Home Blog Page 31

आज दि.19/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
उभयचारी योगामुळे आज कार्यात मान्यता आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल, पण खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे आज करिअरमध्ये प्रगती दिसू शकते, तथापि भावनिक अस्थिरता संभवतेत्या काळात शांतता राखावी.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
मानसिक तणाव असेल, तरी बुधादित्य योगामुळे संवादात सहजता करिअरच्या संधी वाढतील.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा 

कर्क
आज सर्जनशीलता संवादाद्वारे करिअरमध्ये सकारात्मक हालचाल होऊ शकते; प्रवासही लाभदायक ठरु शकतो.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
उभयचारी योगामुळे आज नेतृत्वगुण स्पष्ट होतील, आर्थिक प्रतिष्ठेत लाभ; परंतु संयम ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज विरोधाचा सामना करावा लागू शकतो, मात्र निर्णय विचारपूर्वक घेतल्यास तो मात शक्य आहे.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे, परंतु नात्यांमध्ये संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज मालव्य राजयोगामुळे आर्थिक उन्नतीची शक्यता आहे, परंतु खर्च नियंत्रणात ठेवावे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा 

धनु
आज संयमाने काम प्रवासात प्रगती होईल; खर्च आणि मानसिक ताण नीट व्यवस्थापित करा.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी 

मकर
आत्मपरीक्षणाचा पूर्णयोग उपलब्ध असून, धैर्याने घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायदे देतील.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
आज करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे; जुन्या योजना परिणामकारक ठरतील.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा 

मीन
राजयोग शनि वक्री यांचे संयोग लाभदायक आहेत; आर्थिक तसेच भावनिक दोन्ही स्थैर्य राखायला हवे.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.18/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
नवीन संधीची चाहूल लागेल. आरोग्य चांगले राहील. मनात उत्साह राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: भगवा

वृषभ:
महत्त्वाची बैठक यशस्वी होईल. खर्चाचे नियोजन करा. नातेवाईक भेटतील.
शुभ अंक:
शुभ रंग: क्रीम

मिथुन:
कामात सतत सुधारणा होईल. एखादी शुभवार्ता येण्याची शक्यता.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

कर्क:
घरात एखादा प्रसंग साजरा होईल. जुने मित्र भेटतील. मनात समाधान राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट निळा

सिंह:
दिवस कार्यक्षमतेने जातो. सरकारी कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
जुने रेंगाळलेले व्यवहार पूर्ण होतील. मानसिक स्थैर्य लाभेल. संयम ठेवावा.
शुभ अंक:
शुभ रंग: राखाडी

तूळ:
व्यवसायात विस्ताराचा विचार पुढे सरकवू शकता. घरात थोडे वाद संभवतात.
शुभ अंक:
शुभ रंग: गडद हिरवा

वृश्चिक:
आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मनात स्थिरता राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक:
शुभ रंग: तपकिरी

धनु:
स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. थोडेसे एकटेपण जाणवेल. देवपूजा लाभदायक ठरेल.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट पिवळा

मकर:
जमिनीसंपत्तीचे व्यवहार पुढे जाऊ शकतात. वादविवाद टाळा. शांतता ठेवा.
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

कुंभ:
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वेळेचे योग्य नियोजन हवे.
शुभ अंक:
शुभ रंग: निळसर

मीन:
दिवस मध्यम आहे. निर्णय थोडा उशिराने घ्या. जुने अनुभव उपयोगी ठरतील.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.17/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज तुमचे विचार स्पष्ट राहतील. महत्वाची निर्णय क्षमता विकसित होईल.
कामात यश मिळेल. काही नवीन संधी येऊ शकतात.
शुभ अंक:
शुभ रंग: तांबडा

वृषभ:
घरगुती कामात व्यस्त राहाल. खर्च वाढण्याची शक्यता.
शांत राहा आणि वेळेचे योग्य नियोजन करा.
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा

मिथुन:
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. नवे मैत्र निर्माण होईल.
तोंडी कामात यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा

कर्क:
कुटुंबातील मतभेद दूर होतील. मनःशांती लाभेल.
जुने अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता.
शुभ अंक:
शुभ रंग: सफेद

