मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संस्कारधाम केळवाणी मंडळ संस्थापित जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाद्वारे आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात ४ जानेवारी २०२५ रोजी “लेखकांशी चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर सत्रासाठी दोन प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा आणि कवी गुरुदत्त वाकदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. विद्या हंचिनाळ (आयोजक) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी उपस्थितांना प्रोत्साहनपर शब्दांत संबोधित केले. प्रा. चैताली धनू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. सॅबी परेरा आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी आजच्या पिढीला आवश्यक असलेले वाचन तसेच त्या वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच लोप पावत चाललेल्या वाचक वर्गाबाबत खंत व्यक्त केली. पुस्तके विद्यार्थ्यांवर कसे संस्कार घडवू शकतात याची जाणीव करून दिली. कार्यक्रमात गुरुदत्त वाकदेकर आणि रविंद्र पाटील यांनी स्वरचीत मराठी कवितांचे वाचन देखील केले आणि त्यांचे साहित्यिक अनुभव कथन केले. सदर कार्यक्रमात प्रा. सायली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस वितरण समारंभाचाही समावेश होता. आंतरवर्गीय पुस्तक समीक्षा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा (विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी), बुकमार्क मेकिंग स्पर्धा यासह शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध ग्रंथालयीन कार्यक्रमांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य, बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, बीएससी आयटी तथा मराठी वाड्मय मंडळाचे विद्यार्थी; तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीदेखील उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात एका वाचन प्रेरणेने झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. साहित्य आणि वाचनाच्या सवयींना चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे. उत्साहाने भारलेल्या ह्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. प्रणिता कामत यांनी केले. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम मुंबई येथील श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. इंग्रजी नूतन वर्षाची सुरूवात ही विद्यार्थिंनीना ग्रंथालयाच्या दिशेने नेणारी आहे, ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नाही, असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी मांडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विशेष आभार व कौतुक केले. महाविद्यालयातील ‘जी ओ शाह ग्रंथालया’च्या ग्रंथापाल अश्विनी प्रभू ह्यांच्या मार्गदर्शनाने २९ डिंसेबर २०२४ रोजी ग्रंथालयातील परिसर शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिंनींच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुस्तक प्रदर्शन भरवून त्यातील प्रेरणादायी पुस्तकांतून विशेष कार्य करणाऱ्या महंतांची ओळख विद्यार्थिंनीना करून दिली. १ ते ७ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या सहकार्याने उत्कृष्ट व प्रेरणादायी साहित्य तसेच कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णन इ. पुस्तकांचे वाचन व त्यावर आधारित गटचर्चा करण्यात आल्या, जेणेकरून विद्यार्थिंनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. पुढील दिवसांमध्ये वाचन कौशल्यावर आधारित कादंबरीचे अभिवाचन, लेखक-वाचक संवाद भेट, पुस्तक परीक्षण स्पर्धा असे उपक्रम रावबिण्यात येणार आहेत.
