आपण सर्वजण एक जिल्हा, एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत – एरवी आपल्या जळगाव जिल्ह्याला कृषी, उद्योग, शिक्षण आणि सांस्कृतिक प्रगतीने ओळखले जाते. परंतु पावसाळ्याच्या आगमनासोबतच कधीकधी आपल्या परिसरात डासांमुळे पसरणाऱ्या रोगराईचा धोका निर्माण होतो. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन सकारात्मक पावले उचलायला हवीत.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल या तालुक्यांतील जनतेने, आपापल्या घराप्रमाणे आपल्या परिसरालाही घरासारखेच मानले पाहिजे. आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य हे आपल्या हाती आहे. पावसाळा म्हणजे हिरवळ, समाधान आणि निसर्गसौंदर्य. पण याच काळात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, आणि जपानी मेंदूज्वर (जे.ई.) यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला पाण्याची साठवण आणि त्यातून होणारी डासांची वाढ.
या डासांमधील एडिस इजिप्ती हा डास डेंग्यूचा प्रमुख वाहक आहे. हा डास केवळ सकाळी व संध्याकाळी चावतो आणि स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. म्हणजेच आपल्या अंगणातील कुंड्या, मोकळ्या डब्या, टाक्या, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या – हे सगळे ठिकाणं धोकादायक ठरू शकतात.
आपण काय करू शकतो? – प्रतिबंधात्मक उपायांची यादी
पाणी साठू देऊ नका – आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळा. सर्व पाणी साठवलेली भांडी रिकामी करा व स्वच्छ ठेवा.
तेलाचा वापर करा – साचलेल्या पाण्यात केरोसिन किंवा सरस तेलाचे २-४ थेंब टाकावेत.
पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस.
भंगार व बांधकाम साहित्याची अनावश्यक साठवण टाळा.
स्वच्छ परिसर – आरोग्यदायी जीवनशैलीचा पाया जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक शाळा-महाविद्यालयात आणि प्रत्येक घरात एकच संकल्प हवा – “स्वच्छ परिसर, रोगमुक्त जीवन”. आपण जर आज थोडा वेळ काढून आपल्या घराप्रमाणे परिसराचीही जबाबदारी घेतली, तर उद्याचा दिवस अधिक सुरक्षित आणि निरोगी होईल. जसे आपण आपल्या अंगणात लावलेला वृक्ष जपतो, तसेच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे. हे एकट्या प्रशासनाचे काम नाही, ही तर आपली सामूहिक जबाबदारी आहे. डासमुक्त परिसर ही फक्त काळजी नाही, ती आपल्या आरोग्याबद्दलची सकारात्मक बांधिलकी आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका व ग्रामीण रुग्णालयांच्या विविध यंत्रणा त्यांच्या पातळीवर उपाययोजना करत आहेत – आता त्यांना आपलेही सहकार्य मिळेल अशी कृती व्हावी. चला, आजपासून आपल्या गल्लीत, आपल्या मोहल्ल्यात, आपल्या शाळेत एक जनजागृती मोहीम राबवूया. मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या लढ्यात भाग घ्या. कधीकधी एक साधा उपाय – उदा. पाणी रिकामं करणं – एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. आपण एक पाऊल उचलूया स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या आरोग्यासाठी. “स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवून, डासांवर मात करून, रोगराईपासून बचाव करूया” हे आपल्या जळगाव जिल्ह्याचं सामूहिक संकल्पवाक्य बनवूया! आपल्या प्रत्येक कृतीतून निर्माण होईल आरोग्यदायी भविष्यासाठीचा मार्ग. चला, हातात हात घालून किटकजन्य आजारांविरुद्ध लढूया – सकारात्मकतेने, सजगतेने आणि एकजुटीने!
