मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!” संतांचे आगमन हे नेहमीच आनंद, मंगल आणि भक्तिभावाचे प्रतीक असते. सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी कामिका एकादशीच्या निमित्ताने श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कनिष्ठ महाविद्यालयात अशाच एक भक्तिपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळाला, जणू साक्षात विठ्ठलमाऊलीच भक्तगणांना दर्शन देण्यासाठी अवतरले.
या दिवशी महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाच्या वतीने आयोजित “अभंग गायन स्पर्धा २०२५” मध्ये एकूण ७१ विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदवून संतवाङ्मयाचा गोडवा आणि अभंगांची भक्तिरसाळ परंपरा रसिकांसमोर उलगडली. “ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला, नामदेवांनी भक्तीचा गंध दरवळवला आणि तुकारामांनी भावनांचा महासागर उलगडला. आजच्या विद्यार्थिनी त्यांच्या अभंगांनी हेच तेज पुढे नेत आहेत,” असे विचार प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील संत परंपरा ही आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीची शिदोरी आहे. संतांचे अभंग आजही आपल्याला मानसिक आधार देतात आणि जीवनवाट दाखवतात. मराठी विभागाच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींना संतविचारांची खरी ओळख होते, हे विशेष कौतुकास्पद आहे.”
उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले, “आजच्या तरुण पिढीला भारतीय मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. विद्यार्थिनी अभंग गायनातून संतांचे विचार प्रभावीपणे सादर करत आहेत, ही काळाची गरज आहे.”
कला शाखेच्या प्रमुख डॉ. हिना शाह यांनी विद्यार्थिनींच्या पारंपरिक वेषातील सादरीकरणाचे विशेष कौतुक करत सांगितले, “विद्यार्थिनींनी केवळ गाणं सादर केलं नाही, तर त्यांच्या पोशाखातून, हावभावातून आणि भक्तिरसातून संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवलं.”
या स्पर्धेत कला, वाणिज्य आणि बॅफ शाखेतील विद्यार्थिनींचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विजयी विद्यार्थिनींचा प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. किरण जाधव (समाजशास्त्र विभाग) आणि प्रा. रिता खडगी (पर्यावरण शिक्षण विभाग) यांनी परखडपणे केले. अभंगांची निवड, सूर, लय, भावभावना आणि प्रस्तुती यांचा समग्र विचार करून गुणांकन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे रसाळ आणि सुसंवादी सूत्रसंचालन प्रा. नेहा भोसले (मराठी विभाग प्रमुख) आणि डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप पाटील यांनी अत्यंत मन:पूर्वक केले.
कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संतांच्या अभंगगायनातून पंढरपूरची ओढ, विठ्ठलमाऊलीचं स्मरण आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. ही स्पर्धा नव्हतीच – हा भक्तिरसात न्हालेला, संतविचारांनी भारलेला आणि विद्यार्थिनींच्या अभंगगायनाने पावन झालेला एक सुसंस्कृत सोहळा होता!
मेष आज तुम्हाला मेहनती कामांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे; आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा, परंतु जुन्या अडचणींना मात मिळेल. शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल
वृषभ शुक्र गोचरामुळे आर्थिक व कौटुंबिक जीवनात समृद्धी वाटू शकते; परंतु कामाच्या दबावामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी
मिथुन बुधादित्य योगामुळे कामात गती, आर्थिक लाभ आणि नव्या योजनांमध्ये स्थिरता मिळू शकते; तरीही मानसिक ताण जाणवू शकतो . शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा
कर्क बुध–सूर्य युतीमुळे संवाद, प्रवास किंवा व्यावसायिक प्रयत्नांमध्ये प्रगती येईल; साधना आणि मार्गदर्शनाद्वारे मार्ग मिळेल . शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा
सिंह राजयोगामुळे नेतृत्वगुण वृद्धिंगत होतील; आर्थिक व कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसेल, तर शारीरिक वा भावनिक ताणाचा सामना करावा लागू शकतो शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी
कन्या कामात विरोध किंवा अडचणी येऊ शकतात; निर्णय घेण्यापूर्वी संयम व सखोल विचार करण्याची गरज आहे शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा
तुला शत्रूप्रभावामुळे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या, मात्र प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळू शकते . शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक मालव्य राजयोगामुळे आर्थिक वाढ होईल, परंतु खर्च नियंत्रणात ठेवा — मध्यभागी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा
धनु केवळ काम किंवा प्रवासात यश न मिळता, तो ईमानदारीने वाट पाहण्याचा दिवस आहे; काही अडचणींचा सामना करावा लागेल . शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी
मकर शनि वक्रीमुळे संयम व धैर्य आवश्यक, परंतु दीर्घकालीन दृष्टीने निर्णय फायदेशीर ठरू शकतात शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा
कुंभ करिअरच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे; जुनी गुंतवणूक व सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता दिसते शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा
मीन आर्थिक व व्यावसायिक दोन्ही स्तरावर लाभासाठी योग असूनही, खर्च व भावना नियंत्रित करणे गरजेचे आहे . शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा
वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.
