Home Blog Page 88

हवेत वाचलेले प्राण… आणि आकाशातील खरा देवदूत — डॉ. सागर गरुड(कोलकाता-हैदराबाद विमानातील थरारक अनुभव)

Loading

पाचोरा (शिवाजी शिंदे) |
हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला दिशा देणारा एक क्षण… आणि त्या क्षणात निर्णय घेणारा डॉक्टर जर आकाशात असला, तर तो देवदूतच! पाचोऱ्याचे सुपुत्र आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड यांनी एका उड्डाणादरम्यान हे अक्षरशः सिद्ध करून दाखवले.
कोलकाता ते हैदराबाद दरम्यान इंडिगोच्या 6E334 या विमानात 55 वर्षीय एका सहप्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्राणांच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या या प्रवाशाच्या जीवनरक्षणासाठी डॉ. गरुड यांनी आकाशातच उपचार करून त्याचे प्राण वाचवले. या प्रसंगात डॉ. गरुड यांच्यासोबत असलेले डॉ. अमोल जाधव (दिशा डेंटल केअर) आणि डॉ. अतुल महाजन (माऊली हॉस्पिटल) यांनी देखील धावून जाऊन योग्य सहकार्य केले. या तिघांचाही हा अनुभव केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हे, तर मानवीतेच्या दृष्टिकोनातूनही विलक्षण ठरला.
पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड, दिशा डेंटल केअरचे डॉ. अमोल जाधव व माऊली हॉस्पिटलचे डॉ. अतुल महाजन हे तिघे डॉक्टर आपल्या परिवारासह काही दिवसांपूर्वी सिक्कीम दौऱ्यावर गेले होते. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले दिवस, गिरिशिखरांमधून फिरताना आलेले अनुभव यांचे स्मरण करत करत शनिवार, 31 मे रोजी सकाळी 11 वाजता कोलकाता येथून इंडिगोच्या 6E334 विमानाने हैदराबादकडे प्रयाण केले.
विमान काही मिनिटे हवेत झेपावले असतानाच, एका सहप्रवाशाला — वय अंदाजे 55 वर्षे — अचानक अत्यवस्थ वाटू लागले. तो आपल्या सीटवरून खाली पडला, व बेशुद्ध झाला. सुरुवातीला इतर प्रवासी घाबरले. परंतु या धावपळीच्या वातावरणात एक नाव शांततेने उभे राहिले — डॉ. सागर गरुड.
डॉ. सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या प्रवाशाकडे धाव घेतली. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन शुद्धीवर आणण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी प्रवाशाच्या नाडीचा वेग, श्वासाची गती, आणि चेहऱ्यावरच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास केला.
मात्र काही वेळातच त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. विमान आता पूर्ण उंचीवर झेपावले होते. डॉक्टरकडे हाताशी फक्त विमानातील एमर्जन्सी मेडिकल किट होते. तरीसुद्धा डॉ. गरुड यांनी वैद्यकीय ज्ञान, अनुभव आणि धैर्य यांच्या बळावर पुढचे 30 ते 40 मिनिटे त्या व्यक्तीच्या जीवनासाठी लढा दिला.
रुग्णाच्या छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. उलट्यांचा त्रास वाढत होता. प्रवाशाचा चेहरा फाटलेला, श्वासोच्छवास अनियमित. अशा गंभीर परिस्थितीत डॉ. गरुड यांनी सलाइन, इंजेक्शन, आणि योग्य औषधांचा वापर करून स्थिती नियंत्रणात ठेवली.
या काळात प्रवाशाचे कुटुंबीय पूर्णपणे गहिवरले होते. पत्नीने उघड्या आकाशात आसवं ढाळली, मुलांनी देवाला साकडं घातलं. मात्र, त्या काळजीच्या क्षणी देव दूताच्या रूपात डॉ. सागर गरुड यांनी जीवनदान दिले.
या संकटात डॉ. अमोल जाधव आणि डॉ. अतुल महाजन यांनी मोलाचे सहकार्य दिले. आवश्यक ती साधने, मोजणीचे उपकरण, प्रवाशांना समजावणे, आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना धीर देणे — हे सर्व कार्य तंतोतंत केले गेले. या तिघांच्या उत्तम समन्वयामुळे विमानातील एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती नियंत्रणात आली.
डॉ. गरुड यांची तात्काळ कृती पाहून विमान व्यवस्थापनाने हैदराबाद विमानतळावर एमर्जन्सी अलर्ट दिला. ॲम्बुलन्स आधीच पोहोचवण्यात आली. लँडिंग झाल्यानंतर रुग्णाला अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद येथे दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी डॉ. गरुड यांनी वेळेत दिलेल्या उपचारांचे कौतुक करून सांगितले की, “जर हे उपचार आकाशात मिळाले नसते, तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती.”
विमानातील प्रत्येक प्रवाशाला हे समजल्यावर त्यांच्या डोळ्यांत कौतुक दाटून आले. कोणी हात जोडले, कोणी अश्रू पुसले. काहींनी डॉ. गरुड यांना “देवदूत”, “भगवंताचे रूप”, “खरे डॉक्टर” अशा शब्दांत गौरविले. हा क्षण केवळ वैयक्तिक समाधानाचा नव्हता, तर एक वैद्यकीय आणि मानवीतेचा विजय होता. हैदराबाद येथून परतल्यानंतर पाचोरा शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. डॉ. गरुड यांच्या मित्रमंडळींनी, सहकाऱ्यांनी, पेशंट्सनी आणि नागरी संस्थांनी त्यांचं मोठ्या कौतुकाने स्वागत केलं. पाचोऱ्यासारख्या ग्रामीण शहरातून आलेल्या डॉक्टरने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमठवणे हे नुसते अभिमानास्पदच नव्हे, तर प्रेरणादायीही ठरले. डॉ. सागर गरुड यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या गावी परत येऊन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. त्यांचे कार्य फक्त वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे, गरजूंसाठी मोफत तपासण्या, आणि सामाजिक जाणीवेतून राबवलेल्या अनेक उपक्रमांद्वारेही विस्तारले आहे. त्यांचा दृष्टीकोन असा आहे की, “रुग्ण कोण आहे, कुठला आहे, कोणत्या जात-धर्माचा आहे — हे महत्वाचे नाही; त्याचे प्राण वाचले पाहिजेत हेच खरी डॉक्टरकी!” या घटनेतून समाजाला एक मोलाचा संदेश मिळतो — संकट कुठेही येऊ शकते, पण तिथे जर सुसंवेदनशील, तत्पर आणि प्रशिक्षित व्यक्ती असेल, तर संकटांवर मात करता येते. डॉ. सागर गरुड हे त्याचे जिवंत उदाहरण ठरले.
भारतीय वैद्यकीय संघटना (IMA), इंडिगो विमान कंपनी, तसेच हैदराबाद अपोलो हॉस्पिटल यांच्याकडूनही औपचारिक पत्राद्वारे त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
या संपूर्ण घटनेने हे सिद्ध केले आहे की, देवदूत हे आकाशातून उडत येत नाहीत — ते आपल्या आजूबाजूलाच असतात. फक्त त्यांना ओळखण्याची नजर लागते. डॉ. सागर गरुड हे त्या देवदूतांचे मूर्तस्वरूप ठरले आहेत.

