Home Blog Page 116

“माणसाच्या चेहऱ्याच्या आतल्या हृदयाची बोबडी”-: संदीप महाजन

0

Loading

“प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात.
एक तो जो वागत असतो आणि दुसरा तो जो खऱ्या अर्थाने जगत असतो.”
या एका ओळीमध्ये माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा, समाजाच्या वागणुकीचा, मानसिकतेचा आणि परस्पर नातेसंबंधांचा सारांश सामावलेला आहे. हा लेख म्हणजे केवळ शब्दांचा गोफ नाही, तर तो प्रत्येक वाचकाच्या मनाला झिणझिण्या आणणारा आरसा आहे – जो आपला प्रतिबिंब दाखवतो, पण मुखवटे गळून पडल्यावर.
आपण ज्या जगात जगतो, तेथे माणसाला स्वतःच्या अस्तित्वासाठी रोज नवा चेहरा लावावा लागतो.
कधी हसऱ्या चेहऱ्याने दुःख दडवायचं,
कधी शांत चेहऱ्याने अस्वस्थता लपवायची,
तर कधी प्रामाणिक चेहरा लावून व्यावसायिक धूर्तता साधायची.
आणि ही खेळी इतकी प्रगत झाली आहे की, माणूसच विसरतो – “मी कोण आहे खरोखर?”
एक चेहरा तो असतो, जो ‘दिसवायचा’ असतो — समाजासाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, ऑफिससाठी, सोशल मीडियासाठी…
आणि दुसरा चेहरा तो असतो, जो ‘रडतो’, ‘सहन करतो’, ‘आतून खचतो’, पण कुणालाही दिसत नाही.
आपण माणूस आहोत की नाट्यमंचावरील कलाकार?
एकाच दिवशी वेगवेगळ्या व्यक्तींसमोर वेगवेगळ्या भूमिका –
आईसमोर सज्जन मुलगा,
बॉसमसमोर आज्ञाधारक कर्मचारी,
प्रेयसीसमोर रोमँटिक,
सोशल मीडियावर सुखी आणि यशस्वी व्यक्ती…
पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र प्रश्नांनी भरलेला, हरवलेला, कोसळलेला एक वेगळाच चेहरा –
जो कधी आरशासमोरच उघड होतो.
या दोघांमधला संघर्ष दिवसेंदिवस इतका प्रखर होतो की आयुष्याचे खरे अर्थ हरवून जातात.
समाजाच्या आरशात माणूस आपलं “दिसणं” रंगवतो.
पण “असणं” हे मात्र अंधारात पडलेलं.
म्हणून म्हणावंसं वाटतं :
“आजकाल हसणारे चेहरे जास्त आढळतात, पण खऱ्या आनंदासाठी तडफडणारे हृदय कोठे हरवलेत?”
मुखवटे घालणाऱ्या माणसांची समाजशास्त्रात्मक पडताळणी
मानसशास्त्र सांगतं की माणसाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे *‘इमेज’ आणि ‘रिअॅलिटी’ यामधील झगड्याचं प्रतिक.
माणूस जितका सामाजिकदृष्ट्या यशस्वी वाटतो, तितकाच तो आतून एकटा पडलेला असतो.
या दुहेरी जीवनशैलीला ‘Social Masking’ म्हणतात
कुठे तरी आपल्याला वाटतं की, आपली खरी भावना लोकांना सांगितली, तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल.
म्हणून आपण सुरक्षिततेच्या नावाखाली मुखवटे घालतो, आणि कालांतराने तेच आपल्या चेहऱ्याचं रूप होऊन जातं.
उपरोधिक उदाहरणं – जे बोलतात, तेच कोसळतात                                         1)‘आपण खूप Busy आहोत’ म्हणणारे लोक
– प्रत्यक्षात त्यांच्याकडे वेळ असतो, पण भावना व्यक्त करण्यासाठी नाही.                                                2) ‘मी fine आहे’ म्हणणारी व्यक्ती
– कदाचित मनाच्या तळाशी कुठेतरी कोसळलेली असते, पण सवयीच्या उत्तरात झाकलेलंअसतं.                                             3) ‘You are my best friend’ म्हणणारा मित्र
– कदाचित दुसऱ्या ग्रुपमध्ये तुमच्याबद्दल मजाक करतअसतो.                                     4) ‘काय मस्त वाटतंय!’ म्हणणारा सायबर सेलिब्रिटी
– एकटेपणात मानसिक थेरपी घेत असतो.
समाजाने निर्माण केलेली ‘इमेज कस्टमायझेशन’ व्यवस्था
आजचं युग म्हणजे इमेज कस्टमायझेशनचं युग झालं आहे.
आपल्या कपड्यांपासून लेकरांच्या स्कोरपर्यंत सगळं म्हणजे ‘ब्रँडेड इम्प्रेशन’.
कुणी मुलीचं लग्न ठरवायचं असलं तरी ‘Instagram प्रोफाईल’ तपासलं जातं,
नात्यांतही खरी भावना महत्त्वाची राहिली नाही, तर स्टेटस अपडेट, शायरी आणि डीपी हाच नात्यांचा आधार बनतो.
हे चित्र किती भेसूर आहे, याची आपल्याला कल्पना देखील नाही.
मनाच्या गाभाऱ्यातल्या प्रश्नांची उत्तरं – आपण शोधतोय का?
का आपण समाजासाठी मुखवटे घालतो?
का आपण स्वतःचं दुःख गिळून हसतो?
का माणूस स्वतःच्या वेदना लपवण्यास शिकतो, व्यक्त होण्यास नव्हे?
या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका दिवसात मिळणार नाहीत. पण त्यांचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न तरी आपण करतोय का?
आयुष्यात सगळं मिळवता येतं, पण खरे नातं फक्त तेवढंच टिकतं जेव्हा आपण आपला खरा चेहरा दाखवतो.
अर्थात, हे सोपं नाही. पण एक ‘खरा चेहरा’ दाखवणारा माणूस कधीतरी समाजालाही आरसा दाखवतो — की, “खोटं वागत राहिलात, तर आयुष्याच्या शेवटी स्वतःलाच ओळखता येणार नाही.”
म्हणूनच,
“दिसण्यासाठी नाही, जगण्यासाठी माणूस व्हा… मुखवट्यांना विसरून आत्म्याच्या आवाजाने जगा.”