पाचोरा – शहर पोलीस ठाण्याचे माजी पोलिस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची नुकतीच बदली करण्यात आली असून या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि त्याचे पडसाद सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. एकीकडे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे पाचोरा बसस्थानकावर घडलेली अति गूढ आणि गंभीर स्वरूपाची गोळीबाराची घटना, ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने निर्णय घेत पवार यांची बदली केली असून, बदली आदेशातही “कायद्याची व सुव्यवस्थेची गरज” या कारणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.मात्र, या बदलाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी खाजगी पातळीवर याचे श्रेय स्वतःकडे घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या काही व्यक्तींनी माजी निरीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली होती, त्यांचं आता पोलीस ठाण्यात वारंवार विनाकारण येणं-जाणं वाढले असून, तासन्तास पोलीस ठाण्यात व पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांचा वावर दिसून येतो. “आमच्या आंदोलनामुळेच बदली झाली” अशा प्रकारचा टेंभा मारत पोलीस ठाण्यातील वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, माजी निरीक्षक अशोक पवार यांच्या जागी नियुक्त झालेले विद्यमान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पदभार स्वीकारताच अष्टपैलू कार्यशैलीने जनतेचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विविध सकारात्मक उपक्रमांची चर्चा सर्वत्र होत असून, विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे कौतुकही होत आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरून चिंता व्यक्त होत आहे की, काही मंडळींच्या अशा अनावश्यक छटांमध्ये रंगलेल्या हस्तक्षेपामुळे पोलीस प्रशासनातील गटबाजी सारख्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी, अशा हस्तक्षेपांना त्वरित लगाम घालणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. या विषयावर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांना जाब विचारत रस्ते कामांची गंभीरता अधोरेखित केली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान, शेतातील पोहोच सुविधा आणि शेतीमाल वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि त्यांच्या मानसिकतेवर होत असल्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले. त्यांनी अधिवेशनाच्या अर्ध्या तासाच्या चर्चेत या विषयावर प्रश्न उपस्थित करत शासनाच्या हलगर्जी धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकरी हा सरकारचा भोगवटादार असून त्याच्याकडून शासन दरवर्षी शेतसारा घेत असते. त्यामुळे त्याला मूलभूत सुविधा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, मातोश्री शेत पाणंद योजना, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध माध्यमातून मंजूर झालेल्या कामांना केवळ काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे, तांत्रिक अडचणीमुळे किंवा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेळेवर मंजुरी मिळत नाही आणि ती कामे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, यामुळे शासनाचा नुसता आर्थिक नुकसानच नाही तर शेतकऱ्यांचाही प्रचंड मानसिक त्रास होत आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भडगाव व पाचोरा तालुक्यातील परिस्थितीचे वास्तव अधिवेशनात मांडताना सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघात जवळपास 250 शेत पाणंद रस्त्यांची कामे शासन स्तरावर मंजूर झाली आहेत. मात्र, या पैकी फक्त 50 कामेदेखील पूर्ण झालेली नाहीत. ही कामे का रेंगाळली आहेत, त्यामागची अडथळ्यांची कारणे काय आहेत याचे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात मागितले. विशेष म्हणजे 10 शेतकऱ्यांपैकी 9 शेतकरी रस्त्यासाठी सकारात्मक सहमती देतात, मात्र केवळ एका शेतकऱ्याच्या विरोधामुळे संपूर्ण रस्ता थांबतो, ही गोष्ट शासनाने गांभीर्याने घ्यायला हवी. मनरेगाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांत मजुरांची उपलब्धता, कमी रोजंदार आणि आवश्यक यंत्रसामुग्रीचा अभाव यामुळे देखील कामे रखडतात. मनरेगाच्या अंतर्गत सध्या 300 रुपयांची रोजंदारी आहे, जी अत्यंत अपुरी असून शेतमजूर स्वतःच्या शेतीत 500 रुपये रोजाने काम करतो, मग तो शासकीय कामात का येईल? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या धोरणात सुधारणा करून मनरेगामध्ये रोजंदार वाढवण्याची मागणी केली. रस्ते कामे जेसीबी व पोकलँड सारख्या यंत्रांच्या सहाय्याशिवाय शक्यच नाहीत, परंतु शासन अद्याप ही कामे केवळ मजुरांकडूनच करवून घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण योजनेच्या स्वरूपावर, नियमांवर आणि अंमलबजावणी प्रक्रियेवर पुन्हा विचार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात वेगळी, स्पष्ट व शेतकऱ्यांच्या हिताची नियमावली तयार करून शासनाने ती तात्काळ अंमलात आणावी अशी मागणी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ठामपणे केली. त्यांनी सांगितले की अनेक वेळा 1 किलोमीटर रस्त्याला जिल्हा स्तरावर मंजुरी मिळते, पण जेव्हा रस्ता 2 ते 2.5 किलोमीटरचा असतो तेव्हा तो थेट शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवावा लागतो आणि तेथेच तो फायलीच्या ढिगात अडकतो. परिणामी रस्त्यांची कामे रखडतात. यात सुधारणा करून अशा लांब रस्त्यांची जिल्हा पातळीवरच मंजुरी देण्याचे धोरण राबवावे असे त्यांनी सूचित केले. अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी थेट मंत्री भरत गोगावले यांना उद्देशून विचारले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 100% रस्ते पाच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार? 250 किलोमीटरची कामे चार वर्षांपूर्वी मंजूर असून आजही 10 – 20 किलोमीटर कामे पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यपद्धती कितपत परिणामकारक आहे हे स्पष्ट होते. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत, सरकारने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि प्रत्यक्षात अंमलात येईल अशी धोरणात्मक निर्णय प्रक्रिया स्वीकारावी. पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने शासनाने मस्टर बंद केल्याने 15 जूनपासून सर्व रस्ते कामे थांबलेली आहेत. यामुळे अजूनही कामे लांबणीवर पडणार असून, शेतकऱ्यांची हताशता वाढत आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावर उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, शेत पाणंद रस्त्यांसाठी सर्वच शेतकरी तयार होत नाहीत. अनेकदा एका-दोन शेतकऱ्यांचा विरोध असतो आणि त्यामुळेच रस्त्यांचे काम थांबते. अशा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने वेगळी भूमिका घ्यावी लागेल. यासाठी शासन सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी योग्य तो विचार करत असून लवकरच रस्त्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, विरोधकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, त्यांनी सरकारकडून वेळकाढूपणाच्या धोरणावर टीका केली आहे. या चर्चेमुळे शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. शासनाने या प्रश्नावर वेळ न घालवता निर्णय घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होईल. प्रत्येक शेतकऱ्याचा शेतात पोहोचण्याचा रस्ता असणे ही केवळ सुविधा नव्हे तर त्यांच्या हक्काची बाब आहे. त्यामुळे शासनाने सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधत, स्पष्ट नियोजन राबवत, आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणा करत, शेत पाणंद रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, हीच या संपूर्ण प्रश्नाचा सार्थ आणि प्रभावी समारोप होऊ शकतो.