शैक्षणिक व सामाजिक सेवेस समर्पित हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व – नानासाहेब शांताराम चौधरी सर

Loading

गिरड (ता. भडगाव) या जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात १ जून १९५८ रोजी जन्मलेल्या शांताराम सुकदेव चौधरी सर यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, शिक्षण व समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. एका सर्वसामान्य शेतमजुराच्या घरात जन्मलेले चौधरी सर यांचे बालपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेले. घरात अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचे लहानपणीच निधन, आणि या सगळ्यांत त्यांच्या मातोश्री – स्वर्गीय रुखमाबाई चौधरी यांनी अत्यंत धैर्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार घेतला. अशा परिस्थितीत तीन मुली आणि दोन मुलांना शिक्षित करण्याचा महान कार्यभाग त्या मातोश्रींनी पार पाडला, ज्यामुळे शांताराम चौधरी सर यांना शिक्षणाची गंगा लाभली.
श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गिरड येथील ‘जवाहर हायस्कूल’मध्ये झाले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक अडचणी, गरिबी, संसाधनांचा अभाव या गोष्टी आडव्या येत असतानाही त्यांनी शिक्षणाची गाठ सोडली नाही. अकरावी आणि बारावीचे शिक्षण पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ‘आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पाचोरा’ येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी त्यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथून अर्थशास्त्र विषयात एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर लातूर येथे जाऊन बी.एड. पूर्ण केले.
एम.ए., बी.एड. झाल्यानंतर त्यांनी आपल्या मातृसंस्थेतच – श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे उपशिक्षक म्हणून कार्यारंभ केला. याच संस्थेत त्यांनी तब्बल तीस वर्षे सेवा करताना शिक्षक म्हणून केवळ अध्यापन नव्हे तर संस्कार, नेतृत्व, मार्गदर्शन या सर्व अंगांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. अध्ययन व अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करणे ही बाब चौधरी सरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे.
विद्यालयीन कारकिर्दीत सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांनी १५ वर्ष कार्य केले. या कालखंडात वकृत्व, निबंध, वादविवाद, नृत्य, फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य, विचारप्रवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेमुळे शाळेला अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली.
२००३ मध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार आणि मार्गदर्शक स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांनी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांना शिक्षक प्रतिनिधी संचालक म्हणून जबाबदारी दिली. पुढे नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वात त्यांनी संचालक मंडळात कार्य केले. या काळात शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. वरिष्ठ श्रेणीसाठी लागणारे ठराव, पदोन्नती, सोयीस्कर बदली अशा विविध समस्यांचे निवारण संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नेहमी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कर्मठ निष्ठा ठेवली.
शैक्षणिक कार्यासोबतच श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर सामाजिक कार्यातही सक्रिय राहिले आहेत. पाचोरा शहर तेली समाज संस्थेचे ते पाच वर्षे संचालक आणि २०२२ पासून सचिव पदावर कार्यरत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, हे उपक्रम त्यांनी मनापासून राबवले. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात शैक्षणिक जागृती वाढली आहे.
श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तसेच नाशिक विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी, मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने, उपोषणे केली, निवेदने दिली. आजही ते सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ग्राहक पंचायत – तालुकाध्यक्ष, माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संघ – सहसचिव, माजी विद्यार्थी संघ, एम.एम. कॉलेज पाचोरा – सहसचिव, पाचोरा शहर तेली अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत.
शैक्षणिक जीवनात वेळोवेळी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वासमोर नमते घेतले असून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्याच्या घटना ही त्यांच्या कार्याच्या परिणामकारकतेचे द्योतक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षक म्हणून, समाजसेवक म्हणून आणि नेतृत्वकर्त्या व्यक्तिमत्त्व म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
श्री नानासाहेब शांतारामचौधरी सर यांचे कुटुंब शिक्षणप्रेमी आहे. त्यांच्या पत्नी सौ सुनीता चौधरी यांनीही त्यांच्या कार्यात पाठिंबा दिला असून त्यांची मुले मुलगी कुमारी ऋतुशा व मुलगा मोहित हे बी. कॉम्प्युटर, एमबीए पूर्ण करून पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मुलांमध्ये संस्कार, विचार आणि आत्मविश्वासाचे बीज त्यांनी लहानपणापासूनच पेरले.
श्री नानासाहेब शांताराम सर नेहमी सकारात्मक विचारांचा पुरस्कार करतात. “नेहमी चांगले विचार करा, आपले नेहमी चांगलेच होईल,” हा त्यांचा जीवनमंत्र आहे. आजच्या काळात अशा विधायक विचारसरणीचे नेतृत्व करणारे शिक्षक आणि समाजसेवक फार दुर्मिळ झाले आहेत.
आज १ जून रोजी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, आणि निरंतर सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि अजूनही समाजासाठी, शिक्षणासाठी कार्य करण्याचे सामर्थ्य देवो, हीच प्रार्थना.

