Home Blog Page 132

पथनाट्य कार्यशाळेद्वारे समाज जागृतीचा संदेश

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विभागाने प्रा. जगदीश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पथनाट्य कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींचा पथनाट्य हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. प्रत्येक विद्यार्थिनींना सहभागी करून प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्य कार्यशाळा घेतली.

प्रा. जगदीश संसारे म्हणाले, “पथनाट्य हे केवळ नाटक नाही तर ती एक चळवळ आहे, समाजाला जागे करण्याचे काम पथनाट्य चळवळ करित असते. आपल्या आवाजाच्या जोरावर, मिळेल त्या जागी, प्रचंड ऊर्जा निर्माण करून रस्त्यावर आपल्याच विचारात गुंग असणाऱ्या माणसांना जागे करते ते फक्त पथनाट्य.”

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यशाळेत प्रा. संसारे यांनी मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे, त्यावर आपले विचार मांडले. “केवळ आणि केवळ मराठीचाच अट्टाहास असावा. भाषेवर प्रेम करा, भक्ती असली तरी सक्तीची गरज नाही,” असे ते म्हणाले.

सदर कार्यशाळेत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमात असलेल्या पथनाट्यांतील दोन पथनाटये सादर करून दाखविली. त्यासंदर्भात प्रा. जगदीश संसारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी माधवी पवार हिने ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमुची’ या गीताने कार्यशाळेची सुरूवात केली. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार सेल्फ फायनॅन्सचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांच्या ओघवत्या शैलीत झाली.

*’म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर प्रा. नेहा भोसले यांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद*

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नेहा भोसले होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. व्याख्यानात प्रा. नेहा भोसले यांनी विद्यार्थिनींना म्हणींचे महत्त्व आणि त्यांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करावा हे सांगितले. त्या म्हणाल्या, “लोकजीवनातून आविष्कृत झालेल्या म्हणी भाषा अधिक समृद्ध बनवितात.”

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यात अनेक सुंदर म्हणींचा समावेश आहे, अशा विचारांचे विवेचन त्यांनी केले. तसेच, बोलीभाषेतील म्हणींचा अभ्यास आणि संकलन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमास प्रा. किरण जाधव, डॉ. रेखा शेलार, ग्रंथालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाशी सकारात्मक चर्चा – उमेश येवले

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची भेट उमेश येवले, जनरल सेक्रेटरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई, शिवडी तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष इसरार खान, शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र कदम आणि माजी वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र खानविलकर यांनी घेतली. या भेटीचा मुख्य उद्देश म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील उद्यान व मैदानांबाबत निवेदन देणे.

सदर भेटीदरम्यान, एक सकारात्मक चर्चा घडली, ज्यात महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गानेही सहभाग घेतला. निवेदनात दिलेल्या सर्व सूचना सहाय्यक आयुक्तांनी गांभीर्याने समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश दिले.

सदर चर्चेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांनी मुंबईतील उद्यान आणि मैदानांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

सदर सकारात्मक भेट आणि चर्चा निश्चितच नागरिकांसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास उमेश येवले यांनी व्यक्त केला.

विजय भोई यांचा पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार: एक क्रांतिकारी उपक्रम

0

Loading

पाचोरा: आजच्या काळात, पर्यावरण रक्षणासाठी विविध पद्धती स्वीकारल्या जात आहेत. त्याचाच एक सुंदर भाग म्हणजे “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा, विजय भोई पाचोरा” यांच्याकडून सुरू करण्यात आलेला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा उपक्रम. देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करून पारंपरिक धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्काराची ही पद्धत राबवली जाते.
पर्यावरण पूरकता आणि परंपरेचा संगम:
परंपरेला सन्मान देत पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग करणे, ही काळाची गरज ओळखून या संस्थेने पुढाकार घेतला आहे. गोवऱ्या, कापूर, आणि देशी गायीचे तूप यांच्या वापरामुळे अंत्यसंस्कार प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचविण्याऐवजी त्याचे रक्षण करते.
धार्मिक विधींसाठी विशेषत्व:-
धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी या संस्थेने खास गोवऱ्या आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामुळे लोकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता येतात. शिवाय, गोमातांच्या संरक्षणासाठीही या उपक्रमातून मदत केली जाते.
गायींच्या संवर्धनाला चालना:-
या उपक्रमामुळे गोशाळांना आर्थिक सहाय्य मिळते. गायींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी:-
या प्रक्रियेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, प्लास्टिक किंवा इतर प्रदूषक घटकांचा वापर होत नाही, आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो.
समाजात जागरूकता निर्माण:-
विजय भोई संचलित “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा” ही संस्था लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करत आहे. धार्मिकता, परंपरा आणि आधुनिक गरजा यांचा समतोल साधत, ही संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करत आहे.
संपर्क माहिती:-
या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा:विजय भोई: 9766836299, 9975444232
विजय भोई यांच्या “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा, पाचोरा” यांनी सुरू केलेला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा उपक्रम केवळ धार्मिक विधींनाच सन्मान देत नाही तर पर्यावरण संवर्धनातही मोलाची भर घालतो. हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल असून भविष्यात अधिकाधिक लोकांनी याचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा विजय भोई यांनी याप्रसंगी माहिती देताना व्यक्त केली

