Home Blog Page 32

आज दि.14/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषतुमची ऊर्जा वाढेल. कामकाजात वेग येईल. मित्र सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.
शुभ अंकशुभ रंगलाल

वृषभआर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबात सौहार्द राहील. महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होईल.
शुभ अंकशुभ रंगहिरवा

मिथुननवे संपर्क जुळतील. प्रवास लाभदायी ठरेल. शिक्षण करिअर क्षेत्रात प्रगतीची संधी.
शुभ अंकशुभ रंगपिवळा

कर्कनोकरीव्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. घरातील जबाबदाऱ्या पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंकशुभ रंगपांढरा

सिंहसामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नव्या योजनांना यश मिळेल. कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संवाद होतील.
शुभ अंकशुभ रंगसोनेरी

कन्याकाहीसा ताण जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये संयम आवश्यक आहे. आरोग्य जपून घ्या.
शुभ अंकशुभ रंगनिळा

तुळआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. भागीदारीत काम करण्यास दिवस अनुकूल आहे. आनंददायी वार्ता मिळेल.
शुभ अंकशुभ रंगगुलाबी

वृश्चिकस्पर्धेत यश मिळेल. तुमची योजना फायदेशीर ठरेल. घरगुती वातावरण उत्साही राहील.
शुभ अंकशुभ रंगकाळा

धनुआजचा दिवस धाडस करून नवे प्रयोग करण्याचा आहे. प्रवास शक्यतो टाळावा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
शुभ अंकशुभ रंगकेशरी

मकरअडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक फायदा संभवतो. जिद्दीने पुढे गेल्यास यश निश्चित.
शुभ अंकशुभ रंगराखाडी

कुंभनोकरीत चांगली संधी मिळेल. मित्रपरिवारातून मदत होईल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
शुभ अंकशुभ रंगआकाशी

मीनसर्जनशीलतेला वाव मिळेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
शुभ अंकशुभ रंगजांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोराच्या मध्यवर्ती भागात ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स’चा भव्य शुभारंभ

0

Loading

पाचोरा – शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेत एक महत्त्वाची भर घालणाऱ्या ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स’ या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ श्री गणेशांच्या कृपेने आणि मंगल वातावरणात होणार आहे. मागील दहा वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व प्रामाणिक सेवा देत विश्वासार्हतेचा पाया मजबूत करणाऱ्या कासार कुटुंबाने आता पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात ही नवी शाखा सुरू करून आरोग्यसेवेला अधिक व्यापक रूप देण्याचा संकल्प केला आहे. “शाखा जरी नवीन, विश्वास मात्र तोच” या ब्रीदवाक्यानुसार ग्राहकांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल असल्याचे संचालकांनी स्पष्ट केले आहे. दि. १४ डिसेंबर २०२५, रविवार रोजी या नव्या शाखेचा औपचारिक शुभारंभ सोहळा संपन्न होणार असून सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायंकाळी अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक, ग्राहक, हितचिंतक आणि शुभेच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जनऔषधी संकल्पनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याचे ध्येय ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल’ने अंगीकारले असून वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता किफायतशीर औषधे उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे संचालकांचे मत आहे. याच उद्देशाने पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात ही शाखा सुरू करण्यात येत असून याचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही होणार आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या ‘जनऔषधी मेडीकल’ आणि ‘कासार सर्जिकल हाऊस’ या संस्थांच्या माध्यमातून कासार कुटुंबाने वैद्यकीय क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देत नागरिकांचा उदंड प्रतिसाद व प्रेम मिळवले आहे. रुग्णहिताला प्राधान्य, योग्य मार्गदर्शन, दर्जेदार औषधे आणि पारदर्शक व्यवहार या मूल्यांमुळे या संस्थांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच विश्वासाच्या बळावर आता ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स’ ही नवी शाखा सुरू होत असून भविष्यात आरोग्यसेवेत अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या उपक्रमामागे श्री. विनीत कृष्णराव द. कासार, श्री. विशाल कृ. कासार, श्री. यज्ञेश कृ. कासार तसेच चि. समर्थ वराडे यांचे मार्गदर्शन व सक्रिय सहभाग लाभला असून “YOUR TRUST, OUR ACHIEVEMENT” या संकल्पनेनुसार ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नवीन शाखा संकट मोचक हनुमान मंदिर शेजारी, श्रीराम मंदिर चौफुली, जामनेर रोड (मेन रोड), पाचोरा येथे सुरू होत असून नागरिकांना सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ही शाखा उपलब्ध होणार आहे. जनऔषधी औषधांसह मेडिकल, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट तसेच जनरल स्टोअरच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी सोय होणार आहे. या शुभप्रसंगी पाचोरा शहरातील सर्व नागरिकांनी, ग्राहकांनी व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून या नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन कासार कुटुंबाच्या वतीने करण्यात आले असून ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स’चा हा शुभारंभ पाचोरा शहराच्या आरोग्य क्षेत्रात एक सकारात्मक व महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव बक्षीस समारंभात बैठक व्यवस्थेवरून वाद; पत्रकार व पोलीस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

