Home Blog Page 54

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळ्यावर गंभीर आरोप – आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अखेर गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग आरोपींच्या अटकेवर लक्ष केंद्रित

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा परत मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण रॅकेटचा उलगडा व्हावा, या मागण्यांसाठी पाचोरा येथील आंदोलक संदीप महाजन यांनी आमरण उपोषणा नंतर आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. महाजन यांच्या या ठाम भूमिकेमुळे आणि तीव्र आंदोलनामुळे अखेर हा गंभीर गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न–पाणी त्याग करून उपोषण सुरू केले. आमदार किशोरआप्पा पाटील, प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या उपस्थितीत सर्व मागण्या मान्य झाल्या म्हणून उपोषण थांबविण्यात आले. परंतु उपोषण संपल्यानंतरही ठोस व जलद हालचाल न झाल्याने महाजन यांनी प्रशासनाला 10 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. महाजन यांच्या कठोर इशाऱ्यामुळे संपूर्ण प्रशासन आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली. शेतकऱ्यांचा प्रचंड रोष लक्षात घेता प्रकरण केवळ महसूल सहाय्यक अमोल भोईपुरते मर्यादित ठेवणे शक्य नाही, हे प्रशासनालाही लक्षात आले. एक कोटी वीस लाख रुपयांचा अपहार हा छोटा घोटाळा नसून गंभीर आर्थिक गुन्हा असल्यामुळे महाजन यांनी तपास स्थानिक पातळीवर न ठेवता स्वतंत्र यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. आत्मदहनाच्या इशाऱ्याने निर्माण झालेल्या दबावामुळे आणि आंदोलनातून झालेल्या जनक्षोभामुळे प्रशासनाला जलद काम हाती घ्यावे लागले. अवघ्या 24 तासांत पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळ्याचा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तपासाला गती मिळेल आणि संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरोपींवर केंद्रित झाले आहे. केवळ महसूल सहाय्यकावर कारवाई न करता तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी व CSC सेंटर चालक यांनाही तपासाच्या कक्षेत आणले जाईल का, दोषींना तातडीने अटक होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संदीप महाजन यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे अखेर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग, एक कोटी वीस लाखांचा अपहार – गंभीर आर्थिक गुन्हा म्हणून वर्गीकरण, आता आरोपींवर कठोर कारवाई व अटकेची शेतकऱ्यांची अपेक्षा – हे मुद्दे अधोरेखित झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा परत मिळविण्यासाठी सुरू झालेले हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे दबावाखाली घेतलेला ‘गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय’ हा शेतकऱ्यांसाठी मोठा विजय मानला जात आहे. मात्र या पुढे दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर संघर्ष आणखी तीव्र होईल, हेही स्पष्ट आहे. पुढील तपास
जिंल्हा पोलीस अधिक्षक रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव आर्थिक गुन्हा शाखेचे प्र. उप- अधिक्षक संदीप पाटील असून ते आणि त्यांची आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस यंत्रणा सदरचे कामकाज पाहत आहे

आज दि.05/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – कामकाजात उत्साह वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आर्थिक बाबतीत लाभ होईल. आरोग्य सुधारेल. घरातील जबाबदाऱ्या निभावता येतील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – प्रवासातून फायदा होण्याची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात नवे संपर्क लाभदायी ठरतील. परिश्रमाचे यश मिळेल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – वरिष्ठांचा आधार मिळेल. मानसिक शांती लाभेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबाचा आधार लाभेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याशी संबंधित त्रास संभवतो. नोकरी-व्यवसायात स्थिरता राहील. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक. खर्च जपून करा.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवासाचा योग लाभदायक ठरेल. मित्रपरिवारासोबत वेळ आनंदात जाईल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – गुंतवणुकीतून फायदा होईल. कामकाजात यश मिळेल. संबंधांमध्ये विश्वास वाढेल. घरात सौहार्द राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – नवीन संधी प्राप्त होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्य जपावे. अनावश्यक प्रवास टाळावा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबात समाधान राहील. कामात गती येईल. आर्थिक बाबतीत थोडा उतार-चढाव संभवतो. संयम आवश्यक.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस. मित्रांचा आधार लाभेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक वा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता. संयम ठेवा.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

