Home Blog Page 86

जिद्दीची शिखरयात्रा – पाचोराच्या डॉ अपूर्वा ढवळे यांना पीएच.डी पदवी प्राप्त

Loading

पाचोरा – शहराला पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण लाभला आहे. येथील अपूर्वा शाम ढवळे (साळुंखे) यांनी आपल्या कर्तृत्वातून विज्ञान क्षेत्रात एक नवा आदर्श घालून दिला आहे. के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, बेंगळुरू (कर्नाटक युनिव्हर्सिटी) येथून त्यांनी औषधनिर्माण शास्त्र (Pharmaceutical Sciences) या क्षेत्रात ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.)’ ही अत्युच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण पाचोरा शहरात आनंदाची आणि अभिमानाची लाट उसळली आहे.
डॉ. अपूर्वा यांनी आपले संपूर्ण पीएच.डी संशोधन ‘परिधीय न्यूरोपॅथी (Peripheral Neuropathy)’ या महत्त्वपूर्ण आणि जटिल विषयावर केंद्रित केले होते. परिधीय न्यूरोपॅथी ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती असून मेंदू व पाठीच्या कण्याच्या बाहेरच्या मज्जासंस्थांमध्ये विकृती निर्माण झाल्याने अनेक प्रकारची वेदना, हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, स्नायूंमध्ये कमजोरी अशी विविध लक्षणे या आजारात दिसून येतात. या लक्षणांमुळे रुग्णांचे दैनंदिन जीवन अत्यंत त्रासदायक बनते.
या गुंतागुंतीच्या विकारावर उपाय शोधण्यासाठी डॉ. अपूर्वा यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून एक विस्तृत आणि अत्यंत बारकाईने संशोधन केले. विविध औषधी संयुगे, प्रयोग, परिणामकारकता, औषधांचे संभाव्य दुष्परिणाम अशा अनेक स्तरांवर तपशीलवार अभ्यास करत त्यांनी प्रभावी उपचार पद्धतींचा शोध घेतला. त्यांच्या या संशोधनामुळे परिधीय न्यूरोपॅथीसारख्या आजारांवर नव्या संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे तज्ज्ञ मानतात. डॉ. अपूर्वा यांचा प्रवास केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता सीमित नाही, तर तो जिद्द, चिकाटी, आणि स्वप्नपूर्तीचा उत्कट प्रेरणास्रोत आहे. त्यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर औषधनिर्माण शास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी संशोधन क्षेत्रात पाऊल ठेवत स्वतःला पीएच.डी.च्या अत्युच्च पदवीपर्यंत नेले. आज जेव्हा शहरातील अनेक तरुण इंग्रजी माध्यम, मोठी शहरे आणि महागडी कोचिंगच्या आधारावर यशाची स्वप्ने पाहतात, तेव्हा अपूर्वा यांची वाटचाल वेगळी ठरते. अत्यंत साध्या, ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन, मराठी शिक्षणाच्या बळावर आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. डॉ. अपूर्वा यांच्या या यशामध्ये त्यांचे पती राहुल साळुंखे यांचे व साळूंखे परिवाराचे मोठे योगदान आहे. ते स्वतः आयआयटी रुरकी येथून M.Tech पदवीधारक असून, सध्या ते टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. आयआयटी सारख्या देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेऊन आपला करिअर उभारणाऱ्या राहुल साळुंखे यांनी पत्नीच्या शिक्षणात व संशोधन प्रवासात खंबीर साथ दिली. वैवाहिक आयुष्य आणि पीएच.डी. यामधील समतोल राखणे, मूल आणि कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळत संशोधन क्षेत्रात सातत्य ठेवणे हे खरंच कठीण काम असते. पण या सगळ्या संघर्षात अपूर्वा यांना त्यांच्या पतीबरोबरच त्यांना सासू-सासरे यांचेही अमूल्य सहकार्य लाभले.
डॉ. अपूर्वा या पाचोरा नगरपरिषदेतील ग्रंथपाल श्याम ढवळे व सौ. ज्योती ढवळे यांची सुपुत्री आहेत. एका वाचनसंस्कृती वाढवणाऱ्या घरातून आलेल्या अपूर्वा यांना लहानपणापासून अभ्यासाची गोडी होती. त्यांच्या घरी पुस्तकांचे, वाचनाचे आणि शिक्षणाचे महत्व लावून धरले गेले. त्यामुळेच त्यांनी आपले करिअरही संशोधन क्षेत्रात घडवले.डॉ. अपूर्वा साळुंखे यांचे यश हे आजच्या तरुणींना आणि विद्यार्थिनींना सांगणारा एक स्पष्ट संदेश आहे की, परिस्थिती कोणतीही असो, जर इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. पीएच.डी. ही पदवी मिळवताना अनेक अडचणी, मानसिक तणाव, वेळेचा अभाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांसारख्या अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. मात्र अपूर्वा यांनी हे सर्व मात करून आपली वाटचाल यशाकडे सुरूच ठेवली शहरातील महिलांमध्येही डॉ. अपूर्वा यांच्या यशाबद्दल विशेष उत्सुकता आणि अभिमान आहे. सामाजिक कार्यात आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत अनेक महिला त्यांच्या या यशकथेचा दाखला देत आहेत. ‘स्त्री ही अबला नाही तर सबला आहे’ हे वाक्य डॉ. अपूर्वा यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पाचोरा शहरात डॉ. अपूर्वा ढवळे (साळुंखे) यांना पीएच.डी. पदवी मिळाल्याच्या बातमीने न पा कार्यालयात व त्यांच्या निवासस्थान जवळील परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक कर्तृत्वाबद्दल शहरातील नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शहरातील विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, वाचनालये आणि महिला मंडळांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागातून एखादी युवती आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर विषयावर संशोधन करून पीएच.डी. सारखी पदवी मिळवते, हे निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी डॉ. अपूर्वा एक आदर्श आणि दिशा दर्शक ठरत आहेत. डॉ. अपूर्वा यांचे हे संशोधन केवळ शैक्षणिक किंवा वैयक्तिक यशापुरते मर्यादित नाही, तर त्याचे प्रत्यक्ष सामाजिक व वैद्यकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संशोधनातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते भविष्यात परिधीय न्यूरोपॅथीसारख्या गंभीर आजारावर औषधांच्या शोधासाठी उपयोगी ठरू शकतात.
डॉ. अपूर्वा यांचे हे यश केवळ एक पदवी मिळविणे नाही, तर एक व्यापक शास्त्रीय योगदान आहे. भविष्यात त्यांनी आपले संशोधन अधिक गतीने चालू ठेवून भारतीय वैद्यकीय संशोधनात ठसा उमठवावा, अशी अपेक्षा सर्वच शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
डॉ. अपूर्वा साळुंखे यांचे यश म्हणजे प्रयत्न, चिकाटी, आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याची मिळवलेली फलश्रुती आहे. त्यांनी घडवलेली ही शास्त्रसाधनेची कहाणी आजच्या पिढीला ज्ञानार्जनाचा नवा प्रेरणास्रोत बनली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’ परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदनसह हार्दीक शुभेच्छा.

