Home Blog Page 19

शिक्षण उत्सव २०२६ मधील चर्चासत्रात विजय पवार यांचे प्रभावी मार्गदर्शन

0

Loading

जळगाव – जिल्हा परिषद जळगाव व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शंभर अधिकारी व शिक्षकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, अनुभवांची देवाणघेवाण आणि भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये शैक्षणिक चर्चासत्र विशेष आकर्षण ठरले. या चर्चासत्रासाठी पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या सोबत भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, डायट अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे तसेच जिल्ह्यातील अनेक अनुभवी शिक्षक सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शिक्षणाच्या गुणवत्तेचा मूलभूत पाया मजबूत करण्यावर सखोल चर्चा झाली. चर्चासत्रात गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी गुणवत्तापूर्ण शाळा भेटी कशा कराव्यात या विषयावर सविस्तर व अनुभवाधारित मांडणी केली. शाळा भेट केवळ औपचारिक न राहता ती विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडवून आणणारी असावी, शिक्षकांना मार्गदर्शन करणारी व व्यवस्थापनाला योग्य दिशा देणारी असावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. शाळा भेटीवेळी वर्गातील अध्यापन, विद्यार्थ्यांचा सहभाग, शैक्षणिक साहित्याचा वापर, शाळेतील वातावरण आणि पालक-शिक्षक संवाद यांचे सूक्ष्म निरीक्षण किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबतही त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. विद्यार्थ्यांची वाचन, लेखन व गणितातील मूलभूत कौशल्ये निश्चित करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि पालकांचा सहभाग या घटकांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधील वास्तव वेगवेगळे असले तरी उद्दिष्ट मात्र समान आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. चर्चासत्रात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरही सखोल चर्चा झाली. डिजिटल साधनांचा योग्य वापर केल्यास अध्यापन अधिक प्रभावी, रंजक आणि विद्यार्थीकेंद्रित होऊ शकते, मात्र त्यासोबतच संभाव्य धोके व घ्यावयाची काळजी याबाबतही विजय पवार यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तंत्रज्ञान हे साधन आहे, उद्दिष्ट नव्हे, त्यामुळे त्याचा वापर शैक्षणिक उद्देश लक्षात घेऊनच करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. गटकार्यात सहभाग घेत त्यांनी विविध मार्ग, नव्या कल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव मांडत चर्चेला अधिक परिणामकारक स्वरूप दिले. या शैक्षणिक चर्चासत्रात पाचोरा तालुक्यातील केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी, शिक्षिका रजनी पाटील, स्मृती साबळे तसेच शिक्षक रवींद्र कुंभार यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या अनुभवांच्या मांडणीमुळे चर्चेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विविध स्तरांवरील शैक्षणिक अडचणी, त्यावरील स्थानिक उपाय आणि यशस्वी प्रयोग यांची माहिती उपस्थितांना मिळाली. शिक्षण उत्सव २०२६ हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरला. अशा चर्चासत्रांमधून अधिकारी व शिक्षकांमध्ये संवाद वाढतो, अनुभवांची देवाणघेवाण होते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची जाणीव दृढ होते. विजय शांतीलाल पवार यांचे मार्गदर्शन, त्यांच्या अनुभवाधारित मांडणी आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे चर्चासत्र अधिक प्रेरणादायी ठरले. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही अशाच संवादमूलक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

श्री.गो.से.हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा भव्य, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात सोहळा संपन्न

