Home Blog Page 94

पाचोऱ्यातील बंद एटीएममुळे शेतकरी व सामान्य नागरिक त्रस्त; पत्रकार आंदोलनासाठी सज्ज

Loading

पाचोरा : -सध्याच्या काळात देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण बनले असून, शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पैशांसाठी त्यांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. पिकांची लागवड सुरू होण्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी रोख रक्कमेची नितांत गरज असते. मात्र, पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील बहुतांश एटीएम सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढणे अत्यंत कठीण झाले असून, याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये शासकीय मदतीच्या, सोसायट्यांच्या किंवा पीककर्जाच्या माध्यमातून रक्कम जमा झाली आहे. मात्र, ती रक्कम प्रत्यक्षात मिळवण्यासाठी त्यांना बँकेच्या शाखांमध्ये दीर्घ रांगा लावाव्या लागत आहेत किंवा बंद एटीएमपुढे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर पैसे काढण्यासाठी १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या गावातील बँकांमध्ये धाव घेतली आहे, पण तिथेही कधी कॅश नसते, तर कधी नेटवर्क नाही. परिणामी, शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आता पत्रकार बांधवांनी आपल्या संघटना गत तट बाजूला सारून एकत्र येऊन या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्याचा निर्धार केला आहे. सध्या बातम्या संकलित करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजूट होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत, पत्रकारांना संघटना, गट-तट, मतभेद यापलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील पत्रकारांनी ठरवले आहे की, केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरून, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवला जाईल.या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन करण्यात येणार आहे. २९ मे गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्व पत्रकारांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालय व पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना निवेदन सादर करण्यात येईल. निवेदनाद्वारे शहरातील सर्व बंद एटीएम तातडीने सुरु करण्याची मागणी केली जाईल. तसेच, एक आठवड्याच्या आत ही एटीएम सेवा पूर्ववत झाली नाही, तर त्या त्या बँकेच्या बंद एटीएमवर अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.या निषेधात बंद एटीएमवर ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला बँकेत जाऊन एटीएम सेवा तात्काळ सुरू कराव्या यासाठी गुलाबपुष्प देत विनंती करण्यात येणार आहे या आंदोलनामागे कुठलाही राजकीय हेतू नसून, हा शुद्ध सामाजिक आणि जनहितार्थ उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. बँकिंग सुविधा बंद ठेवणे हे केवळ तांत्रिक अडचण नसून, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळणारे कृत्य आहे. शहरातील व तालुक्यातील इतर सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शेतकरी संघटना, व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पत्रकारांनी जर एकत्रितपणे आवाज उठवला, तर प्रशासन आणि बँका निश्चितच जागरूक होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या २९ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

हरियाणातील राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी हर्षवर्धन चौधरीची महाराष्ट्र संघात निवड

Oplus_16777216

Loading

जळगाव – धानोरा येथील युवा क्रिकेटपटू हर्षवर्धन चौधरी याने आपल्या उत्तम खेळगुणांद्वारे राज्याच्या यशात मोलाचा वाटा उचलण्यास सुरुवात केली असून, त्याची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनमार्फत हरियाणा – पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी आणि धानोरा सारख्या ग्रामीण भागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी जळगाव येथे खास सत्कार समारंभाचे आयोजन करून हर्षवर्धन चौधरीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पाटील यांनी चौधरी याच्या खेळगुणांची प्रशंसा करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे नवलसिंगराजे पाटील यांनी या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक खर्चाची स्पॉन्सरशिप घेत उदयोन्मुख खेळाडूला प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण केला आहे.या कार्यक्रमाला दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखरदादा पाटील, त्रिमूर्ती कॉलेजचे चेअरमन मनोजबापू पाटील तसेच माही पाटील हे मान्यवरही उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार सोहळा हा केवळ एका खेळाडूचा गौरव नव्हता, तर हा ग्रामीण भागातील नवोदित युवकांच्या क्रीडाविकासासाठी दिलेला सशक्त संदेश होता.हर्षवर्धन चौधरी याच्या क्रिकेट क्षेत्रातील या यशामागे त्याचा सातत्याने घेतलेला सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील संस्थांची साथ यांचा मोठा वाटा आहे. लहानशा गावातून येणारा हा युवा खेळाडू आपल्या जिद्दीने मोठ्या स्पर्धेत स्थान पटकावतोय, ही बाब इतर अनेक युवकांना प्रेरणादायी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी ही एक दिशा देणारी घटना ठरत आहे.नवलसिंगराजे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आजच्या युगात तरुणांनी खेळासोबत शिक्षणातही प्रगती करणे आवश्यक आहे. राज्यात आणि देशात खेळांच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या असंख्य संधी आहेत. अशा वेळी ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हर्षवर्धनसारख्या मेहनती युवकांना मदत करणे ही माझी सामाजिक जबाबदारी समजून मी स्वतः पुढाकार घेतला आहे.”हर्षवर्धन चौधरी याच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या क्रिकेट अकॅडमी, प्रशिक्षक व खेळाडू यांच्यासाठी ही निवड एक प्रेरणा आहे. हर्षवर्धनच्या या यशामुळे त्याच्या पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचा मार्ग मोकळा झाला आहे.यावेळी चंद्रशेखर दादा पाटील यांनी सांगितले की, “गावपातळीवरून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही. हर्षवर्धनने त्याच्या कष्टाने ही कामगिरी साधली आहे. त्याचा हा प्रवास ग्रामीण भागातील इतर अनेक युवकांसाठी दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.”मनोज बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं की, “आज ग्रामीण भागातील खेळाडू प्रामाणिक सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. हर्षवर्धनसारख्या खेळाडूंना संस्थात्मक पाठबळ मिळाल्यास ते देशासाठीही खेळू शकतील.हर्षवर्धनने सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही निवड माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच माझं ध्येय आहे. नवलसिंगराजे पाटील यांनी मला दिलेली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन हे मला अधिक प्रेरणादायी वाटते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या संधींना अधिक बळ मिळाले आहे.क्रिकेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ग्रामीण खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी – दर्जेदार प्रशिक्षणाची कमतरता, आर्थिक पाठबळाची मर्यादा, व्यासपीठाचा अभाव – या सर्व गोष्टींवर मात करत हर्षवर्धनसारख्या खेळाडूंनी मिळवलेलं यश हे केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरत आहे हर्षवर्धन चौधरीने याआधी जिल्हा व विभागीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याच्या फलंदाजीतील सुस्पष्टता, तंत्रशुद्ध खेळ आणि मैदानावरील सकारात्मक ऊर्जा ही त्याच्या यशाची प्रमुख कारणे आहेत. प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन यांच्यासह खेळाडू मित्रांनीही त्याच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांनीही सहभाग घेत हर्षवर्धनला शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याला पुढील स्पर्धेसाठी किट, बूट, जर्सी यांचे संच प्रदान करण्यात आले. या सोहळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली – ग्रामीण भारतातही प्रचंड क्षमतेचे खेळाडू आहेत, फक्त त्यांना योग्य संधी व मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. नवलसिंगराजे पाटील यांच्यासारखे लोकप्रतिनिधी जर पुढाकार घेत राहिले, तर हर्षवर्धनसारखे अनेक हिरो उदयाला येतील आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारताला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देतील.हर्षवर्धन चौधरीच्या यशाला केवळ क्रीडाक्षेत्रात मर्यादा नाही तर त्याच्या मागे असलेल्या समर्पणाची, कष्टाची आणि चिकाटीची ही कथा आजच्या तरुणाईला एक संदेश देणारी आहे – की स्वप्न मोठी असावी, पण त्यासाठी प्रयत्न त्याहून मोठे असावेत!

