Home Blog Page 29

आज दि.28/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात नियोजन करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबात संवाद साधताना संयम हवा.
शुभ अंक:
शुभ रंग: लाल

वृषभ
आज गुरु ग्रहाचे उदय तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती बळकट होईल आणि घरगुती कामाच्या आयुष्यात संतुलन निर्माण होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
गुरु ग्रह तुमच्यासाठी राजयोग निर्माण करत आहेकरिअरमध्ये प्रगती, सामाजिक संबंध आणि आर्थिक स्थैर्य यात सुधारणा होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा

कर्क
आज गुरु ग्रहामुळे मनःशांती लाभण्या बरोबर धार्मिक प्रवासाबाबत संधी देखील मिळतील. करिअरमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे .
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

सिंह
गुरुची कृपा तुमच्यात राजयोग निर्माण करेल, आर्थिक स्थिती सुधारेल, नेतृत्वगुण वाटतील आणि पारिवारिक सौहार्द वाढेल 
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज ग्रह गोचरामुळे सजग राहावे. कामात अचानक बदल किंवा थोडासा ताण अनुभवायला मिळेल. निर्णयात संयम ठेवा 
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा

तुला
आज गुरुमंगलचंद्र युतीमुळे राजयोग निर्माण होतो आहे. कामात प्रगती आणि आर्थिक लाभ मिळतील; प्रेमनीय संबंधात सुख राहील 
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज खर्च आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. शब्दनियंत्रण खर्चावर नियंत्रण ठेवा; निर्णय विचारपूर्वक घ्या 
शुभ अंक:
शुभ रंग: काळा

धनु
आज साधारण सुखद; जोडीनात्यांत सुधारणा होईल, तसेच शिक्षकता, प्रवासशिक्षणसंधी योग राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: नारिंगी

मकर
आज खर्च वक्री शनीच्या परिणामांनी नियंत्रित राहतील. तज्ञांचा सल्ला घेतल्यास व्यवसायात प्रगती होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

कुंभ
गुरु ग्रहाचा उदय अधिकारी प्रभावासाठी उत्तम योग देत आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक स्थैर्यता बनेल आणि प्रकल्पांमध्ये स्वीकृती मिळेल 
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

मीन
आज महालक्ष्मी राजयोगामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये उन्नती आत्मविश्वास मिळेल. जोडप्रेमातही सामंजस्य राहील 
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

नियम कागदावरच, व्यवहार पैशावर? पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील विवाह नोंदणी विभागाचा भोंगळ कारभार

0

Loading

पाचोरा – ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या विवाह नोंदणी विभागामध्ये सध्या अत्यंत भोंगळ व अनागोंदी स्वरूपाचा कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. शासनाने नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा मिळाव्यात या उद्देशाने विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी प्रत्यक्षात या विभागात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागातील संबंधित कर्मचारी यांच्या जाण्या-येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना कार्यालयात येऊनही तासन्‌तास वाट पाहावी लागते. अनेक वेळा कार्यालय उघडे असतानाही लाईट व पंखे सुरू ठेवलेले असतात; मात्र प्रत्यक्षात कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतो, अशी तक्रार वारंवार केली जात आहे. परिणामी, दूरवरून आलेल्या अर्जदारांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “कामानिमित्त बाहेर आहे” असे सांगून वेळ मारून नेली जाते, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, काही वेळा आर्थिक देवाण-घेवाण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतात, तर नियमाप्रमाणे अर्ज सादर करणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र आठवड्यांनंतरही दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, असा आरोपही होत आहे. हा प्रकार प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विवाह नोंदणीचा अर्ज दिल्यानंतर विवाह दाखला तयार होण्यासाठी नियमाने किती कालावधी लागतो, याची स्पष्ट माहिती कार्यालयात कुठेही दर्शविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच अनेक वेळा अपूर्ण अर्ज स्वीकारले जातात आणि नंतर कागदपत्रांच्या नावाखाली पुन्हा-पुन्हा नागरिकांना बोलावले जाते. एकाच वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती दर्शविणारा फलक कार्यालयात लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय, संबंधित कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी कोण आहेत, त्यांची नावे, हुद्दे व संपर्क क्रमांक यांची माहिती दर्शविणारा फलक असणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्या अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांना नेमके कोणाशी संपर्क साधावा, हेही समजत नाही. तसेच संबंधित कर्मचारी स्थानिक रहिवासी आहेत की अप-डाऊन करून ये-जा करतात, याचीही वरिष्ठ स्तरावरून सखोल परताळणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, विवाह नोंदणी विभागातील कारभार नियमबद्ध, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा पाचोरा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. अन्यथा शासनाच्या लोकाभिमुख सेवेची संकल्पना केवळ कागदावरच राहील, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

