Home Blog Page 34

भातखंडे येथे घरफोडी प्रकरणाचा पाचोरा पोलिसांनी केला जलद उलगडा – ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0

Loading

जळगाव –  जिल्ह्यात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पाचोरा पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि कार्यकुशलता दाखवत केवळ काही तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) हे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या नातलगांच्या लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायद्याच्या हेतूने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम अंदाजे ४१,५०० रुपयांची लंपास केली. या घटनेबाबत फिर्यादींनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्र. ५३०/२०२५ भादंवि कलम ३३१(१) अन्वये नोंदविण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तात्काळ तपास पथक तयार करून चोरीचा तपास सुरू केला. गुन्हा घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, भातखंडे खुर्द येथील रहिवासी कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५) या तरुणावर संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत भातखंडे खुर्द येथे सापडताच त्यास ताब्यात घेतले. सदर संशयिताची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण ४१,५०० रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याने अत्यंत कमी वेळेत एक गंभीर घरफोडी प्रकरण उघडकीस आणत जनतेत विश्वास निर्माण केला आहे. या यशस्वी कारवाईमागे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांचे प्रभावी मार्गदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम यांचे समन्वय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांचे सक्रिय पर्यवेक्षण लाभले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात सपोनि संजय निकुंभ, पोना महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकोन संदीप राजपुत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंगी, संतोष राजपुत आणि अनिल पवार या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. जिल्हा पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता केवळ गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरत नाही, तर जनतेतही पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते. ग्रामीण भागात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर पाचोरा पोलिसांनी केलेली ही तत्पर आणि व्यावसायिक कारवाई आदर्शवत ठरत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे मनापासून कौतुक केले असून, योग्य वेळी दिलेल्या प्रतिसादामुळे जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलिसांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. पाचोरा पोलिसांची ही जलद आणि प्रभावी कारवाई जिल्ह्यातील पोलिसांच्या सतर्कतेचे आणि गुन्हे उघड करण्याच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

उपजिल्हाधिकारी पदावर आम्रपाली कासोदेकर यांची नियुक्ती — पाचोऱ्याच्या भूमीचा सन्मान