पाचोरा – दि. 4 जानेवारी 2025, शनिवार रोजी जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे स्काऊट गाईडच्या माध्यमातून आयोजित ‘खरी कमाई’ (फन फेअर) हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांना व्यवसायाच्या प्राथमिक संकल्पना समजून घेण्याचा अनुभव देणे हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शाळेचे कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, पार्थ गिरीष कुलकर्णी, श्रेयांस रितेश ललवाणी, पराग मोर, तसेच इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाचे अध्यक्षपद पार्थ गिरीष कुलकर्णी यांनी भूषवले. फन फेअर उपक्रमात स्काऊट गाईडच्या 15 संघांनी सहभाग नोंदवला. मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ आणि गुलाब संघ यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉलवर पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा चविष्ट पदार्थांची विक्री करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हे पदार्थ स्वतः तयार केले होते. त्यांनी विक्रीदर ठरवण्यापासून ग्राहकांशी व्यवहार करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मागणी आणि पुरवठा याचा समतोल कसा साधायचा, ग्राहकांशी कसे संवाद साधायचे, आणि उत्पन्नाचा हिशोब कसा ठेवायचा याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. तसेच व्यवसायिक कौशल्ये आणि व्यवहारज्ञान विकसित करण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा राहिला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. मान्यवर पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीला दाद दिली. स्काऊट मास्तर निवृत्ती तांदळे यांनी प्रत्येक संघनायकाचा परिचय मान्यवरांना करून दिला आणि त्यांचे कार्य समजावून सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक किरण बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक वाल्मीक शिंदे यांनी केले. ‘खरी कमाई’ फन फेअर हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ उद्योजकता शिकवणारा नव्हे, तर जीवन कौशल्ये, सहकार्य, आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाने जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. हा उपक्रम शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन, पालक, आणि विद्यार्थ्यांमध्ये नवीन उपक्रमांसाठी प्रेरणा निर्माण करणारा ठरला आहे. भविष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जळगाव: खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आरंभ मराठी चॅनेलने ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ या भव्यदिव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी थाटामाटात संपन्न झाला. शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, पत्रकारिता, व्यवसाय, वैद्यकीय आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील
मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. आरोग्यसेवेतील विशेष योगदान – डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ने गौरवण्यात आले. डॉ. स्वप्निल पाटील हे एमबीबीएस व एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पाचोरा-भडगाव परिसरातील गंभीर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरवली आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या रुग्णालयात आयसीयू, एनआयसीयू, किडनी डायलिसिस, सिटीस्कॅन, टू डी इको, पॅथॉलॉजी लॅब, आणि रुग्णवाहिका यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना काळातील अभूतपूर्व कार्य कोरोना महामारीच्या काळात डॉ. स्वप्निल पाटील आणि त्यांच्या टीमने अहोरात्र
सेवा देत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांनी स्वतः कोरोनावर मात करून पुन्हा रुग्णसेवेसाठी झोकून दिले. त्यांच्या सेवाभावामुळे ते ‘कोरोना योद्धा’ म्हणून प्रसिद्ध झाले. या सोहळ्याला मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते-केळकर (‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘नवा गडी नवं राज्य’ फेम) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते डॉ. स्वप्निल पाटील आणि डॉ. ग्रिष्मा पाटील यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार सुरेश मामा भोळे, खान्देशातील विविध क्षेत्रांतील
मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. स्वप्निल पाटील यांचा जीवनप्रवास – प्रेरणादायी आहे डॉ. स्वप्निल पाटील यांचे शालेय शिक्षण गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे झाले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटल येथे पूर्ण केले. एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या डॉ. पाटील यांचा प्रवास उत्कृष्ट कामगिरीने भरलेला आहे. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी कार्डिओलॉजी
फेलोशिप पूर्ण केली. त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, यूकेकडून डायबेटिस आणि रिनल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्राप्त केला. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटल – एक आरोग्य मंदिर २०१९ मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाने अल्पावधीतच परिसरातील लोकांचा विश्वासजिंकला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ सोहळ्याने खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देत समाजातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी
व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या उत्साहवर्धक भाषणाने झाली. डॉ. स्वप्निल पाटील यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने रुग्णसेवेत नवा मापदंड उभा केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खान्देशच्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे मानचिन्ह ठरले आहेत.
