Home Blog Page 19

पाचोरा अनुदान प्रकरणांवर उद्या आंदोलन ठाम : शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत माघार नाही, तहसील कार्यालयाचा अधिकृत खुलासा जाहीर

0

Loading

पाचोरा -अनुदानासंदर्भात उद्या दिनांक 15 जानेवारी 2025 गुरुवारी सकाळी 11.30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुलाबसिंग पाटील यांचे आमरण उपोषण तर संदीप महाजन यांचे शेतकरी बांधवांसोबत लाक्षणिक उपोषण होणार असल्याची ठाम भूमिका जाहीर झालेली असताना, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तहसील कार्यालयाने आज पत्रकार संदीप महाजन यांना एक सविस्तर व अधिकृत पत्र पाठवून सन 2019 पासून आजपर्यंतच्या शेतकरी अनुदान प्रकरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रामध्ये पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांतर्गत देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, चुकीच्या खात्यावर वर्ग झालेल्या रकमा, त्यावर करण्यात आलेली प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही तसेच सद्यस्थिती यांचा तपशील देण्यात आला असून, सदर पत्राची जशीच्या तशी प्रिंट प्रत बातमीसोबत जोडण्यात आली आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रानुसार, सन 2019 पासून आजपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या वेळोवेळी संबंधित गावांच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या व उपलब्ध अधिकृत अभिलेखांच्या आधारे अनेक प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले असून, अशा एकूण 598 इसमांच्या खात्यावर 2 कोटी 7 लाख 50 हजार 597 रुपये इतकी रक्कम चुकीच्या पद्धतीने जमा झाल्याची नोंद कार्यालयीन स्तरावर असल्याचे पत्रात नमूद आहे. या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चुकीच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेपैकी शासनाकडे वसुलीची कार्यवाही करत 46 इसमांकडून 17 लाख 62 हजार 26 रुपये इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अनुदानाच्या अफरातफरीप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 428/2025 दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडून करण्यात येऊन संबंधित प्रकरणात मा. न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही पत्रातून स्पष्ट होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेनुसार केवळ खुलासे व आकडेवारी पुरेशी नसून, सन 2019 पासून आजपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झालेली एकूण रक्कम, प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम, अद्याप अदा न झालेल्या रकमा, तसेच ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांची नावे व त्यामागील कारणांसह संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच 2019 पासून आजपर्यंत कोणताही

शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, गुन्हा दाखल असो, कोर्टकचेरी सुरू असो, वसुलीची प्रक्रिया असो किंवा कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय बोजे असोत, या प्रक्रियांशी शेतकऱ्यांचा थेट संबंध नसून यादीतील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदानाची रक्कम मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली आहे. तहसील कार्यालयाच्या पत्रामध्ये माहे ऑक्टोबर 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, 41 हजार 408 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 57 कोटी 19 लाख 19 हजार 535 रुपये इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करून त्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे नमूद आहे. ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार आधार, बँक तपशील व संमतीपत्र प्राप्त असलेला कोणताही पात्र शेतकरी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड होण्यापासून प्रलंबित नसल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे तहसील प्रशासनाने अनुदान प्रकरणांतील कार्यवाही नियमांनुसार झाल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, उद्या होणाऱ्या आमरण व लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील पुढील घडामोडींकडे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आज दि.14/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज उत्साह आणि कार्यक्षमता वाढलेली राहील. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक व्यवहारात सावधपणा आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिरतेचा आहे. नियोजनबद्ध प्रयत्नांना यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस साधारण आहे.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा

मिथुन-आज संवाद महत्त्वाचा ठरेल. नवीन ओळखी उपयोगी ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक ताजेपणा जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक बाजू संयमाने हाताळा. घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. शांतता राखणे हितावह ठरेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-प्रतिष्ठा वाढवणारा दिवस आहे. जबाबदाऱ्या वाढल्या तरी आत्मविश्वास टिकेल. वादविवाद टाळा. वरिष्ठांकडून मान्यता मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे आज निर्णायक ठरतील. ताण जाणवला तरी परिणाम चांगले मिळतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-समतोल राखण्याचा दिवस आहे. भागीदारीतील कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस समाधान देणारा ठरेल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीयता जपा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन संधींचा विचार करा. शिक्षण आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर लक्ष ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेचा लाभ मिळेल. कामात स्थैर्य आणि प्रगती दिसेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कुरंगी–बांबरुड गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी किरण प्रताप पाटील यांचा नवा चेहरा चर्चेत