जारगाव SBI शाखेचा आदर्श अनुभव : ग्राहकाभिमुख सेवेमुळे ग्रामीण भागातील विश्वासार्ह बँकिंग केंद्र

Loading

पाचोरा – तालुक्यातील जारगाव हे गाव, जे पूर्वी केवळ विकासाचे गांव आणि ग्रामीण अर्थकारणासाठी ओळखले जात होते, आता तिथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेमुळे व व्यवसायामुळे फार मोठे आर्थिक उलाढालीचे एक आदर्श बँकिंग केंद्र म्हणून ओळखले जात आहे. पाचोरा शहरात अनेक मोठ्या बँका असताना, जारगावसारख्या ग्रामीण भागातील शाखेने आपल्या सेवेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या नम्र व पारदर्शक वागणुकीमुळे ग्राहकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कालच्या एका साध्या बँक भेटीतून मिळालेला अनुभव याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरला.
सध्या सर्वच व्यवहार आता डिजिटल होत असताना, बँकेत प्रत्यक्ष जाण्याची वेळ खूप कमीच येते. मात्र, काल कामानिमित्त जारगाव शाखेत जाण्याचा प्रसंग आला आणि तिथे जे वातावरण अनुभवायला मिळाले ते उल्लेखनीय होते. विशेष म्हणजे त्या वेळी शाखा व्यवस्थापक श्रीमती संगिता शिंदे, आणि शिपाई जयदीप कोळी बँकेच्या कामा निमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे शाखेत थोडा अधिक वेळ घालवावा लागला. या वेळेत तिथल्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करता आला आणि यामुळे एक सकारात्मक अनुभव मिळाला.
जारगाव SBI शाखेची वाटचाल ही पाचोऱ्याच्या सुपुत्रांनी घडवलेली यशोगाथा आहे. एकेकाळी पाचोरा शहरातील मोठ्या SBI शाखेतून नागरिक आपले व्यवहार चांगल्या सेवेच्या कारणाने इतर बँकेकडे स्पेशली HDFC बँकेकडे वर्ग करत असताना त्यावेळी जारगाव SBI शाखेचे व्यवस्थापक व पाचोऱ्याचे सुपूत्र अभिलाष (भाई) बोरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पाचोरेकरांनी जारगाव शाखेकडे ग्राहकांची पावले वळवली. मितभाषी व सेवाभावी वृत्ती असलेले श्री बोरकर यांनी त्या काळात आपल्या नम्र कार्यपद्धतीने जारगाव शाखेच्या सेवेला प्रगतीचे आलेखाचे वळण दिले. त्यांच्या बदलीनंतर आलेले नवे व्यवस्थापक विवेक हांडे साहेब यांनी देखील भाई बोरकर यांची परंपरा चालवत ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे काम नेटाने सुरू ठेवले.
कालच्या जारगाव SBI शाखेच्या भेटीत दिसून आले की, संपूर्ण शाखेत शासकीय धोरणानुसार नेहमीप्रमाणे या कार्यालयात सुद्धा कमी व मोजकाच कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. बँक व्यवस्थापक श्रीमती संगीता शिंदे, स्पे. असि. सुनिल महाजन , सहायक लिपीक श्री भामरे , शिपाई जयदिप कोळी, वॉचमन जगदीश पाटील हा संपूर्ण स्टाफ प्रत्येक जण बँकेचे कौटूंबिक सदस्य या नात्याने अत्यंत कार्यक्षमतेने आपापल्या जबाबदाऱ्या तर सोडाच परंतु इतरांच्या देखील जबाबदाऱ्या पार पाडत होते. कामांचे ठराविक विभाग न ठेवल्यासारखेच प्रत्येकजण ग्राहकांच्या गरजेनुसार पुढे सरसावून सेवा देत होते. कुणी ‘हे माझे काम नाही’ असे म्हणताना दिसले नाही. हेच खरे कार्यसंस्कृतीचे लक्षण आहे.
जर पाचोरा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर सद्यास्थितीत HDFC बँक सोडली तर पाचोऱ्यातील अनेक ग्राहकांच्या तक्रारी इतर बँकांच्या बाबत ऐकिवात आहेत. बहुतेक बँकांमध्ये ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांची अडवणूक, दुर्लक्ष, आणि “उद्या या”, “परवा या” अशा वाक्यांच्या सर्रास वापरामुळे सामान्य माणसाला बँकेत जायचे म्हणजे टेंशनचा विषय बनतो. मात्र, जारगाव शाखेत याचा पूर्णतः अभाव होता. येथे ना केवळ ग्राहकांची फसवणूक होते, ना त्यांच्या भावनांशी खेळ. येथे ग्राहकांशी प्रेमळ संवाद साधला जातो आणि त्यांची कामे वेळेत मार्गी लावली जातात.
जारगाव शाखेच्या व्यवस्थापनाकडे पाहिले असता, हे लक्षात येते की यांची सेवा ही केवळ ‘काम’ म्हणून मर्यादित नाही, तर ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून जोपासली जाते. विशेषतः संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला योजना, वृद्धपकाळ योजना अशा विविध शासकीय योजनांचे खातेधारक या शाखेत आहेत. या लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी मोबाईल नंबर लिंक असून शासनाचे अनुदान त्यांच्यापर्यंत वेळेत पोहचविण्यासाठी शाखेतील सर्व कर्मचारी कटिबद्ध आहेत. लाभार्थ्यांना कोणतेही अडथळे न येता त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत, यासाठी शाखेतील प्रत्येक जण जबाबदारीने काम करतो. हे फार मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
या सर्व अनुभवाच्या पार्श्वभूमीवर एक जुना प्रसंग आठवतो. काही वर्षा पूर्वी पाचोरा SBI मुख्य शाखेतील उप-व्यवस्थापक श्री. खोब्रागडे यांनी ‘ध्येय न्युज’ व ‘झुंज’ या स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक संदीप महाजन यांच्याशी वाद घातला होता. श्री.खोब्रागडे यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्या बाबत चुकीचे वक्तव्य केल्याने पाचोऱ्यातीलच नव्हे तर मुंबई स्तरावरील पत्रकारांनी आवाज उठवला होता. परिणामी मुंबई येथील SBI महाराष्ट्राच्या चिफ जनरल मॅनेजर यांनी तातडीने उच्चस्तरावरून चौकशी व दखल घेऊन पाचोरा SBI मुख्यशाखेचे व्यवस्थापक श्री. खोब्रागडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अखेर आमदार किशोरआप्पा यांच्या मध्यस्थिने आणि संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक व्यक्ती असल्याने अभिलाष बोरकर यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेची बाजी लावून हे प्रकरण शांत केले. अखेर श्री खोब्रागडे यांना लेखी माफी मागावी लागली परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील जंगल भागात श्री खोब्रागडे यांची बदली करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जर आज जारगाव शाखेतले वातावरण पाहिले, तर निश्चितच आश्वासक वाटते.
ग्राहकांशी आदराने वागून, त्यांची कामे वेळेवर, पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे केवळ नोकरीसाठी काम करत नाहीत. ते समाजाच्या विश्वासाला उत्तर देतात. प्रत्येक समाधानी ग्राहकाच्या मनातून निघणारी शुभेच्छा, दुवा ही त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठीही अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळेच जारगाव SBI शाखेचे कार्यकर्तृत्व केवळ खात्यांची संख्या , डिपॉझीट, कर्जाचे क्रीम ग्राहक वाढवणारे नाही, तर मनं जिंकणारे आहे.
ग्रामीण भागातही उत्कृष्ट बँकिंग सेवा देऊन विश्वासार्हतेचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जारगाव शाखेचे हे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. या शाखेत बँक म्हणजे एक ताणतणावाचे ठिकाण नसून, मदतीचा आणि विश्वासाचा केंद्रबिंदू बनले आहे. या शाखेचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि संपूर्ण बँक टीम यांचे यासाठी विशेष कौतुक करावे लागेल. पाचोऱ्यासह परिसरातील इतर बँकांनी जारगाव SBI शाखेच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा, हीच अपेक्षा.