शब्दांकन
श्री संदीप महाजन, पत्रकार
संपादक – झुंज ध्येय न्यूज चैनल, पाचोरा

त्रिशताब्दी गौरवोत्सवात “बुद्धिजीवी संमेलन” आणि आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भव्य सत्कार

Loading

पाचोरा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित भव्य “बुद्धिजीवी संमेलन” आणि नव्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भव्य स्वागत सोहळ्याने पाचोरा शहरात राष्ट्रनायकांच्या स्मृतींना उजाळा देत नवसंघटनाचे आव्हान पुन्हा एकदा गगनावर पोहोचवले. भाजपा तालुक्याच्या वतीने शुक्रवार, दि. 31 मे 2025 रोजी महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिष्ठानाचा समरस संगम पाहायला मिळाला.
या गौरवशाली कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पणाने झाली. सद्गुण, शौर्य आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर कार्यक्रमात वारंवार अनुभवास येत होता. त्यांच्या जीवनमूल्यांपासून प्रेरणा घेत नव्या पिढीला दिशादर्शन करण्याचा संकल्प सर्व स्तरांवरून जाणवला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “पाचोरा-भडगाव तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा पक्ष जनतेच्या आशेचे केंद्रबिंदू बनणार असून, आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा नवे शिखर गाठेल.” त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनबांधणीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
या विशेष “बुद्धिजीवी संमेलनात” प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ स्त्री म्हणूनच नव्हे तर एक कुशल प्रशासक, न्यायनिष्ठ शासक आणि धर्मनिरपेक्ष सामाजिक आदर्श म्हणून संपूर्ण भारतात आदरणीय स्थान प्राप्त केले.” त्यांच्या कार्यातील समतोलता, धार्मिक सहिष्णुता आणि जनहितार्थ घेतलेले निर्णय आजच्या काळातही राजकारणाला दिशादर्शक ठरतात, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी पक्षाच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसमोर आपल्या मनातील भावना अत्यंत आत्मीयतेने मांडल्या. त्यांनी सांगितले की, “पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह खांद्याला खांदा लावून काम करू. भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे, जो सर्वसामान्य जनतेला न्याय देतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि त्यावर त्वरित कृती करतो.” त्यांनी पक्षाला ‘नंबर वन’ बनवण्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखवला.
कार्यक्रमात भाऊसाहेब डी. एम. पाटील, हिम्मत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दिलीपभाऊंच्या नेतृत्वाचे स्वागत केले. त्यांनी नव्या पर्वात भाजपाला स्थानिक स्तरावर अधिक सक्षम बनवण्यासाठी पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. त्यांच्या भाषणातून अनुभवी नेतृत्वाची आणि पक्षनिष्ठेची जाणिव व्यक्त झाली.
या कार्यक्रमात पाचोरा भाजपा टीमच्या वतीने आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि विशेष सन्मानपत्र अशा विविध स्वरूपांचा समावेश होता. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दिलीपभाऊंचे स्वागत करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
.या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आयोजित बुद्धिजीवी संमेलनात विविध क्षेत्रातील विचारवंतांनी एकत्र येत समाजाच्या समोर असलेल्या आव्हानांवर मुक्त संवाद केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, धर्मनिरपेक्षता आणि न्यायदेवतेवर असलेली निष्ठा या मुद्द्यांवर विचारप्रवर्तन झाले. या मंचावरून महिलांच्या सक्षमीकरणावरही सशक्त भूमिका मांडण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे यांनी करताना या आयोजना मागील उद्देश, त्यातील ऐतिहासिक महत्त्व आणि पक्षशिस्तीचे सूत्र उलगडून सांगितले. सूत्रसंचालन माणिक पाटील यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष गोविंद शेलार यांनी करताना सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाला पाचोरा व परिसरातील भारतीय जनता पक्षाचे विविध पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये –पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची चेअरमन नानासाहेब संजय वाघ, माजी जि प सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलालभाऊ जैन, रमेश वाणी, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, माजी जि प सदस्य डी.एम. पाटील, भूषण पाटील, प्रमोद सोमवंशी, प्रदीप पाटील, वसंत गायकवाड, रशीद काहाकर, एन.सी. पाटील, शशी पाटील, शशिकांत वाघ, शोभाताई तेली, सरला पाटील, सुरेखा पाटील, शिवदास पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, सुदाम वाघ, अनिल धना पाटील, डॉ. शांतीलाल तेली, विजय कडू पाटील, पिंटू भामरे, सतीश चौधरी, मच्छिंद्र थोरात, प्रकाश चौधरी, वासुदेव महाजन, राजेंद्र झावरु पाटील, प्रवीण गुजर, अशोक मोरे, अजय अहिरे, पंडित तेली, सुनीता गुंजाळ, नीलिमा पाटील, सतीश देशमुख, दीपक पाटील, नितीन पाटील, फकीरा भाऊ गंगे, नंदू बापू सोमवंशी, शरद अण्णा पाटील, विजू काका पाटील, योगेश माळ, गोपाल पाटील, अविनाश दादा सोमवंशी, कुलदीप पाटील, मनोज पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, विचारांचे सखोल मंथन आणि नेतृत्वावरील विश्वासाचे अधिष्ठान स्पष्ट दिसून आले. यानंतर पाचोरा-भडगाव तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट आणि संगठितपणे उभा राहील, अशी भावना उपस्थितांमध्ये ठळकपणे दिसून आली. आगामी काळात भाजपाचा जनाधार अधिक विस्तारित होईल, असा विश्वास या कार्यक्रमाने पक्का केला.