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील कुरंगी–बांबरुड गटासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील हडसन येथील रहिवासी आणि श्रीराम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक किरण प्रताप पाटील हे इच्छूक उमेदवार म्हणून पुढे येत असून गटात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वच्छ प्रतिमा, सेवाभावी वृत्ती आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे किरण पाटील यांना सर्वसामान्य नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. किरण प्रताप पाटील यांनी सीआयएसएफमध्ये तब्बल 14 वर्षे देशसेवा केली असून या काळात त्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्यांची जोपासना केली. देशसेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बिल्डिंग मटेरियल व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कष्टावर उद्योग उभा केला, मात्र व्यवसायापुरतेच न थांबता समाजकार्याची आवड त्यांनी कायम जपली. रात्री अपरात्री गरजू नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, आजारपणात दवाखान्यात उपचारासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करणे, तसेच अचानक उद्भवलेल्या अडचणींमध्ये वेळ न पाहता मदतीचा हात देणे ही त्यांची ओळख ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. कुणालाही काही समस्या आल्यास सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटून त्यांचे म्हणणे ऐकणे आणि तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती लोकांना भावत आहे. त्यामुळेच निर्व्यनी, निष्कलंक, एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा कुरंगी–बांबरुड गटात दृढ होत आहे. किरण पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे खंदे समर्थक असून राजकारणात पारदर्शकता आणि विकास हाच आपला केंद्रबिंदू असल्याचे ते ठामपणे सांगतात. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमदारकीची हवा डोक्यात शिरणे, वरिष्ठांशी सतत गैरसमज निर्माण होईल असा संपर्क ठेवणे किंवा वाळूचोरीसारख्या कोणत्याही बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होणे हे कधीच करणार नाही अशी महत्वपूर्ण चर्चा देखील किरण पाटील यांच्या बाबतीत जोरदार आहे. कायदेशीर मार्गाने आणि लोकहिताचा विचार करूनच विकास साधला जाईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुरंगी–बांबरुड गटातून शिवसेनेचे तिकीट किरण पाटील यांना मिळावे, अशी चर्चा व अपेक्षा पंचक्रोशीत सुरू असून स्वच्छ प्रतिमा व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला आणि थेट जनतेशी जोडलेला किरण पाटील सारखा असाच उमेदवार मिळावा अशी भावना जनतेतुन व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी किरण पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणीही गटात जोर धरू लागली आहे. इच्छूक उमेदवार किरण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा साहेबांनी मला जर शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी त्या संधीचे सोनं करीन आणि ज्या पद्धतीने आमदार किशोरआप्पा पाटील विकासकामे करतात त्याच धर्तीवर त्यांच्या आदेशानुसार कुरंगी–बांबरुड गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देत गटाचा समतोल व शाश्वत विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशसेवेची शिस्त, व्यवसायातील अनुभव आणि समाजकार्याची तळमळ या बळावर किरण प्रताप पाटील यांचा हा नवा राजकीय प्रवास कुरंगी–बांबरुड गटात आशेचा नवा किरण ठरत असून आगामी निवडणुकीत हा नवा चेहरा कोणती दिशा देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दि.13/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात वेग येईल. घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थैर्य देणारा आहे. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवाद कौशल्यामुळे अडचणी सुटतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक ताजेतवानेपणा जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक बाजू मजबूत राहील. कुटुंबाकडून आधार मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची सुरुवात होईल. संयम आणि समजूतदारपणा ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह -नेतृत्वगुण आज ठळक होतील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी यश मिळेल. वाद टाळल्यास प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे लक्षात घ्या. थोडा ताण जाणवू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल साधावा लागेल. सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-आत्मविश्वास वाढलेला राहील. जुने प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधींचा विचार करा. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे मान-सन्मान वाढेल. कामात स्थैर्य येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस मध्यम स्वरूपाचा राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा तालुक्यात आदिवासी भिल्ल समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी एकलव्य आदिवासी संघटनेचे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन आजपासून सुरू