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये दिमाखात प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला, पाचोरा-भडगाव राजकारणात नवा सत्ताबदलाचा सूर

Loading

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोऱ्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवलेले प्रतिष्ठित नेते दिलीपभाऊ वाघ यांनी आज मंगळवार दिनांक २७ मे रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात

अधिकृत प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी दिली. महाराष्ट्रातील भाजप मुख्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजपचे वरिष्ठ भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तेजलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन , विधानसभा सभापती राम शिंदे , रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री , आमदार मंगेशदादा चव्हाण ,जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार

पडला. यावेळी पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.दिलीपभाऊ वाघ यांच्या या प्रवेशाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून राजकीय चर्चांना आणि अपेक्षांना नवे वळण लाभले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करत भाजपला स्थानिक पातळीवर मोठे बळ दिले आहे.या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी देखील दिलीप वाघ यांच्या सोबत मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला यात प्रामुख्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पाचोरा पं.स.माजी सदस्य विजय पाटील शेतकरी सहकारी संघाचे संचालक तथा पाचोरा पं.स.चे माजी सभापती अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर भडगाव न.पा.माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामकांत भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भागवत महालपुरे पाचोरा न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव महाजन जळगाव जिल्हा मजुर संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील पाचोरा शेतकरी संघाचे संचालक शिवदास पाटील पाचोरा शेतकरी संघाचे चेअरमन सुनिल पाटील खडकदेवळा सरपंच सुदाम वाघ माजी नगरसेवक तथा शेतकरी संघाचे संचालक शरद पाटील शेतकरी संघाचे संचालक प्रविण गुजर, मच्छिंद्र थोरात, शशी पाटील माजी नगरसेवक अशोक मोरे माजी पं.स.सदस्य ललित वाघ बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्ष संजय राठोड माजी नगरसेवक वाशिद बागवान अंतुर्ली सरपंच वसंत पाटील माजी नगरसेवक रणजित पाटील सु.भा.पाटील प्राथ.विद्यामंदिर चे चेअरमन जगदीश सोनार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत नैनाव माजी नगरसेवक प्रकाश चौधरी अजय अहिरे, अ‍ॅड.अविनाश सुतार, भगवान मिस्तरी, विनोद पाटील, अमोल ठाकूर, सुनिल चौधरी, गिरीष राठोड, प्रशांत महाले, गणेश पाटील, मोहसीन टकारी, अ‍ॅड.ललित सुतार, सतिष देशमुख, हरीष पाटील, निलेश पाटील, तेजस पाटील, सचिन शिंदे, गौरव पाटील, चेतन पाटील, युक्तेश बाविस्कर, महेश माळी, कृष्णराव साळूंखे, शामकांत वाडेकर, दिपक पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र साळूंखे, दत्तात्रय पाटील, वसंत पाटील, राजेंद्र पाटील, मनोज वाघ, प्रदिप वाघ, सदाशिव नरवाडे, युनूस मेंबर, संदीप कोल्हे, महेंद्र मानसिंग पाटील, रंगराव पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, सुरेश कोळी, आबा पाटील, वाल्मिक पाटील, सचिन पाटील, विलास पाटील, अरूण पाटील, मनोजकुमार पाटील, प्रा.डॉ.माणिक पाटील, धर्मराज पाटील, संजय राठोड, गुलाब पाटील, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, डिगंबर बोरसे, प्रशांत पाटील, सुरेश परदेशी, सचिन शिंदे, लोकेश पाटील, भुपेंद्र पाटील, कपुरचंद तेली, अनिल देवरे, मोजुलाल जैन, दिलीप जैन, संतोष कुटे, प्रशांत माळी, पंडीत नैनाव, गोविंदा येवले, प्रशांत नैनाव, रविंद्र पाटील, अमोल पाटील, हर्षल पाटील, रामेश्‍वर पवार, विनोद पाटील, संजय पाटील, चेतन परदेशी, नंदू टिळक, किशोर पाटील, रशीद काहकर, शितल पाटील, रामभाऊ पाटील, हिरालाल पाटील, बी.एम.पाटील, किरण देवरे, भिमा पाटील, अविनाश पाटील, कर्नल पाटील, विजय राठोड, सचिन राठोड, भास्कर व्यवहारे, सुपडू परदेशी, कैलास पाटील, शेखर राजपूत, रघुनाथ पाटील, रावसाहेब पाटील, शंतनु पाटील, सागर अहिरे, रामधन परदेशी, नितेश शेलार, विलास भामरे, अशोक सोनी, अभिजीत पवार, रज्जाक अबिद, मुन्नाकाका परदेशी, पिंटू तावरे, कमल पाटील, सागर पाटील, चंदन झंवर, बापु सोमवंशी, सचिन पाटील, भुषण पाटील, सुनिल पाटील, रमेश पाटील, बालाजी पाटील, कल्याण पाटील, कुणाल पाटील, मोनू हिरे, पुरूषोत्तम पाटील, लक्ष्मण पाटील, विश्‍वनाथ पाटील, विनोद पाटील, भिमराव पाटील, कल्पेश पाटील, संजय कारभारी, भाईदास पाटील, रणधीर पाटील, अशोक पाटील, अरूण सोनवणे, यशवंत पाटील, परेश पाटील, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, भुषण पाटील, संजय पाटील, विकी पाटील, निखिल पाटील, सोनु पाटील, हिराजी पाटील, शिवराज पाटील, ताराचंद पाटील, जितेंद्र पाटील, किरण पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, झिपरू केदार यांसारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो एक व्यापक जनसहभाग होता जो भाजपच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकासाच्या दिशेने नव्या ध्येयाने पुढे जाणार असल्याचे संकेत देतो. दिलीपभाऊ वाघ यांचा राजकीय प्रवास हा त्यांचे पिताश्री माजी आमदार स्व आप्पासाहेब ओ ना वाघ यांच्या आदर्शवादी सारखा प्रेरणादायी आणि जनतेशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन जीवनातच जी एस व कार्यकर्त्याच्या रूपात केली होती. सार्वजनिक राजकारणात त्यांची पहिली निवड १९९१ साली पाचोरा न पा नगरसेवक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक पदावर सातत्याने कार्य केले आणि पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून १९९५ ते २०१२ पर्यंत सर्वाधिक जास्त वेळ असलेला पाच वेळा नगराध्यक्षा पदाचा कालावधी भोगला आहे विशेष म्हणजे, एकदा त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही नेतृत्व केले. आणि 2009 मधील जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ते एकमेव असे आमदार होते की ते एकाच वेळी नगराध्यक्ष व आमदार पदावर विराजमान असल्याचा इतिहास नोंदवला आहे त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी पाचोरा शहरात नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सहकारी क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यानंतर जनतेच्या विश्वासावर आणि कार्यक्षमतेच्या बळावर ते पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक रस्त्यांचे कामे पूर्ण झाली, शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प, सहकारी संस्था, शिक्षण संस्था व ग्रामीण पायाभूत सुविधा यामध्ये लक्षणीय भर पडली. सध्या ते जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक, तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.दिलीपभाऊ वाघ हे कुशल संघटक, जनसामान्यांसाठी लढाऊ आणि कार्यकर्त्यांशी संपर्कात राहणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी कधीही पदासाठी राजकारण केले नाही, तर जनतेसाठी राजकारण केले. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, सहकार्य व संवादाचा समावेश असतो. त्यांनी राजकारणात सामाजिक समरसता, सर्वसमावेशक विकास आणि सहकार चळवळीला गती देण्यासाठी अहोरात्र कार्य केले आहे.भाजपमध्ये त्यांचा प्रवेश हा स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवू शकतो, कारण ते केवळ स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर नव्हे, तर आपल्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रबळ पाठबळावर पक्षाला नवे आयाम देऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालय परिसर सुद्धा जनतेने फुलून गेला होता. भगवे झेंडे, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ‘दिलीपभाऊ वाघ पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ‘भाजपचा विजय असो’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.दिलीपभाऊ वाघ यांनी पक्ष प्रवेशानंतर केलेल्या भाषणात सांगितले की, “मी फक्त विकासासाठी विचारांचा बदल करत आहे. दिलीपभाऊ वाघ यांनी पक्ष प्रवेशा नंतर केलेल्या भाषणात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, गिरीषभाऊ महाजन यांचे सर्वसामान्यांशी असलेले अतूट नाते, जनतेशी असलेली आपुलकी, अखंड कार्यतत्परता आणि पक्षाची कार्यसंस्कृती हीच माझ्या निर्णयामागची खरी प्रेरणा आहे.” माझ्या सोबत असलेले कार्यकर्ते माझी खरी ताकद आहेत आणि आता आम्ही मिळून पाचोरा-भडगावच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील आपल्या भाषणात दिलीपभाऊ वाघ यांच्या अनुभवाचे आणि कार्यक्षमतेचे स्वागत करताना सांगितले की, “भाजपमध्ये अशा अनुभवी, लोकाभिमुख, सहकार क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती. दिलीपभाऊंचा प्रवेश म्हणजे भाजपच्या विजयाचे रणशिंग.राजकीय विश्लेषकांच्या मते, हा प्रवेश भाजपसाठी केवळ पाचोरा-भडगावमध्येच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नवा राजकीय टप्पा निर्माण करणारा ठरू शकतो. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले अन्य राजकीय पक्षही आता नव्या रणनीतीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात या प्रवेशाचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था, न पा,जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आगामी सर्वच निवडणुकीत नक्कीच उमटतील. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांनी बोलताना सांगितले एकंदरीतच, दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमधील प्रवेश हा तालुक्याच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात मोठा आणि निर्णायक पाऊल मानला जात आहे. या प्रवेशामुळे राजकीय, सामाजिक, सहकारी, शैक्षणिक आणि स्थानिक प्रशासन या सर्वच पातळ्यांवर नव्या समीकरणांची बीजे रुजली आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि विजयाचा विश्वास निर्माण करणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाने पाचोरा- भडगाव तालुका पुन्हा एकदा एका नव्या राजकीय पर्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

