Home Blog Page 14

आज दि.02/04/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज कामात गती येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढलेला राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 1
शुभ रंग: लाल

वृषभ
आजचा दिवस संयमाने घालवावा लागेल. कामात थोडे अडथळे येऊ शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबाची साथ लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6
शुभ रंग: हिरवा

मिथुन
आज नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. मित्रांची मदत मिळेल. खर्च वाढू शकतो. मन आनंदी राहील.
शुभ अंक: 5
शुभ रंग: पिवळा

कर्क
आज कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय टाळा. कामात स्थिरता राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा. आरोग्य सामान्य राहील.
शुभ अंक: 2
शुभ रंग: पांढरा

सिंह
आज तुमचा प्रभाव वाढेल आणि लोकांवर छाप पडेल. कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.
शुभ अंक: 3
शुभ रंग: केशरी

कन्या
आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक: 7
शुभ रंग: निळा

तुला
आज संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. भागीदारीत लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. खर्च वाढू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवा.
शुभ अंक: 8
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज थोडा तणाव जाणवू शकतो. संयम आणि शांतता राखा. कामात विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 4
शुभ रंग: जांभळा

धनु
आजचा दिवस प्रगतीचा राहील. प्रवासाची शक्यता आहे. नवीन कामांची सुरुवात करू शकता. आर्थिक लाभ मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक: 9
शुभ रंग: पिवळा

मकर
आज मेहनतीचे फळ मिळेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कुटुंबात आनंद राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 8
शुभ रंग: करडा

कुंभ
आज नवीन संधींचा लाभ घेता येईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 11
शुभ रंग: आकाशी

मीन
आज मन शांत ठेवणे आवश्यक आहे. कामात स्थिरता राहील. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. ध्यान उपयोगी ठरेल.
शुभ अंक: 2
शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.02/03/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज कामात गती येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यवसायिक निर्णय लाभदायक ठरू शकतात. कुटुंबीयांशी सौहार्द राखा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 1
शुभ रंग: लाल

वृषभ:
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास यश मिळेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. मानसिक शांतता राखा.
शुभ अंक: 6
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा.
शुभ अंक: 5
शुभ रंग: पिवळा

कर्क:
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. भावनिक निर्णय घेणे टाळा. कामात स्थिरता येईल.
शुभ अंक: 2
शुभ रंग: पांढरा

सिंह:
नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
शुभ अंक: 9
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
कामात बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 7
शुभ रंग: निळा

तुळ:
संतुलन राखल्यास सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
शुभ अंक: 6
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
धैर्य आणि संयम ठेवा. गुप्त शत्रूं पासून सावध राहा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 8
शुभ रंग: जांभळा

धनु:
प्रवास योग संभवतो. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मित्रांची साथ लाभेल.
शुभ अंक: 3
शुभ रंग: केशरी

मकर:
मेहनतीचे फळ मिळेल. कामात स्थिरता राहील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांशी संवाद वाढेल.
शुभ अंक: 4
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
नवीन कल्पना यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभ अंक: 7
शुभ रंग: आकाशी

मीन:
मन शांत आणि समाधानी राहील. आध्यात्मिक कल वाढेल. कुटुंबीयांशी जिव्हाळा वाढेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ अंक: 2
शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा गौरव : सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांना अंजनविहिरे गावाचा ऐतिहासिक निरोप

