Home Blog Page 74

सभासदांच्या हक्कांवर गदा? पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीत उमेदवार डॉ. निलेश मराठे यांचे गंभीर प्रश्न

0

Loading

दि पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम आता अंतिम टप्प्यात पोहचली असून मतदारांच्या मनात प्रश्नांची गर्दी निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली आहे.सहकार पॅनलच्या नेत्यांकडून गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे कौतुक करत पारदर्शकता आणि कायदेशीरतेचा टेंबा मिरवत मते मागितली जात आहेत.मात्र याच सहकार पॅनलच्या कारभारात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे निर्णय घेतले गेले असून हे प्रश्न थेट उमेदवार डॉ. निलेश विनायक मराठे यांनी उपस्थित केले आहेत.या निवडणुकीत केवळ निवडून येण्यासाठी पद्धतशीरपणे सदस्यांच्या मतदानाच्या हक्कांवर गदा आणणारे ठराव व कृती केल्या गेल्या,असा आरोपही त्यांनी उघडपणे केला आहे.डॉ. निलेश मराठे यांनी उपस्थित केलेला एक अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे सभासदांच्या शेअर किमतीमध्ये अचानक वाढ करत जुने सभासद मतदानहक्कापासून दूर ठेवण्याचा कटकारस्थानाचा भाग.सुरुवातीस केवळ 51 रुपयांचे शेअर असलेले सदस्य हे बँकेचे अधिकृत सभासद होते आणि त्यांना मतदानाचा हक्क होता.मात्र नवीन ठराव आणत हा हक्क बदलण्यात आला.यानुसार फक्त 1001 रुपयांचे शेअर असलेल्यांनाच मतदानाचा हक्क दिला गेला.हे करताना बँकेने सर्व सभासदांना वेळेवर माहिती न देता,केवळ काही ठराविक लोकांनाच नव्याने सभासद करून घेतले व त्यांना तातडीने 1001 रुपयांचे शेअर देवून मतदानाचा अधिकार दिला.ही योजना अगदी पद्धतशीरपणे अंमलात आणत हजारो जुने सभासद मतदानापासून वंचित ठेवले गेले,असा थेट आरोप उमेदवार डॉ. निलेश मराठे यांनी केला आहे.ते पुढे म्हणतात की,जर खरोखरच हे निर्णय सर्वांच्या हितासाठी होते,तर बँकेने स्थानिक वृत्तपत्रांमधून,सोशल मीडियावरून तसेच वैयक्तिक मेसेजद्वारे माहिती देऊन सर्व सभासदांना सूचित केले असते की “आपला शेअर फक्त 51 रुपयांचा आहे,आपल्याला मतदानाचा हक्क हवा असल्यास शेअरची रक्कम 1001 रुपये भरून ती सुधारणा करा.”मात्र तसे झाले नाही.याउलट,ही संधी केवळ आपल्याच गटातील,आपल्याच मर्जीतल्या लोकांना मिळावी म्हणून गुपचूप व्यवहार करत त्यांच्या नावावर शेअर्स काढले गेले.उर्वरित हजारो सभासद अंधारात ठेवून त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली गेली.आज जे संचालक मंडळातील लोक मतदारांच्या दारापर्यंत जाऊन किंवा मोबाईलवरून मेसेज पाठवून मतदान मागत आहेत,त्यांनी आधी सभासदांना मतदानहक्कापासून वंचित ठेवले.या सर्व गोष्टी केवळ निवडणूक जिंकण्यासाठीच पद्धतशीरपणे घडवून आणल्या गेल्या असल्याचा संशय निर्माण होतो.मात्र,सभासदांनी या कटकारस्थानांना न जुमानता लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.डॉ. निलेश मराठे यांनी या संदर्भात एक सशक्त भावनिक संदेश दिला असून असे सांगितले आहे की,”सभासदांनो,जरी तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला नसेल तरी प्रचाराचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे.तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांना,नातेवाईकांना,मित्रांना,ओळखीच्या व्यक्तींना डोळसपणे सत्य सांगून मत देण्याची विनंती करा.बँकेचा कारभार पुन्हा पारदर्शक व्हावा,सामान्य सभासदांचे हित जोपासले जावे,यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तींनी छत्र्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून डॉ. निलेश मराठे यांना विजयी करावे.”डॉ. निलेश मराठे यांनी नमूद केले की,“सभासदांनी त्यांच्या पैशाचा विनियोग कुठे होतो,कोणत्या मूल्याने होतो,याची संपूर्ण माहिती मिळवण्याचा हक्क आहे.सभासदांची बँक ही काही कोणाच्या मालकीची नाही,तर सर्वसामान्य सभासदांची आशा व विश्वास यावर उभी आहे.”बँकेच्या प्रशासनातील अशा प्रकारचे निर्णय,जसे की शेअर रकमेवरून वर्गवारी निर्माण करणे,फक्त आपल्याच गटाच्या सभासदांची भरती,पारदर्शकतेचा अभाव आणि फसव्या पद्धतीने प्रचार,हे सर्व प्रकार एका गंभीर व्यवस्थात्मक षडयंत्राचे संकेत देत आहेत.निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना मतदारांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे,असे आवाहन उमेदवार डॉ. निलेश विनायक मराठे यांनी केले आहे.ते म्हणाले की,”आपण भावनांवर नव्हे,तर वास्तवाच्या आधारे निर्णय घ्यावा.निव्वळ मोह,आहेर,तोंडदेखली विनवणी किंवा खोट्या घोषणा याला बळी न पडता आपल्या मताच्या माध्यमातून बँकेच्या भविष्यासाठी योग्य व्यक्ती निवडावी.”एकंदरीत,सभासदांपासून मतदानाचे हक्क हिरावून घेणे,गरजेपुरतेच नव्या सभासदांची भरती करणे,शेअर रकमेवरून वर्गवारी निर्माण करणे आणि नियोजित व्यवहारात अपारदर्शकता या साऱ्यामुळे सहकार पॅनलवर प्रचंड संशयाचे मळभ निर्माण झाले आहे.हे सर्व निर्णय आणि त्यामागील हेतू आता मतदारांनी बारकाईने पाहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.सभासदांच्या हितासाठी,पारदर्शकतेच्या व्यवस्थेसाठी,बँकेच्या प्रत्येक व्यवहारात जनतेचा विश्वास बहाल होण्यासाठी आणि सामान्य सभासदांना निर्णयप्रक्रियेचा भाग बनवण्यासाठी डॉ. निलेश विनायक मराठे यांना मत देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी निवडणुकीच्या अखेरच्या क्षणात जनतेला ठाम संदेश दिला आहे की,“छत्र्या चिन्हाला दिलेले प्रत्येक मत हे सभासदांच्या हक्काच्या सुरक्षेसाठी आणि बँकेच्या निखळ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”
मतदार बांधवांना विनंती माझ्या माझ्या परिवाराचे सदस्य तसेच स्नेही जेवढे शक्य असेल तेवढे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मतदार यादीतील घोळ,खरे पत्ते व मोबाईल नंबर उपलब्ध न होणे यामुळे संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्यांना ही बातमी व बातमी शब्द योग्य वाटत असेल त्यांनी बँकेच्या सभासदांपर्यंत सदस्य बातमी पोहोचवण्याची कृपा करावी ही विनंती