Loading

निगडी (गुरुदत्त वाकदेकर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त, दरवर्षीप्रमाणे सरस्वती माध्यमिक विद्यालय, आकुर्डी, पुणे येथील शिक्षिका, लेखिका, कवयित्री, निवेदिका, संपादिका, समीक्षक प्रतिमा काळे (खेमनर) यांनी यंदाही ऑनलाइन स्वरूपात एकूण पाच स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, लेख लेखन आणि काव्य लेखन या प्रकारांचा समावेश होता. यामध्ये विशेषतः लेख लेखन व काव्य लेखन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्पर्धेसाठी परीक्षक नेमले होते : वक्तृत्व स्पर्धा : प्रमोद सूर्यवंशी, मुंबई, रांगोळी स्पर्धा : सारिका अस्मार, पुणे, चित्रकला स्पर्धा : कु. अक्षदा तावरे, पुणे, लेख लेखन स्पर्धा : राजश्री मराठे, पुणे, काव्य लेखन स्पर्धा : आनंद घायवट, कसारा

सर्व परीक्षकांनी अत्यंत योग्य पद्धतीने व वेळेत परीक्षण करून निकाल जाहीर केला. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आयोजिका प्रतिमा काळे यांनी केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संजीवनी शिवाजी जगताप यांनी सर्व पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची प्रभावीपणे जनजागृती झाली.

प्रत्येक स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे :

१) वक्तृत्व / व्हिडीओ सादरीकरण स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: प्रिशा स्नेहा विराज तांबे
गट ५ (खुला गट)
प्रथम: पल्लवी कदम
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप

२) रांगोळी स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: आयुष अविनाश तांबे
द्वितीय: प्रिशा स्नेहा विराज तांबे
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: माहेश्वरी बापूराव बाजगिरे
द्वितीय: जान्हवी बापूराव बाजगिरे
तृतीय: गौतमी भानुदास कांबळे
गट ५ (खुला गट)
प्रथम: हर्षा उध्दव भुरे
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप

३) चित्रकला स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: गायत्री गणेश काळे
द्वितीय: आयुष अविनाश तांबे
तृतीय: सक्षम संदीप आखाडे
गट २ (इ. ३ री ते ५ वी)
प्रथम: आस्मी मुकुंद पेटकर
द्वितीय: आरव उदावंत
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
सर्वोत्कृष्ट: वेदश्री पुनम विनायक जाधव
उत्कृष्ट: महेश्वरी बापूराव बाजगिरे
प्रथम: जान्हवी बापूराव बाजगिरे
द्वितीय: मीरा मंगेश मगर
तृतीय: मृण्मयी गणेश काळे
उत्तेजनार्थ: राजरत्न भानूदास कांबळे, गौतमी भानूदास कांबळे, श्रावणी वाल्मिक जावळीकर
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: गार्गी संतोष तितर
द्वितीय: दिव्यांका संगम बगाडे
तृतीय: स्नेहल सागर मडके
उत्तेजनार्थ: जगदीश हनुमंता नरसन्ना
गट ५ (खुला गट)
प्रथम: संगीता संजय रोंघे
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप
तृतीय: राधिका बापट

४) लेख लेखन स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: संजीवनी शशिकांत बंडगर
द्वितीय: इनायानूर रशीद अन्सारी
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: दर्शन अभिनंदन देबाजे
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: दिव्या ज्ञानेश्वर पाटील
द्वितीय: वैष्णवी सुनिल कोठूरकर
गट ५ (खुला गट)
सर्वोत्कृष्ट: संतोष गोकुळदास जगताप
उत्कृष्ट: श्रीमती कोकिळा ज्ञानेश्वर ढाके
प्रथम: वैशाली चांदेकर
द्वितीय: किशोर खराते
तृतीय: अलका ज्ञानोबा सपकाळ
उत्तेजनार्थ: विकास गोपाळ खराते, डॉ. शैलजा शंकरराव करोडे, अनुराधा जोशी

५) काव्य लेखन स्पर्धा:
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: दर्शन अभिनंदन देबाजे
द्वितीय: अक्षदा प्रदीप शिरढोणे
तृतीय: गायत्री धनंजय टिळेकर
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: स्नेहा मीरा संतोष खोडके
द्वितीय: वैष्णवी सुनिल कोठूरकर
तृतीय: अनुष्का उदय पाटील
गट ५ (खुला गट)
सर्वोत्कृष्ट: अमर दादाराव जंजाळ
उत्कृष्ट: गुरूदत्त दिनकर वाकदेकर
प्रथम: राधिका बापट
द्वितीय: सुरेश शेठ
तृतीय: चेन्नूर अश्विनी श्रीनिवास
उत्तेजनार्थ: कु. वैशाली लांडगे, सावित्री कांबळे, किशोर खराते

या स्पर्धांच्या आयोजिका प्रतिमा काळे यांनी विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे समाज माध्यमातून वितरित केली असून, ११ जून २०२५ रोजी पुण्यात प्रत्यक्ष कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करून प्रेरणादायी कार्य सादर करणाऱ्या सर्व सहभागी व विजेत्यांचे आयोजिका प्रतिमा काळे यांनी अभिनंदन केले असून, यशस्वी कार्यक्रमाबद्दल परीक्षक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

