मेष-आज कामातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ दिसतो. कुटुंबातील सहकार्य मिळेल. शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा
वृषभ-दिवस शांत आणि स्थिरतेचा आहे. नियोजनबद्ध कामामुळे समाधान मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य सुधारण्याची चिन्हे आहेत. शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा
मिथुन-आज संवादातून मार्ग निघेल. नव्या ओळखी उपयुक्त ठरतील. कामात चपळाई ठेवा. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा
कर्क-भावनिक समतोल राखणे आवश्यक आहे. घरातील प्रश्न समजूतदारपणे सोडवता येतील. आर्थिक बाजू हळूहळू सावरत जाईल. संयम ठेवा. शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा
सिंह-आज प्रतिष्ठा वाढवणारा दिवस आहे. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडाल. अहंकार टाळल्यास अधिक लाभ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी
कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. थोडा ताण जाणवेल पण परिणाम समाधानकारक असतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा
तुला-समन्वयातून यश मिळेल. भागीदारीच्या कामात प्रगती होईल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस सकारात्मक जाईल. शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी
वृश्चिक-आत्मविश्वास वाढेल. जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. गोपनीयता राखणे हितावह ठरेल. शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून
धनु -नवीन संधी मिळू शकतात. शिकण्याची इच्छा वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा
मकर-कर्तव्यदक्षतेमुळे मान वाढेल. कामात स्थैर्य येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा
कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास लाभ होईल. शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी
मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांतीची गरज भासेल. शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा
पाचोरा – नगर परिषदेत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षच्या स्थानिक संघटनेत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून या पराभवामुळे केवळ राजकीय नुकसान झाले नाही तर निर्णयप्रक्रियेत जुन्या, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याची तीव्र भावना उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पक्ष कार्यालयात भाजपच्या जुन्या व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वाच्या मनमानी व एकतर्फी निर्णयांवर उघड नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून पक्षासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने पक्ष संघटनेत तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष मुंढे पाटील, बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, माजी तालुकाध्यक्ष हिंमतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष दीपक माने, माजी शहराध्यक्ष रमेश वाणी, दत्ता बोरसे पाटील, नंदूबापू सोमवंशी, समाधान मुळे, माजी पदाधिकारी डॉ. शांतीलाल तेली, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना मधुकर काटे यांनी सांगितले की पक्षाने मागील काळात काही नेत्यांना पक्षात सामावून घेणे हा अंतर्गत निर्णय असू शकतो, मात्र त्या निर्णयांचे परिणाम काय होऊ शकतात याची माहिती आम्ही वेळोवेळी पक्षश्रेष्ठी, जिल्हाध्यक्ष तसेच ना. गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना दिली होती, तरीही योग्य वेळी ठोस निर्णय न झाल्याने पाचोरा व भडगाव नगरपालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही आणि दारुण पराभव स्वीकारावा लागला. तरीसुद्धा आम्ही पक्षावर नाराज नाही, कोणीही राजीनामा देणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष असून पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नाही, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र पराभवानंतर आवश्यक असलेली आत्मपरीक्षणाची व सखोल चर्चा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तसेच पाचोरा नगर परिषद गटनेता निवडीदरम्यानही ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय अधिकच वादग्रस्त ठरला असून कोअर कमिटीत असतानाही काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून थेट निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की स्वीकृत नगरसेवक म्हणून अॅड. अविनाश सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांनी शेतकरी अनुदान घोटाळ्यातील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित गंभीर घोटाळ्यातील आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करणे म्हणजे थेट शेतकरीविरोधी भूमिका घेतल्यासारखे असून हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने आम्हाला मान्य नाही व त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे स्पष्ट करण्यात आले. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मते प्रत्यक्षात पक्षासाठी त्याग करणारे, अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना शब्द देण्यात आला होता त्यांनाच संधी देणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही शिवाय आगामी काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका होणार असून अशा वेळी जनतेसमोर विशेषतः शेतकऱ्यांसमोर जाताना अनुदान घोटाळ्याशी संबंधित वकिलाला भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून सदस्यत्व दिल्याचे उत्तर कसे द्यायचे, असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वांना व शेतकरीहिताच्या भूमिकेला शोभणारा नसल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी आक्रमक मागणी करत पाचोरा नगर परिषद पराभवानंतर भाजपमध्ये निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शेतकरीहित या मुद्द्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे या पत्रकार परिषदेतून ठळकपणे समोर आले आहे.याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली असून भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून शेतकरी अनुदान घोटाळ्या प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेणारे ॲड. अविनाश सुतार यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द साठी युद्ध पातळीवर जोरदार हालचाल सुरू झाली आहे
मेष-आज निर्णयक्षमता वाढलेली जाणवेल. कामात पुढाकार घेतल्यास यश मिळेल. खर्च करताना गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. घरातील वातावरण सकारात्मक राहील. शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा
वृषभ-दिवस संयमाचा आहे. आर्थिक व्यवहारात स्थिरता राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको. शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा
मिथुन-नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. बोलण्यात स्पष्टता ठेवा. प्रवासाचे योग संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्या. शुभ अंक : 5 | शुभ रंग : फिकट पिवळा
कर्क-मन संवेदनशील राहील. जवळच्या व्यक्तीशी संवाद वाढवा. आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. कामात शांतता ठेवल्यास लाभ होईल. शुभ अंक : 2 | शुभ रंग : चंदेरी
सिंह-आत्मविश्वासामुळे कामे सोपी होतील. नेतृत्वाची संधी मिळू शकते. वादविवाद टाळा. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी
कन्या-आज नियोजनात बदल करावे लागू शकतात. कामाचा ताण वाढेल पण परिणाम चांगले मिळतील. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळसर
तुला-नातेसंबंधात समतोल राखा. सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. दिवस समाधान देणारा आहे. शुभ अंक : 7 | शुभ रंग : फिकट गुलाबी
वृश्चिक-एकाग्रतेने काम केल्यास प्रगती होईल. जुनी अडचण सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. भावनांवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक : 9 | शुभ रंग : गडद मरून
धनु-आशावाद वाढलेला राहील. शिक्षण व ज्ञानवृद्धीसाठी अनुकूल दिवस आहे. प्रवासात सावधगिरी ठेवा. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळट
मकर-जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. शुभ अंक : 10 | शुभ रंग : करड्या छटेचा
कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास दिवस यशस्वी ठरेल. शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी निळा
मीन-भावनिक समज वाढेल. कलात्मक कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. मन:शांतीसाठी वेळ काढा. शुभ अंक : 12 | शुभ रंग : फिकट हिरवा
