Home Blog Page 86

संकल्प से सिद्धी अभियानाअंतर्गत पाचोरा कार्यशाळेत उल्लेखनीय उपस्थितीत संपन्न

0

Loading

पाचोरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारने नुकतीच यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केली असून, या महत्त्वपूर्ण वाटचालीचा देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे. “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी शीर्षकाखाली हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात विभागीय स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नाशिक विभागीय कार्यशाळा दिनांक ५ जून २०२५ रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी नाशिक विभागातील सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेला भाजपा प्रदेश आणि केंद्र स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शकांमध्ये भाजपा केंद्रीय महामंत्री अरुण सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री संजय सावकारे, प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी, विक्रांत पाटील, तसेच महाराष्ट्र कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांचा समावेश होता. या कार्यशाळेमध्ये भाजप सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा आढावा, कार्यपद्धती, भविष्यातील ध्येयधोरणे, तसेच ‘संकल्प से सिद्धी’ मोहिमेचे सखोल विश्लेषण सादर करण्यात आले. केंद्र सरकारने केलेली शेतकरी कल्याणाची कामगिरी, जलसंधारण, गोरगरीबांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरण, युवा रोजगारासाठीचे उपक्रम, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा विविध उपक्रमांचा आढावा घेतला गेला.
नाशिक येथे झालेल्या या कार्यशाळेत पाचोरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात पाच मंडळांपैकी तीन मंडळ अध्यक्षांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये गोविंद चंद्रकांत शेलार, अनिल मुरलीधर पाटील आणि प्रमोद देविदास पाटील हे विशेषतः उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती पाचोरा भागातील संघटनात्मक बांधिलकी आणि भाजपच्या विचारसरणीवरील निष्ठा अधोरेखित करणारी होती.
कार्यशाळा संपल्यानंतर पाचोरा येथे परतल्यावर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण शहर व तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी सुभाषभाऊ मुंडेपाटील, मधुभाऊ काटे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ नाशिक कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आले, तसेच “संकल्प से सिद्धी” अभियानाचा प्रभावी प्रचार कसा करावा याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत दिलीपभाऊ वाघ यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील यशस्वी निर्णयांची माहिती देत, त्या कामगिरीचा सामान्य जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “हे अभियान केवळ भाजपच्या कार्यकाळाचा उत्सव नाही, तर देशाच्या विकास प्रवासातील एक नवसंकल्पना आहे,” असे त्यांनी म्हटले. सदस्य नोंदणी अभियानाबाबतही या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भाजपा द्वारे संपूर्ण राज्यात आणि देशात चालू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा एक भाग म्हणून कार्यकर्त्यांनी अधिकाधिक नागरिकांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी झटावे, असा संदेश दिला गेला. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा डॉ माणिक पाटील यांनी सुरेखपणे पार पाडले. सदस्य नोंदणी प्रक्रियेचे तांत्रिक मार्गदर्शन कृष्णा साळुंखे आणि स्वप्नील ठाकरे यांनी केले. त्यांनी ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रिया, उपलब्ध पोर्टल्सचा वापर, मोबाईल अ‍ॅप्सचा उपयोग अशा तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. या बैठकीदरम्यान सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल प्रचाराचे युग लक्षात घेता, सदस्य नोंदणी, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, तसेच मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने आणि ऊर्जा घेऊन आगामी काळात भाजपची विचारसरणी व योजना घराघरात पोहोचवण्याचा निर्धार केला. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात, विविध मंडळांमार्फत सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाच्या निमित्ताने एकंदरीत पाचोरा तालुक्यात भाजपा संघटनेच्या कामकाजात नवचैतन्याचे वारे वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवसंघटन आणि विस्ताराचे उद्दिष्ट गाठण्यासाठीची ऊर्जा निर्माण झाली आहे.
या प्रकारच्या कार्यशाळा आणि बैठका ही पक्ष संघटनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावत असून, संकल्प से सिद्धी अभियानाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने आणि एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाचोऱ्यात भव्य उत्साहात भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