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाला मूलभूत हक्क व नागरी सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी एकलव्य आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आज सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून पाचोरा येथे बेमुदत बिऱ्हाड आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाचोरा तालुक्यातील विविध आदिवासी वस्त्यांमध्ये आजही घरकुल, वीज, रस्ते, पाणी, दफनभूमी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शासन आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र आणि लोकप्रतिनिधींच्या शिफारशी असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ठरलेल्या वेळेनुसार आंदोलनस्थळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले. मौजे म्हसास येथील 21 आदिवासी भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरकुलासाठी जागा मंजूर असतानाही मौजे रामेश्वर येथील गट नंबर 69/अ मध्ये रस्ते, ओपन स्पेस, नागरी सुविधा व दफनभूमी उपलब्ध करून संपूर्ण मोजणी करण्यात आलेली नाही. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शासनाने आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न झाल्याने लाभार्थ्यांना अद्याप घरकुलाचे स्वप्न अपूर्णच आहे. उपविभागीय अधिकारी पाचोरा यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या पत्रात सुविधा न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत वीज, रस्ते, पाणी अशा कोणत्याही सुविधा प्रत्यक्षात मिळालेल्या नाहीत. वीज नसल्यामुळे आदिवासी वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य असून महिलांना व लहान मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डीपीडीसी अंतर्गत आदिवासी वस्तीसाठी नवीन 250 केव्हीएचे रोहित्र, 15 विद्युत खांब व विजतारा बसविण्याची शिफारस संबंधित मंत्र्यांनी केली होती. दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीचे पत्र असूनही अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे आदिवासी समाजात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मौजे अंतळी बुद्रुक येथील गट नंबर चारमध्ये आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण करून दफनविधी केलेल्या प्रेतांची विटंबना केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दफनभूमीतील पुरावे नष्ट करून शेत तयार केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून सदर जागा अधिकृत दफनभूमी म्हणून स्वतंत्र सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. बहुळा धरणातील मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांना मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थांमध्ये सभासद करून घेण्यात यावे, तसेच मौजे भडाळी व मौजे बिल्दी येथील आदिवासी समाजाला भविष्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात दफनभूमी व घरकुलासाठी गावठाण जागा उपलब्ध करून द्यावी, अशा इतरही मागण्या आंदोलनात ठळकपणे मांडण्यात येत आहेत. एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सुधाकरराव वाघ, गणेश वाघ, एकनाथ अहिरे, कैलास भावकल यांनी स्पष्ट केले आहे की, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत हे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरूच राहणार आहे. प्रशासनाने आदिवासी समाजाच्या संयमाची परीक्षा न घेता त्वरित न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आज दि.12/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ दिसतो. कुटुंबातील सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस शांत आणि स्थिरतेचा आहे. नियोजनबद्ध कामामुळे समाधान मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य सुधारण्याची चिन्हे आहेत.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा

मिथुन-आज संवादातून मार्ग निघेल. नव्या ओळखी उपयुक्त ठरतील. कामात चपळाई ठेवा. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक समतोल राखणे आवश्यक आहे. घरातील प्रश्न समजूतदारपणे सोडवता येतील. आर्थिक बाजू हळूहळू सावरत जाईल. संयम ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आज प्रतिष्ठा वाढवणारा दिवस आहे. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडाल. अहंकार टाळल्यास अधिक लाभ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. थोडा ताण जाणवेल पण परिणाम समाधानकारक असतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-समन्वयातून यश मिळेल. भागीदारीच्या कामात प्रगती होईल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस सकारात्मक जाईल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-आत्मविश्वास वाढेल. जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. गोपनीयता राखणे हितावह ठरेल.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधी मिळू शकतात. शिकण्याची इच्छा वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे मान वाढेल. कामात स्थैर्य येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांतीची गरज भासेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेतकरी अनुदान घोटाळ्यातील आरोपींच्या वकिलालाच भाजपकडून स्वीकृत नगरसेवक? ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा उघड निषेध, पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट – वरिष्ठ स्तरावरून तातडीने दखल