मेष आज तुमचा आत्मसम्मान वाढेल आणि मेहनतीच्या कामांना मान्यता मिळेल. आर्थिक क्षेत्रात हलकी चिंता असू शकते; खर्चांवर नियंत्रण आवश्यक. शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल
वृषभ शनि वक्रीवर असल्याने राजयोगाचा परिणाम अनुभवता येईल. करिअर व आर्थिक स्थितीत स्थिरता येईल, पण थकवा जाणवू शकतो शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी
मिथुन मालव्य राजयोग व बुधादित्य योगामुळे कामात गती मिळेल आणि आर्थिक फायदा शक्य शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा
कर्क आज सूर्य कर्कात प्रवेश केल्याने बुधादित्य योग तयार होतोय: संवादातून फायदा, प्रवास व करिअर सुधारणा होईल शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा
सिंह नेतृत्वगुण वाढतील, आधीच्या प्रयत्नांचे मान-सन्मान मिळतील; परंतु आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी
कन्या ग्रह-ज्योतिषानुसार विरोध, ताण येऊ शकतो—विशेषतः कामात आणि नात्यांमध्ये; संयमाने वागा शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा
तुला आर्थिक बाबतीत लक्ष ठेवा—शत्रू प्रभाव कमी नाहीत; पण प्रेम व कौटुंबिक संवादात सुधारणा होतील शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक मालव्य राजयोगामुळे आर्थिक उन्नती होण्याची शक्यता आहे; पण खर्चावर नियंत्रण ठेवावं शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा
धनु स्थान, प्रवास किंवा शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योग. मात्र, शनि वक्रीमुळे खर्च जागरूकतेने नियंत्रित ठेवा शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी
मकर शनि वक्रीमुळे स्व-विचार व निर्णयांची गरज, परंतु असे निर्णय दीर्घकालीन दृष्ट्या फायदेशीर ठरतील शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा
कुंभ राजयोगाचा परिणाम तुम्हाला सामाजिक व व्यावसायिक ताकद देतोय आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा फायदा होऊ शकतो शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा
मीन शनि वक्री व मीन राशीत राजयोगामुळे आर्थिक स्थैर्य व करिअरमध्ये प्रगती होईल, पण खर्च व भावना नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे
वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.
पाचोरा – पीपल्स बँक निवडणुकीतून मिळालेला धडा पाचोरा पीपल्स बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीने संपूर्ण पाचोरा तालुक्याचेच नव्हे तर जिंल्हयाचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीमध्ये एक नामवंत, स्वाभिमानी आणि अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले – डॉ. निलेश विनायक मराठे. त्यांच्या नावाभोवती कोणताही राजकीय गट नव्हता, कुणाचेही बाहुबल नव्हते आणि प्रचारासाठी मोठी यंत्रणासुद्धा नव्हती. पण एक गोष्ट मात्र होती – ती म्हणजे प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि लोकांवर असलेली निस्सीम श्रद्धा. या लढाईत एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला – मीडिया. आपल्या समाजात बऱ्याच वेळा मीडियाला फक्त टीका करण्यापुरतेच महत्त्व दिले जाते. पण मीडियाच्या आर्थिक वास्तवाकडेही बघा… आपल्या आजूबाजूच्या अनेक चर्चांमध्ये, सोशल मीडियाच्या पोस्ट्समध्ये, अगदी चहा टपरीवरील गप्पांमध्येही मीडिया म्हणजे एक विकलेली संस्था, खरी गोष्ट न दाखवणारी यंत्रणा, अशी टीका सहज ऐकायला मिळते. “मीडिया विकला गेला”, “त्यांचं काही खरं नाही” हे वाक्य सर्रास वापरले जातात. परंतु, ही टीका करणारे अनेकदा एक महत्त्वाची बाब विसरतात – मीडिया ही देखील एक यंत्रणा असते, ती चालवण्यासाठी आर्थिक स्रोतांची गरज भासते, आणि त्यामागे काम करणाऱ्या पत्रकारांनाही एक कुटुंब असते प्रत्येक पत्रकार, लेखक, छायाचित्रकार, व्हिडीओ संपादक यांच्यावरही त्यांच्या घरच्यांची जबाबदारी असते. त्यांच्या घरातही मुलांचे शिक्षण, वृद्ध पालकांची औषधं, दैनंदिन गरजा असतात. मीडिया हे क्षेत्र ‘सेवेचे’ असले तरी ते पूर्णपणे ‘सेवाभावी’ चालवणे आजच्या युगात