Home Blog Page 104

“जनतेच्या मनात घर केलेलं तेजस्वी नेतृत्व – नानासाहेब संजय ओंकार वाघ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा”

0

Loading

पाचोरा तालुका सह शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि पाचोरा नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.गटनेते तथा मा.नगरसेवक म्हणून आपले कार्यक्षेत्र उत्तमरित्या पेलणारे, सहकार, शिक्षण, क्रीडा, आणि सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी योगदान देणारे नानासाहेब संजय ओंकार वाघ यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा क्षण नसून, त्यांच्या कार्याची उजळणी आणि सन्मान करण्याची संधी आहे.नानासाहेब वाघ यांचं व्यक्तिमत्त्व हे अत्यंत शांत, नम्र, संयमी आणि विचारशील आहे. ते नेहमी कार्य करतात, पण त्याचं श्रेय घेण्याची त्यांना कधीही हाव नाही. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांना स्वतःचं कौतुक, बडेजाव, बॅनरबाजी, दिखावा, आणि भपकेबाजपणा अजिबात आवडत नाही. त्यांनी आतापर्यंत कितीही मोठी कामं केली असली तरी त्याची प्रसिद्धी त्यांनी कधीच केली नाही. याउलट, ते लोकांच्या अडचणी समजून घेत, त्यांना सोडवण्याकरता कुठलाही आडपडदा न ठेवता, अत्यंत शांततेने, परिश्रमपूर्वक कार्य करत आले आहेत.सध्या जो गढुळ, गोंधळलेल्या आणि स्वार्थी राजकारणाचा काळ आहे, त्या पार्श्वभूमीवर संजयनाना वाघ यांचं नेतृत्व हे एक तेजस्वी आदर्श ठरतं. त्यांनी आपले पिताश्री स्व.आप्पासाहेब ओकार वाघ यांच्याप्रमाणे राजकारणाला सेवा आणि जबाबदारीचा मार्ग मानत लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांनी केवळ पदांवर राहून सत्ता उपभोगण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजकल्याणासाठी कसा करता येईल, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून अधोरेखित होतं.त्यांची कर्तव्यदक्षता इतकी प्रगल्भ आहे की, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या काळात किंवा राजकीय धोरण, नियोजन, प्रचार, प्रचाराची आखणी, कार्यकर्त्यांचं बळ एकवटणं, तसेच जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचवणं या सगळ्या बाबतीत नानासाहेब अगदी लक्ष्मणाच्या भूमिकेत राहून दिलीपभाऊंच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढेच राहतात. ते दिलीपभाऊंनी घेतलेल्या निर्णयप्रक्रियेत कधीही मागेही राहत नाहीत – त्यांनी नेहमीच आपलं बंधुभाव टिकवून कार्यक्षमता सिद्ध केली आहे.                  आज संजयनानांचा विचार करता हेही अधोरेखित करावं लागतं की त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक केंद्र न राहता एक मूल्यप्रधान संस्कारांचे केंद्र बनले आहे. त्यांनी शिक्षणात नवकल्पनांचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, गुणवत्ता आणि सामाजिक जाणिवा विकसित केल्या. संजयनाना यांचं सहकारातील योगदानही मोठं आहे. संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी पारदर्शी कारभार, व्यवस्थापन कौशल्य, आणि संघटन क्षमतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सहकार चळवळीला राजकीय हेतू नव्हे तर आर्थिक आत्मनिर्भरतेचा उद्देश असतो.त्यांच्या सामाजिक कार्यातही माणूस हा केंद्रस्थानी असतो. कोणतंही संकट असो – आपत्ती, आजार, दुर्घटना, शोक – नानासाहेब लगेच धावून जातात. त्यांचं सर्वांशी नातं हे औपचारिक न राहता खऱ्या अर्थाने भावनिक आणि आपुलकीचं असतं. त्यांना ‘कॉमन मॅन’ म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.त्यांच्या शांत, संयमी आणि सौम्य वागणुकीमागे एक अत्यंत काटेकोर सुक्ष्म नियोजन असतं. त्यांच्या निर्णयप्रक्रियेच्या मागे नेहमीच लोकहित आणि शाश्वत विकास यांचा विचार असतो. त्यामुळेच पाचोरा नगरपालिकेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले – कधी रस्त्यांसाठी, कधी पाणीपुरवठ्यासाठी, तर कधी सर्व स्तरांवरील जनतेच्या मूलभूत सुविधेसाठी असो            आज नानासाहेब वाघ यांचा वाढदिवस हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी करत पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. ते केवळ आपल्या कामासाठी ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या माणुसकीसाठी, त्यांच्या शालीनतेसाठी आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजबांधव, कार्यकर्ते, शिक्षक, पालक, सहकारी, नागरिक, युवक त्यांना शुभेच्छा देताना हेच म्हणतात की, “तुमच्यासारखं नेतृत्व लाभणं हे आमचं सौभाग्य आहे.” स्व आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्याप्रमाणे जनतेचा आवाज, कार्यकर्त्यांचा विश्वास, आणि समाजासाठी झिजणारा सच्चा नेता – संजय ओंकार वाघ – यांना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा!
तुमची वाटचाल अशीच तेजस्वी, प्रेरणादायी आणि यशस्वी होवो, हीच प्रार्थना.

संघटन संस्कृतीचा दीपस्तंभ हरपला ग. दि. कुलथे यांना सश्रद्ध निरोप

0

Loading

१४ एप्रिल २०२५. सोमवारी रात्री नऊ वाजता एक अत्यंत दुःखद बातमी आली – ग. दि. कुलथे यांचं त्यांच्या नेरुळमधील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. महाराष्ट्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटन क्षेत्रात पाच दशके ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य झोकून दिलं, असे हे अफाट व्यक्तिमत्व… आज काळाच्या पडद्याआड गेले. आज असं वाटतंय… एखादं वटवृक्ष कोसळून गेला आहे.

ज्यांच्या सावलीत कित्येक संघटना उभ्या राहिल्या, अनेक नेतृत्वं घडली, संघर्षांना दिशा मिळाली, असा हा तेजस्वी दीपस्तंभ हरपला आहे.

ग. दि. कुलथे हे फक्त एक संस्थापक नव्हते, ते संघटनसंस्कृतीचे शिल्पकार होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा ही पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्व करत करत, अखेर “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली.