मान्सूनची चाल मंदावणार; पावसाच्या भरवशावर पेरणी नको – कृषी विभागाचं शेतकऱ्यांना सावध आवाहन

Loading

पाचोरा – राज्यात अनेक भागांमध्ये नुकत्याच पडलेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये या वर्षी मान्सून लवकरच सक्रिय होईल आणि शेतीकामांना वेग येईल, अशी धारणा निर्माण झाली आहे. विशेषतः २५ मे रोजी दक्षिण कोकणात मान्सूनच्या आगमनाने अनेक भागात समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच कृषी विभागाने अत्यंत महत्वाचं आणि तितकंच संवेदनशील असं आवाहन केलं आहे की, शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये. कारण हवामान खात्यानं व कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा प्रवास लवकरच मंदावणार असून राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येणार आहेत. राज्यात २५ मे रोजीच मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. हा मान्सून दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करताच काही भागांत चांगल्या पावसाचा अनुभवही घेतला गेला. त्यामुळे कोकणासह इतर भागातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं व समाधानाचं वातावरण निर्माण झालं. मात्र २७ मेपासून मान्सूनचा प्रवास मंदावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. परिणामी कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित बहुतांश भागांत मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हवामान कोरडेच राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरु असलेला मान्सूनपूर्व पाऊस खरा समजून किंवा अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची कोरडवाहू पेरणी करू नये, असे स्पष्टपणे कृषी विभागाने म्हटले आहे. कारण अशा घाईघाईने केलेल्या शेतीकामांमुळे नंतर पावसाची विश्रांती पडल्यास उगमलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते – एकीकडे बी-बियाण्यांचा खर्च वाया जातो आणि दुसरीकडे जमिनीच्या योग्य ओलाव्याअभावी उत्पादनही प्रभावित होते. हवामान खात्याचा अंदाज व कृषी विभागाची चिंता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात मान्सूनचा प्रवास सध्या जरी सशक्त दिसत असला तरी लवकरच त्याची गती मंदावेल. यामुळे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत तरी मान्सूनसदृश वातावरण तयार होणार नाही. कोकणात सुरुवातीला आलेला पाऊस देखील एकप्रकारचा वादळी स्वरूपाचा असून, तो दीर्घकालीन शेतीसाठी आधारभूत ठरणार नाही. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्पष्ट सांगतात की, “पाऊस पडतोय हे पाहून अनेक शेतकरी बियाणे विकत घेत आहेत, शेताची तयारी करत आहेत. पण अजून हवामान अनिश्चित आहे. हवामान खात्याचे अपडेट्स सतत पाहणे, स्थानिक कृषी अधिकारी व कृषी विस्तार सेवेशी संपर्कात राहणे आवश्यक आहे.” पूर्वीचे अनुभव आणि शेतकऱ्यांना मिळालेली धडे गेल्या काही वर्षांच्या मान्सूनचा आढावा घेतल्यास असं लक्षात येतं की, जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या मान्सूननंतर काही वेळा मोठ्या विश्रांतीमुळे पेरण्या वाया गेल्या आहेत. अनेक वेळा पावसाचा एक जोरदार फटका बसल्यानंतर पंधरा-वीस दिवस कोरडं हवामान राहिल्यामुळे उगवलेली बियाणं मरून गेली आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानावर होत असतो. त्यामुळे कृषी विभागानं यावर्षी अगोदरच दक्षता घेत शेतकऱ्यांना सावध केलं आहे. माहिती, मार्गदर्शन व शाश्वत शेतीसाठी धोरणात्मक भूमिका राज्यातील कृषी विद्यापीठे, हवामान तज्ज्ञ व राज्य कृषी विभाग एकत्रितपणे काम करत असून, स्थानिक हवामान केंद्रांमार्फत सातत्याने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या हवामान केंद्राशी संपर्कात राहून शेतीसंदर्भातील निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांसाठी विविध माध्यमांतून – मोबाईल मेसेज, कृषी सल्लागार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, एफएम रेडिओ, स्थानिक टीव्ही वाहिन्या – यांचा वापर करून कृषी विभाग पेरणीसंबंधी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. याशिवाय ‘माझी शेतकरी योजना’, ‘शाश्वत शेती मिशन’ अशा उपक्रमांतूनही कृषी माहिती उपलब्ध केली जाते. कोणती पेरणी टाळावी आणि कोणती पुढे ढकलावी? कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, मका यांसारख्या पिकांची पेरणी पावसाची नियमितता निश्चित झाल्यावरच करावी. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बी उगमण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे उगमल्यानंतरही पावसाचा पुरवठा नसल्यास रोपं सुकून जातात. याशिवाय, काही भागांत ‘सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनीच’ फारकत घेतल्यानंतर पेरणीसंबंधी निर्णय घ्यावा. कारण अशा ठिकाणी शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने शक्यतो धोका टाळता येतो. शेतकरी बांधवांची अपेक्षा आणि वास्तव शेती ही निसर्गाधीन असलेली प्रक्रिया असल्यामुळे पावसावरील अवलंबन अपरिहार्य आहे. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीच्या खुणांवर विश्वास ठेवून पेरण्या करून बसण्याऐवजी हवामान खात्याचे अचूक अंदाज, कृषी विभागाचे सल्ले आणि स्थानिक परिस्थितीचा बारकाईने विचार करूनच शेतीसंबंधी निर्णय घेणं हीच यशस्वी व टिकाऊ शेतीची गुरुकिल्ली आहे. कृषी विभागाचं हे वेळेवरचं आणि परिणामकारक आवाहन शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेतल्यास उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढवण्यास निश्चितच मदत होईल आणि अनावश्यक आर्थिक फटका टाळता येईल

पंजाब किंग्ज क्वालिफायर-१ मध्ये पोहोचणारा पहिला संघ, मुंबई इंडियन्स एलिमिनेटर खेळणार

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोश इंग्लिश आणि प्रियांश आर्य यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव करून क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबने १८.३ षटकांत तीन गडी गमावून १८७ धावा केल्या आणि सामना जिंकला. 
पंजाब किंग्जने १० वर्षांनंतर पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, संघाने २०१४ मध्ये पात्रता सामना खेळला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने १४ सामन्यांमध्ये नऊ विजय आणि चार पराभवांसह लीग टप्प्यात पूर्ण केले. यामुळे गुजरात टायटन्स १९ गुणांसह आणि ०.३७२ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर पोहोचले. दुसरीकडे, मुंबईने आठ विजय आणि सहा पराभवांसह चौथे स्थान पटकावले. सध्या, आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांना मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. जर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने हा सामना जिंकला तर ते दुसऱ्या स्थानावर जातील आणि २९ मे रोजी पंजाबविरुद्ध क्वालिफायर-१ खेळतील. तर, मुंबई शुक्रवारी, ३० मे रोजी एलिमिनेटर सामना खेळेल.
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाबला ३४ धावांवर सुरुवातीचा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने प्रभसिमरन सिंगला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला फक्त १३ धावा करता आल्या. तथापि, पंजाबच्या फलंदाजांनी हार मानली नाही आणि प्रियांश आर्यने जोश इंग्लिशसह संघाला विजयाच्या जवळ आणले. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत १०९ धावांची मोठी भागीदारी झाली. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. सलामीवीर प्रियांशने नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याच वेळी, इंग्लिशने ४२ चेंडूत ७३ धावांची शानदार खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने संघाला विजयाकडे नेले. तो १६ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला आणि नेहल वधेरा २ धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून मिचेल सँटनरने दोन आणि बुमराहने एक विकेट घेतली.
त्याआधी, रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी झाली. मार्को जॅन्सनने रिकेलटनला श्रेयस अय्यरकडून झेलबाद केले. तो २० चेंडूत २७ धावा काढून बाद झाला तर रोहित शर्मा २१ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह २४ धावा काढून बाद झाला.
यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली. तो एका टोकाला खंबीरपणे उभा राहिला पण दुसऱ्या टोकाला फलंदाजांकडून त्याला फारशी साथ मिळाली नाही. असे असूनही, उजव्या हाताच्या फलंदाजाने ३४ चेंडूत हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. तो ३९ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा काढून परतला. त्याच्याशिवाय मुंबईकडून तिलक वर्मा यांनी एक, विल जॅक्सने २६, हार्दिक पांड्याने २६ आणि नमन धीरने २० धावा केल्या. दरम्यान, मिचेल सँटनर एक धाव काढून नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जानसेन आणि विजय कुमार विशाख यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय हरप्रीत ब्रारला यश मिळाले.

