मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सने पराभव करून या हंगामात सलग चौथा विजय नोंदवला. दरम्यान, बेंगळुरूला दुसरा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच वेळी, आरसीबी पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने सुरुवात झटपट केली आणि पहिल्या चार षटकांत फक्त एका विकेटच्या मोबदल्यात ६० पेक्षा जास्त धावा केल्या. फिल सॉल्टने १७ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली आणि धावबाद झाला. यानंतर संघाने ३० धावांच्या आत तीन विकेट गमावल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने १४ चेंडूत २२ धावा केल्या. पडिक्कलने १ धावेचे योगदान दिले. कर्णधार रजत पाटीदारने २५ धावांची संथ खेळी केली. लिव्हिंगस्टोन ४, जितेश ३ आणि कृणाल पंड्या १८ धावा करून झटपट बाद झाले. शेवटी, टिम डेव्हिडने २० चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. कुलदीप आणि विप्राज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ३० धावांवर तीन विकेट गमावल्या. त्यानंतर, ६० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी चार विकेट गमावल्या. फाफ २, जॅक फ्रेझर मॅकगर्क ७ आणि अभिषेक पोरेल ७ धावा करून तंबूमध्ये परतले. कर्णधार अक्षर पटेलने १५ धावा केल्या पण केएल राहुलने एक बाजू राखून ठेवली. रिमझिम पावसात, राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या विकेटसाठी ५५ चेंडूत १११ धावांची नाबाद भागीदारी केली. केएल राहुलने ५३ चेंडूत ९३ धावांची नाबाद खेळी केली आणि स्टब्सने २३ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. भुवनेश्वर कुमारने दोन विकेट घेतल्या. जोश आणि सुयश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पाचोरा – शहरातील जनतेच्या मनामनात ज्यांची आठवण आजही स्फूर्तीचा झरा ठरते, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात त्यांच्या स्मारकाचे भव्य सुशोभीकरण करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईच्या मखरात नटलेले हे स्मारक, सामाजिक परिवर्तनाच्या प्रकाशात झळाळणाऱ्या फुलेंच्या विचारांची आजही किती प्रासंगिकता आहे, हे अधोरेखित करणारे आहे. महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य सामाजिक अन्यायाविरोधात लढा देण्यात गेले. त्यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातिनिर्मूलन, शेतकरी प्रश्न आणि पाणी व जमीन यावरील लोकांचे हक्क या मुद्द्यांवर खोलवर विचार करत वास्तवाला आव्हान दिलं. आजही त्यांच्या प्रत्येक विचारात संघर्ष आहे, त्याग आहे, आणि समाजाला उज्वल दिशा देण्याची क्षमता आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाचोरा शहरातील त्यांचे स्मारक केवळ सजवले गेले नाही, तर संपूर्ण शहराने एक सन्मानाचा भाव जपला आहे. रात्रीच्या अंधारात स्मारकावर झालेली विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी झेंडे, फुलांची तोरणं आणि लाल मखमली पायऱ्यांनी व्यापलेली पथदिव्यांची उजळण – हे दृश्य डोळ्यांना जितकं आकर्षक वाटतं, तितकंच अंतःकरणाला जागं करणारं आहे. या स्मारकाच्या दोन्ही बाजूंना महात्मा फुले यांचे विचार लिहिण्यात आले आहेत. एकीकडे त्यांनी सांगितलेले – “स्वार्थ सोडून जो सत्यधर्म धारण करतो, कर्तव्याच्या वाटेने चालतो, तोच खरा माणूस होतो” – हे उदात्त विधान आहे. तर दुसऱ्या बाजूला – “नवीन विचार करणारं जर तरुण असतं, तर त्याचं स्वागत करण्याची ताकद समाजात हवी” – असा विचार मांडण्यात आला आहे. या ओळी केवळ फलकावर लिहिलेल्या नाहीत, तर त्या शहराच्या अंतःकरणात कोरल्या गेल्या आहेत. पाचोरा शहरातील नागरिकांनी या स्मारकाच्या सजावटीसाठी समीतीने ज्या आत्मियतेने सहभाग घेतला, त्यातून महात्मा फुले यांच्याप्रती असलेली त्यांची निष्ठा स्पष्ट होते. अनेक राजकीय मान्यवर , स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, महिला मंडळं, आणि स्थानिक व्यापारी वर्ग यांचा समवेत सहभाग होता. फुलेंच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या स्मारकासमोर दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणारआहे स्मारकाभोवतीच्या सजावटीत विशेषतः महाराष्ट्राचा पारंपरिक आणि सामाजिक रंगधर्म राखण्यात आला आहे. केशरी, पिवळ्या, निळ्या झेंड्यांनी स्मारकाभोवतीचा परिसर भारलेला आहे. हे रंग काही निव्वळ सौंदर्यासाठी निवडले गेलेले नाहीत, तर ते महात्मा फुलेंच्या विचारसरणीचे प्रतीक आहेत – केशरी म्हणजे त्याग, पिवळा म्हणजे आशावाद, आणि निळा म्हणजे बहुजन समाजासाठी केलेल्या संघर्षाचं प्रतिक. महात्मा फुले यांनी समाजात निर्माण केलेल्या परिवर्तनाचे पडसाद आज शतकानंतरही पाचोरा शहरात उमटताना दिसत आहेत. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ते पहिले समाजसुधारक होते. सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांनी समाजात क्रांतीचा नवा अध्याय लिहिला. त्यांची शिक्षणशाळा, सत्यशोधक समाज, शेतकरी हितसंवर्धनाचे धोरण आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढा – हे सर्व इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. पाचोरा शहरातील स्मारक केवळ एक दगड-मातीचा स्थापत्यसंच नाही, तर तो महात्मा फुलेंच्याया विचारांचा जिवंत दस्तऐवज आहे. ते स्मारक पाहताना आजही जनतेच्या डोळ्यात आदर, अभिमान आणि प्रेरणेचा तेजोमय झोत दिसून येतो. त्यांचे स्मरण म्हणजे केवळ उत्सव नसून – त्यांचा विचार, त्यांचे कार्य, आणि त्यांची शिकवण आज किती समाजोपयोगी आहे, हे पुन्हा नव्याने समजून घेण्याची संधी आहे. महात्मा फुले यांनी “ज्याला ज्ञान आहे तोच खरा ब्राह्मण” अशी परिभाषा मांडली. त्यांनी शिक्षणाचा अधिकार सर्वांसाठी खुला केला. त्यांच्या या ध्येयवादाची जाणीव आजच्या तरुण पिढीने ठेवणे आवश्यक आहे. पाचोरा शहरातील स्मारकावरील सजावट म्हणजे त्या विचारांप्रती वाहिलेली एक आधुनिक श्रद्धांजली आहे. या स्मारकाच्या सजावटीसाठी वापरलेली विद्युत रोषणाई विशेष लक्षवेधी आहे. रात्रीच्या काळोखात ते स्मारक तेजाने झळकतं, जणू एखादा प्रकाशस्तंभच! आणि हे दृश्य पाहून प्रत्येक व्यक्तीच्या मनात फुल्यांच्या प्रकाशात चालण्याची एक नवी ऊर्जा निर्माण होते. या जयंतीनिमित्त स्थानिक पालिका, शाळा-कॉलेज संस्था, समाजसेवी मंडळे आणि तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन विविध उपक्रम राबवत आहेत. व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे. यातून नव्या पिढीला त्यांच्या विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे. पाचोरा शहराने यंदा जयंती साजरी करताना केवळ फुलं वाहून, भाषणं देऊन, आणि फोटो काढून थांबलेलं नाही, तर त्यांनी खऱ्या अर्थाने ‘कार्यपूजेला’ महत्त्व दिलं आहे. महात्मा फुले हे केवळ एका जातीच्या, वर्गाच्या, वा विशिष्ट समुदायाच्या नव्हते – ते साऱ्या मानवतेसाठी एक प्रकाशपुंज होते. आज जेव्हा आपण स्मारकांकडे बघतो, तेव्हा आपल्याला त्याच्या भौतिक सौंदर्यापेक्षा जास्त महत्त्व त्या स्मारकाच्या मागे असलेल्या विचारसरणीला द्यावं लागतं. पाचोऱ्यातील या सजावटीमुळे स्मारकाचा केवळ देखावा वाढला नाही, तर महात्मा फुलेंच्या विचारांची उजळणी प्रत्येक पावलावर होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टपणे दिसते की पाचोरा शहरातील नागरिकांनी महात्मा फुलेंचे स्मरण केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी त्यांच्या स्मारकास वंदन करताना संपूर्ण समाजाच्या प्रबोधनाची जबाबदारीही आपल्यावर घेतली आहे. अशा प्रकारे पाचोरा शहर महात्मा फुल्यांच्या स्मृतींना आणि विचारांना केवळ शब्दात नव्हे, तर कृतीतही जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यांच्या स्मारकाभोवतीचा प्रकाश जसा अंधार दूर करतो, तसाच त्यांचा विचार समाजातील अज्ञान, भेदभाव आणि अन्याय दूर करण्याची ताकद आजही बाळगतो.
सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed (उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा ) MO.7588645908
मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे आणि त्या दिशेने ठोस पावले उचलण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य शासनाने पत्रकारांच्या हितासाठी घेतलेल्या या भूमिकेमुळे पत्रकार क्षेत्रात आशेचा किरण दिसून येत आहे. यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या प्रतिनिधींशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न अधिकृत जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांविषयी गांभीर्याने विचार करून आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले. ज्येष्ठ पत्रकारांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ ही योजना पत्रकार क्षेत्रातील मानाची बाब मानली जाते. मात्र या योजनेच्या अटींचा फेरविचार करण्याची गरज वेळोवेळी मुंबई मराठी पत्रकार संघ & जळगाव जिल्हा पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटनांनी सातत्याने मांडली होती. या पार्श्वभूमीवर योजनेतील अनुभवाची अट ३० वर्षांवरून २५ वर्षे करण्याचा तसेच वयोमर्यादा ६० वर्षांवरून ५८ वर्षे करण्याचा प्रस्ताव राज्यातील विविध पत्रकार संघटनांकडून देण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून सूचना घेऊन नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेतून सन्मानित होणाऱ्या पत्रकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेबाबतही पत्रकार संघटनांनी अधिक वाढ करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून योजनेतील आर्थिक लाभ अधिक वाढवण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान म्हणजे समाजप्रबोधनात मोलाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींचा गौरव असून राज्य शासन यासाठी कटिबद्ध आहे. याशिवाय पत्रकारांसाठी मुंबईतील कांदिवली भागात सुरू असलेल्या गृहनिर्माण योजनेत सदनिकांच्या किमती पत्रकारांच्या आवाक्यात राहाव्यात यासाठी म्हाडाने योग्य तोडगा काढावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या योजनेमुळे अनेक पत्रकारांचे स्वप्नपूर्ती होणार आहे, मात्र सदनिकांच्या किंमती पत्रकारांसाठी परवडणाऱ्या असाव्यात याकडे शासनाचे लक्ष आहे. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी कल्याण निधीमधून आजारपणाच्या काळात पत्रकारांना दिली जाणारी आर्थिक मदत सध्या एक लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे. या मर्यादेत वाढ करून आजाराच्या खर्चाचा अधिक भाग भरून निघेल याची सोय करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ही मदत पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी संकटाच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ अंतर्गत पत्रकार आरोग्य योजनेला संलग्न करून या योजनेच्या यादीबाहेरील आजारांवरही प्रतिपूर्ती मिळावी यासाठी पावले उचलली जातील. पत्रकारांचा आरोग्य संरक्षण हा शासनाच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय आहे आणि या योजनांमधून पत्रकारांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. राज्य शासनाच्या अधिस्वीकृती यादीत असलेल्या पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बस सेवा वापरताना भाडे सवलत मिळावी यासाठीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटी महामंडळाला स्पष्ट निर्देश दिले. यामुळे प्रवास खर्च कमी होईल आणि पत्रकारांना सहजपणे जिल्ह्याजिल्ह्यांत फिरणे शक्य होईल. या बैठकीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रालय प्रवेशासाठी सध्या सुरू असलेल्या ‘फेशियल रिकग्नेशन’ प्रणालीचा पत्रकारांसाठी लाभ घेण्याबाबत होती. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, या यंत्रणेअंतर्गत पत्रकारांचा प्रवेश प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्णत्वास न्यावी. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा मजबूत होईल आणि पत्रकारांची ओळख व प्रवेश प्रक्रिया अधिक सुगम व सुलभ होईल. या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे मुंबई मराठी पत्रकार संघासह इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी पत्रकारांच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर सविस्तरपणे मांडल्या. सर्वच मागण्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टीकोन ठेवून उत्तर दिले. या बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांच्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक, आर्थिक व निवासी प्रश्नांबाबत शासन अधिक सजग असून त्यावर तातडीने निर्णय घेण्यास तयार असल्याचे दिसून आले. राज्य शासन व पत्रकार प्रतिनिधी यांच्यातील हा संवाद अधिक दृढ होऊन येणाऱ्या काळात पत्रकार क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक निर्णय होत राहतील, अशी अपेक्षा आहे.सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातील पत्रकारांच्या सन्मान, कल्याण आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि त्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत आहे, हेच या बैठकीतून अधोरेखित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन पत्रकारांच्या प्रत्येक न्याय्य मागणीवर योग्य कार्यवाही करेल, असा विश्वास मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न अधिकृत जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी व्यक्त केला लवकरच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न अधिकृत जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असल्याचे सोमवंशी यांनी सांगितले
पाचोरा – राज्य सरकारने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असली, तरी पाचोरा शहरासह अर्ध्या जळगाव जिल्ह्यात गुटख्याची खुलेआम होलसेल विक्री सुरूच आहे. यामागे खऱ्या अर्थाने ‘मास्टरमाइंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारखेडा येथील दिलीप नावाच्या सराईत विक्रेत्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. पोलीस प्रशासनाच्या धमाकेदार व कौतुकास्पद कामगिरीमुळे अनेक गुटखा तस्कर अटकेत असतानाही गुटख्याचा माल सुरळीतपणे पोहोचतो आहे, याचे मुख्य कारण म्हणजे हा दिलीप नावाचा मुख्य पुरवठादार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात २०१२ पासून गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ही बंदी लागू करण्यात आली. तरीही, गुटखा विक्रीचं संजाळ इतकं खोलवर रुजलेलं आहे की पोलिसांनी अनेक वेळा केलेल्या छापेमारी, अटका आणि कारवायांच्या पार्श्वभूमीवरही विक्री थांबलेली नाही. पाचोरा शहरात ठीक ठिकाणी यांनी साठे केले आहेत यामागे एका मोठ्या आणि बिनधास्त कार्यरत असलेल्या नेटवर्कचं अस्तित्व आहे, ज्याच्या मुळाशी दिलीप नावाचा व्यक्ती असल्याची माहिती पुढे येत आहे. तारखेडा गावातून कार्यरत असलेला दिलीप हा गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा आयात, साठवणूक, वितरण आणि विक्री यामध्ये अग्रेसर असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक वेळा गुटखा जप्तीच्या कारवायांमध्ये आढळलेली मालाची शैली, वितरणाची पद्धत, आणि वाहतुकीच्या साधनांचा तपशील पाहता या नेटवर्कचं संचालन दिलीप नावाची व्यक्तीच व्यवस्थित आणि स्थिर पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट होते. या साखळीत दिलीपचा समावेश असल्याबाबत अनेक ठोस पुरावे असून देखील त्याच्यावर कार्यवाही होत नाही, हे अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. दिलीपच्या नेटवर्कचा विस्तार – पाचोरा ते भडगाव, चाळीसगाव, एरंडोलसह अर्ध्या मराठवाड्यापर्यंत पोहोचला दिलीपच्या नेटवर्कमधून फक्त पाचोरा नाही, तर भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, यावल, अमळनेर व अर्ध्या मराठवाड्यापर्यंतच्या भागांत दररोज गुटख्याचा पुरवठा होतो. यासाठी त्याच्या नेटवर्कमध्ये विविध एजंट, वाहन चालक, होलसेल विक्रेते आणि स्थानिक दुकानदार सहभागी असल्याचे बोलले जाते. एखादा तस्कर अटकेत गेला तरी वितरण थांबत नाही, कारण दिलीपच्या नेटवर्कमध्ये ‘बॅकअप’ यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे संपूर्ण साखळी जणू एखाद्या संगणकीय प्रणालीसारखी प्रभावीपणे चालते. ‘विमल’ हा गुटखा ब्रँड या नेटवर्कचा मुख्य घटक आहे. मागणी वाढल्याने आणि साठा नियंत्रित राहिल्याने विक्रेत्यांनी विमल गुटख्याच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी १० रुपयाला मिळणारा गुटखा आता १५ ते २० रुपये दराने विकला जातो. ग्राहकांनी ही किंमत मोजूनही गुटखा घेण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक तरुण, विद्यार्थी, आणि कामगारवर्ग या व्यसनात आकंठ बुडालेला आहे.दिलीपच्या नेटवर्कमधून केवळ मूळ विमल नव्हे, तर नकली विमल गुटख्याचाही पुरवठा होत असल्याची शक्यता आहे. असे नकली गुटखे मूळ उत्पादनासारखेच दिसतात, परंतु त्यामध्ये वापरले जाणारे घटक अधिक अपायकारक असतात. त्यामुळे गुटखा सेवनाच्या दुष्परिणामांमध्ये आणखी वाढ होत असून, कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचे गंभीर आरोग्यदायी परिणाम पुढील काही वर्षांत अधिक स्पष्ट होतील, अशी वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता आहे. दिलीपवर यापूर्वी कठोर कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखाद्या सराईत विक्रेत्याची ओळख सर्वांनाच असताना, तो वर्षानुवर्षं खुलेआम गुटख्याचा मुख्य पुरवठादार म्हणून कार्यरत राहतो, यामागे कोणाचा तरी अप्रत्यक्ष अथवा थेट आश्रय असल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रश्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. नागरिकांनी अशा विक्रेत्यांविरुद्ध माहिती प्रशासनाला देणे, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी जनजागृती करणे, तर पत्रकारांनी सत्य समोर आणणं – हे सगळं अनिवार्य आहे. अन्यथा, तरुण पिढी नकली गुटख्याच्या विळख्यात अडकून आरोग्य बिघडवेल आणि हे मूकपणे होत राहील. गुटख्याच्या या साखळीवर पूर्ण आळा बसवायचा असेल, तर या साखळीच्या मूळावर म्हणजेच तारखेड्याच्या दिलीपवर तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्याच्या नेटवर्कचे सर्व बिंदू शोधून, आर्थिक व्यवहारांची चौकशी करून, स्थानिक पोलीस प्रशासनाने आणि अन्न व औषध प्रशासनाने एकत्रित कारवाई करावी. केवळ पाचोरा नव्हे तर अर्ध्या जळगाव जिल्ह्यातील & अर्ध्या मराठवाड्यात गुटखा विक्री रोखायची असेल, तर या एकाच व्यक्तीवर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. पाचोरा व परिसरात गुटख्याची साखळी तुटण्याची एकमेव किल्ली म्हणजे तारखेड्याचा दिलीप. जोपर्यंत तो मोकाट फिरतोय, तोपर्यंत कितीही अटक, जप्ती किंवा कारवाई झाली, तरी गुटखा विक्री थांबणार नाही. आता प्रशासनाने लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांना थांबवण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा, ही साखळी समाजाच्या मुळावरच घाव घालेल निश्चित.