आज दि 27/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज स्वविकासाच्या संधी दिसतील; जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते, परंतु एखाद्या निर्णयात ताण येऊ शकतो.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
गुरुउदय आणि मालव्य राजयोगामुळे कामव्यवसायात आणि आर्थिक क्षेत्रात स्थैर्य आणि वाढ दिसेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
आज तुमची बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्य उपयोगी ठरेल. पण ग्रह गोचरामुळे मानसिक तणाव जाणवू शकतोसंयम ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
मालव्य राजयोगामुळे करिअर आणि प्रवासाच्या संधी मिळतील; नवीन कल्पना राबवण्यासाठी अनुकूल.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
राजयोगाचा परिणाम कुटुंब व्यवसायात दिसून येईल, पण आरोग्य संयम याचा विचार करा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज कार्यप्रकारात स्पर्धा आणि विरोध होऊ शकतो; निर्णयात सतर्कता आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
वर्तमान गोचरात संभाषण आणि आर्थिक बाबींमध्ये सतर्कता गरजेची आहे; घडामोडी नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

वृश्चिक
मालव्य राजयोग आणि शनि वक्री यांच्या परिणामी आर्थिक वाढ, पण खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा 

धनु
आज प्रवास, शिक्षण किंवा नवकल्पनांमध्ये फायदा मिळू शकतो; याचवेळी, खर्च नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी 

मकर
शनि वक्रीमुळे काही आव्हाने असली तरी, करिअर आर्थिक योजनांमध्ये बळकट निर्णय घेण्याची संधी राहील.
शुभ अंक: शुभ रंग: निळा 

कुंभ
मालव्य राजयोगामुळे सामाजिक प्रतिष्ठा करिअरमध्ये प्रगती होईल, पण मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा 

मीन
शनि वक्रीच्या परिणामामुळे आर्थिक स्थैर्य प्रगती दिसून येईल, पण खर्चावर लक्ष द्या.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.26/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आजच्या ग्रहस्थितीत तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल. आर्थिक प्रतिष्ठात्मक क्षेत्रात वाढ होऊ शकते. निर्णय घेताना थोडी सावधगिरी आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
भावनांच्या बाजूने थोडे अस्थिरता येऊ शकतात, त्यामुळे निर्णय मागे घेण्याचा विचार करा. कामात समर्पण नेहमी प्रमाणे फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

मिथुन
मानसिक ताण जाणवेल आणि कामातील जबाबदाऱ्या वाढतील. दिवसभर संयमाने वागल्यास काम सुगम होईल.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
आजचा दिवस सर्जनशील व्यावसायिक दोन्ही बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. प्रवास किंवा संभाषणातून फायदा होईल.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
तुमच्या नेतृत्वगुणांना बल मिळेल. कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आत्मविश्वासातून पावले टाका; आरोग्यावर ताण टाळा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
विरोधकांच्या दबावाखाली येऊ शकता; परंतु योग्य नियोजनाने तो मात करता येईल. खर्चात संयम ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही दिसणार आहेत. परंतु अनावश्यक खर्च टाळायला हवे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
शारीरिक आणि मानसिक उर्जा चांगली राहील. पण खर्चाविषयी जागरूक रहा. प्रवास किंवा शिक्षणाची संधी लाभदायक राहील.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
आज वक्री शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर निर्णयांची शक्यता देऊ शकतो. कारकिर्दीत सुधारणा तर होतच, पण संयम आवश्यक राहील.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
सभोवताली सामाजिक वातावरण सकारात्मक राहील. जुनी गुंतवणूक वा कामातून स्थिरता लाभेल.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
शासन आणि आर्थिक समतोल साधण्याचा योग दिसतोय. परंतु खर्च आणि भावनिक दोन्हीकडे नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात शेतकरी अनुदान घोटाळा कारवाई नंतरही रॅकेट सुरूच; 2025 मध्ये डॉक्टराचे पावणे दोन लाख चुकीच्या खात्यावर पैसेही काढले – पाणी नेमकं कुठे मुरतंय?