0

Loading

पाचोरा – येथील पोलीस स्टेशन परिसरात आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक सहभाग असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडून शिस्तबद्ध आयोजन, योग्य प्रोटोकॉल आणि समन्वयाची अपेक्षा असतानाच बैठक व्यवस्थेतील त्रुटींमुळे पत्रकार व पोलीस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिणामी कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेला तडा जाण्याचा प्रकार घडला असून याची वस्तुनिष्ठ दखल घेणे आवश्यक असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. या समारंभासाठी पुरेशी जागा असलेला सभागृह अथवा योग्य हॉल उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आसनव्यवस्था, हालचालींची सोय आणि विविध घटकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः शासकीय प्रोटोकॉलनुसार प्रत्येक अधिकृत कार्यक्रमात स्वतंत्र पत्रकार कक्ष असणे अपेक्षित असते, जेणेकरून वार्तांकन करताना पत्रकारांना काम सुलभ होईल आणि कार्यक्रमाची माहिती अचूकपणे जनतेपर्यंत पोहोचेल. परंतु या कार्यक्रमात पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. याच कार्यक्रमासाठी पोलीस पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनातील मानधन तत्वावर काम करणारे घटक असून शासकीय नियम व प्रोटोकॉलनुसार ज्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांसारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असतात, त्या दिवशी वेळेवर नव्हे तर वेळेच्या आधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एका पोलीस पाटील यांचा उशिरा प्रवेश झाला. त्या वेळी फोटो व वार्तांकनासाठी उभा असलेला पत्रकार आपल्या खुर्चीवर बसण्याच्या तयारीत असतानाच त्या खुर्चीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. या प्रकाराला पत्रकारांनी विरोध दर्शवताच उशिरा आलेल्या पोलीस पाटील यांचा स्वाभिमान दुखावल्याचे दिसून आले आणि जेष्ठ व मान्यवर अधिकारी उपस्थित असतानाच पत्रकारांशी वादविवाद सुरू झाला. शासकीय नियमांच्या दृष्टीने पाहता, विशेषतः पोलीस पाटील महिला असल्यास अशा प्रकारच्या बैठकीत उशिरा येणे, कार्यक्रमादरम्यान थेट हस्तक्षेप करणे किंवा आसनव्यवस्थेबाबत वाद घालणे हे शासकीय प्रोटोकॉलनुसार योग्य व कायदेशीर मानले जात नाही, अशी माहिती जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या मंचावर आणि उपस्थित मान्यवरांसमोरच झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ अस्वस्थ वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेमुळे व्यवस्थापनातील उणिवा आणि शासकीय प्रोटोकॉलच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पत्रकार हे लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जातात. सार्वजनिक कार्यक्रमांचे वार्तांकन, माहितीचा प्रसार आणि प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांना सन्मानजनक व स्वतंत्र बैठक व्यवस्था देणे ही केवळ सोय नसून आवश्यक बाब आहे. दुसरीकडे, पोलीस पाटील हे ग्रामीण व शहरी प्रशासनातील महत्त्वाचे दुवे असून त्यांचाही मान राखला जाणे तितकेच आवश्यक आहे, मात्र त्यासाठी शासकीय नियम, वेळेची शिस्त आणि अधिकारमर्यादा पाळणे अपेक्षित असते. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये दोष नेमका कोणाचा आणि याला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित झाले. कार्यक्रमाचे ठिकाण, आसनव्यवस्था, स्वतंत्र कक्षांचे नियोजन आणि उपस्थित घटकांची वेळेची शिस्त याबाबत पूर्वनियोजन केले असते तर हा प्रसंग टाळता आला असता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केल्यास अशा वादांना आळा घालता येऊ शकतो, असे मतही मांडले गेले. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात अशा प्रकारचे प्रसंग टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून सार्वजनिक कार्यक्रम हे सन्मान, शिस्त आणि समन्वयाचे प्रतीक ठरावेत, अशी नागरिकांची भावना व्यक्त होत आहे.