पाचोरा (प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) – फोटोबाजी, बॅनरबाजी, अवाजवी प्रसिद्धी आणि चौकाचौकांत लावण्यात येणारे स्वतःचे
फोटो यापासून दूर राहून, केवळ कार्याच्या जोरावर ओळख निर्माण करणारे,पत्रकारांच्या खऱ्या न्यायहक्कासाठी लढणारे आणि तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत प्रामाणिक योगदान देणारे सचिन सोमवंशी यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न अधिकृत जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाचोरा तालुक्यातील पत्रकार वर्तुळात समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या या निःस्वार्थी, सजग आणि स्पष्टवक्तेपणाच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ ही महाराष्ट्रातील एक अत्यंत जुनी आणि पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढणारी प्रमुख संघटना आहे. या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आपला विस्तार केला असून, प्रत्येक तालुक्यात योग्य नेतृत्व उभे करून पत्रकारांसाठी कार्य करण्याचा ध्यास या संघटनेने घेतला आहे. त्याच ध्येयधोरणाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी सचिन सोमवंशी यांची निवड ही अत्यंत योग्य आणि आवश्यक पाऊल ठरली आहे.सचिन सोमवंशी हे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी सदैव सत्य, निडरता, आणि सामाजिक बांधिलकी यांचा विचार करत पत्रकारिता केली आहे. त्यांनी कधीही पत्रकारितेचा उपयोग स्वतःचा आर्थिक वा सामाजिक फायद्यासाठी केला नाही. अनेकदा पत्रकारांच्या संघटनांमध्ये पद मिळाल्यानंतर काही मंडळींकडून विशेषतः अवैध धंदेवाल्यांकडून आपले फोटो बॅनरवर छापणे, चौकाचौकांत लावणे, आणि स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इतरांच्या नावाने पुरस्कार वाटप वा जाहिरात गोळा करणे असे प्रकार पाहायला मिळतात. मात्र सोमवंशी यांचा मार्ग यापेक्षा पूर्णपणे वेगळा राहिला.ते नेहमीच म्हणतात की, “कार्य हेच आपली ओळख असावी, चेहऱ्यावरचे फोटो नव्हे.” त्यामुळेच त्यांनी कधीही पत्रकार असो वा नसो, कोणाच्याही संमतीशिवाय त्यांचे फोटो वापरून स्वतःचा बॅनर शो केला नाही, अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेऊन चौकात प्रसिद्धीसाठी पोस्टर्स लावले नाहीत. त्यांच्या या नम्रतेने आणि नितीमत्तेवर आधारलेल्या वर्तनामुळेच त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता अधिक ठळकपणे समोर आली आहे.यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असून, त्या कार्यकाळातही त्यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा वैयक्तिक लाभासाठी संघटनेचा वापर केला नाही. पत्रकार संघटनेच्या नावाखाली त्यांनी ना कधी पैसा गोळा केला, ना कधी पुरस्कारांची विक्री केली, ना कधी हप्ते मागितले. त्यामुळेच त्यांचं नाव घेतलं की, निष्ठा, सचोटी आणि लढाऊ वृत्ती ही प्रतिमा लोकांच्या मनात तयार होते.त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुका पत्रकार संघ अधिक सशक्त होणार यात कोणतीही शंका नाही. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “पाचोरा तालुक्यातील जे पत्रकार आमच्या संघटनेचे सदस्य असतील, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही. संघटनेचा एक एक सदस्य माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे.” त्यांच्या या विचारांमुळे अनेक नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळते आहे. पत्रकारिता केवळ बातम्या देण्याचा व्यवसाय नसून, ती समाजाप्रती जबाबदारी आणि जनहितासाठीची लढाई आहे, हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले आहे.सचिन सोमवंशी यांच्या निवडीनंतर पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांतून अनेक पत्रकारांनी, सामाजिक संस्थांनी, राजकीय नेत्यांनी, आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यकाळात पाचोरा तालुक्यातील पत्रकारांसाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, आणि पत्रकार सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रम राबवले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.पत्रकारांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या या संघटनेत नेतृत्व करणे म्हणजे केवळ मानाचा पद नसून, ती एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पार पाडण्याची क्षमता सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या आजवरच्या कार्यातून सिध्द केली आहे. समाजात अनेकदा अशीही उदाहरणं दिसतात जिथे बॅनरवर मोठे फोटो झळकतात, परंतु त्यामागे कामच नसतं. अशा बॅनरपुरतं मर्यादित नेतृत्व समाजाला काही देऊ शकत नाही. याच्या पूर्णपणे विरोधी उदाहरण म्हणजे सोमवंशी – जे केवळ त्यांच्या कामातून आणि कृतीतून समाजाशी संवाद साधतात.त्यांच्या निवडीनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, “ही निवड म्हणजे माझ्या कामाची पावती आहे. ही संधी मी तालुक्यातील पत्रकारांसाठी अधिक मजबूत आधारस्तंभ ठरण्यासाठी वापरणार आहे. मी माझ्या कार्यकाळात कोणताही गवगवा न करता, कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली पैसा मागे न लावता, प्रामाणिकपणे संघटनेसाठी झटणार आहे. माझं ध्येय हे केवळ माझी ओळख बनवणं नसून, इथल्या प्रत्येक पत्रकाराची ओळख उजळवणं आहे.”एकूणच, पाचोरा तालुक्यातील पत्रकार संघटनेला एक सशक्त, अनुभवी, आणि प्रामाणिक नेतृत्व लाभल्यामुळे संघटनेच्या कार्याची दिशा आणि गती निश्चितच वाढेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे. बॅनरशाहीच्या पलीकडे जाऊन केवळ कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सोमवंशी यांचे नेतृत्व ही इतर अनेक पत्रकारांसाठी आणि पदाधिकार्यांसाठी देखील एक प्रेरणादायी शिकवण ठरेल.