झाडे लावा, झाडे जगवा – प्रशांत भाऊ देवरे यांचा पर्यावरणपूरक वाढदिवस

0

Loading

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळे बु. या गावात नुकताच समाजासाठी प्रेरणादायी ठरलेला उपक्रम राबवण्यात आला. गावातीलच उत्साही आणि समाजाभिमुख तरुण म्हणून परिचित असलेले प्रशांत भाऊ देवरे यांनी आपल्या ३२ व्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि अनुकरणीय उपक्रम हाती घेतला. वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापणे, डीजे वाजवणे, पार्टी देणे ही परंपरा आजकाल सर्वत्र दिसते, परंतु प्रशांत भाऊंनी या दिखाऊ चालीरीतींना छेद देत गावाच्या स्मशानभूमी परिसरात तब्बल ३२ वडवृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वड हे झाड भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि सावलीचे प्रतीक मानले जाते. स्मशानभूमीसारख्या गंभीर ठिकाणी या वृक्षांची लागवड केल्याने परिसर केवळ हरित होणार नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि थंड सावली मिळणार आहे. प्रशांत भाऊंनी केलेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे आणि विशेषतः तरुणांसाठी त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. हे पहिल्यांदाच नाही की त्यांनी आपल्या वाढदिवसाला समाजहिताचा उपक्रम राबवला. मागील वर्षी त्यांनी पाचोरा क्रिकेट टर्फ मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या वेळी रोख रक्कम किंवा इतर बक्षिसे न देता त्यांनी पर्यावरणाशी जोडलेला वेगळा उपक्रम हाती घेतला होता. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला २१ झाडांची रोपे, द्वितीय क्रमांकाला ११ रोपे, तर तृतीय क्रमांकाला ७ रोपे बक्षीस देऊन त्यांनी क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातूनही निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला होता. या माध्यमातून सहभागी खेळाडूंनी आपल्या अंगणात वाड्यात, शेतात ही झाडे लावली आणि ती जगवण्याचा संकल्प केला. या वर्षीच्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमासाठी गावातील आणि पाचोर्‍यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पाचोरा येथून चेतन मणियार, अथर्व शेठ सोनार, सागर भाऊ वाघ, अमय बोरसे, विकी पाटील, नयन सूर्यवंशी, शुभम पाटील तसेच किशोर निंभोरीकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली. तर खडकदेवळे गावातून सद्याचे सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच प्रवीण पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन वाल्मिक देवरे, सचिव जगदीश पाटील, धर्मराज पाटील, शांताराम पाटील, गजानन सूर्यवंशी, आबा पाटील, दीपक पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावून प्रशांत भाऊंच्या कार्याचे कौतुक केले. गावकऱ्यांनी सांगितले की, प्रशांत भाऊंच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसर हरित होणार आहेच, शिवाय अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मकतेची भावना निर्माण होते. तरुण पिढीला वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा प्रसंग नसून, समाजहिताशी जोडलेला प्रसंग असावा, याची जाणीव त्यांच्या कृतीतून झाली आहे. आजच्या युगात पर्यावरणाचे वाढते प्रश्न सर्वांसमोर उभे आहेत. प्रदूषण, वृक्षतोड आणि हवामान बदल यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अशा वेळी एका तरुणाने स्वतःचा आनंद निसर्गाशी जोडून झाडे लावण्याचा उपक्रम केला, ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रशांत भाऊंनी पुढील काळातही दरवर्षी वाढदिवसाला असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या या विचारामुळे खडकदेवळे गावासह संपूर्ण परिसर हिरवागार होईल, अशी आशा गावकरी व्यक्त करत आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीतून अमलात आणणारे प्रशांत भाऊ देवरे यांच्या पर्यावरणपूरक वाढदिवसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

शेतकरी अनुदान घोटाळा: निष्पाप बळींची व्यथा – एजंटांच्या फसवणुकीमुळे निर्दोष अडचणीत