 

शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल “शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार झोपले का?” — शिक्षकी पेशावर डाग आणि न्याय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न

0

Loading

एरंडोल – तालुक्यातील रवंजे येथील शाळेतील एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी पोस्को आरोपा अंतर्गत एरंडोल पोलीस स्टेशनला पाचोरा येथील रहिवाशी व रवंजे शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल केल्याने पुनःच्छ एकदा शिक्षकी पेशावर डाग लागणारी घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही न्यायप्रक्रियेत होत असलेली दिरंगाई, शिक्षक संघटनांची मौनव्रती आणि लोकप्रतिनिधी असलेल्या शिक्षक आमदारांचे दुर्लक्ष — हे सारेच समाजाच्या चिंतनाचा विषय बनले आहे.
सदर प्रकरणात जो गुन्हा घडला आहे, अर्थात दाखल करण्यात आला आहे तो अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा आहे. समाजाच्या नैतिक आणि शैक्षणिक

मूल्यांवर थेट घाला घालणाऱ्या अशा घटनांकडे केवळ कारवाई करून नव्हे तर व्यापक पुनरावलोकनाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
या प्रकरणात सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रथमच जो प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे, “गुन्हा कधी घडला आणि एफआयआर नोंदवण्यात एवढा उशीर का झाला?”
ज्या दिवशी हा कथित गुन्हा घडल्याचा आरोप आहे, त्या दिवशी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई न केल्याने आणि एफआयआरची प्रत देखील वेळेत संबंधित पक्षांपर्यंत पोहोचली नसल्याने मोठ्या प्रमाणावर संशय निर्माण झाला आहे.
कायद्याच्या चौकटीत पाहिले तर, एफआयआर नोंदवल्यानंतर २४ तासांच्या आत त्याची प्रत संबंधित आरोपीस देणे व प्रसार माध्यमांना सार्वजनिक माहिती म्हणून उपलब्ध करणे अनिवार्य असते. परंतु या प्रकरणात एफआयआरची प्रत उशिरा प्रसिद्ध होण्यामागचे कारण काय, हा एक गंभीर तपासाचा मुद्दा आहे.
हे विशेष नमूद करणे गरजेचे आहे की, अनेक वेळा सामान्य शिक्षकावर अगदी किरकोळ कारणांवरूनही निलंबनाची कारवाई तात्काळ केली जाते. मात्र येथे जेव्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा एका शिक्षकावर नोंदवला गेला आहे, तेव्हा प्रशासन आणि शिक्षक संघटनांनी यावर कठोर भूमिका का घेतली नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.
या मुद्द्यानेच संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजवली आहे. शिक्षक संघटनांनी नेहमीच शिक्षकांच्या हितासाठी आवाज उठवला आहे, मात्र येथे जेव्हा पेशा बदनाम होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यांचा आवाज कुठे गायब झाला?
शिक्षक आमदार हे जनतेचे अर्थात शिक्षकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांवर त्यांचा आवाज महत्त्वाचा असतो. परंतु या प्रकरणात त्यांची भूमिका अत्यंत निराशाजनक बोटचेपी वाटते.
हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ ते सुद्धा अंडरट्रायल चालणे गरजेचे जेणेकरून न्याय प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि दोषी असल्यास संबंधित शिक्षकास कठोर शिक्षा मिळेल.आणि त्याची पडसाद देखील संपूर्ण शिक्षण क्षेत्रात उमटतील
जर संबंधित शिक्षक खरोखरच दोषी असेल, तर शिक्षकी पेशाच्या शुद्धीकरणासाठी त्याला शिक्षा मिळायलाच हवी. आणि जर या गुन्ह्यामागे काही स्टाफ अंतर्गत सुडाचे राजकारण , वैयक्तिक अथवा सामाजिक पाणी मुरत असेल, तर त्याचाही शोध लावणे तितकेच आवश्यक आहे.
या प्रकरणाशी संबंधित अजूनही अनेक बाबी स्पष्ट झालेल्या नाही
गुन्हा केव्हा घडला? एफआयआर कधी दाखल झाला? आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातमी नावे व पदासहित उशिरा का आली?
एफआयआरची प्रत २४ तासात संबंधित संस्थांना का मिळाली नाही?
प्रकरण गुप्त ठेवण्यामागे कोणाचे हितसंबंध होते?
शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक संघटनांनी यामध्ये कोणती भूमिका बजावली?
अशा एक ना अनेक सर्व प्रश्नांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
प्रसार माध्यमांवर समाजाचा विश्वास आहे. या प्रकरणात माध्यमांनी घटना उशिरा का प्रसिद्ध केली, याबाबतही स्पष्टीकरण अपेक्षित आहे. वास्तविक एवढा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती लपवण्याचा अथवा वेळेवर प्रसिद्ध न करण्याचा दोष सुद्धा माध्यमांवरही लागू शकतो.
एकीकडे सरकार शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेच्या गप्पा करत आहे, तर दुसरीकडे अशा घटनांमुळे सर्व शिक्षक समाज बदनाम होतो. अशा वेळी, दोषीला कठोर शिक्षा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निर्दोष शिक्षकांची प्रतिष्ठा राखणे गरजेचे आहे.
या प्रकरणात काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप तर आर्थिक पाणी मुरत असल्याची कुजबुज सुरू आहे. जर खरोखरच आरोपीवर काही उच्चपदस्थांची छत्रछाया असेल, तर न्यायप्रक्रियेला होणारा अडथळा ही लोकशाहीसाठी शोकांतिकाच ठरेल. त्यामुळेच या प्रकरणाची संपूर्ण तपासणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे
शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. त्याच्याकडून नैतिकतेचे आणि आदर्शाचे आचरण अपेक्षित असते. त्यामुळे शिक्षकांविरुद्ध आलेल्या गंभीर आरोपांची चौकशी निष्पक्ष, पारदर्शी आणि जलद होणे अत्यंत आवश्यक आहे.
जर दोषी सिद्ध झाला, तर कठोर शिक्षा देऊनच समाजाला एक स्पष्ट संदेश दिला पाहिजे की, शिक्षकी पेशात अशा प्रकारच्या व्यक्तींसाठी जागा नाही. आणि जर खोट्या आरोपांखाली एखाद्या शिक्षकाचा छळ होत असेल, तर दोषारोप करणाऱ्यांवर आणि अशा प्रकारचे शडयंत्र रचणाऱ्यांवरही तितकीच कठोर कारवाई व्हावी.