पाचोरा – शहरातील श्री गो से हायस्कूलच्या कॉर्नर परिसरात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डे व वर आलेल्या सळईंमुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे, जीव धोक्यात आले होते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून वाहनांची चाके सळईंमध्ये अडकणे, सायकलस्वार घसरून पडणे, दुचाकीस्वार जखमी होणे अशी परिस्थिती नित्याची बनली होती. पावसाळ्यानंतरही या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने समस्या अधिकच गंभीर झाली होती. काल शाळा सुटण्याच्या वेळी या धोकादायक रस्त्यावरून जात असताना एका विद्यार्थ्याच्या सायकलचे चाक वर आलेल्या सळईमध्ये अडकले आणि त्याचा अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र ही घटना रस्त्याच्या विद्यमान स्थितीचे विदारक वास्तव समोर आणणारी ठरली. त्याच सुमारास डीवायएसपी ऑफिसकडून मार्गक्रमण करत असताना पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांचे सुपुत्र जय बारावकर त्या ठिकाणी आले. त्यांनी अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून रस्त्यावरील धोका लक्षात घेतला. विशेष म्हणजे नगरपालिका सकाळी उघडेल, तक्रार करू आणि मग काम होईल असा क्षणाचाही विचार न करता जय बारावकर यांनी तात्काळ निर्णय घेत रात्री सुमारे अकराच्या सुमारास स्वतःच्या मालकीचे खड्डे बुजवण्याचे साहित्य त्या ठिकाणी आणले, मजूर मागवले आणि धोकादायक खड्डे तसेच वर आलेल्या सळईंच्या परिसरात त्वरित दुरुस्तीचे काम करून घेतले. अंधारातही सुरक्षिततेची काळजी घेत, वाहतूक विस्कळीत होऊ न देता, आवश्यक ठिकाणी खड्डे बुजवून मार्ग सुकर करण्यात आला. या तत्परतेमुळे रात्रीच रस्त्यावरील तातडीचा धोका दूर झाला आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सामाजिक जाणीव व जबाबदारीची भावना दाखवत केलेल्या या उपक्रमाबद्दल जय बारावकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नागरिक, पालक आणि वाहनचालकांनी त्यांच्या तत्काळ कृतीचे कौतुक केले असून अपघातानंतर नव्हे तर अपघात टाळण्यासाठी केलेली कृती महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही दुरुस्ती तात्पुरती असली तरी भुयारी मार्ग ते गो से हायस्कूल या संपूर्ण पट्ट्यावर रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण किंवा किमान शास्त्रशुद्ध दुरुस्ती तातडीने व्हावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शाळा परिसर असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्ता सपाटीकरण, योग्य डांबरीकरण, सळई पूर्णपणे काढून सुरक्षित बांधकाम तसेच आवश्यक ठिकाणी इशारा फलक व गतीमर्यादा राबवाव्यात अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पाचोरा नगरपालिका प्रशासनानेही रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना तक्रारींची प्रतीक्षा न करता नियमित पाहणी, वेळेवर दुरुस्ती आणि शाळा परिसरात विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकीकडे जय बारावकर यांचा हा आदर्श पुढाकार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला असला तरी दुसरीकडे नगरपालिकेनेही याची दखल घेऊन संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण त्वरित हाती घ्यावे अशी ठाम अपेक्षा पाचोरा शहरातून पुढे येत आहे.
पाचोरा – तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी अनुदान योजना, मदत योजना तसेच पीक विमा योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने ऐकायला मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांची जमीन नोंद, पीक नोंद, आधार-बँक लिंकिंग आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रिया पूर्ण असतानाही अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष खात्यावर जमा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र अनेक वेळा योग्य पद्धतीने अर्ज न दिल्याने, अर्जाचा मजकूर कसा असावा याची माहिती नसल्याने किंवा “आपोआप मिळेल” या अपेक्षेने शेतकरी प्रशासनाकडे लेखी दाद मागत नाहीत. परिणामी पात्र असूनही अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन व आवाहन करण्यात येत आहे की, जर सन 2019–2020 पासून किंवा त्यानंतरच्या कोणत्याही वर्षात शेतकरी अनुदान, विविध मदत योजना किंवा लागू असल्यास पीक विम्याचा लाभ मिळालेला नसेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या नावाने थेट तहसीलदार कार्यालयात लेखी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. असा अर्ज दिल्यानंतर संबंधित शासकीय नोंदी तपासल्या जातात आणि पात्रता सिद्ध झाल्यास अनुदान मिळण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होते. अर्ज करताना काही मूलभूत बाबी स्पष्टपणे नमूद करणे महत्त्वाचे आहे. शेतजमिनीचा सर्वे नंबर व गट नंबर, जमीन बागायत किंवा जिरायत स्वरूपाची असल्याची माहिती, सातबारा (7/12) व ८-अ (8A) उतारे अद्ययावत असल्याचा उल्लेख अर्जात असावा. तसेच तलाठी कार्यालयामार्फत पीक नोंद नियमित झाली आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि बँक खाते DBT साठी कार्यरत आहे, हे स्पष्ट शब्दांत नमूद करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी पूर्ण असूनही अनुदान मिळालेले नाही, अशी थेट व स्पष्ट मागणी अर्जात करणे आवश्यक ठरते. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करताना विनाकारण अनेक कागदपत्रांच्या झेरॉक्स देण्याची गरज नाही. अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मागितली जातील, या भीतीने ते अर्जच करत नाहीत. प्रत्यक्षात प्राथमिक चौकशीसाठी केवळ किमान आवश्यक कागदपत्रे जोडली तरी प्रक्रिया सुरू होऊ शकते. यामध्ये अद्ययावत सातबारा उतारा, ८-अ खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकचा पहिला पृष्ठ, पीक नोंद प्रत आणि लागू असल्यास पीक विमा पावती एवढीच कागदपत्रे पुरेशी ठरतात. शेतकऱ्यांनी हेही लक्षात घ्यावे की अर्ज हा साध्या, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ भाषेत असावा. भावनिक मजकूर किंवा आरोपांची गरज नसते. “मी पात्र असूनही अनुदान मिळालेले नाही, कृपया चौकशी करून मला पात्र लाभ देण्यात यावा,” अशी थेट मागणी प्रभावी ठरते. योग्य पद्धतीने दिलेला अर्ज हीच पुढील कार्यवाहीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, अनुदान मिळत नसेल तर गप्प न बसता लेखी अर्ज करून आपल्या हक्कासाठी प्रशासनाकडे दाद मागावी. अनेक वेळा एक साधा अर्जही अडकलेल्या प्रकरणाला चालना देतो आणि वर्षानुवर्षे रखडलेला लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करतो. माहितीअभावी किंवा भीतीपोटी अर्ज न करणे हे स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे आहे. योग्य माहिती, किमान कागदपत्रे आणि स्पष्ट अर्ज या तीन गोष्टी लक्षात ठेवल्यास शेतकरी आपला हक्क अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. अर्जासंदर्भातील व शेतकरी अनुदान संदर्भातील अधिक माहितीसाठी व आपला अर्ज स्वीकारला जात नसेल तर शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप दामोदर महाजन, पाचोरा Mo.7385108510 यांच्याशी संपर्क साधावा.
मेष-आज कामातील गती वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती प्रश्न शांततेने सोडवता येतील. शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल
वृषभ-दिवस स्थैर्य देणारा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवा. शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा
मिथुन-नवीन कल्पनांना वाव मिळेल. संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. प्रवासात सावधगिरी ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा
कर्क-भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबाची साथ लाभेल. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. मन:शांतीसाठी वेळ द्या. शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा
सिंह-नेतृत्वगुण प्रकट होतील. कामात यशाची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास लाभ वाढेल. मित्रांची मदत मिळेल. शुभ अंक : 1 | शुभ रंग : केशरी
कन्या-आज नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामातील बारकावे लक्षात घ्या. खर्च अपेक्षेपेक्षा वाढू शकतो. आरोग्य सुधारेल. शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा
तुला-समतोल राखण्याचा दिवस. भागीदारीत लाभ संभवतो. कायदेशीर बाबी सावधपणे हाताळा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी
वृश्चिक-धैर्याने निर्णय घ्या. अडथळे दूर होतील. आर्थिक संधी मिळू शकतात. गोपनीय बाबी जपून ठेवा. शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून
धनु-नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास फलदायी ठरेल. खर्च नियोजनबद्ध ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील. शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा
मकर-जबाबदाऱ्या वाढतील पण यश मिळेल. वरिष्ठांचे विश्वासार्ह सहकार्य मिळेल. आरोग्यासाठी दिनक्रम पाळा. संयम ठेवा. शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा
कुंभ-नवीन संपर्क उपयोगी ठरतील. सर्जनशील कामांना चालना मिळेल. आर्थिक निर्णय विचार करून घ्या. मित्रपरिवाराचा आधार मिळेल. शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी
मीन-अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. कलात्मक कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष द्या. मन शांत ठेवण्यासाठी वेळ द्या. शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा
पाचोरा – राजस्थानातील जोधपूर येथे आयोजित भव्य माहेश्वरी कुंभ सोहळ्यात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडले. या कुंभमेळ्यात नाशिक ढोलपथकाच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री मोटाभाई अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला यांच्या स्वागतासाठी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले. या मानाच्या आणि ऐतिहासिक क्षणी चैताली हिचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.सौ चैताली ही चेतन मणियार यांची पत्नी असून पाचोरा येथील श्री गो. से. हायस्कूल, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा. सुनील मणियार यांची सुन आहे. महेश्वरी समाजाच्या या कुंभमेळ्याला देशभरातून हजारो समाजबांधवांची उपस्थिती लाभली होती. समाजातील ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडवणारा हा सोहळा केवळ धार्मिक मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक समन्वयाचे प्रतीक ठरला. अशा भव्य कार्यक्रमात नाशिक ढोलपथकाने सादर केलेल्या शिस्तबद्ध, जोशपूर्ण आणि पारंपरिक वादनाने उपस्थितांची मने जिंकली. मराठमोळ्या तालावर साकारलेली ऊर्जा आणि उत्साहामुळे स्वागत सोहळ्याला वेगळेच वैभव प्राप्त झाले. सौ.चैताली यांनी या ढोलपथकासोबत सहभागी होत आपल्या सादरीकरणातून शिस्त, समर्पण आणि संघभावना यांचे दर्शन घडवले. अल्पवयातच राष्ट्रीय पातळीवरील अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभाग घेणे ही तिच्या आत्मविश्वासाची आणि कौटुंबिक संस्कारांची साक्ष देणारी बाब मानली जात आहे. चेतन मणियार यांनी आपल्या पत्नीचा या सहभागाबद्दल समाधान व्यक्त करताना अशा अनुभवांमुळे व्यक्तिमत्त्व विकास घडतो आणि सामाजिक जाणीव वाढते, असे मत व्यक्त केले. प्रा. सुनील मणियार यांनीही सुनेने पाचोरा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याचा अभिमान व्यक्त केला. गृहमंत्री मोटाभाई अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला यांच्या उपस्थितीमुळे या स्वागत सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. देशाच्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोलपथकाची निवड होणे ही बाब राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा सन्मान मानली जात आहे. ढोलपथकाच्या सादरीकरणादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही या जिवंत परंपरेचे कौतुक केले. एकूणच जोधपूर येथील महेश्वरी कुंभमध्ये नाशिक ढोलपथकासह चैतालीचा सहभाग हा केवळ वैयक्तिक यशाचा क्षण नसून पाचोरा, नाशिक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारा ठरला आहे. अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला आपल्या परंपरेशी जोडण्याचे कार्य घडत असून भविष्यातही सौ.चैतालीसारख्या युवक-युवतींकडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचोरा – राजस्थान के जोधपुर में आयोजित भव्य माहेश्वरी कुंभ समारोह में महाराष्ट्र की समृद्ध सांस्कृतिक परंपरा का प्रभावशाली दर्शन देखने को मिला। इस कुंभ मेले में नासिक ढोल पथक के माध्यम से देश के गृह मंत्री मोटाभाई अमित शाह और लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला के स्वागत के लिए पारंपरिक ढोल-ताशों की गूंज के साथ उत्साहपूर्ण वातावरण का निर्माण किया गया। इस गौरवपूर्ण और ऐतिहासिक क्षण में चैताली की भागीदारी विशेष रूप से उल्लेखनीय रही। सौ. चैताली, चेतन मणियार की पत्नी हैं तथा पाचोरा स्थित श्री गो. से. हाईस्कूल के न्यूनतम कौशल विभाग के प्रमुख प्रा. सुनील मणियार की बहू हैं। माहेश्वरी समाज के इस कुंभ मेले में देशभर से हजारों समाजबंधुओं की उपस्थिति रही। समाज की एकता, सांस्कृतिक विरासत और सामाजिक उत्तरदायित्व का दर्शन कराने वाला यह समारोह केवल धार्मिक सीमाओं तक सीमित न रहकर राष्ट्रीय स्तर पर सामाजिक समन्वय का प्रतीक बनकर उभरा। ऐसे भव्य कार्यक्रम में नासिक ढोल पथक द्वारा प्रस्तुत अनुशासित, जोशपूर्ण और पारंपरिक वादन ने उपस्थित जनसमूह का मन मोह लिया। मराठी ताल पर सजी ऊर्जा और उत्साह के कारण स्वागत समारोह को एक अलग ही वैभव प्राप्त हुआ। सौ. चैताली ने इस ढोल पथक के साथ सहभाग करते हुए अपने प्रदर्शन के माध्यम से