भाजपच्या “संकल्प से सिद्धी”नाशिक विभाग कार्यशाळांमध्ये पाचोरा मतदारसंघाचं भक्कम प्रतिनिधित्व

Loading

पाचोरा – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या यशस्वी अकरा वर्षांच्या कारकीर्दीची पूर्णता साजरी करण्यासाठी देशभरात “संकल्प से सिद्धी” या शीर्षकाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाअंतर्गत भारतभर एकात्मतेचा, विकासाचा आणि सुशासनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रातही विभागीय पातळीवर विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांचा मुख्य उद्देश म्हणजे, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजना, उपलब्धी आणि पुढील दृष्टीकोन समजावून सांगणे, तसेच येणाऱ्या काळात पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून अधिक प्रभावीपणे कसे कार्य करू शकेल, याबाबत दिशा आणि मार्गदर्शन देणे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय कार्यशाळा दिनांक ५ जून २०२५ रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा “संकल्प से सिद्धी” अभियानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून यात नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांनी, नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांनी, तसेच आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. या कार्यशाळेच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक विभागातून विविध भागातून नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. पाचोरा विधानसभेचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व करत कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा विधानसभेतील पाच मंडळांपैकी गोविंद चंद्रकांत शेलार,अनिल पाटील,प्रमोद पाटील या तीन मंडळ अध्यक्षांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. हे सर्व मंडळ अध्यक्ष या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती घेतली, तसेच कार्यप्रणाली अधिक गतिमान व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. ही कार्यशाळा केवळ माहितीची देवाणघेवाण नसून, ती एकप्रकारे पक्षाच्या भविष्यातील दिशा ठरविण्यासाठीचा आधारस्तंभ होती. या कार्यशाळेला भाजपचे केंद्रीय महामंत्री अरुण सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना चंद्रशेखर बावनकुळे
कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे,
ना गिरीशभाऊ महाजन, ना राधाकृष्ण विखे पाटील, ना जयकुमार रावल, ना संजय सावकारे हे राज्यातील मंत्रीसह
प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी व विक्रांत पाटील महाराष्ट्र भाजप कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे
यांनी कार्यशाळेत विशेष उपस्थित राहून आपल्या अनुभवांचे, धोरणांचे व संघटनात्मक विचारांचे मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात केंद्र सरकारने मागील अकरा वर्षांत केलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा आढावा घेण्यात आला. यात स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, पीएम किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, अशा अनेक योजनांचा ग्रामीण व शहरी भागात कसा प्रभाव पडला याबाबत आकडेवारीसहित सादरीकरण झाले. तर
दुसऱ्या सत्रात संघटनात्मक पातळीवर मंडळ, जिल्हा व विधानसभा स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचा सशक्तीकरण, समाजातील विविध घटकांशी संवाद, आणि डिजिटल पद्धतीने प्रचार यावर भर देण्यात आला. कार्यशाळेत उपस्थित नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पुढील काळात फक्त निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेशी निगडीत कामे करताना भाजप कार्यकर्त्यांनी सशक्त, प्रामाणिक आणि संवेदनशील राहावे.” यावर मार्गदर्शन करण्यात आले
पाचोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचा विचार आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घराघरात पोहचवण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य होत आले आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अधिक गतीने वाढणार आहे. कार्यशाळेत तीन मंडळ अध्यक्षांची उपस्थिती हे याचेच द्योतक आहे. गोविंद शेलार, अनिल पाटील आणि प्रमोद पाटील यांच्यासारख्या तरुण, अभ्यासू व कार्यशील मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे पाचोरा मतदारसंघाच्या संघटनात्मक ताकदीची प्रचिती या कार्यशाळेत आली. कार्यशाळेच्या समारोपात “संकल्प से सिद्धी” या अभियानाचा अर्थ अधिक खोलात समजावण्यात आला. म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर संकल्प करून त्याच्या पूर्णतेसाठी तळमळीने, संयमाने आणि चिकाटीने कार्य करणे हीच यशाकडे नेणारी वाट आहे.
भाजपचे सर्वच पदाधिकारी, खासकरून नाशिक विभागातील पदाधिकारी हे संकल्पबद्ध असल्याचे या कार्यशाळेत अधोरेखित झाले. नजीकच्या काळात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा अतिशय योग्य वेळी झाली, असे सांगितले जात आहे. नाशिक येथे पार पडलेली ही विभागीय कार्यशाळा “संकल्प से सिद्धी” या अभियानाच्या माध्यमातून केवळ योजनांची माहिती देणारी नव्हे, तर पक्षाच्या भावी वाटचालीचा मार्ग स्पष्ट करणारी ठरली आहे.
पाचोरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि त्यांच्यासोबत उपस्थित राहिलेले मंडळ अध्यक्ष हे पक्षाचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक क्षमता दर्शवणारे ठरले.या कार्यशाळेच्या माध्यमातून नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आणि दृढ संकल्पाने भाजप कार्यकर्ते आपापल्या विभागात कार्यरत होतील असेही माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले

आकाशातील देवदूतांचा पाचोरा PTC तर्फे सत्कार

Loading

पाचोरा : हवेत उडणाऱ्या विमानात एका प्रवाशाचा जीव वाचवून ‘आकाशातील देवदूत’ म्हणून ओळख प्राप्त झालेल्या डॉ. सागर गरुड यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ,सतीश उर्फ भोलाआप्पा चौधरी
यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड, दिशा डेंटल केअरचे डॉ. अमोल जाधव, माऊली हॉस्पिटलचे डॉ. अतुल महाजन हे तिघेही आपल्या कुटुंबासोबत सिक्कीम सहलीवर गेले होते. परतीच्या प्रवासात कोलकात्याहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E334 या विमानात अचानक एका 55 वर्षीय सहप्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या अत्यवस्थ स्थितीत डॉ. गरुड यांनी वेळ न दवडता तात्काळ वैद्यकीय मदत करत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. या प्रसंगात डॉ. अमोल जाधव व डॉ. अतुल महाजन यांनीही डॉ. गरुड यांना मोलाची साथ दिली.
या घटनेने संपूर्ण वैद्यकीय समाजात आणि जनतेच्या मनात मोठा अभिमान निर्माण झाला असून, पाचोरा शहराला लाभलेले हे डॉक्टर म्हणजे खरेच समाजाचे आरोग्यदूत आहेत, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या या साहसी व सेवाभावी कार्याची दखल घेत एका छोटेखानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सत्कार सोहळ्याप्रसंगी नानासाहेब संजय वाघ यांनी डॉ. गरुड यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “केवळ वैद्यकीय ज्ञान असून चालत नाही, त्यासोबत धाडस, संवेदनशीलता आणि निर्णयक्षमता लागते. डॉ. सागरदादा गरुड यांनी या तिन्ही गोष्टींचा मिलाफ दाखवून दिला आहे. त्यांच्या या कार्याचा आम्हा पाचोरेकरांना सार्थ अभिमान वाटतो.” “हृदयविकारासारख्या जीवघेण्या अवस्थेत, विमानात उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांसह रुग्णाला वाचवणे ही केवळ व्यावसायिक डिग्री नव्हे तर ती मानवतेची मोठी शिकवण आहे. डॉ. गरुड आणि त्यांचे सहकारी खरेच आकाशातील देवदूत ठरले आहेत.”
या प्रसंगी सतीश उर्फ भोलाप्पा चौधरी यांनी डॉक्टरांच्या या अतुलनीय कार्याचे गौरव करताना सांगितले, “आपल्या मतदारसंघात असे डॉक्टर कार्यरत असावेत हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. समाजहितासाठी त्यांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे.”
सत्कार समारंभात डॉ. सागर गरुड यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यामुळे डॉक्टरांच्या कार्याबद्दल जनतेमध्ये अधिक सन्मान व विश्वास निर्माण झाला असून, आपत्कालीन परिस्थितीतही डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी पाचोऱ्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे.
डॉ. सागर गरुड, डॉ. अमोल जाधव व डॉ. अतुल महाजन यांच्या कार्यामुळे ‘हेल्थ केअर’ या संकल्पनेला नव्याने एक सामाजिक आयाम मिळाला असून, या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण डॉक्टर वैद्यकीय सेवेकडे सामाजिक दायित्व म्हणून पाहू लागले आहेत.
पाचोऱ्याचे हे वैद्यकीय तिकडीचे त्रिकुट आज केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नाही, तर आकाशातही त्यांनी आपली जबाबदारी आणि कौशल्य सिद्ध करून दाखवले आहे. ‘आकाशातील देवदूत’ हे बिरुद खरोखरच या डॉक्टरांच्या नावास योग्यच आहे.

समीक्षावाङ्मयाच्या उज्वल परंपरेचा सन्मान : प्राचार्य डॉ. किसनराव पाटील स्मृतीप्रित्यर्थ वाङ्मय पुरस्कारांचे वितरण ७ जून रोजी पुण्यात