0

Loading

पाचोरा (भोला पाटील ) भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या नव्या उंची गाठणाऱ्या यशस्वी वाटचालीला यंदा अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने देशभरात “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहर शाखेच्यावतीने आज दि. २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, शहरात सदस्य नोंदणी अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भाऊसो. दिलीप वाघ होते. त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. कार्यक्रमास पाचोरा शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पाचोरा शहराच्या सभासद नोंदणीच्या इतीहासात ऐतिहासिक गर्दी प्रथमच दिसुन आली या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना “८८ ०००० २०२४” या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात युवक, महिला, व्यापारी, शेतकरी, विविध समाजघटक भाजपाशी जोडले जात आहेत
या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः नानासो. संजय वाघ, भाऊसो. मधुकर काटे, नानासो. व्ही. टी. जोशी, सुभाष पाटील, प्रदीप पाटील,डॉ. शांतीलाल तेली, रमेश वाणी , नंदू सोमवंशी, शिवदास पाटील, वासुदेव माळी, दादासो. सुदाम वाघ, हारूण देशमुख,सतीश चौधरी, अशोक मोरे,शरद पाटील, भूषण वाघ, निलेश पाटील, सुरज वाघ, बंटी महाजन ,अमोल ठाकूर,विनोद पाटील, भगवान मिस्तरी, बंडू नाना, अ‍ॅड. ललित सुतार, सुनील पाटील, हरीश पाटील, अनिल पाटील, वाजिद बागवान, ए. जे. महाजन, बंटी पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. महिला नेतृत्वाचा सशक्त प्रत्यय देणाऱ्या ताईसो. सुचेता वाघ, ताईसो. ज्योती वाघ, ताईसौ. प्रमिला वाघ, ताईसो. सरला पाटील, ताईसो. जयश्री मिस्त्री, ताईसो. सुरेखा पाटील, ताईसो. दीपमाला पाटील यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मार्गदर्शन करताना मा. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, “देशाचे नेतृत्व करीत असलेले मा. नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ही प्रगती आणखी गती घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने भाजपच्या विचारधारेशी जोडले गेले पाहिजे. सदस्य नोंदणी हे केवळ औपचारिक कार्य नसून, देशहिताच्या दिशेने उचललेले एक सशक्त पाऊल आहे.”
“पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा परिवर्तनाचा वाहक असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि गरिबांच्या सक्षमीकरणाची धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
सभासद नोदणी अभियानाला मिळणारा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गर्दी उसळली होती. अनेक युवक, महिला, व्यापारी, शेतकरी तसेच विविध घटकांतील नागरिकांनी भाजप सदस्यत्व घेण्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी मोबाईलद्वारे “८८ ०००० २०२४” वर मिस्ड कॉल करून सदस्य नोंदणी करून दिली.या अभियानात डिजिटल सदस्य नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोबाईल अ‍ॅप, मिस्ड कॉल सुविधा, आणि ऑनलाइन पोर्टल्स यांचा वापर करून नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने केली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याने सदस्य नोंदणी प्रक्रियेची कार्यप्रणाली काळानुरूप अत्याधुनिक करण्यात आली आहे. या सदस्य नोंदणी अभियानामुळे पाचोरा शहरात राजकीय जागृतीसोबतच सामाजिक एकात्मतेचाही एक नवा अध्याय सुरु झाला आहे. विविध वयोगटांतील नागरिक, विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या अभियानात सहभागी झाल्याने एकात्मता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने समाज एकवटताना दिसून आला. या अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर पाचोरा शहर भाजप शाखेच्यावतीने पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागात, वार्डात आणि गल्लोगल्लीत जाऊन सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा नवीन सदस्य जोडावेत, अशा उद्दिष्टासह काम सुरू करण्यात येणार आहे “भाजप सदस्य नोंदणी अभियान” हे केवळ संघटनात्मक बळकटीकरणाचे माध्यम नसून, देशाच्या सशक्त, आत्मनिर्भर आणि सुरक्षित भविष्यासाठी जनतेच्या सहभागाचे प्रतीक आहे. पाचोरा शहरात राबवले गेलेले हे अभियान हा उत्साह, संघटन आणि जनतेच्या विश्वासाचा भक्कम पुरावा ठरला आहे. यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर अध्यक्ष, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते यांचे विशेष योगदान राहिले.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

0

Loading

पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात दिनांक २० जून २०२५ रोजी, लिपिक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना आणि एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरात जिल्हा परिषदेतील १५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शिबिरातील तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे कर्मचारी समाधानी होते. अनेक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून पुढील काळात असे उपक्रम अधिक प्रमाणात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपूर्ण आरोग्य तपासण्या व मोफत शस्त्रक्रियेची तरतूद

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, ईसीजी अशा तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत जे रुग्ण निदान झाले, त्यांच्यावर एम. एल. ढवळे ट्रस्टमार्फत मोफत शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे, असे वैद्यकीय समाजसेवक श्री. अविनाश संदनशिव यांनी सांगितले.
विशेषतः डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि कर्मचारी वर्गाची सकारात्मक प्रतिसादमूलक भूमिका यामुळे उपक्रम अधिक परिणामकारक ठरला.

यशस्वी नियोजन व संघटनांचे सहकार्य

सदर शिबिराचे नियोजन किशोर पाटील (राज्य सचिव) व प्रसाद संखे (जिल्हाध्यक्ष, लिपिक कर्मचारी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भाऊसाहेब पठाण (राज्याध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ) आणि मुकुंद तुरे (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हे सलग पाचवे यशस्वी शिबिर होते, ही विशेष बाब आहे.

व्ही. एम. हुंडेकर (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग) यांनी शिबिरास भेट दिली. त्यांनी स्वतः तपासणी करून घेतली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
त्यांनी सांगितले, “कर्मचाऱ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे. ही कृती शासकीय कार्यक्षमतेसाठी देखील पूरक ठरते.”

आरोग्य व सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम

सदर शिबिराच्या माध्यमातून फक्त आरोग्य तपासणीच नव्हे, तर निदान, उपचार व मोफत शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचणारी आरोग्यसाखळी निर्माण करण्यात आली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सशक्त आरोग्यासाठी संघटनांची व वैद्यकीय संस्थेची बांधिलकी ठळकपणे दिसून आली.
“आरोग्यम् धनसंपदा” ही संकल्पना यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श उदाहरण ठरला.