सिंह:
आर्थिक बाजू सुधारेल. एखादा प्रलंबित व्यवहार मार्गी लागेल.
शारीरिक थकवा जाणवेल, काळजी घ्या.
शुभ अंक:
शुभ रंग: केशरी

कन्या:
दैनंदिन कामात अडथळे येतील. संयमाने काम घ्या.
एखादा मित्र मदतीला येईल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट गुलाबी

तूळ:
विद्यार्थ्यांना यशस्वी दिवस. नवीन संधींचा फायदा घ्या.
सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रवास टाळा.
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

वृश्चिक:
नवीन योजना यशस्वी होतील. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल.
मनातील भीती दूर करा.
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

धनु:
शुभ बातमी मिळेल. प्रवास घडू शकतो.
प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

मकर:
कौटुंबिक सुख वाढेल. एखादा निर्णय मनासारखा होईल.
स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्याकडेच येईल.
शुभ अंक:
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
कामातील मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचे कौतुक लाभेल.
सकारात्मक वातावरण असेल.
शुभ अंक:
शुभ रंग: राखाडी

मीन:
नवीन संपर्कातून लाभ होईल. घरात शुभकार्याची चर्चा होईल.
मन उत्साही राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शाळेच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे दोन चिमुकले बळी; भडगाव हादरले, शिक्षण व्यवस्थेवर गंभीर आरोप

0

Loading

पाचोरा – भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेली घटना ही केवळ दुर्घटना नसून ती सरळसरळ गुन्हेगारी निष्काळजीपणाची जिवंत उदाहरण आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली जाते, त्याच शाळेच्या बेफिकीर आणि बेजबाबदार कारभारामुळे दोन निष्पाप, निरागस चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला असून या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण भडगाव शहर हादरले आहे आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेणारे अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) ही दोन लहान मुले शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडली आणि बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळीज तुटेल; मात्र येथे प्रश्न असा आहे की ही परिस्थिती निर्माणच कशी झाली. शाळेच्या आवारात संरक्षण भिंतीला कोणताही अडोका, जाळी किंवा सुरक्षित कठडा नसणे म्हणजे शाळा व्यवस्थापनाने लहान मुलांच्या जीवाशी सरळसरळ खेळ केल्याचेच द्योतक आहे. इतक्या लहान वयाच्या मुलांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कोणी दिली, त्या वेळी वर्गशिक्षक, सहाय्यक शिक्षक, आया किंवा शिपाई नेमके कुठे होते, विद्यार्थ्यांवर सतत नजर ठेवणे ही शाळेची मूलभूत जबाबदारी नाही का, की केवळ फी वसूल करणे आणि जाहिराती करणे एवढेच काम या शाळेचे आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना अपघात म्हणून झटकून टाकण्याचा कोणताही प्रयत्न नागरिक सहन करणार नाहीत, कारण हा प्रकार पूर्वनियोजित निष्काळजीपणाचा परिणाम असून नर्सरी वयातील मुलांना क्षणभरही एकटे सोडू नये, हे साधे भानही शाळा व्यवस्थापनाला राहिले नसल्याचे यातून स्पष्ट होते. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बालकांचे पालक, नातेवाईक आणि नागरिकांनी शाळेवर धाव घेतली, शाळेच्या आवारात आक्रोश, रडारड आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले, आम्ही आमची मुले सुरक्षिततेच्या विश्वासावर शाळेत पाठवतो पण इथे तर शाळाच मृत्यूचा सापळा ठरली, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या असून अनेकांनी शाळा व्यवस्थापनावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने भडगाव शहरावर शोककळा पसरली असली तरी हा शोक आता संतापात बदलत असून दोन कुटुंबांवर कोसळलेले हे दुःख संपूर्ण समाजाचे अपयश असल्याची भावना व्यक्त होत आहे आणि खासगी इंग्लिश मीडियम शाळांच्या वाढत्या माजावर, मनमानी कारभारावर तसेच प्रशासनाच्या डोळेझाक धोरणावरही या घटनेने जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाळा सुरू करताना आवश्यक असलेले सुरक्षा निकष, संरक्षण भिंती, खेळाच्या मैदानांची सुरक्षितता, पुरेसे शिक्षक व कर्मचारी, लहान मुलांसाठी स्वतंत्र देखरेख व्यवस्था हे सर्व कागदावर दाखवून प्रत्यक्षात काहीच अंमलात आणले जात नाही, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केले असून शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने वेळेवर तपासणी केली असती तर दोन निष्पाप जीव वाचले नसते का, असा थेट सवाल नागरिक करत आहेत. या प्रकरणी केवळ चौकशीचे औपचारिक नाटक न करता संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि थेट जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करावा व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आज अंश आणि मयंक गेले, उद्या कुणाचे मूल, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात घोळत असून दोषींना शिक्षा होईपर्यंत आवाज उठवणे हीच या दोन निष्पाप चिमुकल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