Loading

पुणे – मराठी वाङ्मय क्षेत्रातील अभ्यासू, संशोधक, समीक्षक आणि विद्यार्थीप्रिय साहित्यिक म्हणून ख्यात पावलेले जळगाव येथील प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय व खानदेश स्तरीय वाङ्मय पुरस्कार यंदा शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक भारत सासणे यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी असतील. यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे केवळ एक समीक्षक नव्हते, तर समीक्षक म्हणून वाङ्मयविवेकाचा धांडोळा घेणारे, विचारशील, सर्जनशील आणि संशोधक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, समीक्षा, शिक्षण आणि चिंतन यांच्या चौकटीत त्यांचे कार्य लक्षणीय राहिले. त्यांच्या या महान योगदानाची स्मृती जागवण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणेतून नव्या पिढीला साहित्यप्रेमाचा वसा देण्यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरा’ या नावाने एक प्रेरणादायी चळवळ उभी केली आहे. ही ज्ञानपरंपरा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा-जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विभिन्न वाङ्मयप्रकारांतील नावाजलेल्या आणि सर्जनशील ग्रंथांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, समीक्षा अशा वाङ्मयप्रकारांचा विचार करून मान्यवर ग्रंथांचे सन्मानपूर्वक गौरव करण्यात येतो. सन २०२१ पासून सुरू झालेली ही परंपरा आता राज्यभरातील साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून आहे.
यंदा समीक्षा या वाङ्मयप्रकारासाठी सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा विचार करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे : रोख ११,००० रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ या पुरस्कारासाठी नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील नवे काही या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. सावंत हे मराठी बालसाहित्य क्षेत्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक व अभ्यासक आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बालसाहित्याच्या नव्या प्रवाहांचा सखोल वेध घेणाऱ्या या ग्रंथाने समीक्षाक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथील डॉ. अनंता सूर यांच्या साहित्य, समाज आणि विचारधारा या ग्रंथालाही राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून, हा पुरस्कार वरील दोघांना विभागून दिला जाणार आहे. डॉ. सूर हे सामाजिक दृष्टिकोनातून साहित्यातील विचारप्रवाहांचा सूक्ष्मपणे शोध घेणारे समीक्षक म्हणून ओळखले जातात.
खानदेश स्तरीय पुरस्कार,रोख ५,००० रुपये,स्मृतीचिन्ह,शाल व श्रीफळ,या विभागासाठी जळगाव येथील डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या समीक्षा विवेक या ग्रंथाची निवड झाली आहे. डॉ. सपकाळे हे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास करणारे आणि समीक्षेच्या पारंपरिक चौकटीतून नव्या धारणांचा शोध घेणारे समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्याचबरोबर साक्री येथील डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांच्या मंचीय कवितेचा स्वरूपशोध या अभ्यासपूर्ण ग्रंथालाही खानदेश स्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघा साहित्यिकांना हा पुरस्कार विभागून प्रदान केला जाईल.पुरस्कारांची प्रतिष्ठा वाढवणारी परंपरा २०२१ साली सुरू झालेल्या या पुरस्कार परंपरेत आतापर्यंत खालील साहित्यिकांचा गौरव करण्यात आला आहे : २०२१ – कथा वाङ्मय : मनोहर सोनवणे (पुणे), युवराज पवार ,२०२२ – कविता : पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव),२०२३ – कादंबरी : ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल),२०२४ – बालसाहित्य : वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असणारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), सौ. नीता शेंडे (पाचोरा),या परंपरेतून साहित्याच्या विविध प्रांतातील नवविचार, सृजनशीलता आणि चिंतनशीलतेला उभारी देण्याचे काम सातत्याने होत आहे.या पुरस्कार समारंभाचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा-जामनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. पुरस्कार समारंभात उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे प्रतिनिधी डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठी वाङ्मय क्षेत्रातील मान्यवरांना केले आहे. समीक्षावाङ्मय हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे आणि विचारपूस करणारे अंग आहे. या अंगातील उत्तम ग्रंथांचे आणि अभ्यासकांचे सन्मानपूर्वक गौरव करून ‘प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कार’ मराठी वाङ्मय क्षेत्रातील एक उज्ज्वल दीपवत ठरले आहेत. ही परंपरा मराठी साहित्याला केवळ गौरव नव्हे, तर भविष्याच्या वाटचालीसाठी आधारस्तंभ ठरत आहे.

‘फुले’ चित्रपट — समतेचा संदेश देणारा आणि पुरोगामी विचारांना प्रेरणा देणारा ऐतिहासिक चित्रपट – सौ.शितल महाजन

