2025 हे वर्ष इतिहासात एक अत्यंत निर्णायक वळण ठरले. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. इतिहासातील 1947, 1965, 1971, 1999 नंतरचा हा 2025 मधील संघर्ष चारच दिवस चालला, परंतु त्यात दोन्ही देशांनी अनेक गोष्टी गमावल्या आणि काही गोष्टी मिळवल्या. या लेखात आपण सत्यावर आधारित तटस्थ व विश्लेषणात्मक पद्धतीने या युद्धाच्या पार्श्वभूमीपासून ते परिणामांपर्यंतचा सर्वंकष आढावा घेणार आहोत.
युद्धाची पार्श्वभूमी : चिघळलेली सीमारेषा आणि पुन्हा पेटलेला बारुद
2025 च्या एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला हा या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. हे हल्लेखोर पाकिस्तानमधून प्रशिक्षित व समर्थित असल्याचे पुरावे भारत सरकारकडे होते. यावर भारत सरकारने शांतता मार्ग सोडून थेट कारवाईचा निर्णय घेतला.
“ऑपरेशन सिंदूर” हे या कारवाईचे गुप्त नाव होते. या अभियानात भारताने पाकिस्तानातील 14 हवाई व दहशतवादी केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध होते आणि यात नागरी लोकसंख्या कमी त्रस्त होईल याची काळजी घेण्यात आली होती.
भारताने काय मिळवलं? – 1) दहशतवाद्यांना निर्णायक धक्का
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील पीओके, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले हे केवळ सैनिकी विजय नव्हते, तर ते भारताच्या नवीन युद्धनीतीचे प्रातिनिधिक स्वरूप होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन यांचे गुप्त केंद्र उद्ध्वस्त झाले. 2)ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर अधोरेखित
या अभियानात भारताने “स्टेथ” ड्रोन्स, लॉन्ग-रेंज ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आणि राफेल लढाऊ विमानांचा प्रभावी वापर केला. अमेरिकेतील संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांनी या हल्ल्यांनंतर म्हटले, “भारताने युद्धाचे नवे परिमाण तयार केले आहे. हे सैनिकी डावपेच नव्हते, ही होती राजनैतिक इशाऱ्यांची पक्की व्यूहरचना.” 3)जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा आणि दबदबा
भारताच्या या कारवाईमुळे जगभरात भारताच्या लष्करी व रणनीतिक क्षमतेची दखल घेतली गेली. विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, फ्रान्स, रशिया यांनी भारताच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला मान्यता दिली. चीनच्या जाणीवपूर्वक मौनामुळे चीन-पाकिस्तान संबंधांवरही आंतरराष्ट्रीय संशयाची सावली पडली. 4) “चले तो चांद तक नही तो रात तक” या खेळण्याप्रमाणे चिनी शस्त्रास्त्रांची उघड झालेली मर्यादा
पाकिस्तानने या युद्धात चीनकडून मिळवलेली J-10C लढाऊ विमाने, HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली आणि अन्य यंत्रणा वापरल्या, परंतु त्यांचा उपयोग भारतीय हल्ल्यांपासून बचाव करण्यात कमी पडला. यामुळे चीनच्या शस्त्र निर्यातीवर प्रश्न उपस्थित झाले आणि भारताचे स्वदेशी संरक्षण उत्पादन धोरण अधिक मजबूत वाटू लागले.
भारताचे नुकसान – 1)सैनिक व नागरी प्राणहानी जरी सैनिकी विजय मिळवला, तरी भारताने या युद्धात 5 जवान आणि किमान 21 नागरिक गमावले. जम्मू, पूंछ, कुपवाडा आणि राजौरी या भागांमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ही हानी झाली. 2) काही लढाऊ विमानांची हानी
पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताचे एक राफेल विमान आणि एक सुखोई-30 पाडल्याचा दावा केला. हे अद्याप संपूर्णपणे सिद्ध नाही, परंतु भारतानेही संबंधित वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. 3) राजनैतिक दबाव व युद्धविरामाची घाई
अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दबावामुळे भारताला 10 मे रोजी युद्धविराम स्वीकारावा लागला. अनेक संरक्षण विश्लेषकांच्या मते, जर भारताने आणखी 2 दिवस मोहीम चालू ठेवली असती, तर पाकिस्तानची संरचना अधिक उद्ध्वस्त झाली असती. 4)काश्मीरमधील अस्थिरता व मानवी हानी
युद्धामुळे काश्मीरमध्ये लोकांचे जगणे अधिक कठीण झाले. दहशतवादी व लष्करी चकमकी, कर्फ्यू, तुटलेली पूर्ती व्यवस्था आणि संचारबंदी यामुळे नागरिकांचे हाल झाले. मानवी अधिकार संस्थांनी याची नोंद घेतली.
