई न झाल्याने काही ठिकाणी गटारी तुंबलेल्या होत्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी विशेष लक्ष देत स्वच्छता कर्मचारी व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने गटारी साफ करण्यात येत आहेत. या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील अस्वच्छता कमी होत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण कामकाजामागे नगराध्यक्ष , गट नेते आणि उपनगराध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला आवश्यक सूचना देत कामात गती आणली असून, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्याचा संदेश दिला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे कामे वेळेत पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यवाहीचे स्वागत केले असून, लोकप्रतिनिधींनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आमच्या समस्या ऐकून घेतल्या गेल्या आणि तातडीने उपाय करण्यात आले, यामुळे विश्वास वाढला आहे, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. स्वच्छता व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा नियमितपणे उपलब्ध राहाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक रफिक भाई बागवान यांनी यावेळी बोलताना सांगितले की, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातही पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज अशा सर्व नागरी सुविधांबाबत तक्रारी आल्यास तत्परतेने दखल घेतली जाईल. शनी मंदिर परिसरासह प्रभागातील इतर भागांमध्येही आवश्यक तेथे अशाच प्रकारची कामे राबविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. एकूणच शनी मंदिर परिसरात सुरू झालेल्या या कामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होत असून, स्वच्छ व आरोग्यदायी परिसर निर्माण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. लोकप्रतिनिधींच्या सक्रियतेमुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना प्रत्यक्ष दिलासा मिळत असल्याचे सकारात्मक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मौन साधिकेच्या सेवाव्रताला रक्तदानाची मानवंदना; जय किरण प्रभाजी जयंतीनिमित्त ४५ जणांचे रक्तदान

0

Loading

पाचोरा—येथील जय किरण प्रभाजी पतसंस्थेमार्फत मौन साधिका परमपूज्य जय किरण प्रभाजी म.सा. यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या भावनेत संपन्न झाले. मानवी सेवेलाच सर्वोच्च धर्म मानणाऱ्या परमपूज्य जय किरण प्रभाजी यांच्या विचारांना अभिवादन म्हणून आयोजित या उपक्रमात एकूण ४५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजहिताचा आदर्श घडविला. पतसंस्थेच्या परिसरात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सौं. सुनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, रक्तदान ही जीवनदान देणारी कृती असून अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्य, संवेदनशीलता आणि सेवाभाव वृद्धिंगत होतो. मौन साधिका परमपूज्य जय किरण प्रभाजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम त्यांच्या सेवाभावी विचारधारेचेच प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक सुमित पाटील, संस्थेचे चेअरमन अतुल भाऊ संघवी, उपाध्यक्ष प्रमोद बांठिया, संचालक डॉक्टर मनोज पाटील, ईश्वर पाटील, बरकत संघवी, शिवाजी आव्हाड, अमित संघवी, स्वप्निल बाहेती, ईश्वर संघवी, किशोर संघवी, संजय संघवी, संकेत तांबोळी, बाळू महाजन, योगेश पाटील, सुरेश वाणी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे मनापासून अभिनंदन करताना अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. या रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील संस्थेचे अमोल पाटील व त्यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. रक्तदान प्रक्रियेत स्वच्छता, सुरक्षितता व वैद्यकीय निकषांचे काटेकोर पालन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्याची पूर्व तपासणी करूनच रक्तदान स्वीकारण्यात आले, त्यामुळे उपस्थितांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजूभाऊ जैन यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी परमपूज्य जय किरण प्रभाजी यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत मौन, साधना आणि सेवा या मूल्यांचा समाजाला लाभ होत असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक एडवोकेट अण्णासाहेब भोईटे यांनी केले. त्यांनी रक्तदाते, मान्यवर, रेड क्रॉसचे पथक व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी राजू जैन, शिवाजी पाटील, मनोज पाटील, रवींद्र पाटील, अमोल पाटील, काजल संघवी, संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिस्तबद्ध नियोजन व सेवाभावी वृत्ती दिसून आली. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाचोरा शहरात सकारात्मक संदेश पोहोचला. रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी अशा शिबिरांचे योगदान अमूल्य ठरते. परमपूज्य जय किरण प्रभाजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानासारख्या उपक्रमातून त्यांच्या सेवाव्रताला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यात आली, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