समतेच्या लढ्यात जनजागृतीचा प्रकाश : पाचोऱ्यात समता सैनिक दलाची भव्य बाईक रॅली संपन्न

0

Loading

पाचोरा  –”समता, बंधुता आणि न्याय या महामूल्यांचा दीप प्रज्वलित करणारी ऐतिहासिक संघटना – समता सैनिक दल – आज नव्याने जनतेच्या मनामनात चेतवली जात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 98 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या शिस्तबद्ध, लढाऊ संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली केवळ एक सांघिक अनुशासनाचा उत्सव नव्हे, तर समतेच्या संघर्षासाठीची जागृती ठरली.”
       या ऐतिहासिक रॅलीचे आयोजन समता सैनिक दलाचे राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या प्रेरणादायी आवाहनानंतर करण्यात आले होते. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समता सैनिक दलाची चळवळ गतिमान व्हावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत व्हावा, या उद्देशाने ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरोधात लढा देताना 1927 मध्ये ‘समता सैनिक दल’ या संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना त्याकाळी सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन ठरली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजामध्ये संघटीतपणा, शिस्त, साहस आणि संघर्षशीलता यांचे बीज रोवले. समता सैनिक दल ही केवळ एक संघटना नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची जिवंत चळवळ आहे.
          आजही त्याच उद्दिष्टांशी बांधील राहून या संघटनेचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका आणि गावस्तरीय नेतृत्व नव्या जोमाने पुन्हा या संघटनेच्या पुनरुज्जीवनासाठी झटत आहे. याच प्रेरणेतून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त अशा प्रकारच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय समता सैनिक दलाच्या राज्य कमिटीने घेतला आहे.
       पाचोरा शहरात 13 मार्च रोजी काढण्यात आलेली बाईक रॅली अत्यंत शिस्तबद्ध, अनुशासित आणि प्रभावी स्वरूपात पार पडली. या रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील तरुणवर्गाने स्वखर्चाने व स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. रॅलीचे नेतृत्व समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या वर्षीही यशस्वीपणे रॅलीचे आयोजन करण्यात आले.
      पाचोरा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याचे अत्यंत काटेकोर नियोजन केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली आणि शेवटी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले. शहरातील जनतेने रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून सहभागींचे स्वागत करण्यात आले.
     पाचोरा शहर पोलिस प्रशासनाने या रॅलीसाठी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला. रॅली शिस्तबद्धतेत पार पडावी यासाठी वाहतूक नियंत्रण, मार्गदर्शन आणि अनुशासनाच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
    या रॅलीमध्ये जिल्हा सचिव अरुण खरे, पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे, भडगाव तालुका अध्यक्ष रामजी जावरे, भडगाव तालुका सचिव दिलीप पवार, सोयगाव तालुका अध्यक्ष पाचोरा शिवराम जाधव, तालुका सचिव शरद पवार, पाचोरा शहराध्यक्ष शांताराम सोनवणे, भडगाव शहराध्यक्ष शांताराम गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
     अश्पाक शेख, विक्की ब्राम्हणे, राहुल साठे, अजय संसारे, अरुण गायकवाड, सागर निकम, आदेश जाधव, आनंद सुरवाडे, निलेश सपकाळे, अजय गजरे, भैय्या गायकवाड, सोनू तेली, नरेश ब्राम्हणे, कलीम तडवी, कुणाल सोनवणे, जितेंद्र निकम, दीपक भिल्ल, गोविंद भिल्ल, विश्वनाथ सोनवणे, राहुल मोरे, गौरव सपकाळे, चंद्रकांत सोनवणे, प्रविण सावळे, अनिल ब्राम्हणे, दीपक पाटील, रमाकांत सोनवणे, गजानन इंगळे, लक्ष्मण शेजवळ.तसेच माजी नगरसेवक अशोक मोरे, दीपक अदिवाल, भावडू जाधव, शशिकांत मोरे, दीपक शेजवळ, ईश्वर डोंगरे, कपिल पाटील, अनिकेत डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
      आजही समाजामध्ये अनेक प्रकारच्या विषमता, जातीभेद, लिंगभेद आणि अन्य सामाजिक भेदभावांचे स्वरूप दिसून येते. अशा पार्श्वभूमीवर समता सैनिक दलासारख्या संघटनांची गरज अधिक तीव्रपणे जाणवते. समाजामध्ये समतेची भावना रुजवण्यासाठी केवळ आंदोलन नव्हे, तर विचारप्रसार, शिस्तबद्ध संघटन आणि नेतृत्व निर्माण करणे आवश्यक आहे.                                          या दृष्टिकोनातून समता सैनिक दल आज नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही संघटना एक शक्तिकेंद्र आहे. पाचोऱ्यातील रॅलीने याची पुन्हा एकदा प्रचीती दिली.
               या रॅलीत युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे विशेष वैशिष्ट्य ठरले. आपल्या खर्चाने आणि मनापासून या चळवळीत सहभागी होणाऱ्या युवकांनी सामाजिक परिवर्तनासाठी नव्या उर्जेचा संचार केला. समता सैनिक दलाच्या माध्यमातून युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनासाठी झगडण्याची वृत्ती बळकट होत आहे. राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली संघटना नव्या उंचीवर पोहोचत आहे. त्यांनी दिलेल्या आवाहनामुळे राज्यभर जागृती निर्माण झाली असून, प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रेरित झाले आहेत.
         समता सैनिक दलाची रॅली केवळ एक कार्यक्रम नव्हता – ती एक चळवळ होती. ती एक विचारधारा होती. समतेसाठीची आग, न्यायासाठीचा निर्धार आणि बंधुतेसाठीचा आग्रह – या तिन्ही मूल्यांचा संदेश पाचोऱ्यातून संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला.
      समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली शिस्त, निष्ठा आणि एकजूट ही पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरेल. महामानवांच्या विचारांची ही मशाल अशाच प्रकारे प्रत्येक गावात, प्रत्येक मनात पोहोचत राहो, हीच अपेक्षा.

“शहरी सजावटीच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘स्टुडीओ स्वरुप’ आर्किटेक्चर, इंटेरिअर डिझाईन आणि वास्तु कन्सल्टंट फर्मचा भव्य शुभारंभ!”