राज्य शासनाच्या तब्बल ७२ खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणणं हे कठीण काम त्यांनी संयम, संवाद, आणि सातत्याच्या माध्यमातून साध्य केलं. “महासंघ” ही फक्त संघटना नव्हती… ती होती एक विचारधारा, एक चळवळ – आणि या चळवळीचे ते प्राण होते.

पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या काळात कुलथेसाहेबांनी संवादात्मक संघटन शैलीचा आदर्श घालून दिला. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं – कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणं. ते कठोरही होते, पण नेहमी न्याय्यतेच्या बाजूने उभे राहत.

त्यांनी २० पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणलं, दरवर्षी राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून नेतृत्व विकसित केलं, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहावा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह धरला.

त्यांचं संघटन हे मागण्या व आंदोलने यापलीकडे जाऊन धोरण निर्मितीतील सक्रिय सहभाग असं होतं. त्यांनी संघटन क्षेत्राला केवळ आक्रमकता नव्हे तर विवेकशीलता आणि दीर्घदृष्टी दिली.

कर्मचारी वर्गासाठी ते फक्त सल्लागार नव्हते – ते मार्गदर्शक होते, प्रेरणास्थान होते. कोण्या नवख्या पदाधिकार्‍याने त्यांच्यासमोर आपली शंका ठेवली, तर ती ऐकून घेताना त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा नव्हे, तर एक आत्मीय भाव असायचे. ते आपुलकीनं समजावून सांगायचे – अनुभवांच्या संदर्भासह.

अनेकजण सांगतात, “कुलथेसाहेबांना एकदा भेटलं, की पुढच्या वाटचालीचं ध्येय स्पष्ट होतं.” हीच त्यांची खासियत होती. आज कित्येक विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, निवृत्त कर्मचारी हे त्यांच्या स्पर्शामुळेच घडलेले आहेत, असं ठामपणे म्हणतात.

ग. दि. कुलथे यांचं जाणं हे संघटन क्षेत्रातील मोठी पोकळी आहे.
कुठलाही मोठा निर्णय घेताना, कर्मचारी हिताचा विचार करताना, एक मतभेदांचं वादळ असताना… आता “कुलथेसाहेब काय म्हणाले असते?” हा प्रश्न हमखास आठवणार.

त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणं सहज शक्य नाही. पण त्यांच्या विचारांची, कामाची आणि मूल्यांची ज्योत प्रत्येक संघटकाच्या मनात तेवत ठेवणं… हीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

१५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नेरुळ पश्चिम येथील स्मशानभूमीत कुलथेसाहेबांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या घरासमोर सकाळी ९ ते १२.३० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

संघटन चळवळीतील महामेरू, कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ, आणि दृष्टी व दीर्घदृष्टीचा संगम असलेल्या ग. दि. कुलथे यांना संपूर्ण अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या वतीने सश्रद्ध निरोप…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर,मुंबई
दिनांक : १५/०४/२०२५ वेळ : ०२:४३

फिनिशर धोनीने शिवम दुबे सोबत लखनऊला त्याच्याच घरात हरवले

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सलग पाच पराभवांनंतर, चेन्नई सुपर किंग्ज आता विजयाच्या मार्गावर परतले आहेत. सोमवारी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने त्यांच्या घरच्या मैदानावर, एकाना स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्सचा पाच विकेट्सने पराभव केला. या हंगामात चेन्नईचा हा दुसरा विजय आहे तर लखनऊचा तिसरा पराभव आहे. संघाच्या विजयात फिनिशर धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. 
कर्णधार ऋषभ पंतच्या ६३ धावांच्या जोरावर लखनौने संघर्ष केला आणि २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. चेन्नईने १६७ धावांचे लक्ष्य १९.३ षटकांत पूर्ण केले. धोनीने ११ चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. दुबेने ३७ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. 
या सामन्यात धोनीने २० वर्षीय युवा फलंदाज शेख रशीदला संधी दिली आणि त्याने रचिन रवींद्रसोबत मिळून संघाला दमदार सुरुवात दिली. या तरुण फलंदाजाने शानदार फलंदाजी केली आणि आपल्या सुंदर फटक्यांनी सर्वांना प्रभावित केले. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, रशीदला अवेश खानच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनने झेलबाद केले आणि त्याचा डाव संपुष्टात आला. रशीदने १९ चेंडूत सहा चौकारांसह २७ धावा केल्या.
लखनौला विकेट मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत पंतने एडेन मार्करामला बोलावले आणि त्याने रचिन रवींद्रला पायचीत बाद केले. राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा अपयशी ठरला. १० चेंडू खेळल्यानंतर तो फक्त ९ धावा करू शकला. रवी बिश्नोईने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
राहुलची विकेट ७६ धावांवर पडली. यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी जबाबदारी स्वीकारली. संघाला दोघांकडून खूप अपेक्षा होत्या, पण बिश्नोईने जडेजाला आपल्या जाळ्यात अडकवले. सात धावा काढल्यानंतर तो १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याच्यानंतर आलेल्या विजय शंकरलाही धावगती वाढवता आली नाही आणि दबावाखाली त्याने मोठा फटका खेळला आणि १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिग्वेश राठीचा बळी ठरला.
शंकरनंतर, धोनी मैदानावर आला आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण स्टेडियम माहीच्या आवाजाने दुमदुमून गेलं. १५ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारून धोनीने चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून धोनीने लखनौच्या चिंता वाढवल्या. चेन्नईला शेवटच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी २४ धावांची आवश्यकता होती. दुबे आणि धोनीच्या बळावर चेन्नईने या धावा केल्या आणि विजय मिळवला. 
घरच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर सलग तिसरा विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही, परंतु मधल्या फळीतील कर्णधाराच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने यजमान संघाने चेन्नई सुपर किंग्जला १६७ धावांचे लक्ष्य दिले. एलएसएलच्या मागील सामन्यांचे मुख्य आधारस्तंभ असलेले अॅडम मार्कराम (०६) आणि निकोलस पूरन (०८) हे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. मिचेल मार्श (३०) त्याच्या प्रभावी सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरला.
खेळपट्टीचे स्वरूप समजून घेत, चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खलील अहमदने आपल्या कर्णधाराचा निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध केले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्क्रमला बाद करून खलीलने चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. एकूण २३ धावांवर असताना, एलएसजीला निकोलस पूरनच्या रूपात आणखी एक मोठा धक्का बसला. सामन्याच्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॅरेबियन फलंदाजाला पायचीत करून अंशुल कंबोजने चेन्नईला सर्वात मोठी विकेट दिली. तथापि, धोनीला एका रिव्ह्यूचा अवलंब करावा लागला ज्यामध्ये पूरन यष्टीसमोर सापडला. त्याने नऊ चेंडूंच्या खेळीत दोन चौकार मारले.
लखनौने चार षटकांत २३ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. आता, संघाला पुढे नेण्याची जबाबदारी पंतवर होती, जो खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याने संघ व्यवस्थापनाच्या आशा जिवंत ठेवल्या आणि खेळपट्टीवर पोहोचताच एक शानदार चौकार मारून एक चांगला संकेत दिला. मात्र, दरम्यान मार्शला जडेजाने बाद केले. पंतने मिशेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.
त्यानंतर कर्णधाराने आयुष बदोनी (२२) सोबत डाव हळूहळू सावरला. या काळात बदोनीला दोन लाईफलाईन्स मिळाल्या, पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. धोनीने एका शानदार चेंडूवर यष्टीचीत करून लखनौला मोठा धक्का दिला. गेल्या सहा सामन्यांपैकी पाच डावात फक्त ४० धावा काढणारा पंत या महत्त्वाच्या सामन्यात पूर्णपणे वेगळा दिसत होता. अनेक चांगले फटके मारल्यानंतर त्याचा आत्मविश्वासही वाढत होता. सतत विकेट पडल्यामुळे तो त्याच्या शैलीनुसार फलंदाजी करू शकला नाही पण बाद होण्यापूर्वी त्याने निश्चितच संघाला आव्हानात्मक लक्ष्यापर्यंत नेले. पंतने हंगामातील पहिले अर्धशतक झळकावून आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले. कर्णधार फॉर्ममध्ये परतल्याने लखनौला नक्कीच दिलासा मिळाला असेल.