आज दि.16/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज मन शांत सकारात्मक राहील. जुनी कामे पूर्णत्वाकडे जातील.
नवीन योजनांना सुरुवात करण्याचा दिवस.
शुभ अंक:
शुभ रंग: केशरी

वृषभ:
कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
नवीन लोकांच्या संपर्कात याल. आर्थिक बाबतीत काही निर्णय फायदेशीर ठरतील.
संधी ओळखून कृती करा.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

कर्क:
घरात वडिलधाऱ्यांची साथ लाभेल. मानसिक तणाव कमी होईल.
सामाजिक कामात पुढाकार घ्याल.
शुभ अंक:
शुभ रंग: राखाडी

सिंह:
प्रभावशाली व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता.
तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देईल.
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
आजचा दिवस शांततेने घालवा. अनावश्यक खर्च टाळा.
शुभचिंतकांचा आधार लाभेल.
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

तूळ:
व्यवसायिक निर्णय योग्य ठरतील. मित्रांचा सहकार्य लाभेल.
जुने मतभेद मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे.
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो, पण तुम्ही तो पार कराल.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम बाळगा.
शुभ अंक:
शुभ रंग: तपकिरी

धनु:
प्रवासाचे योग संभवतात. एखादी चांगली बातमी मिळेल.
मन प्रसन्न राहील, कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक:
शुभ रंग: केशरी

मकर:
महत्त्वाचे कागदपत्र हाताळताना सावध राहा.
थोडा वेळ स्वतःसाठी काढा. जुने प्रश्न मिटतील.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

कुंभ:
कल्पकतेमुळे प्रशंसा मिळेल. आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता.
दिवस उत्साहवर्धक आहे.
शुभ अंक:
शुभ रंग: फिकट निळा

मीन:
नवीन संधीची सुरुवात होईल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील.
शुभ विचारांवर लक्ष केंद्रित ठेवा.
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नामुळे पाचोरा तहसिलमधील नैसर्गिक आपत्ती निधी अपहाराची स्पष्टता उघड; परद्या मागील सूत्रधार उघड होण्याची मागणी