0

Loading

पाचोरा : पाचोराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारी आनंदवार्ता म्हणजे येथील सुपुत्री आम्रपाली कासोदेकर (मेने) यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाचोरा व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, समाजातही अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. आम्रपाली कासोदेकर या दिवंगत शामकांत कासोदेकर, सेवानिवृत्त ग्रंथपाल, एम. एम. महाविद्यालय, पाचोरा आणि शालीनी कासोदेकर यांच्या कन्या होत. वाणी समाजात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या कुटुंबाने नेहमीच समाजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक आदर्श ठेवला आहे. आम्रपाली यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण वाणी समाजाचा आणि स्पेशली ज्ञान प्रबोधिनी मंडळ व त्याचे प्रमुख प्रा राजेंद्र चिंचोलेसह पाचोऱ्याच्या भूमीचा गौरव वाढला आहे. आम्रपाली या संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध विधी तज्ञ ॲड. मंगेश मेने यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या सासरे दादासाहेब चंद्रकांत मेने हे छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) येथील समाजसेवा आणि संघटन कार्यात सक्रिय असलेले प्रगतिशील व्यक्तिमत्त्व आहे. आम्रपाली कासोदेकर या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे शासकीय सचिव सुनिल वाणी यांच्या मेहुणी असून, त्यामुळे या परिवाराचे सामाजिक, प्रशासकीय आणि वैचारिक क्षेत्रात विशेष योगदान आहे. सन २००१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून आम्रपाली कासोदेकर यांनी प्रशासनात प्रवेश केला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जिल्हा प्रशासनातील तहसीलदार म्हणून झाली. या दोन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी जामनेर, मालेगाव, खुलताबाद, संभाजीनगर आणि परभणी अशा विविध ठिकाणी तहसीलदार जबाबदारीची पदे भूषविली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख कार्यशैलीतून आपले वेगळेपण सिद्ध केले. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदार पदावर कार्यरत असून, त्यांच्या प्रशासकीय कामगिरीची दखल शासनाने घेतली आहे. नुकत्याच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नती यादीनुसार आम्रपाली कासोदेकर यांची उपजिल्हाधिकारी पदावर बढती निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती “उप व्यवस्थापकीय संचालक, सारथी” या महत्वाच्या पदावर करण्यात आली आहे. “सारथी” ही संस्था राज्य शासनाची एक महत्त्वाची संस्था असून, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना व तरुणांना उच्च शिक्षण, रोजगार आणि मार्गदर्शनासाठी कार्य करते. त्यामुळे या पदावर आम्रपाली यांचे योगदान समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनाबद्दलची पारदर्शकता, जनतेशी सुसंवाद आणि निर्णयक्षमता ही गुणवैशिष्ट्ये विशेष ठरली आहेत. त्यांनी काम केलेल्या ठिकाणी विकासकामांची गती वाढली, जनतेचे प्रश्न तातडीने सोडवले गेले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवले गेले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि स्थानिक नागरिकांकडूनही त्यांना नेहमीच कौतुक मिळाले आहे. आम्रपाली कासोदेकर यांच्या या यशामागे त्यांचे माता- पिता गुरुजन वर्ग व त्यांची स्वतःची मेहनत, संयम, शिस्तबद्ध जीवनपद्धती आणि कुटुंबाचे भक्कम पाठबळ आहे. शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यात लहानपणापासून वाचन, प्रामाणिकता आणि सामाजिक संवेदनशीलता या मूल्यांचा संस्कार केला. या संस्कारांचे फळ म्हणजे त्यांनी आज मिळवलेले हे उच्च पद. त्यांच्या पदोन्नतीची बातमी जाहीर होताच पाचोरा, संभाजीनगर आणि वाणी समाजात सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध सामाजिक संघटनांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले. “झुंज” वृत्तपत्र आणि “ध्येय न्यूज” चे संपादक संदीप महाजन परिवाराने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत म्हटले आहे की, “आम्रपाली कासोदेकर यांच्या या नियुक्तीने वाणी समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि महिलांनी प्रशासन क्षेत्रात कसे उल्लेखनीय यश मिळवावे याचे उदाहरण निर्माण झाले आहे.” महिला सक्षमीकरणाचा आणि समानतेचा आदर्श ठेवत, आम्रपाली कासोदेकर यांनी जिद्द, ज्ञान आणि निष्ठेच्या जोरावर प्रशासकीय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाचोरा या छोट्या शहरातून सुरुवात करून त्यांनी राज्य प्रशासनाच्या उंच शिखरावर झेप घेतली आहे. त्यांच्या या प्रवासाने अनेक तरुणींना नव्या दिशेने विचार करायला भाग पाडले आहे. त्यांच्या कार्यकाळात जनतेशी सलोखा राखणे, योजनांची पारदर्शक अंमलबजावणी आणि विकासविषयक निर्णयांमध्ये लोकसहभाग वाढवणे या बाबी कायम अग्रक्रमावर राहिल्या आहेत. अशा प्रगल्भ आणि संवेदनशील अधिकाऱ्यांची पदोन्नती ही शासनासाठीही गौरवाची बाब आहे. उपजिल्हाधिकारी पदावर आम्रपाली कासोदेकर यांची नियुक्ती म्हणजे प्रशासनात संवेदनशीलता, प्रामाणिकता आणि कार्यक्षमतेचा संगम होय. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पाचोरा शहर, वाणी समाज आणि सर्व समाजबंधूंनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा प्रवास पुढेही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आज दि.12/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात गती येईल. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ संभवतो.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा सहवास लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: नवे संपर्क लाभदायक ठरतील. कामात यश मिळेल. प्रवासाच्या योगाने मन प्रसन्न राहील. मानसिक स्थैर्य टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: आज घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्तता राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. मानसिक शांतीसाठी ध्यान उपयुक्त राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प हाताळण्यास शुभ दिवस.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबात सौहार्द टिकेल. आरोग्य उत्तम राहील. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज भावनांवर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च संभवतो. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरु करण्यास योग्य दिवस. प्रवास फायदेशीर ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती लाभेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

