Home Blog Page 93

मध्यरात्रीचे स्वातंत्र्य – इतिहासाचा रक्तरंजित दस्तऐवज (‘Freedom at Midnight’ या पुस्तकावर आधारित विस्तारित लेख)

Loading

स्वातंत्र्य हे एखाद्या राष्ट्रासाठी परमप्राप्ती असते, पण भारतासाठी ते एक वेदनामय पर्व ठरले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण त्या स्वातंत्र्याच्या पायावर रक्ताचे थेंब होते. लाखो लोकांचे विस्थापन, दंगली, अत्याचार, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका संस्कृतीचे दोन भागांमध्ये तुटणे. डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘Freedom at Midnight’ या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा हा सगळा संघर्ष शब्दबद्ध झालेला आहे – एक जीवंत, धडकी भरवणारी आणि विचारांना गहिवर आणणारी गाथा.
या पुस्तकातील घटनाक्रम केवळ ऐतिहासिक नाही, तर मानवी स्वभावाच्या उत्कटतेचा आरसा आहे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना यांसह सरदार वल्लभभाई पटेल, नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर या सर्व पात्रांनी त्या काळात आपापल्या भूमिका ताकदीने निभावल्या – काहींनी राष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी, तर काहींनी अखंड हिंदुराष्ट्र त्यांच्या वैचारिक ध्येयासाठी.
या पुस्तकात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा विशेष उल्लेख आहे. ते फक्त काँग्रेसचे नेते नव्हते, तर भारताच्या एकात्मतेचे खरे शिल्पकार होते. ‘Freedom at Midnight’ मध्ये वर्णन येते की, जर सरदार पटेल यांच्याकडे राजकीय निर्णयांची मुभा असती, तर फाळणी वेगळ्या पद्धतीने झाली असती किंवा कदाचित टळलीही असती.
पुस्तकात नमूद केले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल हे जमीनविषयक, राज्यकारभार विषयक आणि सुरक्षाविषयक बाबतीत अत्यंत वास्तववादी आणि कठोर निर्णय घेणारे नेते होते. प्रिन्सली स्टेट्स अर्थात संस्थानांना भारतात विलीन करण्यासाठी त्यांनी वापरलेले राजनैतिक धोरण आणि आवश्यकतेनुसार दाखवलेली धमकीची छटा – ही एक दबंग नायकाची महत्वपुर्ण लक्षणं होती.
हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर हे तिन्ही राज्ये त्यांनी योग्य वेळी देशात समाविष्ट केली नसती, तर आजचा भारत म्हणजे शेकडो तुकड्यांचा कोडं राहिला असता. त्यांच्या निर्णयक्षमतेने भारत एकसंध राहिला, आणि हीच गोष्ट ‘Freedom at Midnight’ मध्ये माउंटबॅटनसुद्धा स्पष्टपणे मान्य करतो – ” सरदार पटेल ही माणूस नव्हते, ती संस्था होता.”
पण दुर्दैव असे की, काँग्रेसच्या नेतृत्वात नेहरूंच्या प्रभावाखाली गांधीजींची निवड झाली आणि पटेल यांना हेतुपुर्वक दूर ठेवण्यात आले. अनेक अभ्यासकांचे आणि लेखकांचे स्पष्ट मत आहे खरोखर जर स्वतंत्र भारताचा पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल झाले असते, तर भारताच्या सीमावर्ती समस्या आणि अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न अधिक काटेकोरपणे हाताळले गेले असते.आणि हे विष कायमस्वरूपी संपवले असते
‘Freedom at Midnight’ मध्ये नथुराम गोडसे यांच्या बाबतचा भाग एक अत्यंत क्लिष्ट आणि भावनिक बिंदू आहे. लेखकांनी नथ्युराम गोडसे यांना केवळ ‘खून करणारा’ ठरवून थांबले नाहीत, तर त्याच्या मानसिकतेचा, वैचारिक पृष्ठभूमीचा आणि त्याच्या संतापाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नथुराम गोडसे हे एक राष्ट्रप्रेमी,अभ्यासू, वैचारिकदृष्ट्या प्रभावी आणि इंग्रजीतून