मुख्यमंत्र्यांचा डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय: जळगाव येथे पत्रकार संघाकडून गौरव

0

Loading

पाचोरा ( भोला पाटील ) राज्यातील डिजिटल माध्यमांना न्याय देत, त्यांना शासकीय धोरणात स्थान देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पत्रकारितेविषयी असलेली त्यांची संवेदनशीलता आणि दुरदृष्टी सिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे विशेष स्वागत करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाच्या राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे मनापासून अभिनंदन करताना स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री महोदयांनी डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो डिजिटल पत्रकारांना न्याय मिळाला असून, या माध्यमांना शासकीय मान्यता व आर्थिक स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.” जळगाव विमानतळावर झालेल्या छोटेखानी पण अत्यंत सन्मानपूर्वक कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, गुलाब पुष्प, व विशेष आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना “पत्रकार हितैषी मुख्यमंत्री” अशी उपाधी देत त्यांच्या निर्णयाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार संघाच्या विविध विभागांतील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेकांनी हा क्षण “डिजिटल पत्रकारिता क्षेत्रासाठी नवा सूर्य उगवण्याचा क्षण” म्हणून संबोधला. २० सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने “डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण” जाहीर करताना शासन निर्णय क्रमांक-२०२३/प्र.क्र.३२१/प्रसार-५ अंतर्गत मार्गदर्शक नियम प्रसिद्ध केले. या निर्णयात डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती देण्यासाठी स्पष्ट निकष, पारदर्शी प्रक्रिया, आणि नोंदणीच्या आधारावर जाहिरात पात्रता यासंबंधीच्या नियमांची मांडणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डिजिटल पत्रकारितेला शासकीय मान्यता प्राप्त झाली, जाहिरातीत पारदर्शकता आणि संधीची समता निर्माण झाली, नव्या पिढीतील डिजिटल पत्रकारांना शाश्वत आधार मिळाला आणि ग्रामीण, निमशहरी भागात सक्रिय असलेल्या डिजिटल पोर्टल्ससाठी ही संजीवनी ठरली.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विशेष आभारपत्रात, पत्रकार संघाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे जाहीर अभिनंदन केले आहे. आभारपत्रात नमूद केले आहे – “आपण ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ जाहीर करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक भान यांना नव्या दिशा प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या या पावित्र्यपूर्ण पावलामुळे डिजिटल पत्रकारांना अधिकृत स्थान प्राप्त झाले असून, त्यांच्या कार्यक्षमतेला शासकीय आधार मिळाला आहे.” पुढे आभारपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “या धोरणामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये समतोल प्रस्थापित होऊन, पारंपरिक माध्यमांसोबत नव्या माध्यमांनाही समान संधी मिळणार आहे. पत्रकार संघ आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो.” मागील काही वर्षांपासून डिजिटल माध्यमांचा झपाट्याने विस्तार होत आहे. वेगवान माहिती प्रसारण, सहज उपलब्धता, मोबाईल फ्रेंडली पोर्टल्स, आणि सोशल मीडियाशी सुसंगतता या घटकांमुळे डिजिटल माध्यमांची प्रभावीता वाढली आहे. परंतु, इतक्या मोठ्या संख्येने कार्यरत असतानाही डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिरात धोरणात स्थान नव्हते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला निर्णय केवळ प्रशासकीय नव्हे, तर पत्रकारितेच्या मूलभूत स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ धोरणात्मक नसून सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचा मानला जातो.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. डिजिटल माध्यमांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून देण्यासाठी विविध पातळ्यांवर निवेदने, चर्चासत्रे व मोहिमा राबविल्या. त्या पाठपुराव्याला आता सकारात्मक यश मिळाले आहे. प्रवीण सपकाळे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता, तर डिजिटल माध्यमे अजूनही उपेक्षित राहिली असती. हा निर्णय म्हणजे आमच्या दीर्घकालीन संघर्षाला मिळालेला न्याय आहे.” या निर्णयानंतर राज्यभरातील पत्रकार, विशेषतः ग्रामीण आणि जिल्हास्तरावरील डिजिटल पत्रकार, अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. काहींनी तर या निर्णयामुळे त्यांच्या माध्यम संस्था वाचवल्या गेल्याचेही नमूद केले आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, जळगाव, नाशिक आदीमुख्यमंत्र्यांचा डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय: जळगाव येथे पत्रकार संघाकडून गौरव जिल्ह्यांतील पत्रकारांनी “हा निर्णय म्हणजे पत्रकार क्षेत्रात सरकारचा ऐतिहासिक हस्तक्षेप आहे, जो अत्यंत गरजेचा होता” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शासनाने हे धोरण घोषित केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. यासंदर्भात पत्रकार संघाने काही प्रमुख मागण्या पुढे मांडल्या आहेत – जिल्हास्तरावर डिजिटल माध्यमांची नोंदणीची यंत्रणा सक्षम करणे, जाहिरात वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, धोरणाचे तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन करणारी समिती स्थापन करणे आणि माध्यम संस्थांच्या आर्थिक शाश्वततेसाठी विशेष निधी अथवा सवलतींचा विचार करणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ हा निर्णय महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. हा निर्णय केवळ डिजिटल पत्रकारांसाठी नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा मुक्त प्रवाह आणि लोकशाही मूल्यांची जोपासना यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांची व्याप्ती अधिक भक्कम होईल, त्यांना हक्काचे स्थान प्राप्त होईल आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या उंची गाठता येईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