स्पष्टवक्तेपणाच्या ओळखीने समाजमन जिंकलेले – सीताराम पाटील सर

Loading

पाचोरा – आज 31 मे 2025 रोजी शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवणारे आणि स्पष्टवक्तेपणाची ओळख निर्माण करणारे सीताराम पांडुरंग पाटील सर आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सन 1954 मध्ये जन्मलेल्या पाटील सरांनी आयुष्यभर ‘जे योग्य ते स्पष्ट’ म्हणण्याची भूमिका घेतलेली असून, त्यांच्या स्पष्ट भाषेची कडूनिंब व कारल्यासारखी कडवट चव लोकांनी शेवटी औषधासारखीच स्वीकारलेली आहे. शिक्षकी पेशातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक क्षेत्रात विस्तारलेला असून, अनेक संस्था व पदांवर त्यांनी कार्य केले आहे. पाटील सरांचे मूळ गाव पाचोरा तालुक्यातील पुनगाव असले तरी नोकरीनिमित्त ते पाचोरा येथे स्थायिक झाले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी 1974 ते 2012 पर्यंत सु. भा. विद्या मंदिर, पाचोरा येथे शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अखंड मेहनत घेतली. त्यांच्या अध्यापनशैलीत स्पष्टता, शिस्त आणि मूल्यशिक्षणाची ठाम भूमिका होती. याच शाळेत त्यांनी 2007 ते 2012 या काळात मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर समाजजीवनात सक्रिय सहभाग हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे. पाटील सरांनी पुनगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सलग 10 वर्षे भूषवले. या काळात गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी विविध योजनांची अंमलबजावणी केली. सहकार क्षेत्रातही त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्था ही त्यांनी स्थापन करून यशस्वीपणे चेअरमन पद सांभाळले. त्याशिवाय ते जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, पुनगाव यांचेही संचालक होते.
राजकारणात त्यांनी राजकारणाचे पितामह स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांचे पाईक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवास सुरू केला कालांतराने स्वर्गीय आप्पासाहेब व वाघ परिवार वेळोवेळी जे जे जबाबदारी पक्षाची संघटनेची व निवडणुकीची देतील ती यशस्वीपणे सांभाळत त्यांनी तालुका अध्यक्षपद, तसेच ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट विचार, शिस्त आणि कार्यक्षम नेतृत्व ही त्यांची छाप राहिली आहे.
शिक्षक संघटनेच्या माध्यमातूनही पाटील सरांनी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षपद, तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न प्रशासनदरबारी मांडले.
त्यांच्या एकूण कार्यकाळात विशेष नोंद घ्यावी लागेल ती म्हणजे त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांच्या बोलण्यात कधीच मखलाशी नव्हती, जे योग्य वाटले ते त्यांनी कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट शब्दांत मांडले. त्यामुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्यांचा राग आला, पण पुढे त्यांच्या बोलण्यातील खरंचपणा, हितचिंतन आणि मार्गदर्शन समजून येत गेले. ते बहुउद्देशीय रेवे गुज्जर मंडळ, पाचोरा तालुका चे संचालकही राहिले असून या समाजघटकाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रत्येक स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवला.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेतला असता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येतात – शिक्षक, मुख्याध्यापक, सहकारी नेते, राजकारणी, संघटक आणि मार्गदर्शक. पण या सर्वांवर मात करणारा गुण म्हणजे त्यांची थेट बोलण्याची प्रामाणिक शैली, जी त्यांना आजच्या काळातही लोकांमध्ये विशेष स्थान मिळवून देते.
71 व्या वर्षात पदार्पण करताना पाटील सर अजूनही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असून नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी ‘ध्येय न्यूज – झुंज वृत्तपत्र’ परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

आयपीएल २०२५ – क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना पंजाबशी होणार; गुजरात टायटन्सचा प्रवास संपला

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. आता १ जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी त्यांचा सामना होईल. शुक्रवारी न्यू चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत पाच गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत सहा गडी गमावून फक्त २०८ धावा करता आल्या. त्यांच्याकडून साई सुदर्शनने ८० धावा केल्या.
गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिलला फक्त एक धाव करता आली. त्याला ट्रेंट बोल्टने त्याचा बळी बनवले. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला कुशल मेंडिस हिट विकेटने बाद होत तंबूमध्ये परतला. त्याने साई सुदर्शनसोबत ३४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. यामध्ये मेंडिसने २० धावांचे योगदान दिले. त्यानंतर सुदर्शनला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली. दोघांमध्ये ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. सुंदरने ४८ आणि सुदर्शनने ८० धावा केल्या. त्याच वेळी रुदरफोर्डने २४, शाहरुख खानने १३ धावा केल्या. राहुल तेवतिया १६ आणि रशीद खान खाते न उघडता नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिशेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्यापूर्वी, रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या सलामी जोडीने मुंबईला जलद सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. साई किशोरने या सामन्यात पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला जेराल्ड कोएत्झीकरवी झेलबाद केले. तो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा काढल्यानंतर बाद झाला. त्यानंतर रोहितला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. दोघांनी ३४ चेंडूत ५९ धावा जोडल्या. यादरम्यान सूर्यकुमारने २० चेंडूंचा सामना केला आणि ३३ धावा करून तंबूमध्ये परतला.
या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला. आता त्याच्या नावावर ३०२* षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. हिटमनने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूंमध्ये ४३ धावा जोडल्या. माजी कर्णधाराने ५० चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. तिलकने ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या आणि नमन धीर नऊ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या नऊ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने २२ धावा करून नाबाद राहिला तर सँटनर खाते न उघडता नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोरने प्रत्येकी दोन बळी घेतले तर मोहम्मद सिराजला एक यश मिळाले.