9 फेब्रूवारी रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ‘शाहिरी बाणा’ कार्यक्रम ( पहा बातमी मध्ये VDO ची एक झलक )

0

Loading

पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने, संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता “शाहिरी बाणा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. संस्थेच्या

विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. द. मो. परांजपे
कै. बाबूभाई रावल
कै. सुपडूअण्णा पाटील
कै. के. एम. बापू पाटील
कै. आप्पासाहेब ओंकार वाघ
कै. दादासाहेब आर. एस. थेपडे
कै. भाईसो वाय. बी. शर्मा
कै. अण्णासाहेब एस. आर. देशमुख या सर्व मान्यवरांनी संस्थेच्या उभारणीत आणि विकासात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात पुणे येथील युवा शाहीर चंद्रकांत माने आणि युवा शाहिरी ऋतुजा माने व त्यांच्या सहकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “शाहिरी बाणा” हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शिवरायांच्या पराक्रमांची गाथा, त्यांचे शौर्य, आणि राज्यकारभारातील त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली जाईल.
“शाहिरी बाणा” हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. शाहिरी ही महाराष्ट्राची एक पारंपारिक लोककला असून, तिच्या माध्यमातून समाजप्रबोधन, इतिहासाची जाणीव, आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन केले जाते. या कार्यक्रमात पोवाडे, लावणी, भारूड यांसारख्या विविध लोककला सादर केल्या जातात. शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने हे या क्षेत्रातील युवा कलाकार असून, त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ उपस्थित राहणार आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲडव्होकेट दादासाहेब महेश देशमुख, वाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, त्यामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्ये अंतर्भूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शाहिरी सादरीकरणामुळे उपस्थितांना त्यांच्या पराक्रमांची आणि कार्याची सखोल माहिती मिळेल. तसेच, दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याची ही एक संधी आहे.
पाचोरा तालुका आणि परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीपभाऊ वाघ चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲडव्होकेट दादासाहेब महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी संस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य वार्षिक स्नेहसंमेलन