चक्री व्यवसायाआड दबाव, धमकी आणि पत्रकारातीच्या आड डॉनशाहीचे सावट – पोलिसांनी उघडकीस आणली काळी बाजू

0

Loading

पाचोरा – शहरात अलीकडच्या काळात ‘चक्री’ या नावाखाली सुरू असलेल्या तथाकथित व्यावसायिक उपक्रमाने नव्या वळणावर प्रवेश करत तथाकथित बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार समाजात दहशत निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. चक्रीच्या नावाने सुरू झालेली हप्त्यांची वसुली, त्यामागे उभी राहिलेली बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार अशा एक स्वयंघोषित पत्रकारांचा डॉन पोलिसांवर दबाव आणि सामान्य व्यावसायिकांच्या मनात पसरलेली भीती – या साऱ्या घटनांनी शहरातील सामाजिक शांततेला जबरदस्त हादरा दिला आहे.
ही घटना केवळ आर्थिक शोषणापुरती मर्यादित न राहता, पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या असंविधानिक आणि धमकीखोर कारवायांचे विदारक उदाहरण बनली आहे. विशेष म्हणजे या घटनेमागे असलेल्या बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार व त्याच्या स्वयंघोषित प्रमुखाचा चेहरा आता सर्वांसमोर उघड झाला आहे.
शहरातील लाकूड व्यापार, खाट व्यावसायिक, लघुउद्योजक आणि इतर अनेक व्यवसायिकांवर “हप्ते वाढवा – अन्यथा चक्री सारखे तुमचे पण धंदे बंद” अशी धमकी देत सुरू झालेल्या या चक्राला
बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार यांचा डॉनचा आधार असल्याचे समोर आले आहे. स्वतःला या संघटनेचा डॉन म्हणवून घेणाऱ्याने काही स्थानिक व्यावसायिकांना एका घरगुती बैठकीत बोलावून दरमहा 1000 रुपये देण्याचा ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे, काही व्यावसायिकांनी ही मागणी मान्य केली, पण बहुसंख्य व्यवसायिकांनी स्पष्ट नकार दिला.
यासोबतच, शहरातील नीलम हॉटेलजवळ या तथाकथित पत्रकार डॉनने एका चक्रीधारकासमोर उघडपणे शिविगाळ करत धमकी दिली की, “आम्ही सांगू तेव्हा चक्री सुरू राहील, सांगू तेव्हा बंद करु.” अशा प्रकारची भाषा एखाद्या लोकशाही देशात, तीही पत्रकारितेच्या बुरख्याआड वापरण्यात येणं हे चिंतेचं आणि धक्कादायक होतं.
एवढंच नव्हे तर या तथाकथित पत्रकार डॉनच्या दबावापोटी एका चक्री धारकाला इतर चकलीधारकांच्या दबावापोटी जबरदस्तीने माफीनामा सादर करावा लागला. शहराच्या मध्यवर्ती चौकात उभं करून, “मी चुकीचं बोललो, आम्हाला माफ करा” आणि चक्री सुरू करा अशा स्वरूपाचा माफीनामा द्यावा लागला, हे पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही जबरदस्ती केवळ एका व्यक्तीविरोधातील नाराजी नव्हती, तर पूर्ण पत्रकारितेच्या मूल्यांवरच एक मोठा धक्का होता.
या कथित बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकाराच्या डॉनने पुढे जाऊन पोलिसांवरही चक्री सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “आम्ही सांगु तेव्हा सुरू, आम्ही सांगू तेव्हा बंद,” अशा प्रकारची मागणी करून, पोलिस यंत्रणेला सरळ सरळ आदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.