ढोल-ताशों की गूंज में आर्किटेक्ट देवांशी कोटेचा का भव्य स्वागत, 31 मई को होगा सम्मान समारोह

Loading

पाचोरा – निवासी कोटेचा परिवार के लिए यह क्षण अत्यंत गर्व और खुशी का था जब परिवार की होनहार बेटी आर्किटेक्ट देवांशी हेतल जयेश कोटेचा ने देश की प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थाओं से अपनी उच्च शिक्षा सफलतापूर्वक पूर्ण कर घर वापसी की। इस खास मौके को यादगार बनाने के लिए परिवार ने परंपरागत रीति से ढोल-ताशों की धुन पर और फूलों की वर्षा के साथ उनका भव्य स्वागत किया। देवांशी, पाचोरा के प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र कोटेचा की पौत्री और हेतल एवं जयेश कोटेचा की सुपुत्री हैं। उन्होंने अपनी पांच वर्ष की आर्किटेक्चर स्नातक डिग्री नागपुर स्थित Priyadarshini Institute of Architecture and Design Studies से पूर्ण की है। इसके पश्चात उन्होंने दो वर्ष की परास्नातक डिग्री (मास्टर्स इन सस्टेनेबल आर्किटेक्चर) देश के प्रतिष्ठित केंद्रीय संस्थान School of Planning and Architecture, Vijayawada (SPAV) से प्राप्त की है। यह संस्थान भारत सरकार के अधीन कार्य करता है और वास्तुकला एवं पर्यावरण-संवेदनशील निर्माण क्षेत्र में देशभर में प्रसिद्ध है। शिक्षा पूर्ण कर घर लौटने पर देवांशी का स्वागत उनके चाचा निलेश कोटेचा, चाची नेहा कोटेचा और समस्त कोटेचा परिवार द्वारा उत्सवमयी माहौल में किया गया। ढोल-ताशों की गूंज और पाँवों के नीचे फूल बिछाकर उन्हें पारंपरिक सम्मान दिया गया। इस दौरान मोहल्ले, समाज, रिश्तेदारों और मित्रों का भी भारी उत्साह देखा गया। इस गौरवपूर्ण उपलब्धि के उपलक्ष्य में देवांशी एवं कोटेचा परिवार का एक विशेष सम्मान समारोह का आयोजन किया गया है। इस शुभ अवसर पर देवांशी का सत्कार श्री एवं सौ परिवार की ओर से दिनांक 31 मई को पाचोरा स्थित सर्वज्ञ होटल के कॉन्फ्रेंस हॉल में आयोजित किया गया है। कार्यक्रम के दौरान देवांशी के शैक्षणिक सफर की जानकारी, उनके अनुभवों की झलक और भविष्य की योजनाओं पर भी चर्चा होगी। साथ ही उनके इस सफलता के पीछे परिवार का सहयोग, उनके अथक प्रयास और समर्पण का सम्मान भी किया जाएगा।
देवांशी ने एक साक्षात्कार में कहा, “यह सफलता सिर्फ मेरी नहीं, बल्कि पूरे परिवार की है। उनके सहयोग और विश्वास के बिना यह संभव नहीं होता।” कोटेचा परिवार ने इस अवसर को केवल पारिवारिक आयोजन तक सीमित न रखते हुए, इसे समाज के समक्ष प्रेरणादायक उदाहरण के रूप में प्रस्तुत करने का संकल्प लिया है। देवांशी कोटेचा आज की युवा पीढ़ी, खासकर बेटियों के लिए एक मिसाल बन रही हैं। उन्होंने कड़ी मेहनत, समर्पण और पारिवारिक समर्थन के सहारे वास्तुकला जैसे रचनात्मक और चुनौतीपूर्ण क्षेत्र में उल्लेखनीय सफलता प्राप्त की है। उनका यह शैक्षणिक और प्रेरणादायक सफर न केवल उनके परिवार के लिए, बल्कि पूरे पाचोरा नगर के लिए गर्व की बात है।

हरिद्वार में गुर्जर सम्राट मिहिर भोज सभागार एवं संग्रहालय का भव्य लोकार्पण समारोह सम्पन्न