0

Loading

पाचोरा – शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले असून या घोटाळ्याचा खरा केंद्रबिंदू म्हणजे काही CSC सेंटर व एजंटांची स्वार्थी फसवणुकीची कारस्थाने हे आता उघडकीस येऊ लागले आहे. या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी होत असताना अनेक निष्पाप व असंबंधित व्यक्तींना बळीचे बकरे बनवले जात असल्याचे समोर येत आहे. अशा व्यक्तींच्या खात्यावर चुकीच्या मार्गाने व चुकीच्या कारणांनी पैसे जमा करण्यात आले आणि लगेचच हे पैसे एजंटांनी काढून घेतले. परिणामी चौकशीच्या फेरात या निष्पाप व्यक्तींचेच नाव पुढे येत असून त्यांना मोठ्या अडचणीत सापडावे लागत आहे. खरं पाहता या निष्पाप खातेदारांनी स्वतःच्या इच्छेने किंवा फायद्याच्या हेतूने पैसे स्वीकारलेले नाहीत. त्यांना एजंटांनी विविध खोट्या सबबी सांगून, सरकारी योजनेत तुमचे नाव आहे, मला अनुदानाची रक्कम मिळणार आहे ,माझ्या खात्यात पैसे आले म्हणजे थकीत हप्ते कट होतील किंवा तात्पुरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या खात्यावर पैसे येतील, असे सांगून फसवले. पण वास्तविकता अशी की पैसे त्यांच्या खात्यात आले आणि लगेचच एजंटांनी त्यांना ते पैसे स्वतःकडे परत आणायला लावले. खातेदारांना कुठलाही प्रत्यक्ष लाभ न होता ते आज चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे या साऱ्या कारस्थानामागे असलेले एजंट आणि त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक आता सरळ हात झटकत आहेत. “पैसे तुमच्या खात्यावर आले आहेत, जबाबदारी तुमचीच” असे सांगून ते निष्पाप लोकांवरच दोष ढकलत आहेत. एजंटांनी केलेल्या या पद्धतशीर फसवणुकीमुळे केवळ निरपराध नागरिकांचा छळ होत आहे. ज्यांनी एक रुपयाही स्वतःसाठी वापरलेला नाही, ते आज चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास सहन करत आहेत. या परिस्थितीत सर्वात मोठे प्रश्नचिन्ह म्हणजे अशा बळींच्या मानसिक व सामाजिक अवस्थेचे काय? एकीकडे शेतकरी व ग्रामीण समाजातील लोक आधीच आर्थिक अडचणीत आहेत, त्यात अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे त्यांच्यावर संशयाची सावली येते. गावोगाव चुकीच्या अफवा पसरतात, की अमुक व्यक्तीच्या खात्यावर पैसे आले, ती प्रकरणात सामील आहे. परिणामी निरपराध व्यक्तींच्या कुटुंबांवरही ताण येतो. या घोटाळ्यातील बळी ठरलेले लोक हे केवळ एजंटांच्या भूलथापांना बळी पडलेले आहेत, हे आता स्पष्ट होते. पण न्यायप्रक्रियेच्या टप्प्यावर ही बाब ठामपणे सांगणे आणि खरी वस्तुस्थिती मांडणे गरजेचे आहे. अन्यथा या लोकांना चुकीच्या आरोपांखाली शिक्षा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणत्याही दडपणाला किंवा धमकीला घाबरून न जाता या निष्पाप नागरिकांनी सामूहिकरित्या एकत्र येऊन कायदेशीर मार्ग स्वीकारणे हेच योग्य ठरेल. एकाच विधीतज्ज्ञाचा सामूहिक सल्ला घेऊन,आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन तसेच तपास यंत्रणेसमोर प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडावी. एजंटांनी कशाप्रकारे खोटे कारण देऊन पैसे मागवले, खात्यात जमा झालेले पैसे त्यांनी लगेच काढून घेतले आणि संबंधित खातेदारांना एक रुपयाही न मिळाल्याची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट करावी. यामुळे चौकशी करणाऱ्या यंत्रणेलाही खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल. अन्यथा चौकशीच्या चुकीच्या दिशेमुळे बळी ठरलेले निरपराध लोक अनावश्यक त्रासाला सामोरे जातील आणि खरे दोषी मात्र हात झटकून सुटतील. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अधोरेखित होते की, ग्रामीण समाजातील सामान्य नागरिक अजूनही अशा फसवणुकीस सहज बळी पडतात. सरकारी योजनांबाबत माहितीचा अभाव, प्रक्रियेतील गुंतागुंत आणि एजंटांची पकड यामुळे लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे शासनानेही यापुढे जनजागृती करून, “एजंटमार्फत नव्हे तर थेट शासकीय यंत्रणेद्वारेच लाभ घ्या” असा संदेश स्पष्टपणे पोहोचवण्याची आवश्यकता आहे. शेतकरी अनुदान घोटाळा केवळ आर्थिक घोटाळा नाही, तर तो निरपराधांना बळी बनवणारा सामाजिक अपराध आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील खरे दोषी एजंट व त्यांचे साथीदार यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, तसेच बळी ठरलेल्या निष्पाप लोकांना न्याय मिळणेही तितकेच गरजेचे आहे. समाजानेही या निष्पाप लोकांवर बोट न दाखवता त्यांना धीर देणे व खरी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण घडामोडींकडे पाहता, आजची तातडीची गरज म्हणजे – बळी ठरलेले सर्व नागरिक एकत्र येऊन सामूहिकरित्या सत्य मांडतील, कायदेशीर सहाय्य घेतील आणि शासनाकडे आपल्या निर्दोषत्वाचे पुरावे सादर करतील. अशानेच खरे गुन्हेगार उघड होतील आणि निरपराध लोकांच्या माथी अन्याय्य आरोपांचा डाग लागणार नाही.

