Home Blog Page 118
Breaking

आंबेवडगाव येथ महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार *माजी आमदार दिलीप भाऊ वाघ* यांच्याप्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री चक्रधर स्वामीमहाराज मंदिरात नगरसेविका सुचिता वाघ यांच्या हस्ते नारळ वाहण्यात आले, पुढे रॅलीची सुरुवात,या भागात प्रचार रँली ला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत होतो, त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच कुठल्याच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हाहन नगरसेविका सूचिता वाघ, तालुका महिला अध्यक्ष सरला पाटील,शहर अध्यक्ष जयश्री मिस्तरी, जयश्री वाघ, सरला पाटील,रंजना भोसले,रमीरमिला पाटील रुख्मा बाई महाजन पमाबाई बोरसे देवका आधार , आरती पाटील, कल्पना पाटील ,मनिषा बोरस, रजुबाई पाटील , शोभा महाजन, सिंधू मोरे ,व आंबेवडगाव येथील महिला, अभय पाटील ध्यानेश्वर पाटील प्रतिभा चौधरी , शितल पाटील ,जयश्री वाघ आदी उपस्थित होते गावात घरोघरी जाऊन प्रचार केला जात होता महिलांच्या समस्या यावेडी एकूण घेत महिला आघालीच्या पदाधिकारी यांनी भाऊंना निवडून द्या आम्ही तुमच्या समस्या सोडवतो असे आव्हान केले.

बोदर्डे गावात शिवसेनेला खिंडार अनेकांच्या राष्ट्रवादिमध्ये जाहिर प्रवेश

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत बोदर्डे गावातील शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून सेनेचे माजी पदाधिकारी सर्वश्री देविदास वसंत पाटील,विनोद अशोक पाटील,रावसाहेब खुशाल पाटील,समाधान भीमराव पाटील तसेच एकलव्य संघटनेचे सर्वश्री अध्यक्ष हेमराज संभाजी सोनवणे,ईश्वर सोनवणे,किसन सोनवणे,भाऊसाहेब सोनवणे,जगन सोनवणे,सुखा सोनवणे,सुनील सोनवणे,यशवंत सोनवणे, विनोद सोनवणे,नाना कोळी,दीपक कोळी,दादाभाऊ सोनवणे,सोनू सोनवणे,गोकुळ सोनवणे,सुनील सोनवणे,रवींद्र कोळी,रवींद्र मोरे,अनिल मोरे,आबा मोरे या पदाधिकाऱ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मा.भाऊंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाऊंना विजयी करण्याचा निर्धार केला.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा डांभुर्णी पिंपरी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार

0

पाचोरा – माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादीचे प्रकाश भोसले ए बी अहिरे सर जयसिंग कारभारी तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे सावखेडा येथे भैरवनाथ मंदिर नारळ वाहून प्रथम सुरुवात करण्यात आली ठिकाणी महिलांनी शिक्षण औक्षण केले गावात विकास नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त सिंचनाचे प्रश्न केली रस्ते मूलभूत सुविधा या भागात दिसून आले नाहीत म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात आमदार किशोर पाटील यांनी जनतेची व मतदारांची दिशाभूल केली यामुळे ग्रामस्थांमध्ये परिवर्तनाचा सुर दिसून आला दिलीप भाऊ आमदार होणारच या स्वरूपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी ठिकाणी दिल्या परिसर घोषणांनी दणाणून गेला होता प्रत्येक गावात दिलीप वाघ यांना प्रतिसाद मिळत होता गावातील लहान-मोठे आबालवृद्ध शेतकरी कष्टकरी मजूर यांनी दिलीप भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचा गावकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले

दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे पंचायत समिती सदस्य ललिता वाघ यांच्या नेतृत्वात प्रचाराचा झंजावात