पाचोरा (प्रतिनिधी – धनराज पाटील,बॅनर Mo. 9922614917) – भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, अंधश्रद्धा, जातिभेद, अज्ञान आणि अन्यायाविरोधात अविरत संघर्ष करणारे महामानव, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची 11 एप्रिल 2025 रोजी जयंती पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात, शिस्तबद्धतेने आणि सामूहिक एकतेने साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात येत असून, शहरातील सर्वच सामाजिक संघटना, सांस्कृतिक मंडळे, युवक संघटना, विविध राजकीय पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व समाजप्रेमी नागरिकांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येणार आहे. या जयंती सोहळ्याचे आयोजन “सार्वजनिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती, पाचोरा” यांच्या नेतृत्वाखाली केले जात असून, समितीचे अध्यक्ष म्हणून पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील कार्यरत आहेत. उत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली असून, उत्सवात सर्व घटकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी 9.30 वाजता पाचोरा शहरातील महात्मा फुले स्मारक येथे प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये माजी आमदार व पी.टी.सी.चे अध्यक्ष मा.आ.दिलीपभाऊ वाघ, शहरातील प्रतिष्ठित उद्योजिका आणि निर्मल सिड्स पाचोरा या कंपनीच्या संचालिका मा. वैशालीताई सुर्यवंशी, शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा चे संचालक मा. अमोलभाऊ शिंदे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. संजयभाऊ गोहील, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगावचे सभापती मा. गणेश भिमराव पाटील, तसेच प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी मा. भूषण अहिरे, तहसिलदार मा. विजय बनसोडे, नगरपरिषद पाचोरा चे मुख्याधिकारी मा. मंगेश देवरे आणि पोलीस विभागात पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अशोक पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले यांनी आपल्या जीवनकार्याद्वारे समाजात समता, शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार, शेतकरी आणि मजूर वर्गाचे हक्क यासाठी झटून कार्य केले. त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने फक्त एक दिवसाचा सोहळा न होता, त्यांच्या विचारांना समर्पित वैचारिक जागृतीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. यंदाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणजे सायंकाळी 6.00 वाजता निघणारी शोभायात्रा, जी कृष्णापुरी येथून सुरु होऊन महात्मा फुले स्मारक पाचोरा येथे संपन्न होणार आहे. या मिरवणुकीत जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा यांचे सहभाग लक्षवेधी ठरणार असून, लेझीमच्या तालावर, बॅण्डपथकाच्या गजरात, भव्य झांजपथक व विविध सामाजिक संस्था-कार्यकर्ते यांचा सहभाग लाभणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार असून, नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा फुलांची उधळण करून स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शोभायात्रेनंतर रात्री 8.00 वाजता एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात “गाठोडं” या सांस्कृतिक सादरीकरणाचे सादरीकरण सुप्रसिद्ध शाहीर तुषार सुर्यवंशी, मुंबई आणि त्यांच्या सहकलाकारांकडून करण्यात येणार आहे. शाहीर परंपरेतून महात्मा फुले यांचे कार्य, संघर्ष, आणि विचार यांचा प्रभावी उद्घोष करण्यात येणार असून, हा कार्यक्रम नागरिकांच्या सांस्कृतिक भावनांना उर्जा देणारा ठरेल. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध स्वरूपात होत असून, स्थानिक पोलीस प्रशासन, नगरपरिषद, वीज विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह सर्व संबंधित विभागांची सहकार्यभावना उत्सवासाठी लाभली आहे. विशेषतः सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासाठी विशेष पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.सार्वजनिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती, पाचोरा यांच्यासह जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा (मिरवणूक समिती) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्वांनी या महत्त्वपूर्ण जयंती उत्सवात सहभागी होऊन महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करावा. सामाजिक समरसता, बंधुता, शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या दिशेने त्यांचे योगदान आपल्याला आजही प्रेरणा देत आहे. अशा महामानवाच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून सर्व घटकांनी आपापसातील मतभेद विसरून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करावे, अशी भावना या आयोजनातून व्यक्त होते. महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आणि कालसुसंगत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त पाचोऱ्यात जो सामाजिक-सांस्कृतिक एकतेचा संगम होत आहे, तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल. शिस्तबद्धतेने आणि भव्यतेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीने कसून तयारी केली आहे. पाचोऱ्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृध्दीच्या वाटचालीत अशा उपक्रमांचा मोठा वाटा आहे या भव्य आयोजनामुळे शहरात आनंदाचे, उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पाचोरा शहराने एक आदर्श उभा केला असून, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण शहर एकत्र येत असल्याचे दृश्य या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
दिनांक 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीत जन्मलेल्या होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हॅनिमान यांचा 270 वा जन्मदिन भारतात साजरा होत आहेत. होमिओपॅथी ची महाविद्यालये भारतात व महाराष्ट्रा मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू केलेली आहे. ही सर्व महाविद्यालये खाजगी आहेत. महाराष्ट्रात फक्त एक शासकीय काॅलेज जळगाव येथे सुरू झाले आहे. होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेऊन तयार होणारी डॉक्टर्स महाराष्ट्रामध्ये शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असतात. त्यापैकी बरीच डॉक्टर मंडळी ही नाईलाजास्त ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करतात. जे डॉक्टर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात त्यांना त्यांच्या प्रचार प्रसार मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण येतात. विशेषतः सर्वात मोठी अडचण म्हणजे होमिओपॅथिक फार्मसी (मेडिकल स्टोअर) यांची वानवा मोठ्या प्रमाणात आढळते. पूर्वी नागपूर सारख्या मोठया शहरांमध्ये तीन ते चार होमिओपॅथिक फार्मसी (मेडिकल स्टोअर) उपलब्ध होती. आता ही संख्या थोडीफार वाढली आहेत तथापि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आणि होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये या फार्मसीची संख्या अत्यंत नगण्य आहे. होमिओपॅथिक औषधी सहज उपलब्ध न होणे हे होमिओपॅथीच्या प्रसारामधला सर्वात मोठा अडथळा आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये होमिओपॅथिक औषध घेतल्याने कोरोना होत नाही किंवा कोरोना आजाराला प्रिव्हेन्शन म्हणून होमिओपॅथीचे औषध उपयोगी ठरतात अशा प्रकारचा प्रचार दूरदर्शन चया माधयमाने मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु त्यावेळी ही औषधे कुठे उपलब्ध आहे याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली नव्हती किंवा सामान्य माणसांना ही माहीती नव्हती. ज्यावेळी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम नावाचे औषध रोगप्रतिबंधात्मक म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांनी आणि सेवाभावी संस्थांनी मोफत वाटायला सुरुवात केली त्यावेळी सामान्य च्या तोंडातून हीच प्रतिक्रिया ऐकायला मिळाली की हे औषध कुठे मिळते याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. कारण मोठ्या शहरांमध्ये दोन ते तीन होमिओपॅथिक फार्मसी आढळतील. अजूनही लहान शहरांमध्ये त्याची माहिती सुद्धा नाही. तालुका स्तरावर वर तर कोणत्याच प्रकारचा त्याचा मागमूसही नाही. होमिओपॅथीची फार्मसी मोठ्या प्रमाणात न वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही फार्मसी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले 20 सी हे लायसन्स अलीकडे फक्त ऍलोपॅथी मध्ये बी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होते तसेच जे डॉक्टर्स होमिओपॅथी ची प्रॅक्टिस न करता होमिओपॅथिक फार्मसी चालवू इच्छिते अशांना होमिओपॅथिक फार्मसी चे लायसन मिळते. परंतु होमिओपॅथिक कॉलेजमध्ये पुर्वीच्या डी.