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील तहसिल कार्यालयात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेल्या निधीच्या वितरणात कोट्यवधी रुपयांचा गंभीर अपहार झाल्याचे प्रकरण राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्पष्टपणे समोर आले असून, या प्रकरणाला सभागृहात ठोस स्वरूपात मांडून शासनाला कारवाईस भाग पाडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आ. एकनाथराव खडसे यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यातील शेतकरी आंदोलकांनी हा विषय सातत्याने उचलून धरलेला असतानाच, आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा गंभीर विषय विधिमंडळात उपस्थित करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली. आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात सविस्तर माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तहसिल कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती निधीच्या वाटपात अत्यंत गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार केला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बनावट लाभार्थी याद्या तयार करून शेतकरी नसलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. हा प्रकार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्या कालावधीत घडल्याचे निदर्शनास आले असून, प्रारंभी या गैरव्यवहाराची रक्कम रुपये १ कोटी २० लाख १३ हजार ५१७ इतकी असल्याचे समोर आले होते. मात्र, शेतकरी अनुदान घोटाळ्याचे आंदोलक संदीप महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच शासनस्तरावर करण्यात आलेल्या पुढील तपासणीत सन २०२३ व सन २०२४ या दोन वर्षांच्या शेतकरी अनुदान याद्यांची सखोल पडताळणी करण्यात आली असता, एकूण आर्थिक अपहाराची रक्कम तब्बल रुपये २ कोटी ०७ लाख ५० हजार ५९७ इतकी असल्याचे उघड झाले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाऊ नये, अशी ठाम भूमिका आंदोलक संदीप महाजन यांनी यावेळी मांडली आहे. या प्रकरणात शासनाने नेमकी कोणती चौकशी केली, दोषींविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली किंवा करण्यात येत आहे, तसेच खऱ्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा निधी प्रत्यक्षात कसा मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात केली. हा प्रकार केवळ आर्थिक गुन्हा नसून शेतकरी समाजाशी केलेला गंभीर विश्वासघात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पाचोरा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती निधी वितरणाच्या बनावट याद्यांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून, सुरुवातीला रुपये १,२०,१३,५१७/- इतक्या रकमेचा अपहार निदर्शनास आला होता. पुढील तपासणीत ही रक्कम वाढून रुपये २,०७,५०,५९७/- इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात तत्कालीन महसूल सहायक, तहसिल कार्यालय, पाचोरा यांनी शेतकरी नसलेल्या इसमांच्या बँक खात्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचे तसेच काही गावांचे मूळ पंचनामे गहाळ करून खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित महसूल सहायक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. ४२८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांचेमार्फत सुरू असून आतापर्यंत एकूण सात आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रशासनिक पातळीवरही तातडीची कारवाई करण्यात आली असून, संबंधित महसूल सहायक व ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच ज्या चुकीच्या इसमांच्या बँक खात्यांवर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली होती, त्यांना ती रक्कम शासनाच्या खात्यावर परत करण्याबाबत तहसिलदार, पाचोरा यांचेमार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलककर्ते संदीप महाजन यांनी या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आणली आहे. त्यांनी सांगितले की, या घोटाळ्यामागे अजूनही काही महत्त्वपूर्ण परद्या मागील खरे सूत्रधार तसेच या प्रकरणात सहभागी असलेले आरोपीचे जवळचे नातेवाईक, मित्र व त्यांचे सहकारी समोर येणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रकरणी दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे दुपारी बारा वाजेपासून आमरण उपोषणाचा पवित्रा जाहीर करण्यात आला होता. मात्र, वेळेपूर्वीच अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याने आंदोलनाची दिशा बदलली. आता पुढील न्यायासाठी आणि दोषींना शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत आ. एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सभागृहात प्रभावीपणे चर्चेत आणल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, महाजन यांनी पुढे स्पष्ट केले की, या प्रकरणाच्या तपासात काही युवकांचे तसेच निष्पाप व दोषी नसलेल्या व्यक्तींचे बँक खाते सील करण्यात आले आहे. अशा व्यक्तींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी न्यायालयाच्या आदेशाने त्यांची बँक खाती तातडीने पूर्ववत करून ग्राहकांच्या वापरासाठी खुली करण्यात यावीत, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे. एकूणच, पाचोरा तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निधीतील कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा भंडाफोड होऊन शासनाला कारवाईस भाग पाडण्यामागे शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन यांच्या लढ्याबरोबरच आ. एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नाची निर्णायक भूमिका ठरली असून, आता या प्रकरणातील परद्या मागील खरे आरोपी समोर येऊन शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

आज दि.15/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नफा होईल. नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.
शुभ अंकशुभ रंगलाल

वृषभघरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य वाढेल. मित्रांचा उपयोगी सल्ला मिळेल.
शुभ अंकशुभ रंगहिरवा

मिथुनआज बोलण्यात संयम ठेवा. प्रवास टाळावा. कामकाजात थोडा विलंब होऊ शकतो.
शुभ अंकशुभ रंगपिवळा

कर्कनोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जुन्या समस्या मिटतील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.
शुभ अंकशुभ रंगपांढरा

सिंहतुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. महत्वाचे निर्णय घ्याल.
शुभ अंकशुभ रंगकेशरी

कन्याआज संयम आवश्यक आहे. व्यवहारात काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंकशुभ रंगनिळा

तुळनवीन ओळखी लाभदायी ठरतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंकशुभ रंगगुलाबी

वृश्चिकआर्थिक बाबतीत फायदेशीर दिवस. शत्रूंचा पराभव होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा.
शुभ अंकशुभ रंगकाळा