दि पाचोरा पीपल्स बँकेतील नोकरभरतीत पारदर्शकतेचा टेंभा की भूमिपुत्रांचा अवमान?

0

Loading

पाचोरा – को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्थानिक लोकांच्या हितासाठी स्थानिक सदस्यांनी उभारलेली लोकशाही संस्था. यामध्ये लोकसहभाग, पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा मिलाफ असतो. प्रत्येक भागातील को-ऑपरेटिव्ह बँका म्हणजे त्या परिसरातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक आधारस्तंभ असतो. विशेषतः ग्रामीण भागातील अशा बँका केवळ आर्थिक व्यवहारापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्या त्या भागातील बेरोजगार, सेवाभावी तरुणांचे आयुष्य घडवणाऱ्या संस्था ठरतात. परंतु पाचोरा शहरातील बहुचर्चित दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील नुकतीच पार पडलेली नोकरभरती प्रक्रिया या मूल्यांना, या तत्त्वांना आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना मूठमाती देणारी ठरली आहे, असा आरोप सुजाण नागरिक, बेरोजगार युवक, वंचित ठरलेले माजी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने डॉ निलेश मराठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे
दि पाचोरा पीपल्स बँकेचे विद्यमान चेअरमन यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत सदर नोकरभरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याचा टेंभा मिरवत ही संपूर्ण भरती पाचोरा न करता जळगाव येथे केली गेल्याचा उल्लेख केला. हा मुद्दा पहिल्या ऐकाव्यात सामान्य वाटेल, मात्र यामागे दडलेले वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. ज्या बँकेचे नावच पाचोरा या शहराच्या नावाने आहे, त्या बँकेत नोकरभरती प्रक्रियेसाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलून तालुक्या बाहेर ही प्रक्रिया पार पाडणे म्हणजे भूमिपुत्रांच्या नशिबाशी खेळ नाही का?
गेल्या अनेक वर्षांपासून दि पाचोरा पीपल्स बँकेत कार्यरत असलेले किंबहुना लायक असलेले अनेक कर्मचारी अचानक सेवेतून काढण्यात आले होते. त्यापैकी काही जण आजही बेरोजगारीशी लढत असून काही जण आजही पुन्हा कामावर घेण्यात यावे, अशी विनवणी करत आहेत. याशिवाय बँकेत अनेक वर्षे काम करूनही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना भरती प्रक्रियेत त्यांना सेवा जेष्ठतेत स्थान न मिळणे हे अन्यायकारकच नव्हे तर क्रूरतेची परिसीमा आहे. स्थानिक युवक-युवती, अनेकांनी पदव्या घेतल्यानंतरही बँकेसारख्या संस्थांमध्ये संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र या भरती प्रक्रियेत त्यांना पूर्णपणे डावलले गेले.
ही भरती जर पारदर्शक होती तर ती गुप्तपणे, निव्वळ जळगावमध्येच का करण्यात आली? ज्या प्रकारे आज स्वतःच्या निवडणुकीसाठी बँकेच्या संचालक मंडळाने मतांसाठी शहरभर फलक, बॅनर, जाहिरातबाजी सुरू केली आहे, त्याच प्रकारे जर ही भरती होणार असल्याची माहिती देखील शहराच्या कानाकोपऱ्यांपर्यंत बॅनर, जाहिरातीद्वारे देण्यात आली असती, तर भूमिपुत्रांसाठी खुली संधी उपलब्ध झाली असती. परंतु तसे न करता ही भरती पूर्णतः स्थानिकांच्या नजरेपासून लपवून, योजना पूर्वक दुसरीकडे हलवून पार पाडण्यात आली. त्यामुळे ही भरती पारदर्शक नसून पारंपरिक राजकारणाने ग्रासलेली असल्याचा ठाम विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
यावरून मराठे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पाचोऱ्यातील युवा पिढीला सशक्त बनवण्याची जबाबदारी असलेल्या संस्थाच जर त्यांच्या वाट्याचा हक्क हिरावून घेत असेल तर ही लोकशाही व्यवस्थेची चेष्टा आहे. या भरती प्रक्रियेत कोणत्या जाती-धर्माच्या, सामाजिक आरक्षणातील घटकांना किती जागा दिल्या गेल्या? ही माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. बँक जर खरोखर पारदर्शक पद्धतीने काम करत असेल तर ही माहिती प्रसिद्ध करायला काय हरकत आहे?