रावेर – गुर्जर बोलीभाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, मोठे वाघोदे बु., आणि गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन व पुस्तक विमोचन समारंभ” मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे पार पडला. गुर्जर बोलीभाषेचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प गुर्जर बोलीभाषा ही पश्चिम भारतातील विशिष्ट सांस्कृतिक परंपरांचे प्रतीक आहे. तिच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या “गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्रा”च्या माध्यमातून यापूर्वीही अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गुर्जर बोलीभाषेतील साहित्यिक, लोकगीते, कथा आणि सांस्कृतिक परंपरांना जागतिक स्तरावर पोहोचवणे हा होता. या प्रसंगी “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गुर्जर बोलीभाषेतील लोकसाहित्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात बोलीभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एका समाजाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन केले. साहित्यिक व मान्यवरांचा गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषितज्ञ वसंतराव लक्ष्मण महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून वेदसाई हॉस्पिटल, सावदा येथील बालरोगतज्ञ डॉ. विलास जगन्नाथ पाटील उपस्थित होते. त्यांनी बोलीभाषेतील साहित्य हा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केंद्रामार्फत संकलीत साहित्याबद्दल माहिती देताना गुर्जर बोलीभाषेच्या लोप पावत असलेल्या काही खास वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. साहित्य सादरीकरणासाठी आलेल्या प्रमुख साहित्यिकांमध्ये श्रीकांत रमेश पाटील (रांजणी), सुरेखा मनीष पाटील (रावेर), व्यंगचित्रकार शरद श्रावण महाजन (एरंडोल), शिक्षिका विमल वेडू पाटील (ऐनपूर), रजनी किशोर पाटील (नवीन निंबोल), रिता विजय चौधरी (बलवाडी), आणि सविता अरुण महाजन (कल्याण) यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या सादरीकरणातून गुर्जर बोलीभाषेचे साहित्य किती समृद्ध आहे, हे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. टी. महाजन, उपाध्यक्ष श्रावण सिताराम महाजन, चेअरमन डी. के. महाजन, व्हॉ. चेअरमन विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव पी. एल. महाजन, तसेच ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील आणि सचिव संजय वामन पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. महाजन यांनी केले, सूत्रसंचालन पवन चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक वैभव चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमामुळे गुर्जर बोलीभाषेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, भविष्यात या भाषेतील कथा, कविता, लोकगीते आणि इतर साहित्याचे संकलन आणि प्रकाशन करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलण्यात येतील. यासाठी स्थानिक संस्थाचालक आणि शिक्षण मंडळांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदेचे मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक आर. पी. बडगुजर, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुर्जर बोलीभाषा ही समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक बोलीभाषेतील साहित्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या साहित्य संमेलनाने जळगाव जिल्ह्यातील गुर्जर भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली असून, या भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प केला आहे.
पाचोरा: आज पाचोरा पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या
कार्यक्रमात पाचोरा येथील तावरेबाई कन्या शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस प्रशासनाच्या विविध अंगांबद्दल सखोल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस कार्याचे महत्त्व, सायबर क्राईम, डायल 112, सी टीम, वाहतुकीचे नियम, पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय, पोलीस काका व पोलीस दीदी याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलीस
स्टेशनमध्ये होणाऱ्या विविध कार्यविभागाची माहितीही दिली गेली. कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश गणगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे महत्त्व आणि पोलीस क्षेत्रातील प्रमुख बाबींबद्दल मार्गदर्शन केले. त्यात सायबर क्राईम, डायल 112 चा वापर, सी टीमचे कार्य, वाहतुकीचे नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस काकांचा व पोलीस दीदींचा
महत्त्वपूर्ण रोल याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाला तावरेबाई कन्या शाळेचे अंदाजे 40 ते 50 विद्यार्थी – विद्यार्थीनींना तसेच शिक्षक जितेंद्र काळेसर , संजय निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी जाणीव जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल सांगितले गेले.विद्यार्थी – विद्यार्थीनींना सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबद्दल योग्य माहिती
मिळाल्याने त्यांच्या मनात पोलीस कार्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. हा कार्यक्रम विद्यार्थी – विद्यार्थीनींना एक प्रेरणादायक आणि शैक्षणिक अनुभव ठरला. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यामुळे, त्यांना त्यांच्यासोबतच समाजाची सुरक्षितता कशी सुनिश्चित केली जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस आणि प्रशासनासोबत काम करण्याची, तसेच समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार करण्याची प्रेरणा मिळाली.