उत्तम बोलणारे तरुण होते. त्यांनी गांधीजींवर आरोप केला की त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीस मूक संमती दिली, आणि हिंदूंवर अन्याय झाला तरी मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेतली. गांधीजींच्या उपोषणामुळे जिनाच्या हट्टा खाली भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला तो सुद्धा गांधीच्या हट्टापायी यामुळे नथ्थुराम गोडसेच्या संतापाने उच्चांक गाठला.
त्यांच्या मते, गांधी हे हिंदूंच्या हिताच्या विरोधात गेले होते आणि ते मुस्लिम समुदायासंदर्भात अधिक सहानुभूती दाखवत होते. म्हणूनच गांधींची हत्या त्यांनी एक ‘राजकीय आवश्यक निर्णय’ म्हणून मांडली.
पुस्तकात गोडसेच्या कोर्टात दिलेल्या आत्मसमर्पक निवेदनाचा हवाला दिला आहे, ज्यात ते म्हणतात – “मी गांधीजींचा आदर करतो, पण राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आमच्या दृष्टीने आत्मघातकी ठरले.” आणि त्यांना जेव्हा फाशी देण्यात आली तर त्यांची अस्थीविसर्जची शेवटी इच्छा आणि आज पर्यंत त्या अस्थी जशाच्या तशा सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत पुस्तका बाहेरील मात्र अधिक माहिती करिता नाथूराम गोडसे यांच्या अस्थी आजही पुण्यातील शिवाजीनगर येथील एका इमारतीत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही इमारत ‘अजिंक्य डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट कंपनीचे कार्यालय आहे, ज्याचे मालक गोडसे यांचे नातू आहेत .
नाथूराम गोडसे यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेत नमूद केले होते की, त्यांच्या अस्थी सिंधू नदीत (इंडस नदी) तेव्हाच विसर्जित कराव्यात, जेव्हा ती नदी स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली पुन्हा वाहू लागेल . त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत त्या अस्थी विसर्जित केल्या नाहीत .
गोडसे यांच्या अस्थी एका चांदीच्या कलशात ठेवण्यात आल्या असून, त्या शिवाजीनगर, पुणे येथील एका इमारतीत जतन करण्यात आल्या आहेत . या इमारतीत गोडसे यांचे काही कपडे आणि हस्तलिखित नोट्सही ठेवण्यात आल्या आहेत .
नाथूराम गोडसे यांच्या अस्थी आजही पुण्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्या तेव्हाच विसर्जित केल्या जातील, जेव्हा सिंधू नदी पुन्हा स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली वाहू लागेल . असो
यावर एक स्वतंत्र लेखच तयार होईल
परंतु ‘Freedom at Midnight’ स्वातंत्र्य विर वि.दा.सावरकरांचा गांधीहत्या प्रकरणाशी संबंध होता की नाही, यावर पुस्तक स्पष्ट निर्णय घेत नाही. मात्र, लेखकांनी स्वातंत्र्य विर सावरकरांच्या राजकीय विचारांचा, विशेषतः हिंदुत्वविचारसरणीचा, नथ्थुराम गोडसेसारख्या युवकांवर कसा परिणाम झाला, याचा ऊहापोह केला आहे.
नथ्थुराम गोडसे स्वतः ‘हिंदू महासभा’शी संलग्न होते, आणि स्वातंत्रविर वि दा सावरकरांचे विचार त्याच्या मनावर खोलवर बिंबलेले होते. तथापि, कोर्टात स्वातंत्रविर वि दा सावरकर यांच्यावर आरोप झाले असले तरी थेट पुरावे नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झाली. परंतु एवढे निश्चित भारत स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यविर वि दा सावरकर हे असे एकमेव क्रांतीकारी होते की त्यांची जेलमध्ये गांधी हत्ये प्रकरणी रवानगी करण्यात आली होती. Freedom at Midnight यात सावरकरांचा उल्लेख ‘intellectual influence’ म्हणून येतो – ज्यांनी क्रांती, राष्ट्रवाद, आणि हिंदू अस्मिता यांचं बिंब रोवलं.
लेखक लिहितात – ” स्वातंत्रविर वि दा सावरकर हे एक ज्वालामुखीसारखे होते – बाह्य शांत, पण अंतर्गत धगधगता. त्याचे विचार तरुणांच्या मनात क्रांतीचा वणवा पेटवत होते.” ( म्हणूनच हिंदु हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची तुलना सावरकरांशी करण्यात येते )
Freedom at Midnight हे पुस्तक स्वातंत्र्याच्या वेदनेचा दस्तावेज आहे. हे पुस्तक गांधीजींच्या पवित्रतेला नमते घेते, पण त्याचबरोबर नथ्थुराम गोडसेच्या आक्रोशालाही दुर्लक्षित करत नाही. नेहरूंच्या आशावादाला स्थान देते, पण सरदार वल्लभभाई पटेल यांची वास्तववादी दूरदृष्टीही मांडते. भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री – एक महाशक्ती नवी झाली, पण त्या पायाशी कित्येकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्या चुराड्यातूनच उभा राहिला आजचा भारत – एक हळूवार पण ठाम राष्ट्र.
यामुळे हे पुस्तक केवळ ऐतिहासिक वाचन नसून, आजच्या काळात आपल्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय चिंतनासाठी एक प्रेरणादायी आरसा आहे.
संदर्भ – ‘Freedom at Midnight’ (Dominique Lapierre & Larry Collins) —- संदीप दा महाजन

‘सुराबा’ कादंबरी देऊन मान्यवरांचा गौरव — एका अनाथ मुलाच्या संघर्षाचे प्रेरणादायी चित्रण

Loading

पाचोरा – समाजात वेगवेगळ्या स्तरांवर संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना दिशा देणारे साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून एक सामाजिक प्रबोधनाचे सामर्थ्य असते. अशीच एक प्रबोधनात्मक आणि अंतःकरणाला भिडणारी कादंबरी ‘सुराबा’ या नावाने एस्.ए.पाटील सर नांद्रेकर यांनी लिहिलेली असून, एका अनाथ मुलाच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित असलेल्या या कादंबरीने अल्पावधीतच