अन्यथा विविध मार्गाचे आरोप करत पोलीस निरीक्षकाची बदली करू अशी धमकी सोशल मीडियावर देणे सुरु केले पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत, कोणत्याही बेकायदेशीर मागणीला झुकून न देता, संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. यामध्ये गुप्त चौकशीही सुरू करण्यात आली असून, संबंधित घटकांविरोधात गंभीर कारवाईची शक्यता आहे. पाचोरा शहरात गेल्या काही 4-5 वर्षापासून पत्रकारितेच्या नावाखाली एक विचित्र आणि धोकादायक प्रकार वाढीस लागला आहे. बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार व त्या संघटनेचा प्रमुख स्वतःला ‘डॉन’ म्हणवून घेत, डॉक्टर, व्यापारी, अधिकारी, खाट व्यवसाईक , लहान – मोठे खाद्य विक्रेते, खाटांच्या कपल ग्राहकांना टार्गेट करत, ‘ब्रेकिंग टाकू’, ‘न्यूज लावू’, ‘तुमचं करियर संपवू’ अशा धमक्यांनी ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याचे अनेक व्यवसायिकांनी खंत व्यक्त केली आहे.यामध्ये विविध रुग्णालये, दुकाने आणि खाट व्यवसाईक ठिकाणी येणाऱ्या जोडप्यांवरही दबाव आणून पैसे उकळण्याचा प्रकार समोर येत आहे
या प्रकरणात सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे – जेव्हा संपूर्ण राज्यात पत्रकारांच्या हक्कासाठी मोठ्या पत्रकार संघटना वेळोवेळी आंदोलने करतात, त्या संघटनांनी या
बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार ,पुरस्कार विक्री पाचोऱ्यातील प्रकरणावर एक शब्दही बोललेले नाही. पोलिस प्रशासन या प्रकरणाकडे अत्यंत सतर्कतेने पाहत आहे. पोलिसांनी गुप्त माहिती संकलनास सुरुवात केली असून, अवैधरीत्या व्यवसाय, धमकावणे, दबाव वसुली, आणि कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील शांतता भंग होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. चक्री, लाकूड कटाई, खाट व्यवसाय, डॉक्टर, अधिकारी यांच्यावर होत असलेल्या दबावाचा हा खेळ फक्त एक व्यक्ती किंवा संघटनेपुरता सीमित नाही. ही घटना संपूर्ण शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे. याचा प्रभाव जर असाच वाढत राहिला, तर सामान्य नागरिकांचं जगणं अवघड होईल. नव्हेतर होत आहे ज्याचे शिक्षण नाही, बातमी लिहीणे व बातमीचे प्रकार माहित नाही फक्त ब्रेकिंगवर पोट भरणे व दीपावली & निवडणूक काळात पाकिट वाटपाच्या वेळी तोतया पत्रकार जन्मला आणणे एवढी गर्दी व एवढे पत्रकार माझ्या मागे आहे असे भासवणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वेळ आली आहे की, समाजातील सजग नागरिक, खरे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याचा आदर करणारे लोक एकत्र येऊन अशा डॉनशाही मानसिकतेविरुद्ध आवाज उठवावा. जो कोणी पत्रकारितेच्या नावाने लाजिरवाणी कृत्यं करत असेल, त्याला समाजात स्थान दिलं जाऊ नये.
पाचोरा हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. येथे व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामान्य जनतेचं जीवन यामध्ये सुसंवाद आणि सुसंस्कृततेचा वारसा आहे. पण जर बोगस पत्रकार संघटना व न्युज कार्डवाले बॅनरबाज फेक पत्रकार एखाद्या तथाकथित संघटनेच्या नावाखाली, पत्रकारितेचा मुखवटा घालून, डॉनगिरी केली जाणार असेल, तर त्याला तात्काळ आळा बसायला हवा. पोलीस प्रशासनाने जे धैर्य दाखवले आहे, त्याचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. मात्र, या प्रकारातील पिडीतांनीदेखील आता पुढे येऊन तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे. पोलिसांवर संपूर्ण जबाबदारी न सोडता, नागरिकांनीही अशा ब्रेकिंग टाकणाऱ्या पोटभरु चौकडी विरोधात आपल्या हक्कासाठी ठाम भूमिका घेणे ही काळाची गरज आहे