0

Loading

पाचोरा – तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर वळणावर येऊन ठेपला असून चुकीच्या बँक खात्यांत अनुदानाची रक्कम वर्ग होण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत, त्यामुळे संपूर्ण अनुदान वितरण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अशा चुकीच्या खात्यांवर कारवाई करून अनेक बँक खाती ब्लॉक करण्यात आली होती तसेच काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखलही झाले होते, तरीही नव्या वर्षात पुन्हा त्याच स्वरूपाचे प्रकार घडत असल्याने ही बाब केवळ तांत्रिक चूक म्हणून झटकून टाकता येणार नाही अशी ठाम भूमिका आता जनतेतून पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली असता शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यापासूनच शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन सातत्याने प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी करत असून २०१९ पासून त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत पाचोरा तहसील कार्यालयाकडे शेतकरी अनुदानाची संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शासनाचे स्पष्ट परिपत्रक, नियमांतील तरतुदी आणि माहिती अधिकार कायद्याची बंधनकारक अंमलबजावणी असतानाही ही यादी आजपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही, विशेष म्हणजे ही माहिती देण्यास तहसीलदारांकडून वारंवार नकार देण्यात आला असून ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर व संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संदीप महाजन यांचा आरोप आहे की शेतकरी अनुदान यादी जाणीवपूर्वक लपवली जात आहे कारण ती जाहीर झाल्यास अनेक गैरप्रकार, चुकीची खाती, अपात्र लाभार्थी आणि संभाव्य संगनमत उघडकीस येण्याची शक्यता आहे, माहिती अधिकार कायद्याचा उद्देशच प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे हा असताना त्याच कायद्याचे उल्लंघन करून माहिती न देणे हे प्रशासनाच्या हेतूंवर गंभीर संशय निर्माण करणारे आहे. या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे ज्या तहसील कार्यालयात हा संपूर्ण अनुदान घोटाळा घडला आहे त्याच कार्यालयातील तहसीलदारांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचीच तपासणी समिती नेमण्यात आली असून या प्रकरणात फिर्यादी देखील तेच तहसीलदार आहेत, त्यामुळे आपणच आरोपी, आपणच तपासकर्ता आणि आपणच फिर्यादी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा तपासातून सत्य बाहेर येईल का असा प्रश्न उपस्थित होत असून ही परिस्थिती नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना हरताळ फासणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान चुकीच्या खात्यांवर कारवाई होऊनही पुन्हा नव्याने इतर खात्यांमध्ये शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम वळवली जाणे आणि ती रक्कम निर्लज्जपणे काढून वापरली जाणे यामागे अजूनही एक मोठे, संघटित आणि सक्रिय रॅकेट कार्यरत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्या खात्यांवर पूर्वी संशय होता ती खाती ब्लॉक झाल्यानंतरही नव्या खात्यांद्वारे हा गैरव्यवहार सुरू राहणे हे प्रशासनातील गंभीर त्रुटी, दुर्लक्ष किंवा जाणूनबुजून केलेले संगनमत दर्शवते. या संदर्भात संदीप महाजन यांनी अत्यंत ठाम आणि रोखठोक भूमिका घेत स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की एखाद्या खातेदाराच्या खात्यात चुकून शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम वर्ग झाली असेल तर ती रक्कम वापरणे हा थेट गुन्हा आहे, संबंधित खातेदारांनी ती रक्कम तात्काळ न काढता प्रामाणिकपणे तहसील कार्यालयात जाऊन माझ्या खात्यावर चुकून रक्कम आली आहे अशी माहिती देणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या आवश्यक होते, मात्र तसे न करता काही खातेदारांनी ती रक्कम काढून स्वतःच्या उपयोगात आणल्याचे प्रकार समोर आले असून अशा व्यक्तींना कोणतीही गय देता कामा नये अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की यापूर्वी सव्वा लाख रुपयांच्या आसपासची रक्कम चुकीच्या खात्यांत वर्ग झाल्याचे प्रकरण समोर आले होते, आता मात्र जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रक्कम पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु. प्र.