बेरोजगारीच्या या गंभीर परिस्थितीत, जिथे हजारो युवक हातात डिग्र्या घेऊन नोकरीच्या शोधात आहेत, अशा काळात जर त्यांच्याच गावातील संस्था त्यांना नाकारत असेल, तर त्यांनी कुठे जावे? ही भरती जर पाचोरा शहरातच झाली असती, तर निश्चितच बेरोजगार युवक-युवती, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार, सेवेतून काढले गेलेले कर्मचारी यांचे प्रबळ आवाज उठले असते. मोठे आंदोलन झाले असते. त्या संभाव्य आंदोलनाच्या भीतीपोटीच ही संपूर्ण प्रक्रिया जळगावमध्ये गुप्तपणे राबवण्यात आली, असा ठाम आरोप डॉ निलेश मराठे यांनी केला आहे.
हि बाब निव्वळ एक नोकरभरतीची घटना नसून, ती एक सामाजिक अन्यायाची पातळी गाठणारी कृती आहे. लोकशाहीत नागरिकांना हा अधिकार आहे की, सार्वजनिक संस्थांमध्ये योग्य पारदर्शकतेने भरती प्रक्रिया पार पडावी. मात्र या प्रक्रियेत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करून निव्वळ सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांना लाभ मिळवून देण्याचा डाव आहे. ही निवडणूक माझ्या एकट्यामुळे लागलेली नाही किंवा “हा केवळ नोकर भरतीचा विषय नाही, हा संपूर्ण बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे म्हणून माझी उमेदवारी आहे. जर आज भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर उद्या आर्थिक व्यवहारात काय पारदर्शकता राहील?” त्यांनी पुढे सांगितले की, “आज पाचोऱ्यातील युवकांमध्ये असंख्य गुण आहेत. त्यांनी एमबीए, बीकॉम, सीए, एमसीएसारख्या पदव्या घेतलेल्या असूनही त्यांना स्थानिक बँकेच्या नोकर भरतीत स्थान मिळत नसेल तर हे फक्त दुर्लक्ष नाही तर भूमिपुत्रांच्या स्वाभिमानावर घाव आहे.”
या संपूर्ण प्रकरणातून एकच स्पष्ट संदेश मिळतो – दि पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाने स्थानिक भूमिपुत्रांना, सेवावंचितांना, आरक्षित वर्गातील उमेदवारांना आणि सामान्य बेरोजगार तरुणांना पूर्णतः डावलले आहे. बँकेचा कारभार केवळ निवडणुकीसाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांना लाभ मिळवून देण्यासाठी वापरला जात असल्या मुळेच माझी उमेदवारी आहे डॉ. निलेश विनायक मराठे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, यावेळी मतदान करताना फक्त प्रचाराचे ढोल न ऐकता, भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मला मतदान करा. आजच्या घडीला योग्य व्यक्ती, योग्य नेतृत्व आणि पारदर्शक कार्यपद्धतीची गरज आहे. अशा व्यक्तींनाच निवडून दिले पाहिजे, जे केवळ वचनं नाही तर कृतीतून भूमिपुत्रांचा सन्मान टिकवून ठेवतील.पाचोरा शहरातील जनतेने, विशेषतः बेरोजगार तरुणांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या पालकांनी हा संपूर्ण प्रकार मनात ठेवून मतदानाच्या दिवशी आपले मत स्पष्टपणे व्यक्त करावे. कारण हे फक्त निवडणूक नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. ही वेळ आहे, जागरूकतेची, हक्काची आणि निष्ठेची. आपला स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी, पारदर्शक भरतीसाठी आणि सामाजिक न्यायासाठी, डॉ. निलेश विनायक मराठे यांना मतदान करून संधी द्यावी, ही विनंती.ही निवडणूक फक्त एका उमेदवाराच्या विजयासाठी नाही, तर पाचोऱ्यातील भूमिपुत्रांच्या हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी आहे. हे लक्षात ठेवून मतपेटीपाशी पोहोचताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा. पाचोरा शहराने आणि ग्रामीण परिसराने नेहमीच न्यायासाठी लढा दिला आहे. या लढ्याचे पुढचे पाऊल म्हणजे स्वाभिमानी भूमिपुत्राच्या पाठीशी ठाम उभे राहणे.

दि पाचोरा पीपल्स बँक निवडणूक : शेंदुर्णीतील संशयास्पद व्यवहारावरून सहकार पॅनल अडचणीत