← Back

Thank you for your response. ✨

महाराष्ट्रात रेंट-ए-बाईक व्यवसायासाठी खुले दरवाजे – मोटार सायकल भाड्याने देण्यावरील निर्बंध हटवले

0

Loading

पाचोरा ( भोला पाटील ) मोटार सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय करणाऱ्या इच्छुक व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गेली अनेक वर्षे लागू असलेले निर्बंध अखेर हटवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पर्यटकांपासून तरुण व्यावसायिकांपर्यंत अनेकांना नव्या संधीचे दार खुले झाले आहे. अधिकृत माहितीनुसार, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ७५ तसेच रेंट-ए-मोटार सायकल स्कीम, १९९७ या धोरणांतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्याची कायदेशीर तरतूद आधीपासूनच अस्तित्वात आहे. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १२ एप्रिल २०१६ रोजीच्या निर्णयानुसार या स्कीमअंतर्गत नवीन लायसन्स देण्यावर निर्बंध लादण्यात आले होते, ज्यामुळे राज्यभरात या व्यवसायाला मर्यादा आल्या होत्या. दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने यासंबंधी महत्त्वाचा आदेश निर्गमित केला असून, यामध्ये २०१६ मधील निर्बंध पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता कोणतीही व्यक्ती किंवा संस्था रेंट-ए-मोटार सायकल स्कीम, १९९७ अंतर्गत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून मोटार सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करू शकते. या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार असून, विशेषतः कोकण, पुणे, नाशिक, सातारा, जळगाव, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तरुणांना व्यवसायाची नवी दिशा मिळणार आहे. पर्यटक आणि प्रवासी आता थेट त्यांच्या गरजेनुसार मोटार सायकल भाड्याने घेऊन प्रवास करू शकतील, जे सार्वजनिक वाहतुकीची आवश्यकता कमी करत स्वतःचा वेळ, ऊर्जा व पैसा वाचवेल. मोटार सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि कमी वेळात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याने अनेक तरुणांसाठी तो आदर्श पर्याय ठरतो. विशेषतः पुणे, नासीक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, लातूर यांसारख्या जिल्ह्यांतील बेरोजगार तरुणांना आता आपल्या गावातच छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत गोवा, केरळ, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान अशा राज्यांत मोटार सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. स्थानिक तरुणांनी थोड्याशा भांडवलात २-५ दुचाकी खरेदी करून पर्यटकांना भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच चांगले उत्पन्न मिळवले. आता महाराष्ट्रातील तरुणांसाठी देखील अशीच संधी उपलब्ध झाली आहे.
मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया कायदेशीर बाबी पूर्ण करूनच होते. संबंधित अर्जदाराने खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवली गेली असून, कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी परिवहन विभागाने विशेष मदत केंद्र सुरू करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मोटार सायकल भाड्याने देण्यास परवानगी मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि अर्धशहरी भागात अर्थसंचलनाचा वेग वाढणार आहे. वाहनांची विक्री वाढेल, विमा कंपन्यांचे उत्पन्न वाढेल, वाहन देखभाल, स्पेअर पार्ट्स, पेट्रोलपंप यांसारख्या व्यवसायांना देखील अप्रत्यक्ष फायदा होईल. याशिवाय, पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस, खाण्यापिण्याचे स्टॉल्स, स्थानिक मार्गदर्शक यांना देखील काम मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा एकूणच ग्रामीण पर्यटन व व्यावसायिक विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
मोटार सायकल भाड्याने देण्यावरील निर्बंध हटवल्याचा निर्णय हा महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी आहे. अल्प गुंतवणुकीत मोठ्या उत्पन्नाची संधी, पर्यटन क्षेत्राला चालना, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागात व्यवसायाचा विकास हे या निर्णयाचे महत्त्वाचे फायदे आहेत. शासनाने घेतलेला हा सकारात्मक आणि दूरदर्शी निर्णय केवळ एक धोरणात्मक बदल न राहता, तो हजारो तरुणांचे भवितव्य उजळवणारा ठरू शकतो.

आज दि २१ जून २०२५ (शनिवार) सर्व १२ राशींचे भविष्य, शुभ अंक व शुभ रंग

0

Loading

१. मेष (Aries)
आजचा दिवस मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
शुभ अंक: ७ | शुभ रंग: भगवा

२. वृषभ (Taurus)
कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. जुने अडथळे दूर होण्यास मदत होईल. प्रेम व नातेसंबंधात सौहार्द निर्माण होईल. खाण्यापिण्यात節 संयम ठेवा.
शुभ अंक: ४ | शुभ रंग: पांढरा

३. मिथुन (Gemini)
आज तुमचं वाक्चातुर्य फळ देईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात गुप्तता राखावी. मित्रांकडून मदत मिळेल.
शुभ अंक: ५ | शुभ रंग: हिरवा

४. कर्क (Cancer)
आजचा दिवस मन:शांती देणारा आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पडतील. घरात थोडासा तणाव संभवतो. मनातील चिंता थोडीशी वाढू शकते. ध्यान-धारणा फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: २ | शुभ रंग: पांढरट निळा

५. सिंह (Leo)
नवीन कामांची सुरुवात करण्यास योग्य दिवस. वरिष्ठांची मर्जी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. उधार देणे-घेणे टाळा. आत्मप्रसिद्धी टाळावी.
शुभ अंक: १ | शुभ रंग: केशरी

६. कन्या (Virgo)
आज एखादी जुनी योजना यश देऊ शकते. घरात काही खर्च वाढू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे.
शुभ अंक: ६ | शुभ रंग: गडद निळा

७. तुळ (Libra)
तुमचं संतुलन आणि संयम आज परीक्षेत असेल. निर्णय घाईने न घेता विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता. कायदेशीर बाबींत काळजी घ्या.
शुभ अंक: ९ | शुभ रंग: जांभळा

८. वृश्चिक (Scorpio)
गुप्त योजना यशस्वी होतील. घरातील वडिलधाऱ्या माणसांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आज एखादं रहस्य उघड होऊ शकतं. मन शांत ठेवणं गरजेचं आहे.
शुभ अंक: ८ | शुभ रंग: गडद लाल

९. धनु (Sagittarius)
विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता. नवीन शिकण्याची संधी मिळेल. मित्रपरिवारात काही आनंदाचे क्षण अनुभवता येतील. यात्रा घडण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: ३ | शुभ रंग: पिवळा

१०. मकर (Capricorn)
कामात स्थैर्य आणि जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. थोडं तणावाचं वातावरण असू शकतं. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.
शुभ अंक: ५ | शुभ रंग: राखाडी

११. कुंभ (Aquarius)
आज एखादा जुना मित्र संपर्कात येईल. सामाजिक कामांत सहभागी व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नव्या संधींकडे डोळसपणे बघा.
शुभ अंक: ६ | शुभ रंग: निळसर करडा

१२. मीन (Pisces)
तुमची संवेदनशीलता आज प्रभावी ठरेल. भावनिक निर्णय टाळा. कला, साहित्य किंवा अध्यात्म क्षेत्रात यश. जोडीदारासोबत काही विशेष क्षण.
शुभ अंक: २ | शुभ रंग: जलरंग (फिकट निळा)

महावितरणच्या अकार्यक्षम कारभारावर वीज ग्राहकांचा सूर एकवटला!