Loading

पाचोरा -येथील श्री. शेठ एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य, साहित्य व सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रातील आदर्श मार्गदर्शक डॉ. वासुदेव वले यांनी अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मनापासूनची अपेक्षा व्यक्त केली—’फुले’ हा चित्रपट पाचोरा शहरातही प्रदर्शित व्हावा. जेव्हा डॉ. वले यांच्यासारखी विचारवंत, अभ्यासू आणि सामाजिक जाणिवांची व्यक्ती अशी मागणी करते, तेव्हा त्या मागणीला केवळ औपचारिकतेत न पाहता त्यामागील आशय समजून घेण्याची आणि स्वतःही चित्रपट पाहण्याची जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
त्यांच्या या अपेक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘फुले’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला आणि चित्रपटातील अनेक दृश्यांनी मन हेलावून गेले. मनात विचारांचे वारे उसळले. त्यामुळेच त्या विचारांना दोन शब्दांत व्यक्त करण्याची इच्छा मनात दाटून आली…समता, न्याय आणि बंधुतेचा दीप पुन्हा उजळणारा ‘फुले’ चित्रपट भारतभर गाजतोय…
हजारो वर्षांच्या जातविचाराच्या गुलामीत अडकलेल्या समाजाला समतेचा, शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा प्रकाश देणाऱ्या दोन थोर महापुरुषांचे जीवन आपणासमोर आणणारा ‘फुले’ हा हिंदी चित्रपट सध्या संपूर्ण भारतभरात गाजत आहे. आद्य समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट केवळ कलाकृती नाही, तर एका सामाजिक जागृतीचे माध्यम आहे.
समकालीन काळातील वाढती जातीयता, धार्मिक तेढ, अंधश्रद्धा आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर ‘फुले’ हा चित्रपट समाजाला एका प्रगल्भ आणि पुरोगामी मार्गावर नेणारा एक प्रकाशस्तंभ ठरतो. आपल्या महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा, वैचारिक संपन्नता आणि सर्वसमावेशक विचारधारा यांचे भान ‘फुले’ या चित्रपटातून संपूर्ण देशाला होईल, असा विश्वास या चित्रपटाच्या यशामागे आहे.
या चित्रपटात महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआई फुले यांचा जीवनपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर एक प्रेरणादायी वैचारिक प्रस्थापनेच्या रूपात दाखवण्यात आला आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर बहुजन समाजातील कष्टकरी, शोषित, पीडित आणि विशेषतः महिलांसाठी जे कार्य केले, ते हृदयस्पर्शी पद्धतीने पडद्यावर सादर करण्यात आले आहे.
चित्रपटात सावित्रीआई फुले यांचे शिक्षिका म्हणून योगदान, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी घेतलेली झुंज, समाजातील विरोध सहन करत त्यांनी उभे केलेले पहिले मुलींचे शाळा, तसेच महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचा इतिहास उत्तम प्रकारे मांडण्यात आला आहे. हे सगळं पाहताना केवळ चित्रपट पाहत आहोत असा अनुभव येत नाही, तर एका सजीव इतिहासाचा आपण साक्षीदार आहोत असे वाटते.
खरोखर आज आपला समाज विविध ताणतणावांमधून जात आहे. जातीय भेद, धार्मिक ध्रुवीकरण, महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा यांचे सावट दाटले आहे. अशा वातावरणात ‘फुले’ चित्रपट समाजाला डोळे उघडणारा आरसा दाखवतो. तो केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नाही, तर आपल्या सद्य समाजाची स्थिती ओळखून, तिला आरशात पाहण्याची संधी देणारा ठरतो.
जोतीराव आणि सावित्रीआई फुलेंनी त्या काळात जे विचार मांडले ते आजही तितकेच लागू आहेत. त्यांनी मांडलेली समता, शिक्षणाचा प्रसार, जातीपातीचा विरोध आणि स्त्रीपुरुष समानतेचे तत्त्व ही आजच्या भारतासाठीसुद्धा प्रेरणादायी वाटचाल आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक नागरिकाने पाहणे हे काळाची गरज ठरते.
‘फुले’ चित्रपट केवळ इतिहास दाखवत नाही, तर भविष्यासाठी दिशाही दाखवतो. महात्मा फुले आणि सावित्रीआई यांच्या कार्यातून अनेक सुधारक, कार्यकर्ते आणि शिक्षक प्रेरणा घेत आहेत. आजच्या तरुण पिढीला जर नव्या भारताचा चेहरा साकारायचा असेल, तर ‘फुले’ सारख्या चित्रपटांमधून आपल्याला प्रेरणा घ्यावी लागेल.
या चित्रपटात दाखवण्यात आलेले स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, शेतीसंबंधीचे विचार, सामाजिक सुधारणेसाठी सुरू केलेले सत्यशोधक समाज यांचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. या कार्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती नव्हे, तर ती अखंड भारताच्या समतेच्या लढ्यातील एक मूलभूत पायाभूत कल्पना ठरते.
चित्रपटाची कलात्मक मांडणी, संवादलेखन, पार्श्वसंगीत, अभिनय यांचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. महात्मा फुले यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका इतक्या सजीव साकारल्या आहेत की प्रेक्षक क्षणभर वास्तव आणि अभिनयातील सीमारेषा विसरून जातात. सावित्रीआईंच्या भूमिकेत ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, तीने एक समजूतदार, प्रगल्भ, झुंजार आणि करुणामयी स्त्रीचे दर्शन घडवले आहे.
या दोन्ही पात्रांमध्ये एक सुसंवाद, परस्पर सन्मान, आणि समाजासाठीची बांधिलकी सतत जाणवत राहते. हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. त्यामुळे ‘फुले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक नव्हे, तर अत्यंत भावनिक, विचारप्रवर्तक आणि परिवर्तनकामी आहे.
या चित्रपटाचा उपयोग शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी अवश्य करावा. ‘फुले’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवला गेला पाहिजे. कारण तो केवळ मनोरंजनासाठी नाही, तर शिक्षणासाठी आणि मूल्यशिक्षणासाठी एक प्रभावी साधन ठरू शकतो. आजच्या मुलांना ‘रिअल हिरो’ कोण होते, याची जाणीव होणे फार गरजेचे आहे समाजात जर बदल घडवायचा असेल तर तो केवळ आंदोलनांनी नाही, तर विचारांच्या पुनरुज्जीवनाने घडतो. ‘फुले’ हा चित्रपट अशा नवचैतन्याचा उद्गाता आहे. सत्यशोधक चळवळ, महिला मुक्ती, सामाजिक समतेसाठी फुले दांपत्याने केलेले कार्य पाहता हे लक्षात येते की परिवर्तनासाठी केवळ शाब्दिक घोषणा नाही, तर कृती आणि समर्पण हवे असते. ‘फुले’ हेच शिकवतो.
फुले दांपत्याचे आयुष्य म्हणजे एक आदर्श जीवनपद्धती आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनालाही सामाजिक बांधिलकीत गुंफले. ‘फुले’ चित्रपट पाहून अनेक कुटुंबांमध्ये या मूल्यांची रुजवणूक होईल. स्त्री-पुरुष समानतेपासून ते मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी या चित्रपटातून प्रेरणा घेऊन समाजामध्ये नवसंस्कार होऊ शकतात.
आज जेव्हा समाज पुन्हा जातीयवाद, धार्मिक अंधश्रद्धा, आणि परस्पर तेढ याकडे झुकतो आहे, तेव्हा ‘फुले’ चित्रपट ही एक सामाजिक औषधी ठरते. ती समाजाच्या जखमांवर फुंकर घालते आणि म्हणते – “उठा, जागे व्हा, आणि विचाराचा प्रकाश पसरवा.”
या चित्रपटाचा प्रभाव इतका खोल आहे की प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत आणि प्रत्येक शाळेत तो पोहोचवणे हे आपण सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ‘फुले’ ही केवळ फिल्म नाही – ती एक वैचारिक चळवळ आहे. आणि या चळवळीचा प्रचार, प्रसार करणं हे आपल्या सर्व पुरोगामी नागरिकांचे कर्तव्य आहे.
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग, क्रांती आणि विचारांना चित्ररूपात अनुभवण्याची ही संधी आपल्याला ‘फुले’ चित्रपटात मिळते. समाजमनाला स्पर्श करणारी आणि अंतर्मन जागवणारी ही कलाकृती आपण सर्वांनी पाहावी, इतरांना दाखवावी आणि यातील विचारांचा अंगीकार करावा.
यातून आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा सापडेल. ‘फुले’ पाहणं म्हणजे आपलं वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भतेकडे टाकलेलं एक पाऊल आहे.
‘फुले’ – एक चित्रपट नव्हे, एक चळवळ!
-जय ज्योती – जय क्रांती

सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

आज दि 05/06 /2025 चे प्रत्येक राशी निहाय आजचे भविष्य

Loading

मेष: आज तुम्हाला कामात नवे संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वातावरण शांत राहील. आर्थिक गुंतवणुकीपूर्वी विचार करा.