शिंदे गटातील अंतर्गत ‘शीत युद्ध’, भाजपची कडी नजर आणि आ.किशोरआप्पांच्या मंत्रिपदाच्या चर्चां मागील अस्वस्थ राजकीय वास्तव

0

Loading

पाचोरा – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट) दिसायला एकसंध असला, तरी आतून चाललेली हालचाल, अस्वस्थता आणि परस्पर अविश्वास लपून राहिलेला नाही. विशेषतः विधानसभा मंत्रीमंडळात कोणतेही फेरबदल होणार नाहीत, ही भूमिका केवळ प्रशासकीय कारणांनी नाही, तर स्पष्टपणे राजकीय तणाव टाळण्यासाठी घेतली गेली आहे. कारण आजच्या घडीला शिंदे गट आधीच भाजपच्या कड्या नजरेखाली आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळात फेरबदल झाले, तर सध्या आतून सुरू असलेले ‘शीत युद्ध’ उघडपणे चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर काही अति उत्साही, हौसे–गौसे आणि राजकीय वास्तवाशी फारकत घेतलेले अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले बुटके काळे उंदीर स्वयंघोषीत ब्रेकिंग पत्रकार आमदार किशोरआप्पांना यांना ‘मित्र पद’ मिळणार, अशा बातम्या आणि पोस्ट सोशल मीडियावर पसरवत आहेत. मात्र अशा बातम्यांमुळे पक्षाचे संघटन मजबूत होण्याऐवजी पक्षांतर्गत गैरसमज, संशय आणि वाद वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. सध्याच्या नाजूक राजकीय समतोलात अशा अफवा किंवा अप्रमाणित बातम्या पक्षासाठी घातक ठरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, इथे प्रश्न संघटनात्मक शाखांचा नाही, तर शिंदे गटाच्या आत प्रत्यक्षात जाणवणाऱ्या राजकीय शक्तिकेंद्रांचा आहे. हे गट अधिकृतपणे जाहीर नसले, तरी सत्तावाटप, निधी, पालकमंत्रीपद, उमेदवारी आणि स्थानिक वर्चस्व या मुद्द्यांवरून त्यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसून येतो. पहिला आणि सर्वाधिक प्रभावी गट म्हणजे मुख्यमंत्री-केंद्रीत ‘मूळ शिंदे’ गट. या गटाचे नेतृत्व स्वतः करतात. २०२२ च्या बंडाच्या काळात सुरुवातीपासून शिंदे साहेबांच्या सोबत राहिलेले, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी असलेले नेते या गटात मोडतात. मुख्यमंत्री कार्यालयावर पकड, प्रशासकीय यंत्रणेत प्रभाव आणि नियुक्त्यांमध्ये वरचष्मा ही या गटाची ताकद आहे. मात्र सर्व निर्णय याच गटाभोवती केंद्रीत राहतात, अशी भावना इतर गटांमध्ये निर्माण झाल्याने तणाव वाढतो. दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे मंत्रिपद-केंद्रीत ‘उदय सामंत गट’. या गटाचे नेतृत्व करतात. सत्तेत असूनही हा गट अस्वस्थ मानला जातो. उद्योग, रोजगार, कोकणातील राजकीय वर्चस्व आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव या गटामागे आहे. काही निर्णयांवर उघड नाराजी, स्वतंत्र भूमिका घेण्याची प्रवृत्ती आणि “आम्हालाही न्याय हवा” ही भावना या गटाची ओळख बनली आहे. निधीचे वाटप, विकासकामांचे श्रेय आणि मंत्रिमंडळात दुय्यम वागणूक मिळते, अशी तक्रार या गटाकडून वेळोवेळी व्यक्त होते. तिसरा गट म्हणजे भाजप-समीप व निवडणूक-व्यवस्थापन गट. या गटात भाजप नेतृत्वाशी जवळीक असलेले शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदार येतात. “आघाडी टिकवणे आणि सत्ता स्थिर ठेवणे सर्वात महत्त्वाचे” ही या गटाची भूमिका आहे. मात्र या भूमिकेमुळे शिवसेनेची स्वतंत्र ओळख आणि ताकद कमी होते, अशी भीती इतर गटांमध्ये आहे. स्थानिक पातळीवर भाजपकडून दुय्यम वागणूक मिळते, अशी भावना देखील याच ठिकाणी रुजते. या तिन्ही गटांमधील संघर्ष सध्या उघड नाही, पण तो सतत आतून धगधगत आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ फेरबदल, नवीन पदे किंवा मंत्री पदांच्या चर्चा जाणूनबुजून टाळल्या जात आहेत. कारण