0

Loading

भडगाव – तालुक्यातील मौजे अंजनविहिरे येथे कार्यरत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांची बदली झाल्याने २८ फेब्रुवारी रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र ही केवळ एक शासकीय प्रक्रिया न राहता, अंजनविहिरे गावासाठी तो एक भावनिक क्षण ठरला. गावातील समस्त शेतकरी बांधवांनी एकत्र येत सुखदेव गिरी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य आणि अभूतपूर्व निरोप समारंभाचे आयोजन केले. प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्यासाठी गावकऱ्यांनी इतक्या प्रेमाने, उत्साहाने आणि आपुलकीने निरोप देण्याची घटना विरळाच म्हणावी लागेल. गावकऱ्यांच्या मनात सुखदेव गिरी यांच्याविषयी असलेले प्रेम आणि आदर या समारंभातून ठायीठायी दिसून आला. सुखदेव गिरी यांची सपत्नीक डीजेच्या गजरात अश्वरथातून गावभर मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळी काढून औक्षण केले, ओवाळणी टाकून त्यांचे स्वागत केले. हजारो रुपयांची ओवाळणी ही केवळ आर्थिक मूल्याची नव्हती, तर ती शेतकऱ्यांच्या मनातील कृतज्ञतेची आणि विश्वासाची पावती होती. महाडीबीटी योजनेच्या माध्यमातून अनुदानावर शेतकऱ्यांना मिळवून दिलेले २५ ते ३० ट्रॅक्टर या मिरवणुकीत सहभागी झाले. हे ट्रॅक्टर केवळ वाहन नव्हते, तर शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाचे प्रतिक होते. मिरवणुकीनंतर संपूर्ण गावाला गावकऱ्यांनीच स्नेहभोजन दिले आणि हा निरोप समारंभ एका कुटुंबीयाच्या विदाईसारखा साजरा केला. या समारंभास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मा. किशोर मांडगे, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सुखदेव गिरी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या भाषणांतूनही एक गोष्ट ठळकपणे जाणवत होती—सुखदेव गिरी हे केवळ आदेश देणारे अधिकारी नव्हते, तर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांच्या दारात जाणारे, त्यांच्या पिकांत उतरून काम करणारे अधिकारी होते. हा निरोप समारंभ म्हणजे गावाच्या कृषी अधिकाऱ्याप्रती असलेल्या प्रेमाचे आणि विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरले. सुखदेव गिरी यांनी आपल्या कार्यकाळात घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, शासकीय योजनांची माहिती दिली, कागदोपत्री अडचणी सोडवल्या आणि शेतीला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नोकरी करत असताना पगार मिळवणे हे प्रत्येकाचे ध्येय असते, मात्र आपण जो पगार घेतो त्याच्या बदल्यात समाजासाठी काय योगदान दिले, हे अधिक महत्त्वाचे असते. आपण आयुष्यात किती संपत्ती कमावली यापेक्षा, किती माणसे जिंकली याची खरी किंमत असते, हे सुखदेव गिरी यांच्या कार्यातून दिसून आले. आजच्या व्यवस्थेत एकीकडे रंजले-गांजले, वृद्ध, अपंग आणि त्रस्त लोकांना किरकोळ कामासाठी तासन्तास उभे ठेवणारे, महिनोन्‌महिने चकरा मारायला लावणारे अधिकारी-कर्मचारी आपण पाहतो. तर दुसरीकडे पगार घेऊनही हरामाचा पैसा कमवण्यासाठी लोकांचे लाचरूपी रक्त शोषणारे राक्षसी वृत्तीचे घटकही प्रशासनात कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जेव्हा ग्रामस्थांकडून अशी ‘पावती’ मिळते, तेव्हा त्याचा आनंद आणि समाधान शब्दात मांडणे कठीण असते. या समारंभातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे सुखदेव गिरी यांची सहपत्नी त्यांच्या सोबत मिरवणुकीत विराजमान होत्या. आपल्या पतीच्या कार्यामुळे जनतेकडून मिळणारा मान-सन्मान, प्रेम आणि आदर पाहून त्या माऊलीच्या मनात जो अभिमान दाटून आला असेल, तो शब्दांत सांगण्यासारखा नाही. एका बाजूला प्रामाणिक कार्यामुळे निघणारी मिरवणूक आणि सन्मान, तर दुसऱ्या बाजूला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकून घराची झाडाझडती होताना कोपऱ्यात बसून रडणारी भ्रष्ट अधिकाऱ्याची पत्नी—या दोन टोकांच्या चित्रांतून जीवनाचे खरे मूल्य स्पष्ट होते. याच संदर्भात संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात—“ज्याचे आचरण त्याचे भूषण.” पद, अधिकार किंवा सत्ता तात्पुरती असते; मात्र आचरणातून निर्माण होणारी कीर्ती आणि सन्मान कायमचा असतो. लेखक ग.दि. माडगूळकर यांनी म्हटल्याप्रमाणे, “माणूस मोठा त्याच्या कर्तृत्वाने होतो, पदाने नाही.” सुखदेव गिरी यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, जीवनात आपण किती दिवस जगलो याला फारसे महत्त्व नाही, तर आपण कसे जगलो, कोणासाठी जगलो आणि समाजासाठी काय दिले, याला खरे महत्त्व आहे. अंजनविहिरे गावाने दिलेला हा निरोप केवळ एका अधिकाऱ्याचा सत्कार नाही, तर प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी यांचा सन्मान आहे. सुखदेव गिरी यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

इराण–इजराइल युद्धाच्या छायेत भारताची सज्जता आणि दुबईतील वास्तव : CCS बैठकीतून राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा आणि दुबईतून सौ. शितल संदीप महाजन यांचा दिलासादायक संदेश

1

Loading

दुबई – मध्यपूर्वेत इराण–इजराइल युद्धाने धोकादायक वळण घेतले असून त्याचे परिणाम केवळ त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगावर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजारपेठा आणि विविध देशांची अंतर्गत सुरक्षा या सर्वच बाबी या संघर्षामुळे प्रभावित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या सर्वोच्च सुरक्षा समितीची म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक केवळ औपचारिक स्वरूपाची नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध अधिक व्यापक रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या, वेगाने विकसित होत असलेल्या आणि जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील ठरते.