चला पाचोरा! आता आश्वासन नको, तर पूर्ती हवी — १३ नोव्हेंबरपासून लक्षवेधी आंदोलन, तर १८ नोव्हेंबरपासून आंदोलक संदीप महाजन यांचे आमरण उपोषणआज मान्यवरांना निवेदन देऊन प्रतिक्रीया घेणार

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनाचा बिगुल वाजला आहे. “आता आश्वासन नको, तर पूर्ती हवी!” या घोषवाक्याखाली दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लक्षवेधी आंदोलन सुरू होणार आहे, तर शासनाने मागण्यांवर निर्णय न घेतल्यास १८ नोव्हेंबर २०२५ मंगळवार रोजी सकाळी ११ पासून आंदोलक संदीप महाजन आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी सांगितले की, २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जामनेर व चाळीसगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना जसे अनुदान दिले गेले, तसेच पाचोरा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही कोणतीही अट न ठेवता आणि कोणत्याही कारणावरून विलंब न करता सरसकट अनुदान थेट जमा करण्यात यावे. यासाठी जे अधिकारी अथवा कर्मचारी अनुदान मिळण्यात अडथळे निर्माण करीत आहेत किंवा कर्तव्यात कसूर करीत आहेत, त्यांना निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, सन २०१९ पासून आतापर्यंतच्या सर्व शेतकरी अनुदानाची सविस्तर माहिती शासनाने पीडीएफ स्वरूपात तत्काळ सार्वजनिक करावी, जेणेकरून नागरिकांना पारदर्शक माहिती मिळेल. पाचोरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना अनुदान वितरणाच्या बाबतीत झालेल्या सर्व व्यवहारांचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे. या आंदोलनात तिसरी महत्त्वाची मागणी म्हणून संदीप महाजन यांनी म्हटले आहे की, सदरचा घोटाळा जालना, पाचोरा आणि आता मुक्ताईनगर येथे उघडकीस आला असल्याने या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक पातळीवर न होता, राज्यभर उच्चस्तरीय यंत्रणांमार्फत व्हावी. त्यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणाचा तपास SIT, ED आणि CBI सारख्या स्वायत्त संस्थांमार्फत मे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, जेणेकरून कोणत्याही दबावाशिवाय सत्य बाहेर येईल.” महाजन यांनी सांगितले की, पाचोरा येथील प्रथम तक्रारदार नाईक या शेतकऱ्यांने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध व ई-सेवा केंद्रचालकांविरुद्ध थेट तक्रार दिली असतांना अशा प्रकरणात विलंब न लावता त्यांना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी. आर्थिक गुन्हा शाखेतर्फे सुरू असलेला तपास हा पाचोरा तहसिलदार यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर आधारित आहे. परंतु या समितीतीलच एक सदस्य आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आरोपी म्हणून निष्पन्न झाले असल्याने ही समिती संशयास्पद ठरत आहे. म्हणूनच आर्थिक गुन्हा शाखेने स्वतःच्या स्तरावरून स्वतंत्र तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संदीप महाजन यांनी पुढे म्हटले की, “मे. न्यायालयासमोर तपासाअंती आरोपींची नावे निष्पन्न होण्याआधीच त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमले जावे. अन्यथा आरोपी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात.” तसेच, आर्थिक