पा. परिसरातील एका वैद्यकीय व्यवसायीक तसेच प्रगतिशील शेतकरी यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने इतर व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे, ही रक्कम मोंढाळे येथील एका व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाली असून संबंधित डॉक्टरांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने आपल्या खात्यात रक्कम आल्याचे तसेच ती रक्कम काढून वापरल्याचे मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार केवळ चूक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही कारण याआधीही अशाच स्वरूपाचे प्रकार घडले होते आणि त्यावर कारवाईही करण्यात आली होती, असे असताना नव्या वर्षात पुन्हा अशाच पद्धतीने रक्कम वर्ग कशी झाली, ती काढण्यासाठी संबंधित खातेदारांना परवानगी कशी मिळाली, बँकिंग प्रणालीतील अलर्ट्स का वाजले नाहीत आणि तहसील व संबंधित विभागांनी याची दखल का घेतली नाही असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून त्यामुळेच अजूनही एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंका अधिक बळावत आहे. या पार्श्वभूमीवर जरी काही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेल्या असल्या तरी संपूर्ण पाचोरा तहसील अनुदान घोटाळा प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावरून होणे अत्यावश्यक असल्याचे मत संदीप महाजन यांनी व्यक्त केले असून केवळ खालच्या स्तरावरील कर्मचारी किंवा काही मोजक्याच खातेदारांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यात असे प्रकार पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाकडे राजकीय स्तरावरूनही अपेक्षित ती गंभीरता दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात असून सत्ताधारी असोत किंवा विरोधक, फक्त बोलायची भात आणि बोलायची कडी या उक्तीप्रमाणे स्टेजवर भाषणे, प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया आणि आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती किंवा ॲक्शन मोड दिसून येत नाही, याच निष्क्रियतेमुळे हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न असल्याने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल भाऊ शिंदे आणि वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून या प्रकरणाकडे उच्च स्तरावरून लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान या संपूर्ण घडामोडींमधून एक कटू वास्तव पुन्हा समोर आले आहे ते म्हणजे प्रामाणिक शेतकरी आजही असहाय्य आहे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तो सर्व नियम, कागदपत्रे आणि अटी पूर्ण करतो मात्र त्याच्याच नावावर मंजूर झालेली रक्कम इतर कुणाच्या खात्यात जाते आणि तोच शेतकरी तहसील, बँक आणि कार्यालयांच्या फेऱ्या मारत बसतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतःच अधिक जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात येणारी रक्कम, अनुदानाचे तपशील, संदेश आणि व्यवहार यांची नियमित तपासणी करावी, कुठलीही संशयास्पद बाब, रक्कम न मिळणे किंवा चुकीच्या व्यवहाराची शंका आल्यास तात्काळ तहसील कार्यालय, बँक आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवावी कारण जोपर्यंत शेतकरी स्वतः सावध होत नाही तोपर्यंत त्याच्या हक्काच्या पैशांचे संरक्षण करणारा कोणी वाली नाही हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकूणच चुकीच्या खात्यांत अनुदान वर्ग होणे आणि ती रक्कम वापरणे हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाशी, त्यांच्या कष्टाशी आणि त्यांच्या जगण्याशी केलेली फसवणूक आहे, त्यामुळे या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच चुकीने पैसे मिळूनही ते वापरणारे खातेदार यांना आरोपी करून कठोर कारवाई करणे आवश्यक असून भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी पारदर्शक, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा उभी करणे ही काळाची नितांत गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आज दि.25/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज मेहनती कामांना मान्यता प्राप्त होईल. आर्थिक प्रगतीचा साठा होईल, पण खर्चात सतर्कता गरजेची.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिरता दिसणार आहे. मात्र भावनिक निर्णय टाळा.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी

मिथुन
बुधादित्य योगामुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीस चालना मिळेल. पण मनात ताण येऊ शकतो, संयम ठेवा.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
सर्जनशीलतेच्या माध्यमातून नवे संधी मिळतील. प्रवास किंवा संवादातून फायदा होईल.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
नेतृत्वगुण स्पष्ट होणारे. राजयोगाचा प्रभाव कुटुंब कामात दिसून येईल, परंतु संयम आवश्यक.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
सेवा–कार्यस्थळी विरोध किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. नियोजन आणि संयम महत्वाचे.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबतीत काळजी घ्या, पण प्रेम–नातंयात समाधानप्रद क्षण मिळतील.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
राजयोगामुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
प्रवास, शिक्षण किंवा सार्वजनिक संवादात यश मिळू शकते; तथापि खर्चावर संयम ठेवा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
स्वतःतील आत्मपरीक्षणाच्या वेळेत करिअरशी संबंधित पुढील टप्प्याच्या निर्मितीत क्लिष्टता येऊ शकतात.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
सामाजिक प्रतिष्ठा वाढीसाठी अनुकूल काळ. ध्यान-धारणा तुमच्या मानसिक शांतीला मदत करतील.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
राजयोगामुळे आर्थिक आणि करिअरमध्ये चांगली उन्नती होईल. परंतु शून्य खर्च आणि भावना नियंत्रित ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात ‘हॉटेल साईप्रसाद चायनीज (Pure Veg)’ चा नवा अध्याय : विश्वासातून चवीकडे वाटचाल

0

Loading

पाचोरा – शहरातील चवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. गेली पाच वर्षे पाचोऱ्यातील नागरिकांच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आशीर्वादावर यशस्वीपणे कार्यरत असलेले “साईप्रसाद चाट – I Love पाणीपुरी” आता नव्या स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. या विश्वासाचाच पुढचा टप्पा म्हणून “हॉटेल साईप्रसाद चायनीज (Pure Veg)” या नावाने व्यवसायाचा नवा अध्याय सुरू होत असून, याचा उद्घाटन समारंभ लवकरच पाचोरा शहरात पार पडणार आहे. पाचोऱ्यात चाट आणि पाणीपुरीसाठी “साईप्रसाद” हे नाव गेल्या पाच वर्षांत एक विश्वासार्ह ओळख बनले असून सातत्यपूर्ण चव, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी जपलेले आपुलकीचे नाते यामुळे या व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. “तुमच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आशीर्वादावर चालत राहिले” हे शब्द केवळ घोषवाक्य न राहता ग्राहकांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहेत. याच विश्वासाच्या पायावर उभा राहत “आज त्या विश्वासाचं नवीन स्वरूपात रूपांतर होत आहे” या भावनेतून हॉटेल साईप्रसाद चायनीज (Pure Veg) ची सुरुवात करण्यात येत आहे. बदलत्या काळातील ग्राहकांची आवड, शाकाहारी चायनीज पदार्थांची वाढती मागणी आणि दर्जेदार जेवणाची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. “तोच मालक, तोच प्रामाणिकपणा, तोच दर्जा… फक्त चवीत नवीन अध्याय” ही भूमिका या नव्या उपक्रमामागे ठळकपणे दिसून येते. हॉटेल साईप्रसाद चायनीज (Pure Veg) हे संपूर्णपणे शाकाहारी असून येथे विविध चायनीज व व्हेज पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. स्वच्छता, दर्जेदार कच्चा माल, संतुलित मसाले आणि सातत्यपूर्ण चव यावर विशेष भर देण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांत ग्राहकांनी ज्या विश्वासाने “साईप्रसाद” ला स्वीकारले, तोच विश्वास या नव्या स्वरूपातही कायम ठेवण्याचा संकल्प व्यवस्थापनाने केला आहे. या नव्या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा नगर, एचपी पेट्रोल पंपासमोर, भडगाव रोड, पाचोरा येथे होणार आहे. या प्रसंगी शहरातील मान्यवर, हितचिंतक, ग्राहक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभाचे निमंत्रक विठ्ठल यशवंत दुंदले, शोभा विठ्ठल दुंदले, श्रीकृष्ण विठ्ठल दुंदले आणि मिनाक्षी श्रीकृष्ण दुंदले यांनी पाचोरा शहरातील नागरिकांना आपुलकीचे आमंत्रण दिले आहे. पाचोऱ्याच्या खाद्यसंस्कृतीत दर्जेदार, स्वच्छ आणि विश्वासार्ह शाकाहारी हॉटेल म्हणून हॉटेल साईप्रसाद चायनीज (Pure Veg) नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी या नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे निमंत्रण सह आवाहन करण्यात आले आहे