0

Loading

कुडाळ (गुरुदत्त वाकदेकर) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरणच्या अकार्यक्षम व अंधाधुंद कारभाराला कंटाळलेल्या वीज ग्राहक, व्यापारी आणि सरपंच संघटनेच्या सदस्यांनी कुडाळ येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. ही बैठक कुडाळ येथील महावितरण कार्यालयातील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या वीज ग्राहकांनी तालुकावार आपापल्या समस्या स्पष्ट शब्दांत मांडल्या आणि तात्काळ लेखी उत्तरांची मागणी केली. रोषाने भरलेल्या या चर्चेत महावितरणचे अधिकारी काहीसे निरुत्तर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, ह्युमन राईट्स कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ (दादा) कुलकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, कुडाळचे गोविंद सावंत, माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी भागातून महावितरणच्या मुख्य वाहिन्या जात असल्याने पावसाळ्यात झाडे पडून वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. यासाठी महावितरणला आधीच ३३ प्राधान्य कामांची यादी देऊन सतर्क करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कामे न होता केवळ कागदोपत्रीच कार्यवाही दाखवली गेल्याचा आरोप संघटनेने केला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्यामुळे काही कामे अपूर्ण राहिल्याची कबुली दिली आणि उघडीप मिळताच झाडांची छाटणी करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यामुळे चर्चेला काहीशी सकारात्मक वळण मिळाले.

तालुकावार समस्यांची यादी रोखठोक मांडली गेली. संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर, गुरुनाथ कुलकर्णी यांनी वैभववाडी व कणकवलीतील प्रश्न उपस्थित केले; नंदन वेंगुर्लेकर यांनी देवगड, मालवणच्या समस्या मांडल्या; महेश खानोलकर, नारायण (बाळा) जाधव यांनी सावंतवाडीतील प्रश्न उभे केले. सावंतवाडीत वारंवार होणाऱ्या वीज खंडित पुरवठ्यामुळे राजू पनवेलकर यांनी रोष व्यक्त केला.

गोविंद सावंत यांनी झाडे न छाटल्याने कुडाळमध्ये दिवसभर वीज गायब असल्याची तक्रार केली. पिंगळी सरपंच आकेरकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, विकास माणगावकर, विजय माणगावकर यांच्यासह अनेकांनी गावपातळीवरील समस्यांची ठळक मांडणी केली. शिवापूर येथून तब्बल ६० किमी अंतर पार करून आलेल्या सरपंच सुनिता शेडगे यांनी विजेविना १५/१५ दिवसांचा अंधार मांडत पुढील बुधवारी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक ठरवली आहे.

राजन परब यांनी सरपंच संघटनेतर्फे जिल्हाभरातील तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. साईनाथ आंबेडकर यांनी कसाल, ओरोस येथील प्रश्न मांडले, तर संजय गावडे यांनी वेंगुर्ल्यातील अभियंत्यांची मागणी व अखंडित वीज पुरवठ्याचे प्रश्न समोर ठेवले.

दोडामार्ग तालुक्याच्या समस्या सुभाष दळवी, भूषण सावंत, संजय गवस, गोपाळ गवस यांनी खोलवर मांडल्या. मोडकळीस आलेले वीज खांब, जंगलातून जाणाऱ्या वाहिन्या, सबस्टेशनच्या जागेची अडचण, वीज अपघातातील पीडित कुटुंबाला आर्थिक मदत यांचा समावेश होता.

ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी संयम आणि ठामपणे महत्त्वाचे मुद्दे कणकवलीचे कार्य. अभियंता माळी, कुडाळचे कार्य. अभियंता वनमोरे आणि अधीक्षक अभियंता यांच्यासमोर मांडले. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी अधीक्षक अभियंत्यांकडून सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील वीज समस्या गंभीर असून अधिकाऱ्यांनी याचा सारासार विचार करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.

या बैठकीस शिवराम आरोलकर, गोविंद कुडाळकर, शेखर गावडे, नारायण गोसावी, भक्ती घाडीगावकर, किरण खानोलकर, वाल्मिकी कुबल, संजय तांडेल, अजय नाईक, अनंत आसोलकर, परशुराम परब, विनायक गाडगीळ, मायकल लोबो, अनिल शेटकर यांच्यासह वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरळीत बैठक पार पाडण्यासाठी कुडाळ पीएसआय भांड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त सांभाळला.

आठवा वेतन आयोग लवकरच स्थापन होणार? – केंद्र सरकारकडून हालचाली गतीमान; कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह

0

Loading

नवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : देशभरातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे – आठवा वेतन आयोग कधी स्थापन होणार आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठीच्या ‘Terms of Reference’ (अटी व कार्यक्षेत्र) निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

काय आहे वेतन आयोग?