एक छोटा निर्णयही संपूर्ण अंतर्गत समतोल बिघडवू शकतो. थोडक्यात सांगायचे तर, शिंदे गट बाहेरून एकसंध दिसत असला, तरी आतून तो तीन शक्तिकेंद्रांमध्ये विभागलेला आहे. अशा परिस्थितीत अफवा, अप्रमाणित बातम्या आणि अति उत्साही पोस्ट केवळ व्यक्ती विशेषांनाच नव्हे, तर संपूर्ण पक्षाच्या अंतर्गत ऐक्याला धक्का देऊ शकतात, हे लक्षात घेणे आज सर्वाधिक गरजेचे आहे. अखेर आमदार किशोरआप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळायलाच पाहिजे ही गोष्ट स्वतः त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी आनंदाची व हिताची आहे, प्रत्येकाच्या मनात आजही ती प्रतीक्षा आहे नव्हे तर आजही किशोरआप्पा मतदार संघातल्या जनतेच्या मनातील मंत्री आहेत परंतु योग्य वेळी योग्य निर्णय होऊन पांडुरंगाच्या कृपेने ते मंत्रिपदी विराजमान निश्चित होतील, फक्त त्यासाठी मतदारसंघाला थांबा आणि वाट पहा भूमिका घ्यावी लागणार आहे. याच संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे ज्याप्रमाणे मोठा मासा लहान माशाला गिळतो तसे भाजपने संपूर्ण भारतात राज्यपातळीवरील अनेक पक्ष गिळंकृत केले आहेत, किंबहुना काही पक्षांना पूर्णपणे संपुष्टात आणले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आमचा मोठा भाऊ म्हणत भाजपने आपली पावले टाकली आणि आज तीच शिवसेना, शिवसेना भवन, मातोश्री निष्ठ सैनीक विखरून टाकले आहेत, अशी भावना शिवसैनिकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. अजूनही काही तास, काही वेळ, काही महिने धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असलो तरी तो निर्णय काय लागणार आहे हे आज राजकीय वर्तुळात सर्वश्रुत असल्याचे मानले जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कदाचित महाराष्ट्राची संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अ ,ब ,क , ड गटाचे उमेदवार म्हणून उमेदवार जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता उघडपणे चर्चिली जात आहे. ही शक्यता केवळ तर्कवितर्कापुरती मर्यादित नसून, मागील काही वर्षांतील राजकीय घडामोडी, मित्रपक्षांबाबत भाजपची भूमिका तसेच केंद्र व राज्य पातळीवरील सत्तासंतुलन पाहता अनेकांना ती अधिक वास्तववादी वाटू लागली आहे. त्यामुळेच शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी, मंत्रिमंडळ फेरबदलांवरील मौन आणि मित्रपद वा मंत्रिपदाच्या चर्चांवर जाणीवपूर्वक ठेवलेली लगाम या सर्व गोष्टी केवळ आजच्या क्षणापुरत्या नसून येणाऱ्या मोठ्या राजकीय वादळाची नांदी ठरू शकतात.जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीची राजकीय रणनीती, तिची सावज पावले आणि दूरगामी डावपेच अचूकपणे ओळखले. आपल्या नेहमीच्या ‘एरंडोली शैलीत’ राजकीय व्यवहार करत त्यांनी भाजपशी युती करून घेतली आणि ही चाल शिवसेना (शिंदे गट) च्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरली. या युतीमुळे जळगाव महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला अपेक्षेपेक्षा अधिक आणि लक्षवेधी जागा मिळाल्या, तसेच उपमहापौर पदावर स्पष्ट दावा सांगण्याइतके संख्याबळही पक्षाकडे आले. अखेर सत्तेसमोर केवळ राजकीय हुशारी नव्हे, तर वास्तवदर्शी शहाणपणच कामी येते, याची प्रचिती जनतेने जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत उघड्या डोळ्यांनी अनुभवली. त्यामुळे शिवसेनेच्या व्यापक हितासाठी नामदार गुलाबराव पाटील यांनी घेतलेली ही ‘एरंडोली भूमिका’ राजकीयदृष्ट्या योग्य, वेळेवर आणि लाभदायक ठरली, हे वास्तव दुर्लक्षित करून चालणार नाही. नाही तर नासीक महापालिका सारखी परिस्थिती जळगाव महापालिकेची झाली असती