0

Loading

पाचोरा – दि पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली असून प्रचारात वेगवान गती निर्माण झाली आहे. सहकार पॅनलचे प्रमुख यांनी बँकेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाचे पारदर्शक व कायदेशीर स्वरूप अधोरेखित करत जनतेकडून मते मागण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच काळात उघड झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे सदर पॅनलवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विशेषतः जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे दि पाचोरा पीपल्स बँक शाखेसाठी घेतलेली जागा आणि त्या व्यवहाराचा तपशील हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. उमेदवार डॉ. निलेश विनायक मराठे यांनी या व्यवहारावर थेट प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. डॉ. मराठे यांनी विचारले आहे की, शेंदुर्णी येथील पहूर दरवाजा परिसरात 200 स्क्वेअर फुट जागा दि पाचोरा पीपल्स बँकेने घेतली असून सदर व्यवहारासाठी तब्बल 36 लाख रुपये मोजल्याची अधिकृत माहिती आहे. या व्यवहारावरूनच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते आजही या परिसरातील बाजारभाव फक्त 3 ते 4 हजार रुपये प्रति स्क्वेअर फुट इतकाच आहे. त्यानुसार 200 स्क्वेअर फुट जागेची एकूण किंमत 6 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान असणे अपेक्षित आहे. मात्र बँकेने त्यासाठी थेट 36 लाख रुपये खर्च केल्याची बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहे. इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार का व कसा करण्यात आला, याचे उत्तर सहकार पॅनलकडून अजूनही देण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर जागा घेण्यापूर्वी बँकेने कोणतेही अधिकृत टेंडर प्रसिद्ध केले नाही. दि पाचोरा पीपल्स बँकेसारखी सार्वजनिक संस्था जर एखादी मालमत्ता खरेदी करत असेल तर त्यासाठी खुले निविदा प्रक्रियेतून पारदर्शकतेने निर्णय घेतला जाणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात टेंडरविनाच जागा खरेदी केल्यामुळे सहकार पॅनलवर पक्षपात व अपारदर्शक व्यवहार केल्याचा ठपका निश्चितच लागतो. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया योग्य नियमांनुसार व कायदेशीर मार्गाने झाली का? यावर आता मतदार बंधू भगिनींनी गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. स्थानिक शेंदुर्णी ग्रामस्थांच्या साक्षीने घेण्यात आलेल्या प्राथमिक माहितीमधूनही हेच उघड होते की, बँकेने ज्या किंमतीत जागा खरेदी केली, ती किंमत त्या भागातील सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत 5 ते 6 पट अधिक आहे. त्यामुळे 36 लाख रुपयांच्या व्यवहारामागे नक्की कोणाचा फायदा साधला गेला?, हा प्रश्न उपस्थित होतो. ही रक्कम ज्या बँकेच्या हजारो ठेवीदारांनी आपल्या घामाच्या पैशातून गुंतवलेली आहे, त्या बँकेच्या निधीचा वापर इतक्या संशयास्पद पद्धतीने करणे कितपत योग्य आहे? हे सर्व प्रश्न आता मतदारांपुढे उभे राहत असून या प्रकरणावरून सहकार पॅनलची पारदर्शकतेची प्रतिमा डागाळली जात आहे. बँकेने सदर जागा खरेदी करताना कोणत्या प्रकारची निवड प्रक्रिया राबवली? कोणत्या कारणास्तव हाच प्लॉट निवडण्यात आला? यासंबंधी कोणतेही खुलासे अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत. यावरून असे दिसून येते की संपूर्ण व्यवहारात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न झाला आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. निलेश विनायक मराठे यांनी स्पष्ट केले आहे की, “मी लवकरच या व्यवहारासह गेल्या पाच वर्षातील संचालक मंडळाच्या काळ्या पांढऱ्या कारभारावर भेदक आणि ठोस पुराव्यानिशी पडदा फाश करणार आहे. दि पाचोरा पीपल्स बँकेच्या एकेक पैशावर ठेवीदारांचा हक्क आहे. तो कोणत्याही परिस्थितीत वाया जाऊ देणार नाही.” डॉ. निलेश विनायक मराठे यांनी जाहीर केले आहे की, याआधी देखील सहकार पॅनलच्या कारभारावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विविध शाखांमधील नियोजन, अधिकारी भरती, कर्जवाटप, व्यवहार मंजुरी आदी बाबींमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे विविध अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे यावेळी निवडणुकीत मतदारांनी भावनिक भाषणांपेक्षा ठोस कामगिरी व उत्तरदायित्व विचारात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय, बँकेने शेंदुर्णीतील जागा खरेदीसंदर्भात आजवर कोणताही प्रेसनोट, खुलासा किंवा जनतेला उद्देशून स्पष्टीकरण दिलेले नाही. यावरून ही बाब अधिक संशयास्पद ठरत चालली आहे. जर हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक असेल, तर संबंधितांनी या व्यवहाराची सर्व माहिती जनतेपुढे आणावी, असे मागणारे आवाज आता अधिक बुलंद होत आहेत. शेंदुर्णीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटना व ग्राहक हितसंरक्षण समित्यांनी देखील या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर संबंधित व्यवहाराची सर्वोच्च सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्याचीही तयारी दर्शवली आहे. एकूणच, सहकार पॅनलवर ‘सर्व काही कायदेशीर आणि पारदर्शक’ असल्याचा दावा करत असतानाही त्यांच्या कारभारातील ही गंभीर बाब आता मतदारांच्या विश्वासाला हादरा देणारी ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही माहिती उघड झाल्यामुळे सहकार पॅनलची पंचाईत झालेली असून मतदारांचा कल बदलू शकतो, असा अंदाज राजकीय व सहकारी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. डॉ. निलेश विनायक मराठे यांनी यापूर्वी अनेक वेळा बँकेच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांनी वेळोवेळी बँकेच्या सार्वजनिक पैशावर कुणाचा व्यक्तिगत फायदा होऊ नये, यासाठी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लवकरच या संपूर्ण प्रकरणावर अधिक सविस्तर माहिती आणि दस्तावेजासह खुलासा येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मतदारांनी आता निव्वळ घोषणांवर न जाता, वास्तविक कारभार, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता, सार्वजनिक पैशाचा वापर आणि संचालक मंडळाची उत्तरदायित्व यावर विचार करून आपला निर्णय घ्यावा. शेंदुर्णीतील व्यवहारासारख्या प्रकरणांवर मौन बाळगणाऱ्या पॅनलच्या उमेदवारांकडे पुन्हा एकदा बँकेच्या कारभाराची जबाबदारी सोपवायची की यावेळी खऱ्या प्रश्नांची उत्तरे मागणाऱ्या आणि पारदर्शकतेचा निर्धार बाळगणाऱ्या उमेदवाराला संधी द्यायची, हे ठरवायची वेळ आता मतदारांवर आली आहे असेही डॉ निलेश मराठे यांनी अखेरीस प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