सोळा वर्षांची निस्वार्थ जलसेवा : सावखेडा काळभैरव यात्रेत ‘अक्वा’ पिण्याच्या पाण्याचा आधार

0

Loading

पाचोरा या तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका उपक्रमाने गेली सोळा वर्षे हजारो भाविकांची तहान भागवण्याचे पुण्यकार्य अखंड सुरू ठेवले आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने तसेच दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक मदतीने राबविण्यात येणारी जल सेवा – शुद्ध पिण्याचे पाणी (Aquwa) वाटपाची ही परंपरा आज पाचोरा तालुक्यातील विविध यात्रा आणि धार्मिक सोहळ्यांचा अविभाज्य भाग बनली आहे. सालाबादप्रमाणे पौष महिन्यात पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील काळभैरव मंदिराच्या भव्य-दिव्य परिसरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. जळगाव, धुळे, संभाजी नगर, बुलढाणा तसेच आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून लाखो भाविक भक्त श्रद्धेने या यात्रेसाठी दाखल होतात. काळभैरवाच्या दर्शनाने मनातील प्रश्न, चिंता व अडचणी दूर होतात अशी भाविकांची दृढ श्रद्धा असून दर्शनानंतर भाविक वरण-भात, बट्टी, वांग्याची भाजी आणि कबूल केलेल्या वजनाइतका गूळ मंदिरात चढवतात. हा गूळ नंतर प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटप केला जातो. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीने ओतप्रोत असलेल्या या यात्रेत मात्र पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस सोय नसल्याने दरवर्षी भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक मदतीतून सुरू असलेली पाणपोळी व जलसेवा यात्रेमध्ये आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त करून गेली आहे. संपूर्ण यात्रेच्या परिसरात शुद्ध, थंड आणि सहज उपलब्ध पिण्याचे पाणी देणारा हा एकमेव मंडप निस्वार्थ भावनेने उभारलेला दिसून येतो. कडाक्याच्या उन्हात, प्रचंड गर्दीत आणि सतत चालणाऱ्या दर्शन रांगेत ही जलसेवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. “पाणी हीच खरी सेवा” या भावनेतून उभारलेला हा उपक्रम कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आणि सातत्याने आपले कार्य करीत आहे. या मंडपात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसते. विशेषतः वयोवृद्ध भाविक, लहान मुले आणि महिला या जलसेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसतात. अनेक वृद्ध भक्त सेवा संघाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना मनापासून शुभाशीर्वाद देताना दिसून येतात. कुणी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो तर कुणी “देव तुमचं भलं करो” असे शब्द उच्चारतो आणि या शब्दांतूनच या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते. मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक हरी पाटील हे या संपूर्ण उपक्रमामागील प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक सहकार्यामुळे ही जलसेवा गेली सोळा वर्षे अखंड सुरू असून समाजकार्य केवळ भाषणातून नव्हे तर अशा प्रत्यक्ष कृतीतूनच प्रभावी ठरते हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या सेवेत भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिव सुनील परदेशी, ट्रस्ट सदस्य प्रकाश परदेशी, पदम परदेशी, प्रकाश पाटील, संजय सोनवणे, देवीलाल परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, पोलिस कर्मचारी शाम हटकर, व्यापारी नितीन चौधरी, माणिक पाटील, संतोष पाटील, उद्योजक समर्थ दीपक पाटील, राका जी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत हे कार्यकर्ते स्वतःहून पाणी वाटप करतात, गर्दीतून वाट काढून तहानलेल्या भाविकांपर्यंत पाणी पोहोचवतात आणि कुठेही गैरसोय होऊ देत नाहीत. ही जलसेवा केवळ एक धार्मिक किंवा औपचारिक उपक्रम न राहता समाजातील माणुसकीचे दर्शन घडवते. लाखो भाविकांच्या गर्दीत कुणीही ओळखीचा नसताना, कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरते. पाण्याच्या एका घोटातून मिळणारा दिलासा, थकलेल्या देहाला मिळणारी ऊर्जा आणि मनाला मिळणारे समाधान हे या उपक्रमाचे खरे यश असून सावखेडा काळभैरव यात्रेत उभारलेली ही जलसेवा आज संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