गुन्हा शाखेकडून होणारा तपास, पंचनामे आणि जबाब यांची नोंद प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पुरावा स्वरूपात — म्हणजेच व्हिडीओ कॅमेरावर — करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात काही लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या लोकप्रतिनिधींच्या सह्या बनावटपणे करण्यात आल्या आहेत, त्यांची संपूर्ण नावे व तपशील सार्वजनिक करावेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी आशिष कडूबा काकडे यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी — जे पाचोरा तालुक्याचे रहिवासी नाहीत आणि ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही — त्यांनी बनावट शेतजमिनीचे गट क्रमांक दाखवून अनुदान घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात त्यांच्या वहिणी सौ. मोहिनी, सासरे विजय, सासू सौ. वैशाली, शालक आदित्य आदींचा समावेश आहे. तसेच आरोपी आणि त्यांच्या भावांनी पाचोरा शहरात जवळपास ८० लाख रुपये बाजारभावाने जमीन खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे. त्यांनी असेही सांगितले की, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आरोपी क्रमांक २ गणेश हेमंत चव्हाण याने आपल्या वडिलांच्या मदतीने — हेमंत ज्ञानदेव चव्हाण — अनुदानाची रक्कम खोट्या लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले असूनदेखील हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांना अद्याप सहआरोपी म्हणून समाविष्ट केलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यांनाही तातडीने आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महाजन यांनी सांगितले की, यापुढे या प्रकरणात जे-जे आरोपी म्हणून निष्पन्न होतील, त्यांच्या अटकेसाठी तातडीने युद्धपातळीवर हालचाली करण्यात याव्यात. आरोपींना कायदेशीर संरक्षण मिळू नये, त्यासाठी ठोस पावले उचलावीत. या सर्व मागण्यांसाठीच हे लक्षवेधी आंदोलन आणि आमरण उपोषण होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आमचे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे, कोणावर वैयक्तिक सूड नाही. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही शेवटपर्यंत लढू.” शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले — “आंदोलनाच्या पावित्र्यात, एकतेचा दीप उजळू द्या! शेतकऱ्याच्या घामाचा आदर करा, भ्रष्ट्राचाराचा अंत करा आणि सर्व एकत्र या!” या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन (मो. ७३८५१०८५१०) करीत असून, त्यांनी पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी हितचिंतक आणि नागरिकांना या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात आंदोलक संदीप महाजन यांनी सदरचे निवेदन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले असून आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्तरावर आमदार किशोरआप्पा पाटील,माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,अमोलभाऊ शिंदे,वैशालीताई सूर्यवंशी,सचिनदादा सोमवंशी,उद्धवभाऊ मराठे,रमेशशेठ बाफना या मान्यवरांना भेटून आंदोलन निवेदनाच्या प्रती देऊन ऑन व्हिडिओ कॅमेरा त्यांची प्रतिक्रिया घेणार आहेत