धनुधार्मिक सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. नवे अनुभव समृद्ध करतील. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंकशुभ रंगसोनेरी

मकरजुने अडथळे दूर होतील. व्यवसायात प्रगती होईल. घरगुती सौख्य मिळेल.
शुभ अंकशुभ रंगतपकिरी

कुंभमित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरीत महत्त्वाचे निर्णय घेण्यास वेळ योग्य आहे. लाभाची शक्यता.
शुभ अंकशुभ रंगआकाशी

मीनमानसिक तणाव दूर होईल. कुटुंबाचा आधार लाभेल. आरोग्य सुधारेल आणि नवा आत्मविश्वास येईल.
शुभ अंकशुभ रंगजांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पोलीस अधिकारी सत्तेच्या स्नेहभोजनात, पत्रकार उपेक्षेच्या कडेला; पाचोऱ्यात पत्रकारितेचे आत्मचिंतन आवश्यक

0

Loading

पाचोरा – जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गणेशोत्सव मंडळांचे बक्षीस वितरण समारंभ पाचोरा शहरात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन औपचारिकतेने, शिस्तबद्धतेने आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सार्वजनिक उत्सवांमध्ये शिस्त, सामाजिक भान आणि प्रशासनाचा सहभाग दाखविण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे महत्त्व निर्विवाद आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्या नंतर बातमी मध्ये नांव टाकू नका किंवा बदल करा असे प्रकार घडत होते आता तर थेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची बातमीच लपवली जाते ती का? आणि कोणासाठी व कोणाच्या हितासाठी हा संशोधनाचा विषय आहे मात्र सध्याची  गंभीर बाब म्हणजे बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानंतर जे दृश्य समोर आले, त्याने पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारितेच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बक्षीस वितरण संपल्यानंतर उपस्थित मंडळांचे पदाधिकारी आणि अवघे मोजके सहा ते सात पत्रकार इतकीच संख्या असताना, पत्रकारांना स्पष्ट शब्दांत “आता जाण्यास हरकत नाही” असे सांगण्यात आले.( तरी सुद्धा काही बाईटच्या लालचेने तिथेच घुटमळत होते त्यांना सुद्धा जेवा म्हटले नाही हा भाग वेगळा) परंतु हे शब्द केवळ औपचारिक नव्हते, तर पत्रकारांच्या भूमिकेची, कष्टांची आणि लोकशाहीतील त्यांच्या स्थानाची अवहेलना करणारे होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांना निरोप देण्यात आला, मात्र त्याच ठिकाणी उपस्थित पोलीस पाटील आणि (महिला पोलीस पाटील यांचे पती ) यांच्यासाठी स्नेहभोजनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समोर आले. हा भेदभाव केवळ भोजनापुरता मर्यादित नव्हता, तर तो मानसिकतेचा, प्राधान्यक्रमांचा आणि सत्ताकेंद्रित संस्कृतीचा आरसा दाखवणारा होता. सार्वजनिक कार्यक्रमात बातमीदार म्हणून उपस्थित असलेले पत्रकार हे केवळ पाहुणे नसतात, तर त्या कार्यक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणारे महत्त्वाचे दुवे असतात, तरीही