0

Loading

पाचोरा – नगर परिषदेत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षच्या स्थानिक संघटनेत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून या पराभवामुळे केवळ राजकीय नुकसान झाले नाही तर निर्णयप्रक्रियेत जुन्या, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याची तीव्र भावना उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पक्ष कार्यालयात भाजपच्या जुन्या व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वाच्या मनमानी व एकतर्फी निर्णयांवर उघड नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून पक्षासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने पक्ष संघटनेत तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष मुंढे पाटील, बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, माजी तालुकाध्यक्ष हिंमतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष दीपक माने, माजी शहराध्यक्ष रमेश वाणी, दत्ता बोरसे पाटील, नंदूबापू सोमवंशी, समाधान मुळे, माजी पदाधिकारी डॉ. शांतीलाल तेली, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना मधुकर काटे यांनी सांगितले की पक्षाने मागील काळात काही नेत्यांना पक्षात सामावून घेणे हा अंतर्गत निर्णय असू शकतो, मात्र त्या निर्णयांचे परिणाम काय होऊ शकतात याची माहिती आम्ही वेळोवेळी पक्षश्रेष्ठी, जिल्हाध्यक्ष तसेच ना. गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना दिली होती, तरीही योग्य वेळी ठोस निर्णय न झाल्याने पाचोरा व भडगाव नगरपालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही आणि दारुण पराभव स्वीकारावा लागला. तरीसुद्धा आम्ही पक्षावर नाराज नाही, कोणीही राजीनामा देणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष असून पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नाही, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र पराभवानंतर आवश्यक असलेली आत्मपरीक्षणाची व सखोल चर्चा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तसेच पाचोरा नगर परिषद गटनेता निवडीदरम्यानही ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय अधिकच वादग्रस्त ठरला असून कोअर कमिटीत असतानाही काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून थेट निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की स्वीकृत नगरसेवक म्हणून अॅड. अविनाश सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांनी शेतकरी अनुदान घोटाळ्यातील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित गंभीर घोटाळ्यातील आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करणे म्हणजे थेट शेतकरीविरोधी भूमिका घेतल्यासारखे असून हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने आम्हाला मान्य नाही व त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे स्पष्ट करण्यात आले. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मते प्रत्यक्षात पक्षासाठी त्याग करणारे, अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना शब्द देण्यात आला होता त्यांनाच संधी देणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही शिवाय आगामी काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका होणार असून अशा वेळी जनतेसमोर विशेषतः शेतकऱ्यांसमोर जाताना अनुदान घोटाळ्याशी संबंधित वकिलाला भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून सदस्यत्व दिल्याचे उत्तर कसे द्यायचे, असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वांना व शेतकरीहिताच्या भूमिकेला शोभणारा नसल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी आक्रमक मागणी करत पाचोरा नगर परिषद पराभवानंतर भाजपमध्ये निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शेतकरीहित या मुद्द्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे या पत्रकार परिषदेतून ठळकपणे समोर आले आहे.याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली असून भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून शेतकरी अनुदान घोटाळ्या प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेणारे ॲड. अविनाश सुतार यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द साठी युद्ध पातळीवर जोरदार हालचाल सुरू झाली आहे

आज दि.11/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज निर्णयक्षमता वाढलेली जाणवेल. कामात पुढाकार घेतल्यास यश मिळेल. खर्च करताना गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. घरातील वातावरण सकारात्मक राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस संयमाचा आहे. आर्थिक व्यवहारात स्थिरता राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : गडद हिरवा

मिथुन-नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. बोलण्यात स्पष्टता ठेवा. प्रवासाचे योग संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : फिकट पिवळा

कर्क-मन संवेदनशील राहील. जवळच्या व्यक्तीशी संवाद वाढवा. आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. कामात शांतता ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : चंदेरी

सिंह-आत्मविश्वासामुळे कामे सोपी होतील. नेतृत्वाची संधी मिळू शकते. वादविवाद टाळा. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-आज नियोजनात बदल करावे लागू शकतात. कामाचा ताण वाढेल पण परिणाम चांगले मिळतील. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळसर

तुला-नातेसंबंधात समतोल राखा. सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. दिवस समाधान देणारा आहे.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : फिकट गुलाबी

वृश्चिक-एकाग्रतेने काम केल्यास प्रगती होईल. जुनी अडचण सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. भावनांवर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : गडद मरून

धनु-आशावाद वाढलेला राहील. शिक्षण व ज्ञानवृद्धीसाठी अनुकूल दिवस आहे. प्रवासात सावधगिरी ठेवा. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळट

मकर-जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. घरगुती प्रश्न मार्गी लागतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करड्या छटेचा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास दिवस यशस्वी ठरेल.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी निळा

मीन-भावनिक समज वाढेल. कलात्मक कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. मन:शांतीसाठी वेळ काढा.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : फिकट हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

विद्यार्थ्याच्या अपघातानंतर तत्काळ कृती; रात्रीच खड्डे बुजवून जय बारावकर यांचा आदर्श पुढाकार

0

Loading

पाचोरा – शहरातील श्री गो से हायस्कूलच्या कॉर्नर परिसरात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डे व वर आलेल्या सळईंमुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे, जीव धोक्यात आले होते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून वाहनांची चाके सळईंमध्ये अडकणे, सायकलस्वार घसरून पडणे, दुचाकीस्वार जखमी होणे अशी परिस्थिती नित्याची बनली होती. पावसाळ्यानंतरही या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने समस्या अधिकच गंभीर झाली होती. काल शाळा सुटण्याच्या वेळी या धोकादायक रस्त्यावरून जात असताना एका विद्यार्थ्याच्या सायकलचे चाक वर आलेल्या सळईमध्ये अडकले आणि त्याचा अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र ही घटना रस्त्याच्या विद्यमान स्थितीचे विदारक वास्तव समोर आणणारी ठरली. त्याच सुमारास डीवायएसपी ऑफिसकडून मार्गक्रमण करत असताना पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांचे सुपुत्र जय बारावकर त्या ठिकाणी आले. त्यांनी अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून रस्त्यावरील धोका लक्षात घेतला. विशेष म्हणजे नगरपालिका सकाळी उघडेल, तक्रार करू आणि मग काम होईल असा क्षणाचाही विचार न करता जय बारावकर यांनी तात्काळ निर्णय घेत रात्री सुमारे अकराच्या सुमारास स्वतःच्या मालकीचे खड्डे बुजवण्याचे साहित्य त्या ठिकाणी आणले, मजूर मागवले आणि धोकादायक खड्डे तसेच वर आलेल्या सळईंच्या परिसरात त्वरित दुरुस्तीचे काम करून घेतले. अंधारातही सुरक्षिततेची काळजी घेत, वाहतूक विस्कळीत होऊ न देता, आवश्यक ठिकाणी खड्डे बुजवून मार्ग सुकर करण्यात आला. या तत्परतेमुळे रात्रीच रस्त्यावरील तातडीचा धोका दूर झाला आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सामाजिक जाणीव व जबाबदारीची भावना दाखवत केलेल्या या उपक्रमाबद्दल जय बारावकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नागरिक, पालक आणि वाहनचालकांनी त्यांच्या तत्काळ कृतीचे कौतुक केले असून अपघातानंतर नव्हे तर अपघात टाळण्यासाठी केलेली कृती महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही दुरुस्ती तात्पुरती असली तरी भुयारी मार्ग ते गो से हायस्कूल या संपूर्ण पट्ट्यावर रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण किंवा किमान शास्त्रशुद्ध दुरुस्ती तातडीने व्हावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शाळा परिसर असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्ता सपाटीकरण, योग्य डांबरीकरण, सळई पूर्णपणे काढून सुरक्षित बांधकाम तसेच आवश्यक ठिकाणी इशारा फलक व गतीमर्यादा राबवाव्यात अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पाचोरा नगरपालिका प्रशासनानेही रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना तक्रारींची प्रतीक्षा न करता नियमित पाहणी, वेळेवर दुरुस्ती आणि शाळा परिसरात विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकीकडे जय बारावकर यांचा हा आदर्श पुढाकार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला असला तरी दुसरीकडे नगरपालिकेनेही याची दखल घेऊन संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण त्वरित हाती घ्यावे अशी ठाम अपेक्षा पाचोरा शहरातून पुढे येत आहे.