सुरांतून साकारले मातृप्रेम; प्रा. जयश्री वर्मा–वाघ यांच्या गायनाने ‘वंदे मातरम्’ला अश्रूंनी न्हाऊ घातले

0

Loading

पाचोरा – स्वातंत्र्य, त्याग आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम व्यक्त करणाऱ्या या अजरामर राष्ट्रस्वराच्या १५० वर्षांचा भावपूर्ण गौरव पाचोरा शहरात अनुभवायला मिळाला. येथील येथे आयोजित वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रा. जयश्री वर्मा–वाघ मॅडम यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या गायनाने संपूर्ण सभागृह भावनांनी ओथंबून गेले. हे सादरीकरण केवळ एक गायन न राहता मातृभूमीच्या चरणी अर्पण केलेली हृदयस्पर्शी स्वरांजली ठरली. ‘वंदे मातरम्’ हे गीत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा श्वास असून, त्या संघर्षातील वेदना, बलिदान आणि अभिमान प्रा. जयश्री वर्मा–वाघ मॅडम यांच्या प्रत्येक सुरातून जिवंत होत होता. त्यांच्या संयत, गहि-या आणि भावविवश गायनशैलीतून मातृप्रेमाची तीव्र अनुभूती प्रेक्षकांच्या मनाला भिडत होती. गीत सुरू होताच सभागृहात एक विलक्षण स्तब्धता पसरली आणि प्रत्येक श्रोता त्या सुरांच्या प्रवाहात स्वतःला विसरून गेला. ‘वंदे मातरम्’च्या प्रत्येक ओळीबरोबर स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या असंख्य वीरांचे स्मरण, मातृभूमीसाठी सहन केलेल्या यातना आणि देशासाठी जगण्याची व मरण्याची प्रेरणा प्रेक्षकांच्या मनात दाटून येत होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, तर अनेक चेहरे अभिमानाने तेजस्वी झाले होते. या गायनाने केवळ कानांना नव्हे, तर अंतःकरणालाच स्पर्श केला. विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थित मान्यवर या क्षणाचे साक्षीदार बनत असताना सभागृहात निर्माण झालेला भावनिक भार प्रत्येकाला जाणवत होता. गीत संपल्यानंतर काही क्षण पूर्ण शांतता पसरली आणि त्यानंतर उसळलेला टाळ्यांचा कडकडाट हा त्या भावनांचा उद्गार ठरला. उभे राहून दिलेला प्रतिसाद हा कलाकाराच्या गायनकौशल्याचा सन्मान तर होताच, पण त्याहून अधिक तो मातृभूमीप्रती असलेल्या सामूहिक श्रद्धेचा आणि आदराचा आविष्कार होता. अनेकांनी हा क्षण आयुष्यातील अत्यंत भावनिक व अविस्मरणीय अनुभव असल्याचे व्यक्त केले. ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाची जाणीव या कार्यक्रमातून नव्या पिढीला झाली. जागतिकीकरणाच्या युगात राष्ट्रप्रेम, कर्तव्यभावना आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत संदेश ठरला. महाविद्यालयीन व्यासपीठावरून साकारलेली ही स्वरांजली पाचोरा शहराच्या सांस्कृतिक जीवनात भावनिक आणि प्रेरणादायी ठसा उमटवणारी ठरली. प्रा. जयश्री वर्मा–वाघ मॅडम यांच्या सुरांतून साकारलेले मातृप्रेम शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या हृदयात उतरले. एकूणच, ‘वंदे मातरम्’च्या गौरवप्रसंगी पाचोरा शहरात साकारलेली ही भावविवश घटना केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता राष्ट्रप्रेम जागवणारी, मनाला भिडणारी आणि समाजमनाला एकत्र बांधणारी प्रेरणादायी अनुभूती ठरली, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निर्णायक हस्तक्षेपाने पाचोरा शेतकरी अनुदान प्रकरणात सातही मागण्या मंजूर; अंधारात पेटलेला न्यायाचा लढा निर्णायक वळणावर