अशक्यप्राय झाले आहे. कोणतीही वृत्तसंस्था असो, युट्यूब चॅनल असो किंवा स्थानिक पोर्टल – त्यांना देखील सर्व्हर खर्च, तंत्रज्ञ, ऑफिस व प्रकाशनासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. अर्थातच, पत्रकारिता करताना कोणाकडून, किती, आणि कोणत्या हेतूने आर्थिक मदत घेतली जाते, याचे नैतिक भान राखणे देखील तेवढेच आवश्यक आहे. पत्रकाराने स्वतःच आत्मपरीक्षण करावे लागते – आपण जे सांगतो आहोत, त्यामागे कोणाचा अजेंडा नाही ना? आपण खरी गोष्ट सांगतोय का? आणि त्याचवेळी, समाजानेही ही जाणीव ठेवायला हवी की, मीडिया हा समाजाचा आरसा आहे, तो तुटू नये यासाठी त्याला आर्थिक व नैतीक पाठबळ आणि विश्वासाची गरज असते. म्हणूनच मीडियावर टीका करताना थोडे थांबा – आणि विचार करा की, जे लोक आपल्यासाठी रात्री-अपरात्री चालून बातम्या कव्हर करतात, त्यांनाही जगण्यासाठी आधार हवा असतो. पत्रकारिता ही नुसती चौथा स्तंभ नव्हे, तर तो टिकवणाऱ्या हातांचंही भान ठेवणं गरजेचं आहे. असो पण पाचोऱ्यातील या निवडणुकीने हे सिद्ध केले की जर एखाद्या प्रामाणिक उमेदवाराच्या पाठीशी मीडिया उभी राहिली, तर ती एकटी यंत्रणा देखील परिवर्तन घडवू शकते. एक विरुद्ध पंधरा – एकाकी पण न डगमगलेली लढत. या निवडणुकीत 15 उमेदवारांचा गट बिनधास्त मैदानात उतरला होता. त्यांच्या मागे संस्थात्मक ताकद, भरघोस निधी, प्रचार यंत्रणा, रथ, पोस्टर्स, बॅनर्स, व्हॉट्सअॅप टीम्स इत्यादी सर्व काही होतं. दुसरीकडे डॉ. निलेश मराठे यांच्याकडे ना ती व्यवस्था, ना मोठी टीम. त्यांच्याकडे होतं फक्त स्वाभिमानाचं झेंडू आणि मनापासून काम करण्याची तयारी. अशा परिस्थितीत, काही स्वच्छ विचारसरणी असलेल्या पत्रकारांनी त्यांना एक संधी दिली. त्यांनी माध्यमांमधून डॉ. मराठे यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली. मोठा पैसा नसतानाही, त्यांनी सोशल मीडिया आणि लोकल न्यूज पोर्टल्सचा योग्य वापर करून मतदारांच्या मनामनात प्रवेश मिळवला. मीडिया – प्रचाराचा नवा हात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेल्या या युगात, मीडिया ही केवळ टीव्ही, वर्तमानपत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर प्रभावीपणे काही पोस्ट्स, व्हिडीओ, मुलाखती पोहोचवल्या गेल्या. पत्रकार बांधवांनी सत्याला न्याय दिला. सतत घडामोडींवर नजर ठेवून, योग्य तो प्रकाशझोत प्रामाणिक उमेदवारावर टाकून माध्यमांनी “एक नवा बदल घडू शकतो” असा संदेश दिला. यामुळे सामान्य मतदारांनाही नवा पर्याय दिसू लागला. त्यांनीही विचार केला – की प्रस्थापित गटाच्या बाहेरही एक चांगला उमेदवार असू शकतो. निवडणुकीतील पारदर्शकतेचा आवाज. आजवर अनेक निवडणुका बघितल्या, जिथे पैशाच्या जोरावर, मतदारांना आकर्षित करून, यंत्रणेच्या दबावाखाली विजय मिळवला जातो. पण या निवडणुकीत डॉ. निलेश मराठे यांनी ना कोणतेही आमिष दाखवले, ना कुणावर दबाव टाकला. त्यांनी एकच गोष्ट केली – आपल्या विचारांवर आणि कार्यक्षमतेवर लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. हा विश्वास घडवण्यात मीडियाची भूमिका मोलाची ठरली. पत्रकारांनी त्यांच्या विचारांना माध्यमं दिली. मतदारांपुढे एक नवा विचार मांडला – की बँकेचे प्रशासक म्हणून नवा चेहरा का असावा, कोणते बदल हवेत, आणि नेमका काय फरक डॉ. मराठे घडवू शकतात. समाजप्रबोधनाची भूमिका बजावणारे पत्रकार. माध्यमं ही केवळ बातम्या देण्याची यंत्रणा नाही, ती समाजाचा आरसा असते. या निवडणुकीत जे पत्रकार, युट्यूब चॅनल्स, स्थानिक न्यूज पोर्टल्स, सोशल मीडियावरील लेखक-प्रेक्षक मंडळी होत्या, त्यांनी अगदी समाजप्रबोधनपर कामगिरी बजावली. त्यांनी जनतेला योग्य माहिती दिली. कुठेही बदनामी, चुकीचा प्रचार, किंवा निवडणूक वाकवण्याचा प्रकार केला नाही. आजचा निकाल – उद्याच्या संघर्षाची सुरुवात. नक्कीच, डॉ. निलेश मराठे यांना या निवडणुकीत विजय मिळाला नाही. पण निवडणूक म्हणजे फक्त मतपत्रिकेवरचा निकाल नव्हे. लोकांच्या मनात उमेदवाराबद्दल ज्या भावना निर्माण होतात, तोच खरा विजय असतो. आणि त्या अर्थाने पाहता, त्यांच्या “एकट्या लढाईला” भरभरून साथ देणाऱ्या