पाचोरा इनोव्हेटर्सचा ऐतिहासिक विजय : भडगाव नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धेवर ३ धावांनी वर्चस्व- सामनावीर नयन सुर्यवंशी

0

Loading

पाचोरा – (झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज प्रतिनिधी धनराज पाटील, बॅनर मोबा. 9922614917) – भडगाव येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय रॉयल ग्रुप नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंट ही जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. जिल्ह्यातील युवकांच्या क्रीडासंवर्धनासाठी आणि ग्रामीण भागात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्पर्धेमध्ये एकूण बारा नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिकेट रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य, रणनीती, धैर्य आणि संघभावना यामुळे संपूर्ण भडगाव परिसरात क्रिकेटचा खऱ्या अर्थाने उत्सव अनुभवायला मिळाला. या स्पर्धेची सांगता अत्यंत रंगतदार आणि थरारक अंतिम सामन्याने झाली. पाचोरा शहरातील पाचोरा इनोव्हेटर्स आणि देशमुख रायडर्स क्रिकेट पाचोरा या दोन मातब्बर संघांमध्ये अंतिम लढत झाली. क्रिकेटप्रेमींच्या हजारो साक्षीने झालेला हा सामना अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा ठरला. सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा टिकून राहिल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी प्रत्येक चेंडूवर जल्लोष करत खेळाचा आनंद घेतला. पाचोरा इनोव्हेटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकांमध्ये ठोस धावसंख्या उभारली. फलंदाजांनी संयम राखून आणि योग्य फटकेबाजी करत फलंदाजीची जबाबदारी उत्तमरित्या निभावली. प्रतिस्पर्धी देशमुख रायडर्स संघाने देखील धाडसी आणि जोशपूर्ण फलंदाजी करत विजयासाठी झुंज दिली. मात्र शेवटच्या दोन षटकांत इनोव्हेटर्सच्या गोलंदाजांनी निर्धारपूर्वक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. अखेरच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाचोरा इनोव्हेटर्सने अवघ्या ३ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. या रोमांचकारी विजयानंतर पाचोरा इनोव्हेटर्स संघाला ११,००० रुपयांचे रोख पारितोषिक व भव्य विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघाच्या खेळाडूंमध्ये अपार आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नयन लक्ष्मण सूर्यवंशी याला

सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्या दमदार कामगिरीने संघाला विजयाच्या दिशेने नेण्यात मोलाचा वाटा उचलला. पाचोरा इनोव्हेटर्स संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रशांत देवरे, महेंद्र पाटील, कुलदीप पाटील, नयन सूर्यवंशी, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, देवा परदेशी, जयेश पाटील आणि शुभम कदम हे सर्व खेळाडू संघाच्या यशामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे ठरले. संघात असलेल्या संघभावना, परस्पर समन्वय, खेळावरील निष्ठा आणि कोचिंगचा सकारात्मक प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रॉयल ग्रुप भडगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. टर्फ मैदानावर रात्रीच्या वेळी झालेल्या सामन्यांसाठी उत्कृष्ट प्रकाशयोजना, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, खेळाडूंसाठी सुविधा आणि संयोजन यांची विशेष प्रशंसा करण्यात येत आहे. क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धांची गरज असून, या टुर्नामेंटने त्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. स्पर्धेच्या दरम्यान मैदानावर उपस्थित असलेल्या क्रीडा प्रेमींनी विविध संघांच्या खेळाला भरभरून दाद दिली. प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण व उद्घोषण प्रभावी पद्धतीने करण्यात आल्यामुळे मैदानावरचा जोश व आनंद द्विगुणित झाला. स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक नागरिक, माजी खेळाडू, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुढे सरसावले. विजयी संघाचे अभिनंदन करताना झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्यूज प्रतिनिधी धनराज पाटील यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या स्पर्धा युवकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, नेतृत्वगुण वाढतात आणि परिश्रमाचे खरे मूल्य समजते. पाचोरा इनोव्हेटर्सचा आजचा विजय हा केवळ एक स्पर्धेतील यश नाही तर पुढील अनेक विजयांची नांदी आहे.” क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक आणि प्रशिक्षकांनी या सामन्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी दोन्ही संघांच्या खेळाची प्रशंसा करत पाचोरा इनोव्हेटर्स संघाच्या युवा खेळाडूंमध्ये भविष्यात जिल्हा व राज्यस्तरावर झळकण्याची क्षमता असल्याचे मत व्यक्त केले. संघातील खेळाडूंनी शिस्त, एकाग्रता आणि कौशल्य दाखवत खऱ्या अर्थाने “खेळ ही एक जीवनशाळा” असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्याच्या शेवटी पाचोरा इनोव्हेटर्स संघाचे खेळाडू विजयी चषक घेऊन मैदानात फिरले, त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. नयन सूर्यवंशीसाठी विशेष सन्मान व्यक्त करत त्याच्या शिस्तबद्ध खेळाची आणि मैदानावरील शांत संयमी वागणुकीची प्रशंसा करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल रॉयल ग्रुपच्या संपूर्ण टीमला, खेळाडूंना आणि प्रेक्षकांना धन्यवाद देण्यात आले. येत्या वर्षीही ही स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात यावी, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली. एकूणच, भडगाव येथे झालेली रॉयल ग्रुप नाईट क्रिकेट टुर्नामेंट ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नव्हती, तर ती ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ देणारी, त्यांच्यातील क्रीडासंवेदना जागृत करणारी आणि जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा ठसा उमटवणारी स्पर्धा ठरली आहे. पाचोरा इनोव्हेटर्स संघाचा हा विजय आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