एकीकडे दुबई, इराण, इजराइल तसेच आसपासच्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी वास्तव्यास आहेत, तर दुसरीकडे भारताची ऊर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणावर याच भागावर अवलंबून आहे. युद्ध अधिक तीव्र झाल्यास भारतीय नागरिकांची सुरक्षितता, इंधन पुरवठा, देशाची अर्थव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो. याच कारणांमुळे CCS बैठकीत या सर्व बाबींचा सखोल आढावा घेतला जात आहे. CCS ही भारत सरकारची सर्वात महत्त्वाची आणि गोपनीय समिती मानली जाते. युद्ध, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघर्ष, संरक्षणविषयक धोरणे, लष्करी हालचाली, संरक्षण खरेदी तसेच परराष्ट्र धोरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील निर्णय याच समितीत घेतले जातात. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री हे तिचे सदस्य असतात. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्करप्रमुख आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी विशेष आमंत्रित म्हणून बैठकीस उपस्थित राहतात. इराण–इजराइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली जाणे, भारत कोणत्याही संभाव्य परिणामांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत देते. या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता. युद्ध अधिक तीव्र झाल्यास दुबई, इराण, इजराइल तसेच आसपासच्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गरज भासल्यास विशेष विमानसेवा सुरू करणे, स्थलांतर योजना राबवणे आणि दूतावासांमार्फत तातडीची मदत उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार ठेवण्यावर भर दिला जात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताची ऊर्जा सुरक्षा. मध्यपूर्वेतील समुद्री मार्ग, विशेषतः होर्मुज सामुद्रधुनी असुरक्षित झाल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई व अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेल साठे, पर्यायी पुरवठा व्यवस्था आणि आर्थिक उपाययोजनांवरही CCS बैठकीत चर्चा होत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताची अंतर्गत सुरक्षा. आंतरराष्ट्रीय युद्धपरिस्थितीचा फायदा घेऊन दहशतवादी संघटना सक्रिय होण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे विमानतळ, बंदरे, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, मोठी शहरे आणि इतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याची गरज भासू शकते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना ठरवण्यात येणार आहेत. चौथा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण. इराण आणि इजराइल हे दोन्ही देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. इजराइलसोबत भारताचे संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आहे, तर इराणसोबत ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंध आहेत. त्यामुळे कोणत्याही एका बाजूचा उघड पाठिंबा न देता संतुलित, संयमित आणि शांततेला प्राधान्य देणारी भूमिका कशी ठेवावी, यावरही CCS बैठकीत सविस्तर चर्चा होत आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुबईची स्थिती विशेष चर्चेत आली आहे. सोशल मीडिया आणि काही माध्यमांतून “दुबईवर हल्ला”, “दुबई एअरपोर्ट उद्ध्वस्त”, “रात्री मोठे स्फोट” अशा बातम्या वेगाने पसरल्या. मात्र या सर्व गदारोळात वास्तव समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारनंतर मध्यपूर्वेतील संघर्षाने तीव्र वळण घेतले आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेने मिसाईल व ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाला. UAE च्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हवेतच मोठ्या प्रमाणावर अडवले आणि बहुतेक क्षेपणास्त्रे निष्प्रभ करण्यात आली. तथापि या इंटरसेप्शन प्रक्रियेदरम्यान काही क्षेपणास्त्रांचे तुकडे खाली पडल्यामुळे दुबई आणि अबू धाबीतील काही भागांमध्ये मर्यादित स्वरूपाच्या घटना घडल्या. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट परिसरात अशाच तुकड्यांमुळे एअरपोर्टच्या एका भागात किरकोळ नुकसान झाले आणि चार कर्मचारी जखमी झाले. खबरदारी म्हणून काही काळ उड्डाणे थांबवण्यात आली. मात्र रनवे किंवा प्रवासी टर्मिनलवर थेट मिसाईल हल्ला झाला असा दावा अधिकृतरीत्या कधीही करण्यात आलेला नाही. पाम जुमेराह, जेबेल अली पोर्ट आणि बुर्ज़ अल अरब परिसरातही आग आणि धूर दिसल्याच्या घटना नोंदल्या गेल्या, मात्र या सर्व घटना इंटरसेप्ट केलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांमुळेच झाल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. डाउनटाउन दुबई आणि शेख झायेद रोड परिसरात मोठे आवाज ऐकू आले, इमारती हादरल्या, मात्र थेट इमारतींवर हल्ला झाल्याची पुष्टी नाही. अबू धाबीमध्ये मात्र तुकडे पडल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत एजंट सौ. शितल संदीप महाजन यांचे निवेदन विशेष महत्त्वाचे ठरत आहे. सध्या दुबई येथे अभ्यासदौरा आणि प्रशिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या सौ. शितल महाजन यांनी दुबईतील वस्तुस्थिती थेट दुबईतून स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दुबईतील सध्याची परिस्थिती पूर्णतः सुरक्षित, शांत आणि नियोजित स्वरूपात सुरू आहे. येथे कोणत्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नसून सर्व व्यवहार, पर्यटन उपक्रम आणि दैनंदिन जीवन सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्यक्ष दुबईत दिसणारी परिस्थिती आणि सोशल मीडियावर दाखवली जाणारी चित्रे यामध्ये मोठा फरक असून अनेक बातम्या या अफवांवर आधारित असल्याचे त्या स्पष्टपणे सांगतात. सौ. शितल महाजन या केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीतर्फे दुबई येथे आलेल्या अधिकृत टीमचा भाग असून त्या सध्या कंपनीच्या अभ्यासदौरा व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दुबईत आहेत. त्यांनी सांगितले की केअर हेल्थ इन्शुरन्स मार्फत दुबई येथे आलेली संपूर्ण टीम पूर्णतः सुरक्षित आहे. कंपनीने आखलेले सर्व प्रशिक्षण सत्र, अभ्यासक्रम, व्यावसायिक बैठक तसेच नियोजित पर्यटन दौरे ठरलेल्या वेळापत्रकानुसार यशस्वीपणे पार पडत आहेत. कोणताही कार्यक्रम रद्द झालेला नाही किंवा त्यात अडथळा आलेला नाही. दुबईतील हॉटेल्स, रस्ते, पर्यटनस्थळे, बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत असून सामान्य नागरिकांचे जीवन नेहमीप्रमाणेच सुरू आहे. सौ. शितल महाजन यांनी विशेषतः भारतातील आपल्या नातेवाईक, स्नेही आणि सहकाऱ्यांना उद्देशून सांगितले आहे की कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्या सर्व एजंट्स आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. कंपनी व्यवस्थापन प्रत्येक सेकंदाची माहिती घेत असून सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहे. त्यामुळे कंपनीतर्फे दुबईत आलेली संपूर्ण टीम पूर्णतः सुरक्षित आहे आणि सर्व कार्यक्रम नियोजनानुसार सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींकडे पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे युद्धाच्या काळात अफवा आणि अप्रमाणित माहिती मोठ्या वेगाने पसरते. प्रत्यक्ष घटनांपेक्षा भीतीचे वातावरण अधिक निर्माण केले जाते. अशा वेळी दुबईतून प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सौ. शितल संदीप महाजन यांचे हे निवेदन अत्यंत विश्वासार्ह आणि दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित बातम्यांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहितीलाच प्राधान्य देणे आवश्यक आहे. दुबई सध्या सुरक्षित आहे, शांत आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सर्व उपक्रम सुरू आहेत फक्त दुबई एअरपोर्ट वरून कोणतीही विमानाचे उड्डाण होत नसल्याने आता परतीच्या नियोजनात बदल बदल होऊ शकतो बाबी आम्ही सर्व लोक सुरक्षित आहोत एअरपोर्ट वर विमान उड्डाण बंद असल्याने त्या ठिकाणी यात्रेकरूनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे दुबई सरकारने स्पष्ट आवाहन केले आहे जोपर्यंत आमच्याकडून विमान उड्डाण व प्रवास तिकिटाचे दिनांक वेळ याचे कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत कोणीही विमानतळावर येऊ नये

रंगार गल्लीतील कट्ट्यावरून विधानसभेच्या केंद्रबिंदूपर्यंतचा विश्वासाचा प्रवास : स्वीय सहाय्य राजेंद्र पाटील (राजूभाऊ) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