रसिक वाचकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. याच कादंबरीचा सन्मानपूर्वक सत्कार पाचोरा येथे चि. तेजस या युवकाच्या विवाहप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमात मा. विजय नवल पाटील, माजी केंद्रीय दळणवळण मंत्री, भारत सरकार, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘सुराबा’ कादंबरी देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की, “ही कादंबरी वाचताना मन हेलावून गेलं. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेला, पण स्वाभिमानाने आणि सकारात्मकतेने जीवनाला सामोरे जाणारा एक अनाथ मुलगा — सुराबा — हा प्रत्येक वाचकाच्या मनाला निश्चित प्रेरणा देईल. ही केवळ एक कथा नाही, तर समाजातील दुर्लक्षित व कधी कधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या मुलांसाठी जीवनदायी मार्गदर्शन करणारा प्रकाशस्तंभ आहे.” त्यांनी लेखक एस्.ए.पाटील सरांच्या संवेदनशील लेखनशैलीचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या Adv. प्रविण पाटील, शासकीय अभियोक्ता छत्रपती संभाजीनगर यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, “समाजात न्यायासाठी लढणाऱ्या अनेकांची कहाणी आपण पाहतो, पण ज्यांना कोणीच नसते, त्यांच्या वेदना आणि त्यातून उभारलेला स्वाभिमानी जीवनप्रवास दाखवणं हे मोठं धाडस आहे. एस्.ए.पाटील सरांनी हे काम फारच समर्थपणे केले आहे.” प्रा. सुनिल गरुड (जळगाव), डॉ. जगदीश पाटील (धुळे), डॉ. अनिल पाटील (धुळे), एल. डि. पाटील, मुख्याध्यापक आर. व्हि. पाटील, मुख्याध्यापक सानप सर, डॉ. भरत पाटील (डॉक्टर असोसिएशन, पाचोरा), मा. सभापती नितिन दादा तावडे, डि. पि. पाटील सर, दीपक पाटील (ता. अध्यक्ष, मराठा सेवा संघ) यांसारख्या मान्यवरांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला, हे विशेष. या कार्यक्रमाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विवाहासारख्या आनंददायी क्षणातही साहित्यिकतेचा आणि सामाजिक जाणिवेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामान्यतः लग्नसोहळे हे मनोरंजनप्रधान आणि पारंपरिक स्वरूपाचे असतात, मात्र यावेळी विवाहाच्या निमित्ताने समाजप्रबोधन आणि साहित्याच्या माध्यमातून विचारविनिमय होणे हे निश्चितच कौतुकास्पद होते. ‘सुराबा’ या कादंबरीच्या प्रकाशनाचे श्रेय डॉ. बालाजी जाधव यांच्या ‘पंचफुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर’ यांना जाते. प्रकाशक म्हणून त्यांनी सांगितले की, “आम्ही नेहमीच अशा साहित्याला प्राधान्य देतो जे समाजात परिवर्तन घडवू शकेल. ‘सुराबा’ ही त्याच प्रकारची कादंबरी आहे. तिचं प्रत्येक पान वाचकाला अंतर्मुख करतं.” या कादंबरीस प्राचार्य बी. एन. पाटील सर यांची प्रस्तावना लाभली असून त्यांनी सुराबाच्या कथानकावर सखोल भाष्य करताना सांगितले होते की, “ही कहाणी जरी एका मुलाभोवती फिरते, तरी तिचा केंद्रबिंदू म्हणजे समाजातील तळागाळातील भावभावनांचे प्रतिनिधित्व करणारा एक पात्र. हे पात्र वास्तवदर्शी आहे आणि आज अनेक ठिकाणी वंचित असलेल्या मुलांमध्ये हेच व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसते.” एस्.ए.पाटील सर नांद्रेकर यांनी या कादंबरीच्या लेखनामागील प्रेरणा विशद करताना सांगितले की, “मी स्वतः समाजातील अनेक दु:खद गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. या पात्रात माझ्या अनुभवांचं आणि अनेक अनाथ, उपेक्षित मुलांच्या कहाण्यांचं एकत्रित प्रतिबिंब आहे. मला वाटतं ही गोष्ट लिहून मी त्यांच्यासाठी एक आवाज उभा केला आहे.” कार्यक्रमात अनेकांनी कादंबरी खरेदी केली आणि तिच्या प्रतींचा खास संग्रह केला. उपस्थितांनी ही कादंबरी शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ग्रंथालयात पोहोचवण्याची गरजही व्यक्त केली. विशेषतः शिक्षक वर्गाने याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेच्या जडणघडणीसाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘सुराबा’ हे पात्र वाचकाला केवळ सहवेदना शिकवत नाही, तर संघर्षातून यशाकडे नेणारा मार्गही दाखवतो. त्यामुळे ही कादंबरी सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते. वडीलधारी पिढीला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी, आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी ही कथा — काळाच्या कसोटीतून नक्कीच उतरते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षक, डॉक्टर, कायदेविषयक क्षेत्रातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘सुराबा’सारख्या कादंबरींचे वाचन युवकांसाठी आवश्यक असल्याचे मत मांडले. विशेषतः सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी या कादंबरीचा वापर मार्गदर्शन साहित्य म्हणून करण्याची तयारी दर्शवली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लेखक एस्.ए.पाटील सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या लेखनातील सामाजिक भान, वास्तवाचा समतोल मांडणी आणि भावनिक सूक्ष्मता याचे सर्वांनी मुक्तकंठाने कौतुक केले. पाचोरा येथील हा सत्कार कार्यक्रम केवळ एक सन्मान सोहळा नसून समाजाला साहित्याच्या माध्यमातून आरसा दाखवणारा एक संवेदनशील उपक्रम ठरला. ‘सुराबा’ ही कादंबरी ज्या प्रकारे एका विवाहप्रसंगी समाजाशी संवाद साधणाऱ्या मंचावर पोहोचली, ते पाहता अशा साहित्यकृती भविष्यात प्रत्येक घरात, शाळेत आणि वाचनालयात पोहोचल्या पाहिजेत. समाजाच्या दुर्लक्षित घटकांवरील प्रकाश टाकणारे हे लेखन म्हणजे काळाच्या गर्भात दडलेले खरे सामाजिक दायित्व आहे. अशा प्रेरणादायी कादंबरीचे लेखन करणाऱ्या लेखकाचे आणि या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानावे तितके थोडेच आहेत.

भाजप कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी दिलीपभाऊ वाघ यांचा तातडीने पक्षप्रवेश अत्यावश्यक!

Loading

पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीचा आणि तितकाच मतभेदांनी व्यापलेला मतदारसंघ राहिला आहे. येथे पक्षांची वर्चस्वाची लढाई ही स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाच्या बळावर लढली जाते, जिथे जनतेशी नातं, संघर्षाची पार्श्वभूमी ठराविक दिशा देतो. याच पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखताना भारतीय जनता पार्टीने जर खरोखरच पाचोरा-भडगावमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं ठरवलं असेल, तर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप पक्षप्रवेश हा आजच्या घडीला सर्वात निर्णायक आणि तितकाच अनिवार्य असा टप्पा ठरतो. दिलीपभाऊ वाघ हे पाचोरा-भडगावमधील राजकारणात फक्त