Loading

हरिद्वार – की पावन धरती पर 28 मई 2025 को गुर्जर समाज के आत्मगौरव और सांस्कृतिक परंपरा का साक्षात उत्सव बड़े ही भव्य और गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। गुर्जर धर्मशाला, हरिद्वार के प्रांगण में नव-निर्मित गुर्जर सम्राट मिहिर भोज सभागार और गुर्जर इतिहास एवं संस्कृति संग्रहालय का लोकार्पण समारोह हजारों गुर्जर बंधुओं की उपस्थिति में अत्यंत हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनने हेतु देशभर से समाज के प्रतिष्ठित प्रतिनिधि, नेता, सामाजिक कार्यकर्ता, न्यायविद, अधिकारी, किसान नेता और युवाओं ने सहभागिता निभाई। कार्यक्रम का सफल संचालन श्री अमित कुमार शिवपुर और श्री प्रवेश गुर्जर ने अत्यंत कुशलता और प्रभावी शैली में किया। कार्यक्रम की भव्यता और समाज की सक्रिय सहभागिता ने यह सिद्ध किया कि गुर्जर समाज आज अपनी ऐतिहासिक विरासत को सहेजते हुए आधुनिक युग में आत्मगौरव के साथ आगे बढ़ रहा है। इस लोकार्पण समारोह में डॉ. यशवीर सिंह (राष्ट्रीय अध्यक्ष, गुर्जर महासभा), अनन्त राम तंवर (राष्ट्रीय अध्यक्ष, गुर्जर समन्वय समिति), सुनीता बैंसला (आईआरएस, पूर्व प्रधान महानिदेशक, आयकर), सुखवीर सिंह जौनापुरिया (पूर्व सांसद), वीरेंद्र सिंह (पूर्व मंत्री), स्वामी यतिश्वरानंद (पूर्व मंत्री), प्रदीप चौधरी (पूर्व सांसद), प्रह्लाद गुंजल (पूर्व विधायक, राजस्थान), नैपाल सिंह कसाना (समाजसेवी), हिम्मत सिंह (किसान नेता, राजस्थान), पूर्व जस्टिस सुनील पंवार (पटना हाईकोर्ट), पूर्व जस्टिस ब्रह्म सिंह वर्मा (नैनीताल हाईकोर्ट), ओंकार सिंह (पूर्व सचिव, उत्तराखंड सरकार), रामशरण (पूर्व आईएएस), राव सुरेन्द्र सिंह तंवर (कैथल), सुरेश राणा, अशोक कुमार हंसापुर, नरेंद्र देढा के साथ-साथ कुरुक्षेत्र धर्मशाला व अन्य गुर्जर धर्मशालाओं के प्रतिनिधियों की गरिमामयी उपस्थिति ने समारोह की महत्ता को और बढ़ा दिया। सभागार का उद्घाटन समारोह समाज की एकता, जागरूकता और संगठनात्मक क्षमता का प्रतीक बना। यह भवन आधुनिक सुविधाओं से युक्त है और भविष्य में समाज के विविध कार्यक्रमों, संगोष्ठियों, सांस्कृतिक आयोजनों तथा विचार विमर्श हेतु एक सशक्त मंच के रूप में कार्य करेगा। इसके साथ ही ‘गुर्जर इतिहास एवं संस्कृति संग्रहालय’ की भव्य स्थापना समाज के इतिहास को एकत्र करने का एक महत्त्वपूर्ण प्रयास है। संग्रहालय में गुर्जर वीरों के चित्र, ऐतिहासिक दस्तावेज, दुर्लभ छायाचित्र, पुरातात्विक प्रमाण, ऐतिहासिक पत्रक और साहित्य का संग्रह बड़ी श्रद्धा और मेहनत से प्रस्तुत किया गया है। इस संग्रहालय में मिहिर भोज, बप्पा रावल, नागभट्ट प्रथम जैसे गुर्जर इतिहास के महान सम्राटों के चित्रों, शिलालेखों, लेखों और जीवन वृतांत को सुंदर रूप से प्रदर्शित किया गया है। समाज के सभी प्रतिनिधियों और आम नागरिकों ने इस संग्रह को देखकर गर्व की अनुभूति की और इसे नई पीढ़ी के लिए प्रेरणास्रोत बताया।इस लोकार्पण समारोह के अंतर्गत स्वर्गीय किरोड़ी सिंह बैंसला की स्मृति में रचित एक प्रेरणादायी पुस्तक का विमोचन भी मान्यवरों के करकमलों से संपन्न हुआ। यह पुस्तक समाज के लिए उनके संघर्ष, समर्पण और नेतृत्व क्षमता को उजागर करती है। इसके अतिरिक्त, गुर्जर समाज के ऐतिहासिक योगदान पर आधारित एक और शोधपूर्ण पुस्तक का विमोचन भी किया गया, जिसमें गुर्जरों की गौरवशाली गाथाओं को संकलित किया गया है। इसी अवसर पर स्वतंत्रता संग्राम सेनानी और महान क्रांतिकारी विजय सिंह पथिक को भी श्रद्धांजलि अर्पित की गई। वक्ताओं ने उनके विचारों, देशप्रेम और सामाजिक संघर्ष का स्मरण करते हुए उन्हें गुर्जर समाज का प्रेरणास्रोत बताया। इस आयोजन की विशेष बात यह रही कि इसमें उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश ,महाराष्ट्र जैसे विभिन्न राज्यों से हजारों की संख्या में समाजबंधु उपस्थित हुए। विशेषकर कुरुक्षेत्र धर्मशाला और अन्य गुर्जर भवनों के प्रतिनिधियों ने समाज के साथ जुड़कर अपने सहयोग की भावना प्रकट की। हरियाणा और राजस्थान से आए किसान प्रतिनिधियों ने भी समाज की एकजुटता पर प्रकाश डाला और कहा कि हमारा इतिहास ही हमारी ताकत है। इस समारोह में वक्ताओं ने समाज की वर्तमान स्थिति और भविष्य की दिशा पर भी गंभीरता से विचार रखे। उन्होंने बताया कि आज का युग ज्ञान, संगठन और आत्मगौरव का है। ऐसे समय में समाज को शिक्षा, रोजगार, राजनीतिक भागीदारी, और सामाजिक चेतना के माध्यम से सशक्त बनाना आवश्यक है। युवाओं से विशेष रूप से आग्रह किया गया कि वे अपने इतिहास को जानें, संगठन से जुड़ें, और समाज की मुख्यधारा में नेतृत्व की भूमिका निभाएं।मान्यवर अतिथियों ने अपने उद्बोधन में कहा कि यदि समाज को प्रगति करनी है तो उसे अपने अतीत से प्रेरणा लेकर वर्तमान को दृढ़ बनाना होगा। सभागार और संग्रहालय जैसे संस्थान समाज को नई दिशा देने का कार्य करेंगे। यह स्थान न केवल इतिहास का दस्तावेज होगा बल्कि यह युवाओं को दिशा देने वाला विचार केंद्र भी बनेगा।समारोह की समाप्ति पर आयोजक राहुल बैंसला (हरिद्वार) ने मंच से उपस्थित सभी अतिथियों, समाजबंधुओं, पत्रकारगण, आयोजक मंडल और स्वयंसेवकों का हार्दिक धन्यवाद एवं आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि इस सफलता का श्रेय सम्पूर्ण गुर्जर समाज को जाता है, जिनकी निष्ठा, सहयोग और संगठन भावना के कारण यह भव्य आयोजन संभव हुआ। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि भविष्य में भी समाज के गौरव को बढ़ाने वाले ऐसे आयोजन किए जाते रहेंगे।यह ऐतिहासिक दिन न केवल हरिद्वार के इतिहास में बल्कि समस्त गुर्जर समाज के गौरवशाली इतिहास में स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा। यह समारोह एक संदेश है कि जब समाज एकजुट होता है, तब इतिहास रचता है।