पाकिस्तानने काय गमावले? 5)हवाई तळांचे मोठे नुकसान
भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सियालकोट, मियांवाली, स्कर्दू, बहावलपूर, मुलतान, चकवाला या हवाई तळांवर रनवे, हँगर, अचूक क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे पाकिस्तानची हवाई ताकद खिळखिळी झाली. 6) दहशतवादी ढाच्यांचा खात्मा
ज्या संघटनांच्या बळावर पाकिस्तान भारतावर दबाव टाकत होता, त्या संघटनांचे गुप्तालयच उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानचा ‘प्रॉक्सी वॉर’चा आधारच गेला. विशेषतः बलुचिस्तानात झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत असंतोषात वाढ झाली. 7) चिनी तंत्रज्ञानावर अवलंबनाचे दु:खद प्रत्यंतर
चीनकडून मिळालेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची युद्धातील कमी कामगिरी ही पाकिस्तानसाठी मोठा धक्का होती. भारताच्या तंत्रज्ञानाने पाकिस्तानला धडा शिकवला की, उधारची ताकद तात्पुरतीच असते. 8) आर्थिक हानी -सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चार दिवसांच्या युद्धामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 16-18 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. स्थानिक चलन घसरले, शेअर बाजार कोसळले, आणि तेल-गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला. देशांतर्गत आर्थिक अस्थिरतेचे वारे निर्माण झाले.
पाकिस्तानने काय मिळवलं? 9) अण्वस्त्र धोरणाची पुन्हा मांडणी
पाकिस्तानने यावेळी अण्वस्त्रांची अप्रत्यक्ष धमकी दिली होती, ज्यामुळे जागतिक स्तरावर युद्ध थांबवण्याची प्रक्रिया गतीने सुरु झाली. पाकिस्तानच्या या मनोवैज्ञानिक रणनीतीने त्याला युद्धात पूर्णपणे नामोहरम होण्यापासून वाचवले. 9)जागतिक सहानुभूती-
भारताने केलेल्या प्री-एंप्टिव स्ट्राईक्समुळे पाकिस्तानने स्वतःला पीडित म्हणून सादर केले आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या हल्ल्यांची ‘अन्यायकारक’ म्हणून निंदा केली. अनेक इस्लामिक देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली.
युद्धविराम व सामूहिक परिणाम
10 मे 2025 रोजी अमेरिका, सौदी अरेबिया आणि रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. मात्र, युद्धविरामाच्या तासाभरातच दोन्ही देशांनी एकमेकांवर उल्लंघनाचे आरोप केले. 10) पाणी युद्धाचा प्रारंभ -भारताने इंडस जल करार पुन्हा एकदा तपासण्याचे ठरवले. युद्धाच्या दरम्यान झेलम, चिनाब, सिंध या नद्यांवरील पाण्याच्या प्रवाहाला तात्पुरते थांबवण्यात आले. & सोडले यामुळे पाकिस्तानात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, तसेच पिण्याच्या पाण्याचा टंचाईही जाणवली. मानवी हानी व विस्थापन –
काश्मीरमधील सीमावर्ती गावांमधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. रुग्णालये भरली, शाळा बंद राहिल्या आणि जनजीवन ठप्प झाले.
विजय कोणाचा? हानी कुणाची?
या युद्धात सैनिकी दृष्टिकोनातून भारत विजयी ठरला. पाकिस्तानचे संरक्षण व्यवस्थेचे सत्त्वच हादरले. परंतु मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही देशांनी आपापल्या जवानांचे, नागरिकांचे प्राण गमावले, अर्थव्यवस्था कोलमडली, आणि शेजारी देशांतील अस्थिरतेत वाढ झाली.
सैनिक जिंकले, सरकारांनी श्रेय घेतले, परंतु काश्मीरमधील आईने आपले मूल गमावले.
ही केवळ रणधुमाळी नव्हती, ही होती दोन अण्वस्त्रधारी देशांमधील शीतयुद्धातील गरम टप्पा. भारताने “ऑपरेशन सिंदूर” द्वारे सैनिकी ताकद सिद्ध केली.
युद्ध संपले, पण अनेक प्रश्न उभे राहिले – शांतीची किंमत किती? युद्धाचा खरा शत्रू कोण? आणि आपण आता कुठे जात आहोत?
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.