मतदारांनी त्यांना मानसिक विजय मिळवून दिला आहे. एक वेगळा संदेश – माध्यमांचा वापर योग्य केला तर लोक जोडले जातात. या संपूर्ण निवडणुकीतून मिळालेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे – मीडियाला हलक्यात घेऊ नका. मीडिया ही जर जबाबदारीने वापरली, योग्य माहिती आणि विचार मांडले गेले, तर ती एखाद्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येऊ शकते. जनतेला जागृत करू शकते. जर मीडिया चुकून एखाद्या चुकीच्या विचारसरणीच्या पाठीशी उभी राहिली, तर समाजाचा घात होऊ शकतो. पण जर ती योग्य व्यक्तीच्या, नीतिमान विचारांच्या पाठीशी उभी राहिली, तर एकटे व्यक्तीही परिवर्तन घडवू शकतात – हेच डॉ. निलेश मराठे यांचं उदाहरण सिद्ध करतो. पत्रकारितेची खरी शक्ती काय असते? ✓ मते वाढवणे नव्हे, तर विश्वास निर्माण करणे ✓ अफवा पसरवणे नव्हे, तर विचार जागवणे ✓ कोणाच्या बाजूने उभं राहणं नव्हे, तर सत्याच्या बाजूने उभं राहणं या निवडणुकीतून मीडियाने हे सिद्ध केलं. मतांची संख्या विजयासाठी कमी परंतु नेत्रदिप असली तरी ती ज्या प्रामाणिकपणे मिळाली, त्या एकेक मतामागे एक विचार होता, आणि त्या विचाराची जडणघडण मीडियामार्फत झाली. शेवटी… आजचा निष्कर्ष एकच – तुमच्याकडे जर प्रामाणिक विचार असतील, योग्य हेतू असेल, तर मीडिया तुमच्या सोबत उभी राहते. आणि ती उभी राहिली, तर तुम्ही कितीही एकटे असलात, तरी समाज तुमच्या मागे उभा राहतो. म्हणून पुढच्या वेळेस मीडिया म्हणजे फक्त टीका करण्याचं माध्यम नाही, तर योग्य वापर केला तर तेच तुमचं सर्वात मोठं बळ ठरू शकतं, हे लक्षात घ्या. पुनच्छ विनंती मीडियाला हलक्यात घेऊ नका…!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे सायंकाळी ४:३० ते ७:३० या वेळेत सतराव्या कविसंमेलनाने रसिकमनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. “श्रद्धेच्या सुरांनी भारलेली त्रिसंधी – भक्ती, कृतज्ञता आणि श्रावणाचा काव्यसाज” या संकल्पनेवर आधारित हे संमेलन रसिकांच्या मनात खोलवर ठसणारा अनुभव ठरला. या विशेष संमेलनाची वैशिष्ट्यपूर्ण रचना तीन सत्रांत करण्यात आली होती. पहिलं सत्र “भक्तिरसाने भारलेली काव्यसंध्या” – विठोबा, हरिपाठ, वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशीच्या भक्तिभावपूर्ण पार्श्वभूमीवर आधारित होतं. टाळ-मृदंगाच्या आभासी नादात साकारलेले काव्य नुसते ऐकायला नाही, तर अंतःकरणाने अनुभवायला मिळाले. दुसऱ्या सत्रात “गुरुचरणी नतमस्तक” या गुरुपौर्णिमा विशेष सत्रात गुरु-शिष्य नात्याचं गूढ, आदर, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा भाव कवितांमधून प्रकट झाला. अनेकांनी आपल्या गुरूंप्रतीच्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडल्या. तिसऱ्या सत्रात “मनातला श्रावण” या विषयावर निसर्ग, आठवणी, विरह, ओलसर भावना, पावसाच्या सरी आणि नात्यांची उब अशा नाजूक तरलतेचा सुरेख काव्याविष्कार झाला. मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपल्या श्रावण विषयाला अनुसरून अभिवाचन करणार्या चंद्रकांत दढेकर यांनी उपस्थितांना दाखवून दिले. त्यांनी निवडलेला उतारा, त्यातील लालित्यपूर्ण भाषा सौंदर्य आणि आरोह अवरोह घेत संयतपणे केलेलं अभिवाचन एका उत्कृष्ट अभिवाचनाचा उत्तम नमूना होतं. कार्यक्रमाची रंगत वाढवणारा एक विशेष क्षण म्हणजे ओमकार गणेश खाडे या लहानशा बालकाने अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने सादर केलेली प्रार्थना. त्याच्या निरागसतेनं आणि आवाजातील माधुर्याने सर्व रसिकांची मने जिंकली. या कविसंमेलनात डॉ. मानसी पाटील, अशोक (भाई) पुंडलीक नार्वेकर, कल्पना दिलीप मापूसकर, विक्रांत मारूती लाळे, संतोष धर्मराज मोहिते, आश्विनी सोपान म्हात्रे, वैभवी विनीत गावडे, उत्तम कुलकर्णी, अनिल विनोद भोईर, नंदन भालवणकर, सुचिता बागडे-खाडे, प्रा. नागेश सोपान हुलवळे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, प्रमोदिनी अनिल देशमुख, सरोज लट्टू, प्रीती तिवारी, राजेश साबळे ओतूरकर, अक्षता रणजित गोसावी, डॉ. स्नेहा समीर राणे, छाया धर्मदत्त पाटील, मेघना