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळ्यावर गंभीर आरोप – मागण्या मान्य न झाल्यास महाजन यां चा आत्मदहनाचा इशारा

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाकडून ठोस कारवाई व्हावी, या मागणीसाठी पाचोरा येथील आंदोलक संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न–पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरू केले होते. सकाळी 11 वाजता प्रारंभ झालेल्या या उपोषणावेळी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची उपस्थिती होती. या उपस्थितीत प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्यामुळे उपोषणाचा समारोप करण्यात आला. मात्र उपोषण संपून तीन दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने संदीप महाजन यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, तुर्त उघडकीस आलेला एक कोटी वीस लाख रुपयाचा हा घोटाळा गंभीर स्वरूपाचा असून केवळ महसूल सहाय्यक अमोल भोई यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्व कारवाई थांबविणे हा मोठा अन्याय आहे. इतक्या मोठ्या घोटाळ्यात तहसिलदार, इतर अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित CSC सेंटर चालक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दोषींना सहज अटकपूर्व जामीन मिळू नये, त्यांना तातडीने अटक व्हावी, तसेच तपास स्थानिक पातळीवर न ठेवता स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करावा, ही त्यांची ठाम मागणी आहे. याशिवाय चुकीच्या खात्यात गेलेला शेतकऱ्यांचा पैसा तातडीने परत वसूल करून मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. दोषींनी अवैध मार्गाने मिळविलेली संपत्ती जप्त करून शासनाकडे जमा करावी व ती रक्कम नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 2019–20 पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान वितरणाची सखोल चौकशी करून घोटाळ्याचा संपूर्ण उलगडा व्हावा, अशी मागणी वारंवार प्रशासनास कळवूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड रोष वाढला आहे. महाजन यांनी आपल्या निवेदनात कळकळीची विनंती केली आहे की, पुढील सर्व मागण्या 10 सप्टेंबर 2025 पर्यंत मान्य करून तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा 11 सप्टेंबर 2025 रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले असून, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही दिला आहे.
सविस्तर मागण्या पुढील प्रमाणे