0

Loading

पाचोरा – तात्कालीन आमदार स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्यावर उद्योगाचा कामाचा व्याप प्रचंड वाढत चालल्याने त्यांना आमदार या नात्याने ग्राउंड लेव्हलवरील सर्वसामान्य लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणे व त्यांच्या दैनंदिन कामांकडे वैयक्तिक लक्ष देणे प्रत्यक्षात कठीण होत गेले होते. जनतेच्या प्रश्नांचा पसारा मोठा होता, विकासकामांची जबाबदारी वाढत होती आणि राजकीय तसेच प्रशासकीय आघाड्यांवर निर्णयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. अशा काळात लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य होत नव्हते. याच काळात स्वतःला निष्ठावंत समजणाऱ्या काही चौकटी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्कात राहून इतर सामान्य शिवसैनिकांना त्या संपर्कापासून दूर ठेवत होत्या. संघटनेतील कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत जाऊ नये, सामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी थेट नेतृत्वापर्यंत पोहोचू नयेत, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात होती. सहकार्य करण्याऐवजी तात्यासाहेबांच्या कामात अडथळे निर्माण करणे, गैरसमज पसरवणे, चुकीची माहिती देणे आणि संघटनात्मक पातळीवर अडचणी वाढवणे, असेच या चौकटींचे कामकाज बनले होते. या पार्श्वभूमीवर तात्यासाहेबांनी किशोर आप्पा पाटील यांना शिवसेनेत अधिक सक्रियपणे पुढे आणले. मात्र जनतेच्या अपेक्षा आणि वास्तव परिस्थिती वेगळीच दिशा दाखवत होती. अल्पावधीतच किशोर आप्पा पाटील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्या कामाची पद्धत, सर्वसामान्यांशी थेट संवाद, प्रश्न समजून घेण्याची शैली आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे त्यांनी तरुणांसह सर्व स्तरांतील लोकांचा विश्वास संपादन केला आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाचोरा नगरपालिकेच्या नेतृत्वस्थानी विराजमान झाले. एका बाजूला आमदार स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या जबाबदाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नगरपालिकेच्या वाढत्या कामांचा व्याप, या दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येक नागरिकाला थेट न्याय देणे आपल्याला एकट्याला शक्य नाही, अशी स्पष्ट जाणीव किशोर आप्पा पाटील यांना होऊ लागली. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, कोणालाही वाऱ्यावर सोडले जाऊ नये आणि प्रशासन व जनता यांच्यात समन्वय राहावा, यासाठी विश्वासू, प्रामाणिक आणि जनतेशी थेट नाळ जोडणारा स्वीय सहाय्यक असावा, असा विचार पुढे आला. कोण योग्य ठरेल, याची सखोल पडताळणी व पाहणी सुरू झाली. अनेक नावांवर चर्चा झाली, अनेक व्यक्तींच्या कार्यपद्धतीचा विचार झाला, मात्र अखेरीस चर्चाअंती रंगार गल्लीतील राजूभाऊ हेच या भूमिकेसाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे निश्चित झाले. कारण त्यांच्याकडे पद नव्हते, सत्ता नव्हती, मात्र जनतेचे दुःख समजून घेण्याची क्षमता, शिवसेनेप्रती निष्ठा आणि प्रामाणिक काम करण्याची तयारी होती. त्यानंतर रंगार गल्लीतील कट्ट्यावर, म्हणजेच मोरभुवनच्या ओट्यावर बसणाऱ्या राजूभाऊंना तेथून थेट उठवून तत्कालीन नगराध्यक्ष किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सक्रिय करण्यात आले आणि येथूनच त्यांच्या सार्वजनिक कार्यातील जबाबदारीचा नवा अध्याय सुरू झाला. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आज राजेंद्र पाटील म्हणजेच सर्वांचे लाडके राजूभाऊ ओळखले जातात. नाव जरी राजू असले तरी नावाप्रमाणेच त्यांचे मन राजासारखे मोठे आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व परिवाराच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या संघर्षमय, निष्ठावंत आणि लोकाभिमुख कार्यप्रवासाकडे कृतज्ञतेने पाहिले जाते. राजूभाऊंची ओळख आज 24×7 जनतेसाठी तत्पर असलेल्या स्वीय सहाय्यकाची असली, तरी हा प्रवास कोणत्याही सवलतीतून किंवा शिफारसीतून मिळालेला नाही. त्यांच्या आयुष्याची सुरुवात रंगार गल्लीतील एक साधा शिवसैनिक म्हणून झाली. त्या काळात पद, अधिकार किंवा सत्तेच्या परिघाशी दूरदूरपर्यंत संबंध नसताना त्यांनी शिवसेनेच्या विचारांवर ठाम राहून प्रामाणिकपणे काम केले. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेणे, गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या उंबरठ्यावर ठामपणे उभे राहणे आणि रंजले-गांजले यांना दिलासा देण्यासाठी धडपडणे, हीच त्यांची ओळख होती. याच मातीतील गुणांमुळे पुढे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना राजूभाऊंनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. त्यांच्या अंगी असलेली प्रामाणिकता, निष्ठा आणि स्पष्टवक्तेपणा हे गुण अधिक ठळकपणे समोर आले. काम होईल तर होईल असे ठामपणे सांगणे आणि काम का होणार नाही हेही तितक्याच संयमानं व समजूतदारपणे सांगणे, हा त्यांचा मोठा गुण ठरला. भूलथापा न देता वस्तुस्थिती मांडणे, लोकांना खोटी आश्वासने न देता योग्य दिशा दाखवणे आणि प्रशासनाशी समन्वय राखत कामे मार्गी लावणे, या तिन्ही बाबींमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. किशोर आप्पा पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून ते आजच्या हॅट्रिक आमदारकीपर्यंत राजूभाऊ अखंडपणे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, यामागे कोणताही संधीसाधूपणा किंवा स्वार्थ नाही, तर केवळ आणि केवळ निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्य आहे. अनेक चढ-उतार, राजकीय बदल, सत्तांतराचे वारे आणि विरोधकांकडून होणारी टीका, या सगळ्या काळात त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. जनतेचे काम हेच सर्वोच्च कर्तव्य मानून त्यांनी आपले दैनंदिन आयुष्य आखले. राजूभाऊंच्या कार्यशैलीची खासियत म्हणजे ते सर्व स्तरांतील लोकांशी समान आदराने वागतात. गरीब असो वा श्रीमंत, कार्यकर्ता असो वा अधिकारी, प्रत्येकाशी संवाद साधताना त्यांची भाषा संयमी, नम्र आणि आश्वासक असते. त्यामुळेच लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि हाच विश्वास त्यांच्या यशाचा खरा पाया ठरला आहे. अनेकदा प्रशंसेपेक्षा टीका अधिक मिळते, गैरसमज निर्माण होतात, तरीही राजूभाऊंनी कधीही मनात कटुता ठेवली नाही. काम योग्य असेल तर ते टिकेल, या तत्त्वावर त्यांनी आजवरची वाटचाल केली आहे. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या राजकारणात, जिथे पदे बदलतात, भूमिका बदलतात आणि नाती तुटतात, तिथे राजूभाऊंची स्थिरता, सातत्य आणि निष्ठा विशेष ठरते. ते केवळ स्वीय सहाय्यक नाहीत, तर आमदारांच्या कार्याचा एक विश्वासू दुवा आहेत—जनता, पक्ष आणि प्रशासन यांच्यातील. याच दुव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, अनेक गरजूंना दिलासा मिळाला आणि अनेक विकासकामांना गती मिळाली. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसतो, तर समाजाने दिलेल्या विश्वासाचे आणि जबाबदारीचे स्मरण करून देणारा दिवस असतो. राजूभाऊंसाठी हा दिवस त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती ठरतो. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा निष्ठेची, प्रामाणिकपणाची आणि लोकसेवेची साक्ष देतो. आजही ते पूर्वीप्रमाणेच साधेपणाने काम करत आहेत—नावात राजू असले तरी मन राजासारखे मोठे ठेवून. 2 मार्च या वाढदिवसाच्या निमित्ताने झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने राजेंद्र पाटील म्हणजेच राजूभाऊ यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि लोकसेवेच्या या पवित्र वाटचालीत नवनवीन यश मिळो, हीच सदिच्छा. जनतेसाठी अखंड कार्यरत राहणाऱ्या या विश्वासाच्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आज दि.01/03/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल.
शुभ अंक: 9
शुभ रंग: लाल