शेतकरी अनुदान मिळत नसेल तर असा अर्ज करा; पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे दाद मागण्याचे आवाहन

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी अनुदान योजना, मदत योजना तसेच पीक विमा योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने ऐकायला मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांची जमीन नोंद, पीक नोंद, आधार-बँक लिंकिंग आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रिया पूर्ण असतानाही अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष खात्यावर जमा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र अनेक वेळा योग्य पद्धतीने अर्ज न दिल्याने, अर्जाचा मजकूर कसा असावा याची माहिती नसल्याने किंवा “आपोआप मिळेल” या अपेक्षेने शेतकरी प्रशासनाकडे लेखी दाद मागत नाहीत. परिणामी पात्र असूनही अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन व आवाहन करण्यात येत आहे की, जर सन 2019–2020 पासून किंवा त्यानंतरच्या कोणत्याही वर्षात शेतकरी अनुदान, विविध मदत योजना किंवा लागू असल्यास पीक विम्याचा लाभ मिळालेला नसेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या नावाने थेट तहसीलदार कार्यालयात लेखी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. असा अर्ज दिल्यानंतर संबंधित शासकीय नोंदी तपासल्या जातात आणि पात्रता सिद्ध झाल्यास अनुदान मिळण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होते. अर्ज करताना काही मूलभूत बाबी स्पष्टपणे नमूद करणे महत्त्वाचे आहे. शेतजमिनीचा सर्वे नंबर व गट नंबर, जमीन बागायत किंवा जिरायत स्वरूपाची असल्याची माहिती, सातबारा (7/12) व ८-अ (8A) उतारे अद्ययावत असल्याचा उल्लेख अर्जात असावा. तसेच तलाठी कार्यालयामार्फत पीक नोंद नियमित झाली आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि बँक खाते DBT साठी कार्यरत आहे, हे स्पष्ट शब्दांत नमूद करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी पूर्ण असूनही अनुदान मिळालेले नाही, अशी थेट व स्पष्ट मागणी अर्जात करणे आवश्यक ठरते. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करताना विनाकारण अनेक कागदपत्रांच्या झेरॉक्स देण्याची गरज नाही. अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मागितली जातील, या भीतीने ते अर्जच करत नाहीत. प्रत्यक्षात प्राथमिक चौकशीसाठी केवळ किमान आवश्यक कागदपत्रे जोडली तरी प्रक्रिया सुरू होऊ शकते. यामध्ये अद्ययावत सातबारा उतारा, ८-अ खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकचा पहिला पृष्ठ, पीक नोंद प्रत आणि लागू असल्यास पीक विमा पावती एवढीच कागदपत्रे पुरेशी ठरतात. शेतकऱ्यांनी हेही लक्षात घ्यावे की अर्ज हा साध्या, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ भाषेत असावा. भावनिक मजकूर किंवा आरोपांची गरज नसते. “मी पात्र असूनही अनुदान मिळालेले नाही, कृपया चौकशी करून मला पात्र लाभ देण्यात यावा,” अशी थेट मागणी प्रभावी ठरते. योग्य पद्धतीने दिलेला अर्ज हीच पुढील कार्यवाहीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, अनुदान मिळत नसेल तर गप्प न बसता लेखी अर्ज करून आपल्या हक्कासाठी प्रशासनाकडे दाद मागावी. अनेक वेळा एक साधा अर्जही अडकलेल्या प्रकरणाला चालना देतो आणि वर्षानुवर्षे रखडलेला लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करतो. माहितीअभावी किंवा भीतीपोटी अर्ज न करणे हे स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे आहे. योग्य माहिती, किमान कागदपत्रे आणि स्पष्ट अर्ज या तीन गोष्टी लक्षात ठेवल्यास शेतकरी आपला हक्क अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. अर्जासंदर्भातील व शेतकरी अनुदान संदर्भातील अधिक माहितीसाठी व आपला अर्ज स्वीकारला जात नसेल तर शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप दामोदर महाजन, पाचोरा Mo.7385108510 यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!