0

पाचोरा – बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय कवाळे गट अधिकृत उमेदवार भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे पंचायत समिती सदस्य ललिता वाघ यांच्या नेतृत्वात या गटात सर्वाधिक ताधिक्‍य मिळवून देणार असल्याने गटातील सामनेर लासलगाव माहिजी नांद्रा परधाडे कुरंगी मोहाडी आसनखेडा राणीचे बांबरुड वडगाव खेडा या भागात गावागावात गल्लीबोळात घराघरात राष्ट्रवादीचा जोरदार सुरु प्रचार असून माजी आमदार यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य ललित वाघ पंचायत समिती माजी सभापती नितीन दादा तावरे यांनी कंबर कसली असून दिलीप भाऊंना या गटात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे या भागात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्याच कामे न झाल्याने मतदार नाराज आहेत शेती सिंचन उद्योग बेरोजगारी रस्ते या प्रमुख मूलभूत सुविधा सोडवण्यास आमदार किशोर पाटील अपयशी ठरले आहेत त्यामुळे या भागातील बहुतांश खेड्यात नाराजी दिसत आहे परिवर्तन अटळ असून दिलीप भाऊ आमदार होतीलच असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत व्यक्त करीत आहेत जि प सदस्य यांच्या निधीतून कुठल्याच विधायक काम या भागात न झाल्याने त्यांनी मते मागू नये असे गावकर यांनी व्यक्त केलेले मत सर्वत्र चर्चिले जात आहे
सामनेर येथील रवींद्र पाटील उपसरपंच अरुण पाटील सदस्य प्रवीण पाटील बाळकृष्‍ण पाटील दिनकर पाटील प्रशांत साळुंखे नांद्रा येथील
सुरेश कोळी गजानान पवार
बाबाजी पाटील सुनिल पाटील पप्पु सुर्यवंशी
प्रेमराज पाटील अमृड राणीचे आसनखेडा माहिजी नांद्रा हडसन पहान कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते

भडगांव येथे राष्ट्रवादीची, उत्स्पुर्त व उत्साहाच्या वातावरणात जाहीर सभा संपन्न

0

राष्ट्रवादीचे भडगांव तालुका कार्यध्यक्ष हर्षल दादा पाटील आपल्या मनोगताच्या अनोखी शैलित मतदारांची मने जिंकली

भडगाव – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पी आर पी ( कवाडे गट ) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील यशवंत नगर भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेचे अध्यक्ष जेष्ठ नेते मा.सुभाष आप्पा बोरसे तर प्रमुख वक्ते अल्पसंख्याक सेलचे पाचोरा शहराध्यक्ष मा. जहर भाई खान, तालुका कार्याध्यक्ष मा. हर्षल पाटील होते. वक्त्यांनी आपल्या मनोगतातून युती शासनाच्या फसव्या योजना,संपुर्ण सरसकट कर्जमाफी दिली नाही,वाढती बेरोजगारी,आर्थिक मंदी याचा व तसेच मतदारसंघाचे विद्यमान आमदारांनी तालुक्यात रस्त्यांची कामे केली नसून फक्त स्वतःचा विकास केला व त्यांच्या खोट्या विकासकामाचा भांडाफोड केला. त्याच प्रमाणे आपले आघाडी शासन आल्यास संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी ग्वाही देत मा.दिलीप भाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले, आपल्या मनोगनात राष्ट्रवादीचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष मा. हर्षल दादा म्हणाले युवकांना रोजगार नाही युवक वर्ग रोजगार नसल्यामूळे भरकटत आहे, जाती पातीचे राजकारण होत आहे ह्या सरकार सरकारच्या आठमुठी धोरणा मध्ये मतदाराचे जगणे असह्य झाले आहे दिवस भर राबणार्‍या माझ्या कष्टकरी शेतकरी शेतमजुर व हातमजुरी करणार्‍या मतदार बन्धुंचे, प्रचार करतांना पाठीवर हात ठेवता आणि पाठींबा राष्ट्रवादीला देत तोच आमच्या साठी मोठा आधार आहे, जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्र्वाश्र्वती आम्हाला आहे, सभेला सर्व समुदायाचे लोक व सर्व सामान्यांचा आतला आवाज परिवर्तना साठी न्याय देणारा आहे, भडगाव पाचोरा मतदार संघातील गावानां विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जनसेवेचा वारसा लाभलेल्या राष्ट्रवादीला मतदार संघात विकासाच्या ध्यास घेतला असुन असा प्रत्यय राष्ट्रवादी चे भडगांव कार्यध्यक्ष हर्षल दादा पाटील यांनी सभेच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले, सभेस शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले,नगर सेविका मा.योजनाताई पाटील,नगरसेवक भिकनूर पठाण,इसाक मलिक,डी डी पाटील सर,व्ही एस पाटील,बी वाय पाटील,अरुण मामा पवार,डॉ जे डी शेख,निमंन शेख, शक्ती भाऊ सोनवणे,शिवदास पाटील,गणेश पाटील,मुख्तार मिस्तरी,भगवानदादा पाटील,अनुप बोरसे,शशिभाऊ चंदिले,अतुल देसले,कुणाल पाटील,अनिल टेकडे,योगेश महाजन,विवेक पवार,मोहसीन भाई,संदीप मनोरे,आकाश कंखरे, रवींद्र पाटील,सागर पाटील,ज्ञानेश्वर पाटील,हेमंत पाटील,दस्तगिर भाई,राजुभाऊ पाटील,संजय पाटील,वीरेंद्र पाटील,विशाल पाटील,चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी,महिला व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅली उत्साहात संपन्न