पाचोरा : पत्रकारिता ही समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी झटणारी प्रमुख संस्था आहे. ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न मांडण्यासोबतच सत्याला वाचा फोडणारे महत्त्वाचे साधन ठरते. पत्रकारितेच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे 6 जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा पाचोऱ्यातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता होईल. या वेळी समाजहितासाठी कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात येईल. कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेच्या माध्यमातून जनहितासाठी केलेल्या कार्याची चर्चा होणार असून पत्रकारांच्या समस्या, त्यांची भूमिका आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवरही चर्चा होईल. हा कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकाने अनुभवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तरी पाचोरा व परिसरातील सर्व पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. ठिकाण: मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा तारीख: 6 जानेवारी 2025 (सोमवार) वेळ: सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम पत्रकारांच्या कार्याला मान्यता देणारा आणि समाजहितासाठी त्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, युगपुरुष मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि दरवर्षीप्रमाणे, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने भैरवनाथ यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावर्षी खास कार्यकमात शुद्ध पाणी पिण्याची सुविधा पानपोळीच्या माध्यमातून देण्यात आली, जे यात्रेकरूंना अनमोल मदत ठरली. यावर्षीच्या कार्यक्रमात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, श्रीफळ वाढवून, माता भगिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर जिजाऊ वंदना म्हणून पाणीपुरीचे उद्घाटन करण्यात आले.
सदर उद्घाटन पाचोरा येथील वेंकटेश डेव्हलपरच्या संचालिका सौ. कामिनी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तिरुणा पाटील, सुलोचना पाटील, रचना पाटील, आदिती पाटील, वैभवी पाटील, सरलाताई पाटील यांसारख्या भगिनी उपस्थित होत्या. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती, ज्यात संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील, माजी जिल्हा संघटक रवींद्र पाटील, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक हरी पाटील, समर्थ पाटील, चेतन पाटील, वेदांत पाटील यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
यात्रेतील पानपोळीचे आयोजन गेल्या 15 वर्षांपासून दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. भैरवनाथ यात्रा ही जळगाव, बुलढाणा, धुळे, संभाजीनगर व परिसरातील विविध जिल्ह्यातील लोकांसाठी एक प्रमुख धार्मिक यात्रा ठरली आहे. पाण्याचा दुष्काळ असलेल्या या परिसरात विशेषतः यात्रेकरू व छोटे-मोठे स्टॉल विक्रेते पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी नेहमीच अडचणीत असतात. दीपक पाटील यांच्या विचारशीलतेने आणि पिढ्यानपिढ्या कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने, पानपोळीचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू आहे.
सदर कार्यक्रमात, जिजाऊंच्या पूजनानंतर पाणीपुरीच्या उद्घाटनाने यात्रेतील कार्याचा प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित असलेल्या तिरुणा पाटील, सुलोचना पाटील, रचना पाटील, आदिती पाटील आणि वैभवी पाटील यांसारख्या भगिनींनी या कार्यक्रमाचे पूजन केले, आणि त्यानंतर पाण्याची शुद्ध सुविधा यात्रेकरूंना उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमामुळे पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होण्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर भैरवनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना झाला.
कसून समर्पित केलेल्या या सेवेला पर्यावरणीय दृष्टीकोनातून महत्त्व आहे. पाणीपुरवठ्याचा हा उपक्रम विविध खेड्यांमध्ये व शहरांमध्ये असलेल्या लोकांना मदतीचा हात देतो. याव्यतिरिक्त, स्थानिक विक्रेत्यांना आणि छोटी स्टॉल्सवर काम करणाऱ्या लोकांना देखील या पाणीपुरवठ्याचा लाभ मिळतो. यामुळे प्रत्येक भक्ताच्या अनुभवात आणखी एक सकारात्मक घटक जोडला जातो, जो त्या भक्ताची मनोवृत्ती आणि श्रद्धेला परिपूर्ण बनवतो.