ती अपयशी नव्हती, आधाराचा अभाव होता…

Loading

एका कर्तबगार, निष्ठावान महिला पोलीस उपअधीक्षकाच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. ही घटना केवळ तिच्या वैयक्तिक वेदनेची नव्हे, तर आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या त्रुटींची, मानसिक आरोग्याकडे असलेल्या दुर्लक्षाची, लिंगभेदाच्या कटु वास्तवाची आणि शासकीय असंवेदनशीलतेची साक्ष आहे.

ती सत्तेसाठी नव्हे, तर कायद्याच्या बाजूने लढणारी धाडसी अधिकारी होती. कोपर्डी प्रकरणाच्या तपासातील तिचे निर्भय कार्य हेच तिची खरी ओळख होते. तिच्या चिठ्ठीतले शब्द “माझं काही चुकलं असेल, तर शिक्षा करा, पण असा मानसिक छळ करून मारू नका…” — हे शब्द तिच्या अंतःकरणातील वेदनेचा टाहो आहेत आणि व्यवस्थेच्या अनास्थेवर केलेला सवाल आहे.

१. मानसिक आरोग्य – दुर्लक्षित पण अत्यावश्यक आधार

पोलीस कर्मचारी अनेकदा दीर्घ कामाचे तास, सततचा तणाव, जोखमीच्या जबाबदाऱ्या आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मानसिक थकव्याला सामोरे जातात.

NCRB (२०२३) च्या आकडेवारीनुसार, देशभरात १३,००० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी सुमारे ६% पोलीस दलातील आहेत.

Centre for Mental Health Research and Services (२०२२) च्या संशोधनानुसार, ४०% पोलीसांमध्ये तीव्र मानसिक ताणाची लक्षणे दिसून आली. ही आकडेवारी केवळ एक इशारा नसून, तातडीच्या उपायांची गरज दर्शवते.

सुधारणेचे मार्ग आणि अंमलबजावणी:

जिल्हास्तरावर प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती – राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खास मानसिक आरोग्य कक्ष सुरू करावेत.

गोपनीय, विनामूल्य व सहज उपलब्ध समुपदेशन सेवा – २४x७ हेल्पलाइन क्रमांक, ई-समुपदेशन अ‍ॅप्स, व पोलीस आयुक्तालयांत समुपदेशन बूथ.

मानसिक आरोग्य कार्यशाळा व सहकारी पाठिंबा गट – प्रत्येक पोलीस ठाण्यात दर सहा महिन्यांनी कामाच्या ताणावर आधारित प्रशिक्षण सत्र व समूह चर्चा.

मानसिक आरोग्य तपासणी व विश्रांती योजना – वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करणे व मानसिक थकवा दिसल्यास विशेष विश्रांती मंजूर करणे.

२. महिला अधिकारी व व्यवस्थेतील लिंगविषयक भेदभाव

भारतीय पोलीस दलात महिलांचे प्रमाण केवळ ११.७% इतके आहे. महिला अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दुय्यम वागणूक, सूक्ष्म लैंगिक छळ, वरिष्ठांकडून अपुरा पाठिंबा आणि सामाजिक एकटेपणाला सामोरे जावे लागते.

शिफारसी आणि रचना:

प्रत्येक जिल्ह्यात महिला सहाय्यता केंद्रांची स्थापना – महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सहाय्यता व मार्गदर्शन कार्यालय. महिला आयोग व गृह मंत्रालयाच्या सहकार्याने निधी व नियोजन.

महिला सल्लागार व तक्रार निवारण समित्या – स्थानिक महिला अधिकाऱ्यांचे नेतृत्व असलेली तक्रार निवारण प्रणाली. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल व कालमर्यादा असलेले निवारण पथक.

लिंग-संवेदनशीलतेचे नियमित प्रशिक्षण – आयपीएस प्रशिक्षण केंद्रे, राज्य पोलीस अकादमीमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक प्रशिक्षण.

स्वायत्त अंतर्गत तक्रार निवारण समित्या (ICC) – POSH कायद्यानुसार प्रभावी ICC समित्या कार्यरत करणे व वार्षिक ऑडिट करणे.

३. उच्चस्तरीय तपासांतील ताण आणि संस्थात्मक पाठिंब्याचा अभाव

गुंतागुंतीचे व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गुन्हे तपासताना अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दडपण, गुन्हेगारी धमक्या आणि अंतर्गत मत्सराला सामोरे जातात.

सुधारणेची दिशा व पद्धत:

स्वतंत्र तपास यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था – महत्त्वाच्या प्रकरणात “विशेष संरक्षण शाखा” सक्रिय करणे; अधिकाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा सुविधा.

कायदेशीर सल्ला आणि मानसिक आधार सेवा – तपास अधिकाऱ्यांसाठी कायदेशीर सल्लागारांची नियुक्ती व समुपदेशन सत्र (fast-track support cells).

राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना – वरिष्ठ आयएएस/आयपीएस व न्यायिक सदस्यांचा समावेश असलेली समिती (State Oversight Body).

४. माध्यमांची जबाबदारी आणि संवेदनशीलता

आत्महत्यांच्या बातम्यांचे असंवेदनशील व सनसनाटी पद्धतीने सादरीकरण केवळ मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत नाही, तर समाजातही चुकीचे संदेश पोहोचवतो.

डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार (२०२१):

आत्महत्येच्या कारणांबाबत तटस्थ आणि सूज्ञ मांडणी

कुटुंबाच्या भावना व मृत व्यक्तीचा सन्मान राखणे

मदतसेवा क्रमांक व समुपदेशन माहितीचा समावेश

अंमलबजावणी उपाय:

पत्रकारांना संवेदनशील पत्रकारितेचे प्रशिक्षण – पत्रकारिता अभ्यासक्रमात मानसिक आरोग्यविषयक संवेदनशीलता आणि आत्महत्येचे जबाबदार वार्तांकन यांचा समावेश करावा.

प्रेस कौन्सिलमार्फत देखरेख व आचारसंहिता लागू – अनावश्यक सनसनाटीपणा केल्यास दंडात्मक कारवाई.

५. चौकशी आणि उत्तरदायित्व

मृत्यूपूर्व पत्रातील आरोपांचे स्वतंत्र आणि वेळेत तपास – Judicial Magisterial Inquiry किंवा सीआयडी विभाग मार्फत स्वतंत्र चौकशीची तरतूद.

केवळ निलंबन नव्हे, तर उत्तरदायित्व सुनिश्चित करणारी कारवाई – दोषी असल्यास सेवा नियमांनुसार शिक्षात्मक कारवाईची कालमर्यादा पाळली जावी.

चौकशी अहवाल जनतेसमोर सादर करण्याची पारदर्शक यंत्रणा – गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सार्वत्रिक चौकशी अहवाल प्रसिद्धी.