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा तालुक्यातील खाजोळे, नेरी वडगाव. दिघी या भागात प्रचारसभा उत्साहात झाल्या, असून गावकऱ्यांनी परिवर्तनाची होणार असल्याचा संकल्प केला आहे या भागात आमदार किशोर पाटील यांनी कुठलेच काम न केल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे या भागातील रस्ते सिंचन समस्या शेतकरी प्रश्न आरोग्य दुर्लक्षित आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून उद्योगधंदे आहेत नोटा बंदी मुळे सर्व उद्योधंदे मंदीचे सावट असून याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे म्हणून तरुण शेतकरी व्यापारी बेरोजगार वर्ग हवालदिल झाला असून परिवर्तन अटळ आहे माजी आमदार दिलीप वाघ यांना या भागातून प्रचंड मताधिक्य येणार असून भाऊंचा विजय निश्चित मानला जात आहे यावेळी गावातील तरुण वर्ग शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात प्रचारित स्वतःहून सक्रीय होताना दिसले गावातील
राजेंद्र पाटील(माजी सभापती),गोकुळ पाटील सर,दिपक पाटील.ता.अध्यक्ष किसान सेल,रवींद्र केशव पाटील,प्रदीप तात्या(माजी सरपंच),कोगेस आयचे ता.सरचिटणीस प्रताप दादा पाटील,माजी ता.दिनकर पाटील वाल्मिक पवार,कैलास पाटील चेअरमन वि.का.सो,ओमप्रकाश पाटील,रामदास नेतकर भाऊसाहेब पाटील,शेख शकील,संजूदादा पवार,नामदेव अहिरे,(माजी.संचालक कु.बा. समिती)सुपडूदादा मिस्टरी,देवदास पाटील,अनिलदादा पाटील
भोला पाटील,महेंद्र पाटील,दत्तूआबा,जयदेव पाटील,नानाभाऊ पाटील,दिलीप पाटील खाजोळे,राजुभाऊ अहिरे,बापू पाटील,सचिन पाटील,राकेश पाटील सर तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य ,विकास सो.संचालक, व तरुण कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक व नगरदेवळा बाळद गटातील कार्यकते यांनी मोठ्या प्रमाणात भाऊंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला व उपस्थित होते.

मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे ठिकठिकाणी कॉर्नर मिटिंगला मतदारांचा मोठा प्रतिसाद

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस (आय) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ नानासो संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाकशेन नगर पाचोरा येथे कॉर्नर मिटिंगमध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक बशीर दादा वासु भाऊ माहाजन अशोक मोरे भालचंलद्र ब्राह्मणे रणजीत पाटील रामा तांबे प्रकाश बनसोडे आनंद नगैरे युवराज खेडकर भाऊराव पवार लखन वाघ आकाश खैरनार व कार्यकर्ते समस्त नागरीक उपस्थित होते.

मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आज भडगाव येथील जाहीर सभेला उस्फुर्त प्रतिसाद

0

भडगाव – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आज भडगाव शहरात वरची पेठ भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेचे अध्यक्ष जेष्ठ नागरीक मा.हेमराज नाना पाटील तर प्रमुख वक्ते विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.नितीन दादा तावडे,नगरसेवक मा.विकास पाटील सर, तालुका प्रवक्ते मा.भूषण पाटील होते.