आज दि 11/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
जुलै महिन्यातील उभयचारी योगाच्या फळांनी मेष राशीला आर्थिक व प्रतिष्ठात्मक लाभ मिळेल. आज जुन्या प्रयत्नांचे फल मीठवतील; निर्णयांमध्ये संयम ठेवा.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल 

वृषभ
मालव्य राजयोगामुळे करिअर व कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. प्रेम–नात्यांत संतुलन राहील, परंतु विचलन टाळा.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
मालव्य राजयोगाचा फायदाही मिथुन राशीसाठी चालू आहे—आर्थिक स्थैर्य, नकद लाभ व नव्या संधींसाठी जमीव तयार.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
मालव्य राजयोगामुळे करिअर–प्रवास–नवउपक्रमांत सकारात्मक ऊर्जा आहे. कलात्मकतेमुळे व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा 

सिंह
नेतृत्व गुणवत्तेत वाढ; राजयोग प्रभावाने कुटुंब–पारिवारिक आयुष्यात सौख्य. परंतु संयम राखा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
मासिक राशीभविष्यानुसार मानसिक ताण-तणाव व स्पर्धा वाटतील. काळजीपूर्वक निर्णय घ्या.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा 

तुला
प्रेम-रिष्ट्यात सौहार्द वाटेल; काही आर्थिक निर्णयांसाठी काळजी घ्या—शत्रू प्रभाव कमी करता येईल.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी 

वृश्चिक
मालव्य राजयोगाने आर्थिक प्रगतीची शक्यता, परंतु गुप्त खर्चांवर नियंत्रण ठेवावे. संयम आणि विवेक आवश्यक.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
प्रवास–शिक्षण आणि सामाजिक संपर्क वाढतील; खर्चाचे नियोजन ठरवून ठेवा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
शनि वक्रीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो; पण विरोध किंवा तणाव निर्माण होऊ शकतो—शांती राखा.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
मालव्य राजयोगाच्या फळांनी करिअर व सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. वैयक्तिक शांतताही लाभदायक.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
शनि वक्री व गुरु-प्रभावामुळे आर्थिक, करिअर व आत्मविश्वासात वाढ अपेक्षित.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

“जगायचंय… पण कशासाठी? अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाची अंतःकरण हेलावणारी हाक!” आत्महत्येवर आजही ठाम

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील नांद्रा परिसरात अवैध धंद्यांचे जाळे आणि जुलमी खाजगी सावकारी दररोज कित्येक निष्पापांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. याच अन्यायकारक व अमानवी व्यवस्थेला कंटाळून प्रेम टी चे मालक राजू बडगुजर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू बडगुजर हे मानसिक तणावात असून, आज त्यांनी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळांवर जाण्याचा धोकादायक निर्णय घेतला. मात्र वेळेवर रेल्वे आली नाही त्यापुर्वीच तेथे पोहचुन त्यांच्या मित्रमंडळींनी हस्तक्षेप केल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांचा जीव सध्या तरी वाचलेला आहे. तथापि, “काहीही झालं तरी मी आत्महत्या करणारच!” असा निर्धार त्यांनी मोबाईल फोनवरून पत्रकार संदीप महाजन यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी आपली वेदना आणि सामाजिक अन्यायांविषयीचा रोष व्यक्त करताना, एक ऑडिओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या क्लिपमध्ये त्यांनी पाचोरा-जळगाव मार्गावरील नांद्रा परिसरात सुरु असलेल्या अवैध धंदे, पत्त्याचे क्लब, आणि लोकांना लुबाडणाऱ्या साखळ्यांबाबत आपबीती कथन केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हे सर्व बंद न झाल्यास अशा लोकांना गंडवण्याच्या विळख्यात अनेकजण अडकणार, आणि ते शेवटी माझ्यासारखीच जीवन संपवण्याची वेळ आणतील.” राजू बडगुजर यांनी आपल्या ऑडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी आर्थिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्त्याच्या क्लबमधून त्यांना खोट्या आश्वासनांवर फसवण्यात आले. सततच्या नुकसानीतून त्यांना कर्ज घ्यावे लागले, आणि खाजगी सावकारांनी वसुलीसाठी जी अमानुष वागणूक दिली, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडले आहे. या क्लबमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या खेळात केवळ जुगारच नाही, तर मानसिक आणि आर्थिक शोषण देखील होत असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. “कधी पैसे जिंकायला देतात आणि क्लबमध्ये बाहेरगावचे “करू” ( पत्ते लावणारे ) आणुन मग हळूहळू सर्व काही गमवायला लावतात. नंतर सावकारांचे कर्ज, धमक्या, समाजात अपमान… आणि शेवटी आत्महत्या हा एकच मार्ग उरतो,” असे त्यांनी विदारक स्वरात सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या सावकारी धंद्यात एक विशिष्ट महिलांची टीम कार्यरत असून कर्ज वसुलीसाठी आणि कोणत्याही स्तरावर जाऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याने बदनामीच्या धाकाने कर्जदार अवाजवी चक्क तासाचे व्याजदर देऊन बरबाद होत आहे. राजू बडगुजर यांची ही ऑडिओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, संपूर्ण पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तरुणांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, “राजूच्या आत्महत्येला जबाबदार कोण?” असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे. काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून अवैध पत्त्याच्या क्लब व खाजगी सावकारांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याच क्लब व इतर अवैध धंद्यांविरोधात माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांनी यापूर्वीच आवाज उठवलेल होता. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करत हे प्रकार त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळे पासुन आज पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाल्याचे आजपर्यंत निदर्शनास आलेले नाही. ललित वाघ यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी सातत्याने या अवैध क्लब्सविरोधात बोललो आहे. त्याच वेळी जर उपाययोजना झाली असती, तर आज राजू बडगुजरसारखा तरुण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला नसता.” खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जावर मोठ्या व्याजदराने वसुली केली जाते. केवळ जास्तीचे पैसेच नाही तर अपमानास्पद वागणूक, धमक्या आणि घरपोच त्रास देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी, लघुउद्योगिक, व्यापारी वर्गासोबतच सामान्य मध्यमवर्गीय नागरिकही या जाचाला कंटाळले आहेत. राजू बडगुजर यांच्यासारखे अनेक जण आपल्या वेदना उघडपणे व्यक्त करत नाहीत, पण आतून रोज मरत असतात. या प्रकरणाने फक्त एक युवक नव्हे, तर समाजातील अनेक थरांतील मनोबल खचलेल्या तरुणांचा आवाज ऐकायला हवा, हे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पाचोरा शहरातील सुजाण नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि युवकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की नांद्रासह परिसरातील पत्त्याचे क्लब व इतर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत, खाजगी सावकारांवर कारवाई करून त्यांचे व्यवहार तपासण्यात यावेत, राजू बडगुजर यांच्याशी समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार द्यावा, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी संयुक्त तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत. राजू बडगुजर हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर समाजाच्या विस्कळीत व्यवस्थेचे एक भयंकर वास्तव दर्शवणारे उदाहरण आहेत. जेव्हा एका सामान्य व्यावसायिकाला आपली व्यथा जगासमोर मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो, आणि तरीही त्याला न्याय मिळेल की नाही याची शंका राहते, तेव्हा लोकशाहीच्या यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. राजू यांनी शेवटी एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हटले: “काहीही झालं तरी मी आत्महत्या करणार!” हे केवळ शब्द नाहीत, तर एका खचलेल्या मनाची किंकाळी आहे. जर ही किंकाळी आज ऐकली गेली नाही, तर उद्या किती राजू बडगुजर आत्महत्या करतील, याचा हिशोब ठेवणेही अशक्य होईल.