0

Loading

पाचोरा – तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी अनुदान, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे शेतकरी वर्गात दीर्घकाळापासून तीव्र असंतोष साचत गेला होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी, पत्रव्यवहार झाले; मात्र कागदांवर हालचाल दिसली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही. काही प्रकरणांत अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न होता ती इतर व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले. गुन्हे दाखल होऊन न्यायालयात चार्जशीट सादर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने न्याय अजूनही अपुरा असल्याची भावना तीव्र होत गेली. या पार्श्वभूमीवर नाचणखेडा येथील शेतकरी गुलाब प्रताप पाटील यांनी सन २०१९ पासून पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार करत आमरण उपोषण सुरू केले. दिवसा प्रशासनाकडून चर्चा, बैठका व आश्वासनांची प्रक्रिया सुरू असतानाही रात्री अंधारात उपोषण सुरूच राहिले, ही बाब या आंदोलनाची तीव्रता आणि गांभीर्य अधोरेखित करणारी ठरली. या आंदोलनात शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणातील प्रमुख आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी सक्रिय भूमिका घेतली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून केवळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि लाक्षणिक आंदोलनासह प्रशासकीय पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला.उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुलाब प्रताप पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाचोरा नगरपालिकेचे शिक्षण सभापती व नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना संपूर्ण वस्तुस्थिती कळवली. माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने उपोषणस्थळी भेट दिली. प्रांताधिकारी भूषण अहिरे कार्यालयात उपलब्ध नसल्याने आमदारांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना दिल्या, त्यानंतर तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांना आवश्यक कागदपत्रांसह बोलावण्यात आले. उपोषणस्थळी झालेल्या बैठकीस गुलाब प्रताप पाटील, संदीप महाजन, सामाजिक कार्यकर्ते शिवरामदादा, उबाठा सेनेचे रमेश बाफना, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशबापू पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाप्रमुख सचिन सोमवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, माजी सैनिक किरण पाटील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सविस्तर साधक-बाधक चर्चेनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नारळपाणी देऊन गुलाब प्रताप पाटील यांचे आमरण उपोषण सोडवण्यात आले; मात्र हे उपोषण प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत स्थगित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेअंती शेतकऱ्यांच्या सातही मागण्या पूर्णतः मंजूर करण्यात आल्या. सन २०१९ ते आजपर्यंत अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची गावनिहाय व वर्षनिहाय सविस्तर यादी पीडीएफ स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी महसूल विभागाच्या अखत्यारीतील मुक्ताईनगर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी व कार्यवाही सुरू झाली आहे. चुकीच्या खात्यावर गेलेल्या रकमा, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंतची कार्यवाही यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू असून भविष्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदान मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. या संपूर्ण संघर्षातून इतिहास पुन्हा एकदा लिहिला जात असून, उपोषणाच्या वेळी काही हसत तमाशा पाहणारे, लेखण्या गहाण ठेवणारे आणि सुरक्षित अंतर राखणारे यांची नोंद वेगळी तर आग विझवण्यासाठी उभे राहणाऱ्यांची नोंद वेगळी राहणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागला असला तरी प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली असून आता हा लढा रस्त्यावर किंवा आंदोलन स्वरूपात राहणार नसून न्यायालय स्तरावर लढला जाणार असल्याचे संदीप महाजन यांनी स्पष्ट केले त्यामुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