आज दि.13/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नवे करार आणि संपर्क लाभदायी ठरतील. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंकशुभ रंगलाल

वृषभघरातील कामांमध्ये व्यस्त राहाल. आर्थिक बाबी सुरळीत होतील. व्यवहार जपून करा.
शुभ अंकशुभ रंगहिरवा

मिथुनआज प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यशाची चिन्हे. नवे मित्र जोडले जातील.
शुभ अंकशुभ रंगपिवळा

कर्कघरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. निर्णय घेताना घाई करू नका.
शुभ अंकशुभ रंगपांढरा

सिंहतुमच्या नेतृत्वगुणांना मान्यता मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या संधी येतील. मित्रांचा चांगला सहवास लाभेल.
शुभ अंकशुभ रंगसोनेरी

कन्याखर्च वाढण्याची शक्यता आहे. नियोजन करून कामे करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी आवश्यक.
शुभ अंकशुभ रंगनिळा

तुळमहत्वाचे काम यशस्वी होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सामाजिक मान वाढेल.
शुभ अंकशुभ रंगगुलाबी

वृश्चिकआर्थिक लाभाची शक्यता आहे. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
शुभ अंकशुभ रंगकाळा

धनुप्रवास आणि नवे उपक्रम यशस्वी ठरतील. मित्रांसोबत वेळ छान जाईल. उत्साह ऊर्जा वाढेल.
शुभ अंकशुभ रंगकेशरी

मकरकामकाजात वेग येईल. नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील. जुनी अडचण दूर होईल.
शुभ अंकशुभ रंगराखाडी

कुंभनव्या कल्पनांना वाव मिळेल. भागीदारीतील व्यवहार फायदेशीर ठरतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंकशुभ रंगआकाशी

मीनआजचा दिवस सर्जनशील कामासाठी उत्तम आहे. घरगुती सौख्य मिळेल. मानसिक प्रसन्नता राहील.
शुभ अंकशुभ रंगजांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.12/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषमेहनतीला यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबाचा आधार लाभेल.
शुभ अंकशुभ रंगलाल

वृषभआर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. घरात सौख्य लाभेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.
शुभ अंकशुभ रंगहिरवा

मिथुनशिक्षण नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रमैत्रिणी जोडले जातील. प्रवास यशस्वी ठरेल.
शुभ अंकशुभ रंगपिवळा

कर्ककौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंकशुभ रंगपांढरा

सिंहतुमच्या नेतृत्वगुणांना दाद मिळेल. सामाजिक कार्यात मान वाढेल. नवे उपक्रम यशस्वी ठरतील.
शुभ अंकशुभ रंगसोनेरी

कन्यानोकरीव्यवसायात व्यस्तता राहील. नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील.
शुभ अंकशुभ रंगनिळा

तुळमित्रपरिवाराशी संवाद वाढेल. आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. महत्वाचे निर्णय आज फायदेशीर ठरतील.
शुभ अंकशुभ रंगगुलाबी

वृश्चिकआर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुने प्रश्न सुटतील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंकशुभ रंगकाळा

धनुनवी संधी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण नोकरीत प्रगती होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
शुभ अंकशुभ रंगकेशरी

मकरआजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामातील अडथळे दूर होतील. मानसन्मान वाढेल.
शुभ अंकशुभ रंगराखाडी

कुंभतुमच्या विचारांना लोक मान्यता देतील. महत्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. घरगुती आनंद लाभेल.
शुभ अंकशुभ रंगआकाशी

मीनमानसिक स्थैर्य राहील. प्रवासाचा योग संभवतो. नवे करार व्यवहार फायदेशीर ठरतील.
शुभ अंकशुभ रंगजांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा हिंदू स्मशानभूमीची देखभाली अभावी दैनीय अवस्था;