६. धोरणात्मक व प्रशासकीय सुधारणा

ठोस उपाय व रचना:

गोपनीय तक्रार प्रणाली – हेल्पलाइन, QR कोड-आधारित मोबाईल अ‍ॅप व मेलद्वारे तक्रारी दाखल करता येतील.

मानसिक आरोग्य सेवा – डायल ११२ वा डायल MH-PoliceCare अंतर्गत मानसिक आरोग्य सहाय्य क्रमांक सुरू करणे.

मार्गदर्शक कार्यक्रम – प्रत्येक नवोदित अधिकाऱ्यासाठी अनुभवी मार्गदर्शक अधिकारी नेमणे व तिमाही संवाद सत्रे.

प्रशंसा व पुनर्बलन कक्ष – राज्य पोलीस मुख्यालयात पुरस्कार, पुनर्बलन योजना, व मानसन्मानाचे आयोजन.

क्रियाशील उपाययोजना:

प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन सेवा व मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती

महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सहाय्यता केंद्रे व तक्रार निवारण प्रणाली

उच्चस्तरीय तपासांसाठी कायदेशीर व मानसिक आधार रचना

माध्यमांसाठी आत्महत्या वार्तांकन मार्गदर्शक व पत्रकार प्रशिक्षण

संस्थात्मक उत्तरदायित्व निश्चित करणारे धोरणात्मक बदल

ही आत्महत्या तिचे वैयक्तिक अपयश नव्हते, तर व्यवस्थेतील अपूर्णतेचे दर्शन होते. जर आपण केवळ श्रद्धांजलीपुरते थांबलो, तर तिच्या वेदनेचा अनादर ठरेल. आज आवश्यक आहे — संवेदनशील प्रशासन, कृतीशील धोरणं आणि दीर्घकालीन सुधारणा, जे तिच्यासारख्या अनेक जिवांना आधार देतील. जेव्हा ती एकटी होती, तेव्हा आपण तिच्या सोबत नव्हतो. पण आज तिच्या मृत्यूतून शिकून इतर “तीं”साठी आधार निर्माण करण्यासाठी करणे — हाच तिच्यासाठी खरा श्रद्धांजली संदेश ठरेल. कारण अजूनही अनेक “ती” आपल्या आजूबाजूला आहेत – त्यांना अपयश नव्हे, आधार हवा आहे. आपण व्यवस्था म्हणून प्रत्येक अशा ‘ती’च्या पाठीशी उभे राहणार आहोत का?

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०५/२०२५ वेळ : ०६:१२

विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणारे अजातशत्रू शिक्षक – प्रा. राजेंद्र चिंचोले सरांना वाढदिवसाच्या प्रेरणादायी शुभेच्छा!

Oplus_16777216

Loading

पाचोरा – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचा जीवनप्रवास अर्पण करणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक दीपस्तंभ ठरलेल्या, अत्यंत शांत, संयमी, अजातशत्रू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे अधिष्ठान असलेल्या आदरणीय प्रा. राजेंद्र चिंचोले सरांचा आज वाढदिवस! शिक्षण आणि मार्गदर्शन या क्षेत्रात आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या चिंचोले सरांना वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत, आणि सामान्य नागरिकांपासून ते शासकीय यंत्रणांपर्यंत सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.चिंचोले सरांनी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ब्रँड उभारण्याची क्षमता असताना देखील त्यांनी मार्गदर्शनाच्या व्यवसायीकरणाचा मार्ग न निवडता विद्यार्थ्यांसाठी आपले ज्ञान नि:स्वार्थपणे आणि निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून दिले. हा त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आंतरिक आत्मियतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय देणारा अत्युच्च दर्जाचा आदर्श आहे. आज ज्या लाखो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनातून यशाच्या वाटेवर वाटचाल करत आहेत, ते हेच त्यांच्या कार्याचे जीवंत स्मारक आहेत.चिंचोले सरांचा शैक्षणिक प्रवास केवळ शालेय पातळीवर शिक्षक म्हणून मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन केवळ औपचारिकतेपुरते न करता, त्या विषयाच्या खोलवर अभ्यासातून राज्य परीक्षा मंडळ व पाठ्यपुस्तक मंडळात लेखक, प्रश्नपत्रिका आणि प्रश्न पेढी निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला. अनेक वर्षे त्यांनी या स्तरावर अभ्यासू शिक्षक म्हणून आपल्या ज्ञानाची छाप उमटवली. आजही हजारो विद्यार्थी त्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिकवणीला आदराने आणि उत्कंठेने स्मरतात, कारण त्यांनी हा विषय जिवंत केला, समजावून सांगितला आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. खान्देशातील स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात ‘ज्ञानप्रबोधिनी’ हे एक महत्वाचे योगदान त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहे. ही संस्था केवळ एक शिकवणी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रयोगशाळा ठरली आहे. या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर वैचारिकदृष्ट्या घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय सेवांमध्ये जबाबदारीची पदे भूषवत आहेत.राज्य शासनाच्या ‘करीअर कट्टा’ या अभिनव उपक्रमात राज्यस्तरीय करीअर मार्गदर्शक म्हणून चिंचोले सरांनी आपली भूमिका पार पाडली. त्यांनी ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ आणि ‘करीअर सारथी’ ही पुस्तके प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिशा दाखवली. या पुस्तकांचे लेखन फक्त पुस्तकी नव्हते, तर ते मार्गदर्शक पुस्तिकांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरत आहेत. या लेखनातून सरांनी केवळ विचार दिले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करत आत्मविश्वासाचे बीज पेरले.इतकेच नव्हे तर विविध नामांकित दैनिकांमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षा, अभ्यास पद्धती, करीअर निवड याविषयी केलेले स्तंभलेखनही अत्यंत प्रभावी ठरले. या लेखनासाठी त्यांनी संबंधित वृत्तपत्रांनी दिलेले मानधनही नम्रतेने नाकारले, हे त्यांच्या निःस्वार्थ वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. ज्ञानाचा प्रसार हाच त्यांचा ध्यास असल्यामुळे त्यांनी या लेखनालाही समाजोपयोगीतेचे स्वरूप दिले.शिक्षण व लेखनाच्या क्षेत्राबरोबरच चिंचोले सरांना पर्यटन आणि चित्रपट यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व परदेशातील पर्यटन स्थळांची माहिती, त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक संदर्भांची विस्तृत माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या व्यासंगामुळे त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नव्याने शिकायला मिळते. चित्रपटांविषयी त्यांचे मत हे केवळ रसिकतेपुरते मर्यादित नसून त्यांनी सिनेमा हे समाजाच्या आरशासारखे माध्यम म्हणून पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या चर्चेत चित्रपटांतील सौंदर्य, तांत्रिक बाजू, सामाजिक आशय या सर्वांवर अचूक भाष्य ऐकायला मिळते.या सर्व कामगिरीमुळे चिंचोले सर केवळ एक शिक्षक किंवा मार्गदर्शक राहिलेले नाहीत, तर एक विचारवंत, एक साहित्यिक, एक मार्गदर्शक, एक सखा, एक दिग्दर्शक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सच्चा पालक ठरले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विविधांगी छटा त्यांना सर्वांचेच लाडके सर बनवते. त्यांचा अभ्यास, आचरण, विचार यामुळे ते विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, पत्रकार, लेखक, आणि समाजातील विविध घटकांमध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांची सहजता, नम्रता आणि विनयशीलता यामुळे कुणालाही त्यांच्या सान्निध्यात आपलेपणा वाटतो.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या जुने विद्यार्थी त्यांच्याबद्दलच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकांनी त्यांच्या शिकवणीमुळे, केलेल्या संवादामुळे आणि दिलेल्या प्रेरणेमुळे जीवनात दिशा मिळाल्याचे नमूद केले आहे. त्यांचे हे योगदान केवळ शब्दांपुरते नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्षात परिवर्तन घडवणारे आहे.आजच्या या मंगल दिनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, अपार यश, आणि अखंड सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचा उत्साह, ऊर्जाशक्ती, आणि सेवाभाव अशीच अखंड राहो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी प्रेरणेचा प्रकाश टाकत राहो. “तुम जियो हजार साल, हर साल के दिन हो पचास हजार…!””जीवेतम् त्या शरदः शतम्” – अशी शुभेच्छा देताना आमचे मन अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते. आपल्यासारखा शिक्षक म्हणजे समाजाचे खरे वैभव.आदरणीय, वंदनीय प्रा. राजेंद्र चिंचोले सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या चिंचोले सरांचे कार्य शिक्षणक्षेत्रात मार्गदर्शक ठरले आहे. आपणास उत्तम आरोग्य, यश आणि समाधान लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