आज दि.21/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात ठामपणा ठेवावा लागेल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक जोखीम टाळा. कुटुंबातील सहकार्य मनोबल वाढवेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थैर्य देणारा आहे. नियोजनबद्ध कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात समाधान राहील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवाद कौशल्य आज विशेष उपयोगी ठरेल. नवीन माहिती लाभदायक ठरू शकते. कामात गती येईल. मानसिक ताजेतवानेपणा जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक संतुलन राखणे आवश्यक आहे. घरातील प्रश्न समजूतदारपणे सुटतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. संयम ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वासामुळे नेतृत्वाची संधी मिळू शकते. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडतील. वाद टाळल्यास प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे निर्णायक ठरतील. थोडा ताण जाणवू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन करा. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखण्याचा दिवस आहे. सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढेल. जुने प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन संधींचा विचार करा. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती साधता येईल. कामात स्थैर्य राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस साधारण पण सकारात्मक राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आमदार किशोरआप्पा यांच्या प्रयत्नांमुळे परराज्यातील वधू-वरांच्या विवाह नोंदणी अडचणी दूर होणार; मंत्रालय स्तरावर हालचालींना वेग

0

Loading

पाचोरा – परराज्यातील मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे महाराष्ट्रात विवाह नोंदणी करताना अनेक जोडप्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. आवश्यक कागदपत्रे, निवासी पुरावे, अधिकारक्षेत्राबाबतची अस्पष्टता तसेच स्थानिक पातळीवरील वेगवेगळ्या नियमांमुळे विवाह नोंदणी प्रक्रिया रखडत होती. परिणामी कायदेशीर नोंदणी वेळेत न झाल्याने जोडप्यांच्या दैनंदिन व्यवहारांपासून ते शासकीय योजनांचा लाभ घेण्यापर्यंत अडथळे निर्माण होत होते. सध्याच्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले असता, राज्यातील अनेक भागांत आधीच निम्म्यापेक्षाही जास्त विवाहयोग्य तरुण आज मुलगी मिळत नसल्याने विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी परराज्यातून इकडून तिकडून मुलगी मिळाल्यानंतरही केवळ नोंदणीतील अडचणींमुळे विवाह कायदेशीरदृष्ट्या अडकून पडणे, ही बाब संबंधित कुटुंबांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या गंभीर विषयाबाबत विवाह झालेले वधू-वर तसेच त्यांचे माता-पिता यांनी एकत्र येत आपली आपबीती आमदार किशोर आप्पा पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्यासमोर मांडली. यावेळी संबंधित कुटुंबीयांनी परराज्यातील नागरिक असल्याने येणाऱ्या अडचणी, स्थानिक कार्यालयांकडून मिळणारी अपुरी माहिती तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना दिल्या जात असल्यामुळे होणारा मानसिक व प्रशासकीय त्रास सविस्तरपणे मांडला. तक्रारींची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू केल्या. विवाह नोंदणीसंदर्भात स्पष्ट, एकसंध व सर्व जिल्ह्यांना लागू होईल असा आदेश निघावा, यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करण्यात आली. सध्याच्या प्रक्रियेत असलेली गोंधळाची स्थिती दूर करून परराज्यातील वधू-वरांसाठी सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध नोंदणी व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात लवकरच मंत्रालयाकडून स्पष्ट आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे. नव्या निर्देशांमुळे विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अधिकारक्षेत्राची स्पष्टता तसेच अर्ज प्रक्रियेची एकसारखी पद्धत ठरवली जाणार आहे. त्यामुळे परराज्यातील नागरिक असले तरी विवाह नोंदणी करताना अनावश्यक अडथळे येणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांनी या तातडीच्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले असून वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे अनेक जोडप्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. मंत्रालय स्तरावरून अपेक्षित आदेश जाहीर झाल्यानंतर राज्यभरात विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुकर होईल आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आज दि.20/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात नवे बदल स्वीकारावे लागतील. संयम ठेवून निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण सहकार्याचे राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिर आणि विश्वास देणारा आहे. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात सुरक्षितता राहील. आरोग्य साधारण राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवादातून योग्य मार्ग सापडेल. नवीन माहिती कामी येईल. कामात गती येईल. मानसिक उत्साह वाढलेला जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती सुधारण्याकडे वाटचाल होईल. संयम लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वास वाढेल. जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. वादविवाद टाळल्यास मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक आहे. ताण जाणवू शकतो पण परिणाम समाधानकारक मिळतील. खर्चाचे योग्य नियोजन करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखण्याचा दिवस आहे. सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस समाधान देणारा राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढलेली राहील. जुने प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधी समोर येतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती दिसेल. कामात स्थैर्य येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