0

Loading


पाचोरा– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांनी भारून गेला होता. या सोहळ्यास शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल अठराशे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताच्या तालावर सादर केलेली सांघिक कवायत हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शिस्त, समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही कवायत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यासोबतच डंबेल्स, घुंगरू काठी व करले यांच्या कवायतींनी कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. विद्यार्थ्यांच्या काटेकोर हालचाली, शिस्तबद्ध मांडणी आणि तालबद्ध सादरीकरणातून त्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील शिस्तप्रिय संस्कार प्रकर्षाने जाणवत होते. स्काऊट गाईड पथकाने सादर केलेले पथ संचलन हे देखील कार्यक्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. या पथ संचलनातून शिस्त, देशसेवा आणि नेतृत्वगुणांचे उत्तम दर्शन घडले. कार्यक्रमादरम्यान संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण अधिकच भारावून टाकले. श्रद्धा सोनवणे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांची मने जिंकून घेतली. तिच्या प्रभावी आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी तिला उत्स्फूर्त दाद दिली. याचप्रसंगी भाग्यश्री खरे या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, संविधानाचे मूल्य आणि तरुणांची जबाबदारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तिच्या विचारप्रवर्तक भाषणाने विद्यार्थ्यांना देशप्रेम, कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शाळेने विद्यार्थ्यांप्रती आपुलकी आणि समतेचा संदेश दिला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेचे संचालक सतीश चौधरी, शशिकांत चंदिले, डॉ. अमोल जाधव, डॉ. नरेश गवांदे, माजी मुख्याध्यापक सुधीर पाटील, माजी पर्यवेक्षक पी.जे. पाटील, शांताराम चौधरी, ए.जे. महाजन, माजी तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. पाटील (ठाकरे), पर्यवेक्षक सौ. ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीत आणि राज्यगीत सागर थोरात व रुपेश पाटील यांनी सादर केले. संगीत कवायतीसाठी संजय करंदे, महेश चिंचोले, संदीप मनोरे यांनी उत्कृष्ट संचलन केले तर स्काऊट गाईड पथक संचालनासाठी आर.बी. कोळी, अमित नागरगोजे, शुभम पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आर.बी. बोरसे यांनी केले. या सोहळ्यास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, शिस्त, संस्कार, देशभक्ती आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.

सौ. सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात उत्साहात ध्वजारोहन व सांस्कृतिक कार्यक्रम

0

Loading

भडगाव: येथील सौ. सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे चेअरमन विजय देशपांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन दत्ताजी पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विनय जकातदार, ज्येष्ठ संचालिका श्रीमती जयश्री पूर्णपात्री, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर पाटील, एस. डी. पाटील, अरुण एस. पाटील, नवनियुक्त नगरसेवक विजय देशमुख, विजय भोसले, सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील तसेच भडगाव नगरीतील ज्येष्ठ व श्रेष्ठ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष शोभा लाभली. ध्वजारोहनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर गीत, समूहगीत, नृत्यनाट्य, भाषणे व विविध कलाविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता, शिस्त व राष्ट्रप्रेम प्रभावीपणे सादर केले. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली असून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने सर्वजण भारावून गेले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रप्रेम, शिस्त, शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक जबाबदारी यावर भर दिला. शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून संस्कारांची पायाभरणी करणारे केंद्र असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मुख्याध्यापक अजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक तायडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध व्यवस्था, वेळेचे काटेकोर पालन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रभावी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौ. सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात साजरा झालेला हा ध्वजारोहन व सांस्कृतिक कार्यक्रम राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि शैक्षणिक मूल्यांचा संदेश देणारा ठरला.

सूर्यास्ताआधी राष्ट्रध्वज उतरवल्याचा प्रकार : वडगाव (टेक) ग्रामपंचायतीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांसह वरीष्ठ स्तरावर तक्रार

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील वडगाव (टेक) बु. प्र. पा. ग्रामपंचायतीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज सूर्यास्ताआधीच उतरवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह वरिष्ठ व तालुका स्तरावरील संबधितांकडे ई-मेल, वॅटसॲपव्हारे तक्रार करण्यात आली आहे. संदीप दा. महाजन यांनी याबाबत सविस्तर तक्रार सादर केली असली तरी एवढी महत्वपूर्ण राष्ट्रध्वजा संदर्भात घटना घडल्या नंतर सोशल मीडियावर सदरची वृत्त प्रसारित होताच स्थानिक शासकीय यंत्रणेने यासंदर्भात कोणाच्याही तक्रारीची वाट न पाहता गंभीर दखल घेणे महत्त्वपूर्ण होते या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दि. 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, वडगाव (टेक) येथील ग्रामपंचायत कार्यालयावरही राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. मात्र तो राष्ट्रध्वज आचार संहिते नुसार राष्ट्रध्वज हा सूर्यास्तापर्यंत फडकवणे बंधनकारक असताना, संबंधित ठिकाणी राष्ट्रध्वज सूर्यास्त होण्यापूर्वीच उतरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार केवळ नियमभंगाचाच नव्हे, तर राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला तडा देणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, संबंधित ग्रामसेवक हे नियुक्तीच्या ठिकाणी हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि त्यातून झालेला हा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे निर्देश करणारा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि सन्मानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम अंतर्गत राष्ट्रध्वजाचा अवमान किंवा त्यासंबंधी नियमांचे उल्लंघन हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात. त्यामुळे सदर प्रकरण केवळ प्रशासकीय चूक म्हणून दुर्लक्षित न करता, त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर वडगाव (टेक) परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत प्रशासनाने दाखवलेली निष्काळजी भूमिका चिंताजनक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. “राष्ट्रीय सण हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, तो देशप्रेम आणि संविधानावरील निष्ठेचे प्रतीक आहे. अशा दिवशी नियमांचे पालन न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तक्रारदार संदीप दा. महाजन यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह वरीष्ठ स्तरावर व तालुका स्तरावर सदर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून, दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन योग्य ती प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. तसेच या तक्रारीसोबत घटनेशी संबंधित गुगल मॅप फोटोही जोडण्यात आले असून, त्यामुळे प्रकरणाची सत्यता अधिक ठळकपणे समोर येत आहे.विशेष म्हणजे सदरचे वृत्त प्रसार माध्यमांमधून 4.30 वाजता प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर तालुकास्तरावरील संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देणे अत्यावश्य होते त्यांची देखील स्थानीक स्तरावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौकशी होऊन त्यांना सह आरोपी करण्यात यावे असेही तक्रारदार संदीप महाजन यांनी म्हटले आहे जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे कोणत्या प्रकारे पाहते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंधित अशा घटनांवर कठोर भूमिका घेतली गेली, तरच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती रोखता येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