0

Loading

पाचोरा: जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा येत्या ८ फेब्रुवारी २०२५ रोजी, शनिवार, सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला, प्रतिभा आणि सृजनशीलतेला वाव देणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता अधिकच वाढणार आहे.
     या स्नेहसंमेलनात मा. खासदार स्मिताताई वाघ, आमदार मा. किशोरआप्पा पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. मधुकरभाऊ काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
     संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी आणि स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
       या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्य, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य, तसेच “मोबाईल: शाप की वरदान?” या विषयावर प्रभावी नाटिका सादर करण्याचे नियोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाट्य, नृत्य, संवाद कौशल्ये आणि सृजनशीलता विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये सौ. निर्मला पाटील, सौ. प्रतिभा मोरे, सौ. रूपाली जाधव, सौ. प्रीती शर्मा, सौ. शीतल तिवारी, सौ. योगिता शेंडे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग आहे.
      शाळेच्या वतीने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कामगार नेते आमदार सचिन अहिर यांच्याद्वारेही केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :५ फेब्रुवारी रोजी इंटकच्या नेतृत्वाखालील मुंबईसह राज्यातील कारखान्यांमधील कामगारांनी कामाचा हक्क बजावताना काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध केला आणि या वर्षातील आंदोलनाची‌ पहिली पायरी यशस्वी केली आहे. या आंदोलनाचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन‌ अहिर यांनी स्वागत करुन, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जोरदार निषेध केला आहे.                                    .     महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी इंटक नेतृत्वाखालील कारखान्यामधील कामगारांना या निषेध आंदोलनाचे आवाहन केलेहोते.                                                 ६ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकार विरुद्ध लढा देण्याचा दिल्ली मधील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी इंटक नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सर्व इंटक प्रणित कारखान्यामधील कामगारांनी‌ काळ्या फिती लावून आंदोलन छेडले.                       मुंबईतील टाटा, पोद्दार, इंदू क्र.५ आणि दिग्विजय या एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या गेटवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगारांच्या सभा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध करण्यात ‌आला. या निषेध सभेत खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर आदींची भाषणे झाली. भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर येताच कामगारांच्या खच्चीकरणाचे उचललेले पाऊल गेल्या १२ वर्षात मागे घेतलेले नाही. या विरूध्द सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापन केली आणि ही समिती गेली १२ वर्षे केंद्राच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध लढत आहे.त्याप्रमाणे ६ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा केंद्र सरकार विरुद्ध लढा देण्याचा दिल्ली मधील कृती समितीच्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी इंटक नेतृत्वाखालील कारखान्यांमधील कामगारांनी कामाचा हक्क बजावताना काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला.केंद्र सरकारने भारतीय रेल्वे, संरक्षण, कोळसा खाणी, पोलाद, बंदरे, विमानतळ, रस्ते, वीज, दूरसंचार, बँका इत्यादी सार्वजनिक उद्योगात खाजगीकरण अवलंबून सार्वजनिक उद्योगाच्या तत्वालाच मूठमाती देऊन, कामगारांना रस्त्यावर आणले. जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याचे तयारी केंद्र सरकारने अद्याप तरी दाखविलेली नाही, तसेच दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने कोरोना काळातील लॉकडाऊनची संधी साधून, लोकसभेतील पाशवी सदस्य संख्येच्या (खासदारांच्या) बळावर २९ कायदे मोडीत काढून ४ कामगार संहितेत रुपांतर केले. केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून “फोर कोड बिल” संमत करून कामगारांचे खच्चीकरण केले आहे, तसेच कामगार संघटनाचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे, या विरुद्ध (काल) ५ रोजी इंटक नेतृत्वाखाली सर्वच उद्योगातील कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन यशस्वी केले आहे. महाराष्ट्र इंटेकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच उपाध्यक्ष दिवाकर दळवी, सेक्रेटरी मुकेश तिगोटे आदी पदाधिकार्‍यांनी सर्व कामगार वर्गाचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध इंटक, आयटक, एच. एम.एस, सिटू‌ इत्यादी १२ केंद्रीय कामगार संघटना एकत्र येऊन लढत आहेत. या संघटनांच्या नेतृत्वाखाली‌ राज्यातील कारखाने, आस्थापनेतील कामगारांनी केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध केला आहे. देशातील शेतकरी‌‌वर्ग‌ तर शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पंजाब सीमा रेषेवर आंदोलनाद्रारे लढत आहे. आतापर्यंत केंद्र सरकार कडून देशात कामगार विषयक धोरण आखताना सर्व कामगार संघटनांना विश्वासात घेतले जात होते. पण नरेंद्र मोदी सरकारने या तत्त्वाची पायमल्ली करून ‘हम करो से कायदा’ हे एकतर्फी धोरण अवलंबिले आहे. या विरुद्धचे‌ आंदोलन यशस्वी करून सर्व कामगार संघटना, बीजेपी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे महाराष्ट्र इंटक नेतृत्वाने म्हटले आहे. केंद्रीय इंटकचे अध्यक्ष जी. संजीवा रेड्डी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्व शक्तिनीशी लढत राहील आणि यश मिळवील असा महाराष्ट्र इंटक नेतृत्वाने विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे.

अभिनेते रविंद्र शंकर पाटील यांचा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नासीक साहित्य रंग साहित्य मंच आयोजित नारायण सुर्वे ग्रंथालय येथे एका भव्य समारंभात, अभिनेते रविंद्र शंकर पाटील यांना साहित्यातील, अभिनय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक रविकांत शार्दुल, कवी सुभाष उमरकर, हर्षवर्धन जाधव, इंदिरा जाधव आणि अश्विनी सांगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा पाटील यांच्या कलेच्या समर्पणाचा पुरावा होता.
    लेखक, कवी, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावलेले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले रविंद्र शंकर पाटील २००४ पासून नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी छबिलदास महाविद्यालयातून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांनी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, एकपात्री प्रयोग स्पर्धा आणि द्विपात्री स्पर्धा यासह विविध स्पर्धांमध्ये असंख्य पुरस्कार जिंकले आहेत.
     पाटील यांचा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवास सुनीता थिएटरच्या माध्यमातून झाला आहे, जिथे त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रभावी कामामुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत आणि व्यावसायिक, प्रायोगिक आणि राज्यस्तरीय नाटकांमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मान्यता मिळाली आहे.
     पाटील यांच्या कामगिरीची ओळख पटवून देण्यात आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. विजयकुमार शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
     अभिनय सम्राट पुरस्कार हा पाटील यांच्या कला आणि साहित्यातील अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ओळख आहे. हे त्यांच्या कठोर परिश्रम, आवड आणि त्यांच्या कलेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे, जे नवोदित अभिनेते आणि लेखकांना प्रेरणा म्हणून काम करते. अभिनय सम्राट पुरस्कार सोहळा खूप यशस्वी झाला आणि तो रविंद्र शंकर पाटील यांच्या साहित्यातील, अभिनय क्षेत्रातील पुरावा ठरला.  
      रविंद्र शंकर पाटील हे एक अभिनेते, लेखक, कवी, दिग्दर्शक आणि गीतकार आहेत जे २००४ पासून नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि सुनीता थिएटर संस्थेसोबत अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. पाटील हे अंधेरी, मुंबई येथील रहिवासी आहेत आणि व्यावसायिक, प्रायोगिक आणि राज्यस्तरीय नाटकांमधील योगदानाबद्दल त्यांना ओळखले जाते.

युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूल चमकले; दुसरे पारितोषिक पटकावले

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवधनुष्य मित्र मंडळ (माघी गणेशोत्सव) आणि आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रदर्शन करत आपला ठसा उमटवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका एल वॉर्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा २०२४-२०२५ मध्ये शाळेच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या संघाला दुसरे पारितोषिक देण्यात आले आहे.                         पौर्णिमा काळोखे, योग्या सूर्यवंशी, वंशिका गोठणकर, मोईन खान, आरुषी पवार, इरम शेख, आयशा नाथ आणि अंशिका महली या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या विजेत्या संघाचे मार्गदर्शन सक्षम आणि अनुभवी सलोनी कुडाळकर (सुभेदार) यांनी केले आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक संतोष आनंद गायकवाड यांनी दिग्दर्शन केले. संघाचे सहाय्यक सदस्य गोरख माने, पूर्वा सागवेकर, दुर्वा राऊत आणि सुश्रुती पाटील यांनी संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.                                विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल आमदार दिलीप मामा लांडे यांनी घेतली, ज्यांनी संघाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित केले. ही कामगिरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला वाव देण्याच्या आणि त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.     इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलचा विजय हा कला आणि संस्कृतीसह शिक्षणाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टतेसाठी शाळेच्या समर्पणाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. शाळेचे प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले आहे.                              विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा समुदाय या कामगिरीने खूप आनंदित झाला आहे. कलात्मक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून शाळेची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे. संघाचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांची कामगिरी निःसंशयपणे इतरांना कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अशाच उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल.                 युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलने पटकावलेले दुसरे पारितोषिक हे एक उल्लेखनीय यश आहे जे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला वाव देण्याच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. शाळेचे प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी कौतुकास पात्र आहेत आणि त्यांची कामगिरी येणाऱ्या काळात दीर्घकाळ स्मरणात ठेवली जाईल.

जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचे यंदा २२ वे वर्ष

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादरमधील अमर हिंद मंडळ, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्या सहकार्याने, पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ च्या २२ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. हा महोत्सव रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दादर येथील अमर हिंद मंडळ सभागृहात सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत होणार आहे.                      गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यासाठी एक आदर्श मानदंड असलेला हा प्रतिष्ठित महोत्सव प्रसिद्ध लेखक, कवी आणि साहित्यिकांना मराठी साहित्याची समृद्धता आणि विविधता साजरी करण्यासाठी एकत्र आणेल. हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी एक मेजवानी ठरेल. मराठी साहित्यातील सर्वोत्तम कलाकृतींचे प्रदर्शन करतील.                               मराठी साहित्याच्या जगात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रसिद्ध मराठी लेखक आणि साहित्यिक समीक्षक पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट मराठी साहित्याला प्रोत्साहन देणे आणि लेखक, कवी आणि साहित्यिकांना एकत्र येऊन भाषेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे.                       साहित्यप्रेमी अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणी करण्यासाठी समीर चव्हाण (९८२१८१२३३८), राजेंद्र कर्णिक (९८२०५८४५८९), किंवा रवींद्र ढवळे (९९२०५७२९७४) यांच्याशी संपर्क साधू शकतात.                                           पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ हा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरेल जो मराठी साहित्यातील सर्वोत्तम साहित्याचा उत्सव साजरा करेल आणि साहित्यिक रसिकांना एकत्र घेऊन भाषेची प्रशंसा तसेच गौरव करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!