एक नाव नाही तर ते एक राजकीय वादळ आहे. कारण त्यांचे पिताश्री स्व. आमदार आप्पासाहेब ओ. ना. वाघ यांच्यापासून सुरू झालेला जनतेसाठी संघर्ष, कार्य, अनुभव आणि लोकसमस्या सोडविण्याची परंपरा आजही त्यांच्यामार्फत समर्थपणे सुरू आहे.दिलीप भाऊ वाघ यांचीच नव्हे तर संपूर्ण वाघ परिवाराची ही एक विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेली प्रतिमा आजही ताजी आहे. त्यांनी आमदार असताना केलेल्या विकासकामांपासून ते वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतो. ते कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नसतानाही मतदारसंघातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहतात. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नावाबाबत आदर आणि विश्वास आहे. अशा नेतृत्वाला जर वेळीच सामावून घेतले नाही, तर त्याचा राजकीय तोटा हा फक्त मतांचे विभाजन नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मनोबलाच्या घसरणीच्या स्वरूपात भाजपला सहन करावा लागू शकतो. भाजपमध्ये दिलीपभाऊ वाघ यांचा प्रवेश ही एक केवळ औपचारिकता राहिलेली असून, पक्षश्रेष्ठींपासून स्थानिक पातळीपर्यंत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, हा प्रवेश नेमका कोणत्या दिवशी आणि कुठल्या कार्यक्रमात घ्यायचा, यावरच सध्या निर्णय प्रक्रिया थांबलेली दिसते. ही विलंबित प्रक्रिया जर अधिक काळ चालू राहिली, तर त्यामुळे संधी गमावण्याचा धोका निर्माण होतोय. कारण पाचोरा-भडगावमध्ये सध्या अनेक लहान-मोठ्या राजकीय गटांचे तगडे मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य पक्षही दिलीपभाऊंसारख्या लोकप्रिय नेतृत्वाला आपल्या गोटात खेचण्याची रणनीती आखत आहेत. निवडणूक म्हटली की पैसा आला आणि पक्षाकडून पैसा कोणाकडे येईल, कोण किती खर्च करेल, याच वादांमध्येच भाजपचे गट निवडणूक काळात निर्माण होतात आणि आजही आहेत. जर वेळेतच एक संघ, एक छत्र असलेले आणि सर्वांना मान्य असे नेतृत्व – विशेषतः दिलीपभाऊ वाघ यांच्यासारखे – भाजपाला मिळाले नाही, तर त्याचा थेट परिणाम पक्षाच्या पराभवावर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपने जर धोरणात्मक निर्णय घेण्यास उशिर केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका व वॉर्ड पातळीवर भाजपसाठी उमेदवार निवड, प्रचार तंत्र आणि जनतेशी नाळ जोडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची जनाधाराची ताकद ही केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे नाही, तर वाघ परिवाराने वर्षानुवर्षे जपलेल्या कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनेमुळे आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातून आणि कार्यकर्त्यांमधून अनेक उमेदवार घडवले आहेत. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे, म्हणजे एकाचवेळी शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत होणे. आज भाजपमध्ये स्थानिक पातळीवर पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी स्वकर्तृत्व व नेतृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या उणीवांची चर्चा खुलेपणाने केली जात आहे. अशावेळी जर दिलीपभाऊ वाघ यांचा प्रवेश निश्चित वेळेत झाला, तर तो पक्षासाठी एक नवा बळ निर्माण करणारा ठरेल. त्यामुळे पक्षाने या प्रवेश प्रक्रियेतील अनावश्यक विलंब टाळून तत्काळ तारीख आणि व्यासपीठ निश्चित करणे गरजेचे आहे. दिलीपभाऊंचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे आगामी नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांमधील निवडणुकांच्या दृष्टीने एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय ठरेल. दिलीपभाऊ वाघ यांच्यावर केवळ त्यांच्या समर्थकांचा नाही, तर सामान्य नागरिकांचाही विश्वास आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या वक्तव्यांमधून, माध्यमांमधून लोकशाही विषयीची आपली निष्ठा स्पष्ट केली आहे. त्यांची कोणतीही राजकीय घाई नसून जनतेसाठी योग्य व्यासपीठाची निवड करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. अशा नेतृत्वास जर भाजपने वेळेत स्वीकारले, तर संपूर्ण भागात एक नवा राजकीय स्फोट घडू शकतो, जो भाजप विरोधकांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही या संभाव्य प्रवेशाकडे आशेने पाहत आहेत. अनेक वॉर्डांत कार्यकर्त्यांनी आपली रणनीती आधीच तयार ठेवली असून, दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात लढा देण्यास उत्सुक आहेत. मात्र हा उत्साह जर वेळेत दिशा मिळाली नाही, तर तो हळूहळू नकारात्मकतेत बदलू शकतो. नेतृत्वाच्या पातळीवरच्या गोंधळाचा फटका थेट कार्यकर्त्यांच्या मनोबलाला बसतो आणि हेच मोठ्या पक्षासाठी घातक ठरते. भाजपने मागील काही वर्षांत पाचोरा-भडगावमध्ये मोठी कामगिरी केलेली नसली, तरी संघटनात्मक पातळीवर त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आता हा अस्तित्व टिकवण्याचा टप्पा नाही, तर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा टप्पा आहे. आणि तो टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी दिलीपभाऊ वाघ यांच्यासारखे मजबूत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि मतदारांशी जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. या प्रवेशात विलंब झाल्यास, तो एक राजकीय संधी व नेतृत्व गमावण्यासारखा ठरेल. भविष्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला बहुमत मिळवायचे असेल, तर निर्णय क्षणाचाही विलंब न करता घेणे अत्यावश्यक आहे. कारण लोकशाहीत वेळेवर घेतलेला निर्णय हा विजयाचा पाया ठरतो आणि उशीर झालेला निर्णय केवळ पश्चातापास कारणीभूत ठरतो. एकंदर विचार करता, दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश ही केवळ एक औपचारिक गोष्ट नसून, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणात एक निर्णायक मोड ठरणार आहे. भाजपचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर वेळ न घालवता हा ऐतिहासिक निर्णय तातडीने घेणे हेच पक्षहिताचे ठरेल. अन्यथा भाजपसाठी ही एक अपूर्ण घडी आणि गमावलेली संधी ठरू शकते, जी भविष्यातील निवडणुकांमध्ये मोठा धक्का ठरू शकतो.

लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; हैदराबादचा हंगामातील चौथा विजय

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. अशाप्रकारे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पाचवा संघ बनला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादने १८.२ षटकांत चार गडी गमावून २०६ धावा केल्या आणि सामना जिंकला. त्यांच्याकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ५९ धावा केल्या. लखनौकडून दिग्वेश राठीने दोन तर विल्यम ओ’रोर्क आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने या सामन्यात धक्कादायक सुरुवात केली. अथर्व तायडे १३ धावा करून बाद झाला. यानंतर, अभिषेक शर्माने इशान किशनसह डावाची जबाबदारी घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ८२ धावांची भागीदारी झाली. २० चेंडूत ५९ धावा करून अभिषेक बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने दिग्वेश राठीकरवी झेलबाद केले. 
यानंतर इशान किशनला हेनरिक क्लासेनची साथ मिळाली. दोघांनीही काही चांगले फटके मारले आणि ४१ धावा जोडल्या. किशन २८ चेंडूत ३५ धावा काढून बाद झाला तर क्लासेन ४७ धावा काढून तंबूमध्ये परतला. दरम्यान, कामिंदू मेंडिस ३२ धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. तो हॅमस्ट्रिंगशी झुंजत असल्याचे दिसून आले. अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी प्रत्येकी पाच धावांवर नाबाद राहिले.
त्याआधी, मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी स्फोटक फलंदाजी करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ११५ धावांची भागीदारी झाली जी हर्ष दुबेने मोडली. त्याने मार्शला आपला बळी बनवले, जो ३९ चेंडूत ६५ धावा करून तंबूमध्ये परतला. दरम्यान, हर्षल पटेलने मार्करामला त्रिफळाचीत केले. तो ३८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. लखनौकडून निकोलस पूरनने ४५ धावा केल्या तर कर्णधार ऋषभ पंतची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. त्याने फक्त सात धावा केल्या. आयुष बदोनी तीन, अब्दुल समद तीन आणि शार्दुल ठाकूर चार धावा करून बाद झाले. तर, आकाश दीप सहा धावांवर नाबाद राहिला आणि रवी बिश्नोई खाते न उघडता नाबाद राहिला. हैदराबादकडून इशान मलिंगाने दोन तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऐतिहासिक विजय! ‘असेन मी.. नसेन मी…’ नाटकाला ७.५० लाखांचे प्रथम पारितोषिक

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ३५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत ‘असेन मी.. नसेन मी…’ या नाटकाने ७ लाख ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावून गौरव प्राप्त केला आहे. ही घोषणा संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.

