Home Blog Page 127

पाचोरा तालुक्यातील गरिमा निकित पाटील हिने MPSC कर सहायक परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला!

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील वडगाव टेक येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ स्वर्गीय ॲड. एच. एन. पाटील यांची नात कु. गरिमा निकित पाटील हिने MPSC मार्फत घेण्यात आलेल्या कर सहायक 2023 परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यात DT-A प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण कुटुंबासह पाचोरा आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
गरिमा ही निकित पाटील आणि सुवर्णा पाटील यांची कन्या असून, ती डॉ. अस्मिता पाटील यांची भाची आहे. तिच्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीमुळे तिने हे यश संपादन केले आहे. MPSC परीक्षेसाठी तिने अथक परिश्रम घेतले होते आणि त्याचे फळ आज तिच्या उज्ज्वल भविष्याच्या रूपात मिळाले आहे.
गरिमाच्या या यशाबद्दल संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवाराकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या यशाने पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
गरिमा निकित पाटील हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती भविष्यात आणखी मोठी शिखरे पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन संपन्न : पाचोऱ्याचे सुप्रसिद्ध रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांचे नेत्रसुखद प्रात्यक्षिक

0

Loading

पंढरपूर, दि. १० फेब्रुवारी:
महाराष्ट्रातील कला शिक्षक आणि कलारसिकांसाठी एक महत्त्वाचा सोहळा ठरलेले अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघ आणि सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन नुकतेच दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.                                           या दोन दिवसांच्या अधिवेशनात महाराष्ट्रभरातून आलेल्या कलाशिक्षकांना शैक्षणिक तसेच कलात्मक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्र, बदलते शिक्षण धोरण आणि कलाक्षेत्रातील भविष्यवेधी दिशा याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध मान्यवर कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि व्याख्याने आयोजित करण्यात आली.                                              या अधिवेशनात पाचोरा, जि. जळगाव येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक तसेच सुप्रसिद्ध रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिकाने संमेलनातील उपस्थित कलारसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.         रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा असतानाही आधुनिक युगात ती केवळ सणवारापुरतीच मर्यादित राहिली आहे. परंतु या कलेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य शैलेश कुलकर्णी यांनी आपल्या कुंचल्यातून केले आहे. त्यांच्या कुशल हातातून साकारलेल्या कलाकृती केवळ शोभिवंत नसून त्या आशयघन आणि प्रभावीही असतात.     यावेळी त्यांनी पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले. अतिशय बारकाईने साकारलेल्या या कलाकृतीने उपस्थित कलारसिकांना अवाक् केले. प्रात्यक्षिकादरम्यान त्यांनी रांगोळीच्या कलाप्रकारातील विविध तंत्र, रंगसंगती, सुसूत्रता आणि सूक्ष्म बारकावे यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.                            त्यांच्या या सादरीकरणाला राज्यभरातून आलेल्या कलाशिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवर कलावंतांनी भरभरून दाद दिली. उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी मार्गदर्शनही केले आणि रांगोळी हे केवळ पारंपरिक स्वरूपातील न राहता आधुनिक युगात कला आणि शिक्षण या दोन्ही माध्यमांसाठी कसे प्रभावी ठरू शकते यावर विशेष भर दिला.                                   या राज्यस्तरीय कला शिक्षक संमेलनात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रदर्शन सरचिटणीस शालिग्राम भिरूड, कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेले अनुभवी आणि नवोदित कलाशिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.           संमेलनात विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि कला प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कलाक्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत होणाऱ्या सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी कलाशिक्षणाचे महत्त्व आणि भविष्यातील संधी यासंबंधी तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.                                     कलाशिक्षण हे केवळ छंद जोपासण्यासाठी नसून ते विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. कलाविषयक शिक्षण विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच अशा संमेलनांच्या माध्यमातून कलाशिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश होता.                                                  या अधिवेशनात सादर झालेल्या कला प्रदर्शनांमधून विविध क्षेत्रातील कलावंतांनी आपली उत्कृष्ट कलाकृती सादर केली. यामुळे कलाक्षेत्रातील नवनवीन प्रयोग, सर्जनशीलता आणि कल्पकता यांना चालना मिळाली.                                      .              दोन दिवस चाललेल्या या संमेलनाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. उपस्थित कलाशिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या अनुभवातून भरपूर प्रेरणा मिळवली. कलाक्षेत्राच्या विकासासाठी आणि कलाशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.                                                   या राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने कलाक्षेत्राच्या भविष्यासाठी नव्या संधी निर्माण झाल्या असून, कलाकार आणि शिक्षणतज्ज्ञांनी या क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.                                    या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघ आणि सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांचे विशेष योगदान लाभले.    कलाक्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, सृजनशीलता आणि प्रतिभाशाली कलाकारांमुळे महाराष्ट्रातील कलाक्षेत्र अधिक समृद्ध होत आहे. शैलेश कुलकर्णी यांनी या संमेलनात केलेले उत्कृष्ट सादरीकरण हे त्यांचे कौशल्य आणि मेहनतीचे प्रतीक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