0

Loading

पाचोरा – शहरातील हिंदू स्मशानभूमी ही धार्मिक, सामाजिक आणि मानवी संवेदनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जागा असून या ठिकाणाचे आधुनिकीकरण करून अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, हा विधायक आणि दूरदृष्टीपूर्ण हेतू कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ठेवला. त्यांच्या पुढाकाराने तब्बल चार कोटी रुपयांच्या जवळपास निधी उपलब्ध करून अत्याधुनिक, सर्वस्वयुक्त आणि आदर्श स्वरूपाची स्मशानभूमी उभारण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवून नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार किशोर पाटील यांच्या कार्याचा सकारात्मक आणि कौतुकास्पद भाग मानला जातो. परंतु या सर्व सुविधांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर असून स्वच्छता, विद्युत रोषणाई, पंखे, पाण्याचा पुरवठा, परिसरातील स्वच्छता, अंतर्गत मार्गांची दुरुस्ती अशा अत्यावश्यक बाबींबाबत अपेक्षित ती दक्षता घेतली जात नसल्याचे आज प्रकर्षाने लक्षात आले. आजच्या एका अंत्यविधीदरम्यान स्मशानभूमीत वीज नसणे, पंखे बंद असणे, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची अनुपलब्धता, लोक अक्षरशः जार आणुन आपले काम भागवत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव बघायला मिळाला यात तुटलेली बाके, उखडले पेवर ब्लॉक आणि कचऱ्याचे ढीग अशी दयनीय परिस्थिती नागरिकांना अनुभवास आली. अशा संवेदनशील क्षणी मृतात्म्यास अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना व उपस्थित नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांचे मत आहे की आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भविष्यातील गरज ओळखून मोठ्या निधीतून स्मशानभूमीचे आधुनिकीकरण केले, परंतु त्या सुविधांची योग्य ती देखभाल न झाल्यास त्यांच्या प्रयत्नांचा मूळ हेतूच व्यर्थ ठरू शकतो. काम निर्माण करून देणारा नेता पुढे पाहतो, परंतु त्या कामाची जबाबदारी पार पाडणारे प्रशासन जर निष्क्रीय राहिले, तर विकासाचा उद्देश अपूर्ण राहतो, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून विद्युत दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, परिसर सुशोभीकरण आणि एकूणच व्यवस्थापन दुरुस्त करून स्मशानभूमी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. आमदार किशोर पाटील यांनी उभारून दिलेल्या या आदर्श आणि महत्त्वपूर्ण सुविधेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना अखेरच्या क्षणी तरी निर्विघ्न मिळाला पाहिजे, हीच आज सर्वांची अपेक्षा आहे.

आज दि.11/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये प्रगती होईल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून लाभ मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत काळजी घ्या.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.10/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कामात गती येईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

नंदकिशोर खंडेलवाल जी का निधन

0

Loading

पाचोरा— शहर के प्रख्यात व्यापारी नंदकिशोर रामेश्वरजी खंडेलवाल का आज प्रातः 1:30 बजे, 76 वर्ष की आयु में निधन हो गया। खंडेलवाल परिवार के ज्येष्ठ सदस्य के रूप में उनका स्थान अत्यंत आदरणीय और महत्वपूर्ण था। शामसुदंरसेठ और अरविंदसेठ खंडेलवाल के बड़े भाई के रूप में वे सदैव नंदकिशोर खंडेलवाल जी का निधनमार्गदर्शक रहे, वहीं रवी और निलेश (पिंटू) के वे स्नेही पिताजी थे। कृष्णा और सिद्धू को उन्होंने दादाजी के रूप में हमेशा स्नेह की छाया दी, और पार्थ के लिए वे सहारा देने वाले बाबाजी थे।
नंदकिशोर खंडेलवाल ने अपनी कार्यकुशलता, व्यवहारज्ञान और मानवता के गुणों से समाज और व्यापार क्षेत्र में एक विशेष पहचान बनाई थी। नंदकिशोर अरविंदकुमार एंड कंपनी तथा खंडेलवाल इंफ्रा के संचालक के रूप में उन्होंने व्यवसाय में ईमानदारी, गुणवत्ता, अनुशासन और निरंतरता के मूल्य हमेशा बनाए रखे। उनके संपर्क में आने वाला हर व्यक्ति उनके सौम्य स्वभाव और उदार हृदय से प्रभावित रहता था।
उनके निधन से केवल परिवार ही नहीं, बल्कि समाज, रिश्तेदारों और व्यावसायिक क्षेत्र में भी शोक की लहर फैल गई है। उनकी यादें, उनका स्नेह और जीवन मूल्य सदा सभी के हृदयों में जीवित रहेंगे।
उनकी अंतिम यात्रा आज 9 दिसंबर 2025, मंगलवार, प्रातः 11:30 बजे, इंदिरा नगर, पाचोरा स्थित उनके निजी निवासस्थान से निकलेगी।
जीवनभर शांत, संयमी और सद्भाव से व्यवहार करने वाले नंदकिशोर खंडेलवाल के जाने से खंडेलवाल परिवार में एक अपूरणीय कमी उत्पन्न हुई है। ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे और शोकाकुल परिवार को इस दुखद घड़ी को सहन करने की शक्ति दे — यही प्रभु से प्रार्थना है।
समाज में उनके कार्यों की छाप सदैव बनी रहेगी और उनके दिए हुए संस्कार आने वाली पीढ़ियों को प्रेरित करते रहेंगे — यही उनकी प्रति सच्ची श्रद्धांजलि है।