आज दि.26/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज धाडस आणि पुढाकार यांचा योग्य उपयोग होईल. रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. कुटुंबातील सहकार्य लाभेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ-आज स्थिर विचार आणि संयम आवश्यक आहे. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. कामात हळूहळू प्रगती होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन-आज संवाद आणि संपर्क वाढतील. नवीन संधींबाबत माहिती मिळू शकते. प्रवास किंवा भेटीगाठी यशस्वी ठरतील. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क-आज भावनिक स्थैर्य राखणे महत्त्वाचे आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. निर्णय शांतपणे घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह -आज तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी

कन्या-आज नियोजन आणि शिस्त यामुळे कामे सुरळीत पार पडतील. आरोग्यात सुधारणा जाणवेल. सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवल्यास फायदा होईल. ताण कमी ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा

तुला -आज नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. सर्जनशील कामात यश मिळेल. मन शांत राहील.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक-आज अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस आहे. गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. वाद टाळावेत. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद लाल

धनु -आज नवीन विचार आणि अनुभव मिळतील. शिक्षण व प्रवासाशी संबंधित गोष्टी अनुकूल राहतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील. उत्साह टिकून राहील.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: नारंगी

मकर-आज मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून विश्वास आणि कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबात समाधानकारक वातावरण असेल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ-आज नवीन कल्पना आणि वेगळा दृष्टिकोन लाभदायक ठरेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. खर्चाचे नियोजन गरजेचे आहे. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन -आज अंतःप्रेरणा योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. सर्जनशील कामात यश मिळेल. भावनिक बाबतीत स्थैर्य राखा. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: निळसर हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

 

   होमगार्ड गणेश पाटील यांना राष्ट्रपती पदक प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या तारखेडा गावचा देशपातळीवर गौरव

0

Loading

सुरत – भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यातील होमगार्डस्, सिव्हिल डिफेन्स व ग्राम रक्षक दलामध्ये उत्कृष्ट, निःस्वार्थ व राष्ट्रहिताची सेवा बजावणाऱ्या अधिकारी व जवानांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. या गौरवप्राप्त यादीत महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावचे सुपुत्र गणेश तुकाराम पाटील यांचा समावेश झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. महानिदेशक नागरी संरक्षण व होमगार्डस् तसेच पदसिद्ध कमांडंट जनरल होमगार्डस् गुजरात राज्य यांच्या कार्यालयामार्फत याबाबत अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले असून प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी व जवानांची राष्ट्रपती होमगार्डस् पदकासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीत सूरत जिल्ह्यात समूह-चौक होमगार्ड संरक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश तुकाराम पाटील यांची निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असलेले गणेश तुकाराम पाटील सध्या गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात होमगार्ड सेवेत कार्यरत असून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमा, नागरिकांमध्ये जनजागृती तसेच प्रशासनाला दिलेले सहकार्य या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यात शिस्त, सेवाभाव, सातत्य आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने दिसून येत असल्याने त्यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे आपत्ती प्रसंगी नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांनाही हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती होमगार्डस् पदक हा नागरी संरक्षण व स्वयंसेवी सुरक्षा व्यवस्थेतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. या सन्मानामुळे संबंधित अधिकारी व जवानांचे मनोबल वाढतेच, तसेच समाजातील तरुणांना राष्ट्रसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वयंसेवी सुरक्षादलात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने दुसऱ्या राज्यात सेवा बजावत प्रजासत्ताक दिनानिमित्त देशपातळीवरील सन्मान प्राप्त करणे ही बाब निश्चितच प्रेरणादायी असून गणेश तुकाराम पाटील यांच्या या यशाबद्दल तारखेडा गाव, पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढल्याची भावना व्यक्त होत असून प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र निमित्ताने अशा सेवाभावी, शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना सन्मानित करून शासनाने नागरी संरक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