पाचोरा – अलीकडच्या काळात अंत्यविधी, दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य यासारखे धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता, ते मोठ्या प्रमाणात खर्च, दिखावा आणि प्रतिष्ठा यांचे माध्यम ठरत असल्याचे आपण पाहतो. अनेकदा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर विधींचे स्वरूप एवढे विस्तृत केले जाते की ते जणू एखाद्या भव्य समारंभाचे रूप घेतात. काही ठिकाणी तर मृत्यू नंतरचा हा काळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तत्त्वावर साजरा केला जातो. अशा पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील (जगताप) कुटुंबीयांनी त्यांच्या वृद्ध आईच्या निधनानंतर खर्च, दिखावा, कर्मकांड टाळून समाजप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाटील परिवाराने त्यांच्या वयोवृद्ध आई कै. शांताबाई पांडुरंग पाटील (वय ८७) यांच्या निधनानंतर पारंपरिक विधींऐवजी सामाजिक व पर्यावरणपूरक कृतींचा अवलंब करत समाजासमोर नवा मार्ग दाखवला. त्यांच्या आईच्या अस्थी गावातील स्वतःच्या शेतात आणि बांधावर विसर्जित करून, त्या जागी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संगोपन व संवर्धन त्यांनी आईप्रती असलेल्या निष्ठा आणि ममत्वाच्या प्रतीक म्हणून करण्याचा संकल्प केला आहे. त्या वृक्षांमध्ये आईचे रूप पाहण्याची आणि तिच्या आठवणींचे जतन करण्याची त्यांची भावनिक भावना खरोखरच हृदयस्पर्शी आहे. कै. शांताबाई पाटील यांच्या तिन्ही मुलांवर ग्रामीण संस्कार असले तरी विचार मात्र पुरोगामी आहेत. मोठे चिरंजीव अर्जुन पाटील हे मुंबईत नोकरी करतात, तर पोपट पाटील गावातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. तिसरे चिरंजीव राजेंद्र पाटील हे पाचोरा एसटी बस आगारात मुख्य मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. ते पाचोरा मॉर्निंग वॉक व योगा ग्रुपचे अध्यक्ष असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. शिवकालीन संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. वास्तुशांती, विवाह, उत्तरकार्य यांसारख्या कार्यक्रमांमध्ये ते पारंपरिक शिवकालीन विधी पार पाडतात. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचे विचार आणि कार्य त्यांनी आपल्या जीवनात आत्मसात केले आहे. त्यांच्या प्रतिमांचे पूजन, अभंगांचे गायन आणि ग्रंथांचे वाटप याच्या माध्यमातून ते सातत्याने जनजागृती करीत असतात. कै. शांताबाई पाटील यांच्या निधनानंतर राजेंद्र पाटील यांनी आईच्या दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य विधी पारंपरिक पुरोहितांशिवाय, शिवकालीन कार्यपद्धतीने स्वतः पार पाडले. यात त्यांनी प्रतिमा पूजन, पुष्पांजली व अभिवादन करून आईला आदरांजली वाहिली. त्यांनी कर्मकांडाऐवजी श्रद्धेने केलेली ही विधी समाजात नवसंस्कार रुजवणारी ठरली. पुढे या उत्तरकार्याच्या खर्चातून म्हणजेच अंदाजे २५ हजार रुपयांत कोणतीही मोठी मेजवानी किंवा ब्राम्हण भोजन न करता, त्या पैशातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते १५ ऑगस्टच्या दिवशी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेंसिली, वही कव्हर्स, पाटी, पाटीपेन्सिल यांसारखी उपयुक्त शैक्षणिक साधने देऊन त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात पाटील कुटुंबीयांना अतिशय समाधान लाभले. सध्या ज्या काळात सामाजिक प्रतिष्ठा, नातेवाईकांचे कौतुक आणि धार्मिक कर्मकांड यासाठी लाखोंचा खर्च केला जातो, त्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबीयांनी दाखवलेला संयम, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी ही केवळ अनुकरणीय नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी आईच्या निधनानंतर ज्या पद्धतीने पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसारखे उपक्रम हाती घेतले, तो खरोखरच भावनिक आणि समाजहिताची जाणीव करून देणारा ठरतो. या कुटुंबाने केवळ वैयक्तिक शोकपर प्रसंगात नव्हे, तर त्यातून समाजाला सकारात्मक संदेश देत, मृत्यू नंतरही काहीतरी विधायक करणे शक्य आहे हे सिद्ध केले आहे. मृत व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजोपयोगी कृती करून त्या आठवणींना दीर्घकाल टिकवता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाळण बुद्रुक येथील पाटील कुटुंब. त्यांच्या या कृतीस सलाम करत, समाजातील इतरांनीही अशा पद्धतीने आदर्श घ्यावा आणि मृत्यू नंतरचा काळ देखील विधायकतेने साजरा करावा, हीच काळाची गरज आहे.