आज दि.11/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कार्यात प्रगतीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण सुखद राहील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा आधार लाभेल.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: संवादकौशल्यामुळे लाभ होईल. कामात गती येईल. प्रवास लाभदायक ठरेल. मानसिक स्थैर्य राखा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: आज घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. संयम ठेवा, दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न यशस्वी होतील. घरात सौहार्द टिकेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. मित्रांचा सहवास लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज भावनांवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास शुभ दिवस. प्रवास किंवा भेटीगाठी लाभदायक ठरतील. आत्मविश्वास टिकवा.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबात समाधान राहील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मित्रांचा सहवास लाभेल. आर्थिक प्रगती संभवते.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक चिंतनात मन रमेल. जुने प्रश्न सुटतील. मनःशांती लाभेल. दिवस शांततेत जाईल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

गो.से. हायस्कूलचा शिक्षकांसाठी अनोखा उपक्रम — शिक्षकांची धमाल, मजा आणि मस्तीचा अविस्मरणीय अनुभव

0

Loading

पाचोरा – सहसा शैक्षणिक सहलींचे आयोजन म्हटले की ते विद्यार्थ्यांसाठीच असते, त्यातून त्यांना निसर्ग, विज्ञान, इतिहास आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न असतो. मात्र याच धर्तीवर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो.से. हायस्कूलने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांऐवजी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी खास शैक्षणिक सहलीचे आयोजन करून संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात एक नवे पर्व आरंभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही सहल आखण्यात आली होती. दीपावली सुट्टीनंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन अध्यापनातून व कार्यातून थोडा विरंगुळा मिळावा, नवचैतन्य निर्माण व्हावे, तसेच आपापसातील संवाद व आपुलकी वृद्धिंगत व्हावी या हेतूने रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी भंडारदरा या रमणीय ठिकाणी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी नेमक्या पाच वाजता श्री. गो.से. हायस्कूलच्या आवारातून बसने सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी प्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान सर्वांनी एकत्र येऊन गीतगायन, गप्पा, विनोद आणि छोट्या खेळांच्या माध्यमातून प्रवास अधिक रंगतदार बनवला. उत्साह, आनंद आणि हशा यांनी बसमधील वातावरण प्रसन्न झाले होते. शिक्षकांमधील परस्पर संवाद आणि स्नेहभावना अधिक दृढ होत असल्याचे सर्वांनाच जाणवले. भंडारदरा येथे पोहोचल्यावर दुपारी स्वादिष्ट भोजनानंतर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ऑर्थर लेक अर्थात विल्सन धरण, रंधा धबधबा आणि कळसुबाई शिखर या परिसरात शिक्षकांनी फिरून मनसोक्त आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात सर्व शिक्षकांनी विविध छायाचित्रे काढत फोटोग्राफीचा आनंद घेतला. पर्वतरांगांमध्ये भरलेला धुक्याचा दरवळ, धरणाच्या पाण्यावर पडणारे सूर्यकिरण आणि वाऱ्याने झुलणारी झाडे — या सगळ्याने मन भारावून गेले. अनेकांनी या ठिकाणी सामूहिक छायाचित्रे काढून या क्षणांना कायमची आठवण बनवली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यानही गाणे, नृत्य आणि विनोदी कार्यक्रम सादर करून वातावरण अधिक आनंदी केले. काहींनी पारंपरिक गाणी गायली, तर काहींनी लघुनाटिका आणि नृत्य सादर करून सहलीला एक वेगळे रंगरूप दिले. ही सहल केवळ विश्रांतीसाठी नव्हे तर एकमेकांना नव्या नजरेने जाणून घेण्याची, सहकार्याची भावना दृढ करण्याची आणि कामाचा ताण हलका करण्याची संधी ठरली. परतीच्या प्रवासात चांदवडजवळील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणुका देवीच्या मंदिराला भेट देऊन सर्व शिक्षकांनी देवीचे दर्शन घेतले आणि आपल्या कार्यजीवनात प्रेरणा मिळो अशी प्रार्थना केली. या पवित्र दर्शनाने सहलीचा शेवट अत्यंत आध्यात्मिक वातावरणात झाला. या सहलीत मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे सपत्नीक सहभागी झाले होते. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, आर. बी. बांठिया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या सहलीत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून ही सहल एकत्रितपणे संस्मरणीय बनवली. सहलीबद्दल शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि नियोजनामुळे ही सहल यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीमुळे शिक्षकांना नवचैतन्य प्राप्त झाले असून, ते अधिक प्रेरित होऊन शैक्षणिक कार्यात योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाइस चेअरमन व्ही. टी. जोशी, स्थानिक समिती चेअरमन खलील देशमुख आणि तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी शिक्षकांच्या या सहलीचे अभिनंदन करत, “शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्यापुरते मर्यादित न राहता, स्वतःचा मानसिक व भावनिक विकास घडविण्यासाठी अशा उपक्रमात सहभागी व्हावे,” असे मत व्यक्त केले. गो.से. हायस्कूलच्या या सहलीमुळे शिक्षक वर्गामध्ये परस्पर स्नेह, आत्मीयता आणि एकात्मतेचा नवा धागा निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी सांभाळताना थोडा विरंगुळा आणि आनंद अनुभवावा, ही कल्पना किती महत्त्वाची आहे, याचा उत्तम प्रत्यय या सहलीत आला. भविष्यात अशाच उपक्रमांचे आयोजन करून शिक्षकांच्या जीवनात आनंद, प्रेरणा आणि ऊर्जेचा नवा संचार घडविण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. ही सहल म्हणजे शिक्षणसंस्थेच्या इतिहासात एक प्रेरणादायी पाऊल ठरले असून, शिक्षकांसाठीची ही “धमाल, मजा आणि मस्ती” त्यांच्या स्मरणात दीर्घकाळ कोरली जाईल, यात शंका नाही.