केंद्र सरकार दर १० वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करते, जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन महागाई दरानुसार व त्यांच्या गरजांनुसार सुधारता येईल. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून करण्यात आली होती. त्यामुळे आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ शक्य

आठव्या वेतन आयोगांतर्गत पुढील बदल अपेक्षित आहेत:

तक्ता १ प्रमाणे

घटक सध्याचे अपेक्षित वाढ (गुणोत्तर)

किमान मूळ वेतन ₹१८,००० ₹४६,८०० – ₹५१,५२० २.६ ते २.८५ पट
किमान पेन्शन ₹९,००० ₹२२,००० – ₹२५,००० २.५ पट

उदाहरणार्थ, सध्या ₹३०,००० मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचे वेतन वाढल्यानंतर ₹८५,५०० पर्यंत जाऊ शकते. ही वाढ कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा व आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकते.

कर्मचारी संघटनांचे सक्रिय पाठबळ

केंद्र सरकारच्या हालचालींना कर्मचारी संघटनांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. संघटनांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

फिटमेंट गुणोत्तर ३.० पर्यंत करावे

महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करावा

MACP (मूल्यांकनाधीन पदोन्नती योजना) मध्ये फेरबदल

पेन्शन धोरणात पारदर्शकता व सुधारणा

महाराष्ट्रातील परिणाम

महाराष्ट्रात ३.८५ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५.२५ लाख निवृत्त पेन्शनधारक आहेत. आठव्या वेतन आयोगामुळे या सर्व लाभार्थ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार असल्याने राज्यातील कर्मचारी संघटनांतही उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण आहे.

शासनाचे उद्दिष्ट काय?

केंद्र सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, वेतन व पेन्शन यंत्रणेत सुधारणा करण्यामागील प्रमुख हेतू पुढीलप्रमाणे आहेत:

वाढती महागाई लक्षात घेता कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेची हमी

सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल व उत्पादनक्षमता वाढवणे

निवृत्त व्यक्तींना सन्माननीय जीवनमान

अंतर्गत बाजारपेठेत खरेदीशक्ती वाढवून आर्थिक चक्राला चालना

तक्ता २ प्रमाणे

वेतनवाढीचे अंदाजित उदाहरणे

मूळ वेतन (२०२५) गुणोत्तर २.८५ संभाव्य नवीन वेतन

₹१८,००० २.८५ ₹५१,३००
₹३०,००० २.८५ ₹८५,५००
₹४५,००० २.८५ ₹१,२८,२५०

(टीप: ही आकडेवारी अंदाजावर आधारित असून अंतिम आकडे अधिकृत आयोगाच्या अहवालावर अवलंबून राहतील.)

कधी होईल अधिकृत घोषणा?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार येत्या काही आठवड्यांत आठव्या वेतन आयोगास अधिकृत मान्यता देईल. यानंतर आयोग नेमून आवश्यक अहवाल सादर केला जाईल. २०२५ अखेरीस अहवाल सादर होऊन १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

आठवा वेतन आयोग केवळ कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आर्थिक दिलासा देणारा निर्णय नाही, तर देशाच्या आर्थिक रचनेला गती देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याची शक्यता असून, देशभरातून या निर्णयाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.

आज दि 20 जुन शुक्रवार चे राशीभविष्य शुभ अंक व रंग

0

Loading

मेष (Aries)
महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक लाभाची शक्यता. कौटुंबिक सौहार्द राहील.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल
वृषभ (Taurus)
नवीन योजना राबवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल. जोडीदाराशी मतभेद टाळा.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा
मिथुन (Gemini)
प्रवासात काळजी घ्या. काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. संवादात स्पष्टता ठेवा.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा
कर्क (Cancer)
घरगुती गोष्टींमध्ये मन रमेल. मानसिक शांती लाभेल. कामावर लक्ष केंद्रित करा.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा
सिंह (Leo)
महत्त्वाची कामे यशस्वी होतील. नवे संबंध जुळतील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी
कन्या (Virgo)
नोकरीतील बदलासाठी योग्य दिवस. जुने प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: राखाडी
तुळ (Libra)
वित्तीय व्यवहारात सावध राहा. नात्यांत गोडवा वाढेल. मानसिक स्थैर्य ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा
वृश्चिक (Scorpio)
आज तुमचं निर्णयक्षमता प्रभावी ठरेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: गुलाबी
धनु (Sagittarius)
विद्यार्थ्यांना यशाचे संकेत. भागीदारीच्या कामात फायदेशीर निर्णय होतील.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: सोनेरी
मकर (Capricorn)
कामात अडथळे संभवतात, संयम ठेवा. वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी
कुंभ (Aquarius)
सामाजिक कार्यात भाग घ्याल. जुन्या मित्रांची भेट होईल. आर्थिक नियोजन करा.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: जांभळा
मीन (Pisces)
सर्जनशीलतेला वाव मिळेल. भावनिक स्थैर्य महत्त्वाचे. जुनी आठवण त्रास देऊ शकते.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट निळा

ताज्या बातम्या

error: Content is protected !!