पाचोरा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानिमित्त ॲड. अविनाश सुतार यांचे लॉयर्स असोसिएशनकडून उत्साहात अभिष्टचिंतन

0

Loading

पाचोरा  :  शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश देविदास सुतार यांची पाचोरा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे जाहीर अभिष्टचिंतन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम भोला अप्पा यांच्या फार्म हाऊस, सारोळा येथे अत्यंत आपुलकीच्या व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभिष्टचिंतन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अभय शरद पाटील होते. कार्यक्रमास ज्येष्ठ वकील ॲड. एस. पी. पाटील, ॲड. एन. आर. बोरसे, ॲड. बापू सैंदाणे, उपाध्यक्ष ॲड. रवींद्र ब्राह्मणे, ॲड. अंकुश कटारे, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. बबलू पठाण, ॲड. एच. डी. माहेश्वरी, ॲड. ललित सुतार, ॲड. नरेंद्र डाकोरकर, ॲड. अमजद पठाण, ॲड. जयराज उबाळे, ॲड. गोपाल पाटील, ॲड. राहुल पाटील, ॲड. रणसिंग राजपूत, ॲड. अनुराग काटकर, ॲड. अनिल पाटील, ॲड. राजू वासवानी, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड. संदीप पाटील, ॲड. निलेश सूर्यवंशी, ॲड. चंदन राजपूत, ॲड. एम. के. मोरे, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. अरुण भोई, ॲड. तुषार नैनाव, ॲड. प्रशांत मालखेडे, ॲड. पी. डी. पाटील, ॲड. नाना महाजन, सरकारी वकील नाईकवाडे साहेब यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, आबा पाटील, विकास सूर्यवंशी आदी मान्यवर व असंख्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी ॲड. अविनाश सुतार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात अनेक वकिलांनी ॲड. सुतार यांच्या आजवरच्या व्यावसायिक वाटचालीचा आढावा घेतला. न्यायव्यवस्थेतील त्यांचे योगदान, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक जाणीव ठेवून केलेले कार्य याचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ॲड. अभय शरद पाटील यांनी सांगितले की, नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून ॲड. अविनाश सुतार यांची नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची बाब नसून संपूर्ण वकील बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कायद्याचे ज्ञान, अनुभव आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर ते शहराच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास आहे. यावेळी ॲड. अविनाश सुतार यांनी मनोगत व्यक्त करताना दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन तसेच उपस्थित सर्व वकील मित्रांचे आभार मानले. माझ्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. पाचोरा शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या आणि न्यायसंगत निर्णयांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगितले. वकील म्हणून मिळालेला अनुभव नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितच उपयोगी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भोला अप्पा यांनी आपले फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आपुलकी, स्नेह आणि एकोपा यांचे दर्शन या अभिष्टचिंतन सोहळ्यात घडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी ॲड. अविनाश सुतार यांना पुढील कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. पाचोरा नगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या या उपक्रमामुळे वकील बांधवांमधील ऐक्य आणि सामाजिक सहभाग अधिक दृढ झाल्याचे चित्र या प्रसंगी दिसून आले.

सेवा ज्येष्ठतेतून नेतृत्वाकडे : सौ. सुमनताई गिरिधर पाटील विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी अशोक तायडे यांची नियुक्ती