  1. दोषींवर कठोर कारवाई – केवळ महसूल सहाय्यकावर कारवाई करून इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी सुटू नयेत. तहसिलदारांसह सर्व जबाबदारांवर फौजदारी गुन्ह्यात सहआरोपी म्हणून कारवाई व्हावी.
  2. स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग – स्थानिक तपासावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे तपास SIT, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) किंवा प्रवर्तन संचालनालय (ED) यांच्याकडे तातडीने वर्ग व्हावा.
  3. शेतकऱ्यांचा पैसा परत मिळविणे – चुकीच्या खात्यात गेलेली रक्कम त्वरित वसूल करून मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. नुकसानभरपाईसाठी दोषींच्या पगार, निवृत्तीवेतन व मालमत्तेवर जप्ती आणावी.
  4. दोषींच्या मालमत्तेवर कारवाई – दोषींच्या बँक खात्यांची चौकशी करून अवैध संपत्ती जप्त व्हावी व ती शासनाकडे जमा करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावी.
  5. संपूर्ण अनुदान तपासणी – सन 2019–20 पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान वितरणाची तपासणी करून घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी.
  6. गावनिहाय यादी जाहीर करणे – प्रत्येक गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी अधिकृतरीत्या तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी. ही यादी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सोसायटी चेअरमन व पत्रकारांना उपलब्ध करून दिल्यास पारदर्शकता वाढेल.
  7. महसूल प्रशासनाचा सार्वजनिक अहवाल – मंजूर झालेले, वितरित झालेले व प्रलंबित असलेले अनुदान याचा अधिकृत लेखी अहवाल तयार करून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुला ठेवावा.
  8. CSC सेंटर चालकांची चौकशी – या प्रकरणात संगणक छेडछाड व कागदपत्रांचा गैरवापर झाला असल्याची शंका आहे. दोषी चालकांवर गुन्हे दाखल व्हावेत व निष्पापांवर अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
  9. संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश – हा घोटाळा एका अमोल भोई यांच्यावर खापर फोडून थांबविण्याचा प्रयत्न असल्याची शंका असून, संपूर्ण रॅकेटचा उलगडा करून मास्टरमाइंडपर्यंत तपास नेण्यात यावा व सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.
    या सर्व मागण्या मान्य झाल्यासच शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळू शकेल, असे संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्यावाचून पर्याय नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आज दि.04/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – नवी संधी मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रपरिवाराशी संबंध दृढ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – लाल

वृषभ – कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पैशाच्या बाबतीत लाभ संभवतो. आरोग्य सुधारेल. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण होतील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – प्रवास योग संभवतो. कामात सकारात्मक बदल होतील. नवीन लोकांची ओळख होईल. परिश्रमाचे फळ मिळेल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. मानसिक शांती राहील. नातेवाईकांशी मतभेद मिटतील.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – महत्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. आत्मविश्वास उंचावेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात स्थैर्य येईल. व्यवहार करताना संयम आवश्यक. खर्च जपून करा.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – आर्थिक लाभाची शक्यता. प्रवासातून फायदा होईल. मित्रपरिवारासोबत वेळ आनंदात जाईल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – कामकाजात यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संबंधांमध्ये विश्वास वाढेल. घरगुती वातावरण सुखद राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना सुरू होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास शक्यतो टाळावा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबात सौहार्द टिकेल. कामात गती येईल. आर्थिक बाबतीत थोडा उतार-चढाव राहील. संयमाने वागा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थी व तरुणांना यश लाभेल. नवे प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल दिवस. मित्रांचा आधार लाभेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – धार्मिक वा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अनपेक्षित खर्च संभवतो. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. संयम आवश्यक.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

शेतकरी अनुदान घोटाळ्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये; तातडीने अटक करण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न –आंदोलनाची रणनीती आखण्याचे आवाहन