“पी.टी.सी. संस्था म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवणारे एक विद्यापीठ -डॉ. शामकांत देवरे

0

Loading

पाचोरा-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित “स्मृतिगंध” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या वेळी पुणे येथील सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहीर ऋतुजा माने यांच्या शाहिरी कार्यक्रम “महाराष्ट्राचा शाहिरी बाणा” याचे सादरीकरण करण्यात आले.
या शाहिरी सादरीकरणात महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित गीते सादर करताना शाहीर चंद्रकांत माने यांनी मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आपल्या ओजस्वी शैलीत त्यांनी “संस्कारक्षम माता हाच भविष्यातील तेजस्वी पिढी घडवू शकते” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
     आपल्या शाहिरीतून त्यांनी स्पष्ट केले की, “घराघरात मॉसाहेब जिजाऊ जन्माला यायला हव्यात, तरच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय मावळे घडतील. भावी पिढी संस्कारक्षम आणि सुसंस्कृत होण्यासाठी मातृशक्ती सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे.”
     शाहीर ऋतुजा माने यांनी आपल्या शाहिरीतून सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या कार्यालाही उजाळा दिला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून पटवून दिले.
     या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला आणि दिवंगत पदाधिकाऱ्यांचे स्मरण केले.
    यावेळी कै. द. मो. परांजपे, कै. बाबूभाई रावल, कै. माजी आमदार सू. भा. पाटील, कै. माजी मंत्री बापूसाहेब के. एम. पाटील, कै. माजी आमदार अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, कै. अॅड. आर. एस. थेपडे, कै. अॅड. भाईसो वाय. बी. शर्मा, कै. अॅड. एस. आर. देशमुख यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
      महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “पी.टी.सी. संस्था म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवणारे विद्यापीठ आहे. या संस्थेने आम्हा अधिकाऱ्यांना घडवून देशसेवेसाठी पाठविले आहे, हे आमचे भाग्य आहे.”
      या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्हि. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब दगाजी वाघ, संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, अर्जुनदास पंजाबी, खालील दादा देशमुख, प्रकाश एकनाथ पाटील, अण्णासाहेब वासूदेव महाजन, प्रा. भागवत महालपुरे, दादासाहेब योगेश पाटील, सिताराम पाटील सर, दत्ता आबा बोरसे, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. प्रशांत देशमुख (BOS चेअरमन, KBCNMU, जळगाव), सुचिताताई वाघ, ज्योतीताई वाघ यांनी विशेष मेहनत घेतली.
        या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील (पाचोरा महाविद्यालय), उपप्राचार्य दीपक मराठे (भडगाव महाविद्यालय), कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ तसेच संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिन्य यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी मानले.
     या शाहिरी सादरीकरणामुळे मराठी संस्कृती, स्वराज्य संकल्पना आणि जिजाऊंच्या महान कार्याची नवी उमेद श्रोत्यांना मिळाली.
       शाहीर चंद्रकांत माने यांच्या ओजस्वी शब्दांतून उमटलेला संदेश समाजमनात ठसणारा ठरला. “घराघरात जिजाऊ जन्मास याव्यात, तरच शिवबांच्या विचारांची पताका पुन्हा उंचावेल,” ही भावना या कार्यक्रमातून सर्वत्र पसरली.
   समाजाच्या उन्नतीसाठी, नव्या पिढीच्या घडणीसाठी आणि इतिहासाच्या उजळणीसाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची नितांत गरज आहे.
    शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने यांच्या शाहिरीने पाचोरा तालुक्यात इतिहासाचा जयघोष घडवला, हे निश्चित!

“माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश – पाचोरा तालुक्यात नव्या राजकीय युगाची सुरुवात!”- लक्षवेधी बातमी

0

Loading

पाचोरा -१० फेब्रुवारी २०२५ रोजी पाचोरा तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ माजवणारा आणि भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकणारा एक ऐतिहासिक निर्णय घेणारा दिवस ठरला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा औपचारिक प्रवेश होणार आहे. त्यानंतर पाचोरा तालुक्यातही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर स्वागत सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या निर्णयामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून दिलीपभाऊचा भाजप प्रवेश कार्यकर्त्यांना अपेक्षीत होता आता अधिकृत स्वरूपात अधोरेखित होत असून, या प्रवेशामुळे आगामी नगरपालीका , जिल्हा परिषद , पंचायत समिती सह विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला पाचोराभडगाव तालुक्यात अधिक प्रभावशाली बळकटी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून देशभरसह जिंल्हयात व पाचोरा तालुक्यात भाजपचा प्रभाव वाढत असून, अनेक नेते पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी घेतला, यामुळे त्यांनी मोठी संधी गमावल्याचे बोलले जात आहे. जर त्यांनी हा निर्णय पूर्वी घेतला असता, तर ?
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही ठोस कारणांवर आधारित हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो.          1 ) राजकीय स्थैर्य आणि विकासाच्या संधी :– भाजप सध्या केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर सत्तेत आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये राहणे फायदेशीर ठरणार आहे.
2) संकट मोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याशी थेट संपर्क :– भाजपचे वरिष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांचे संपूर्ण राज्यात मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपभाऊ वाघ यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अधिक बळ मिळू शकते.                                 3) तालुक्यातील भाजपची ताकद वाढणार – पाचोरा तालुक्यातील अनेक समर्थक भाजपच्या वाटेवर येण्यास इच्छुक होते, मात्र स्पष्ट दिशेचा अभाव होता. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशानंतर पाचोरा तालुक्यात भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तालुक्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
ना गिरीशभाऊ महाजनसह इतर मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला होता. अखेर त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.
“हा निर्णय उशिरा घेतला गेला असला तरी, तो योग्यच आहे. पाचोरा तालुक्याचा विकास, स्थानिक नेतृत्वाला चालना आणि भाजपच्या माध्यमातून अधिक प्रकल्प आणण्याची संधी मिळेल,” असे एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले.
.भाजप प्रवेशानंतर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण राजकीय तज्ञांचे लक्ष लागले आहे.
विकासकामांना वेग:- भाजपच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याची संधी उपलब्ध होईल.
संघटन बळकट होणार:- तालुक्यातील भाजपचे संघटन आणखी मजबूत होईल.
नवीन नेतृत्व घडवण्याची संधी: – दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकर्त्यांना मोठ्या संधी मिळतील.
स्थानिक पातळीवर सत्ता मिळवण्याचे प्रयत्न:- पाचोरा भडगाव नगरपरिषद, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद पातळीवर भाजपच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न होतील.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा निर्णय नसून, हा संपूर्ण तालुक्यातील व मतदार संघाचा राजकीय दिशादर्शक बदल ठरणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या विकासाला देखील गती मिळेल.
लवकरच होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून हा बदल अधिकृतरित्या साजरा केला जाणार आहे. पाचोरा तालुक्यातील राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल, यात शंका नाही!