0

Loading

पाचोरा | दिनांक : १५ मार्च २०२५
सजग विचार, शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आणि सौंदर्यपूर्ण साकारतेची त्रिसूत्री बाळगून शहरात आता एक नव्या युगाची सुरुवात होत आहे. वास्तुशास्त्र, अंतर्गत सजावट (इंटेरिअर डिझाईन) आणि आधुनिक स्थापत्यकलेची त्रिसंधी साधणारी एक अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण फर्म “स्टुडीओ स्वरुप” याचा भव्य शुभारंभ साजरा होत आहे. हा उद्घाटन सोहळा फाल्गुन कृ. १, शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार असून, हा कार्यक्रम शहरी स्थापत्य आणि वास्तु क्षेत्रात एक नवा अध्याय ठरणार आहे.
    हा विशेष सोहळा पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर, पोलीस लाईनसमोर साजरा होणार आहे. सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात पाचोऱ्यातील विविध मान्यवर, वास्तुविशारद, व्यापारी, उद्योजक, शासकीय अधिकारी, आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीं उपस्थीत राहणार आहे
     या फर्मच्या स्थापनेमागे उभे आहेत दोन प्रेरणादायी तरुण आर्किटेक्ट – आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील (B.Arch.) आणि विशाल राजेंद्र सोनवणे. त्यांचा दृष्टीकोन म्हणजे – सौंदर्य, उपयोगिता आणि शास्त्र यांचं समतोल मिश्रण. घर, ऑफिस, व्यावसायिक संकुल, दुकाने किंवा क्लासिक वास्तू – प्रत्येकासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना, कार्यक्षम रचना, आणि शास्त्रीय दृष्टीकोन यांचा संगम साधणं हेच ‘स्टुडीओ स्वरुप’चे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
   या फर्मचे संस्थापक आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील हे एक कुशाग्र, तंत्रज्ञानाशी सुसंगत, आणि नवसंवेदनेने झपाटलेले तरुण आहेत. त्यांचे वास्तुविशारद क्षेत्रातील शिक्षण “विद्यावर्धन आयडिया कॉलेज, नाशिक” येथे पूर्ण झाले. बाल्यापासूनच त्यांच्या मनात वास्तुशास्त्राविषयी आकर्षण आणि रचनात्मक विचारांची बीजे रोवली गेली होती.
  गो.से.हायस्कूल, पाचोरा येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कलेच्या अभ्यासासाठी नाशिकमध्ये वास्तुशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यांच्या कामाच्या पद्धतीत नेमकेपणा, कल्पकता आणि भारतीय वास्तुशास्त्राची सखोल समज यांचे उत्तम सामंजस्य पाहायला मिळते.                 आर्किटेक्ट जयेश पाटील यांचे आजोबा बाबा डॉ. विष्णू पाटील हे एक नामवंत व अनुभवी वैद्यकीय अधिकारी होते. तारखेडा बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव. समाजसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रामाणिकतेचे मूल्य त्यांनी आपल्या कुटुंबात रुजवले. आज जयेश पाटील यांचे विचार आणि कामाचे बळ हे त्यांच्या आजोबांच्या संस्कारांचीच साक्ष देतात.
     ‘स्टुडीओ स्वरुप’ ही फर्म केवळ स्थापत्य डिझाईनपुरती मर्यादित नसून, खालील क्षेत्रांमध्ये सेवा देण्याचा संकल्प करते –
नवीन घर , बंगले ,अपार्टमेंट यांची संपूर्ण आराखडा व रचना
व्यावसायिक संकुल, शोरूम, ऑफिसेस यांचे अंतर्गत सजावट डिझाईन
वास्तुशास्त्रावर आधारित सल्ला आणि प्लॅनिंग
नूतनीकरण व पुनर्रचना (Renovation & Remodeling) सेवा
पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम बांधकाम कल्पना
    पाचोरा सारख्या शहरात अशा व्यावसायिक फर्मची गरज खूप दिवसांपासून जाणवत होती. पारंपरिक आराखड्यापलीकडे जाऊन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक योजनांची निर्मिती ‘स्टुडीओ स्वरुप’च्या माध्यमातून होणार आहे. यातून नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
     ‘स्टुडीओ स्वरुप’च्या स्थापनेमुळे आता स्थानिक ग्राहकांना देखील जागतिक दर्जाच्या आर्किटेक्चरल व इंटेरिअर डिझाईन सेवा सहज उपलब्ध होतील. यामुळे जिल्ह्याबाहेर जाऊन डिझाईन सल्ला घेण्याची गरज संपेल. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होईलच, शिवाय स्थानिक स्तरावरच रोजगार व विकासाच्या संधीही निर्माण होतील.
    या फर्मच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आपण सर्व नातेवाईक,मान्यवर, कुटुंबिय, मित्रपरिवार व वास्तुशास्त्र प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक – आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील, विशाल राजेंद्र सोनवणे व त्यांचा परिवार यांनी केले आहे.संपर्कासाठी खालील क्रमांकांवर आपण थेट संवाद साधू शकता :
मोबाईल : ७०८३१२००३१ / ७७२१०५९७७२

होळीच्या अग्नीत सामाजिक दुर्गंधीचा अंत- संदीप महाजन

0

Loading

भारतीय संस्कृती ही सण-उत्सवांनी समृद्ध आहे. होळी हा त्यातील एक अत्यंत रंगीबेरंगी, उत्साही, पण त्याचवेळी अर्थपूर्ण असा सण आहे. होळी केवळ रंगांचा उत्सव नसून, तो असतो वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचा. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही होळी आपल्याकडे रंग आणि उर्जेचा झंकार घेऊन येत आहे. पण या वर्षी आपण या उत्सवाकडे केवळ रंगाच्या डबक्यातून नव्हे, तर वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहूया का?
या वर्षीच्या होळीच्या निमित्ताने आपण

