प्रभूच्या भरवश्यावर पाचोऱ्यात जिलेटिनचा गैरवापर; स्फोटकांच्या अनधिकृत वापरावर गंभीर चिंता

0

पाचोरा – शहर व परिसरात प्रभूच्या आशिर्वादाने आणि भरवश्यावर आपण अनेक संकटांवर मात करतो, परंतु समाजातील काही घटक या भरवश्याचा गैरवापर करत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. जिलेटिन कांड्यांचा वापर बांधकाम, खाणकाम यांसाठी होतो, पण त्याच कांड्यांचा वापर मासेमारीसाठी अनधिकृतपणे होत असल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जारगाव

चौफुलीवर घडलेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांच्या घटनांमुळे या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले. सुदैवाने या स्फोटांमध्ये कोणतीही मानवहानी झाली नव्हती परंतु कुत्रा आणि डुक्कर यांच्या शरीराचे अक्षरशः चिथडे उडाले होते
जारगाव चौफुलीवर जिलेटिन कांड्यांचा स्फोटांमुळे परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले होते.प्रभूच्या कृपेने या स्फोटांमध्ये मानवी जीवितहानी झाली नाही, मात्र प्राण्यांच्या मृत्यूने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावेळी स्थानिकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची

मागणी केली होती त्याचे काय झाले तो प्रश्न अद्यापही गुरदस्त्यात आहे
   स्फोटक पदार्थांसाठी कडक परवाना प्रणाली असूनही जिलेटिन कांड्यांचा तालुक्यात व तालुक्या बाहेर अनधिकृत साठा मोठ्या प्रमाणावर आहे.अनेक वेळा या कांड्या परप्रांतीयांच्या हाती पोहोचतात, ज्यामुळे त्यांचा गैरवापर अनधिकृत मासेमारीसाठी केला

जातो. प्रभूच्या भरवश्यावर अंकुशल ‘कामगारां कडून हाताळणी सुरू असलेल्या या प्रकारच्या  चुकीच्या कृत्यांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे
कारण जिलेटिन कांड्यांच्या वापराबाबत ठिकठिकाणी असलेले गोडावुन गोडाऊनमधील साठा अधिकृत आहे का ? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदरच्या गोडावुनची पुर्तता आहे का ?  याची तपासणी तातडीने

होणे गरजेचे आहे.
या संदर्भात जिलेटिन स्फोटक कांड्यांच्या अधिकृत परवाना, नियम आणि गोडाऊनसंबंधी सुरक्षा नियम व अटी शासनाने निश्चित केलेल्या आहेत प्राप्त प्राथमिक माहीती नुसार यात
जिलेटिन स्फोटक कांड्यांचा वापर, साठवणूक, वाहतूक, आणि विक्री यासाठी कडक कायदे आणि नियम आहेत. हे नियम मुख्यतः केंद्र सरकारच्या “Explosives Rules, 2008” अंतर्गत येतात. तसेच, राज्य पातळीवरदेखील

स्थानिक प्रशासन अतिरिक्त अटी लागू करू शकते. खाली अधिकृत परवाना, त्याचे नियम, आणि गोडाऊनसंबंधी सुरक्षा अटी दिल्या आहेत.
  जिलेटिन स्फोटकांच्या वापरासाठी परवाना मिळवण्यासाठीच्या अटी:
1) परवाना देणारी प्राधिकरणे: केंद्रीय स्फोटक नियंत्रण संस्था (Chief Controller of Explosives, Petroleum and Explosives Safety Organization – PESO).
जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसह स्थानिक प्राधिकरण.
सदरचा परवाना प्राप्त करतांना अर्जासोबत पुढील  कागदपत्रे आवश्यक आहेत
१)अर्जदाराचे नाव, व्यवसाय, आणि पत्ता.
२)स्फोटकांचा वापर (उदा. खाणकाम, बांधकाम, पायाभूत सुविधा).
३)जागेची मालकीची किंवा भाडेकराराची कागदपत्रे.
४)सुरक्षा व्यवस्थेचे प्रमाणपत्र (सुरक्षा साधनांची यादी).
५)स्थानिक पोलीस आणि जिल्हाधिकारी यांची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC).
यासाठी पुढील अटी व शर्ती पाळणे बंधन कारक आहे
फक्त परवानाधारकांनी अधिकृत हेतूसाठी स्फोटकांचा वापर करावा.
परवाना विशिष्ट कालावधीसाठी