पाचोरा – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी केले आहे. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाची संपूर्ण माहिती दिली. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकास्तरीय आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेस मधुकर काटे, गोविंद शेलार, बन्सीलाल पाटील, सुभाष पाटील, नंदू सोमवंशी, अमोल पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, राजेंद्र साळुंखे आणि शिवदास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रारंभी मधुकर काटे यांनी या महा रक्तदान शिबिराच्या नियोजनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मंडळामध्ये शिबिराची जागा निश्चित करण्यात आली असून, आवश्यक औषधे, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर व स्वयंसेवकांची नेमणूक पूर्ण झाली आहे. दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा आदर्श ठेवत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. रक्तदान हे श्रेष्ठतम दान समजले जाते आणि अनेकांना जीवदान देणारे कार्य असते. त्यामुळे या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पाचोरा तालुका व भडगाव तालुक्यातील भाजप मंडळांमध्ये म्हणजेच पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, पिंपळगाव हरेश्वर आणि कजगाव येथे एकाच दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिर होणार आहे. या ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी नियोजनबद्ध प्रचार आणि जनसंपर्क मोहिमा राबविण्यात येत आहेत. पाचोरा येथे हे शिबिर छत्रपती संभाजी महाराज चौकात होणार असून, येथे दरवर्षीप्रमाणेच उत्साही वातावरणात रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भडगावमध्ये पारोळा चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिबिर भरवले जाणार आहे. नगरदेवळा येथे मुख्य बाजारपेठेत, पिंपळगाव हरेश्वर येथे उषःकाळ पॉलिक्लिनिकमध्ये आणि कजगाव येथे मातोश्री हॉस्पिटलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि आरोग्य संस्था समन्वयाने काम करणार आहेत. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, समाजाच्या आरोग्यसुरक्षेसाठी आणि आपत्कालीन गरजांमध्ये रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशा वेळी अशा महा उपक्रमांमधून रक्तसाठा निर्माण होतो आणि अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होते. भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजकार्यात आघाडीवर असलेली संघटना आहे. सामाजिक बांधिलकी जपत हे रक्तदान शिबिर राबवले जात आहे. पत्रकार परिषदेत गोविंद शेलार यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये एकत्रितपणा निर्माण होतो आणि समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित होते. सुभाष पाटील यांनीही आपल्या भाषणात रक्तदानासंदर्भातील वैद्यकीय महत्त्व विशद केले. त्यांनी नमूद केले की, रक्तदान केल्याने शरीरात कोणतीही कमजोरी येत नाही, उलट शरीर नवचैतन्याने भरून जाते आणि नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या वतीने विशेष समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या समन्वयातून प्रत्येक शिबिर ठिकाणी आरोग्य सुविधा, जनजागृती साहित्य, स्वयंसेवकांची तयारी आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. गावोगावी पोस्टर, बॅनर, सोशल मीडियाद्वारे प्रचार केला जात आहे. स्थानिक डॉक्टरांचे सहकार्य घेतले असून, प्रत्येक ठिकाणी योग्य प्रमाणात रक्त साठवणुकीसाठी उपकरणे उपलब्ध असतील. कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी इच्छुक व्यक्तींची पूर्वनोंदणी देखील सुरू केली आहे. या उपक्रमात महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असून, युवक मंडळे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रेरणेचा जागर करत पाचोरा व भडगाव तालुक्यात भाजपच्या वतीने राबविण्यात येणारे हे महारक्तदान शिबिर केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, आरोग्यविषयक जनजागृती आणि संघटनात्मक ताकद दाखवणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. रक्तदान हेच जीवनदान या उक्तीप्रमाणे या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन समाजसेवेचे व्रत पूर्ण करावे, असे आवाहन दिलीपभाऊ वाघ आणि उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.