त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली ही बाब चिंताजनक आहे. या घटनेमुळे एक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो, तो म्हणजे प्रशासन आणि काही अधिकारी आर्थिकदृष्ट्या गब्बर होत असताना काही पत्रकार मात्र लाचारी वृत्तीने किंवा परिस्थितीपुढे झुकत तर नाहीत ना? पत्रकारांच्या जिवावर बातम्या उभ्या राहतात, प्रशासनाची प्रतिमा उजळते किंवा मलीन होते, पण त्याच पत्रकारांना सन्मानाची वागणूक देण्याची वेळ आली की दुर्लक्ष केले जाते. शुद्ध शाकाहारी स्नेहभोजन ही केवळ पोटभर जेवणाची बाब नसून तो सन्मानाचा, समावेशकतेचा आणि परस्पर आदराचा प्रतीकात्मक संकेत असतो. त्या स्नेहभोजनातून पत्रकारांना वगळले जाणे म्हणजे अप्रत्यक्षपणे “तुमची गरज एवढ्यापुरतीच” असा संदेश देण्यासारखे आहे. पाचोरा तालुक्यातील पत्रकारांसाठी ही घटना आत्मचिंतनाची वेळ आहे. पत्रकारांनी आपली एकजूट, आपला आत्मसन्मान आणि आपली व्यावसायिक प्रतिष्ठा यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. अवैध धंद्याशी निगडीत सोडून स्वाभिमानी पत्रकार स्वतःच जर अशा उपेक्षेला गप्प बसून स्वीकारत असतील, तर भविष्यात प्रशासनाकडून अधिक आदर अपेक्षित ठेवणे अवघड ठरेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा पाया स्वाभिमानावर उभा असतो. तो स्वाभिमान सवलतींनी, निमंत्रणांनी किंवा स्नेहभोजनांनी विकत घेण्याचा विषय नाही, पण किमान सन्मानाची वागणूक मिळणे ही अपेक्षा गैर नाही. या घटनेत पोलीस पाटील आणि महिला पोलीस पाटील यांच्या पती यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित होणे आणि पत्रकारांना दूर ठेवणे, यामागील मानसिकता अधिक गंभीर आहे. शासनाच्या मानधन तत्वावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य आणि माहिती देणाऱ्या पत्रकारांना दुय्यम स्थान, हा विरोधाभास समाजाला काय संदेश देतो? प्रशासन आणि माध्यमे यांचे नाते परस्परावलंबी आहे. एकमेकांचा सन्मान राखूनच हे नाते मजबूत राहू शकते, मात्र अशा घटनांमुळे प्रशासनाची संवेदनशीलता आणि पत्रकारांची एकजूट दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील पत्रकार संघटनांनी आणि स्वतंत्र पत्रकारांनी एकत्र येऊन स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. कोणत्याही कार्यक्रमात पत्रकारांना मानहानीकारक वागणूक दिली गेल्यास ती सामूहिकपणे निषेध म्हणुन नोंदवली गेली पाहिजे. पत्रकारांची उपस्थिती केवळ फोटो काढण्यासाठी किंवा बातमी छापण्यासाठी नसून लोकशाहीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आहे, हे प्रशासनानेही समजून घेतले पाहिजे. शेवटी “स्नेहभोजनाची लायकी सुद्धा गमावली” ही भावना केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता ती पत्रकारितेच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात ठरावी, हीच अपेक्षा असून स्वाभिमान जपणारी, निर्भीड आणि एकसंध पत्रकारिता हीच अशा उपेक्षेला योग्य उत्तर देऊ शकते, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