आज दि.10/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज नवे काम सुरू करण्यास योग्य वेळ आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नातेवाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराशी संवाद वाढेल. कामात नवे संधी मिळतील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: भावनिक स्थैर्य राखा. घरगुती जबाबदाऱ्यांत व्यस्तता राहील. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: आज उत्साह आणि ऊर्जा भरपूर राहील. नवे संपर्क फायद्याचे ठरतील. प्रतिष्ठा आणि मानमरातब वाढेल.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: मेहनतीचे फळ मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता.
शुभ अंक: 8 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आज नवी योजना तयार करण्यास शुभ दिवस. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आत्मविश्वासाने काम करा. अडथळे दूर होतील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
शुभ अंक: 9 शुभ रंग: काळा

धनु: प्रवासाचे योग उत्तम आहेत. करिअरमध्ये नवी संधी मिळेल. घरगुती सुख वाढेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: आज धाडसाने निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. मानसिक शांती राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आर्थिक व्यवहारात यश मिळेल. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ. मित्रांकडून पाठिंबा मिळेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: आजचा दिवस शांततेत जाईल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. अध्यात्मिक विचारांकडे ओढ राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यातील इंग्रजी माध्यम शाळांचा मुखवटा उघड — अपात्र शिक्षक, ट्युशनचा दबाव आणि मान्यता नसलेल्या शिक्षणाची वाढती फसवणूक!