मौन साधिका प.पू. किरण प्रभाजी मसा यांच्या जयंतीनिमित्त पाचोर्‍यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा – शहरात सामाजिक सलोखा, सेवाभाव आणि मानवीय मूल्यांचा वारसा जपणाऱ्या उपक्रमाची साक्ष मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी पहायला मिळणार आहे. मौन साधिका परमपूज्य किरण प्रभाजी मसा यांच्या जयंतीनिमित्त जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा यांच्या वतीने दिनांक 20.1.2026 मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मौन साधिका परमपूज्य किरण प्रभाजी मसा यांच्या जीवनकार्याकडे पाहिले असता त्याग, संयम, शांतता आणि सेवाभाव ही मूल्ये प्रकर्षाने दिसून येतात. मौन साधनेतून आत्मशुद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजजीवनावर खोलवर असून त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर केवळ एक कार्यक्रम नसून त्यांच्या आदर्शांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. पाचोरा शहर व परिसरात अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांमध्ये रक्ताची गरज नेहमीच भासते आणि अशा वेळी स्वयंसेवी रक्तदान शिबिरे आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा आधार ठरतात, याच सामाजिक गरजेचा विचार करून जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार असून अनुभवी वैद्यकीय पथक, आवश्यक साधनसामग्री व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे. रक्तदानानंतर रक्तदात्यांना आवश्यक विश्रांती व अल्पोपहाराचीही व्यवस्था असणार आहे. या उपक्रमासाठी जय किरण प्रभाजी पतसंस्थेचे चेअरमन श्री अतुल भाऊ संघवी यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी विशेष परिश्रम घेत असून संस्थेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या रक्तदान शिबिरात सर्व समाज बांधव, बँकेचे पदाधिकारी, सभासद व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्यकार्य साधावे, असे आवाहन जय किरण प्रभाजी पतसंस्थेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