दीपक सावंत, रविंद्र शंकर पाटील, नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून श्री. लट्टू, दिलीप राणे, गणेश खाडे आणि डॉ. अनुज केसरकर यांनी प्रत्येक कवितेचा रसग्रहणपूर्ण अनुभव घेतला. सर्व कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि कार्यक्रमानंतर एकत्रित छायाचित्र घेतलं गेलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेमक्या शब्दांत विक्रांत लाळे यांनी केले. तांत्रिक बाजू रविंद्र पाटील यांनी संभाळली. कार्यक्रमात गरमागरम चहा, बिस्किटांचा आस्वाद रसिकतेला गोडवा देऊन गेला. नंदन भालवणकर, नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी त्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले. गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक/अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा), नितीन सुखदरे (अध्यक्ष – शोध आनंदाचा फाऊंडेशन), आणि सनी आडेकर (सचिव – शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांची संयोजनातील तळमळ आणि सातत्य हाच या संमेलनाच्या यशाचा खरा पाया ठरला. सहभाग प्रमाणपत्रावर सर्वांची नावं आपल्या सुंदर हस्ताक्षरात वैभवी गावडे यांनी लिहून दिली, त्यांना मनःपूर्वक सलाम! या यशस्वी कविसंमेलनानंतर, पुढील अठरावे कविसंमेलन येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित केले जाईल. आपली कविता, आपली ओळख – पुन्हा एकदा साहित्याच्या व्यासपीठावर उमटवण्यासाठी सज्ज व्हा!
मेष आज तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा दोन्ही शिखरावर राहतील. कामात पुढाकार घेऊन निर्णयात स्पष्टता मिळेल; परंतु अचानक आलेल्या संधीमध्ये खर्चिक परिणाम होऊ शकतो, ते विचारपूर्वक निवडा. शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल
वृषभ मालव्य राजयोगाचा चांगला प्रभाव तुम्हाला दिसेल. आर्थिक स्थिरता आणि कुटुंबातील सौहार्द या दोन्ही दिशांनी दिवस फायद्याचा. शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी
मिथुन आज बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. परंतु कार्यभार आपल्या कल्पेक्षा जास्त असेल—तणाव खुले. संयम पण आवश्यक आहे. शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा
कर्क करिअरमध्ये लोकांशी संवादातून व प्रवासातून सकारात्मक लाभ दिसतोय. सर्जनशीलता वाढेल, पण आरोग्याची थोडी काळजी घ्या. शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा
सिंह राजयोगामुळे नेतृत्वगुणांचा विकास होईल. पण शारीरिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वास्थ्याकडे लक्ष द्या. शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी
कन्या आज निर्णय किंवा कामात विरोधात्मक अडचणी येऊ शकतात. विश्लेषणातून पुढे जा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा
तुला भावनिक स्थिरता लाभेल, नात्यांमध्ये सौहार्द राहील. पण व्यवहारात सावधगिरी बाळगा—शत्रू किंवा विरोधकांचा धोका कमी नाही. शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक मालव्य राजयोगामुळे आज व्यवसायात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च थोड्या जास्त होतील, पण नफ्याने तो शमकतो. शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा
धनु प्रवास आणि नवकल्पनांमध्ये यश येऊ शकते. परंतु शनि वक्रीपेक्षा खर्चावर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी
मकर शनि वक्रीमुळे तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागू शकतील. परंतु दीर्घकालीन दृष्टीने आजचा दिवस फायद्याचा आहे. शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा
कुंभ आज सामाजिक प्रतिष्ठा वाढीसारखी वाटतेय. जुने प्रकल्प व गुंतवणूक फळदायी ठरू शकतात. शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा
मीन शनि वक्री आणि महालक्ष्मी राजयोगामुळे आर्थिक लाभ व करिअर प्रगती होईल. तरीही खर्च व भावना नियंत्रित ठेवा. शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा
वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.