प्रत्येकाने काहीतरी वेगळं संकल्प करायचं आहे. फक्त रंग उधळायचे नाहीत, तर आपल्यातील काही नकारात्मक विचार, भावना, दृष्टिकोन, आचरण – यांचं दहन करायचं आहे.
जसे कोणीतरी म्हणाले,
“जमा करतोय आज तिरस्काराची लाकडं, मत्सराच्या गोवऱ्या, हेव्या-दाव्याचं गवत… होळीत दहन करायचं आहे, ज्वाला गगनास भिडवायच्या आहे..”
हा विचार एकट्या व्यक्तीचा न राहता, संपूर्ण समाजाचा झाला, तर खऱ्या अर्थाने होळीच्या अग्नीत होईल वाईट प्रवृत्तींचं समूळ उच्चाटन.
होळीचा सण प्राचीन काळापासून वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. होलिका दहन ही त्या दृष्टीने प्रेरणादायी परंपरा आहे. हिरण्यकश्यपूच्या दहशतीच्या विरोधात प्रल्हादाच्या श्रद्धेचा विजय, हा केवळ धार्मिक मिथक नाही, तो आजही समाजाच्या विविध अंगांना लागू पडणारा संदेश आहे. आजचा हिरण्यकश्यपू म्हणजे भ्रष्टाचार, मत्सर, जातीयवाद, दहशतवाद, विषमतावाद व सामाजिक विषमता. यांचं समूळ उच्चाटन करायचं असेल, तर आपण प्रत्येकाने प्रल्हादासारखी श्रद्धा, मूल्यनिष्ठा आणि संयम बाळगायला हवा.
होळीमध्ये आपण सर्व रंग एकत्र उधळतो — काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा… हे फक्त रंग नसून विविध समाजघटकांचे प्रतिनिधी आहेत. एका रंगालाही वगळलं जात नाही — तसंच समाजातही कोणत्याही जाती, धर्म, वर्ग, समुदायाला वगळलं जाऊ नये.
आपण सारे या रंगांच्या संगमातून निर्माण झालेला मानवतावादाचा इंद्रधनुष्य आहोत. हे जाणवून घेणं हीच खरी आजच्या होळीची गरज आहे. “झाकायची आहे त्याच रंगात.. जात, धर्म, कर्म, अन् बरचस काही.. फक्त माणूस कळला पाहिजे, इतकीच सरळ अन् साधी मागणी आहे..”
हा संदेश केवळ काव्यात्मक न राहता वैचारिक परिवर्तनाचा आधार व्हायला हवा.
आजच्या समाजात आपण अनेक प्रश्नांनी ग्रस्त आहोत — भ्रष्टाचार, गरिबी, असमानता, अशिक्षा, अस्वच्छता, दहशतवाद, कट्टरवाद आणि मानसिक दुटप्पीपणा. होळीच्या अग्नीत या सर्वांचा नाश करण्याचा संकल्प करायला हवा. जर प्रत्येक नागरिक आपल्या मनातील एक तरी नकारात्मक भावना या अग्नीत अर्पण करेल, तर हे देश आणि समाजासाठी एक नवजीवन ठरेल. शुद्धीकरण केवळ शरीराचं नाही, तर विचारांचं, मनाचं आणि समाजाचं असावं — हीच होळीची खरी प्रेरणा ठरू शकते.
आपण रंग उधळतो, पण समाजात आजही काही रंग कायम ‘गळपटलेले’ आहेत — गरीब, वंचित, शोषित, दुर्लक्षित घटक आजही रंगीबेरंगी उत्सवांपासून कोसो दूर आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग पोचवणं ही आपल्या सणांची खरी पूर्तता आहे.
होळी साजरी करताना आपण फक्त आपल्या घरापुरता विचार न करता, गरजूंना रंग, मिठाई, प्रेम आणि स्नेहाचा वाटा दिला पाहिजे. कोणीतरी यथार्थ लिहिलं आहे — “होळी ही केवळ रंगांची नव्हे, तर मनांतील दुराव्यांच्या भिंती रंगवण्याची वेळ असते.”
सण-उत्सव ही केवळ मौजमजा नाही, ती मूल्यसंस्कारांची परंपरा आहे. आजची पिढी जेव्हा या सणांचे फक्त ‘फेस्टिव्ह सेलिब्रेशन’ म्हणून डिजिटल पोस्टमध्ये फोटो टाकते, तेव्हा त्या मागे असलेला भावनिक व सांस्कृतिक वारसा कुठे हरवतोय असं वाटतं.
आपल्याला पुढच्या पिढीसाठी केवळ उत्सव नव्हे, तर त्यामागचा आशय, विचार आणि सामाजिक संदेशही पोहोचवावा लागेल. होळीच्या निमित्ताने आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ‘सामाजिक समरसता’, ‘सांस्कृतिक एकात्मता’ आणि ‘मूल्याधिष्ठित जीवन’ यांचे धडे दिले पाहिजेत
होळी केवळ समाजिकदृष्ट्या नव्हे, तर वैयक्तिकदृष्ट्याही एक सुवर्णसंधी आहे. आपण आपल्या मनात दडलेली नकारात्मकता, द्वेष, अपमान, कटुता, सूडबुद्धी, तुलना, मत्सर — याचंही दहन या निमित्ताने केलं पाहिजे.
एक शुद्ध, समजूतदार, संयमी व्यक्तिमत्व घडवणं ही आपल्या जीवनाची प्राथमिक जबाबदारी आहे. आपण बदललो तरच समाज बदलेल. प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मकतेचा रंग उधळण्याची सुरुवात केली, तर एक नवं सामाजिक चित्र साकार होईल.
सणांच्या माध्यमातून समाजातील समस्यांवर भाष्य करणं ही फक्त लेखकांची जबाबदारी नाही, तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्वानेदेखील त्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.
सणांचा राजकारणासाठी उपयोग न करता, समाजजागृतीसाठी केला गेला, तर देश घडेल. ‘होळीच्या दहना’त राजकारणातील फूट, लोकांना भडकवणारी भाषा, सामाजिक विद्वेष, जातीयवाद, खोटं प्रस्थापित करणारी प्रचारयंत्रणा – यांचंही उच्चाटन झालं पाहिजे. “होळीच्या पवित्र अग्निमध्ये भ्रष्टाचार, गरीबी, निरक्षरता, अस्वच्छता आणि दहशतवाद, कट्टरवाद, दुटप्पीपणा यांचे दहन होवो, अणि सर्वांना आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो..”
या इच्छेने आपण ही होळी एक नवसंकल्प म्हणून साजरी करूया.
सण असतो आनंदाचा, पण तो आनंद केवळ क्षणिक नसून, दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाचा स्त्रोत ठरावा.
आणखी काय हवे?
थोडी सहानुभूती, थोडा समंजसपणा, थोडं विवेकाचं गवत आणि सत्यतेची ज्योत.
या होळीच्या निमित्ताने फक्त रंग उधळू नका, तर विचारही उधळा… प्रेमाचे, समतेचे, सौहार्दाचे!
झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजच्या सर्व वाचकांना होळी आणि धुलीवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान : मानसिक आरोग्य आणि सशक्तीकरणाला चालना

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गणेश क्रीडा मंडळ, टाटा कंपाऊंड, परेल येथे “स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि संतुलन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.  सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मंडळाचा हा उपक्रम सातत्याने १८ वर्षे सुरू आहे.

महिला घरगुती जबाबदाऱ्या, नोकरी आणि सामाजिक अपेक्षांमध्ये समतोल राखताना मानसिक तणावाला सामोऱ्या जातात. तसेच, हार्मोनल बदल आणि वैयक्तिक नातेसंबंधांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. डॉ. शेलार यांनी या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकत तणाव व्यवस्थापन आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी प्रभावी उपाय सुचवले.

कार्यक्रमाची सुरुवात विजय कक्कर यांच्या मधुर गाण्याने झाली. त्यानंतर प्रतिक्षा पंकज फाटक आणि किरण सत्यप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते डॉ. शेलार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी व्यासपीठावर गीता चमनम, पुजा केळुस्कर, शुभांगी कदम ह्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.

महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभानंतर “पैठणीचा खेळ” हा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. या खेळात प्रथम क्रमांक मनिषा शेंडे, रेखा कदम आणि ऋतुजा कांबळे यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक करीना विश्वकर्मा, रुतिका राणे आणि भारती कांबळे यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक विशाखा राणे, किरण मिश्रा आणि काजल जडेजा यांनी मिळवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले, तर रविंद्र पाटील, विक्रांत लाळे आणि किरण जाधव यांनी त्यांना सहकार्य केले. या यशस्वी उपक्रमासाठी गणेश क्रीडा मंडळ, टाटा कंपाऊंड, परेल यांचे प्रमुख पदाधिकारी देवेंद्र केळुस्कर, कमलाकर केळुस्कर, पंकज फाटक, सुनिल सुकाळे, किशोर कदम आणि रोहन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रेरणादायी उपक्रमातून महिलांना मानसिक सशक्तीकरणाची नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला चालना मिळाली आहे.

डॉ. गणेश राठोड यांची ‘एम्का’च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड – एक सेवाभावाने प्रेरित नेतृत्वाचा नवा अध्यायसरचिटणीस पदी डॉ. सागर धडस यांची नेमणूक – अंबरनाथच्या वैद्यकीय क्षेत्रात नवचैतन्याचा शुभारंभ

0

Loading

अंबरनाथ – सामाजिक जबाबदारीची जाणीव, वैद्यकीय सेवेची निःस्वार्थ वृत्ती, आणि संघटनात्मक नेतृत्वाची प्रभावी शैली यांचा त्रिवेणी संगम म्हणजे डॉ. गणेश राठोड यांचे व्यक्तिमत्त्व. अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन (एम्का) च्या अध्यक्षपदी नुकतीच त्यांची सर्वानुमते निवड झाल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात नव्या उमेदीचा श्वास पसरला आहे. सरचिटणीस पदावर डॉ. सागर धडस यांची नेमणूक झाली असून, ही संपूर्ण कार्यकारिणी पुढील चार वर्षांसाठी आपल्या सेवेस सज्ज आहे.
डॉ. गणेश राठोड हे केवळ एक कुशल डॉक्टर नाहीत, तर ते एक संवेदनशील

समाजसेवकही आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ अंबरनाथ, पनवेल आणि चाळीसगावमध्ये सेवा बजावली आहे. ‘शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ या त्यांच्या सेवाभावी संस्थेद्वारे हजारो रुग्णांवर प्रभावी उपचार केले गेले आहेत. कोविड काळात अंबरनाथ शहरात त्यांनी घेतलेले निर्णय, अंबरनाथ पालिका प्रशासन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यात साधलेला समन्वय, हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण आहे.
अलीकडेच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्षपदी डॉ. गणेश राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सरचिटणीस डॉ. सागर धडस, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद बाळापुरे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष हांडे आणि डॉ. श्रीकांत गर्जे यांच्यासह सहसचिवपदी डॉ. आजरा शेख आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचीही नियुक्ती झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. मयूरेश वारके, डॉ. शैलेंद्र गायकवाड, डॉ. यतीन भिसे, डॉ. ज्योती नायर, डॉ. प्रकाश कोलते, डॉ. किरण शिंदे, डॉ. नितीन जोशी, डॉ. स्वप्नील बार्डे आणि डॉ. लीना धांडे हे मान्यवर कार्यरत असतील.ही कार्यकारिणी वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांतील तज्ज्ञांनी युक्त असून त्यांच्या अनुभवाचा लाभ ‘एम्का’च्या सामाजिक प्रकल्पांना मिळणार आहे.
कोविडच्या संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा आरोग्य व्यवस्थेवर ताण होता, तेव्हा अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनने जे काम केले, ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स या सर्वांनी संघटित पद्धतीने समाजासाठी जीव धोक्यात घालून सेवा केली. यामध्ये डॉ. गणेश राठोड यांची निर्णायक भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघटना एका छत्राखाली उभी राहिली आणि हजारो नागरिकांना दिलासा मिळाला.
‘एम्का’ने गेल्या अनेक वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील केवळ तांत्रिक सेवाच नाही, तर सामाजिक जाणीव असलेले उपक्रमही राबवले आहेत. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी हेल्थ अवेअरनेस कार्यक्रम, वरिष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सल्ला शिबिरे – हे सर्व ‘एम्का’च्या कार्याचा अविभाज्य भाग आहेत. डॉ. गणेश राठोड यांच्या नेतृत्वात हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूप घेतील, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे.
डॉ. गणेश राठोड यांचा प्रवास एक प्रेरणादायी जीवनगाथा आहे. खानदेशातील चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी पनवेल आणि अंबरनाथमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नात जावई असलेल्या डॉ. गणेश राठोड यांनी त्यांचा सन्मान टिकवत, आपल्या कृतीद्वारे वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
डॉ. गणेश राठोड यांच्या वैद्यकीय प्रवासात त्यांची पत्नी, सुप्रसिद्ध प्रसुती तज्ज्ञ डॉ. अरुणा राठोड यांची महत्त्वपूर्ण साथ आहे. घर आणि रुग्णालय यामध्ये समतोल राखत त्यांनी अनेक महिलांना आरोग्यसाक्षर बनवले आहे. डॉ. राठोड यांचे यश हे त्यांच्या कुटुंबाच्या सहकार्याचेही द्योतक आहे.
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. गणेश राठोड यांनी अध्यक्ष पद स्वीकारताना स्पष्टपणे सांगितले की, अंबरनाथ शहरात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण, सेवा आणि समाजाशी संवाद – यांचा त्रिवेणी संगम साधत ही संघटना कार्यरत राहील, असे त्यांनी प्रतिपादन केले.
अंबरनाथसारख्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्र हे केवळ उपचार देणारे केंद्र न राहता, ते समाजाभिमुख भूमिका बजावणारे यंत्र बनले आहे. अशा काळात एम्का सारख्या संस्थेचे नेतृत्व सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीकडे असणे गरजेचे होते आणि म्हणूनच डॉ. गणेश राठोड यांची निवड अत्यंत योग्य वेळेस झाली आहे.
‘अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन’ ही संघटना केवळ तज्ञ डॉक्टरांची गटसंधी नाही, तर ही एक सामाजिक चेतनेची चळवळ आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था अंबरनाथ परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि समाजसेवेची भूमिका अधोरेखित करत आहे.
आज या संघटनेत ४०० पेक्षा अधिक डॉक्टर्स कार्यरत आहेत – यात फिजिओथेरपिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर्स, सुपर स्पेशालिस्ट, आयुर्वेद व होमिओपॅथिक वैद्य, तसेच महिला डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दरवर्षी सेवा मिळते आणि एम्का ही संस्था समाजाच्या आरोग्य रक्षक म्हणून ओळखली जाते.कोरोनाच्या काळात अंबरनाथ परिसरातील नागरिकांनी जे अनुभवले ते विसरणे अशक्य आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था जेव्हा ढासळू लागली होती, तेव्हा डॉ. गणेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली एम्का संघटना पुढे सरसावली. त्यांनी पालिका प्रशासन, पोलिस विभाग, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवली. तत्काल कोविड हेल्प डेस्क, ऑक्सिजन बेड व्यवस्थापन, कोविड टेस्ट ड्राइव्ह, वैद्यकीय हेल्पलाइन – या सर्व गोष्टी डॉ. राठोड यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाल्या. त्यांच्या या योगदानाची दखल महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली आणि त्यांचा सन्मान केला.
नवीन कार्यकारिणी – समविचारी, कार्यक्षम आणि सामाजिक बांधिलकी जपणारी टीम
एम्का कार्यकारिणी म्हणजे वैद्यकीय सेवेचा एक बहुआयामी पथक. डॉ. सागर धडस हे सरचिटणीस म्हणून केवळ संघटनेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणार नाहीत, तर युवक डॉक्टरांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहेत. कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद बाळापुरे यांच्या अनुभवामुळे संस्थेचा आर्थिक आराखडा अधिक पारदर्शक बनेल.
उपाध्यक्ष डॉ. सुभाष हांडे आणि डॉ. श्रीकांत गर्जे यांच्या कार्यक्षमतेमुळे जिल्हास्तरावरही एम्का आपल्या उपक्रमांची व्याप्ती वाढवू शकेल. सहसचिव डॉ. आजरा शेख व डॉ. मंजुषा कुलकर्णी या दोघी डॉक्टर महिला आरोग्य क्षेत्रात सशक्त नेतृत्व देणार आहेत.खानदेशातील चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले डॉ. गणेश राठोड यांनी समाजसेवेला व्रत मानले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे पनवेलसारख्या शहरी भागातही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ने हजारो रुग्णांना नवी आशा दिली आहे एम्का ही केवळ वैद्यकीय संघटना न राहता सामाजिक समरसतेचा आदर्श मंच म्हणून उदयास आली आहे. डॉ. गणेश राठोड यांचे नेतृत्व सामाजिक विविधतेच्या समन्वयासाठी ओळखले जाते. त्यांनी डॉक्टर्समध्ये जात, धर्म, वर्ग भेद न करता कार्यसंघात्मक दृष्टिकोन वाढवला आहे.
भविष्यातील दिशा – वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांपर्यंत
अंबरनाथ शहरात सुरू झालेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय ही एक ऐतिहासिक घटना आहे. डॉ. गणेश राठोड यांचे लक्ष्य हे केवळ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण नव्हे, तर समाजात दर्जेदार डॉक्टर घडवणे आहे. त्यांनी जाहीर केले आहे की एम्का संस्थेमार्फत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मेंटरशिप प्रोग्रॅम्स, व्यावसायिक कार्यशाळा, आणि इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व गरजूंसाठी वैद्यकीय सल्ला केंद्र, टेलिमेडिसिन सेवा आणि मोबाईल हेल्थ व्हॅन यासारख्या योजना लवकरच सुरू होतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