नगरदेवळा एमआयडीसीला वेग; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

0

Loading

भडगाव : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात उद्योगवाढीचे नवे पर्व सुरू करण्यासाठी नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजूर झालेल्या एमआयडीसी प्रकल्पाला आता निर्णायक गती मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपूर येथे विशेष अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मूळ कारण म्हणजे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेले पत्र. एमआयडीसीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीची मंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेत ही बैठक बोलावली आहे. नगरदेवळा परिसरातील सुमारे अडीचशे एकर विस्तृत क्षेत्रावर मंजूर झालेली एमआयडीसी ही आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रुती आहे. मंजुरीनंतर या क्षेत्राचे प्लॉटिंग, आराखडा तयार करणे, औद्योगिक वापरासाठी जागा आरक्षित करणे अशी महत्त्वाची प्राथमिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु या विशाल औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा प्रणाली, प्रशासकीय इमारती अशा मूलभूत सुविधांची उभारणी अत्यावश्यक आहे. हाच मुद्दा निकाली काढण्यासाठी उद्योजकांना आकर्षित करणारी सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मागील काही काळापासून सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. या पाठपुराव्याचा एक परिणाम असा घडला की नगरपरिषद निवडणुकीत प्रचारासाठी पाचोर्‍यात आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभेमधूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी थेट दूरध्वनीवर चर्चा केली होती. नगरदेवळा सुतगिरणी परिसरातील मंजूर एमआयडीसीला तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि उद्योग सुरू करण्यासाठी गती द्यावी, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली. या उच्चस्तरीय समन्वयामुळे आता मंत्रालय आणि एमआयडीसी विभाग दोघांकडूनही या प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरला नागपूर येथे होणारी बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या बैठकीत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून प्रकल्पातील उर्वरित कामांचा आढावा घेऊन पुढील कामकाजाच्या प्राधान्यक्रमावर निर्णय घेतला जाणार आहे. नगरदेवळा एमआयडीसीत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सुविधा किती प्रमाणात आणि किती टप्प्यांत उभारता येतील, यावरही महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीनंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग येण्याची सर्वत्र अपेक्षा आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शेतीप्रधान भागात मोठ्या प्रमाणावर तरुणाई रोजगाराच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा एमआयडीसी ही संधींचा नवा मार्ग उघडणारी ठरणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीत विविध उत्पादन क्षेत्रातील कारखाने, प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, वेअरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स यांसारख्या बहुआयामी रोजगार संधी निर्माण होऊ शकतात. तसेच आसपासच्या गावांचा आर्थिक विकासही गतीमान होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाला मिळालेली गती हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकाराचे यश आहे, असे स्थानिक उद्योजक आणि नागरिकही व्यक्त करत आहेत. एमआयडीसीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता असून पायाभूत सुविधांच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे. “पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, हा माझ्या कामाचा मुख्य हेतू आहे. नगरदेवळा येथे मंजूर झालेल्या एमआयडीसीत उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. नागपूर येथील होणारी बैठक या उद्दिष्टपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” असे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगितले

ताज्या बातम्या

error: Content is protected !!