0

Loading

पाचोरा – शेतकरी अनुदान घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे “पैसे वसूल करून घ्या आणि गुन्हे दाखल करू नका” अशीही चर्चा समजले असली तरी कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या आरोपी पर्यंत आणि त्यांना अटक होई पर्यंत थांबणे नाही ज्या -ज्या हरामखोरांनी माय- बाप शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या बापाचा माल समजून लुटला अशांना या प्रकरणातील जबाबदार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये, सर्वांना तातडीने अटक व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याची रणनीती आखली जात आहे. या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी आर्थिक मदतीशिवाय फक्त शारीरिक सहकार्य करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना व हितचिंतकांना विशेषतः विविध राजकीय पक्षाचे मान्यवर नेते व पदाधिकारी यांनी संदीप महाजन (मो. 7385108510) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्राथमिक तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील शेतकरी असून, हे शेतकरी नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील असल्याने या प्रकरणाला गांभीर्य आले आहे. ना गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्ती डॉ. सागरदादा गरुड यांनी हि बाब त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर, ना.गिरीशभाऊ महाजन व आमदार किशोरआप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. या सूचनांमुळे चौकशीला गती मिळाली असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यापासून ते प्रत्यक्ष अनुदान मिळवून देण्यापर्यंत तसेच महाजन यांचे उपोषण सोडविण्यापर्यंत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आंदोलक पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही निर्दोषावर अन्याय होणार नाही तसेच कोणाचीही आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक लूट होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होऊन नंतर परत घेण्यात आले आहेत. अशा खातेधारकांना पोलिसांकडून नोटिसा मिळत आहेत किंवा मिळणार आहेत. या शेतकऱ्यांनी भीती न बाळगता पुढे यावे व आमदार किशोर आप्पा पाटील व जे पण सर्वपक्षीय नेते एकत्र येतील त्यांच्या उपस्थितीत संदीप महाजन यांच्यासमवेत विधीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो कायदेशीर मार्ग काढण्यात येईल कोणत्याही शासकीय, राजकीय किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार होणार नाही मात्र कोणत्याही भामट्याच्या त्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही महाजन यांनी केले. काही व्यक्ती नोटीस प्रकरणातून नाव वगळून देण्याच्या आमिषाने पैसे मागण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले असून अशा फसवणूक करणाऱ्यांची माहिती तातडीने महाजन यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घोटाळ्यात काही CSC सेंटर चालकांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या केंद्रांना तातडीने सिल करून त्यांची तपासणी करावी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये व संगणकामध्ये छेडछाड आढल्यास व दोषी आढळल्यास त्यांना अटक करावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे. कारण या केंद्रांमार्फतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून नंतर ते काढण्याचा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा लढा हा शेतकऱ्यांचा असून शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत तो सुरू राहील, आंदोलन लोकशाही मार्गाने होईल पण परिस्थितीनुसार तीव्रता वाढवली जाईल असे महाजन यांनी स्पष्ट केले. ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी एकत्र येऊन आपली हकीकत मांडावी आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू असेही त्यांनी सांगितले. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून स्पेशली वरिष्ठ स्तरावरून युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे जर आरोपींना जामीन मिळाला तर तपासावर परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपींना तातडीने अटक व्हावी हीच सर्वांची मागणी आहे.आणि शेतकरी बांधवांना विनंती या आरोपींना जो – जो पाठीशी घालत असेल व प्रयत्न करत असेल त्यांची देखील चौका चौकात चर्चा करून अशांना समाजा समोर उघडे पाडणे गरजेचे आहे पुनश्च संदीप महाजन यांनी नम्र आवाहन केले आहे आंदोलन सुरू असून आणि राहील शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत व अनुदान परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असे महाजन यांनी ठामपणे सांगितले. जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा तालुक्यात तीव्र संतापाचे वातावरण असून शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. गिरीशभाऊ महाजन, डॉ. सागरदादा गरुड व आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष न्याय मिळण्यासाठी दोषींना अटक होणे आणि शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणे अत्यावश्यक आहे.विशेष म्हणजे हा प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे आणि सध्या पाचोरा – विधानसभा स्तरावर महायुती आघाडी व त्याचे घटक पक्ष सध्या तरी एकत्रित आहेत आणि हा प्रकार महायुती आघाडीच्या काळात घडलेला असल्यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व महायुती आघाडीचे नेते व पदाधिकारी त्यांनी एकत्रित येतात की नाही  व या प्रकरणी सामूहिक काय भूमिका घेतात हे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी अनुदान आंदोलनाची रणनितीच्या पुढील टप्प्याकडे लागले असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज दि.03/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबीयांचा आधार लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवास फायदेशीर ठरेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – लाल

वृषभ – घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात गती येईल. पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळेल. आत्मविश्वासाने काम करा. घरात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मानसिक शांती लाभेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहकार्य लाभेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – निर्णय घेण्यात घाई करू नका. महत्वाचे काम यशस्वी होतील. मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक आनंद वाढेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याच्या बाबतीत जपावे. नोकरीत स्थैर्य लाभेल. व्यवहारात संयम ठेवावा. अपेक्षित कामे पूर्ण होतील.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. मित्र-परिवाराकडून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – गुंतवणुकीतून फायदा होईल. कामात यश मिळेल. संबंधांमध्ये विश्वास वाढेल. घरगुती वातावरण आनंददायी राहील.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – काळा