पाचोरा – पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाने बँकेला आधुनिक युगाशी सुसंगत बनवत, डिजीटलायझेशनच्या माध्यमातून राज्यभर प्रभाव टाकण्याचा निर्धार केला आहे. बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अतुलभाऊ संघवी यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या भावी योजना सविस्तरपणे मांडल्या. यावेळी बँकेचे संचालक प्रशांत अग्रवाल, ॲड. अविनाश भालेराव, नंदुबालाजी पाटील, भागवत महालपुरे, डॉ. अनंत पाटील, राहूल संघवी आणि शरद पाटे हेही प्रमुख उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत बोलताना अतुलभाऊ संघवी म्हणाले की, “पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची सेवा ही केवळ मर्यादित परिसरापुरती न राहता, ती संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारावी, हा आमचा ध्यास आहे. यासाठी बँकेच्या आर्थिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करून, ग्राहकांना वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज डिजीटल व्यवहार हे काळाची गरज बनले असून, आमची बँकही या प्रवाहाशी सुसंगत होण्यासाठी कटिबद्ध आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, “अत्याधुनिक सुविधा, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्यूआर कोड पेमेंट प्रणाली, यूपीआय सेवा आणि ग्राहक केंद्रित तंत्रज्ञानाचा वापर हे आमच्या वाटचालीतील प्रमुख घटक असतील. ग्रामीण भागातील ग्राहकही या आधुनिक सेवेचा लाभ सहजपणे घेऊ शकतील, याची काळजी घेतली जाईल.”पिंपळगाव हरेश्वर हे तालुक्यातील मोठे आर्थिक केंद्र असून, येथील व्यापारी, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता, पाचोरा पिपल्स बँकेची नवी शाखा लवकरच तेथे सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संघवी यांनी केली. “आमच्या बँकेच्या सेवा ग्रामीण भागात सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. पिंपळगाव हरेश्वर शाखेच्या माध्यमातून आम्ही नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि त्या भागातील आर्थिक व्यवहार अधिक गतिमान करू,” असेही त्यांनी नमूद केले.संघवी यांनी सांगितले की, “डिजिटलायझेशनचा प्रभाव वाढत असून, आमच्या बँकेच्या यूपीआय कोडची अॅक्टीव्हेशन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच आमचे सर्व ग्राहक त्यांच्या मोबाईल फोनवरून सहज आणि सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील. यासोबतच मोबाईल अॅप आधारित बँकिंग, एसएमएस अलर्ट सुविधा, थेट ग्राहक सेवा, २४ तास तांत्रिक सहाय्य अशी व्यवस्था देखील उभारण्यात येणार आहे.” बँकेच्या विविध शाखांमध्ये नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यंत्रणा बसवून सेवा जलद, पारदर्शक आणि त्रुटीविरहित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.या निवडणुकीत सभासदांनी अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास दाखवला असून, सहकार पॅनेलमधील सर्व १५ उमेदवारांनी विजय संपादन करत बँकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण पान लिहिले आहे. विजयी संचालकांमध्ये अतुलभाऊ संघवी, प्रशांतभाऊ अग्रवाल, डॉ. अनंतदादा पाटील, राहूल संघवी, ॲड. अविनाशभाऊ भालेराव, सौ संगीता शरद पाटे, सौ. संध्या प्रकाश पाटील ,नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील, भागवत महालपुरे, पवन अग्रवाल, विकास वाघ, पुखराज डांगी, ॲड स्वप्नील पाटील, भागवत महालपुरे यांचा समावेश आहे. या विजयानंतर नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाने बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवे संकल्प स्वीकारले असून, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता, सभासद हित हे मुख्य केंद्रबिंदू असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.अतुलभाऊ संघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बँकेच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणताना, आम्ही सभासदांच्या सूचना, अपेक्षा, तक्रारी यांचा अभ्यास करून त्या धोरणात्मक पातळीवर अंमलात आणू. आमचे उद्दिष्ट केवळ नफ्यापेक्षा, बँकेचा शाश्वत आणि सदस्याभिमुख विकास साधणे हे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आपली कार्यसंस्कृती ही एकात्मतेवर आधारित आहे. प्रारंभीपासून आम्ही सर्व स्तरांतील कर्मचारी, ग्राहक व संचालक यांच्यात एकमेकांवरचा विश्वास दृढ ठेवला आहे आणि यामुळेच बँकेची वाटचाल ठाम आणि यशस्वी झाली आहे. येणाऱ्या काळातही आम्ही ही परंपरा कायम ठेवत, प्रत्येक शाखेला सशक्त आणि नवतंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी प्रयत्न करू.”यावेळी उपस्थित असलेल्या संचालक प्रशांत अग्रवाल, ॲड. अविनाश भालेराव, नंदुबालाजी पाटील, भागवत महालपुरे, डॉ. अनंत पाटील, राहूल संघवी आणि शरद पाटे यांनी आपापले मनोगत व्यक्त करत सदस्यांचे आभार मानले. “निवडणुकीत आम्हाला भरघोस पाठिंबा देणाऱ्या सर्व सभासदांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. हा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही एकनिष्ठपणे काम करणार असून, बँकेची विश्वासार्हता अधिक दृढ करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “बँकेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सभासदांचा हितसंबंध विचारात घेण्यात येईल. आम्ही कोणताही निर्णय घेताना एकमुखाने, सहकाराची मूल्ये जपत आणि पारदर्शकतेच्या तत्वावर चालत निर्णय घेऊ.”तसेच, बँकेच्या वित्तीय स्थैर्याबाबत बोलताना अतुलभाऊ संघवी यांनी सांगितले की, “सध्याच्या घडीला आमच्या बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. कर्जवसुली, ठेवींची वाढ आणि व्यवस्थापनातील शिस्तबद्धता यामुळे आम्ही स्थिर आर्थिक पाया तयार केला आहे. आता या आधारावरच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून आम्ही एक पायरी पुढे जात आहोत.” त्यांनी असेही सांगितले की, “मुदत ठेव योजना, लोन योजनांमध्ये सुलभता, महिला बचत खाते योजना, तरुणांसाठी विशेष सुविधा अशा अनेक नवनवीन सेवा सुरू केल्या जातील.”संघवी यांनी यावेळी बँकेच्या सामाजिक बांधिलकीबाबतही भाष्य केले. “केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादा न ठेवता, समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी उद्यमशीलता कार्यक्रम अशा स्वरूपात सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही आमची बँक पुढे असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पत्रकार परिषदेच्या शेवटी संघवी यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक, कर्मचारी आणि हितचिंतकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “बँकेचा पाया विश्वासावर उभा आहे आणि आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि सेवा हे त्रिसूत्री बाळगत काम करणार आहोत.” उपसंहार: पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ही निवडणूक केवळ सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली नाही, तर तिने सहकार क्षेत्रात नव्या दिशा दाखवल्या आहेत. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाने घोषित केलेल्या विविध विकासात्मक योजना, डिजिटलायझेशनचा दृढ संकल्प आणि पारदर्शक व सभासदाभिमुख प्रशासनाचे आश्वासन या सर्व गोष्टींनी बँकेच्या पुढील वाटचालीत आशादायी संकेत दिले आहेत. या त्रिसूत्रीवर आधारित धोरणांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाली, तर पाचोरा पिपल्स बँक ही महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील आदर्श संस्था ठरेल, यात शंका नाही.