मुख्य पारितोषिक विजेते नाटके:

प्रथम पारितोषिक (₹७.५० लाख):
असेन मी.. नसेन मी… – संस्था: स्क्रिप्टीज क्रिएशन्स
द्वितीय पारितोषिक (₹४.५० लाख):
वरवरचे वधुवर – संस्था: कलाकारखाना आणि शांताई
तृतीय पारितोषिक (₹३ लाख):
उर्मिलायन – संस्था: सुमुख चित्र

इतर पारितोषिके:

दिग्दर्शन:

प्रथम (₹१,५०,०००): अमृता सुभाष (असेन मी.. नसेन मी…)
द्वितीय (₹१,००,०००): अद्वैत दादरकर (शिकायला गेलो एक)
तृतीय (₹५०,०००): विराजस कुलकर्णी (वरवरचे वधुवर)

नाट्यलेखन:

प्रथम (₹१,००,०००): संदेश कुलकर्णी (असेन मी.. नसेन मी…)
द्वितीय (₹६०,०००): शेखर ढवळीकर (नकळत सारे घडले)
तृतीय (₹४०,०००): सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (उर्मिलायन)

प्रकाश योजना:

प्रथम (₹४०,०००): प्रदीप मुळ्ये (गोष्ट संयुक्त मानापमानाची)
द्वितीय (₹३०,०००): शितल तळपदे (मास्टर माईंड)
तृतीय (₹२०,०००): चेतन ढवळे (उर्मिलायन)

नेपथ्य:

प्रथम (₹४०,०००): प्रदीप मुळ्ये (असेन मी.. नसेन मी…)
द्वितीय (₹३०,०००): प्रदीप पाटील (वरवरचे वधुवर)
तृतीय (₹२०,०००): संदेश बेंद्रे (ज्याची त्याची लव्हस्टोरी)

संगीत दिग्दर्शन:

प्रथम (₹४०,०००): निषाद गोलांबरे (वरवरचे वधुवर)
द्वितीय (₹३०,०००): निनाद म्हैसाळकर (उर्मिलायन)
तृतीय (₹२०,,०००): साकेत कानिटकर (असेन मी.. नसेन मी…)

वेशभूषा:

प्रथम (₹४०,०००): मयुरा रानडे (गोष्ट संयुक्त मानापमानाची)
द्वितीय (₹३०,०००): मंगल केंकरे (सूर्याची पिल्ले)
तृतीय (₹२०,०००): सुनिल हरिश्चंद्र (उर्मिलायन)

रंगभूषा:

प्रथम (₹४०,०००): उदयराज तांगडी (उर्मिलायन)
द्वितीय (₹३०,०००): राजेश परब (गोष्ट संयुक्त मानापमानाची)
तृतीय (₹२०,०००): सुरेंद्र चव्हाण व कौशल तांबे (असेन मी.. नसेन मी…)

उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक व ₹५०,०००/-:

पुरुष कलाकार:

प्रशांत दामले (शिकायला गेलो एक)
ऋषिकेश शेलार (शिकायला गेलो एक)
आनंद इंगळे (नकळत सारे घडले)
सुव्रत जोशी (वरवरचे वधुवर)
ओंकार राऊत (थेट तुमच्या घरातून)

स्त्री कलाकार:

निना कुलकर्णी (असेन मी.. नसेन मी…)
शुभांगी गोखले (असेन मी.. नसेन मी…)
निहारिका राजदत्त (उर्मिलायन)
सखी गोखले (वरवरचे वधुवर)
शर्मिला शिंदे (ज्याची त्याची लव्हस्टोरी)

दि. ६ ते १६ मे २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प.) येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाटके सादर करण्यात आली. प्रेक्षकांची उदंड उपस्थिती आणि रसिकांची टाळ्यांची पावती यामुळे प्रत्येक प्रयोग गगनभेदी जल्लोषात रंगला.

परीक्षक म्हणून विजय गोखले, संजय डहाळे, मिलिंद शिंदे, आशा शेलार आणि लिना भागवत यांनी जबाबदारी पार पाडली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विजेते नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, लेखक व सर्व सन्मानित कलावंतांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेतील यशस्वी कलावंतांनी पुन्हा एकदा मराठी रंगभूमीचा लौकिक उंचावला आहे. भविष्यातही अशीच दर्जेदार निर्मिती रसिकांना पाहायला मिळो, हीच अपेक्षा!

नवी मुंबईत रंगणार साहित्यिक सोहळा!‘२रे एकदिवसीय रंगधनु नवरंग साहित्य संमेलन २०२५’ – ८ जून रोजी कोपरखैरणे येथे

Loading

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला आणि संस्कृतीच्या त्रिवेणी संगमातून सजणार आहे नवी मुंबई! नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘२रे एकदिवसीय रंगधनु नवरंग साहित्य संमेलन २०२५’ हा बहुप्रतिक्षित साहित्यिक सोहळा रविवार, ८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता, कोपरखैरणे येथील ‘ज्ञानविकास शिक्षण संकुल सभागृहात’ रंगणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ साहित्यिक श्री. एल. बी. पाटील यांच्याकडे असून, स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक नेते श्री. पी. सी. पाटील उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभाने होणार आहे.

पहिल्या सत्रात, नवरंगचे अध्यक्ष गज आनन म्हात्रे लिखित ‘नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या ग्रंथाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे हा रंगहीन सोहळा ठरणार आहे.

यानंतर, नवी मुंबईतील सहा गुणी कलाकारांना ‘नवरंग कलारत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, कला, लोकसंस्कृती आणि समाजकार्य क्षेत्रातील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांची नावे संमेलनस्थळी जाहीर केली जातील.

दुसऱ्या सत्रात, ‘आजचे पुस्तक – दिशा आणि दशा’ या विषयावर सखोल परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास पोटे हे असतील. या चर्चासत्रात नामवंत लेखक, समीक्षक आणि वाचक सहभागी होणार आहेत.

तिसऱ्या आणि अंतिम सत्रात, प्रसिद्ध साहित्यिका प्रतिभा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कवीसंमेलनाचे आयोजन होणार आहे. विविध काव्यप्रकारांचा आस्वाद घ्यायची ही एक पर्वणी ठरणार आहे. नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, पुणे येथील अनेक नवोदित आणि ज्येष्ठ कवी यात सहभागी होणार आहेत.