धनु – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन संधी मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास टाळावा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबात सौहार्द राहील. कामात गती येईल. आर्थिक स्थितीत थोडा उतार-चढाव संभवतो. संयमाने वागा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थी व तरुणांना यश मिळेल. नवी योजना हाती घेता येतील. मित्रपरिवारासोबत वेळ आनंदात जाईल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – अनपेक्षित खर्च संभवतो. धार्मिक वा सामाजिक कार्यात रस वाढेल. कामातील जबाबदाऱ्या वाढतील. संयम ठेवा.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

लग्नानंतरही ( रेशन कार्ड ) अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याने खळबळ; पिंपळगाव हरे येथील नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे अन्न सुरक्षा योजनेचा अनुचित लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि खळबळ उडाली आहे. शासनाने अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र कुटुंबांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याची सोय केली असली तरी पात्र नसतानाही लाभ घेऊन शासकीय फसवणूक केल्याचा प्रकार या घटनेतून समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते निलेश नामदेव उभाळे यांनी 7 नोव्हेंबर 2023 रोजी तहसील कार्यालय, पाचोरा येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार १. शंकर माधव क्षिरसागर २. मुक्ताबाई शंकर क्षिरसागर ३. अमोल शंकर क्षिरसागर ४. कविता शंकर क्षिरसागर ५. पंडीत धनु माळी ६. प्रदीप माधव क्षिरसागर ७. मनिषा प्रदीप क्षिरसागर ८. भुषण प्रदीप क्षिरसागर यांनी शासनाची दिशाभूल करून मोफत धान्य घेतले. चौकशीत स्पष्ट झाले की कविता आणि शुभांगी या दोघींचा विवाह झाल्यानंतरही त्यांची नावे शिधापत्रिकेत कायम ठेवण्यात आली होती आणि त्या आधारे धान्याचा लाभ चालू ठेवण्यात आला होता. शिधापत्रिका क्रमांक 272026780867 वरून हा गैरप्रकार सुरू असल्याचे पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे यांनी सखोल चौकशीत सिद्ध केले. त्यांचा अहवाल तहसीलदार आणि प्रांताधिकारी पाचोरा यांच्याकडे सादर करण्यात आला. अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी 7 जुलै 2025 रोजी आदेश देऊन या नऊ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अन्न सुरक्षा योजनेपुरता मर्यादित नसून शासनाच्या इतर योजनांचा गैरवापर कसा केला जातो याचेही हे जिवंत उदाहरण आहे. अनेकदा शासन गरीब कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना, संजय गांधी योजनेतील विधवा अनुदान योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, गॅस सिलेंडर सबसिडी, कृषी अनुदान, घरकुल योजना तसेच वयोवृद्धांसाठी पेन्शन योजना लागू करते. परंतु पात्रतेच्या अटी पाळल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, लाडकी बहीण योजनेत पात्र नसतांनाही 1500 रुपये घेणे , मुलीच्या नावाने मिळणारे पंधराशे रुपये अनेक ठिकाणी मुलीचे लग्न झाल्यानंतरही घेतले जातात. काही ठिकाणी मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून वगळली जात नाहीत आणि त्यांच्या नावावरही धान्य वा अन्य लाभ घेतला जातो. अशा बोगस नोंदींमुळे खरी पात्र कुटुंबे वंचित राहतात. शासनाचा उद्देश गरीब, अनाथ, विधवा, शेतकरी किंवा उपेक्षित समाजघटकांना मदत करण्याचा असतो, मात्र गैरवापरामुळे निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होतो. पिंपळगाव हरे येथील प्रकार यातूनच स्पष्ट झाला आहे. लग्नानंतर मुली माहेरच्या शिधापत्रिकेत राहिल्याने धान्याचा अनुचित लाभ घेण्यात आला, तसेच अन्य अनुदानेही अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने घेतली जात असल्याची शंका प्रशासन व्यक्त करत आहे. या प्रकरणातून एक संदेश स्पष्ट मिळतो की शासनाच्या योजना पारदर्शकतेने चालण्यासाठी नागरिकांनी स्वतः सजग राहणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात नावांची छाननी आणि आधार आधारित पडताळणी केली जात असली तरीही खोट्या माहितीद्वारे काही लोक लाभ घेत राहतात. मात्र निलेश नामदेव उभाळे यांसारखे सामाजिक कार्यकर्ते पुढे आले तरच हे गैरप्रकार उघडकीस येतात. विशेष म्हणजे आता कोणतीही माहिती कोठूनही कशीही ऑनलाइन द्वारे सहज प्राप्त होऊ शकते आता हे विसरून चालणार नाही म्हणून अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने आता या नऊ जणांना न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. शासकीय निधीची फसवणूक करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींना शिक्षा होणे अपेक्षित आहे. शहर असो की ग्रामीण भाग शिधापत्रिका, लाडकी बहीण योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती, विधवा अनुदान यांसारख्या योजना प्रामाणिकपणे वापरण्याऐवजी खोटे लाभ घेण्याची प्रवृत्ती थांबवणे गरजेचे आहे. पिंपळगाव हरे येथील हा प्रकार सर्वसामान्य जनतेसाठी धडा देणारा आहे. चुकीचे लाभ घेणे सहज शक्य वाटले तरी कायद्याच्या कक्षेतून सुटका मिळत नाही. आपल्या शेजाऱ्यांनाही आपल्या गैरकृत्याची जाणीव असू शकते आणि त्याच वेळी ते प्रशासनापर्यंत पोहोचू शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार वर्तन करून शासनाच्या योजनांचा प्रामाणिकपणे लाभ घ्यावा. पिंपळगाव हरे येथील झालेली कारवाई हा त्याचा पुरावा आहे.