संविधान निर्मात्याच्या स्मृतिस्मरणाने भारलेली श्री. गो. से. हायस्कूलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

0

Loading

पाचोरा – ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातिव्यवस्था यांच्याशी लढा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पा.ता.सह. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वाघ व संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. १४ एप्रिल सोमवार रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन दादासो खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षक ए.बी. अहिरे, सौ. अंजली गोहिल मॅडम, आर.बी. तडवी, सांस्कृतिक समिती प्रमुख महेश कौंडीण्य, तांत्रिक विभागाचे प्रमुख एस.एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिमा पूजनानंतर संगीत शिक्षक सागर थोरात यांनी पंचशील प्रार्थना सादर करून या दिवशीची महत्त्वाची अध्यात्मिक नांदी घडवली. पंचशीलाच्या उद्घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संघर्ष, सामाजिक समता, संविधाननिर्मिती, दलित मुक्ती, स्त्री-पुरुष समानता, श्रम प्रतिष्ठा, आधुनिक भारताचे स्वप्न, अशा विविध विषयांवर प्रभावी भाषणे दिली. या भाषणांतून विद्यार्थ्यांनी केवळ माहितीच नव्हे तर आंबेडकर विचाराशी आपली बांधिलकीही दाखवून दिली. परीक्षक म्हणून डी.डी. कुमावत आणि रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षण केले आणि त्यांचे मार्गदर्शनही केले. रंगभरण स्पर्धेत विविध माध्यमातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, प्रतिमा, सामाजिक चळवळीचे प्रसंग, संविधान संकल्पना, बहुजन समाजाची प्रगती यांसारख्या विषयांवर चित्रे साकारली. कला शिक्षक एस.डी. भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील आणि कला शिक्षिका जे.एन. ठाकरे यांनी याचे परीक्षण करून विद्यार्थ्यांमध्ये कलाबोध निर्माण केला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना खलील देशमुख यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर सखोल भाष्य केले. त्यांनी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची, त्यागाची आणि समतेसाठीच्या कार्याची उजळणी करत विद्यार्थ्यांना सांगितले की, “बाबासाहेब केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते नवभारताच्या सामाजिक क्रांतीचे महान नेता होते. आज आपल्याला शिक्षण, मताधिकार, सन्मानाची संधी मिळत असेल, तर त्याचे श्रेय फक्त बाबासाहेबांना जाते. त्यांच्या विचारांनी आजही समाजाला दिशा दिली पाहिजे.” वक्तृत्व व रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत, उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित कविता व गीतं सादर करून सभागृह भारावून टाकलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. बोरसे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले. त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाचा सुरेख पूल बांधत उपस्थितांना जोडून ठेवले. आभार प्रदर्शन करताना रुपेश पाटील यांनी सर्व मान्यवरांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक आत्मीयता, अभिमान आणि त्यांचा विचार अंगीकारण्याची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रम संपल्यानंतर शाळेच्या आवारात बाबासाहेबांच्या घोषणांनी आणि जयंतिच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी “जय भीम” च्या घोषणांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. दिलीपभाऊ वाघ आणि नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली शाळेने अशा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करत समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानप्रेम, लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आणि मानवतेचे भान जपले जावे या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन प्रभावी पद्धतीने झाले. एकंदरीत, श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे साजरी झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर ती विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची, मानवतावादी दृष्टिकोनाची आणि विचारशील नागरिक होण्याची शिकवण देणारी एक जिवंत शाळा होती. या उत्सवाने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नाही, तर सर्व भारतीयांचे आदर्श आहेत आणि त्यांचा विचार हा काळाच्या प्रत्येक वळणावर नवसंजीवनी देणारा आहे.

मुंबईने केली दिल्ली काबिज

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सलग चार विजयांची दिल्ली कॅपिटल्सची विजयी मालिका अखेर खंडित झाली. मुंबई इंडियन्सने त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात १२ धावांनी पराभव केला. शेवटी, दिल्लीचे तीन फलंदाज धावबाद झाले आणि सामना गमावला.
मुंबईच्या २०६ धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९ व्या षटकात १९३ धावांवर बाद झाला. १९ व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूत तीन फलंदाज धावबाद झाले आणि दिल्लीने सामना १२ धावांनी गमावला. दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर जॅकला बाद करून मुंबईला पहिला गडी बाद करून दिला.
तथापि, तीन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने ४० चेंडूत ८९ धावांची जलद खेळी करत सामना दिल्लीच्या बाजूने केला, परंतु सँटनरने नायरची विकेट घेतली आणि कर्ण शर्माने केएल राहुल आणि अभिषेक पोरेलचे विकेट घेत सामना मुंबईच्या बाजूने वळवला. नंतर, अभिषेक शर्मा धावबाद झाल्यानंतर दिल्लीच्या आशा धुळीस मिळाल्या. कर्णने तीन आणि सँटनरने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी फक्त ५ षटकांत ४७ धावा जोडल्या.
तथापि, दोन्ही फलंदाज लागोपाठ तंबूमध्ये परतले. यानंतर, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि अर्धशतकी भागीदारी केली. सूर्याचे अर्धशतक हुकले, पण तिलकने ५९ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. याशिवाय, नमनने उपयुक्त ३८ धावाही जोडल्या. निर्धारित २० षटकांत मुंबई इंडियन्सने ५ गडी गमावून २०५ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने १२ चेंडूत १८ धावा केल्या आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विप्रज निगमने त्याला बाद केले. त्याच्या कामगिरीने चाहते पुन्हा एकदा निराश झाले. रोहित बाद होताच मैदानात शांतता पसरली.
वेगवान गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली. विप्रज निगम आणि कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीने मुंबईच्या मधल्या फळीचा कणा मोडला आणि धावगतीवर नियंत्रण मिळवले. मिचेल स्टार्क आणि मुकेश कुमार यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही परंतु कर्णधार अक्षर पटेलच्या हुशार नियोजनामुळे संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. कुलदीप आणि विप्रज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