सॅल्युट स्वाभिमानी तरुण भारतच्या पत्रकारीतेला

पाचोरा तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला व्यासपीठ

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त वैज्ञानिक क्षमतेला चालना देणाऱ्या व नव्या संशोधनवृत्तीला दिशा देणाऱ्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग, पंचायत समिती पाचोरा व वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गाळण बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमामुळे पाचोरा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील नाविन्यपूर्ण कल्पना, प्रयोगशील दृष्टिकोन व सर्जनशीलता सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास मा.श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दादासो. श्री. बाबुलाल हरी राठोड, आमदार पाचोरा व भडगांव विधानसभा मतदारसंघ तसेच अध्यक्ष, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, गाळण बु. हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या शैक्षणिक उपक्रमाला राजकीय व सामाजिक स्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर अधिकारी व तज्ज्ञ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मा. डॉ. श्री. चंद्रकांत साळुंखे, मा. श्रीमती. कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) जि.प. जळगांव, मा.श्री. डॉ. अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगांव, मा. श्रीमती. प्रतिभा सानप, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. जळगांव, मा. श्रीमती. स्वाती हवेले, मा. श्री. सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. जळगांव, मा. श्री. नरेंद्र एफ. चौधरी, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. जळगांव, मा. श्री. एजाज शेख, मा. श्री. विजय सरोदे, मा. श्री. फिरोज पठाण तसेच मा. श्रीमती. रागिणी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. जळगांव यांचा समावेश आहे. या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील आधुनिक घडामोडी, संशोधनाची दिशा व करिअर संधी याबाबत प्रेरणा मिळणार आहे. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, प्रकल्प व संकल्पना मांडण्यात येणार आहेत. पर्यावरण, आरोग्य, ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान, गणितीय संकल्पना, समाजोपयोगी विज्ञान अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्प या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व प्रयोगशीलतेला योग्य व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीचा विकास करणे हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येणार असून, उत्कृष्ट प्रकल्पांना बक्षिस वितरण समारंभात गौरविण्यात येणार आहे. बक्षिस वितरण समारंभ दि. 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात मा. श्री. सुधाकर एस. मुंढे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाचोरा, मा. श्री. उमेश पाटणकर, सह गटविकास अधिकारी, पं.स. पाचोरा, मा. श्री. भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, तसेच मा. श्री. विजय एस. बनसोडे, तहसिलदार, तहसिल कार्यालय पाचोरा यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी दि. 16/12/2025 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 या वेळेत साहित्य मांडणी करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय समाधान एस. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. पाचोरा, श्रीमती. अल्पा मनसुकलाल सायाणी, सह सचिव, पाचोरा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, श्रीमती. सरोज आर. गायकवाड, अधीक्षक, शा.पो.आ. पं.स. पाचोरा, विजय एस. पवार, गटशिक्षणाधिकारी, पं.स. पाचोरा, रविंद्र यु. चौधरी तसेच रमेश नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, तालुका विज्ञान प्रदर्शन समिती, सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा, खाजगी व स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे शिक्षकवृंद तसेच वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गाळण बु. येथील संपूर्ण कर्मचारीवृंद सहकार्य करीत आहेत. हे भव्य विज्ञान प्रदर्शन वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गाळण बु., ता. पाचोरा येथे आयोजित करण्यात आले असून, पाचोरा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जडणघडणीसाठी, नव्या पिढीतील संशोधक घडविण्यासाठी व विज्ञानविषयक जागृती वाढविण्यासाठी हे प्रदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

गुर्जर महोत्सव सूरजकुंड में महाराष्ट्र के पाचोरा से शीतल पाटील सहित तीन राज्यों के चित्रकारों को मिलेगा ‘गुर्जर कला रत्न सम्मान 2025’