आज दि.10/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज आत्मविश्वासाने कामांमध्ये योजना आणि क्रियाशीलता वाढेल. जुनी अडचण नवीं संधी बनू शकते. खर्चाबद्दल सतर्क राहा.
शुभ अंक: १
शुभ रंग: लाल

वृषभ
आज आर्थिक पैलू सुदृढ होतील आणि तुम्हाला प्रेम व कौटुंबिक जीवनात संतुलन मिळेल. परंतु मला निर्णय काळजीपूर्वक घ्या.
शुभ अंक: ६
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
उपक्रम आणि संधींमध्ये ताणू-तणाव दोन्ही असतील. तिथे संयमाने मार्ग काढल्यास प्रगती होईल.
शुभ अंक: ५
शुभ रंग: पिवळा

कर्क
नोकरी व व्यावसायिक संधी उदयास येतील, प्रवास किंवा नवीन संपर्कांच्या माध्यमातून फायदा होईल.
शुभ अंक: ३
शुभ रंग: निळा

सिंह
आज नेतृत्वकुशलता प्रभुत्वात राहील, पण आरोग्य व कौटुंबिक ताण याकडे सजगता आवश्यक.
शुभ अंक: ९
शुभ रंग: सोनेरी

कन्या
करिअरमध्ये ताण–तणाव येऊ शकतो, जागे-संवादांत संयम ठेवा. खर्च आणि आरोग्यावर लक्ष ठेवा.
शुभ अंक: ५
शुभ रंग: हिरवा

तुला
नात्यांमध्ये समाधानकरणं शक्य; आर्थिक व्यवहारात सुधारणा येईल. निर्णय विवेकानं घ्या.
शुभ अंक: २
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
जागतिक आणि गुप्त बाबींतींमध्ये ताण संभवतो. खर्च व्यवस्थापन आणि शब्द संयम आज गरजेचा.
शुभ अंक: ७
शुभ रंग: काळा

धनु
प्रवास व शिक्षणात संधी आहेत, परंतु खर्चात विवेक ठेवणं गरजेचं.
शुभ अंक: ३
शुभ रंग: नारिंगी

मकर
सरकारी वा व्यावसायिक क्षेत्रात नवे काम येऊ शकतात. आरोग्यावर लक्ष ठेवाच.
शुभ अंक: ८
शुभ रंग: निळा

कुंभ
घरी-व्यवसायात संतुलन साधण्यास दिवस अनुकूल. मानसिक ताण कमी करण्यावर भर द्या.
शुभ अंक: ४
शुभ रंग: जांभळा

मीन
आज दुसर्‍या दिवशीच्या पूर्ण चंद्रामुळे करिअर व बोलण्याच्या माध्यमातून उन्नती मिळू शकते; आत्मविश्वास टिकवून ठेवा 
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांचा स्पष्टवक्तेपणा: व्यक्तिनिष्ठ आरोपांपेक्षा बँकेच्या हिताचा मुद्दा महत्त्वाचा