आमदार किशोरआप्पा & मा आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील “तिरंगा रॅली – एकता, देशभक्ती आणि जनजागृतीचा जिवंत संगम” यावर सविस्तर विश्लेषण

Loading

पाचोरा – स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं उलटून गेली, परंतु भारतीय जनतेच्या रक्तात असलेली देशभक्तीची धग आजही तितकीच तीव्र आहे. भारतमातेच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमणं, हातात तिरंगा घेत रस्त्यांवर उतरलेली माणसं, वयोवृद्धांच्या डोळ्यांतून ओघळलेले अभिमानाचे अश्रू, आणि तरुणाईच्या घोषणांमधून झळकणारी ऊर्जा – हे दृश्य कुठलेही भाष्य न करता स्वतःच सर्व काही सांगून जातं. अशाच एका अभूतपूर्व तिरंगा रॅलीला पाचोरा शहर साक्षी ठरलं. देशाच्या सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे जनतेच्या मनात अनेक वेळा संताप, अस्वस्थता आणि कर्तव्यबुद्धी जागृत होते. जेव्हा कश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप भारतीय नागरिकांना लक्ष्य करत हल्ला करण्यात आला, तेव्हा संपूर्ण देश शोकाकुल झाला. मात्र भारतीय सैन्याने दिलेलं सडेतोड उत्तर हे केवळ शौर्याचं नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरलं. त्याच भावनेचा आणि कृतज्ञतेचा प्रत्यय या रॅलीतून पाचोरा नगरीने दाखवून दिला.या रॅलीत केवळ झेंडा नुसता फडकवला गेला नाही, तर प्रत्येक नागरिकाने मनाचा झेंडा उंच फडकवून देशाच्या अस्मितेची आणि एकतेची प्रत्यक्ष साक्ष जगाला दाखवून दिली. भारत डेअरी स्टॉप येथून सुरू झालेली ही रॅली शहराच्या विविध प्रमुख रस्त्यांवरून, चौकातून आणि गल्ली-बोळातून पुढे जात हुतात्मा स्मारकाजवळ समारोपाला आली. हे केवळ प्रवास नव्हता, तर एका राष्ट्रभावनेच्या शक्तिशाली जागृतीचा सोहळा होता.या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाला कोणताही धार्मिक, जातीय वा पक्षीय रंग नव्हता. प्रत्येकजण फक्त ‘भारतीय’ म्हणून सहभागी झाला होता. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख अशा सर्व धर्मीयांनी, महिला, तरुण, वृद्ध, बालके अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी, आणि शेतकरी, दुकानदार, शिक्षक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, पत्रकार अशा सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी यात सहभागी होऊन ही रॅली एक ‘जनआंदोलन’ बनवली.या ऐतिहासिक रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ. या दोघांनी यावेळी केलेली उपस्थिती केवळ औपचारिक नव्हती, तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावना, त्यांच्या हातात असलेला तिरंगा आणि वृद्ध मातेस दिलेला सन्मान – याने ते एक नेता नसून जनतेच्या भावनांशी एकरूप झालेले ‘देशभक्त नागरिक’ भासले. वयोवृद्ध आजीबाईंना त्यांनी दिलेला साडी-चोळी व नारळाचा सन्मान हा केवळ औपचारिकता नव्हे, तर त्या पिढीच्या बलिदानाची आणि देशसेवेच्या परंपरेची जाणीव होती.शहरातील तरुणांनी 1000 ते 2000 फूट लांबीचा तिरंगा खांद्यावर घेत, सळसळत्या जोशात पुढे चालत दिलेले घोष – “भारत माता की जय”, “जय हिंद”, “वंदे मातरम्” – हे फक्त घोषणा नव्हत्या, तर भारतवर्षाच्या नसांमध्ये वाहणाऱ्या अस्मितेचे प्रतिध्वनी होते. काही तरुणांनी सैनिकांचा गणवेश परिधान करून देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असल्याचा संदेश दिला. महिलांनी पारंपरिक पेहरावात सहभाग घेत आपल्या उपस्थितीने संपूर्ण रॅलीला एक अनोखी ऊर्जासंपन्नता दिली.अनेकांनी आपल्या घरांच्या गॅलरीतून, दुकानांमधून किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून या रॅलीचे स्वागत केले. लहान मुलांनी हातात झेंडे घेतले, वृद्धांनी हात जोडले, काहींनी फुलांची उधळण केली. नागरिकांनी स्वतःहून रॅलीच्या मार्गावर स्वच्छता ठेवली, पाण्याची सोय केली, आणि शिस्त राखली. हे सर्व पाहून कोणताही भारतीय अंतर्मनापासून भारावून गेला नसता तरच नवल.पोलिसांनी केलेली बंदोबस्त व्यवस्था, स्वयंसेवकांची अनुशासित जबाबदारी, रॅलीतील सहभागी नागरिकांची अनुकरणीय शिस्त – हे सर्व घटक या उपक्रमाच्या यशस्वीतेत महत्वाचे ठरले. मात्र या सर्वाच्या पाठीमागे एक निस्वार्थी भावना होती – ती म्हणजे देशासाठी काहीतरी सकारात्मक आणि प्रेरणादायी घडवण्याची.तिरंगा फक्त एक झेंडा नाही, तो आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. आणि या तिरंगा रॅलीतून पाचोऱ्यातील जनतेने दाखवून दिलं की भारत फक्त भूगोलात एक देश नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर असलेली एक भावना आहे.या रॅलीमधून एक गोष्ट स्पष्ट झाली – कोणतीही अडचण, संकट किंवा शत्रूची आगळीवेगळी कृती भारतीय जनतेचं मनोबल खचवू शकत नाही. आपल्यात एकता आहे, बळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशासाठी काहीही करण्याची तयारी आहे.शेवटी हे लिहिताना एकच विचार मनात येतो – अशा रॅली केवळ एक दिवस घडाव्यात असं नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या मनात दररोज एक ‘तिरंगा रॅली’ चालू ठेवली पाहिजे. ती असो स्वच्छतेसाठी, सन्मानासाठी, देशासाठी काही चांगलं करण्यासाठी.किशोर आप्पा पाटील आणि दिलीपभाऊ वाघ यांच्यासारख्या नेतृत्वकर्त्यांनी यात केवळ उपस्थिती नोंदवून नाही, तर प्रत्यक्ष सहभाग घेत संपूर्ण जनतेला एक संदेश दिला – की नेता तोच, जो संकटात जनतेसोबत उभा राहतो, आणि देशभक्तीचे कार्य केवळ भाषणांनी नव्हे, तर कृतीने साकारतो.या रॅलीमधून उगम पावलेली एकजूट, देशप्रेम आणि सामाजिक समरसता ही भविष्यातही अशा अनेक रचनात्मक उपक्रमांची प्रेरणा ठरावी, हीच सदिच्छा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!