पितृपक्षात स्वामी संस्थेचे अन्नदान : ८५० कॅन्सरग्रस्तांना आधार

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पितृपक्ष म्हणजे स्मरण, श्रद्धा व सेवा. या भावनेतून परळ परिसरातील रुग्णालये व रुग्णसेवेशी निगडित कार्यासाठी प्रसिद्ध असलेली “स्वामी” (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्हायरमेंट) ही सेवाभावी संस्था गेली २५ वर्षांपासून निरंतर समाजोपयोगी कार्य करीत आहे. जनसेवा व्रत या उक्तीनुसार संस्थेतर्फे रुग्णसेवा केंद्र, मातृभाव प्रकल्प, विद्यार्थी सहाय्य योजना, विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, पॅथॉलॉजी, औषध पेढी, आदिवासी प्रकल्प, पर्यावरण प्रकल्प, अवयव दान चळवळ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते.

यंदा पितृपक्ष रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ पासून रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. या काळात मातृभाव प्रकल्पांतर्गत दररोज ५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि शेवटया दिवशी अर्थात सर्वपित्री अमावस्येला १५० रुग्णांना अन्नधान्याचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ८५० कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक या उपक्रमाचा लाभ घेतील. प्रत्येक रुग्णाला ३ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, पाव किलो खजूर, अर्धा किलो रवा, पाव किलो चहा पावडर, बिस्किटचा पुडा व राजगिरी चिक्की देण्यात येईल. या उपक्रमासाठी प्रत्येक रुग्णामागे रुपये ५०० खर्च अपेक्षित आहे.

संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की दानशूर व्यक्तींनी आपल्या स्वर्गवासी आप्तजनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या अन्नदानात सहभागी व्हावे. इच्छुकांनी आपल्या तिथीला प्रत्यक्ष उपस्थित राहून रुग्णांना स्वहस्ते शिधा द्यावा. तसेच आर्थिक वा वस्तुरूपाने देणगी देऊन या ईश्वरी कार्यात हातभार लावावा, असे आवाहन “स्वामी” परिवाराने केले आहे.

देणगीसाठी संपर्क क्रमांक ८९२८०६१३९१ असून (वेळ सकाळी १०.०० ते १२.०० व संध्याकाळी ६.०० ते ८.००), बँक तपशील : Account Name: SWAMEE Social Workers Association, Bank of Baroda – Parel Branch, S/Account No: 99350100001251 IFSC Code: BARB0DBPARE ई-मेल : Swamee2016@gmail.com, वेबसाइट : www.swamee_ngo.com व फेसबुक : swameengo.com.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!