वृषभ:
आज संयम ठेवल्यास लाभ होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रवास योग संभवतो.
शुभ अंक: 5
शुभ रंग: पिवळा

कर्क:
भावनिक निर्णय टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 2
शुभ रंग: पांढरा

सिंह:
नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 1
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
कामात बारकाईने लक्ष द्या. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक: 7
शुभ रंग: निळा

तुळ:
संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक सुख समाधान मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
गुप्त शत्रूंपासून सावध रहा. धैर्य आणि चिकाटीने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कुटुंबीयांचा सल्ला उपयोगी ठरेल.
शुभ अंक: 8
शुभ रंग: जांभळा

धनु:
प्रवास किंवा नवीन योजना यशस्वी ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. सकारात्मक विचार ठेवा. जुने मित्र भेटू शकतात.
शुभ अंक: 3
शुभ रंग: केशरी

मकर:
कामात स्थिरता येईल. संयम आणि मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
शुभ अंक: 4
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यास चांगला दिवस. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभ अंक: 7
शुभ रंग: आकाशी

मीन:
आध्यात्मिक कल वाढेल. मन शांत राहील. कौटुंबिक आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील.
शुभ अंक: 2
शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कर्तव्यनिष्ठा, शैक्षणिक योगदान आणि सेवाभावाचा गौरव करणारा गो. से. हायस्कूलमधील भावपूर्ण व स्मरणीय सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश वसंतराव पाटील आणि नाईक पदावर कार्यरत संजय वामन पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला अनेक दशकांच्या प्रदीर्घ सेवेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक व सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही सेवकांचा गौरव करण्याचा हा क्षण शाळेच्या इतिहासातील स्मरणीय ठरला. विद्यालयाच्या कलादालनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा–भडगाव तालुक्याचे माजी आमदार भाऊसो दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक सतीश नारायण चौधरी, योगेश माधवराव पाटील, पिंपळगाव–हरेश्वर येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रुपेश पाटील यांच्या इशस्तवनाने झाली. त्यानंतर दिनेश वसंतराव पाटील व संजय वामन पाटील यांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी प्रास्ताविकातून दोघांच्या कार्यकाळाचा आढावा घेत शाळेच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित त्यांच्या कार्यपद्धतीचे सविस्तर वर्णन केले. किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर यांनी आपले सहकारी दिनेश वसंतराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणात यश मिळविल्याचे नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांनी दोघांच्या कार्याचा गौरव करत निष्ठावंत कर्मचाऱ्यांमुळेच शिक्षणसंस्थेची प्रतिमा अधिक भक्कम होते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख यांनी समाधान व्यक्त करत दोघांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना दिनेश वसंतराव पाटील यांनी संस्थेने वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत निवृत्तीनंतरही संस्थेसाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. संजय वामन पाटील यांच्या वतीने त्यांचा मुलगा सोहम पाटील याने वडिलांच्या सेवापूर्ती निमित्त संस्थेप्रती ऋण व्यक्त करून कृतज्ञता प्रकट केली. या कार्यक्रमास माजी पर्यवेक्षक ए. जे. महाजन , शांताराम चौधरी, तसेच सकाळ व दुपार सत्रातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य यांनी केले

ज्ञान, कर्तव्यनिष्ठा आणि साधेपणाचा ३४ वर्षांचा प्रवास पूर्ण : डी. व्ही. पाटील सरांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती सोहळा