स्वातंत्र्याचे लेखणीवरचे स्वाक्षरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अपार योगदान

0

Loading

                        “साहेब, ही लेखणी फक्त आपल्यामुळेच आज जिवंत आहे,” या शब्दांमध्ये किती खोल अर्थ सामावलेला आहे हे प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेणे अत्यावश्यक आहे. ही केवळ भावनिक अभिव्यक्ती नसून भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आधारित असलेली ती एक जिवंत साक्ष आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीचे अध्वर्यू, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला जे मूलभूत अधिकार प्रदान केले, त्यातील सर्वाधिक अमूल्य ठेवा म्हणजे “स्वतंत्र अभिव्यक्तीचा अधिकार” – ज्यामुळे आज लेखणीला स्वातंत्र्य मिळाले आहे. लेखणी ही एक अशी अस्त्रे आहे, जी शब्दांच्या माध्यमातून क्रांती घडवते, अन्यायाला वाचा फोडते, आणि सत्याचे तेज पसरवते. मात्र या लेखणीच्या अस्तित्वामागे एक महामानवाची विचारशील, सखोल, आणि दूरदृष्टीने युक्त दृष्टिकोनाची प्रेरणा आहे – ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.भारतीय राज्यघटनेचे मसुदा तयार करणाऱ्या घटनासमितीचे अध्यक्ष असलेल्या बाबासाहेबांनी घटनेत अनुच्छेद 19(1)(a) अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क प्रदान केला. हाच तो आधार आहे, ज्यामुळे आज पत्रकार, लेखक, विचारवंत, साहित्यिक आणि सामान्य नागरिकही निर्भीडपणे आपले विचार मांडू शकतो. हीच ती लेखणी, जी अत्याचाराविरोधात लढते, सामाजिक विषमता उघड करते आणि जनतेचा आवाज बनते. भारतीय समाजात लेखन आणि अभिव्यक्तीची परंपरा प्राचीन आहे. परंतु ही परंपरा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार चालणारी होती. ब्रिटिश राजवटीत पत्रकारांना अटक, वृत्तपत्रांवर बंदी, अभिव्यक्तीवर नियंत्रण अशा प्रकारच्या असंख्य घटना घडत असत. त्या काळात लेखणीचे धार कापली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर, विशेषतः 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर लेखणीला कायदेशीर संरक्षण मिळाले.या संरक्षणाचे श्रेय केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकास व्यक्त होण्याचे, लिहिण्याचे, आणि छापून काढण्याचे हक्क दिले. त्यामुळे आज भारतातील लेखणी ही केवळ शाईने नव्हे, तर विचारांच्या स्फुल्लिंगाने भारलेली आहे. बाबासाहेबांनी केवळ अभिव्यक्तीचा हक्क दिला नाही, तर त्या अभिव्यक्तीमध्ये समतेचा गाभा दिला. एका विशिष्ट वर्गापुरते लेखन मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना माहित होते की लेखणी ही केवळ एक माध्यम नसून, ती परिवर्तनाची सुरूवात आहे. म्हणूनच त्यांनी दलित, मागासवर्गीय, स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून लेखनक्षम बनवले. त्यांनी म्हटले होते, “If you want to destroy a society, destroy its literature.” पण त्यांनी भारतीय समाजाला वाचवण्यासाठी लेखणी जिवंत ठेवली.आज अनेक पत्रकार, समाजसुधारक, लेखक, ब्लॉगर, कवी, वकील, विधिज्ञ – हे सगळे या लेखणीच्या शक्तीवरच उभे आहेत. त्यांच्यामागे बाबासाहेबांचे संविधानिक बळ आहे. ज्या समाजात अभिव्यक्तीला स्वातंत्र्य आहे, त्या समाजात सृजनशीलता, नवविचार आणि समृद्ध परंपरा नांदते. याचे मूळ बाबासाहेबांच्या संविधानदत्त अधिकारात आहे. आज लेखणी स्वातंत्र्याची बातमी करताना अनेक अडचणी येतात. दबावगट, सत्ता, आर्थिक प्रभाव, धमक्या – हे सगळं या लेखणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजही ती लेखणी जीवंत आहे, कारण तिच्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान आहे. हा संविधान आपल्या लेखणीला ढाल देतो, तलवार देतो, आणि दिशा देतो. त्यामुळेच पत्रकारांवर झालेल्या आक्रमणांवर देशभर आवाज उठतो, निषेध नोंदवला जातो, कारण ती केवळ पत्रकाराची नाही तर लोकशाहीचीही हत्या असते.लेखणी ही आज समाज जागृती, राजकीय विवेक, धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यातील कणा बनली आहे. हजारो लोकांनी आपल्या लेखणीतून समतेचे, बंधुत्वाचे आणि परिवर्तनाचे बीज रोवले. ही लेखणीच आहे जी आज डिजिटल माध्यमातूनही ताकदवान झाली आहे. पण तिचे मूळ कायम आहे – ते म्हणजे संविधान आणि बाबासाहेबांचे विचार. “साहेब, ही लेखणी फक्त आपल्यामुळेच आज जिवंत आहे…” हा वाक्यफूल अभिव्यक्तीचा स्तंभ आहे. आज प्रत्येक वृत्तपत्रात, पोर्टलवर, न्यूज चॅनलवर जेव्हा एखादी निर्भीड बातमी छापली जाते, तेव्हा त्यामागे बाबासाहेबांच्या विचारांची छाया असते. जेव्हा एखादा विद्यार्थी लेख स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा त्याच्या हातातील पेनमधून संविधानाचा आत्मा झिरपतो. जेव्हा एखादा कार्यकर्ता सोशल मीडियावर सत्य मांडतो, तेव्हा तो अनुच्छेद 19 चा उपयोग करत असतो.त्यामुळेच लेखणी जिवंत आहे. ती दमदार आहे. आणि ती निर्भीड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. या लेखणीला जपणे, वापरणे, आणि तिचा समाजहितासाठी उपयोग करणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. आज बाबासाहेबांची ही देणगी काही ठिकाणी केवळ राजकीय प्रचारापुरती मर्यादित ठेवली जाते, जेव्हा लेखणी विकली जाते किंवा दडपली जाते. पण ज्यांच्यात बाबासाहेबांचे विचार आहेत, ते ही लेखणी सतत सत्यासाठी, न्यायासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी वापरतात. पाचोरा शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात असे अनेक पत्रकार, लेखक आणि अभ्यासक आहेत जे या लेखणीचे उपकार मानतात. त्यांच्यासाठी बाबासाहेब हे प्रेरणास्थान आहेत.”साहेब, ही लेखणी फक्त आपल्यामुळेच आज जिवंत आहे,” हे वाक्य एखाद्या पत्रकाराने म्हटले की, त्यामध्ये कृतज्ञता, आदर, आणि जबाबदारीचा एक वेगळाच सूर आहे. हे केवळ एक उद्गार नाही, तर ही लोकशाहीच्या वटवृक्षाला पाणी घालणारी भावना आहे. लेखणीचं आयुष्य, तिची ताकद, आणि तिचा आत्मा हे सगळं बाबासाहेबांच्या विचारांमध्येच गुंतलेलं आहे. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळेच कोणताही सामान्य नागरिक देखील जुलूम, अन्याय, भेदभाव याविरोधात लिहू शकतो. हीच खरी लोकशाही आहे. आणि हीच खरी लेखणीची जिवंतपणा.बाबासाहेब, तुमच्यामुळेच ही लेखणी आज “जिवंत” आहे – आणि ती केवळ जिवंतच नाही, तर ती शंभर कोटी जनतेच्या हक्कांसाठी सतत झुंजते आहे! अशा महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन

जलसंरक्षण की दिशा में जैन समाज की अनूठी पहल – चोपड़ा में जलरथ का भव्य उद्घाटन

0

Loading

चोपडा ( मनिष प्र महाजन भाई कोतवाल रोड Mo. 9766143638 , 098508 65961) महाराष्ट्र राज्य सरकार, भारतीय जैन संगठन और सुहाना स्पाइसेस के संयुक्त उपक्रम के तहत “गादमुक्त बांध, गादयुक्त खेत” और “नाला गहरीकरण और चौड़ीकरण” जैसी योजनाओं के प्रभावी कार्यान्वयन हेतु चोपड़ा तहसील में भारतीय जैन संगठन की ओर से जनजागृति के लिए एक जलरथ का आयोजन किया गया। इस जलरथ का उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात और कृषि अधिकारी दीपक सालुंखे के शुभहस्ते किया गया। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में किरण पाटिल, जैन संगठन के जिला अध्यक्ष निर्मल बोरा, जिला सचिव एवं जलकार्य प्रमुख दर्शन देशलहरा, तालुका अध्यक्ष गौरव कोचर, उपाध्यक्ष मयंक बरडिया उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान तहसीलदार भाऊसाहेब थोरात और कृषि अधिकारी दीपक सालुंखे को एक विशेष निवेदन सौंपा गया, जिसमें इन योजनाओं की जानकारी गांव-गांव तक पहुँचाने की अपील की गई। जैन संगठन के शिष्टमंडल ने बांधों की गाद निकालने, नालों की सफाई करने और इनसे होने वाले लाभों को किसानों तक पहुँचाने के लिए कार्यवाही की मांग की। तहसीलदार थोरात ने अपने मार्गदर्शन में कहा, “अब भी बहुत से गांवों को इन योजनाओं की जानकारी नहीं है। यह जलरथ उन गांवों में जाकर किसानों को जागरूक करे, यही अपेक्षा है। यह रथ केवल एक वाहन नहीं, बल्कि जलसंवर्धन के प्रति चेतना जागृत करने का सशक्त माध्यम है।” कृषि अधिकारी दीपक सालुंखे ने भी अपने भाषण में कहा, “हमारा विभाग इस योजना के प्रचार-प्रसार में हमेशा सक्रिय रहता है, लेकिन अगर भारतीय जैन संगठन भी अपने स्तर से किसानों तक जानकारी पहुँचाएगा तो और अधिक गांवों को इस योजना का लाभ मिल सकेगा। हम विभाग की ओर से हरसंभव सहयोग देने को तैयार हैं।” इस योजना का उद्देश्य किसानों को जल स्रोतों के माध्यम से उनकी कृषि भूमि में पानी की उपलब्धता और उर्वरता बढ़ाने में मदद करना है। इस योजना के तहत तालाबों, बांधों, नालों से गाद निकाली जाएगी और इसे किसानों के खेतों में डाला जाएगा। यह गाद प्राकृतिक खाद के रूप में कार्य करेगी जिससे भूमि की उपजाऊ क्षमता में वृद्धि होगी। विशेष बात यह है कि यह योजना अल्पभूधारक, विधवा, अपंग और आत्महत्या से पीड़ित किसानों के परिवारों को अनुदान के साथ उपलब्ध कराई जाएगी, जिसमें मशीनरी, ईंधन और परिवहन खर्च पर भी शासन द्वारा सहयोग किया जाएगा।
इस योजना का लाभ अधिक से अधिक किसानों तक पहुँचे, इसके लिए भारतीय जैन संगठन ने जलरथ के माध्यम से ठोस प्रचार-प्रसार करने का संकल्प लिया है। गांव-गांव जाकर लोकप्रतिनिधियों, सरपंचों, किसान समूहों और कृषि सेवकों को योजनाओं की जानकारी दी जा रही है और अधिक से अधिक लोगों को आवेदन करने हेतु प्रेरित किया जा रहा है। जिला प्रशासन के माध्यम से केंद्र और राज्य सरकार की योजनाओं का समन्वय कर इस योजना को सफल बनाने हेतु शिष्टमंडल ने विभिन्न अधिकारियों से भी चर्चा की है। इस कार्यक्रम में जैन संगठन के वरिष्ठ मार्गदर्शक दीपक राखेचा, विभागीय उपाध्यक्ष लतिश जैन, कार्यकर्ता विपुल छाजेड़, अभय ब्रम्हेचा, शुभम राखेचा उपस्थित रहे। साथ ही प्रचारक महेन्द्र पाटिल और जिला समन्वयक गणेश कोळी की उपस्थिति भी उल्लेखनीय रही। इन सभी के सहयोग से कार्यक्रम का आयोजन अत्यंत सुव्यवस्थित ढंग से संपन्न हुआ। भारतीय जैन संगठन ने सदैव पर्यावरण और जलसंवर्धन के कार्यों में सक्रिय सहभागिता दिखाई है। स्थायी कृषि के लिए जल नियोजन अत्यंत आवश्यक है और इसके लिए इस योजना का प्रभावी कार्यान्वयन अत्यंत महत्वपूर्ण है। जलकार्य प्रमुख दर्शन देशलहरा ने कहा कि सरकार की योजना तो है, लेकिन समाज की भागीदारी और जनजागृति ही इस योजना की सफलता की असली कुंजी है। इस अवसर पर बड़ी संख्या में किसान, ग्रामीण, विद्यार्थी और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। जलरथ के माध्यम से बांधों से गाद निकालना, नालों की सफाई करना और खेतों की उर्वरता बढ़ाने के लिए समाज द्वारा उठाया गया यह कदम पूरे तालुका के लिए एक आदर्श बन रहा है। कृषि के लिए स्थायी जल उपलब्धता सुनिश्चित करने की दिशा में उठाया गया यह कदम किसानों के जीवन में नवचेतना और समृद्धि लेकर आएगा, ऐसा विश्वास कार्यक्रम में व्यक्त किया गया।
एकात्म जनभागीदारी और पर्यावरणीय विकास की दिशा में अग्रसर यह योजना निश्चित ही जलसंवर्धन का एक प्रेरणादायी उदाहरण बन रही है।