अनुशासन, समर्पण और टीम भावना का उत्कृष्ट परिचय दिया। कम उम्र में ही राष्ट्रीय स्तर के ऐसे महत्वपूर्ण कार्यक्रम में सहभाग करना उनके आत्मविश्वास और पारिवारिक संस्कारों का प्रमाण माना जा रहा है। चेतन मणियार ने अपनी पत्नी की इस भागीदारी पर संतोष व्यक्त करते हुए कहा कि ऐसे अनुभव व्यक्तित्व विकास में सहायक होते हैं और सामाजिक चेतना को बढ़ावा देते हैं। वहीं प्रा. सुनील मणियार ने भी अपनी बहू द्वारा पाचोरा शहर का नाम राष्ट्रीय स्तर पर रोशन किए जाने पर गर्व व्यक्त किया। गृह मंत्री मोटाभाई अमित शाह और लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला की उपस्थिति के कारण इस स्वागत समारोह को विशेष महत्व प्राप्त हुआ। देश के नेतृत्व के स्वागत के लिए महाराष्ट्र के पारंपरिक ढोल पथक का चयन होना राज्य की सांस्कृतिक पहचान के सम्मान के रूप में देखा जा रहा है। ढोल पथक के प्रदर्शन के दौरान उपस्थित मान्यवरों ने भी इस जीवंत परंपरा की सराहना की। कुल मिलाकर, जोधपुर में आयोजित माहेश्वरी कुंभ में नासिक ढोल पथक के साथ चैताली की भागीदारी केवल एक व्यक्तिगत उपलब्धि नहीं, बल्कि पाचोरा, नासिक और महाराष्ट्र की सांस्कृतिक विरासत का गौरव बढ़ाने वाला क्षण सिद्ध हुआ है। ऐसे आयोजनों के माध्यम से नई पीढ़ी को अपनी परंपराओं से जोड़ने का कार्य हो रहा है और भविष्य में भी सौ. चैताली जैसी युवतियों से विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान की अपेक्षा व्यक्त की जा रही है
Pachora – At the grand Maheshwari Kumbh ceremony held in Jodhpur, Rajasthan, a powerful glimpse of Maharashtra’s rich cultural tradition was witnessed. At this Kumbh fair, an enthusiastic atmosphere was created through the traditional beats of dhol–tasha by the Nashik dhol troupe while welcoming the country’s Home Minister Amit Shah and Lok Sabha Speaker Om Birla. On this proud and historic occasion, Chaitali’s participation proved to be especially noteworthy. Mrs. Chaitali is the wife of Chetan Maniyar and the daughter-in-law of Prof. Sunil Maniyar, Head of the Minimum Skills Department at Shri Go. Se. High School, Pachora. The Maheshwari community’s Kumbh mela saw the presence of thousands of community members from across the country. Showcasing unity, cultural heritage, and social responsibility, the ceremony went beyond religious boundaries and emerged as a symbol of national-level social harmony. In such a grand event, the disciplined, energetic, and traditional performance by the Nashik dhol troupe captivated the audience. The energy and enthusiasm expressed through Marathi rhythms gave the welcome ceremony a distinct grandeur. Participating alongside the dhol troupe, Mrs. Chaitali demonstrated discipline, dedication, and excellent team spirit through her performance. Taking part in such an important national-level event at a young age is considered a reflection of her self-confidence and strong family values. Expressing satisfaction over his wife’s participation, Chetan Maniyar stated that such experiences help in personality development and enhance social awareness. Prof. Sunil Maniyar also expressed pride that his daughter-in-law brought recognition to the city of Pachora at the national level. The presence of Home Minister Amit Shah and Lok Sabha Speaker Om Birla added special importance to the welcome ceremony. The selection of Maharashtra’s traditional dhol troupe to welcome the nation’s leadership is being seen as an honor to the state’s cultural identity. During the performance, the dignitaries present also appreciated this vibrant tradition. Overall, Chaitali’s participation along with the Nashik dhol troupe at the Maheshwari Kumbh in Jodhpur was not merely a personal achievement, but a moment that glorified the cultural heritage of Pachora, Nashik, and Maharashtra. Through such events, the younger generation is being connected with their traditions, and it is hoped that young women like Mrs. Chaitali will continue to make significant contributions in various fields in the future.
पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे पीएम–उषा योजनेच्या माध्यमातून “ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते तर उद्घाटक म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात नानासाहेब संजयजी वाघ यांनी आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजना, शैक्षणिक संधी आणि आधुनिक सुविधा यांची माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातूनच आदिवासी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते स्वावलंबी बनू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. के. एफ. पवार, प्रकल्प समन्वयक, पीएम–उषा सॉफ्ट कॉम्पोनन्ट, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी “आदिवासी युवकांचा शाश्वत विकास” या विषयावर मार्गदर्शन करताना युवकांनी शिक्षणासोबत कौशल्याधारित प्रशिक्षण व स्वयंरोजगाराकडे वळावे, असे सांगितले. दुसऱ्या सत्रात डॉ. विशाल पराते, यू.वाय.सी.टी. सिनेट मेंबर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी “आदिवासी नेते आणि त्यांचे योगदान” या विषयावर व्याख्यान देत आदिवासी समाजाच्या इतिहासातील व वर्तमानातील नेतृत्वाचे महत्त्व स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात प्रा. के. के. वळवी, एम.जे. महाविद्यालय, जळगाव यांनी “आदिवासी समाजाची दिशा व दशा” या विषयावर सविस्तर विचार मांडले तर प्रा. डॉ. दीपक मराठे, उपप्राचार्य, र. ना. भडगाव महाविद्यालय, भडगाव यांनी “सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” या विषयावर व्याख्यान देत संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डब्ल्यू. एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक डॉ. एस. बी. तडवी, सहसमन्वयक डॉ. वाय. बी. पुरी, सहसमन्वयक आर. बी. वळवी, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. शरद पाटील, प्रा. अतुल पाटील, प्रा. स्वप्निल भोसले, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अमित गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. माणिक पाटील यांनी केले. एकूणच पीएम–उषा अंतर्गत आयोजित या कार्यशाळेमुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विटवा या गावात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजभान, श्रमप्रतिष्ठा आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे हे सात दिवसीय शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. या शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी समारोपप्रसंगी केले. या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर संस्थेचे माजी सेक्रेटरी गंभीर शेनू चौधरी होते. कार्यक्रमास ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील, उपाध्यक्ष रामदास नारायण महाजन, सचिव संजय पाटील, संचालक पी. आर. चौधरी, कैलास पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पांडुरंग पाटील व दिलीप पाटील, सिनेट सदस्य प्रा. डॉ. पद्माकर पाटील, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत विटवा येथील सरपंच मुकेश चौधरी, मुख्याध्यापक विजय चौधरी, ग्रामसेवक मनोहर चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कोमल धामोडकर व काजल कोळी यांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करण्यात आले. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी शिबिराचा सात दिवसांचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी शिबिरकाळात राबविण्यात आलेल्या विविध श्रमसंस्कार उपक्रमांची माहिती देताना शोषखड्डा व स्मशानभूमीची स्वच्छता, महिला शौचालयांची साफसफाई, गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदांची स्वच्छता, मंदिर परिसर, ग्रामीण रुग्णालय परिसर, प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ करणे, गटारी साफसफाई आदी कामे स्वयंसेवकांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याचे सांगितले. शिबिराच्या वैचारिक प्रबोधन सत्रात विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. पाणी व्यवस्थापनावर विजय चौधरी, वित्तीय साक्षरतेवर प्रमोद पाटील, पत्रकारिता – काल, आज आणि उद्या या विषयावर अनिल आसेकर, युवा संवादावर दिलशाद शेख, बालविवाह प्रतिबंधक कायद्यावर प्रा. डॉ. नीता जाधव, सोशल मीडियावर डॉ. एस. एस. साळुंके, शाश्वत विकासात युवकांचे योगदान या विषयावर प्रा. डॉ. जयंत नेहेते, आपत्ती व्यवस्थापनावर प्रा. डॉ. चतुर गाढे, स्वच्छ भारत अभियानावर प्रा. डॉ. जी. आर. ढेंमरे, मतदार जनजागृतीवर प्रा. हेमंत बाविस्कर, शाश्वत विकासासाठी युवक या विषयावर अल्ताफ पटेल तर स्पर्धा परीक्षांबाबत पोलिस उपनिरीक्षक हरीदास बोचरे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, कायदेविषयक माहिती, करिअरविषयक दिशा आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी यांचे महत्त्व समजले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रभावी पथनाट्ये सादर करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच ग्राम सर्वेक्षण करून गावातील समस्या, गरजा आणि विकासाच्या संधींचा अभ्यास करण्यात आला. या सात दिवसांच्या शिबिरात गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत विटवा यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले, असेही प्रा. डॉ. रामटेके यांनी नमूद केले. समारोपप्रसंगी अनुष्का लवंगे, अर्पिता चौधरी, प्रतीक्षा पाटील, सुहानी पाटील, काजल कोळी, पवन कोळी, श्रेयश पाटील, वैष्णवी महाजन व जान्हवी पाटील या स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतातून शिबिरातील अनुभव कथन करताना या शिबिरामुळे स्वतःच्या विचारसरणीत आणि सामाजिक जाणीवेत सकारात्मक बदल झाल्याची भावना व्यक्त केली. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड यांनीही शिबिरातील शिस्त, एकोप्याची भावना आणि सेवाभाव याबाबत समाधान व्यक्त केले. विटवा गावचे प्रथम नागरिक सरपंच मुकेश चौधरी यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करताना, त्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे गावाचा कायापालट झाल्याची भावना व्यक्त केली. उपाध्यक्ष रामदास महाजन यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, हा काळ आयुष्याला सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असून श्रमाचे महत्त्व, समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची शिकवण यातून मिळते, असे प्रतिपादन केले. या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन कुमारी दीक्षा पाटील हिने केले तर मान्यवरांचे आभार वैष्णवी पाटील या स्वयंसेविकेने मानले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विनोद रामटेके, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा. डॉ. रेखा पाटील, प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. कोमल सुतार, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, अनिकेत पाटील, श्रेयस पाटील, सेवा निवृत्त लिपिक श्रीराम चौधरी व हर्षल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्षांच्या परवानगीने राष्ट्रगीताने या समारोप समारंभाची सांगता करण्यात आली.
पाचोरा- नगरपालिका निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीत महायुतीचे विरोधी पक्ष नावालाही शिल्लक नाहीत असे चित्र पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले किंबहुना तेवढी वस्तुस्थिती आहे कारण शेवटी पैसा आणि सत्त्येपुढे शहाणपण चालत नाही हे सर्वश्रुत्व आहे व ते मान्य करावंच लागेल मग आता तो राहिला महत्त्वाचा प्रश्न पाचोरा भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तर भाजप अशी चुरशीशी निवडणूक झाली या निवडणुकीत आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोघेही नगरपालिकेवर एकतर्फी बहुमत आले भाजपच्या जागा कमी आलेले असल्या तरी सभागृहात त्यांची विरोधी पक्ष म्हणून भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशा परिस्थितीत पाचोरा शहरात जे विकासाचे भव्य प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये पाणीपुरवठा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मागील स्वर्गीय बाबुराव आनंदा मराठे शॉपिंग कॉम्प्लेक्स,हुतात्मा स्मारकालगतचे गुलाब डेअरी चे शॉपिंग,पाचोरा नगरपालिका नूतन अति भव्य प्रमाणात अत्याधुनिक वास्तू उभारण्याचे काम, त्याचबरोबर जुना सरकारी दवाखाना व परिसर डेव्हलप करणे अशी अनेक महत्त्वपूर्ण अति भव्य प्रोजेक्ट उभारणे हे नवीन सभागृहासमोर महत्त्वाचे आहेत अर्थात ही कामे क्वालिटीची करायची असल्यामुळे आज तरी कामाची क्वॉलिटी चे काम करणारे एम एस पी & बालाजी ग्रुप सारखे दुसरे नाव पाचोरा शहरात डोळ्यासमोर नाही हे जरी सर्व सत्य असले तरी ही संपूर्ण काम करत असताना सभागृहामध्ये एकजूट राहणे महत्त्वाचे आहे शिवाय भाजप विरोधी पक्ष असला तरी त्यांचा देखील विचार महत्त्वपूर्ण आहे कारण अशा स्थितीत विकास कामांना विरोधी पक्षाला देखील विरोध करता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व कामांच्या मंजुरी केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त करावयाची विविध स्तरावरच्या परवानगी सोबतच आर्थिक मदत याकरिता निवडणूक जरी शिवसेना शिंदे गटाने व भाजपाने पाचोऱ्यात एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी केंद्र व राज्यस्तरावर महायुती असल्याने तिघेही पक्षांच्या गॉडफादरांकडून मनोमिलन व विकास कामांना विरोध नाही या तत्त्वावर शहर विकासासाठी एकत्रित राहावे लागणार आहे आणि हेच कटू सत्य आहे तरच पाचोरा शहराचा विकास होणे महत्त्वाचा आहे