पाचोरा – “सेवा हेच आपले व्रत” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला धरून रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणीच्या पदस्थापनेचा सोहळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, रोटरी सदस्य, मान्यवर पाहुणे, आणि पाचोरा-भडगाव परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे सन्माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे यांची उपस्थिती. त्यांच्या हस्ते रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी सचिवपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. रोटरीच्या नव्या वर्षाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थापना सोहळ्यात प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोटरी चळवळीच्या सामाजिक भानाविषयी विवेचन करताना शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित सेवाकार्याचा संदर्भ दिला. रोटरी क्लब पाचोरा-भडगावने सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या मनोगतातून समाजात रोटरीच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या संकल्पाची मांडणी केली. “रोटरी ही केवळ संस्था नसून एक चळवळ आहे. या चळवळीच्या प्रत्येक घटकाने वैयक्तिक जबाबदारीने समाजात बदल घडवण्यासाठी झटले पाहिजे,” असे ते म्हणाले. तर नवनिर्वाचित सचिव रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी संयोजक म्हणून आगामी वर्षात अधिक व्यापक, प्रभावी आणि सहभागी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. पवन पाटील यांनी केले. त्यांनी २०२४-२५ या वर्षात क्लबने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा दिला आणि सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, ग्रामीण शाळांना मदत, युवावर्गासाठी करिअर मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले. तसेच मावळते सचिव रोटेरियन शिवाजी शिंदे यांनी संयोजन आणि नियोजन यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. क्लबच्या कार्यकाळातील अभूतपूर्व योगदानाबद्दल दोघांनाही यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले. या भव्य कार्यक्रमास डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर किरण देशमुख यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी अध्यक्षस्थापना सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करत रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. या कार्यक्रमाची यशस्वीता ही केवळ नवीन अध्यक्ष आणि सचिव यांच्या नेतृत्वानेच नव्हे, तर संपूर्ण रोटरी कुटुंबाच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झाली. या निमित्ताने रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अनेक सदस्य, माजी पदाधिकारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. विशेषतः भाईसाहब अग्रवाल निलेश कोटेचा, संजय कोतकर, चंद्रकांत पाटील, सौ. उदावंत मॅडम, भरत सिनकर, चंद्रकांतजी लोडाया, सुयोगभाई जैन, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. पंकज शिंदे, डॉ. सिद्धांत तेली, प्रज्ञेश खिलोशिया, डॉ. किशोर पाटील आणि डॉ. विशाल पाटील,गिरीश दुसाने,तहसीलदार श्री बनसोडे साहेब ,मुख्याधिकारी साहेब श्री मंगेश देवरे ,पोलिस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब ,डॉ.नितीन जमदाडे ,डॉ.राहुल काटकर ,डॉ.तौसिफ खाटीक ,सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन तायडे ,डॉ.मुकेश राठोड ,डॉ.विजय पाटील,शिंदे इंटरनेशनल स्कूल चे प्रिंसिपल श्री विजय पाटील सर ,होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विशाल पाटील ,डॉ.हृषिकेश चौधरी ,डॉ.अभिषेक जगताप ,डॉ.संकेत विसपुते,डॉ .प्रवीण माळी ,डॉ.स्वप्नील पाटील,रावसाहेब पाटील सर , व इतर सर्व रोटेरियन महिला सदस्य तसेच सम्मानीय रोटेरियन सदस्य तसेच पदाधिकारी हे जळगाव अमरावती नाशिक व चाळीसगाव येथून ही उपस्तीत होते . या सदस्यांचा उल्लेख करत नव्या कार्यकारिणीने विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. या संपूर्ण सोहळ्याला अनुशासन, वेळेची पाळी आणि आदरयुक्त वातावरण या गोष्टींनी अधिकच भारदस्त रूप दिले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची आणि संगीताचा आस्वाद घेता येईल अशा संगीतमय वातावरणाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी जबाबदारी पार पाडणाऱ्या केटरिंग आणि डीजे टीमचेही मनापासून आभार मानण्यात आले. आजचा दिवस रोटरी क्लब पाचोरा-भडगावसाठी एक सन्मानाचा, प्रेरणादायी आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे. अध्यक्ष रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या उत्साहवर्धक भाषणातून संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी देण्याची भूमिका मांडली आणि सेवाभावाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाने ‘सेवा हेच आपले व्रत’ या ब्रीदवाक्याला साजेसा भाव आणि कृती दिली. समाजात सकारात्मकता पसरवणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे, युवा पिढीला दिशा देणे आणि आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यांसारख्या मूलभूत क्षेत्रांत रोटरीची प्रभावी उपस्थिती दिसून येणे हेच खरे यश आहे. आजचा सोहळा ही पुढील सेवाभावाच्या वाटचालीसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे. या अध्यक्षस्थापना कार्यक्रमातून नवीन कार्यकारिणीने एक नवा अध्याय सुरू केला आहे. या अध्यायाचे प्रत्येक पान समाजहिताच्या कार्याने भरलेले असेल, अशी खात्री सर्व उपस्थित रोटेरियन बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांचे आभार मानत, पुढील काळात रोटरीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.