पाचोऱ्यात बँक एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी पत्रकार, बँक व्यवस्थापक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक

Loading

पाचोरा : शहर तसेच तालुक्यातील विविध बँकांच्या एटीएम सेवा सुरळीत व्हाव्यात, ग्राहकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि नागरिकांना आवश्यक त्या बँकिंग सुविधा वेळेवर, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने दिनांक 30 मे 2025 रोजी उपविभागीय कार्यालय, पाचोरा येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पाचोरा तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक वृत्तपत्रांचे तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक आणि प्रतिनिधी, तसेच सर्व संबंधित बँकांचे व्यवस्थापक किंवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले. उपविभागीय अधिकारी (SDO) पाचोरा भाग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. पत्रकारांनी 29 मे 2025 रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीच्या प्रारंभी आमदार किशोर आप्पा पाटील आणि उपविभागीय अधिकारी यांचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि बँक व्यवस्थापकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी तालुक्यातील बँकिंग सेवा व एटीएम यंत्रांच्या कामकाजासंदर्भात सविस्तरपणे आपली मते, अनुभव आणि तक्रारी मांडल्या. या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मुद्देसूद चर्चा झाली आणि कार्यवाहीसाठी ठोस सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पत्रकारांनी सर्वप्रथम रेल्वे स्थानक परिसरातील एटीएमबाबत तक्रार मांडली. अनेक ग्राहकांनी त्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे कट होऊनही प्रत्यक्षात रक्कम मिळत नसल्याची तक्रार केली. विशेष म्हणजे, सदर एटीएम गेल्या दोन वर्षांपासून वारंवार बंद राहत असल्याचेही निदर्शनास आणले गेले.
या तक्रारीवर संबंधित बँकेचे व्यवस्थापकांनी उत्तर देताना सांगितले की, सदर एटीएम 12 तासांपेक्षा अधिक काळ बंद राहत नाही. तसेच त्यासंबंधीचा सर्व रेकॉर्ड बँकेत उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता आमदार पाटील यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एटीएम सेवा खंडित होणार नाही, यासाठी बँकांनी योग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि तांत्रिक अडचणी आल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी
वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत उपस्थितांनी ही सुविधा इतर बँकांनीही सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी तालुक्यातील सर्व बँकांनी अशा गटांना प्राधान्याने कर्ज देण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याची सूचना केली. यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यास मदत होईल.
बैठकीत पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारची कर्जे सहजतेने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी केली. यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोराचे व्यवस्थापक यांनी स्पष्टीकरण दिले की, मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनेक ग्राहकांना कर्ज दिले जात आहे. याशिवाय, वैयक्तिक, व्यवसायिक, शैक्षणिक व इतर कर्ज सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात. यासंदर्भात जास्तीत जास्त नागरिकांनी अवगत व्हावे यासाठी जनजागृती करण्यात यावी, असेही ठरवण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखांमध्ये ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नसल्याची तक्रार उपस्थित पत्रकारांनी केली. त्यावर आमदार पाटील यांनी तातडीने या बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी पार्किंगसाठी जागेचा पर्याय शोधून उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.
बैठकीत उपस्थित अनेकांनी एटीएम सेवा बंद असताना ग्राहकांशी संपर्क साधण्याकरिता टोल फ्री क्रमांक किंवा कार्यालयीन संपर्कासाठी फलक लावण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व बँक व्यवस्थापकांनी अशा सूचना आणि फलक लवकरच लावण्याचे आश्वासन दिले.
बँक ऑफ महाराष्ट्र व सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांनी ग्राहकांसाठी नव्या जागेवर शाखा स्थलांतर करण्याची सूचना प्राप्त झाली. नव्या ठिकाणी अधिक जागा, सुविधा, आणि सुरक्षितता लक्षात घेता अशा स्थलांतराची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. संबंधित बँक व्यवस्थापकांनी या सूचनेची नोंद घेतली.
शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळावे, यासाठी सर्व बँक व्यवस्थापकांना सुचना देण्यात आल्या. यावेळी आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जाबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा अडथळा होणार नाही, याची खात्री घेण्याचे आवाहन केले.
रु. 10, 20 आणि 50 च्या नोटा केवळ मोठ्या व्यक्तींनाच दिल्या जातात, असा आरोप उपस्थित पत्रकारांनी केला. यावर आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बँक व्यवस्थापकांना सर्वसामान्य ग्राहकांनाही पुरेशा प्रमाणात छोट्या नोटा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व ग्राहकांवर समान न्याय व्हावा, यावर भर देण्यात आला.
प्रत्येक बँक ग्राहकाचा विमा असावा, यासाठी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. हे विमा संरक्षण ग्राहकांना आर्थिक संकटाच्या काळात उपयुक्त ठरेल. बँकांनी आपापल्या शाखेतून ही मोहीम अधिक गतीने राबवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्रत्येक तिमाहीत आयोजित होणाऱ्या बँक बैठकीत बँक व्यवस्थापकांनी पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि आमदार यांच्या उपस्थितीत कामकाजाचा आढावा द्यावा. अशा खुल्या चर्चेमुळे बँकेच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि नागरिकांचा विश्वास वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत दिलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि घेतलेल्या निर्णयामुळे पाचोरा शहर व तालुक्यातील बँकिंग सेवा अधिक कार्यक्षम, सुलभ व नागरिक-केंद्रित होतील, असा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व बँक व्यवस्थापक, पत्रकार व मिडिया प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.
ही बैठक केवळ एक औपचारिकता न राहता, यामधून खरोखरच सकारात्मक बदल होतील आणि नागरिकांच्या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या संयुक्त बैठका वेळोवेळी आयोजित केल्या जाव्यात, ही मागणीही अनेक प्रतिनिधींनी मांडली.सदर बैठक पाचोरा तालुक्यातील बँकिंग व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. पत्रकारांचे प्रश्न, लोकप्रतिनिधींचे सक्रिय नेतृत्व आणि बँक व्यवस्थापकांची सकारात्मक भूमिका या त्रिसूत्रीमुळे ग्राहकांचे हित साधले जाईल, यात शंका नाही.