वैध असतो आणि नूतनीकरण गरजेचे आहे.
परवान्याशिवाय स्फोटके विकणे किंवा खरेदी करणे दंडनीय अपराध आहे.
विशेषतः स्फोटक कांड्यांच्या साठवणुकीसाठी गोडाऊनसंबंधी नियम आणि सुरक्षा अटी निश्चित करण्यात आल्या आहेत
२) गोडाऊनची स्थानिकता आणि बांधकाम:
३)गोडाऊन रहिवासी भागापासून आणि ज्वलनशील पदार्थांपासून किमान 300 मीटर अंतरावर असावा.
तर स्फोटके साठवण्यासाठी विशिष्ट बांधकाम मानके लागू होतात (उदा. जाड भिंती, संरक्षक छप्पर).
गोडाऊनचे

दरवाजे लोखंडी, मजबूत, आणि लॉकने संरक्षित असावेत.
४)गोडाऊनमध्ये विद्युत सर्किटिंग प्रमाणित आणि सुरक्षित असावे.
आग प्रतिबंधक उपकरणे (उदा. फायर एक्स्टिंग्विशर) गोडाऊनमध्ये नेहमी उपलब्ध असावीत.
कोणत्याही प्रकारचा उघडा ज्योत किंवा धूर गोडाऊनच्या परिसरात परवानगी नाही.
५) स्फोटकांचा साठा परवानगी देण्यात आलेल्या मर्यादेतच ठेवणे अनिवार्य आहे.
स्फोटक पॅकेजेस सुरक्षित आणि प्रमाणित स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे.
६)जुने किंवा कालबाह्य स्फोटक नष्ट करण्यासाठी अधिकृत प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.
७)  प्रवेशद्वार नेहमी बंद ठेवले पाहिजे आणि अधिकृत व्यक्तीला प्रवेश देण्यात यावा. स्फोटकांच्या साठ्याची रोजची नोंद (Register of Explosives) ठेवणे आवश्यक आहे. महत्वाची आणि लक्षवेधी बाब म्हणजे
वाहतूक व वितरणाचे नियम महत्वपूर्ण निश्चित करण्यात आले आहेत
१) स्फोटक वाहतुकीसाठी स्वतंत्र परवाना आवश्यक आहे.
२) स्फोटके नेणारे वाहन स्फोटकांच्या वाहतुकीसाठी डिझाइन केलेले असावे.
३)वाहतुकीदरम्यान वाहनावर “Danger – Explosives” असा स्पष्ट इशारा असावा.
४)वाहनात योग्य प्रकारे जिलेटिन पॅकेजेस ठेवण्यात यावीत, जिथे हलण्याचा धोका नसेल.
५) फक्त अधिकृत मार्गांवर वाहतूक करावी; घनदाट रहिवासी भाग टाळावा.
जिलेटिनचा वापर खाणकाम, रस्ते आणि पूल बांधणी, बोगदे खोदणे, इत्यादींसाठी होतो. परंतु, अशा अधिकृत वापरासाठी स्फोटक सुरक्षा कायद्यांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे
     जर याबाबत व नियमांचे उल्लघन होत असेल तर नागरिकांनी अनधिकृत साठ्याची माहिती स्थानिक पोलीस किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देणे क्रमप्राप्त आहे
परंतु वरील प्रमाणे नियम पाचोरा शहर , तालुक्यात व सलंग्न परिसरात पाळले जात नाही एका क्रमांकाच्या अनेक ट्रॅक्टरची परप्रांतीयांची आहेत यामागचे रहस्य उघड करण्याची गरज आहे. प्रशासनाने अशा गुप्त कारवायांचा मागोवा घेत जनतेला दिलासा द्यावा
यासाठी  जिल्ह्यातील सर्व गोडाऊनमध्ये जिलेटिनच्या साठ्याची तपासणी होणे अत्यावश्यक आहे नव्हेतर
गुप्तचर विभाग सक्रिय करणे महत्त्वाचे आहे परप्रांतीय मजुरांच्या हालचालींवर नजर ठेवून अनधिकृत वापर रोखणे आणि  मासेमारीसाठी जिलेटिन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे पाचोऱ्यात प्रभूच्या कृपेने घडलेल्या या घटनांमध्ये मानवहानी टळली असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटनांनी मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिलेटिन कांड्यांच्या अनधिकृत साठ्यावर कारवाई करत दोषींना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.
जिलेटिनचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. दोषींवर कारवाई झाली तरच नागरिकांना प्रशासनावर विश्वास बसेल यासाठी प्रभूंच्या कृपेने नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेनेच हा गंभीर प्रश्न सोडवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here