चोपडा तालुक्यात गारपीठी अवकाळी पावसाने धुमाकूळ – शेतकऱ्यांची चिंता शिगेला

0

Loading

(चोपडा – प्रतिनिधी मनिष प्र. महाजन, भाई कोतवाल रोड, मो. 9766143638 / 09850865961) गेल्या काही दिवसांपासून चोपडा तालुक्यात वातावरणात सतत बदल जाणवत होता. ऊन्हाचा चटका अधूनमधून कमी-जास्त होत होता. तापमानातील अस्थिरता आणि ढगाळ हवामानामुळे नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली होती. पावसाची हजेरी नेमकी केव्हा लागेल हे सांगणे कठीण झाले होते, मात्र आज दुपारी दोन ते तीनच्या सुमारास अवकाळी पावसाने धानोरा, मितावली, पंचक, गोरगावले, खेडीभोकरी, माचला परिसराला जबरदस्त तडाखा दिला. या पावसासोबत आलेल्या गारपीठीने तर शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. या गारपीठीचा जोर इतका होता की काही ठिकाणी ती गोट्याच्या

आकाराची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जवळपास १५ ते २० मिनिटे सलग पडलेल्या या गारपीठीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी भात, हरभरा, गहू, केळी, द्राक्ष, पपई, टोमॅटो, मिरची, कांदा आदी पिकांवर गारांचा मारा झाला. काही शेतकरी तर हताश होऊन म्हणू लागले की, “पिकं फळायच्या उंबरठ्यावर होती, आता गारांनी सगळं उध्वस्त केलं.” पाऊस आणि गारपीठ थांबताच शेतकरी वर्ग हातात फक्त छत्र्या आणि काळजी घेऊन आपल्या शेताकडे धावले. जमिनीवर साचलेली गारं, वाकलेली किंवा तुटलेली झाडं, चिखलमय झालेली फळबागा हे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. एका शेतकऱ्याने सांगितले, “पाण्याची चांगली सोय करून पिकं उभं केलं होतं, कर्ज घेतलं होतं… पण निसर्गाने हे सगळं पाण्यात गेलं.” शेतकऱ्यांचे नुकसान इतकं मोठं आहे की, याची आकडेवारी प्रशासनाने तातडीने घेतली नाही तर उद्या आंदोलने होण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यातील मितावली परिसरातील काही शेतकरी म्हणाले, “आम्ही तात्काळ तलाठी व कृषी अधिकारी यांना माहिती दिली आहे. पंचनामे लवकर व्हावेत ही आमची मागणी आहे.”
शासनाने ‘निसर्ग आपत्ती मदत निधी’ अंतर्गत गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. या घटनेनंतर कृषी अधिकारी, तालुका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गारपीठ झालेल्या भागांना भेट देऊन पाहणी करावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गारांचा आकार इतका मोठा होता की काही भागांमध्ये लहान मुलांना उघड्यावरून घरात आणण्यासाठी पालकांना झुंज द्यावी लागली. अनेक ठिकाणी झोपड्यांच्या पत्रे फुटल्याची माहिती मिळतेय. काही ठिकाणी जनावरे देखील गारांमुळे जखमी झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत हवामानातील अस्थिरता आणि अनियमितता ही शेतीसाठी मोठं संकट बनली आहे. पावसाळा वेळेवर येत नाही, आल्यावर अधिक प्रमाणात पडतो आणि अचानक थांबतो, नंतर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडून जातं. अशा परिस्थितीत विमा योजनेचा लाभ देखील वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे. या गारपीठीचा परिणाम केवळ पिकांवरच नाही, तर कर्ज फेडण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, हे वास्तव प्रशासनाने आणि राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं. त्यासाठी गरज आहे ती तातडीच्या पंचनाम्यांची, मदतीच्या जाहीर घोषणांची आणि प्रत्यक्ष खात्रीपूर्वक भरपाई वितरणाची. स्थानिक प्रतिनिधी मनिष प्र. महाजन यांनी गारपीठ झालेल्या परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी गारांचा साठा अजूनही घरांपुढे आणि शेतांमध्ये दिसत होता. गारपीठ झालेल्या गावांमध्ये संपूर्ण गाव भयभीत आणि शांततेत आहे. फक्त आवाज येतो तो लोकांच्या तोंडून – “आता पुढे काय होणार?”
हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही, तो सरकार आणि समाजाच्या संवेदनशीलतेचा आहे. चोपडा तालुक्यातील गारपीठीमुळे झालेलं नुकसान हे फक्त पिकांचं नाही, तर एका कष्टकरी समाजाच्या स्वप्नांचं आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनाने गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत करून त्यांच्या आशेचा किरण जपावा, हीच या संकटातून उमटलेली मूक साद आहे.