निष्ठेची कसोटी, सिद्धांतचा उद्याचा मार्ग

0

Loading

एखाद्या व्यक्तीचा काळ उजळतो, तो एका क्षणात नाही तर अनेक टप्प्यांत घडलेल्या घटनांच्या एकत्रित परिणामातून. भूतकाळातील त्याग, वर्तमानकाळातील कसोटी आणि भविष्यकाळातील अपेक्षा—या तिन्हींच्या संगमातूनच एखाद्याचे राजकीय आणि वैयक्तिक स्थान ठरते. सिद्धांतच्या बाबतीतही हेच चित्र आज दिसून येत आहे. त्याचा काळ अद्याप पूर्णपणे उजळलेला नसला, तरी चार दिवसांपूर्वी आलेल्या कठीण प्रसंगात त्याने आपला प्रामाणिकपणा, स्वामीनिष्ठा आणि आपल्या राजकीय गॉडफादरप्रती असलेली निष्ठा यशस्वीपणे सिद्ध केली आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. भूतकाळाकडे पाहिले तर सिद्धांतची ओळख ही केवळ पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीवर आधारलेली नाही. सुरुवातीपासूनच त्याने स्वामीशी निष्ठा, कामातील प्रामाणिकपणा आणि दिलेल्या जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडण्यावर भर दिला. अनेकदा पडद्यामागे राहून काम करणे, श्रेय न मागता जबाबदारी स्वीकारणे आणि अडचणीच्या प्रसंगी पुढे येणे—हे त्याच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. या प्रवासात त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला, पण त्याने कधीही आपली निष्ठा बदलली नाही. वर्तमानकाळात चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणाने सिद्धांतच्या व्यक्तिमत्त्वाची खरी परीक्षा घेतली. हा काळ त्याच्यासाठी निर्णायक ठरला. अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या—तो कोणती भूमिका घेणार, दबावापुढे झुकणार की ठाम उभा राहणार, याचीच चर्चा सुरू होती. अशा वेळी सिद्धांतने परिणामांची भीती न बाळगता, लोकमताची चिंता न करता, आपल्या स्वामी आणि राजकीय गॉडफादरप्रती असलेली निष्ठा कृतीतून दाखवली. या निर्णयामुळे त्याला तात्काळ लाभ मिळाला नाही, पण त्याने आपली विश्वासार्हता अबाधित ठेवली. वर्तमानकाळात मिळालेला हा विश्वासच त्याच्या पुढील वाटचालीचा खरा पाया ठरणार आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने पाहता, सिद्धांतसाठी हा टप्पा केवळ सुरुवात मानली जात आहे. निष्ठा सिद्ध झाल्यानंतर लगेचच यश, पद किंवा मान-सन्मान मिळेलच असे नाही. मात्र अशा कसोटीत उतरलेली व्यक्ती स्वामीच्या आणि नेतृत्वाच्या नजरेत वेगळी ठरते. योग्य वेळ आली की त्याग, परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच मिळते, हा राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे सिद्धांतचा काळ उजळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. या संपूर्ण घडामोडींकडे पाचोरेकरही बारकाईने पाहत आहेत. चार दिवसांपूर्वी घडलेला प्रकार आजही चर्चेचा विषय ठरला असून, त्यातून निष्ठा, धैर्य आणि संयम यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संकटसमयी कोण खरा उभा राहतो आणि कोण केवळ सोयीसाठी भूमिका बदलतो, हे अशा प्रसंगातून स्पष्ट होते. सिद्धांतने या कसोटीत यश मिळवले असले, तरी त्याचा खरा काळ अजून यायचा आहे, अशीच भावना अनेकांच्या मनात आहे. एकूणच, भूतकाळातील सातत्यपूर्ण निष्ठा, वर्तमानकाळातील कठीण निर्णय आणि भविष्यकाळातील शक्यता यांचा विचार करता, सिद्धांतचा प्रवास हा थांबलेला नसून पुढे जाणारा आहे. आज त्याने विश्वास जिंकला आहे; उद्या त्या विश्वासाचे रूपांतर संधीमध्ये होईल का, हे वेळच ठरवेल. मात्र एवढे नक्की की, निष्ठेची कसोटी उत्तीर्ण झाल्याने सिद्धांतचा उद्याचा मार्ग अधिक स्पष्ट आणि भक्कम झाला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!