पाचोरा – तालुक्यातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक दशके उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाटील कुटुंबातील एक अत्यंत व्यावसायिक, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. अनंतदादा पाटील (Mo.- 9421635777 ) यांनी नुकत्याच पार पडलेल्या दि पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड निवडणुकीत सर्वाधिक 3874 मते मिळवून विजय मिळवत तालुक्याच्या राजकीय पटलावर आपल्या यशस्वी झंझावाती प्रवेशाची नोंद केली आहे. त्यांच्या या विजयाने केवळ बँकिंग क्षेत्रात नव्हे तर आगामी काळातील पाचोऱ्याच्या सामाजिक-राजकीय जीवनात नवचैतन्याचे आणि परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. डॉ. अनंतदादा हे तारखेडा या पाचोरा तालुक्यातील गावाचे सुपुत्र. त्यांचा जन्म गुर्जर समाजातील एक अत्यंत सुसंस्कारित आणि सेवाभावी कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वर्गीय डॉ. बाबुराव उर्फ बा.बा. पाटील हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अग्रणी होते. दि पाचोरा पिपल्स बँकेचे चेअरमन, श्री एम.एम. महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष आणि अखेरपर्यंत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य यासाठी मोठे योगदान दिले. या महान वारशाचे जतन करत, डॉ. जयंतदादा पाटील आणि डॉ. यशवंत पाटील या बंधूंनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षण आणि सहकार क्षेत्रात नेतृत्व बजावले. जयंतदादा सध्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक असून, त्यांनी दि पाचोरा पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणूनही कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अनंतदादा पाटील यांचे यश अधिक प्रेरणादायी ठरते. डॉ. अनंत पाटील यांनी वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर 2006 साली पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य सुरू केले. 2016 पर्यंत त्यांनी शासकीय आरोग्य सेवेत हजारो रुग्णांना निःस्वार्थ सेवा दिली. नंतर त्यांनी खाजगी वैद्यकीय सेवा सुरू केली आणि पाचोऱ्यात “रुग्णांचा डॉक्टर” म्हणून त्यांची ओळख बळकट झाली. पैसा, प्रसिद्धी किंवा राजकीय लाभ या गोष्टींपेक्षा “सेवा” हीच त्यांच्या आयुष्याची केंद्रबिंदू राहिली. ते लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना “अण्णा” म्हणून परिचित आहेत. सुसंवाद, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा स्पर्श हे त्यांच्या स्वभावाचे विशेष पैलू. या साऱ्या गुणांचा परिणाम म्हणूनच त्यांच्या आजूबाजूला सर्व समाजाचे लोक निसंकोचपणे त्यांच्याशी जोडले गेले आहेत. जरी अनेक वर्षांपासून त्यांच्यावर राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी दबाव होता, तरी त्यांनी नेहमीच नम्रपणे त्या गोष्टी टाळल्या. पण यंदाच्या दि पाचोरा पिपल्स बँक निवडणुकीत त्यांनी प्रथमच स्वतःचा उमेदवारी अर्ज भरत आर्थिक क्षेत्रातील निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला — आणि थेट 3874 मतांच्या आघाडीने सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार ठरले. हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर तो समाजाच्या विश्वासाचा विजय, सेवाभावाच्या संस्कारांचा विजय, आणि एक नवा लोकनेता तयार होतो आहे याचे संकेत आहेत. ही निवडणूक म्हणजे त्यांचा राजकीय अविष्कार म्हणावा लागेल. गुर्जर समाजाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. जयंतदादांच्या प्रेरणेतून आलेले, वैद्यकीय सेवा देणारे, शिक्षणावर निष्ठा ठेवणारे आणि आता आर्थिक निर्णयक्षमतेच्या केंद्रस्थानी पोहोचलेले डॉ. अनंत पाटील सर्व समाजघटकांचे प्रतिनिधीत्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, मराठा, माळी, कुणबी, वाणी, ब्राह्मण अशा सर्व समाजघटकांमधून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. कारण त्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येकाशी माणूस म्हणूनच संवाद साधला आणि माणुसकीच्या भावनेतूनच काम केले. डॉ. अनंतदादा यांच्या रूपात एक समंजस, ज्ञानी, भावुक आणि लोकाभिमुख नेतृत्व पुढे येत आहे. बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता, पारदर्शक कर्जव्यवस्था, लघु उद्योजकांसाठी सहकार्य आणि ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी हे त्यांचे प्राधान्यक्रम असतील, असे संकेत त्यांच्या विचारातून दिसतात. त्यांचा संयम, सौम्यपणा, दूरदृष्टी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन पाहता, भविष्यात पाचोरा तालुका नव्हे, तर जिल्हा आणि राज्य पातळीवरही त्यांच्या नेतृत्वाची गरज भासू शकते. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे सहकार्याची आणि नेतृत्वाची विनंती केलेली असूनही त्यांनी अद्याप कोणताही पक्ष स्वीकारलेला नाही, ही गोष्ट त्यांची स्वाभिमानी, मूल्यप्रधान आणि स्वयंपूर्ण विचारसरणी दर्शवते. पाचोरा पिपल्स बँकेच्या विजयानंतर डॉ. अनंतदादा पाटील यांनी केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पहिला टप्पा गाठलेला आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यसंघाने संघटितपणे, शिस्तबद्ध रीतीने ही निवडणूक लढवली, ते पाचोऱ्यातील युवकांना आणि भावी नेतृत्वाला एक सकारात्मक प्रेरणा देणारे ठरेल. “अनंतदादांचा विजय म्हणजे माणुसकीचा विजय आहे!” “पाचोऱ्यात असे नेतृत्व हवेच होते…” “अण्णा म्हणजे आमच्या मनातला विश्वास…” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर, गावगाड्यांत आणि शहरांमध्ये उमटत आहेत. गावातील लहान मुले, महिला मंडळं, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच आपल्या ‘अण्णा’च्या विजयानंतर फटाके वाजवत, पेढे वाटत आनंद साजरा केला. एक यशस्वी डॉक्टर, एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व, एक सहकारी विचारांचा आधारवड, आणि आता एक राजकीय नेतृत्वाचे आश्वासक रूप — डॉ. अनंतदादा पाटील. त्यांनी दि पाचोरा पिपल्स बँकेच्या माध्यमातून लोकमानसात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आजच्या काळात अशा लोकाभिमुख, सभ्य आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची फार गरज आहे. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने डॉ. अनंत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक भविष्याकरिता शुभेच्छा!