पाचोरा: केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ ही व्यापक आणि स्पर्धात्मक मोहीम राबविण्यात येते. या अभियानांतर्गत 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाचोरा नगरपरिषदेनेही आपला सक्रिय सहभाग नोंदवित, अत्यंत नियोजनबद्ध व सुसंगत पद्धतीने विविध निकषांवर काम करून लक्षणीय यश संपादन केले आहे. या सर्वेक्षणाचा अंतिम निकाल 17 जुलै 2025 रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये पाचोरा नगरपरिषदेस हागणदारीमुक्त ODF++ व कचरा व्यवस्थापन संदर्भातील उपाययोजनांमुळे थेट 3 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. एकूण १२,५०० गुणांपैकी प्रभावीपणे ८२९४ गुणांची कमाई करीत पाचोरा शहराने राज्यात १३६ वे, नाशिक विभागात ९ वे, तर देशपातळीवरील ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात १८६ वे स्थान मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ‘ब वर्ग’ नगरपरिषदांमध्ये पाचोरा नगरपरिषदेने ४ था क्रमांक मिळवला असून, संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गौरवास्पद ठरली आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, शहरातील प्रत्यक्ष स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, लोकसहभाग, आरोग्याशी निगडित उपाययोजना, ग्रीन व क्लीन झोन निर्मिती, प्लास्टिकमुक्त मोहिमा, जल व मलनिस्सारण व्यवस्थापन, डंपिंग ग्राउंडची कार्यक्षमता, तसेच नागरिकांचे सक्षमीकरण अशा सर्वच अंगांनी पाचोरा नगरपरिषद यांनी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. या कामगिरीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे व समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्येही एक वेगळाच अभिमान निर्माण झाला आहे. या यशाचा गौरव करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, “हे यश केवळ प्रशासनाचे नसून, शहरातील प्रत्येक नागरीकाच्या सहकार्याचे फलित आहे. स्वच्छता, आरोग्य, प्लास्टिकमुक्ती, ओला-सुका कचरा वेगळा करणे, डोअर टू डोअर कलेक्शन, सायकलच्या माध्यमातून जनजागृती, डिजिटल फीडबॅक अशा अनेक गोष्टींचे सातत्यपूर्ण पालन नागरिकांनी प्रामाणिकपणे केल्यामुळेच हे यश शक्य झाले. माझ्या नगरपरिषदेतील विशेषतः आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन या अभियानाची तयारी केली आणि त्याचा परिणाम आपल्याला या मानांकनाच्या रूपाने मिळाला आहे.” याचबरोबर त्यांनी पुढे आवाहन करताना सांगितले की, “हे यश थांबण्याचे ठिकाण नाही, तर पुढील वाटचालीची दिशा आहे. नागरिकांनी यापुढेही नगरपरिषदेस स्वच्छतेसह इतर अनुषंगिक बाबतीत सहकार्य करावे. आपण सर्वांनी मिळून पाचोरा शहराला आगामी काळात ५ स्टार मानांकन प्राप्त करून देण्यासाठी सज्ज होऊ या.” तसेच मुख्याधिकारी देवरे यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय, आरोग्य, सफाई व तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे, तसेच शहरातील स्थानिक सामाजिक संस्था, विविध शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, व्यापारी संघटना यांचे यथोचित आभार मानले. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत घेतले गेलेले विविध उपक्रम हे केवळ सरकारी कागदोपत्री पुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत दिसून आले. नगरपरिषदेने शहरात राबवलेल्या ‘डस्टबिनमुक्त शहर’, ‘स्वच्छ पाचोरा – सुंदर पाचोरा’, ‘फूटपाथ विक्रेत्यांचे प्रशिक्षण’, ‘प्रशासन तुझ्या दारी – स्वच्छता माझी जबाबदारी’, ‘शाळांमधील स्वच्छता स्पर्धा’, ‘वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण’ असे अनोखे उपक्रम नागरिकांनी स्वीकारले. ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेच्या आधारे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुशोभिकरण, तसेच पुनर्वापरयोग्य वस्तूंमधून आकर्षक वस्तू तयार करणे यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या सगळ्या उपक्रमांचे परीक्षण करताना केंद्र शासनाच्या मूल्यांकन समितीने समाधान व्यक्त केले होते. अशा प्रकारे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत पाचोरा नगरपरिषदेस ‘३ स्टार मानांकन’ प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब असून, यामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा अधिकच रोवला गेला आहे. भविष्यात याच धर्तीवर आणखी उत्तम कामगिरीसाठी शहर सज्ज आहे. नागरिकांनी केवळ ‘स्वच्छता’ ही सरकारची जबाबदारी न मानता ती ‘स्वतःची जबाबदारी’ समजून पुढे आले, तर पाचोरा शहराला राष्ट्रीय पातळीवर आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण होणार यात शंका नाही. हे यश म्हणजे केवळ मानांकन नसून, शहराच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात नगरपरिषदेने अधिकाधिक ‘स्मार्ट आणि स्वच्छ’ धोरण अंगीकारून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम सुरू ठेवावे, हीच अपेक्षा सर्व स्तरांमधून व्यक्त होत आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये पाचोरा नगरपरिषद प्रशासनाचे नेतृत्व, नागरी सहभाग, माध्यमांचे प्रबोधन, आणि सर्व विभागांचे सुसूत्र समन्वय हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतेसाठीचा हा प्रवास येथेच थांबू नये, तर दरवर्षी पुढे जाऊन ‘स्वच्छ पाचोरा – तेजस्वी पाचोरा’ या दिशेने वाटचाल व्हावी, हीच सर्वांची मनोकामना आहे.