“लोहारा में आस्था, सम्मान और संस्कृति का संगम – माँ आशापूर्णा चैत्र नवरात्रि महोत्सव उत्साहपूर्वक संपन्न”

0

Loading

चोपडा ( मनिष प्र महाजन भाई कोतवाल रोड Mo. 9766143638 , 098508 65961) श्रद्धा, उल्लास, संस्कृति और सामाजिक एकता का प्रतीक माँ आशापूर्णा माताजी का पारंपरिक चैत्र नवरात्रि महोत्सव इस वर्ष भी पालीवाल समाज लोहारा द्वारा अत्यंत भव्यता और श्रद्धा के साथ 13 अप्रैल 2025, रविवार को विविध कार्यक्रमों के माध्यम से संपन्न किया गया। यह आयोजन न केवल धार्मिक आस्था को प्रगाढ़ करता है, बल्कि समाज के युवाओं को प्रेरणा, मार्गदर्शन और गौरव प्रदान करने का मंच भी सिद्ध हुआ।
महोत्सव का शुभारंभ माँ दुर्गा मंदिर से निकाली गई भव्य शोभायात्रा के साथ हुआ, जिसमें समाजजन पारंपरिक परिधानों में ढोल-ताशों, भगवा ध्वजों और जयघोषों के साथ उत्साहपूर्वक सहभागी बने। यह शोभायात्रा मुख्य मार्गों से होती हुई शंकर भगवान मंदिर पर संपन्न हुई। सम्पूर्ण वातावरण में भक्ति की लहरें गूंज रही थीं, मानो देवी माँ स्वयं गाँव की गलियों में विराजमान हो गई हों।
महोत्सव का एक विशेष आकर्षण रहा – शैक्षणिक क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों का सत्कार समारोह, जिसमें कक्षा आठवीं से लेकर पीएचडी तक की पढ़ाई कर रहे उन सभी विद्यार्थियों को सम्मानपत्र व स्मृति चिन्ह प्रदान किए गए, जिन्होंने 70 प्रतिशत से अधिक अंक प्राप्त किए। यह सराहनीय पहल समाज के युवाओं के लिए प्रेरणास्त्रोत बनी। इस गरिमामयी समारोह के अध्यक्ष के रूप में श्री अनिलजी पालीवाल (चोपड़ा) उपस्थित रहे, जो कि महाराष्ट्र पालीवाल समाज के महामंत्री एवं वरिष्ठ पत्रकार के रूप में प्रतिष्ठित हैं।अपने अध्यक्षीय संबोधन में अनिलजी पालीवाल ने समाज में शिक्षा, संस्कृति, प्रगति और संवाद के महत्व पर प्रकाश डाला। उन्होंने कहा, “जो समाज अपने छात्रों का सम्मान करता है, वही समाज उन्नति करता है। शिक्षा ही सशक्त समाज की आधारशिला है।” उन्होंने विद्यार्थियों को मेहनत, सामाजिक चेतना और नैतिक मूल्यों से युक्त जीवन की प्रेरणा दी, जिससे उपस्थित सभी श्रोता भावविभोर हो उठे।
इसके पश्चात माँ आशापूर्णा माताजी की महाआरती अत्यंत श्रद्धा और भक्ति के साथ संपन्न हुई। आरती में सामूहिक स्वर और भावभंगिमा के साथ भक्ति का संचार स्पष्ट दिखाई दिया। कार्यक्रम के अंत में संपूर्ण समाज के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया, जो कि इस वर्ष सतीश माणिकचंदजी पालीवाल (जलगांव) की ओर से आयोजित किया गया था। प्रेमपूर्वक परोसे गए स्वादिष्ट भोजन प्रसादी ने सभी के चेहरों पर संतोष और सौहार्द की छाया बिखेरी। इस शुभ अवसर पर लोहारा, नेरी, नांद्रा, चोपड़ा, रोटवड, देवपिंपरी, पाचोरा, वरखेड़ी, जलगांव, पुणे जैसे विभिन्न क्षेत्रों से पधारे पालीवाल समाजजन भारी संख्या में उपस्थित थे। इस आयोजन को सफल बनाने में समाज के सभी भाइयों और बहनों ने तन-मन-धन से सहयोग किया। महोत्सव के दौरान समाज के उत्थान हेतु विविध विषयों पर भी चर्चा हुई – जैसे शिक्षा में नवाचार, सामाजिक सहभागिता, महिलाओं की भागीदारी, पारंपरिक संस्कृति का संरक्षण और युवा नेतृत्व का सशक्तिकरण। इन चर्चाओं से कई नवप्रयोगों की दिशा तैयार हुई।कुल मिलाकर यह महोत्सव न केवल एक धार्मिक आयोजन था, बल्कि पालीवाल समाज की एकता, सामाजिक चेतना, शिक्षा के प्रति निष्ठा और पारंपरिक मूल्यों का प्रतिबिंब बनकर उभरा। माँ आशापूर्णा की कृपा से समाज इसी प्रकार संस्कारों और विकास की दिशा में आगे बढ़ता रहे – यही सभी की अभिलाषा रही।इस कार्यक्रम की सफलता के पीछे समाज के वरिष्ठों का मार्गदर्शन, युवाओं की संगठनात्मक भूमिका और महिलाओं की उत्साही भागीदारी का अहम योगदान रहा। बच्चों से लेकर बुजुर्गों तक, हर किसी ने इस पर्व का हृदय से आनंद लिया। जय माँ आशापूर्णा!
यह महोत्सव बना समाज, संस्कृति और संस्कारों का जीवंत प्रतीक – लोहारा नवरात्रि महोत्सव 2025

ताज्या बातम्या

error: Content is protected !!