आज दि.24/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा दोन्ही शिखरावर राहतील. कामात पुढाकार घेऊन निर्णयात स्पष्टता मिळेल; परंतु अचानक आलेल्या संधीमध्ये खर्चिक परिणाम होऊ शकतो, ते विचारपूर्वक निवडा.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगाचा चांगला प्रभाव तुम्हाला दिसेल. आर्थिक स्थिरता आणि कुटुंबातील सौहार्द या दोन्ही दिशांनी दिवस फायद्याचा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
आज बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. परंतु कार्यभार आपल्या कल्पेक्षा जास्त असेलतणाव खुले. संयम पण आवश्यक आहे.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
करिअरमध्ये लोकांशी संवादातून प्रवासातून सकारात्मक लाभ दिसतोय. सर्जनशीलता वाढेल, पण आरोग्याची थोडी काळजी घ्या.
शुभ अंक: शुभ रंग: निळा 

सिंह
राजयोगामुळे नेतृत्वगुणांचा विकास होईल. पण शारीरिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वास्थ्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज निर्णय किंवा कामात विरोधात्मक अडचणी येऊ शकतात. विश्लेषणातून पुढे जा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा 

तुला
भावनिक स्थिरता लाभेल, नात्यांमध्ये सौहार्द राहील. पण व्यवहारात सावधगिरी बाळगाशत्रू किंवा विरोधकांचा धोका कमी नाही.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आज व्यवसायात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च थोड्या जास्त होतील, पण नफ्याने तो शमकतो.
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
प्रवास आणि नवकल्पनांमध्ये यश येऊ शकते. परंतु शनि वक्रीपेक्षा खर्चावर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
शनि वक्रीमुळे तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागू शकतील. परंतु दीर्घकालीन दृष्टीने आजचा दिवस फायद्याचा आहे.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
आज सामाजिक प्रतिष्ठा वाढीसारखी वाटतेय. जुने प्रकल्प गुंतवणूक फळदायी ठरू शकतात.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
शनि वक्री आणि महालक्ष्मी राजयोगामुळे आर्थिक लाभ करिअर प्रगती होईल. तरीही खर्च भावना नियंत्रित ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

सिकलसेल सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

0

Loading

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने ११ डिसेंबरपासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, या उपक्रमाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तसेच जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले असून, सिकलसेल व थॅलेसेमिया यांसारख्या रक्ताशी संबंधित आजारांनी बाधित रुग्णांना नियमित रक्तपुरवठा व्हावा, या सामाजिक हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच जिल्हा परिषद व इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले की, सिकलसेल, थॅलेसेमिया तसेच इतर रक्ताशी निगडित आजारांनी बाधित रुग्णांना आयुष्यभर नियमित रक्ताची गरज भासत असते. अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे या रुग्णांच्या उपचारात अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत रक्तसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे, असे आवाहनही डॉ. भायेकर यांनी यावेळी केले. विशेष म्हणजे स्वतः डॉ. सचिन भायेकर यांनीही रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि उपस्थितांना प्रेरणा दिली. या शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बाळासाहेब वाबळे, डॉ. सुपे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा उत्साह पाहता रक्तदानाबाबत जनजागृतीसाठी शासकीय यंत्रणा किती संवेदनशीलपणे काम करत आहे, हे अधोरेखित झाले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रक्तपेढीच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलन, तपासणी व सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करत रक्तपेढीच्या टीमने जबाबदारी पार पाडली. यासोबतच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीमनेही नियोजन, समन्वय व अंमलबजावणीमध्ये मोलाची भूमिका बजावली. आज पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, या रक्तामुळे सिकलसेल, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे तसेच त्यांच्या उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. सिकलसेल सप्ताहाच्या माध्यमातून केवळ आजाराविषयी जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून समाजोपयोगी संदेश देण्याचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श ठरला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!