0

Loading

पाचोरा – शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात आपले योगदान ठळकपणे नोंदवून ठेवणारे दिनेश वसंतराव पाटील (डी. व्ही. पाटील सर) Mo. 9420109477 हे श्री गो. से. हायस्कूलच्या किमान कौशल्य विभागातून तब्बल ३४ वर्षे ३ महिने अखंड, निष्ठावंत आणि प्रामाणिक सेवा बजावून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीत आणि तांत्रिक शिक्षणाच्या बळकटीकरणात दिलेले योगदान केवळ एका शिक्षकापुरते मर्यादित न राहता आदर्श मार्गदर्शक, शिस्तप्रिय कार्यकर्ता आणि समाजाशी नाते जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे आहे. त्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती ही केवळ वैयक्तिक टप्प्याची समाप्ती नसून संस्थेच्या इतिहासातील एक भावनिक आणि गौरवशाली पर्व ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ठीक १० वाजता श्री गो से हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला संस्थेचे अध्यक्ष तथा मा.आ. दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, सेक्रेटरी ॲड महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, शालेय चेअरमन खलिलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवअण्णा महाजन आणि मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, शिक्षकवर्गाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीने होणारा हा सोहळा डी. व्ही. पाटील सरांच्या प्रदीर्घ सेवेला कृतज्ञतेने नमन करणारा ठरणार आहे. डी. व्ही. पाटील सरांचे बालपण पाचोरा येथील रंगारी गल्लीमध्ये गेले असून त्या परिसरातील साधेपणा, कष्टाची सवय आणि सामाजिक बांधिलकीची भावना याच वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी झाली. पुढे त्यांचे वास्तव्य गांधी चौक येथे झाले. प्राथमिक शिक्षण त्यांनी सु. भा. पाटील विद्यामंदिर येथे घेतले, तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्री गो. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच त्यांनी शिस्त, अभ्यासू वृत्ती आणि तांत्रिक विषयांची विशेष ओढ जोपासली. पुढे स्थापत्य विषयात पदविका पूर्ण करून त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची ठोस पायरी गाठली. शिक्षणानंतर दोन वर्षे त्यांनी बाहेरील कंत्राटी कामे तसेच प्लॅनिंगची कामे करत प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभव मिळवला आणि नियोजन, गुणवत्ता व जबाबदारी यांचे महत्त्व प्रत्यक्ष कामातून आत्मसात केले. २० नोव्हेंबर १९९१ रोजी त्यांनी श्री गो. से. हायस्कूलमध्ये किमान कौशल्य विभागात बिल्डिंग मेंटेनन्स या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ निदेशक म्हणून रुजू होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्या काळात किमान कौशल्य विभाग हा विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग होता. पाटील सरांनी केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनात कामाची शिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आणि समाजात सन्मानाने आपले स्थान मिळवले. शाळेतील विविध बांधकाम, देखभाल आणि तांत्रिक कामांमध्येही त्यांनी आपले ज्ञान वापरून संस्थेला योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी दिली आणि बिल्डिंग मेंटेनन्स या विषयातून बांधकामाची मूलतत्त्वे, देखभाल व्यवस्थापन, सुरक्षिततेचे नियम, नियोजनाची शिस्त आणि गुणवत्तेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले. शिस्तप्रिय पण माणुसकीची ऊब जपणारे शिक्षक अशी त्यांची ओळख असून विद्यार्थ्यांच्या अडचणी असोत वा सहकाऱ्यांचे प्रश्न, ते नेहमी शांतपणे ऐकून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. डी. व्ही. पाटील सरांचे एक विशेष आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे वास्तुशास्त्राविषयी त्यांचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न अभ्यास होय. दीर्घकाळाच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष कामातून त्यांनी या विषयात प्राविण्य मिळवले असून त्यामुळे त्यांना केवळ पाचोरा तालुका किंवा जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध भागांतून वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येते. निवासी घरे, धार्मिक स्थळे, सामाजिक केंद्रे तसेच संस्थात्मक इमारती याबाबत त्यांचे मार्गदर्शन अनेकांना दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या वडिलांच्या कार्याचा खोल प्रभाव असून त्यांचे वडील व्ही. डी. पाटील साहेब यांनी पाचोरा नगरपालिकेत सब ओव्हरसीअर म्हणून काम करताना पाचोरा पाणीपुरवठा योजना, के. टी. वेअर प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारखी अनेक महत्त्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. सार्वजनिक कामांमधील प्रामाणिकपणा, गुणवत्तेची जाणीव आणि जबाबदारीची भावना हीच मूल्ये डी. व्ही. पाटील सरांनी आपल्या सेवेतही कायम जपली. डी. व्ही. पाटील सरांच्या या यशस्वी आणि स्थिर जीवनप्रवासामागे त्यांच्या सौभाग्यवती सौ. भावना यांचा मोलाचा, न बोलता दिसणारा पण सदैव जाणवणारा सहभाग आहे. देविदास चिंधु राजहंस यांची कन्या असलेल्या सौ. भावना यांच्याशी ४ मार्च १९९४ रोजी डी. व्ही. पाटील सरांचा विवाह झाला आणि त्या दिवसापासून सौ. भावना यांनी पाटील सरांच्या प्रत्येक सुख-दुःखात, चढ-उतारांत आणि जबाबदाऱ्यांच्या वाटचालीत पावलावर पाऊल ठेवत अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ दिली. कुटुंब, सेवा, समाज आणि अध्यात्म या सर्व स्तरांवर पाटील सरांची वाटचाल सुकर करण्यामध्ये सौ. भावना यांचे योगदान अतिशय मोलाचे आणि आधारस्तंभ ठरणारे आहे. विशेष बाब म्हणजे डी. व्ही. पाटील सर ज्या संस्थेत शिक्षण घेतले, त्याच संस्थेत त्यांनी आयुष्याची सेवा बजावली, ही एक दुर्मीळ आणि अभिमानास्पद बाब असताना त्यांच्या मातोश्री सुलभाआई यांचे वडील चिंधू सुपडू दलाल म्हणजेच सर्वांचे परिचित दलाल गुरुजी हे सुपडू भादु पाटील विद्यामंदिर या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक होते, अशी शैक्षणिक परंपरा लाभलेले हे कुटुंब असल्याने ज्ञान, संस्कार आणि शिक्षण यांचे बीज पिढ्यानपिढ्या रुजलेले दिसून येते. शासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून श्री स्वामी समर्थ पाचोरा केंद्राचे काम महाराजांच्या आशीर्वादाने योग्य नियोजनासह त्यांनी मार्गदर्शन करून पूर्णत्वास नेले, तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील केंद्र आणि शिंदाड व नगरदेवळा केंद्राची कामेही त्यांच्या देखरेखीखाली वास्तुशास्त्राच्या नियमानुसार यशस्वीरीत्या पार पडली असून इतर काही केंद्रांची कामेही आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. कौटुंबिक जीवनातही त्यांनी आदर्श निर्माण केला असून मोठा मुलगा कौस्तुभ हा B.E. Civil, M.E. (Structure) शिक्षण पूर्ण करून ‘अवध इंजिनिअर्स अँड डेव्हलपर’ ही स्वतंत्र फर्म यशस्वीपणे चालवत आहे तर दुसरा मुलगा वेंकटेश हा B.Tech. Agri. Engineer आणि MBA असून कृषी व व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. ३४ वर्षे ३ महिने इतक्या प्रदीर्घ सेवाकाळात डी. व्ही. पाटील सरांनी संस्थेच्या उभारणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपले सर्वस्व दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला मिळालेली खरी पावती आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे आयुष्य समाजाभिमुख आणि सक्रिय राहणार असून वास्तुशास्त्राविषयी मार्गदर्शन, आधुनिक पद्धतीने शेती, समाजकार्य आणि अध्यात्माकडे अधिक वळणे असे त्यांचे पुढील मानस आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे कार्य थांबणे नसून नव्या वाटचालीची सुरुवात आहे, हे त्यांच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होत असून त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी सेवेला मानाचा मुजरा करताना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व त्यांच्या परिवाराच्या वतीने डी. व्ही. पाटील सरांचे पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पाचोरा तालुक्यात विकास योजनांच्या नावाखाली निधी लुटीचा संशय : ग्रामपंचायतींमधील गैरप्रकारांचे गंभीर आरोप