संघर्षातून सेवेकडे – डॉ. गणेशदादा रामसिंग राठोड यांची प्रेरणादायी जीवनगाथा

0

Loading

यशाची कितीतरी उदाहरणे आपल्याला संपत्ती, संधी आणि सुखसोयींनी परिपूर्ण दिसतात. परंतु डॉ. गणेशदादा रामसिंग राठोड (Mo.9422774628) यांचा प्रवास या सर्वांहून वेगळा आहे—एक संघर्षमय जीवनातून उभारी घेत समाजसेवेची उंची गाठणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कथा. जळगाव जिल्ह्यातील एका अतिशय गरीब बंजारा कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राठोड यांनी वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटवत समाजात आशेचा किरण निर्माण केला आहे.
डॉ. राठोड यांचे बालपण गरिबीच्या छायेत गेले, परंतु मनात आत्मविश्वास आणि ध्येयवेड होती. त्यांनी आपले प्राथमिक

शिक्षण भडगाव येथे घेतले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पाचोरा येथे पूर्ण केले. ते अभ्यासात हुशार होतेच, शिवाय एक उत्तम खेळाडूही होते. खो-खो आणि कबड्डी या क्रीडांमध्ये त्यांनी राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करून आपली चमक दाखवली होती.
त्यांनी पीएमटी मेडिकल कॉलेज, लोणी येथून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून एम.डी. (मेडिसिन) पदवी प्राप्त केली. हा प्रवास केवळ त्यांच्यासाठी नव्हता, तर त्यांच्या समाजासाठीही तो एक अभिमानाचा क्षण ठरला.
वर्ष 2000 मध्ये त्यांनी पाचोरा येथे पत्नी डॉ. अरुणा राठोड (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांच्या सहकार्याने वैद्यकीय सेवा सुरू केली. त्या दोघांनी मिळून ग्रामीण व गरीब जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचवण्याचे कार्य सुरु केले.
डॉ. राठोड यांनी केवळ रुग्णालयापुरते आपले योगदान मर्यादित ठेवले नाही. त्यांनी रोटरी, मानवाधिकार संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारेशी संबंधित विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आदिवासी, दलित आणि गरजू घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या नावे सेवा हीच खरी ओळख बनली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना, त्यांनी २००७ मध्ये ग्रामीण भागात ३ ते ४ पाणी साठवण धरणांची उभारणी केली. हे काम त्यांनी शासनाच्या मदतीने यशस्वी केले. त्यांनी अनेक आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेतली. संपूर्ण जिल्ह्यात रुबेला लसीकरण मोहीम राबवली आणि आजही ते जनजागृतीसाठी कार्यरत आहेत.
सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांत तीन वेळा भाग घेतला. जरी विजय मिळवता आला नाही, तरी समाजसेवेचा निर्धार कायम ठेवला. त्यांनी निवडणूक कधीही स्वार्थासाठी नव्हे, तर सामाजिक परिवर्तनासाठी लढवली.
पुढे त्यांनी खारघर आणि मग अंबरनाथ येथे स्थायिक होऊन आरोग्य व समाजसेवेचा विस्तार केला. २०१६-१७ पासून अंबरनाथमध्ये त्यांनी विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्य सुरू केले. रोटरी, अंबरभूमी अशा संस्थांमधून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. सध्या ते रोटरी स्कूल ऑफ अंबरनाथ ईस्टचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
अलीकडेच त्यांची डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, ते रोटरी क्लबचे चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. राठोड आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळाही चालवत आहेत, ज्यामुळे सामाजिक समतेसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरते.
त्यांच्या पत्नी डॉ. सौ. अरुणा गणेश राठोड – जे.जे. मेडिकल कॉलेज, मुंबई येथून शिक्षण घेतलेली प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ – यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यात भक्कम साथ दिली आहे.
डॉ. राठोड यांना एक आदर्श कुटुंब लाभले आहे. त्यांचा मुलगा कार्तिकेय हा वी.जे.टी.आय., मुंबई येथून बी.टेक. करून सध्या UPSC परीक्षेची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी UPSC परीक्षा दिली असून त्यांची मुलाखत (इंटरव्ह्यू) पार पडली आहे. सध्या अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. त्यांची मुलगी संशा पुण्याच्या प्रतिष्ठित आय.एल.एस. लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. ही दोघंही आपल्या पालकांच्या सामाजिक मूल्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
कोविड महामारीच्या कठीण काळात, डॉ. राठोड यांनी केवळ वैद्यकीय मदतच केली नाही, तर मानसिक आधारही दिला. RMC सारख्या संस्थांमधून त्यांनी सेवा पुरवली. त्यांचे कार्य केवळ अंबरनाथ नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आणि मान्य केले.
आज डॉ. गणेश राठोड हे केवळ डॉक्टर नाहीत – ते एक विचार, एक चळवळ आहेत. समाजहित, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसतो. जळगावच्या धुळीच्या पायवाटांपासून अंबरनाथच्या आरोग्यप्रवाहापर्यंत, हा प्रवास प्रेरणादायी आहे.