0

Loading

पाचोरा – पालकांनो सावधान! इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आकर्षक नावाखाली फसवणूक होऊ नये यासाठी सजग व्हा! आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आकर्षित होतो. मुलांना चांगले भविष्य मिळावे, आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून ते आत्मनिर्भर व्हावेत, या इच्छेने अनेक पालक आपला आर्थिक ताण सहन करूनसुद्धा महागड्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. पण याच भावनेचा गैरफायदा काही गैरप्रकार करणाऱ्या तथाकथित इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता वेळ आली आहे की पालकांनी डोळसपणे आणि कायदेशीरदृष्ट्या शाळांची वैधता पडताळून पाहावी. राज्य शासनाने व शिक्षण विभागाने वारंवार सूचित केले आहे की राज्यातील कोणतीही शाळा — ती मराठी माध्यमाची असो वा इंग्रजी माध्यमाची — योग्य त्या मान्यतेशिवाय चालवली जाणे कायद्याने गुन्हा आहे. २०१० पासून लागू असलेल्या Right to Education (RTE) Act 2009 च्या तरतुदींनुसार, प्रत्येक शाळेला शिक्षण मंडळाकडून मान्यता प्रमाणपत्र (Recognition Certificate) मिळवणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्राशिवाय चालवली जाणारी कोणतीही शाळा ‘अनधिकृत संस्था’ समजली जाते आणि अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ करणे होय. अनेक पालक केवळ शाळेचे बाह्यरूप, जाहिरात किंवा “इंग्रजी माध्यम” या टॅगने प्रभावित होतात. सुशोभित इमारती, एसी वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा व डिजिटल बोर्ड दाखवून मोठ्या फी आकारल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या शाळेला शासनाची मान्यता नसते. काही ठिकाणी शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, म्हणजे डी.एड., बी.एड. किंवा टी.ई.टी. पात्रता प्रमाणपत्र नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि भविष्यात त्यांना अधिकृत बोर्डाकडून मान्यता मिळवताना अडचणी येतात. विशेष म्हणजे, पाचोरा शहर आणि परिसरातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अशीच परिस्थिती आढळून येते. अनेक शाळांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण न केलेले तरुण शिक्षक केवळ कमी मानधनात नियुक्त केले आहेत. अशा अपात्र शिक्षकांकडून शिक्षण घेतलेल्या मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्याहून चिंताजनक बाब म्हणजे, याच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर त्यांच्या स्वतःच्या ट्युशन वर्गात जाण्यासाठी दबाव आणला जातो. पालकांकडून शाळेची फी घेतल्यानंतरही मुलांना त्या शिक्षकांच्या खासगी शिकवणीत पाठवण्याची सक्ती केल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. काही शाळांनी तर अधिक धक्कादायक पाऊल उचलत आपल्या शाळेच्या वर्गखोल्याच शिक्षकांना शिकवणीसाठी भाड्याने दिल्या आहेत. मात्र या सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असतांना शिक्षण विभागाचे अधिकारी जाणिव पुर्वक किं अर्थिक पुरवठा होत असल्यामुळे डोळेझाक करीत आहे अशा प्रकारांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे आणि पालकांची आर्थिक फसवणूकही होत आहे. शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश आहेत की शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी खालील बाबी नक्की तपासाव्यात: शाळेकडे राज्य शिक्षण मंडळ किंवा CBSE/ICSE मंडळाचे मान्यता पत्र आहे का हे पाहावे. शाळेच्या इमारतीत मूलभूत सुविधा — वर्गखोल्या, शौचालये, स्वच्छ पाणी, खेळाची जागा आणि अग्निसुरक्षा व्यवस्था — व्यवस्थित आहेत का हे तपासावे. शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्याकडे शासनमान्य शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आहेत का हे विचारावे. शाळेच्या फीची पावती, प्रवेशपत्र व सर्व कागदपत्रे नीट जतन करावीत. मुंबई हायकोर्टानेही यापूर्वी अनेक खटल्यांत स्पष्ट केले आहे की, मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे म्हणजे त्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकाराचे उल्लंघन होय. अशा शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत एकही शाळेवर भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात आली नाही किंवा जी पण केली असेल ती फक्त जाणीवपूर्वक सूचना देऊन ठरवून तपासणी केल्यामुळे हा प्रकार त्यांच्या समोर आलेला नाही  त्यामुळे पालकांनी जर अशा शाळेतील अनियमितता किंवा फसवणुकीचे प्रकार लक्षात घेतले, तर त्यांनी तत्काळ जिल्हा शिक्षण अधिकारी (Primary/Secondary) कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अनेक शाळा केवळ बालवाडीपर्यंतच मान्यता घेतात, परंतु पुढे स्वतःहून पहिली, दुसरी, तिसरी असे वर्ग सुरू करतात. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पालकांनी अशा शाळांच्या फसव्या दाव्यांना बळी पडू नये. शासनाने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, दोषी संस्थांवर शिक्षण अधिनियम १९८७ अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. शिक्षण हे केवळ व्यवसाय नाही, तर समाज घडवण्याचे पवित्र कार्य आहे. त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखून योग्य चौकशी केल्यानंतरच आपल्या मुलांना शाळेत प्रवेश द्यावा. शाळेचे बाह्य स्वरूप नव्हे, तर तिची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे ज्ञान आणि मान्यता यावरच मुलांचे भविष्य अवलंबून असते. शेवटी एकच विनंती — “पालकांनो, आपल्या मुलांच्या भविष्यासोबत प्रयोग करू नका! शाळेचे नाव इंग्रजी असले तरी तिची कायदेशीर ओळख आणि शैक्षणिक गुणवत्ता हीच खरी तपासणीची किल्ली आहे.”