Loading

पाचोरा – दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचे वारे जोरात वाहत असून, यामध्ये विशेषतः सहकार पॅनलचे प्रमुख अतुलभाऊ संघवी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार निलेशभाऊ मराठे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये केवळ कर्ज, न्यायालयीन प्रक्रिया, वैयक्तिक व्यवसाय व्यवहार या गुंतागुंतीवरच चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीचा बारकाईने आढावा घेत, ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी एक संयमित, जनहिताकडे लक्ष देणारा आणि पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या व्यक्तिगत कर्ज, त्यावरील खटले किंवा न्यायालयीन वादांवर आधारित चर्चांना आणि प्रेस कॉन्फरन्समधील एकमेकांवर करण्यात येणाऱ्या टोकाच्या टीकांना आतापुढे प्रसिद्धी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे त्याऐवजी आमच्या माध्यमांत फक्त बँकेच्या व्यवस्थापन, सभासदहित, युवकांचे रोजगार, पारदर्शक नोकर भरती व बँकेच्या आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल कारण अशा चर्चांनी सभासदांचा मूळ हिताचा मुद्दा बाजूला पडतो आणि लोकशाही प्रक्रियेमधील गांभीर्याला धक्का पोहोचतो.दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक ही गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरातील आर्थिक व्यवहारांची कणा ठरली आहे. शेकडो सभासद, हजारो ठेवीदार आणि स्थानिक युवकांचे रोजगार या बँकेच्या निर्णयांवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत, बँकेच्या भविष्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणे अपेक्षित होते – सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे धोरण काय असणार? ५१ रुपये शेअर असलेल्या जुने सभासद मतदान प्रक्रियेत पुन्हा सहभागी होतील का? त्यासाठी काय पावले उचलणार? बँकेच्या गतीशील व्यवस्थापनासाठी कोणती सुधारणा करणार? स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देणार? नोकर भरतीच्या धोरणात पारदर्शकता असेल का? स्थानिक तरुणांना प्राधान्य असेल का? वर्षानुवर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती कशी निश्चित केली जाणार? वरील मुद्दे हे निवडणुकीचे खरे मुद्दे असून, एक सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि बँकेच्या हितचिंतक म्हणून प्रत्येक नागरीकाच्या मनात हे प्रश्न आहेत. परंतु त्यांना बगल देत उमेदवार आपल्या व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या चर्चांमध्ये अडकत असल्याची खंत ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी व्यक्त केली आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र या दोन्ही माध्यमांनी यावेळी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून स्पष्टपणे जाहीर केले आहे की, पत्रकार परिषदांमध्ये उमेदवारांनी जर केवळ व्यक्तिगत वाद आणि कर्जाच्या फेऱ्यात चर्चा अडकवली, तर अशा बातम्यांना प्रसिद्धी नाकारण्यात येईल.व नकारात आहे पाचोरा शहरातील जनतेने गेल्या अनेक दशकांपासून पत्रकारितेवर विश्वास ठेवला आहे. परंतु हल्लीच्या काही माध्यमांमध्ये फक्त चिखलफेक, द्वेषमूलक आणि नकारात्मक मथळ्यांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रार सर्वसामान्य जनतेने अनेकवेळा केली आहे. अशा वेळी, ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी घेतलेला हा निर्णय एक पथदर्शी आणि जबाबदारीने युक्त पाऊल आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र चे संपादकाचे पत्रकार आणि सविस्तर वार्तांकन करणारे प्रतिनिधी यांचे यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी बातम्या मांडताना व्यक्तीपेक्षा मुद्दा, द्वेषाऐवजी दिशा आणि संवेदनशीलतेपेक्षा समाजहित हे तत्व डोळ्यासमोर ठेवले असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.दि पाचोरा पीपल्स बँकेसारख्या सहकारी संस्थांची निवडणूक ही कोणत्या तरी वैयक्तिक वैरभावना व्यक्त करण्यासाठी नसून, संस्थेच्या हिताचा, जनतेच्या विश्वासाचा आणि आर्थिक सुदृढतेच्या मार्गाचा निर्णय घेण्यासाठी असते. ही निवडणूक हे संधीचक्र असून बँकेसाठी नवी दिशा, नव्या संकल्पना, आणि पारदर्शक कार्यपद्धती यासाठी ती वापरली जाणे गरजेचे आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, आता व्यक्तिगत वाद सोडून त्यांनी पुढील मुद्द्यांवर खुल्या व्यासपीठावर आपली मते मांडावीत : बँकेच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचे त्यांचे आराखडे काय आहेत? सभासदसंख्या वाढवण्याबाबत कोणते उपक्रम राबवणार आहेत? ५१ रुपयांचे जुने शेअरधारक पुन्हा मतदान प्रक्रियेत येण्यासाठी काय प्रयत्न करणार? विविध गटात बँकेच्या नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने भरल्या जातील का? संगणकीकरण, डिजिटायझेशन, ग्राहक सेवा सुधारणा याबाबत कोणती योजना आहे? ‘ध्येय’ म्हणजे ध्येय, उद्दिष्ट. आणि हे उद्दिष्ट जर समाजाच्या हिताचे नसेल तर बँक निवडणुकीचा व पत्रकारितेचा अर्थच उरणार नाही.