भांडुप येथे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स डेव्हलपमेंट (टीआईएसडी) यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेला देशभरातून ५०४ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक विशाल वाघमारे (सहायक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई), राहूल पवार, छाया खोडके आणि आर्मी रिटायर्ड डी.डी. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादनाने केली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली.

टीआईएसडीच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला प्रोत्साहन मिळाले असून संविधानाच्या उद्दिष्टांप्रती जागृती होण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. प्रमुख पाहुण्यांनी टीआयएसडीच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याची सदिच्छा व्यक्त केली.

स्पर्धेतील विजेते स्पर्धक:-

पहिला गट (३री ते ६ वी):-
प्रथम क्रमांक: संचित वसंत ढगे
द्वितीय क्रमांक: सोहम किशोर जाधव
तृतीय क्रमांक: पृथ्वीराज प्रमोद खेमनर
उत्तेजनार्थ:-
चित्राली उमेश राऊळ
अर्णव राजेंद्र वानखेडे
काव्या प्रवीण कराळे

दुसरा गट (७वी ते १०वी):-
प्रथम क्रमांक: अपूर्वा रुपेश नलवडे
द्वितीय क्रमांक: साक्षी सचिन वीर
तृतीय क्रमांक: स्वयंम विनय पाटील
उत्तेजनार्थ:-
सोहन सदाशिव कुंभार
साक्षी रामचंद्र कवठेकर
राज प्रमोद कांबिरे
आर्यन अधिक मांडवेकर
श्रावणी आनंदराव निकम
आर्या निलेश तेलगे
प्रणय पवनकुमार डवंगे
गौरी दत्तात्रय पवार
अर्जुन पूजा हर्षद चव्हाण

खुला गट:-
प्रथम क्रमांक: सुभाष बन्सी साळवे
द्वितीय क्रमांक: वैभवी विनित गावडे
तृतीय क्रमांक: अनिल शहादराव त्रिभुवन
उत्तेजनार्थ:-
विक्रम केरू पारखे
निशा श्रीपाल जाधव
भोसले संतोष भगवान
वीणा रुपेश होळकर
सुनिल‌ जुलाल सोनवणे
ममता दिलीप मोरे
धनराज रघुनाथ दुर्योधन
गौतम अशोकजी शेंडे
विनोद गोविंदा सोनुने
अरुण शंकर जाधव
अविराज यशवंत गोरीवले
पूजा हर्षद चव्हाण

स्पर्धेतील विजेत्यांनी टीआयएसडीच्या संकल्पनेचे कौतुक करत अशा उपक्रमांची देशपातळीवर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टीआयएसडीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी आणि नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, प्रदीप मुंडे आणि चेतन बनसोडे यांचे अल्पोपहार व्यवस्थेसाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

“भूमीरत्न पुरस्काराने १३ महिलांचा सन्मान, सामाजिक उपक्रमातून कु. भूमीचा वाढदिवस साजरा”

0

Loading

मालेगाव-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांची कन्या कु. भूमीच्या वाढदिवसानिमित्ताने “भूमीरत्न पुरस्कार” प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ महिलांचा “भूमीरत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा शालेय

शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या धर्मपत्नी सौ. अनितामाई भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच मनपा आयुक्त रविंद्र जाधव, प्रांताधिकारी नितीन सदगीर व त्यांच्या पत्नी दामिनी सदगीर, मालेगाव बसस्थानक आगार प्रमुख मनीषा देवरे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शंकूनतला दीदी, भारती दीदी, दाभाडी लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम, माजी संचालक मामको रविष मारू, आश्रय अनाथालयाचे सचिव शामकांत पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते.     या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या १३ महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात डॉ. फोरम हिमांशू सोनवणे, इंजि. सौ. शिल्पा राहुल देशमुख, सौ. कविता सुनील कासलीवाल, सौ. संगीता शामकांत चव्हाण, डॉ. सुरेखा सुदाम दप्तरे, सौ. सुरेखा नंदकिशोर भुसे, सौ.सुवर्णा अविष मारू, सरपंच सौ. सुरेखा शरद ठाकरे, सौ. सरोज ब्रिजलाल देवरे (पवार), सौ. शितल अनिल वाघ, कु. तनिशा पुंजराम कापडणीस, सौ. भावना निळकंठ निकम, सौ. वृषाली किरण निकम यांचा समावेश होता तर अविष मारू, तुषार सूर्यवंशी आणि भूषण बच्छाव यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.कु. भूमीच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि मिष्टान्न भोजनाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाने पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत समाजोपयोगी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श प्रस्थापित केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बेलदार यांनी केले, सूत्रसंचालन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे इनचार्ज हरीश मारू यांनी केले, तर आभार प्रबंधभूमीचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या नियोजनात वैभव भांबर, दिपक पवार, प्रभाकर सोळुंके, चंद्रकांत गोसावी, बबलू खैरणार, व आश्रय अनाथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!