पाचोरा नगरपालिकेची निवडणूक तयारी पूर्ण : वेळ संपल्यानंतर मतदान होणार नाही, पोलिसांकडून काटेकोर देखरेख

0

Loading

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह 14 प्रभागांतील 28 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठीची सर्व प्रशासकीय व सुरक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी दिली आहे. या निवडणुकीत शहरात एकूण 63 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून त्यापैकी एक केंद्र मॉडेल मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी या उद्देशाने प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. प्रशासक मंगेश देवरे यांच्या केबिनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, दगडू मराठे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाचोरा नगरपालिकेसाठी एकूण 59,084 मतदार आहेत. त्यापैकी 30,041 पुरुष आणि 29,037 महिला मतदार असून, या सर्वांना मतदानासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मा. अर्चना मोरे मॅडम यांनी पुढे सांगितले की, मागील निवडणुकीदरम्यान काही केंद्रांवर विशेषतः संभाजीनगर भागातील मराठी शाळेत मतदानाच्या दिवशी प्रवेशद्वाराच्या अभावामुळे मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. तसेच मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील मतदारांची रांग वाढतच राहिली होती. शिवाय, मतदान केंद्र परिसर खुला असल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अपुरी विद्युत रोषणाई आणि पोलीस व्यवस्थेअभावी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व त्रुटी यावेळी होऊ नयेत म्हणून प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केली आहे. मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, पोलीस सुरक्षा, बॅरॅकेट्स आणि प्रवेशद्वारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एकच प्रवेशद्वार ठेवण्यात येणार असून, मतदानाची वेळ संपताच तो मार्ग तत्काळ बंद करण्यात येईल. त्यामुळे मतदारांनी निर्धारित वेळेतच मतदान करून घ्यावे, वेळ संपल्यानंतर कोणालाही मतदानास परवानगी दिली जाणार नाही, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, मतदार यादीतील दुरुस्तीसंदर्भात 5800 हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी 4100 हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे. काही नागरिकांची नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळल्याने त्या मतदारांच्या नावासमोर स्टार (*) चिन्ह लावण्यात आले आहे. अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी आवश्यक फॉर्म भरूनच मतदान करण्याची मुभा दिली जाईल. पत्रकार परिषदेत पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तींवर निवडणुकीदरम्यान विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीदरम्यान कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी, गृह रक्षक, व आवश्यकतेनुसार क्यूआरटी (Quick Response Team) पथकांची नेमणूक करण्यात येईल. शहरातील संवेदनशील केंद्रांची ओळख पटवून त्याठिकाणी अतिरिक्त पोलिसांची तैनाती केली जाईल. निवडणुकीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी 14 भरारी पथके दिवसरात्र गस्त घालणार आहेत. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध शंका, कुशंका आणि प्रश्‍नांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी संयमाने उत्तर दिले. मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प, पिण्याचे पाणी, शौचालय, सावली यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर नियंत्रण अधिकारी आणि महिला कर्मचारी उपस्थित असतील. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदार केंद्रावर पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, मतदारांवर दबाव आणला जाऊ नये आणि मतांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण दक्ष आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व शंका असल्यास थेट निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी नागरिकांना सुचित केले की, मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. सर्व मतदारांनी घरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे व शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडावा. प्रशासनाचे उद्दिष्ट निवडणूक प्रक्रियेला कोणत्याही तणावाशिवाय, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हेच असल्याचे त्यांनी नमूद केले. पाचोरा शहरात होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासनाने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान हा लोकशाहीचा उत्सव ठरणार असून, त्यासाठी सर्व घटक एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे चित्र या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.

आज दि.09/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामात प्रगतीची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरगुती जबाबदाऱ्या पार पाडताना समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: नवे संपर्क लाभदायक ठरतील. कामात गती येईल. प्रवास यशस्वी ठरेल. भावनिक स्थैर्य राखा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: काही जुनी समस्या सुटेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: आज तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध कामामुळे लाभ मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. आरोग्य सुधारेल. मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. नवे प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस. मित्रपरिवाराचा आधार लाभेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज मनावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामातील ताण कमी होईल. संयम ठेवल्यास यश मिळेल.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: प्रवासाचे योग अनुकूल आहेत. प्रयत्नांना यश लाभेल. करिअरमध्ये प्रगती होईल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबातील संबंध दृढ होतील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आज नवे संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रपरिवाराचा सहवास लाभेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक कार्यात मन रमेल. जुने प्रश्न सुटतील. आत्मिक समाधान मिळेल. दिवस शांततेत जाईल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!