वक्त्यांनी आपल्या मनोगतातून होणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्यासाठी स्वाभिमानाची निवडणूक असून महाराष्ट्राचे जाणते राजे मा.शरद्चंद्रजी पवार साहेबांनी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.तसेच बेरोजगारी,कर्जमाफी या मुद्द्यावर युती शासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले त्याचप्रमाणे मतदारसंघाचे विद्यमान आमदारांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पालिकेच्या माध्यमातून झालेली कामे देखील आपल्या निधीतून झाली आहेत अशी खोटी बतावणी करतात.त्यांनी कुठलंही ठोस काम या मतदारसंघात केले नाही.भडगाव शहरातील मटण मार्केट ते खालची पेठ यांना जोडणारा पुलाचे आश्वासन हवेतच वीरले.भडगाव शहराला ज्या कच्च्या बंधाऱ्यामुळे पाणीपुरवठा होतो त्या बंधा ऱ्याचे पक्क्या बंधाऱ्यात देखील रूपांतर आमदारांकडून झाले नाही.वाघ कुटुंबीय गेल्या 55 वर्षांपासून जनसेवचे कार्य अविरतपणे करत असून प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात म्हणूनच मा.दिलीप भाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख,सुभाष दगा पाटील, भिकनूर पठाण,इसाक मलिक,डी डी पाटील सर,मोतीलाल नरवाडे,एस ए जाधव,ऍड.बाग,संजय पाटील,शंकर पाटील,बापु काळे,लोटन आप्पा पाटील,निमन शेख,अतुल देसले,कुणाल पाटील,अनिल टेकडे,योगेश महाजन,विवेक पवार,मोहसीन भाई,संदीप मनोरे,आकाश कंखरे, रवींद्र पाटील,सागर पाटील,ज्ञानेश्वर पाटील,हेमंत पाटील,दस्तगिर भाई,राजुभाऊ पाटील,संजय पाटील,वीरेंद्र पाटील,विशाल पाटील,चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी,महिला व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

0

पाचोरा – येथील कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँगेसचे माजी शहरअध्यक्ष तथा बल्लाळेश्वर फाउंडेशनचे संचालक अध्यक्ष्य हरिभाऊ पाटील व दिलीप धनराज मिस्तरी, भैय्या हटकर, पवन चौधरी, विकास पाटील, योगेश पाटील, भिकन शिंदे , शामभाऊ शिंदे यांचे सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार दिलीप वाघ हे आपल्या संस्थेतील लिमिटेड कर्मचारी यांना सोबत घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करतात तसेच मा.आ.दिलीप वाघ यांनी केसाने गळा कापला याचा राग येऊन त्यांनी शिवसेना पक्षात त्यांच्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. आमदार किशोर आप्पा पाटील हे सर्वांना घेऊन चालणारे रस्त्यावरचे सर्वसमावेश नेतृत्व असून त्यांनाच पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी प्रवेशानंतर केले आहे.

नांद्रा येथे घर कोसळुन एक महिला व एक बालकाचा दुर्दैवी मृत्यू

0

नांद्रा – येथे दि.4 रोजी राञी 11.वा. कै.नामदेव धना पाटिल यांच्या कुटूबांवर काल काळाने अनपेक्षित घाला घालून ते राहत असलेल्या नवेगावातील भाडेच्या मातीच्या घरात पावसाच्या सततधार रिपरिप मुळे पाणी मुरून घराचे छत व घर कोसळल्याने त्याच्या खाली दबून त्यांच्या पत्नी शोभाबाई नामदेव पाटिल वय ५० वर्षे व त्यांचा नुकतीच डिलेवरी झालेल्या मुलीचा अवघ्या सव्वा वर्षाचा मुलगा समर्थ संदिप पाटील (रा.लोण)यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व बाकीचे कुटुंबातील तिन सदस्य एक मुलगा व दोन मुली यांना गावातील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या सर्तरकतेमुळे कुटूबांतील उर्वरीत सदस्याना वाचवण्यात यश आले ते किरकोळ जखमी झाले आहेत परंतु अकल्पित आलेल्या या संकटामुळे मातृपितृ छत हरवलेल्या या मुलांना पुढिल आयुष्य कसे जाईल याविषयी हळहळ व्यक्त आहे. कुटूंबातील कर्ता पुरूष नामदेव पाटील गेल्यानंतर त्यांच्या पत्नी घरातील आधारवड म्हणून शोभाबाई नामदेव पाटिल प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत आपल्या कुटूबांचा गाढा ओढत असताना त्यांचा कुटूबाःवर हा अनपेक्षित कोसळलेल्या दुःखाचा डोंगर मुळे आता दृष्टीने अधु असलेला १३ वर्षाचा एक मुलगा,एक १० वर्षाची मुलगी माञ त्यांचे मातृपितृ छत हरपल्याने रस्त्यावर आले आहेत तरी शासन स्तरावरुन झालेल्या जान माल ची पंचनामा करुन योग्य भरपाई या कुटूबांला मिळावी व समाजातील ही दानशुर व्यक्तीनी या मुलांच्या शिक्षणाच्या व संगोपन खर्चासाठी पुढे यावे अशी चर्चा सुज्ञ व संवेदनाशील लोकांना मधून होत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!