0

Loading

भडगाव : येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सुमनताई गिरिधर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी अशोक बाजीराव तायडे यांची संस्थेच्या सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. दीर्घकालीन अध्यापन अनुभव, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन यांमुळे ही नियुक्ती संस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या नियुक्तीचा आदेश संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक/प्राचार्य अजयजी अहिरे, सु. भा. पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साळुंखे मॅडम, प्राथमिक शिक्षक दीपक पाटील, तंत्रस्नेही डी. आर. टोणपे सर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनियुक्त पर्यवेक्षकास पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अशोक बाजीराव तायडे यांनी आपल्या सेवाकाळात अध्यापन गुणवत्ता, शालेय शिस्त, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तसेच शिक्षक-विद्यार्थी समन्वय यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन, मूल्यमापन पद्धतीतील सुधारणा, सहशालेय उपक्रमांना चालना देणे आणि पालक-शाळा संवाद अधिक परिणामकारक करणे या बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पर्यवेक्षक म्हणून शाळेतील अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक देखरेख ठेवत गुणवत्तावाढीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीप भाऊ वाघ, व्हाइस चेअरमन व्हि. टी. जोशी, मानद सचिव ॲड. महेशजी देशमुख, शालेय समिती चेअरमन दत्ताजी पवार, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन विनयजी जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग चेअरमन विजयजी देशपांडे तसेच संस्थेतील सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले. याशिवाय शाळेतील उपमुख्याध्यापिका श्रीमती छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनींनीही शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. शैक्षणिक वातावरण अधिक सुदृढ करण्यासाठी नवनियुक्त पर्यवेक्षकाच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कार्यवाही राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त होत असून अध्यापनातील नवोपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताविकासासाठी उपक्रमशीलता आणि संस्थेच्या परंपरेला साजेसे नेतृत्व या माध्यमातून शाळेची शैक्षणिक उंची अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आज दि.25/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामातील अडचणी दूर होताना दिसतील. आत्मविश्वासामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ-आज संयम आणि व्यावहारिक विचार उपयुक्त ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरी किंवा व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवट पिवळा

मिथुन-आज संवादकौशल्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. प्रवासाचे संकेत आहेत. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: हलका निळा

कर्क-आज भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. शांत विचारांनी निर्णय घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह-आज नेतृत्वगुणामुळे इतरांवर प्रभाव पडेल. कामात नवीन संधी मिळू शकते. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या-आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्याल. सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा. मानसिक ताण कमी होईल.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: गडद हिरवा

तुला-आज नातेसंबंधात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. कला व सर्जनशीलतेत प्रगती होईल. सकारात्मक विचार ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक-आज संयम ठेवणे फायदेशीर ठरेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: मरून

धनु -आज नवीन अनुभव घेण्याची संधी मिळेल. शिक्षण व प्रवासाशी संबंधित गोष्टी अनुकूल राहतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. उत्साह टिकून राहील.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: पिवळा

मकर-आज मेहनत आणि शिस्त यांचा योग्य परिणाम दिसेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबात शांतता नांदेल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ -आज नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांकडून मदत होईल. खर्चाचे नियोजन करा. मन शांत राहील.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन-आज अंतःप्रेरणा योग्य दिशा दाखवेल. सर्जनशील कामात समाधान मिळेल. भावनिक बाबतीत स्थैर्य ठेवा. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: निळसर जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.24/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज तुमच्यात ऊर्जा व आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील संवाद महत्त्वाचा ठरेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ-आज संयम आणि स्थिरता लाभदायक ठरेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. जुन्या ओळखींकडून मदत मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन-आज नवीन कल्पना आणि संवाद यश देणारे ठरतील. कामात गती येईल. प्रवासाचे योग संभवतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडत्या गोष्टींना वेळ द्या.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क -आज भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. घरगुती विषयांवर लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. निर्णय घाईने घेऊ नका.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह -आज तुमचे नेतृत्वगुण उजळून निघतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वासामुळे अडचणी सोप्या वाटतील.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी

कन्या-आज कामात शिस्त आणि बारकावे महत्त्वाचे ठरतील. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्याल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास फायदा होईल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा

तुला -आज संतुलन राखणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. नातेसंबंधात स्पष्टपणा ठेवा. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरूपाचा लाभ संभवतो. कला व सर्जनशीलतेला चालना मिळेल.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक-आज आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वाद टाळणे हितावह ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु -आज नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित गोष्टी लाभदायक ठरतील. आशावादी दृष्टीकोन ठेवा. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: नारंगी

मकर-आज मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामात सातत्य ठेवा. वरिष्ठांशी संवाद सकारात्मक राहील. कुटुंबासाठी वेळ काढाल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ-आज नवीन विचार आणि वेगळे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत नियोजन गरजेचे आहे. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन-आज अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवल्यास योग्य निर्णय घ्याल. सर्जनशील कामात यश मिळेल. भावनिक बाबतीत स्थैर्य राखा. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: जांभळसर निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!