वृषभ: खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन आवश्यक. जोडीदाराशी संवाद वाढवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक स्थैर्य ठेवा.

मिथुन: सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. जुने प्रश्न मार्गी लागतील. मित्रांकडून साथ लाभेल. प्रवास शक्यता आहे.

कर्क: वरिष्ठांचा विश्वास मिळेल. कामात प्रगती होईल. मन शांत ठेवणे गरजेचे. घरात एखाद्या शुभ कार्याची योजना होईल.

सिंह: आज तुमच्यासाठी अनुकूल दिवस आहे. दूरस्थ संधी येतील. आध्यात्मिक विचार वाढतील. शिक्षणात प्रगती होईल.

कन्या: आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. आरोग्यावर लक्ष द्या. जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. संयम ठेवा.

तुला: भागीदारीत लाभ संभवतो. जोडीदाराशी प्रेम वाढेल. न्यायिक बाबतीत अनुकूलता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

वृश्चिक: व्यावसायिक यश मिळेल. कष्टाचे फळ मिळेल. कामात सतर्क राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु: विद्यार्थी व कलाकारांसाठी अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणात यश. मनात नवे विचार येतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्ता संबंधित कामात यश. मानसिक चिंता वाढू शकते. संयम ठेवणे आवश्यक.

कुंभ: नवे करार, संधी मिळतील. मित्रांचा चांगला सहवास लाभेल. प्रवास यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन: आर्थिक लाभाचा दिवस. वरिष्ठांची साथ मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.

गोवंश हत्येच्या वाढत्या घटनांवर चिंता; बकरी ईदपूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची पाचोरा गोरक्षक संघटनांची मागणी

Loading

पाचोरा – महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा प्रभावीपणे लागू असतानाही, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्रासपणे गोवंश हत्या व तस्करीच्या घटना समोर येत असल्याने गोरक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः बदलापूर, पडघा (भिवंडी), मालेगाव (जि. नाशिक), अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या थांबण्याचे नाव घेत नसून, ही हत्या आणि तस्करी खुलेआम सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
यासोबतच, राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये – विशेषतः तेलंगणा व कर्नाटकच्या सीमांवर – गोवंश तस्करीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते आपल्या जिवावर उदार होऊन गोवंश रक्षणासाठी मैदानात उतरलेले असताना, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना छळले जात असल्याचे गंभीर आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.
या विषयासंदर्भात पाचोरा शहर व ग्रामीण भागातील विहिप व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी अचानक पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून, त्यामध्ये आगामी ७ जून २०२५ रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, पाचोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, वरखेडी येथे सध्या खुलेआम गोवंशाची खरेदी-विक्री केली जात असून, या खरेदीचा उद्देश थेट गोहत्येसाठीच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या बाजारावर तातडीने कारवाई करत गोवंशाची तस्करी व गोहत्या थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या अनुषंगाने विहिप मंत्री योगेश सोनार, बजरंग दल प्रखंड संयोजक बंटी पाटील, विहिप प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल मधुकर पाटील, विहिप प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील तसेच गोरक्षा क्षेत्रातील कार्यकर्ते गौरव पाटील, जीतू लोणारी, बंडू पांचाल, सोपान शिपी, जय बागुल, आकाश पाटील, रोहित पाटील, गोकुल पाटील, दक्ष पाटील, दिनेश भोई, प्रमोद वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी ध्येय न्युजशी बोलताना योगेश सोनार यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची गोरक्षणाबाबत उदासीनता दिसून येत असून, यामुळेच गोवंश तस्करीचा सुळसुळाट झाला आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, गोवंश रक्षणासाठी स्वतंत्र व विशेष पथके स्थापन करून या तस्करीला आळा घालावा.”
बंटी पाटील यांनी सांगितले की, “गोरक्षक कार्यकर्ते जिवाची पर्वा न करता गोवंश रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. यामुळे गोरक्षकांचा मनोबल खचत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन गोरक्षकांवर होणारे खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी.”
राहुल मधुकर पाटील यांनी सांगितले की, “गोवंश तस्करीसाठी आजही अनेक ठिकाणी मालवाहतूक वाहनांचा सर्रास वापर केला जात आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर बाजार समिती परिसरात विशेष पथक तैनात करून गोवंशाची हालचाल त्वरित थांबवणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांनी थेट लक्ष घालणे गरजेचे आहे.”
तसेच, आकाश पाटील, गोकुल पाटील, प्रमोद वाघ आणि रोहित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गोहत्या व गोवंश तस्करी ही फक्त धार्मिक भावना दुखावणारी बाब नाही, तर ही कायद्याला आव्हान देणारी, सामाजिक सलोखा बिघडवणारी व पर्यावरणावरही परिणाम करणारी गंभीर बाब आहे. ही केवळ गोरक्षकांची लढाई नाही, तर समाजाच्या अस्मितेची लढाई आहे.”
गोरक्षक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत बकरी ईदपूर्वी विशेष गस्त, तपासणी मोहिमा राबवाव्यात, वाहनांमध्ये होणाऱ्या गोवंश वाहतुकीवर बंदी आणावी आणि वरखेडी बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या गोवंश खरेदी-विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
गोरक्षक संघटनांच्या या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने पाहते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, सर्वसामान्य जनतेनेही यासंदर्भात जागरूक राहून प्रशासनास सहकार्य करणे हे सामाजिक जबाबदारीचे लक्षण ठरेल. गोवंश रक्षण ही धर्मभावनेशी संबंधित बाब असून, त्याचे पालन ही सरकारची व प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये.