0

Loading

पाचोरा – फरीदाबाद के ऐतिहासिक सूरजकुंड मेला ग्राउंड में गुर्जर समाज की कला, संस्कृति और परंपराओं को समर्पित भव्य गुर्जर महोत्सव का आयोजन आगामी 12, 13 एवं 14 दिसंबर 2025 को किया जा रहा है। गुर्जर आर्ट एंड कल्चर ट्रस्ट द्वारा आयोजित इस महोत्सव के अंतर्गत इस वर्ष समाज के तीन उत्कृष्ट चित्रकारों को ‘गुर्जर कला रत्न सम्मान 2025’ से सम्मानित किया जाएगा। इनमें विशेष रूप से महाराष्ट्र के पाचोरा से शीतल निशिकांत पाटील, राजस्थान से महेश गुर्जर तथा जम्मू एवं कश्मीर के पहलगांव से मुनीर अली खान गुर्जर का चयन किया गया है। ट्रस्ट के अध्यक्ष दिवाकर बिधूड़ी एवं कला प्रदर्शनी प्रमुख राजेश कुमार डेढ़ा ने संयुक्त रूप से यह जानकारी दी। उन्होंने बताया कि गुर्जर महोत्सव समाज की सांस्कृतिक पहचान को सशक्त करने, कला प्रतिभाओं को प्रोत्साहन देने और नई पीढ़ी को अपनी परंपराओं से जोड़ने के उद्देश्य से प्रतिवर्ष आयोजित किया जाता है।
गुर्जर महोत्सव में हर वर्ष देश के विभिन्न राज्यों से चित्रकार, रंगोली कलाकार, शिल्पकार और लोक कलाकार अपनी-अपनी कलाकृतियों के साथ भाग लेते हैं। इनमें से कई कलाकार ऐसे हैं, जिन्होंने न केवल देशभर में बल्कि विदेशों में भी अपनी कला का प्रदर्शन कर राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय स्तर पर सम्मान प्राप्त किया है। इस वर्ष के महोत्सव में हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, जम्मू एवं कश्मीर, गुजरात, उत्तराखंड सहित अनेक राज्यों से कलाकार भाग ले रहे हैं। कला प्रदर्शनी के माध्यम से समाज की समृद्ध सांस्कृतिक विरासत, लोकजीवन, प्रकृति, सामाजिक संवेदनाएं और समसामयिक विषयों को प्रभावी ढंग से प्रस्तुत किया जाएगा।
गुर्जर कला रत्न सम्मान 2025 के लिए चयनित कलाकारों में राजस्थान से महेश गुर्जर एक बहुआयामी कलाकार के रूप में पहचाने जाते हैं। वे चित्रकार होने के साथ-साथ शिक्षक भी हैं तथा नृत्य कला में भी निपुण माने जाते हैं। उनकी कलाकृतियों में भारतीय लोकसंस्कृति, सामाजिक यथार्थ और मानवीय भावनाओं का गहरा प्रतिबिंब देखने को मिलता है। उनकी कला ने विभिन्न प्रदर्शनियों में दर्शकों और कला समीक्षकों का ध्यान आकर्षित किया है।
महाराष्ट्र के पाचोरा से चयनित शीतल निशिकांत पाटील इस वर्ष की विशेष पहचान हैं। वे एक प्रख्यात रंगोली कलाकार हैं, जिनकी कला में रंगों का संतुलन, परंपरा और आधुनिकता का सुंदर संगम देखने को मिलता है। महिलाओं की कला प्रतिभा को सम्मान और मंच देने के उद्देश्य से ट्रस्ट द्वारा विशेष रूप से एक महिला कलाकार का चयन किया गया है। शीतल पाटील की रंगोलियों में भारतीय संस्कृति, सामाजिक विषयों और सौंदर्यबोध का प्रभावी चित्रण होता है, जिसने उन्हें राज्य स्तर पर विशिष्ट पहचान दिलाई है।
जम्मू एवं कश्मीर के पहलगांव से चयनित मुनीर अली खान गुर्जर ऑयल पेंटिंग और पोर्ट्रेट आर्ट में दक्ष कलाकार हैं। उनकी कलाकृतियों में कश्मीर की प्राकृतिक सुंदरता, मानवीय संवेदनाएं और सामाजिक यथार्थ सजीव रूप में उभरकर सामने आते हैं। उन्होंने देश-विदेश की कई कला प्रदर्शनियों में भाग लेकर अपनी विशिष्ट शैली से कला प्रेमियों को प्रभावित किया है।
ट्रस्ट के अनुसार इन कलाकारों का चयन वरिष्ठता, कला के क्षेत्र में योगदान तथा राज्य प्रतिनिधित्व के आधार पर किया गया है। गुर्जर आर्ट एंड कल्चर ट्रस्ट समाज की उन्नति, विकास और सहयोग की भावना को मजबूत करने के उद्देश्य से निरंतर ऐसे आयोजन करता आ रहा है। ट्रस्ट का मानना है कि कला केवल मनोरंजन का माध्यम नहीं, बल्कि सामाजिक चेतना, सांस्कृतिक अस्मिता और भावनात्मक अभिव्यक्ति का सशक्त साधन है।
गुर्जर महोत्सव के दौरान आयोजित कला प्रदर्शनी कलाकारों को अपनी प्रतिभा प्रस्तुत करने का व्यापक मंच प्रदान करेगी, वहीं विद्यार्थियों और युवाओं को कला के प्रति प्रेरित करने का भी महत्वपूर्ण कार्य करेगी। इस महोत्सव में समाज के गणमान्य नागरिकों, कला प्रेमियों, विद्यार्थियों और देश-विदेश से आने वाले पर्यटकों की बड़ी संख्या में उपस्थिति रहने की संभावना है।
कुल मिलाकर सूरजकुंड में आयोजित होने वाला गुर्जर महोत्सव 2025 केवल एक सांस्कृतिक आयोजन न होकर कला, परंपरा और सामाजिक एकता का सशक्त प्रतीक बनेगा। महाराष्ट्र के पाचोरा से शीतल निशिकांत पाटील सहित तीन राज्यों के कलाकारों को दिया जाने वाला ‘गुर्जर कला रत्न सम्मान 2025’ समाज के लिए प्रेरणास्रोत सिद्ध होगा और आने वाली पीढ़ियों को अपनी कला व सांस्कृतिक जड़ों से जुड़े रहने की प्रेरणा देगा।

ताज्या बातम्या

error: Content is protected !!