एच.एम.एस किंवा आताच्या बी.एच.एम.एस. शिक्षण घेतल्यानंतर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करण्याऐवजी होमिओपॅथीचे फार्मसी चालवावी असा विचार डॉक्टरांच्या मनात क्वचित येतो. त्यामुळे डॉक्टर लोकांनी होमिओपॅथिक औषधांची फार्मसी सुरू करण्यासाठी इच्छुक नसतात. त्यातही होमिओपॅथिक फार्मसी करण्यासाठी लागणारे भाग भांडवल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऍलोपॅथिक ब्रॅण्डेड फार्मसी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाग भांडवल ची आवश्यकता होती परंतु त्यानंतर जेनेरिक फार्मसी ही कन्सेप्ट सामान्य लोकात रुजविल्यानंतर कमी पैशांमध्ये ऍलोपॅथिक जेनेरिक फार्मसी चे दुकान मोठ्या सुरू करण्यात आले. तशाप्रकारे होमिओपॅथी मध्ये जेनेरिक ही कन्सेप्ट सुरू न झाल्यामुळे होमिओपॅथिक फार्मसी सुरू करण्यासाठी खूप मोठे भांडवल लागते. त्यातही प्रत्येक औषधाचे वेगवेगळ्या पोटेन्सीचे डायल्युशन्स चा स्टॉक ठेवण्यासाठी मोठी जागाही लागते. ऍलोपॅथीची फार्मसी टाकण्यासाठी 120 स्क्वेअर फुटची जागा पुरेशी आहे परंतु होमिओपॅथी टाकण्यासाठी तेवढी जागा लायसन्स काढण्यासाठी पुरेशी असली तरी स्टॉक ठेवण्यासाठी तेवढी जागा पुरेशी ठरू शकत नाही. तसेच सध्या होमिओपॅथी फार्मसी टाकण्यासाठी जे लायसन्स मिळवण्याची अट आहे ती फक्त बी. फार्म (एलोपॅथी) झालेल्या विद्यार्थ्यांनाच मिळते. त्यामुळे बी.फार्म झालेले विद्यार्थी हे सहसा फार्मसी, मेडिकल स्टोअर च्या क्षेत्रात उतरण्याऐवजी फार्मास्युटिकल व मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नोकरी करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे क्वचितच बी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःची होमिओपॅथी फार्मसी टाकलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथिक फार्मसी मध्ये काम केलेल्या सामान्य व्यक्तीला अनुभवाच्या आधारे होमिओपॅथी फार्मसी चे 20 सी हे लायसन्स उपलब्ध होत होते. परंतु अलीकडे यामध्ये बदल झाला असल्यामुळे हे लायसन्स अनुभवाच्या आधारे आता दिल्या जात नाही. भारत सरकारने अलीकडे जो एक कायदा तयार केलेला आहे त्या कायद्यामध्ये होमिओपॅथी मध्ये डी.फार्म, बी.फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना होमिओपॅथी फार्मसी चे 20 सी लायसन्स देण्याची तरतूद केलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी मध्ये डी. फार्म चा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू केलेला नाही. त्यामुळे ही तरतूद कायद्यामध्ये आली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्रातील एकाही होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डी.फार्मसी, बी.फार्मसी हा स्वतंत्र अभ्यासक्रम शिकविल्या जात नाही. संपूर्ण भारतामध्ये फक्त दिल्लीमध्ये सिंम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फार्मसी व मध्यप्रदेश मधील काहीखाजगी विद्यापीठांनी ही मागील काही वर्षापासून डी.फार्म (होमिओपॅथी), बी.फार्म (होमिओपॅथी) चे कोर्स चालवीत आहे. परंतु याचा लाभ फक्त कमी विद्यार्थीच घेतात. या सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी फार्मसी ची एक राज्य शाखा महाराष्ट्र मध्ये अमरावतीला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अलीकडे डीफार्म (होमिओपॅथी) चे काही विद्यार्थी आता उपलब्ध झालेली आहे. त्यामधून उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना लायसन्स मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. परंतु डिप्लोमा इन होमिओपॅथिक, बॅचलर इन होमिओपॅथिक फार्मसी हा अभ्यासक्रम जोपर्यंत होमिओपॅथिक महाविद्यालया मधून चालविला जात नाही. तोपर्यंत होमिओपॅथिक डी.फार्म, बी.फार्म झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे होमिओपॅथी फार्मसी ची दुकाने ही सध्या मोजक्याच संख्येमध्ये व मोठ्या शहरांमध्ये आहेत. दुसरी बाब अशी की होमिओपॅथिक डॉक्टर्स रुग्णाला औषध देताना त्यांनी जे औषध रुग्णाला दिले त्याचे प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातांत दिल्या जात नाही. त्यामुळे रुग्णाला त्याने कोणते होमिओपॅथिक औषध घेतले किंवा कोणती औषध डॉक्टरांनी दिले याची माहिती नसल्यामुळे तो स्वतः होऊन होमिओपॅथीच्या फार्मसी मध्ये औषध खरेदी करण्यासाठी जात नाही. अलीकडे होमिओपॅथीच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये थोडा बदल झाल्याने मोठ्या प्रमाणात होमिओपॅथिक पेटंट औषधांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ठराविक आजारावरील औषधे, ठराविक पोटेन्सी मध्ये जी तयार झाली ती होमिओपॅथिक फार्मसी मध्ये उपलब्ध आहे. परंतु होमिओपॅथिक डॉक्टर पेशंटच्या हातामध्ये प्रिस्क्रीप्शन देत नसल्यामुळे या औषधाशिवाय इतर औषधी घेण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नाही किंवा हिम्मत होत नाही. एलोपॅथीक प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातामध्ये पडल्यानंतर ही औषधे तो ऍलोपॅथिक फार्मसी मध्ये जाऊन नियमित घेत असतो अशा प्रकारे जर होमिओपॅथी मध्ये पद्धत सुरू झाली तर होमिओपॅथीचा प्रचार प्रसार होईल. परंतु यामध्ये डॉक्टर्समध्ये समज आहे की होमिओपॅथीची औषध ही कमीत कमी डोज व वेगवेगळ्या पोटेन्सी मध्ये घेणे आवश्यक असते. रुग्णाच्या हातात जर एक वेळा प्रिस्क्रीप्शन दिले तर तो रुग्ण होमिओपॅथिक डॉक्टर कडे न येता सेल्फ मेडिकेशन च्या तत्त्वाद्वारे स्वतःच त्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करेल आणि त्याचे दुष्परिणाम रुग्णावर होतील अशी भीती असल्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातात देण्याची पद्धत अजूनही महाराष्ट्रामध्ये आणि बहुतांशी इतरही राज्यामध्ये रुग्णांना दिल्या जात नाहीत. (काही राज्यांत ही प्रिस्क्रीप्शन दिल्या जातात अशी माहिती आहे.) होमिओपॅथिक डॉक्टर च्या मानसिकतेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत होमिओपॅथीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणे शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये अलीकडे महाराष्ट्र शासनाने मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये आयुष मंत्रालयाच्या मार्फत होमिओपॅथिक डॉक्टरांची नियुक्ती करणे सुरू केली आहे. परंतु या डॉक्टरांना त्या एलोपॅथीक दवाखान्यातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसवून त्या ठिकाणी होमिओपॅथीचे औषध सेवा उपलब्ध आहे ही माहिती बाहेर च्या रूग्णाला मिळण्यास विलंब होतो. तसेच या एलोपॅथीक दवाखान्यामध्ये होमिओपॅथिक औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मानसिकता ऍलोपॅथीच्या डॉक्टरांमध्ये नसल्यामुळे तो डॉक्टर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो. त्याचप्रमाणे होमिओपॅथीची फक्त बेसिक औषध वापरावी असा दंडक घातला असलयाचे दिसून येते. होमिओपॅथिची पेटंट औषधे लिहून देऊ नये अशा प्रकारे सुद्धा दबाव बरीच वैद्यकीय अधीक्षक मंडळी होमिओपॅथिक डॉक्टरांवर आणतात अशा प्रकारची माहिती आहे. खरं म्हणजे ज्याप्रमाणे ऍलोपॅथिक डॉक्टर वेगवेगळ्या कंपनीचे पेटंट औषध लिहून देतो त्याप्रमाणेच होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या आयुष डॉक्टर ला सुद्धा होमिओपॅथिक औषध चे प्रिस्क्रीप्शन लिहिण्यासाठी अधिकार आहेत परंतु ऍलोपॅथिक डॉक्टर गैरसमजा मुळे किंवा त्याच्या एकतंत्री नियंत्रणामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना अशाप्रकारे पेटंट औषधे लिहून देण्यासाठी सूट देत नाही अशी माहिती आहे. होमिओपॅथीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करावयाचा असल्यास जोपर्यंत होमिओपॅथिक डी.