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना,पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Loading

जळगाव (जिमाका वृत्त ):महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अनुदान योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजने करिता अर्ज करणारे बचतगटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचतगटातील किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत ३ लाख १५ हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १०% हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते १०, टक्के अनुदानास पात्र राहतील, जास्त अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटाची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल. या योजने अंतर्गत पात्र बचतगटांना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिनी टॅक्ट्रर आणि उपसाधनांची खरेदी केल्याची बिल पावती जमा केल्यानंतर ५०% अनुदान आणि (आरटीओ) उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नोंदणी करुन नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्या नंतर ५०% अनुदान दिले जाते. राष्ट्रीयकृत बचतगटाचे खात्यावर दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महात्मा रोड, मायादेव मंदिर समोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.

रेल्वे गाड्यांचे थांबे देण्याची केंद्रीय मंत्री ना रक्षाताई खडसे यांची ठाम मागणी

Loading

रावेर ( सतिष पाटील ) केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी दिल्लीत रेल्वे भवन येथे रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरीकांच्या, विशेषतः रेल्वे प्रवाशांच्या, दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे स्थानिक रेल्वे स्थानकांवर देण्यात यावेत, अशी ठोस व मुद्देसूद मागणी केली. यातून रावेर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी रक्षाताई खडसे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या बैठकीत भुसावळ रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध स्थानकांवर – विशेषतः रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर व नांदुरा या प्रमुख स्थानकांवर – काही महत्त्वाच्या गाड्यांचे नियमित थांबे मिळावेत, यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. सध्या या स्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी वर्ग, व्यापारी, नोकरदार, कामगार आणि विविध ठिकाणी नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करणाऱ्या सामान्य नागरिकांचा समावेश आहे. मात्र थांब्यांची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी जवळच्या मुख्य स्थानकांवर जावे लागते, परिणामी वेळ, पैसा आणि मेहनत यांचा अपव्यय होतो. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही आग्रही मागणी करण्यात आली. रक्षाताई खडसे यांनी या बैठकीत खालील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी स्पष्ट व ठाम मागणी केली:1) दानापुर – पुणे एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12150): या गाडीला रावेर स्थानकावर थांबा देण्यात यावा. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, विशेषतः शिक्षणासाठी व नोकरीसाठी पुण्याकडे जाणाऱ्या युवकांसाठी रावेर थांबा अत्यंत फायदेशीर ठरेल. 2 ) नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12656/12655): या गाडीला बोदवड स्थानकावर थांबा द्यावा, ही मागणी करण्यात आली. दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी उपयुक्त असून बोदवडमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी या मार्गावर जातात. 3) महानगरी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22177/22178): मुंबई – पुणे – मनमाड मार्गावरील या जलदगती गाडीला रावेर स्थानकावर थांबा दिल्यास, संपूर्ण परिसरातील प्रवाशांना उपयुक्त ठरेल. मुंबईत काम करणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक वर्गासाठी ही सुविधा अत्यंत आवश्यक आहे.
4 )अमृतसर – मुंबई एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11057/11058): उत्तर भारतात अमृतसरकडे जाणाऱ्या गाडीचा निंभोरा स्थानकावर थांबा देण्याची विनंती करण्यात आली. पंजाब, हरियाणा भागात शिक्षण, काम किंवा नातेवाईक भेटीसाठी जाणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयोगी ठरेल. 5)गरीब रथ एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12113/12114): ही कमी दरात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी सेवा असून, मलकापूर येथे थांबा देण्यात आल्यास नागपूर – मुंबई मार्गावरील प्रवाशांना अत्यंत सोयीचे ठरेल.
6 ) गाडी क्रमांक 12719/12720 व 22137/22138: या गाड्यांना नांदुरा स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली. नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक या स्थानकाचा वापर करतात. 7)आझाद हिंद एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12129/12130): या गाडीचा बोदवड स्थानकावर थांबा आवश्यक असल्याची बाब रक्षाताई खडसे यांनी अधोरेखित केली. पूर्व भारत आणि मुंबई जोडणाऱ्या या गाडीचा थांबा मिळाल्यास बोदवडसह आसपासच्या गावांना मोठा फायदा होईल. 8)सूरत – अमरावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20925/20926): या गाडीचा थांबा सुद्धा बोदवड येथे देण्यात यावा, असेही सुचवण्यात आले. गुजरात राज्यात कामासाठी जाणाऱ्या मजूर, व्यापारी यांना यामुळे अधिक सोयीचा प्रवास शक्य होईल.
या सर्व मागण्यांमध्ये स्थानिक जनतेच्या भावना प्रतिबिंबित होत असून, या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती रक्षाताई खडसे यांनी सतीश कुमार यांच्याकडे केली. यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक नागरी संघटनांचे, व्यापारी संघटनांचे तसेच विद्यार्थी संघटनांचे निवेदनांचे दाखलेही सादर करण्यात आले. या बैठकीत चेअरमन सतीश कुमार यांनी सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी रक्षाताई खडसे यांना दिले. नागरिकांच्या मागण्या न्याय्य असून, त्यांची योग्य कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रवासी सुखावतील. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी वर्ग, व्यापारी, महिला, वृद्ध नागरिक आणि अन्य सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासात दिलासा मिळेल. यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्था, व्यवसाय, शिक्षण व रोजगार क्षेत्रालाही चालना मिळेल. यातून रावेर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक आणि आर्थिक विकास साधला जाईल, असे निश्चित वाटते. या बैठकीनंतर बोलताना रक्षाताई खडसे यांनी सांगितले की, “रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या मागण्या केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर नागरी हक्काच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी मी अपेक्षा करते.”
या चर्चेतून हे स्पष्ट होते की, रावेर लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे क्षितिज उलगडण्यासाठी ना रक्षाताई खडसे हे नेतृत्व सातत्याने प्रयत्न करत असून, प्रशासन पातळीवरही या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भविष्यात रावेरसह आसपासच्या सर्व स्थानकांना महत्त्वपूर्ण स्थान लाभेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या १८ वर्षांमध्ये आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनले; ट्रॉफी जिंकणारा आठवा संघ बनला, अंतिम सामन्यात पंजाबचा केला पराभव