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी, शनिवार या दिवशी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा केवळ एक करमणुकीचा कार्यक्रम न राहता, तो विद्यार्थ्यांच्या संस्कार, सामाजिक जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्ग संवर्धन आणि देशभक्तीच्या भावना वाढवणारा एक प्रेरणादायी प्रसंग ठरला.
       या शानदार सोहळ्यास जळगाव लोकसभेच्या विद्यमान खासदार स्मिताताई वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकरभाऊ काटे, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलालभाऊ जैन, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद कार्यकारिणी सदस्य नंदूभाऊ सोमवंशी, अमळनेर तालुका सरचिटणीस महेंद्र पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, अमळनेर विधानसभा विस्तारक राकेश पाटील, युवा मोर्चा पदाधिकारी शुभम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
                        कार्यक्रमाच्या       उद्घाटनप्रसंगी, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक भान, कर्तव्यदक्षता आणि चारित्र्यसंपन्नता यांचा आग्रह धरण्याची प्रेरणा दिली.
  .    कार्यक्रमाची सुरुवात वर्ग ६ वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. सुरेल आवाज आणि मनमोहक नृत्याच्या संगमाने हा सोहळा भक्तिमय झाला. यानंतर विविध प्रकारच्या नृत्य, गीत, नाट्य आणि सामाजिक संदेश देणाऱ्या प्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली.
देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक नृत्य:- विद्यार्थ्यांनी वीर जवानांना श्रद्धांजली वाहणाऱ्या नृत्यनाट्य सादरीकरणातून उपस्थितांना भारावून टाकले.
भावसाक्षरता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन:- विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लघुनाटिकांमधून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
गोंधळ आणि गोपाळकाला: पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.
निसर्ग संवर्धन आणि राष्ट्रीय जबाबदारी:-विद्यार्थ्यांनी निसर्गरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित संदेशमूल्य असलेले नृत्य व नाटिका सादर केल्या.
मोबाईल आणि बाह्य खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेश:- विद्यार्थ्यांनी या विषयावर प्रभावी नाटिका सादर करत पालकांना विचार करायला भाग पाडले.
या सादरीकरणांमधून शालेय जीवनातील शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे एक प्रभावी साधन असते, हे अधोरेखित झाले
        स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच विविध कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला.
खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासोबतच राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. देशप्रेम, निसर्ग संरक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि आरोग्यविषयक सवयी यांचा समतोल साधत शिक्षण घेतल्यास उज्ज्वल भविष्य घडेल.”
मधुकरभाऊ काटे यांनी वाहन विवेक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
नंदूभाऊ सोमवंशी आणि कांतीलालभाऊ जैन यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि योजनांविषयी माहिती दिली.
महेंद्र पाटील, गणेश पाटील, राकेश पाटील आणि शुभम पाटील यांनी युवा पिढीने जिद्द, चिकाटी आणि ध्येय निश्चयाने पुढे जाण्याचा सल्ला दिला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान आणि मार्गदर्शन
        कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे होते.
संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी , संजय चोरडीया , प्रिती जैन तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा यशस्वी झाला.
याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.
या भव्य सोहळ्याचे सुत्रसंचालन किरण बोरसे आणि विद्यार्थिनी अनुष्का पाटील, भूमिका पाटील (८वी), कनिष्का जैन, तनिषा माळी, श्रद्धा पाटील, अक्षरा पांडे (९वी) यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले.
  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नृत्य, नाट्य आणि गाण्यांचा मनोरंजन सोहळा न राहता, तो विद्यार्थ्यांच्या मनोविकासाचा, राष्ट्रीय भावना जागृत करणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारा आणि संस्कारक्षमतेकडे नेणारा एक प्रेरणादायी मंच ठरला.
    विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले, शिक्षकांच्या मेहनतीचा गौरव केला आणि प्रमुख पाहुण्यांच्या मनात शाळेच्या प्रगतीबाबत अभिमानाची भावना निर्माण केली.
जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या इतिहासात हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले!