फार्म/ बी.फार्म/एम.डी झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत तोपर्यंत ज्याप्रमाणे आयुर्वेदिक फार्मसी सुरू करण्यासाठी जी सोपी पद्धत आहेत तशाच प्रकारे होमिओपॅथिक फार्मसी टाकण्यासाठी शासनाने सोपी पद्धत ठेवावी. तसेच होमिओपॅथिक डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करतात त्यांना होमिओपॅथीची औषधे विक्रीसाठी ठेवण्यासाठी अधिकृत परवानगी (लायसन्स) द्यावी. जेणेकरून प्रत्येक डॉक्टर्स स्वतःच्या नियंत्रणाखाली काही प्रमाणात औषधे विक्रीसाठी ठेवू शकेल. याचा फायदा रुग्णांना होमिओपॅथिक औषधे सहज उपलब्ध होण्यामध्ये होईल. असे झाल्यास होमिओपॅथीचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल यासाठी संघटना स्तरावर तसेच शासकीय स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे डॉ. दीपक केदार, एम.डी.(होमिओ) आशियाड काॅलनी, अमरावती 9860 778227
पाचोरा तालुका सहशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दिलीप भाऊ वाघ , चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी आठ वाजता “विश्व नवकार महामंत्र दिन” अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. हा विशेष कार्यक्रम भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, करुणा आणि विश्वकल्याणाचा संदेश आजच्या पिढीला समजावा, यासाठी नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनावर अध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव ठसविण्याचा उद्देश यामागे होता. भगवान महावीर यांची जयंती म्हणजे मानवतेच्या, संयमाच्या, सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा जागर. त्यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आणि नवकार महामंत्राच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरावी, या हेतूने दरवर्षी “विश्व नवकार महामंत्र दिन” देशभर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक भान जागृत केले. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राच्या उच्चारणाने झाली. विद्यार्थ्यांनी सुरेल आणि शुद्ध स्वरात मंत्र पठण करत वातावरणात एक अनोखी शांती निर्माण केली. या मंत्रातून निघणाऱ्या सकारात्मक स्पंदनांनी परिसर भारून गेला. नवकार महामंत्र हा जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि मूलभूत मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये कोणत्याही विशिष्ट देवतेचे नामस्मरण नसून, त्यात पंच परमेष्ठी – अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांचे गुणगान करण्यात आले आहे. म्हणूनच या मंत्राला ‘सर्वधर्मसमभाव’ आणि ‘मानवतेचा मंत्र’ असेही म्हटले जाते. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नवकार महामंत्र दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. त्यांच्या भाषणातून त्यांनी भगवान महावीरांच्या विचारांचा आणि नवकार महामंत्राच्या महत्त्वाचा उल्लेख करत संपूर्ण देशवासीयांना सत्य, अहिंसा व करुणेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये नव्या ऊर्जा व आत्मविश्वासाचा संचार झाला. या कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, राजेश जैन, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, सौ. अंजली गोहिल मॅडम आणि आर. बी. तडवी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी माहोल अनुभवायला मिळाला. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात नवकार महामंत्राच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या आचार-विचारात सकारात्मक परिवर्तन घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी भगवान महावीरांचे जीवनकार्य आणि त्यांनी मानवजातीसाठी दिलेले महान संदेश यावर सविस्तर माहिती दिली. पर्यवेक्षक ए. बी. अहिरे यांनी सांगितले की, या प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये नियमित राबविल्यास विद्यार्थ्यांचे नैतिक आणि मानसिक स्वास्थ्य अधिक सुदृढ होईल. कार्यक्रमात सहभागी झालेले शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थ्यांनीही या दिवशी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करून एकत्रिततेचे आणि शांतीचे दर्शन घडवले. सध्याच्या काळात विद्यार्थी विविध ताण-तणावांना सामोरे जात असतात. अशावेळी नवकार महामंत्रासारखे मन:शांती देणारे आणि जीवनात संतुलन निर्माण करणारे मंत्र विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये शिक्षकवर्गाचे विशेष योगदान होते. सौ. अंजली गोहिल मॅडम व आर. बी. तडवी यांनी विद्यार्थ्यांचे नवकार पठणाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांना मंत्राच्या उच्चारणातील अचूकता व भावनात्मकता यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मंत्र पठण करताना एकाग्रता, भावनिक समरसता आणि शुद्धता या सर्व गुणांचा परिचय दिला. कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या सामूहिक प्रार्थनेने झाली. भगवान महावीरांचे जीवन, त्यांच्या शिकवणुकीतील अंतर्मुखता, संयम, क्षमा, त्याग आणि करुणा यांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या गोष्टींचा जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले. ‘जगात बदल पाहायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू करा’ या भगवान महावीरांच्या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्येच आध्यात्मिक प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त केला. “विश्व नवकार महामंत्र दिन” या उपक्रमामुळे श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा या शाळेने विद्यार्थ्यांच्या मनामनात केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि आध्यात्मिक जागर घडवून आणला. नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली शाळेने नेहमीच समाजोपयोगी, विद्यार्थी-केंद्रित आणि मूल्याधिष्ठित उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्याच परंपरेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची आठवण विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ राहील, याची खात्री प्रत्येक शिक्षकाने व्यक्त केली. नवकार महामंत्र हे केवळ जैन धर्माचे प्रतीक नसून, मानवतेचा एक सार्वत्रिक संदेश आहे, हे जाणवले. एकता, शांती आणि कल्याण या तत्त्वांना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. या उपक्रमातून एक गोष्ट निश्चितपणे अधोरेखित होते – की विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता त्यामध्ये नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शिक्षणाचा हेतू व्यापक होत असून, विद्यार्थी भावी आयुष्यात समाजासाठी जाणीवपूर्वक योगदान देण्यास तयार होतात. शेवटी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले आणि भविष्यात अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करणार असल्याचे आश्वासन दिले.