0

Loading

पाचोरा – केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. मात्र पाचोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हाच उद्देश बाजूला सारत योजनांच्या निधीचा गैरवापर, कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्षात शून्य कामकाज अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने ग्रामीण विकासाच्या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १५ व्या वित्त आयोगापासून ते मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, आमदार–खासदार निधी आणि पंचायत समिती–जिल्हा परिषद योजनांपर्यंत जवळपास प्रत्येक प्रमुख योजनेत अनियमितता, निकृष्ट कामे आणि संशयास्पद देयके झाल्याचे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये कागदावर विकासाचे ढीग उभे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र गावातील नागरिकांना त्या कामांचा कोणताही लाभ मिळत नसल्याची परिस्थिती आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या गटार, पाईपलाईन, सांडपाणी व्यवस्थापन व पाणीपुरवठा कामांबाबत सर्वाधिक तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात ती अर्धवट ठेवण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून निधीची उघड उधळपट्टी करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. मोजमाप पुस्तकात (एमबी) प्रत्यक्ष मोजमापापेक्षा जास्त मोजमाप दाखवून बिले उचलली गेल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजनांतून निधी उचलल्याचे आरोप काही ग्रामपंचायतींवर होत आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत झालेल्या अंतर्गत रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटच्या कामांबाबतही आजही प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्यांची जाडी नियमानुसार न ठेवता कमी जाडीचे रस्ते तयार करणे, काही महिन्यांतच रस्त्यांना तडे जाणे, दिवे बसवले असल्याचे दाखवून प्रत्यक्षात ते अस्तित्वात नसणे, तसेच जुन्या कामांनाच नव्याने दाखवून निधी खर्च केल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मनरेगा योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू मजुरांना रोजगार देणे हा असला, तरी काही गावांमध्ये ही योजना केवळ कागदावरच राबवली जात असल्याचे चित्र आहे. बोगस जॉब कार्ड, खोट्या नावाने मजूर हजेरी, प्रत्यक्षात यंत्रसामग्री वापरूनही मजुरी बिल दाखवणे, तसेच मजुरांच्या खात्यात मजुरी न जमा होणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक कामांच्या ठिकाणी माहिती फलक नसणे, मस्टर रोल सार्वजनिक न ठेवणे यामुळे पारदर्शकतेचा पूर्णतः अभाव दिसून येतो. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकामासाठी दिलेल्या अनुदानाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी शौचालय अस्तित्वात नसतानाही अनुदान काढण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी अर्धवट बांधकाम करून पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याच्या तक्रारीही दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘हर घर नळ, हर घर जल’ या जलजीवन मिशनच्या घोषणेला पाचोरा तालुक्यात अनेक ठिकाणी फोलपणा आल्याचे दिसते. कागदोपत्री घरगुती नळजोडणी पूर्ण दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये पाणीच येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. निकृष्ट पाईपलाईन, सतत गळती, तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे गावकऱ्यांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल देण्याचा उद्देश असताना काही प्रकरणांमध्ये पात्र लाभार्थ्यांऐवजी नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींना लाभ दिल्याचे आरोप होत आहेत. घर पूर्ण न करता पूर्ण दाखवून हप्ते उचलणे, तसेच काही लाभार्थ्यांकडून अप्रत्यक्षपणे पैसे मागितल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या डिजिटलीकरणासाठी निधी देण्यात आला. मात्र काही ठिकाणी संगणक, प्रिंटर व इंटरनेट सुविधा कागदावर दाखवून प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचे आरोप आहेत. प्रशिक्षण खर्चही कागदोपत्री फुगवून दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार व खासदार निधीतून करण्यात आलेल्या कामांबाबतही पाचोरा तालुक्यात असंतोष व्यक्त केला जात आहे. फलकांवर मोठ्या अक्षरात नावे झळकावत कामे मात्र अपूर्ण ठेवणे, गुणवत्तेत तडजोड करणे, तसेच राजकीय दबावाखाली ठराविक ठेकेदारांनाच कामे देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद योजनांअंतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीच्या कामांमध्ये खर्च फुगवणे, साहित्य खरेदीत कमिशनखोरी, तसेच अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले उचलण्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. राज्य शासनाच्या विशेष योजनांतर्गत आपत्ती मदत, दलित वस्ती सुधारणा योजनेतही अपात्र लाभार्थ्यांना मदत देण्यात आल्याचे आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे आरोप होत आहेत. या सर्व योजनांमध्ये एक समान धागा आढळतो—अंदाजपत्रक फुगवणे, मोजमाप पुस्तकात फेरफार, निकृष्ट दर्जाचे साहित्य, दुहेरी निधी उचल, बोगस लाभार्थी आणि बिलाशिवाय खर्च. यामुळे शासनाच्या योजनांचा मूळ उद्देशच मोडीत निघत असून ग्रामीण जनतेचा प्रशासनावरील विश्वास दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचे गंभीर प्रकार पाचोरा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये घडत असल्याच्या अनेक तक्रारी व यांचे संपादक यांच्याकडे दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत. गावातील विकासकामे, निधी वापर, बिले, मोजमाप, लाभार्थी यादी याबाबत ठोस स्वरूपाच्या तक्रारी, संशय किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी योग्य ती कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ अथवा इतर पुराव्यासह थेट संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्क क्रमांक मो. 7385108510 असा देण्यात आला आहे. या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून सत्य समोर आणण्याची भूमिका माध्यमांकडून घेतली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. ग्रामीण विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित गैरप्रकारांचा साखळदंड थांबवायचा असेल, तर केवळ निधी मंजुरी पुरेशी नाही. प्रत्येक कामावर कठोर प्रशासकीय नियंत्रण, तांत्रिक तपासणी, सामाजिक लेखापरीक्षण आणि दोषींवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे. अन्यथा विकास योजनांचा निधी काही मोजक्यांच्या फायद्यासाठी वापरला जात राहील आणि सामान्य ग्रामस्थ विकासाच्या प्रतीक्षेतच राहतील, अशी तीव्र भावना पाचोरा तालुक्यात व्यक्त होत आहे.