संमेलनाचे संयोजक गज आनन म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली असून, अधिक माहितीसाठी 9323172614 ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

साहित्यप्रेमींनी या बहारदार सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहून साहित्यिक आनंदाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वीची काळजी: पाचोरा नगरपालिकेचा लोकाभिमुख उपक्रम – आरोग्य, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक फवारणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी

Loading

पाचोरा- नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे व आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल व स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारू यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनाला लोकाभिमुखता आणि कार्यक्षमतेचा नवा चेहरा लाभला आहे. अल्पावधीतच त्यांच्या तात्काळ निर्णयक्षमतेने व कार्यात गुंतलेपणाच्या वृत्तीमुळे त्यांनी केवळ कर्मचाऱ्यांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्याही मनात विश्‍वासाचे स्थान निर्माण केले आहे. शासकीय अधिकारी असूनसुद्धा जनतेशी प्रत्यक्ष संवाद, त्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल, आणि कोणत्याही कामात विलंब न करता तत्परतेने प्रतिसाद देणे ही त्यांच्या कारभाराची ओळख बनली आहे.
याच वृत्तीचा प्रत्यय यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई मोहिमेतही येतो. नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला जेसीबीच्या सहाय्याने सुरुवात झाली असून, या

उपक्रमात शहरातील जलसंकटाचे मुख्य भाग, जलअडथळे आणि पाण्याचा निचरा अडणारे ठिकाणे लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या नियोजनबद्ध स्वरूपात काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात रेल्वे उड्डाणपूलजवळील म्हसोबा मंदिर परिसर, स्टेट बँक कॉलनी, गांधी सेवा सोसायटी जवळील क्षेत्र आणि बिस्मिल्ला नगर भागातून करण्यात आली आहे. या भागांमध्ये पूर्वीही पावसात पाणी साचण्याच्या समस्या जाणवायच्या. त्यामुळे यंदा या भागांना प्राधान्य देत मोठ्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने खोल नालेसफाई केली जात आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल व स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्या देखरेखीखाली ही मोहीम प्रगतीपथावर आहे.
हे कार्य केवळ यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाने देखील स्वतःला आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूर्णतः झोकून दिले आहे. नागरिकांच्या तक्रारी, सुचना आणि मागण्या या मोहीमेत समाविष्ट करण्यात आल्या असून, प्रशासन व नागरीक यांच्यातील ही संवादसाखळी आता विश्वासार्हतेच्या दिशेने पुढे जात आहे. आरोग्य विभागातर्फे येत्या काही दिवसांत शहरातील इतर नाले आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या प्रमुख वाहिन्यांचीही स्वच्छता पूर्ण केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत, नगरपरिषदेकडून साथीच्या रोगांचा संभाव्य प्रसार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. विशेषतः डेंग्यू, मलेरिया, हिवताप, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी मोहिमेला देखील गती देण्यात आली आहे. 16 मे 2025 पासून या मोहिमेला श्रीराम चौक, जवाहर हौसिंग सोसायटी, बाहेरपुरा इत्यादी भागांमधून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत केवळ कीटकनाशक फवारणीच नव्हे तर घराघरांत जाऊन स्वच्छता व पाण्याची साठवणूक योग्य पद्धतीने करावी याबाबत जनजागृती केली जात आहे.
या मोहिमेत सूक्ष्म नियोजन करून शहरातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने फवारणी केली जाणार असून, दररोज नकाशा आणि विभागनिहाय कार्यक्रम ठरवून कार्यवाही केली जाईल. यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही फवारणी केवळ सार्वजनिक जागांपुरती मर्यादित न ठेवता, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा, मंडई, बस स्थानके अशा गर्दीच्या ठिकाणीही प्रभावीपणे केली जाणार आहे.
मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब यांनी या संपूर्ण मोहिमेबाबत नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे. त्यांनी असेही सुचवले की, नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उकळलेले पाणीच प्यावे, ओलसर व कुजलेले अन्नपदार्थ टाळावेत, व आपल्या परिसरात साचलेल्या पाण्याबाबत त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
या मोहिमेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून नगरपालिकेकडून विशेष जनजागृती अभियानही राबवले जाणार आहे. शाळांमध्ये आरोग्य विषयक चर्चासत्रे, महिलांसाठी मार्गदर्शन सत्रे, तसेच युवक मंडळांमार्फत पोस्टर, भित्तीपत्रक, बॅनर लावून जनजागृती केली जाईल. यासाठी सामाजिक संस्थांचाही सहभाग घेतला जाणार असून, या कार्यात ‘स्वच्छ पाचोरा – निरोगी पाचोरा’ हा मूलमंत्र देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने आपल्या परिसरातील घाण, प्लास्टिक कचरा, पाण्याची साचलेली ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, तसेच आरोग्य विभागाशी सहकार्य करावे. यामुळेच एकात्मिक प्रयत्नांद्वारे पाचोरा शहरास येत्या पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून सुरक्षित ठेवणे शक्य होईल.
मुख्याधिकारी मंगेश देवरेसाहेब यांचा कार्यशैलीतील पारदर्शकता, प्रत्येक विभागाशी संवाद साधण्याची शैली आणि जनहिताचे भान ठेवत केलेली कामांची अंमलबजावणी यामुळे पाचोरा नगरपालिकेचे कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख होत चालले आहे. या मोहिमेद्वारे ‘स्वच्छता आणि आरोग्य’ या दोन्ही अंगांनी प्रशासनाने पुढाकार घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे, जो इतर नगरपरिषदांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल.

अंमळनेर खड्ड्याच्या संकटावर काँग्रेसचा आवाज — रस्त्यावरील अपघाताच्या धोका रोखण्यासाठी तातडीची मागणी