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. १८ वर्षांची प्रतीक्षा संपली. अखेर विराट कोहली कर्णधार असताना जे शक्य झालं नाही ते रजत पाटिदारने शक्य करून दाखवलं. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ सात गडी गमावून केवळ १८४ धावा करू शकला. आयपीएल विजेता बनणारा आरसीबी आठवा संघ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ चॅम्पियन बनले आहेत. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने खराब सुरुवात केली. फिल साॅल्ट नऊ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा काढून बाद झाला. त्याला जेमिसनने बाद केले. यानंतर विराट कोहलीने मयंक अग्रवालसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूचा पाठलाग करताना मयंक बाद झाला. १८ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा काढून तो बाद झाला. यानंतर रजत पाटीदार १६ चेंडूत २६ धावा करून तंबूमध्ये गेला. विराटने लिव्हिंगस्टोनसोबत ३६ धावांची भागीदारी केली. विराटने ३५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ४३ धावा काढून अजमतुल्लाहचा बळी ठरला. जितेश शर्माने धमाकेदार खेळी केली, पण मोठ्या शॉटचा पाठलाग करताना तो विजय कुमारने बाद केला. जितेशने १० चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा काढल्या. अर्शदीपने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. त्याने २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्ड (१७ धावा), चौथ्या चेंडूवर कृणाल पंड्या (४ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (१ धावा) यांचे बळी घेतले. पंजाबकडून अर्शदीप आणि जेमिसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याच वेळी, अझमतुल्लाह उमरझाई, विजयकुमार विशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात चांगली झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी ४३ धावांची भागीदारी केली. प्रियांश २४ धावा काढल्यानंतर हेझलवूडने बाद केला. त्यानंतर २२ चेंडूत २६ धावा काढल्यानंतर प्रभसिमरन सिंग बाद झाला. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची बॅट चालली नाही. तो एक धाव घेत बाद झाला. जोश इंग्लिसने चांगली फलंदाजी केली, परंतु २३ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३९ धावा काढल्यानंतर तो तंबूमध्ये परतला. नेहल वधेरा १५ धावा काढून बाद झाला आणि मार्कस स्टोइनिस सहा धावा काढून बाद झाला. अझमतुल्लाह उमरझाई फक्त एक धाव करू शकला. शशांकने ३० चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह ६१ धावांची खेळी केली, परंतु ती विजयासाठी पुरेशी नव्हती. बंगळुरूसाठी भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याच वेळी यश दयाल, जोश हेझलवूड आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आयपीएलच्या सुरुवातीला २००८ ते २०१० पर्यंत लीगचे नॉकआउट सामने सेमीफायनल स्वरूपात खेळवले जात होते. तथापि, २०११ पासून त्याचे नियम बदलले गेले आणि प्लेऑफ सुरू झाले. क्वालिफायर-१, क्वालिफायर-२ आणि एलिमिनेटर सामने फिक्स झाले. तेव्हापासून २०२५ पर्यंत एकूण १५ हंगाम झाले आहेत आणि त्यापैकी क्वालिफायर-१ जिंकणाऱ्या संघाने १३ वेळा अंतिम सामना जिंकला आहे. गेल्या आठ वर्षांत, क्वालिफायर-१ जिंकणारा संघ चॅम्पियन बनला आहे. २०१८ ते २०२४ पर्यंत, क्वालिफायर-१ जिंकणारा संघ चॅम्पियन बनला आहे. सीएसकेने २०१८, २०२१, २०२३ मध्ये, मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये, गुजरातने २०२२ मध्ये आणि केकेआरने २०२४ मध्ये हे केले. हे सर्व संघ क्वालिफायर-१ जिंकून अंतिम फेरीत पोहोचले. आता आरसीबीने ही क्रमवारी कायम ठेवली आहे.
असे फक्त तीन वेळा घडले आहे की क्वालिफायर-१ जिंकणारा संघ विजेतेपद पटकावू शकला नाही. आरसीबीच्या संघालाच यापूर्वी असा त्रास सहन करावा लागला आहे. हा आरसीबीचा चौथा अंतिम सामना होता. यापूर्वी, संघ २००९, २०११, २०१६ मध्ये देखील अंतिम फेरीत पोहोचला होता. २०१६ मध्ये, आरसीबीने क्वालिफायर-१ जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत त्यांचा पराभव केला. त्यानंतर एसआरएच संघ एलिमिनेटर खेळून अंतिम फेरीत पोहोचला आणि एसआरएच हा एकमेव संघ आहे जो अंतिम फेरीत पोहोचला आणि एलिमिनेटर खेळून जिंकला. तथापि, आता आरसीबीने त्यावर मात केली आहे.
२०१३, २०१६ आणि २०१७ मध्ये, क्वालिफायर-१ जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, क्वालिफायर-२ जिंकणाऱ्या संघाने तीन वेळा (२०१६ मधील एसआरएचसह) विजेतेपद जिंकले आहे. ही तीन वर्षे २०१३, २०१६ आणि २०१७ आहेत. २०१३ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर-१ मध्ये मुंबईला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तथापि, त्यानंतर मुंबईने क्वालिफायर-२ जिंकून अंतिम फेरीत पोहोचले आणि सीएसकेला हरवून चॅम्पियन बनले. दुसरीकडे, मुंबईने २०१७ मध्ये पुन्हा एकदा हे केले. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या संघाने क्वालिफायर-१ मध्ये मुंबईला हरवले. तथापि, मुंबईने क्वालिफायर-२ जिंकले आणि नंतर अंतिम फेरीत आरपीएसला एका धावेने हरवून विजेतेपद जिंकले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!