पाचोरा नगरपरिषदेचा एआय व्हॉट्सॲप चॅटबॉट : लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाचा नवा टप्पा

0

Loading

पाचोरा – नगरपालिका निवडणुकीपूर्वीचा प्रशासनाचा प्रशासकीय कार्यकाळ हा केवळ दैनंदिन कारभारापुरता मर्यादित न राहता प्रगतिशील, लोकाभिमुख आणि भविष्यातील प्रशासनाची दिशा ठरवणारा ठरला. नगरपालिका निवडणुका समाप्त झाल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत समस्यांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा-सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यापर्यंतचा हा प्रवास पाचोरा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व, पाचोरा नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची प्रशासकीय पकड व तांत्रिक जाण, शिवसेना नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील यांची संघटनात्मक व लोकप्रतिनिधी म्हणूनची सक्रिय भूमिका आणि नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांचे लोकाभिमुख नेतृत्व ठळकपणे दिसून येते. पाचोरा नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत मुख्य अधिकारी, उपमुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्यावर भर देण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य, करव्यवस्था, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत विषयांवर सातत्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर झालेल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे एकतर्फी बहुमत प्राप्त झाले. सभागृहात शिवसेना शिंदे गटाची सत्ता असली तरी प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव असून प्रत्यक्षात संपूर्ण नगरपरिषदेत महायुतीचेच नेतृत्व असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या राजकीय स्थैर्याचा थेट लाभ शहराच्या विकासाला मिळाला. नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील आणि सर्व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात टप्प्याटप्प्याने विकासकामांना गती देण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छतेचे नियोजन, पथदिवे, पाणीपुरवठ्याचे नियोजन, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण अशा विविध कामांमध्ये सातत्य दिसून आले आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला. याच समन्वयाचे पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे पाचोरा नगरपरिषदेने उचललेला एआय आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा निर्णय होय. डिजिटल युगात नागरिकांच्या अपेक्षा ओळखून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा हा ठोस प्रयत्न आहे. नगरपरिषदेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधांची माहिती, अर्ज प्रक्रिया, कर भरणा व तक्रार निवारण याबाबतची माहिती आता नागरिकांना थेट त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या अत्याधुनिक एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील, भाजपा गटनेते सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियांका पाटील, मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या चॅटबॉटची संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम, ई-ऑफिसचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, तक्रार निवारण, नागरिकांचे जीवनमान सुलभ करणे आणि कार्यालयीन पारदर्शकता वाढवणे या सर्व मुद्द्यांची तांत्रिक सांगड या प्रकल्पात घालण्यात आली आहे. या चॅटबॉटमुळे पाणीपुरवठा खंडित होणे, कचरा उचल न होणे, रस्त्यावरील खड्डे, स्ट्रीटलाइट बंद असणे, करासंबंधी अडचणी अशा विविध तक्रारी थेट नोंदवता येणार असून त्यावर संबंधित विभागाकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पाठपुरावा होणार आहे, त्यामुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक ठोसपणे निश्चित होईल. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहराचा विकास केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीतही आधुनिकता येत आहे. त्यांनी प्रशासनाला केवळ निधीपुरवठा न करता ठोस दिशा दिली आहे. त्या दिशेला मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी प्रशासकीय शिस्त व तांत्रिक बळ दिले आहे, तर शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासन यांच्यातील सेतूची भूमिका समर्थपणे पार पाडली आहे. नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की 18002335259 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून एआय चॅटबॉटचा जास्तीत जास्त वापर करावा. एकूणच, पाचोरा नगरपरिषदेचा एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉट हा केवळ तांत्रिक उपक्रम नसून नेतृत्व, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील प्रभावी समन्वयातून साकारलेला लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाचा नवा अध्याय ठरला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!