Loading

अमळनेर — येथून गलवाडेकडे जाणाऱ्या राज्य मार्ग क्र. ६ वरील मुंदडा नगर २ परिसरात गंभीर स्वरूपाचा खड्डा पडल्याने नागरिकांचे आरोग्य आणि जीवित सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
   राज्य मार्ग क्र. ६ हा अमळनेर शहर आणि गलवाडे, झाडी, भरवस, लोन पंचम, एकलहरे, शहापूर अशा अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, कार्यालये, दवाखाने, शेती व्यवसायासाठी ये-जा करत असतात. तसेच अमळनेर आगाराच्या बसगाड्याही याच मार्गावरून शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा, बेटावदकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे.
     मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुंदडा नगर २ च्या पुढे, श्री. केले सरांच्या घराजवळील वळणावर एक मोठा खड्डा पडलेला असून, गेल्या काही दिवसांत वाळवाच्या व अवकाळी पावसामुळे या खड्ड्याचा आकार आणखी वाढलेला आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज न लागता अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दुचाकी, चारचाकी, शाळेच्या वाहने आणि रुग्णवाहिका यांना या ठिकाणी तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. काही अपघातांच्या घटना नुकत्याच घडल्याचाही नागरिकांनी उल्लेख केला आहे.
   या रस्त्याचे १० वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट ठेकेदाराला दिलेले असूनही प्रत्यक्षात कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निष्काळजीपणा असून ठेकेदाराकडून तत्काळ योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
   सदर निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास विभागीय कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
  सदर निवेदनाद्वारे काँग्रेसने प्रशासनासमोर स्पष्ट संदेश दिला आहे की, “रोजच्या प्रवासात रस्त्यांवर जीव धोक्यात येणं हा काही भाग्याचा प्रसंग नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं दुष्परिणाम आहे.” काँग्रेसने रस्त्यावर नागरिकांना वाचवण्याऐवजी केवळ फायली ढकलणाऱ्या यंत्रणांवरही टीका केली आहे.
   या निवेदनात संदीप घोरपडे यांच्यासह या निवेदनावर बी के सुर्यवंशी
भागवत गुरुजी शरद पाटील भूषण निकम
मनोज पाटील गोपाल बडगुजर यु पि पाटील
प्रताप नगराज पाटील
तूषार संदानशिव यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI व इतर घटक संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदर समस्या केवळ स्थानिक नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे.
    सामान्य नागरिकांचे मतही याबाबत ठाम असून, रस्त्याच्या देखभालीत हलगर्जीपणा झाल्यास तो प्रशासनाचा गंभीर अपयश ठरेल. काही नागरिकांनी तर सोशल मीडियावर खड्ड्याचे फोटो शेअर करून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा समाचार घेतला आहे. विनोदी भाष्यांमधूनही त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळपणावर उपरोधिक टीका केली आहे.
   या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने जागे होणे गरजेचे आहे. एकीकडे राज्यभर रस्ते सुधारण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे असे धोकादायक खड्डे अजूनही दुरुस्त न होणे म्हणजे शासकीय यंत्रणेच्या वचनबद्धतेवरच प्रश्न निर्माण करणारे आहे. सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा परिस्थितीत ठेकेदार व प्रशासनाला जबाबदार धरून तातडीने उपाययोजना करणे ही वेळेची गरज आहे.
   तसे न झाल्यास, जनतेचा रोष प्रचंड स्वरूपात उफाळून येईल, आणि त्याचे पडसाद केवळ रस्त्यावर नव्हे तर निवडणुकांमध्येही उमटतील, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या या निवेदनाने प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता संपूर्ण अमळनेर तालुक्याचे लक्ष आहे ते — प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि किती लवकर ठोस कृती करते

चोपडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघाच्या मासिक बैठकीत जनहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय

Loading

चोपडा – दिनांक 16 मे 2025 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक मिटिंग आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अशासकीय सदस्य प्रा. उदयकुमार शरदचंद्र अग्निहोत्री होते. जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली आणि काही ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी प्रा. उदयकुमार अग्निहोत्री यांनी ग्राहक पंचायतच्या कार्याचा आढावा घेत बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ग्रामीण भागात ग्राहकांच्या अडचणी, प्रवाशांच्या समस्या, तसेच सार्वजनिक हिताचे प्रश्न प्रभावीपणे हाताळण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत मुख्यतः खालील विषयांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळाली: ग्रामीण भागातील जनावरांची देखभाल व संवर्धन या हेतूने गोशाळा दत्तक उपक्रम राबवण्यास सर्वांनी संमती दर्शवली. या निर्णयामुळे केवळ जनावरांचे रक्षण होणार नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव देखील वृद्धिंगत होईल. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम व सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्थानिक पातळीवर रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडेवाढीच्या मुद्यावरून वाद निर्माण होतो. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व भाडे निश्चितीबाबत शासकीय यंत्रणेस निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना ग्राहक हक्क व प्रवासी अधिकारांची माहिती व्हावी, यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे मार्गदर्शक बॅनर तयार करण्यात येणार आहेत. हे बॅनर गावपातळीवर शासकीय व अशासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात येणार असून, यामुळे मार्गदर्शन आणि प्रचारप्रसारास मदत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्राहक अथवा प्रवासी म्हणून भेडसावत असलेल्या समस्यांचे निवारण लवकर व्हावे, यासाठी कार्यपद्धती सुलभ व पारदर्शक करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. या बैठकीस नानासाहेब कैलास महाजन (अशासकीय सदस्य), तालुका अध्यक्ष दादासाहेब राजेश गुजराथी, संघटक भाऊसाहेब अनिल बारी, तालुका सचिव अण्णासाहेब, भुपेंद्र गुजराथी, सचिव आप्पासाहेब, घन:शाम वैद्य, प्रबोधन मंत्री नानासाहेब भालचंद्र साळुंखे, ग्रामीण प्रबोधन मंत्री प्रा. दादासाहेब यशवंतराव बोरसे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. पृथ्वीराज सैंदाणे, सदस्य दादासाहेब मुकेश बडगुजर, ताईसाहेब सौ. इंदिरा सोनवणे, आक्कासाहेब सौ. पूजा पाटील आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी एकमताने सर्व ठरावांना अनुमोदन दिले. बैठकीचे वातावरण अत्यंत सकारात्मक, सौहार्दपूर्ण आणि कार्यक्षमतेने भरलेले होते. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या जाणून, ग्रामीण व निमशहरी भागातील जनतेच्या हितासाठी काय करता येईल याचा गांभीर्याने विचार मांडला. बैठकीच्या शेवटी अध्यक्ष प्रा. उदयकुमार अग्निहोत्री यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ग्राहक आणि प्रवासी यांच्या समस्यांवर केवळ चर्चा न करता कृती होणे गरजेचे आहे आणि हेच काम पुढील महिन्यांमध्ये वेगाने राबवले जाईल. संपूर्ण बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपस्थित सदस्यांनी केलेले मते, सूचना आणि निर्णय यामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि प्रवासी महासंघाची सामाजिक जाणीव अधोरेखित झाली. ग्रामीण भागातील लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला असून, विविध माध्यमांतून जनजागृती करण्याचे नियोजन यावेळी ठरवण्यात आले. यामधून स्पष्ट होते की, ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ हे संघटन केवळ बैठकीपुरते मर्यादित नसून, खऱ्या अर्थाने गाव, समाज आणि माणसाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. या बैठकीत घेतलेले निर्णय भविष्यात व्यापक परिणाम घडवतील, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