आज दि.09/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

Loading

मेष
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात नियोजन करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबात संवाद साधताना संयम हवा.
शुभ अंक: १
शुभ रंग: लाल

वृषभ
आज गुरु ग्रहाचे उदय तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती बळकट होईल आणि घरगुती व कामाच्या आयुष्यात संतुलन निर्माण होईल 
शुभ अंक: ६
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
गुरु ग्रह तुमच्यासाठी राजयोग निर्माण करत आहे—करिअरमध्ये प्रगती, सामाजिक संबंध आणि आर्थिक स्थैर्य यात सुधारणा होईल 
शुभ अंक: ५
शुभ रंग: पिवळा

कर्क
आज गुरु ग्रहामुळे मनःशांती लाभण्या बरोबर धार्मिक व प्रवासाबाबत संधी देखील मिळतील. करिअरमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे .
शुभ अंक: ३
शुभ रंग: निळा

सिंह
गुरुची कृपा तुमच्यात राजयोग निर्माण करेल, आर्थिक स्थिती सुधारेल, नेतृत्वगुण वाटतील आणि पारिवारिक सौहार्द वाढेल 
शुभ अंक: ९
शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज ग्रह गोचरामुळे सजग राहावे. कामात अचानक बदल किंवा थोडासा ताण अनुभवायला मिळेल. निर्णयात संयम ठेवा 
शुभ अंक: ५
शुभ रंग: हिरवा

तुला
आज गुरु–मंगल–चंद्र युतीमुळे राजयोग निर्माण होतो आहे. कामात प्रगती आणि आर्थिक लाभ मिळतील; प्रेमनीय संबंधात सुख राहील 
शुभ अंक: २
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज खर्च आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. शब्दनियंत्रण व खर्चावर नियंत्रण ठेवा; निर्णय विचारपूर्वक घ्या 
शुभ अंक: ७
शुभ रंग: काळा

धनु
आज साधारण सुखद; जोडी–नात्यांत सुधारणा होईल, तसेच शिक्षकता, प्रवास–शिक्षणसंधी योग राहील.
शुभ अंक: ३
शुभ रंग: नारिंगी

मकर
आज खर्च वक्री शनीच्या परिणामांनी नियंत्रित राहतील. तज्ञांचा सल्ला घेतल्यास व्यवसायात प्रगती होईल 
शुभ अंक: ८
शुभ रंग: निळा

कुंभ
गुरु ग्रहाचा उदय अधिकारी प्रभावासाठी उत्तम योग देत आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक स्थैर्यता बनेल आणि प्रकल्पांमध्ये स्वीकृती मिळेल 
शुभ अंक: ४
शुभ रंग: जांभळा

मीन
आज महालक्ष्मी राजयोगामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये उन्नती व आत्मविश्वास मिळेल. जोडप्रेमातही सामंजस्य राहील 
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

“आषाढी वारी आली शाळेच्या दारी” – मुलुंडच्या लहान वारकऱ्यांनी विठ्ठलभक्तीत रंग भरले

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा, मुलुंड (पूर्व) येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिरसपूर्ण आणि उत्साहाने भरलेली दृश्ये पाहायला मिळाली.
“आषाढी वारी आली शाळेच्या दारी” या भावसंपन्न घोषवाक्याला साजेसा आनंदोत्सव इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला, विठू नामाचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले, रिंगण घातले आणि फुगड्यांचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाल्यासारखा भासला.
या दिंडी सोहळ्यात पालकांनीही उस्फूर्त सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घातली.
कार्यक्रमाची संकल्पना साकारण्यासाठी आणि यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता अनभुले तसेच सतीश डोंगरे, मृणाली तावडे, सुरेखा पाटील आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

लहानग्यांच्या टाळ-मृदंगाच्या नादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात पार पडलेला हा वारी सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्म, परंपरा आणि संस्कृतीची बीजे पेरणारा ठरला.

वृक्षदिंडीतून सामाजिक संदेश; “स्वामी विरंगुळा केंद्र”चा आगळा उपक्रम

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आषाढी एकादशी निमित्ताने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र तर्फे एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी वृक्षदिंडी काढण्यात आली. ही वृक्षदिंडी श्री स्वामी समर्थ मठ, सेंट्रल रेल्वे, परळ येथून निघून परळ नाक्यावरील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन समाधानपूर्वक संपन्न झाली. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर चालणाऱ्या या वृक्षदिंडीत वाऱ्याच्या झुळुकीसह हिरवाईचा गंध वातावरणात दरवळत होता.

या दिंडीत ६० ते ८७ वर्षे वयोगटातील सुमारे १६० ते १७५ ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला, हे विशेष उल्लेखनीय. आयुष्याच्या संध्याकाळीही पर्यावरण संवर्धनासाठी आणि भक्तिरसासाठी दाखवलेली त्यांची निष्ठा खरंच प्रेरणादायी ठरली.

दिंडीच्या समारोपानंतर २०० जणांना साबुदाणा खिचडीचे प्रसादरूपाने भोजन देण्यात आले, ज्यामुळे या आध्यात्मिक सोहळ्याला सामाजिकतेचीही सशक्त जोड मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या पुढील पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले: वैशाली शिंदे – उपाध्यक्ष, मोहन कटारे – कार्याध्यक्ष, गोविंद राणे – सचिव, उल्हास हरमळकर – खजिनदार, प्रतिभा सपकाळ – उपसचिव, प्रतिभा सावंत – विश्वस्त, विमल माळोदे – विश्वस्त

तसेच या वृक्षदिंडीमध्ये शिवाजी गावकर, गीता नाडकर्णी, कांतीलाल परमार, रश्मी नाईक, दिलीप मेस्त्री, जगदीश काळे, सुमंगल गुरव, नम्रता पडवळ, स्वाती मयेकर, विष्णू मणियार, सुनिता पारकर, ज्योती काळे, शैलजा काळे, कलबुर्गी ताई, श्री तेलकर, प्रदीप ढगे, आनंद धायफुले, नंदकिशोर आरोंदेकर, दशरथ खमितकर, उदय फणसेकर, भूपेंद्र राठोड, मारुती पेडणेकर आणि लक्ष्मण गोटल या सदस्यांचाही सक्रिय सहभाग होता.

पर्यावरण रक्षणाचा सशक्त संदेश देणारी ही वृक्षदिंडी स्वामी विरंगुळा केंद्राच्या सामाजिक व अध्यात्मिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आणि उत्स्फूर्त सहभागासह यशस्वीरीत्या पार पडली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!