पाचोरा- शहरातील लाडशाखीय वाणी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरदभाऊ पाटे व सौ.संगिताताई शरद पाटे या यशस्वी दांपत्याने राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव एक आदर्श कार्यकर्ते म्हणून प्रस्थापित केले आहे. दोघांची कारकीर्द ही कार्य, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली अतूट बांधिलकी यांवर आधारित असून, अशा दांपत्याचे उदाहरण संपूर्ण पाचोरा परिसरात दुर्मीळ आहे. राजकीय क्षेत्रात काम करावं, समाजासाठी योगदान द्यावं आणि त्यातून एखादं सन्माननीय पद भूषवावं, ही प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. पण काही निवडक व्यक्तींच्या बाबतीत नशिबाची साथ आणि जनतेचा पाठिंबा हे दोन्ही घटक त्यांच्या यशात निर्णायक भूमिका बजावतात. शरदभाऊ पाटे हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी राजकारणात कोणताही गाजावाजा न करता, फक्त कार्यावर भर देत विश्वासाची कमाई केली. त्यांच्याच पाठीशी उभ्या असलेल्या सौ.संगिताताई पाटे यांचे देखील योगदान यासाठी तितकेच महत्त्वाचे मानावे लागेल. शरदभाऊ पाटे यांच्या कुटुंबाला राजकीय क्षेत्रात पहिली संधी मिळाली ती सौ.संगिताताई पाटे यांच्या रूपाने. त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी तत्कालीन आमदार स्व.तात्यासाहेब आर.ओ. पाटील तसेच विद्यमान हैट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. त्यांच्या सहकार्याने संगिता ताईंनी निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या यशाने समाजात आणि कुटुंबात मोठा आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. पत्नीच्या राजकीय यशानंतर शरदभाऊंनी स्वतःही कार्यक्षेत्रात जबाबदारीने योगदान देण्यास सुरुवात केली. समाजसेवा आणि विकासकामांमधून मिळालेला अनुभव व लोकसंपर्क यांच्या जोरावर त्यांनी पुढील निवडणुकीत नगरसेवक म्हणून स्वतः उमेदवारी दिली आणि निर्विवाद बहुमताने निवडून आले. केवळ निवडून येणे नव्हे, तर त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचे प्रेम आणि विश्वास मिळवला. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची दखल घेऊन दुसऱ्या कार्यकाळात त्यांना उपनगराध्यक्षपदही बहाल करण्यात आले. या पदावर त्यांनी सलग ५ वर्षे अत्यंत जबाबदारीने व समर्पणाने काम पाहिले. त्यांच्या नियोजनशक्ती, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संवादामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडून आले. राजकारणात यशस्वी झाल्यानंतर शरदभाऊ पाटे यांनी सहकार क्षेत्राकडे आपला कल वळवला. दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदासाठी त्यांना संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. संचालक या पदावर त्यांनी पारदर्शक आणि हितकारक निर्णय घेतले. बँकेच्या आर्थिक आरोग्याला बळकटी देणारी भूमिका बजावत त्यांनी सहकारी चळवळीच्या मूल्यांना न्याय दिला. शरदभाऊंच्या पाठोपाठ सौ.संगिताताई पाटे यांनाही दि पाचोरा पीपल्स बँकेत संचालक म्हणून संधी मिळाली आणि विशेष बाब म्हणजे त्या बिनविरोध निवडून आल्या. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेला जनतेचा विश्वास आहे. राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडणाऱ्या संगिताताई पाटे या आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. शरदभाऊ पाटे आणि सौ.संगिताताई पाटे हे दोघेही पाचोरा नगरपरिषद आणि दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या दोन्ही संस्थांमध्ये निवडून आलेले एकमेव दांपत्य आहे. तेही अगदी तरुण वयात. यामधून त्यांच्या नेतृत्वगुणांची, कर्तृत्वाची आणि कार्यक्षमतेची स्पष्ट पावती मिळते. या दोघांचेही कार्य हे समाजासाठी आहे, कोणत्याही व्यक्तिकेंद्रित राजकारणापासून दूर राहून ते फक्त कामाच्या जोरावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. शरदभाऊ पाटे यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, मनमिळावू आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद ठेवणारा आहे. त्यांनी केवळ विकासकामांमध्ये लक्ष केंद्रित न करता, प्रत्येक सण, उत्सव, समाजाचे दु:खद प्रसंग, महिला, युवा, वयोवृद्ध यांच्याशी निगडीत प्रश्नांवरही वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उपक्रम, आरोग्य शिबिरे, महिला बचतगटांना मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. संगिताताईंच्या माध्यमातूनही महिलांसाठी विशेष जागरूकता उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. शरदभाऊंच्या कारकीर्दीकडे पाहता हे निश्चितच सांगता येते की, त्यांचं यश हे काही केवळ नशिबाचे फलित नाही, तर त्यामागे त्यांच्या अथक परिश्रमांची, प्रामाणिक सेवाभावी दृष्टिकोनाची आणि जनतेच्या सुख-दु:खात सामील होणाऱ्या मनाच्या उर्मीची सांगड आहे. भविष्यातही ते अधिक जबाबदाऱ्या पार पाडतील, आणि पाचोराचा विकास साधणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, याबाबत कुठलाही संशय नाही. राजकारण व सहकार क्षेत्रात केवळ निवडून येणेच नव्हे, तर त्या पदाला न्याय देणं हे खऱ्या अर्थाने यशाचं मोजमाप असतं. शरदभाऊ पाटे व सौ.संगिताताई पाटे यांनी याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी ‘ध्येय न्यूज’ आणि ‘झुंज वृत्तपत्र’ परिवारातर्फे मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!