कौशल्य विकासाची पहाट… ITI म्हणजेच उज्ज्वल भवितव्यासाठीची पायाभरणी

Loading

पाचोरा / पुणे – इ. १० वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या मेहनती पालकांना हार्दिक शुभेच्छा! शालेय शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता पुढील वाटचालीसाठी निर्णय घेण्याची वेळ येते. काही विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाकडे असतो, तर काहीजण तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून लवकरात लवकर रोजगारक्षम बनण्याचे स्वप्न बघतात. या पार्श्वभूमीवर, तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रभावी, किफायतशीर आणि उपयुक्त असा पर्याय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI.
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध (पुणे) येथील शिल्प निदेशक (यंत्रकारागीर) @संतोष मंदाकिनी उत्तम गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ITI हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, प्रत्यक्ष जगण्याच्या लढाईत आत्मनिर्भर होण्यासाठीची एक दृढ तयारी आहे. समाजात अनेक अशा पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं कठीण जातं. अशा वेळी ITI हे तांत्रिक शिक्षणाचे दालन त्यांच्या मुलांसाठी स्वप्न साकार करणारे ठरते.                    ITI – कौशल्य आणि कारकिर्दीचा पूल     भारतातील औद्योगिक क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. याच गरजेतून ITI संस्था उभ्या राहिल्या. आज महाराष्ट्रातील व देशातील हजारो विद्यार्थी ITI कोर्स करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत, तर अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक म्हणून यश मिळवलं आहे. ITI मध्ये वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फिटर, प्लंबर, मशीनिस्ट, कारपेंटर, ड्रेस मेकिंग, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, COPA, वायरमन अशा विविध ट्रेड्स उपलब्ध असून, मुला-मुलींना समान संधी उपलब्ध आहे. एकदा का विद्यार्थ्यांनी या कोर्समधून कौशल्य संपादन केलं की ते थेट रोजगाराच्या रांगेत उभे राहतात.            कौशल्य हेच सामर्थ्य – आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा टप्प                                     ITI च्या प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांना हातातोंडाशी आलेले काम शिकवले जाते. हे काम केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहत नाही, तर प्रत्यक्ष मशिनरी, उपकरणे, प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून सखोल प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ शहाणे नव्हे, तर ‘कामाला योग्य’ बनतात. या कौशल्यांचा उपयोग करुन ते केवळ नोकरी मिळवतातच असं नाही, तर स्वतःचा गॅरेज, वर्कशॉप, इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग सेंटर, बुटीक, AC सर्व्हिसिंग सेंटर यासारख्या उद्योगाची सुरुवात देखील करतात.                             स्वप्नांना उंच भरारी – रोजगाराचे दरवाजे खुले    ITI कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेक सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये भरतीसाठी संधी उपलब्ध असतात. रेल्वे, संरक्षण विभाग, सार्वजनिक उपक्रम, MIDC, टाटा, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा, मारुती, बजाज, किर्लोस्कर, इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये ITI विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी निवडले जातात. Skill India, Make In India आणि Digital India यांसारख्या सरकारी योजनांच्या माध्यमातून ITI च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.                      शिक्षणाची खर्चिक बाजू – ITI मध्ये किफायतशीर उपाय                 महाविद्यालयीन शिक्षण हे अनेकदा मध्यमवर्गीय व ग्रामीण कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असते. कॉलेजचे फी, हॉस्टेल, पुस्तकांचा खर्च यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडतात. मात्र ITI चे कोर्स तुलनात्मकदृष्ट्या कमी कालावधीचे, किफायतशीर आणि रोजगारक्षम असल्याने हा पर्याय अधिक व्यवहार्य ठरतो. काही कोर्ससाठी सरकारी अनुदान मिळते, स्कॉलरशिप उपलब्ध असते, त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांचा कल ITI कडे वळतो.                                 व्यावसायिकता आणि नैतिक मूल्यांची शिकवण                              सर्वसाधारणपणे समज असतो की ITI म्हणजे केवळ हातात कौशल्य देणारे प्रशिक्षण. पण प्रत्यक्षात इथे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिस्त, वेळेचं नियोजन, सुरक्षा नियम, कार्यसंस्कृती, टीम वर्क, ग्राहक संवाद, नैतिकता या बाबींचंही प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे ते औद्योगिक वातावरणात सहज समरस होतात आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होतो.    सरकारचा भरगच्च पाठिंबा – योजना आणि उपक्रम                                             ITI साठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक उपक्रम चालवले जातात. National Apprenticeship Scheme, MSME सहाय्य, रोजगार मेळावे, स्टार्टअप प्रोत्साहन योजना, महिला प्रशिक्षण उपक्रम, इत्यादीद्वारे ITI शिकलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी वाढवून दिल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण व दूरवरच्या भागातील युवक-युवती देखील आता ‘कुशल भारत’ निर्माण करण्यासाठी पुढे येत आहेत.     उद्योगजगताशी थेट समन्वय                आजच्या औद्योगिक युगात कामाच्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी ITI संस्था विविध कंपन्यांशी समन्वय ठेवून त्यांच्यासोबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे विद्यार्थी उद्योगांना हवे तसे ‘industry-ready’ बनतात. अनेक कंपन्या थेट ITI मधून विद्यार्थ्यांची निवड करतात.                                             ITI चा टर्निंग पॉइंट – आत्मसन्मानाचा आधार     ITI शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लवकर आर्थिक स्थैर्य मिळते. त्यांचे कौटुंबिक जीवन सुकर होते, स्वतःच्या घरात त्यांचे मान वाढते. काही तर अल्पावधीतच व्यवसाय उभा करून इतर तरुणांनाही रोजगार देतात. अशा तरुणांचा समाजात आदराने उल्लेख होतो. ITI ही फक्त शिक्षण संस्था नाही, तर नवउद्योग, नवसंजीवनी, आणि नवक्रांतीचा केंद्रबिंदू ठरतो आहे.                                           आपणही घ्या पुढाकार – भविष्यासाठी सज्ज व्हा                                                आपण किंवा आपले नातेवाईक, मित्र, शेजारी यांचे मूल इ.१० वी उत्तीर्ण झाले असेल आणि त्याला तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवायचे असेल, तर ITI हे उत्तम दालन आहे. आजच आपल्या जवळच्या ITI संस्थेला भेट द्या, कोर्सेसची माहिती मिळवा, www.dvet.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश प्रक्रिया जाणून घ्या.   संपर्कासाठी: -संतोष मंदाकिनी उत्तम गुरव
शिल्प निदेशक – यंत्रकारागीर
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे
मो.: 7798106759                    “कौशल्य असेल तर संधी कमी नाही, आत्मविश्वास असेल तर यश दूर नाही!”
ITI हे भविष्याचे इंजिन आहे, जे तुमच्या आयुष्याला भरारी देईल.
चला, शिक्षणाकडून कौशल्याकडे, आणि कौशल्याकडून स्वावलंबनाकडे वाटचाल करूया!

ताज्या बातम्या

error: Content is protected !!