पाचोरा-भडगावमध्ये भाजपाचं वर्चस्व निश्‍चित; दिलीपभाऊ वाघांचा विकासाच्या मंत्रासह प्रवेश

Loading

पाचोरा – भडगाव तालुक्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व असेल, असा ठाम विश्वास माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघात सक्रिय राजकीय कार्य करत असलेल्या वाघ परिवाराने अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शुक्रवारी (ता. ३० मे) दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना अनेक राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकरभाऊ काटे, दत्ताआबा बोरसे, रमेश वाणी, कांतीलालभाऊ जैन, डॉ. शांतीलाल तेली, प्रकाश पाटील, ॲड. अविनाश सुतार, सतीश चौधरी, विनय जकातदार, शिवदास पाटील, वासुआण्णा महाजन, नंदू बापू सोमवंशी, प्रदीप पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, अनिल पाटील, विजय पाटील, सनीभावाघ, प्रताप चौधरी, अरुण पाटील, किशोर संचेती, रणजीत पाटील, भगवान मिस्तरी, सुनील पाटील, प्रा. माणिक पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, सुदाम वाघ, भागवत मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई येथील पक्षप्रवेश सोहळ्याचे तपशील दिले.
     दिलीपभाऊ वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले की, गेल्या २५ वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतो. चार वेळा विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या. मात्र यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. निवडणूक रिंगणात असताना युती सरकारच्या लाडकी बहिण योजना व विकासात्मक धोरणांमुळे स्पष्ट संकेत मिळत होते की पराभव अटळ आहे. त्यामुळे मी निवडणूक रिंगणातून बाजूला झालो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या राजकारणाचा पाया म्हणजे समाजहित व विकासाभिमुख दृष्टिकोन. मात्र राज्यात राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे दोन गट पडल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले होते. ‘आता कुठे राहावे?’, ‘विरोधात किती दिवस बसायचे?’ या प्रश्नांनी कार्यकर्ते संभ्रमात होते. त्याच वेळी भाजपात प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची मागणी तीव्र झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि विकासाचा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी अखेर भाजपात प्रवेश केला, असे दिलीपभाऊ यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बाजार समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, पीटीसी शिक्षण संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, संचालक, वाघ परिवाराचे समर्थक व हितचिंतक अशा सुमारे २०० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. आमदार व नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा प्रचंड विकास केला आहे. मात्र गेल्या काही काळात सत्ता नसल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. कार्यकर्तेही दिशाहीन झाले होते. अशा वेळी भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत आग्रहाने संवाद सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या विचारांनुसार निर्णय घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला, असे स्पष्ट करताना दिलीपभाऊ यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाची सत्ता क्रमांक एक वर आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
  आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, सहकारी संस्था यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार कार्य करताना भाजपाचा एकतर्फी प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगून, केंद्र ते गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे आणि त्यामुळे यापुढे निर्णय हे पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
   “आगामी निवडणुकीत  काय विचार आहे?” मित्र पक्षाशी युती की स्वतंत्र लढत या प्रश्नावर उत्तर देताना दिलीपभाऊ वाघ म्हणाले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून येथे निर्णय हे पक्षश्रेष्ठींचे असतात. पक्षाकडून जे आदेश मिळतील, त्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढवू. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. यावेळी अमोलभाऊ शिंदे यांच्या सहभागासंदर्भात विचारल्यावर दिलीपभाऊ म्हणाले की, माझ्या प्रवेशाने कोणीही नाराज नाही. मी भाजपात सक्रिय झाल्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसोबत काम करत आहे. त्यामुळे कोणताही विरोध किंवा नाराजी होण्याची शक्यता नाही. पक्षाच्या धोरणांप्रमाणे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी एकसंघपणे सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.
  या पत्रकार परिषदेत विनय जकातदार, मधुभाऊ काटे, नंदू बापू सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वाघ परिवाराचा भाजपात प्रवेश झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा बळकटीचा फायदा होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेच्या समारोपप्रसंगी नंदू बापू सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आज भडगावात भव्य जाहीर व्याख्यानाचे व श्री वाघ यांच्या सत्काराचे आयोजन

Loading

भडगाव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भडगाव व कजगाव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता भडगाव येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे तसेच जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह (डोकोरे हॉल), दत्तनगर, बाळद रोड, भडगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये जिल्ह्यातील नामवंत वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. डॉ. राधेश्यामजी चौधरी आणि शिवव्याख्याते मा. रविंद्र पाटील (पाचोरा) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
या खास प्रसंगी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेशाबद्दल विशेष स्वागत समारंभही होणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा कजगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील व भाजपा भडगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष  प्रमोद पाटील यांच्यासह संपूर्ण कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
  या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याची नव्या पिढीला ओळख पटेल, तसेच त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श समाजात रुजेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असल्यानं भडगाव शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांस्कृतिक वारशाचा गौरव करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आज सायंकाळी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!