जळगाव, दि.10 एप्रिल २०२५ – महावीर जयंती या पवित्र जैन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, गृह शाखा, आकाशवाणी चौक, जळगाव येथून क्रमांक-दंडप्र/1/कावि/2025/321, दिनांक 07/04/2025 रोजीचा अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार, दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी येणाऱ्या महावीर जयंती दिवशी, संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे. या निर्णयामुळे सामाजिक सलोखा, धार्मिक भावना आणि परंपरेला आदर देण्याचा संदेश प्रशासनाने पुन्हा एकदा दिला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीला महत्त्वपूर्ण पत्रआधारभूत ठरली आहेत. प्रथम, श्री ललित गांधी, अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ, मुंबई यांनी दिनांक 01/04/2025 रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. ही मागणी जैन समाजाच्या धार्मिक भावना व पवित्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. जिल्हा प्रशासनाने आपल्या आदेशामध्ये महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथील पत्राचा संदर्भ घेतला आहे. सदर शासन निर्णय क्र. संकीर्ण-10/2002/प्रक्र 111/नवि 27, दिनांक 28 मार्च 2003 अन्वये दरवर्षी महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाही प्रशासनाने या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशद्वारे कळविण्यात आले आहेत या प्रमुख यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यक ती उपाययोजना करून दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने पूर्णपणे बंद राहतील याची खात्री करणे अपेक्षित आहे. हे आदेश जिल्हा अप्परजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. महावीर जयंती हा जैन समाजासाठी अत्यंत पवित्र आणि अहिंसेच्या तत्वांवर आधारित सण आहे. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीसाठी करुणा, संयम आणि अहिंसा यांचे तत्त्व शिकवले. त्यांच्या जयंतीदिनी प्राणहिंसा होणार नाही याची खबरदारी घेणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने धार्मिक भावनांचा सन्मान राखला जातो आणि सार्वजनिक सलोख्याला चालना मिळते. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित व्यावसायिक व व्यापाऱ्यांना या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महावीर जयंतीच्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका कारवाई करणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापार्यांनी आणि मांस विक्रेत्यांनी या दिवशी स्वखुशीने आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्हा धार्मिक समजूतदारपणा व सहिष्णुतेचे उत्तम उदाहरण आज पर्यंत वर्षानुवर्षे दिसून आले आहे याच पार्श्वभूमीवर व परंपरा जपत सर्वधर्मसमभावाची ही भावना जपण्यासाठी यावेळी देखील अशा निर्णयांना समाजातील सर्व घटकांकडून पाठिंबा मिळणार असल्याचे दिसून येत आहे .जैन समाजाच्या श्रद्धास्थानाचा सन्मान राखत जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांना दृढ करणारा ठरत आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाने महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय केवळ आदेशापुरता मर्यादित न राहता तो एक व्यापक सामाजिक संदेश देणारा ठरत आहे. भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे ‘अहिंसा परमो धर्मः’ या तत्वाचा आदर करत संपूर्ण जिल्ह्यात शांतता, संयम आणि सलोखा नांदावा यासाठी प्रशासन, पोलीस, महापालिका, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन या निर्णयाला समर्थन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी शासनाच्या निर्णयासाठी कोणत्याही प्राण्यांची इच्छा न करण्याची भूमिका सर्व स्तरावर दिसत आहे. महावीर जयंतीचा हा शुभदिन यापुढेही वर्षानुवर्षे धार्मिक आस्था आणि सामाजिक एकोपा जपणारा ठरावा, हीच अपेक्षा! सर्व जैन धर्मीय बांधवांना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार खेळीमुळे गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने चौथा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणारा राजस्थान रॉयल्स विजयी मार्गावरून दूर गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीनंतर, राजस्थान रॉयल्स फक्त १५९ धावा करू शकले. प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात खराब झाली आणि कर्णधार गिलला फक्त २ धावा करता आल्या. यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी ४७ चेंडूत ८० धावा जोडल्या. दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर महेश थीकशनाने बटलरला पायचीत टिपले. त्याने २५ चेंडूत ५ चौकारांसह ३६ धावांची खेळी केली. बटलर गेल्यानंतर साईने शाहरुखसोबत भागीदारी केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी देखील तीक्षनानेच मोडली. १६ व्या षटकात त्याने शाहरुखला यष्टीचीत केले. शाहरुखनेही ३६ धावांची खेळी केली. ७ धावा काढल्यानंतर शेरफेन रदरफोर्डला संदीप शर्माने बाद केले. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या साई सुदर्शनला १९व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने झेलबाद केले. साईने १५४.७२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. या डावात त्याने ८ चौकार आणि ३ षटकारही मारले. या षटकात तुषारने रशीदची विकेट घेतली. यशस्वीने विचित्र शॉट खेळणाऱ्या रशीदचा झेल टिपला. रशीदने ४ चेंडूंचा सामना केला आणि १२ धावा केल्या. राहुल तेवतिया २४ धावा करून नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. अर्शद खानने यशस्वी जयस्वालला ६ धावांवर तंबूमध्ये पाठवले. पुढच्याच षटकात नितीश राणा झेलबाद झाला. त्याने ३ चेंडूंचा सामना केला आणि १ धाव काढली. यानंतर, कर्णधार संजू आणि रियान पराग यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. कुलवंत खेजरोलियाने परागला जोस बटलरकरवी झेलबाद केले. परागने २६ धावांची खेळी खेळली. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ५ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन अर्धशतक झळकावू शकला नाही. त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शुभम दुबेला फक्त १ धाव करता आली. जोफ्रा आर्चरने ४ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हेटमायरने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. तुषार देशपांडेने ३ धावा केल्या.