पाचोरा शहरात एक अत्यंत मनमिळावू, सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच पुढे राहणारी, मदतीसाठी तत्पर आणि सेवाभावी वृत्तीची असामान्य व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेल्याचे दुःखद आणि काळजाला चटका लावणारे वृत्त… पाचोऱ्यातील ज्येष्ठ आणि जिंदादिल व्यक्ती म्हणून परिचित असलेले नितीनभाऊ शिवचंद राठी यांचे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी शुक्रवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पाचोरा शहरासह सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक आणि पारिवारिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पुत्र अनिकेत यांच्यासह संपूर्ण राठी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.नितीनभाऊ राठी हे केवळ नावापुरते नव्हे, तर आचार-विचार, कृती, संवाद आणि सेवाभाव यातून खऱ्या अर्थाने “राठी” कुटुंबाची प्रतिष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष उर्जा होती. कोणताही माणूस भेटला तरी त्याच्याशी आत्मीयतेने बोलणे, त्याच्या अडचणीत समजूतदारपणे मार्गदर्शन करणे आणि शक्य तितकी मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. ते नेहमी हसतमुख असायचे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असायचं – ज्यामुळे कोणीही त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकत असे.त्यांचे सामाजिक योगदानही उल्लेखनीय होते. कोणतीही समाजोपयोगी बाब असो, धार्मिक उत्सव असो वा एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीची गरज असो – नितीनभाऊ नेहमी सर्वप्रथम पुढे असायचे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि कोणतेही काम ही आपली जबाबदारी समजून पार पाडायचे. मदतीची अपेक्षा करणाऱ्याला ‘नाही’ हा शब्द त्यांच्या तोंडून कधीही ऐकायला मिळत नसे. समाजात आपले कार्य करताना त्यांनी कधीच प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही, तर आपल्या परोपकारी स्वभावातून अनेकांचे जीवन समृद्ध केले.पाचोऱ्यातील शिवचंद रामकिसन राठी कुटुंबातील नितीनभाऊ हे अनेक पिढ्यांपासूनची सामाजिक प्रतिष्ठा जपणाऱ्या घराण्याचे नाव होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या कष्ट, आदर्श आणि मूल्यांचा वारसा जपताना स्वतःच्या वागणुकीतून त्याला अधिक बळ दिले. वडिलांप्रमाणेच त्यांनीही आपल्या जीवनात कधीच आराम किंवा चैन शोधली नाही, तर सध्या राहून सर्वांच्या सुखासाठी झटणे, हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.माणुसकीचे दर्शन म्हणजे नितीनभाऊ राठी. त्यांच्या अंतर्मुख सहानुभूतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. वैयक्तिक आयुष्यात त्यांचा संयम, नीतिमत्ता, आणि सकारात्मक दृष्टिकोन हे गुण त्यांच्या मित्रपरिवारातही आदराने पाहिले जात. त्यांचा प्रत्येक मित्र, सहकारी, परिचित हे त्यांच्याशी असलेल्या आठवणींना आता डोळ्यांत अश्रू घेऊन उजाळा देत आहेत. त्यांनी एखादी गोष्ट एकदा मनाशी घेतली की ती पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेतली नाही. त्यांच्या भाषेत गोडवा होता आणि स्वभावात सौजन्य होतं.सद्यस्थितीत समाजात सहकार्य, आपुलकी, आणि माणुसकी कमी होत चालली असताना नितीनभाऊंसारख्या व्यक्तींचे अस्तित्व हे खूप मोठा आधार ठरत असे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघण्यासारखी नाही. समाजात कुणीतरी असा हवा जो हसत हसत दु:खातल्या माणसाच्या पाठीशी उभा राहील, नितीनभाऊ त्या प्रकारात मोडत होते.त्यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जिन्गारो बारावे तसेच पगडी समारंभ दिनांक २२ जुलै २०२५ मंगळवार रोजी निश्चित करण्यात आले असून, पगडी समारंभ सकाळी ११ वाजता & गंगाप्रसादी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. हा कार्यक्रम अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्र, सहकारी, व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी उपस्थित राहून नितीनभाऊंसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहणार आहेत नितीनभाऊंचे स्मितहास्य, त्यांच्या प्रेमळ आठवणी आणि माणुसकीची ओळख कायम पाचोऱ्याच्या स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज संपादक संदीप महाजन व परिवारा तर्फे प्रभ्रू चरणी प्रार्थना…