केंद्रप्रमुख विनोद धनगर यांची राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड – शिक्षणक्षेत्रात मानाचा तुरा

1

Loading

पाचोरा – तालुक्यातील सारोळा जि प शाळेचे नामांकित केंद्रप्रमुख श्री विनोद धनगर यांची सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित “शिक्षणात संस्कृतीचे महत्त्व” या विषयावरील विशेष राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ही निवड जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून, त्यांच्या यशामुळे शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक शहर उदयपूर येथे दिनांक ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.                                        संपूर्ण भारतभरातून फक्त ४० शिक्षकांचीच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे, आणि त्यात जळगाव जिल्ह्यातून एकमेव श्री. विनोद धनगर यांचा समावेश झाला आहे. केंद्रप्रमुख म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेची ही दखल घेण्यात आली असून, राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. नुकतेच सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून अधिकृत डेप्युटी डायरेक्टर यांचे पत्र प्राप्त झाले असून, त्याद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.                             या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संस्कृतीचा शिक्षणात समावेश करून विद्यार्थ्यांना समृद्ध, नैतिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे. शिक्षण प्रणालीमध्ये भारतीय परंपरा, सण-उत्सव, नैतिक मूल्ये, आणि सांस्कृतिक घटक यांचा प्रभावी समावेश कसा करता येईल, याविषयी या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध राज्यांतील शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक धोरणे, संस्कृतीशी संबंधित शिक्षण पद्धती, वर्तणूकशास्त्र, आणि सर्जनशील अध्यापन तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चासत्र घेतली जाणार आहेत.                    विनोद धनगर हे गेल्या अनेक वर्षांपासून सारोळा (ता. पाचोरा) येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण व्यवस्थापन, अध्यापन आणि नवीन उपक्रम राबवण्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी वेळोवेळी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संस्कृती, कला, नाटक, संगीत आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे.                                             त्यांनी आपल्या केंद्रात शालेय विकास प्रकल्प, डिजिटल शिक्षण, कला व संस्कृती संवर्धन कार्यक्रम, बालगोपाळांसाठी नैतिक शिक्षण उपक्रम, तसेच स्थानिक परंपरांचे संवर्धन करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या प्रशिक्षणासाठी झाली आहे.                                     केंद्रप्रमुख श्री. विनोद धनगर यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेल्या निवडीबद्दल शिक्षण विभागातील अनेक मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.        जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील :- यांनी सांगितले की, “विनोद धनगर यांची निवड म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर संस्कारक्षम शिक्षण मिळते.”                                उपशिक्षणाधिकारी श्री. नरेंद्र चौधरी :-यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिक्षण रुजवण्यासाठी श्री. धनगर यांचे योगदान मोठे आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारांची दखल घेतली गेली आहे, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.”                                                        पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री. समाधान पाटील:- यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “विनोद धनगर हे नेहमीच शिक्षणासोबत संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत असतात. त्यांची राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेली निवड हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे.”    शालेय पोषण आहार अधिक्षक श्रीमती सरोज गायकवाड:- यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “संस्कृती आणि शिक्षण यांचा संगम असलेले अध्यापन हे काळाची गरज आहे. श्री. धनगर यांच्या सहभागामुळे शिक्षण क्षेत्राला नवा दृष्टिकोन मिळेल.”                                       उदयपूर येथे होणाऱ्या या विशेष प्रशिक्षणानंतर, श्री. धनगर यांना राष्ट्रीय पातळीवर विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळू शकते. तसेच, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून जळगाव जिल्ह्यातही संस्कृती-आधारित शिक्षण पद्धतींच्या विस्तारासाठी विविध .उपक्रम राबवले जातील.                                            या निवडीबद्दल श्री. विनोद धनगर यांनी साप्ता. झुंज & ध्येज न्युज संपादक संदीप महाजन यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले –
“शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते संस्कार व मूल्यांचा मजबूत पाया घालते. विद्यार्थ्यांना संस्कृतीशी जोडणे हे माझे ध्येय आहे. राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचा आनंद आहे आणि या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आपल्या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”                                                     श्री. विनोद धनगर यांची राष्ट्रीय स्तरावर झालेली निवड ही पाचोरा तालुक्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मेहनतीमुळे शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडणार असून, भविष्यात आणखी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना अशा राष्ट्रीय प्रशिक्षणांची संधी मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.                                  त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!

पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

0

Loading

विरार (गुरुदत्त वाकदेकर) : विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचा हळदीकुंकू समारंभ विरार पूर्व येथील भोयापाडा येथील सी बी एस सी स्कूलच्या सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओ जॉकी जगदीश संसारे म्हणाले, “महिलांनी आपले घर सांभाळत असताना, स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढायला हवा. आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करायला हवे.” शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सारीका रावत यांनी उपस्थित संस्कृती प्रेमी महिलांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आणि हळदीकुंकू समारंभ आपल्या मधील स्नेहभाव वृद्धिंगत करेल असा विश्वास व्यक्त केला. रावत यांनी पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी अल्प शूल्क आकारून पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.

या मंगल प्रसंगी रेडिओ जॉकी माधवी पवार यांनी आपल्या पहाडी आवाजात ‘अफजलखानाच्या वधाचा’ पोवाडा सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या कलाकार विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य आणि बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हळदीकुंकू समारंभात सहभागी झालेल्या महिलांनी विविध खेळांत भाग घेऊन बक्षीसे जिंकली.

विद्या तांबडी आणि संजिवनी किणी यांनी उस्फुर्तपणे कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. रक्षा भोया आणि जॉनिटा फर्नांडिस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

पथनाट्य कार्यशाळेद्वारे समाज जागृतीचा संदेश

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विभागाने प्रा. जगदीश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पथनाट्य कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींचा पथनाट्य हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. प्रत्येक विद्यार्थिनींना सहभागी करून प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्य कार्यशाळा घेतली.

प्रा. जगदीश संसारे म्हणाले, “पथनाट्य हे केवळ नाटक नाही तर ती एक चळवळ आहे, समाजाला जागे करण्याचे काम पथनाट्य चळवळ करित असते. आपल्या आवाजाच्या जोरावर, मिळेल त्या जागी, प्रचंड ऊर्जा निर्माण करून रस्त्यावर आपल्याच विचारात गुंग असणाऱ्या माणसांना जागे करते ते फक्त पथनाट्य.”

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यशाळेत प्रा. संसारे यांनी मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे, त्यावर आपले विचार मांडले. “केवळ आणि केवळ मराठीचाच अट्टाहास असावा. भाषेवर प्रेम करा, भक्ती असली तरी सक्तीची गरज नाही,” असे ते म्हणाले.

सदर कार्यशाळेत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमात असलेल्या पथनाट्यांतील दोन पथनाटये सादर करून दाखविली. त्यासंदर्भात प्रा. जगदीश संसारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी माधवी पवार हिने ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमुची’ या गीताने कार्यशाळेची सुरूवात केली. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार सेल्फ फायनॅन्सचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांच्या ओघवत्या शैलीत झाली.

*’म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर प्रा. नेहा भोसले यांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद*

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नेहा भोसले होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. व्याख्यानात प्रा. नेहा भोसले यांनी विद्यार्थिनींना म्हणींचे महत्त्व आणि त्यांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करावा हे सांगितले. त्या म्हणाल्या, “लोकजीवनातून आविष्कृत झालेल्या म्हणी भाषा अधिक समृद्ध बनवितात.”

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यात अनेक सुंदर म्हणींचा समावेश आहे, अशा विचारांचे विवेचन त्यांनी केले. तसेच, बोलीभाषेतील म्हणींचा अभ्यास आणि संकलन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमास प्रा. किरण जाधव, डॉ. रेखा शेलार, ग्रंथालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाशी सकारात्मक चर्चा – उमेश येवले

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची भेट उमेश येवले, जनरल सेक्रेटरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई, शिवडी तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष इसरार खान, शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र कदम आणि माजी वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र खानविलकर यांनी घेतली. या भेटीचा मुख्य उद्देश म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील उद्यान व मैदानांबाबत निवेदन देणे.

सदर भेटीदरम्यान, एक सकारात्मक चर्चा घडली, ज्यात महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गानेही सहभाग घेतला. निवेदनात दिलेल्या सर्व सूचना सहाय्यक आयुक्तांनी गांभीर्याने समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश दिले.

सदर चर्चेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांनी मुंबईतील उद्यान आणि मैदानांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

सदर सकारात्मक भेट आणि चर्चा निश्चितच नागरिकांसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास उमेश येवले यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!