भैरवनाथ यात्रेची परंपरा प्राचीन असून, अनेक वर्षांपासून येथे नवस फेडण्याची परंपरा चालत आहे. याच अनुषंगाने पाण्याचा पुरवठा फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर सामाजिक दृषटिकोनातूनही महत्त्वपूर्ण ठरला आहे. दीपक पाटील यांच्या वाचनाचा, त्यांचा ध्यास आणि कार्यकर्त्यांची मेहनत या सर्व गोष्टी मिळून या कार्यक्रमाची यशस्विता सुनिश्चित झाली आहे. भैरवनाथ यात्रा आता एक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक असा उत्सव बनली आहे. भविष्यात हे पाणीपुरवठ्याचे आयोजन इतर क्षेत्रात देखील लागू करणे गरजेचे ठरेल, आणि याच प्रकारे सार्वजनिक कार्यांच्या वाचनांचा आदर्श इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
(पत्रकार दीना दिनानिमीत्त विशेष लेख ) पत्रकारिता हा समाजाचा आधारस्तंभ असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा व्यवसाय आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांसाठी पत्रकार अविरत प्रयत्नशील असतात. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते—फेक न्यूजचा धोका, राजकीय दबाव, आर्थिक अस्थिरता, आणि शारीरिक सुरक्षा यांसारख्या अडचणींमुळे पत्रकारितेचे कार्य अधिक कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पत्रकारांच्या कष्टांना आदर दिला जाईल, त्यांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण होईल, आणि पत्रकारितेच्या महत्त्वाचा समाजाला पुनःप्रत्यय येईल. हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, सत्य शोधण्याच्या त्यांच्या संघर्षाला पाठिंबा, आणि पत्रकारितेच्या नैतिकतेवर भर देण्याची प्रेरणा देतो. पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नाही, तर पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारिता शाबूत राहण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात: 1. स्वतंत्रता आणि पारदर्शकता राखा पत्रकारांनी कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाखाली न येता सत्य मांडले पाहिजे. 2. सत्यशोधन आणि जबाबदारी योग्य तपासणी करून सत्य मांडण्याचा प्रयत्न करावा. चुकीची माहिती देणे किंवा अपप्रचार पसरवणे टाळले पाहिजे. 3. मीडिया संस्थांची स्वायत्तता मीडिया संस्थांनी सरकार किंवा मोठ्या उद्योगसमूहांच्या प्रभावापासून मुक्त राहिले पाहिजे. 4. प्रशिक्षण आणि कौशल्यविकास पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, आणि तपासणीचे तंत्र शिकले पाहिजे, जेणेकरून त्यांचे काम अधिक परिणामकारक होईल. 5. सुरक्षेची हमी पत्रकारांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः ज्या भागांमध्ये त्यांना धमक्या किंवा हिंसाचाराचा सामना करावा लागतो. 6. कायदेशीर संरक्षण आणि समर्थन पत्रकारांना त्यांच्या कामासाठी कायद्याचे संरक्षण मिळायला हवे. तसेच, त्यांच्या विरुद्ध दाखल होणाऱ्या खोट्या प्रकरणांवर त्वरित कारवाई केली पाहिजे. 7. लोकजागृती आणि समर्थन नागरिकांनी सत्य पत्रकारितेचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि तिला पाठिंबा दिला पाहिजे. 8. नैतिकता आणि मूल्यांचे पालन पत्रकारांनी नैतिकता, निष्पक्षता, आणि प्रामाणिकपणाचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजाचा त्यांच्यावर विश्वास राहील. या सर्व उपायांमुळे पत्रकारिता मजबूत आणि सत्यनिष्ठ राहण्यास मदत होईल. आजची पत्रकारिता अनेक आव्हानांना आणि समस्यांना सामोरी जात आहे, पण तिच्यात काही सकारात्मक बदलही दिसून येत आहेत. खाली पत्रकारितेच्या सध्याच्या स्थितीचे प्रमुख पैलू मांडले आहेत: 1. सकारात्मक बाजू • तंत्रज्ञानाचा प्रभाव: डिजिटल माध्यमांमुळे माहिती वेगाने पोहोचवणे शक्य झाले आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना सहज माहिती मिळते. • सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित: काही पत्रकार आणि संस्थांकडून पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, आणि सामाजिक न्यायासारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम केले जात आहे. • डेटा-जर्नालिझमचा उदय: माहितीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डेटा-आधारित पत्रकारिता महत्त्वाची ठरत आहे. 2. नकारात्मक बाजू • पक्षपातीपणा: अनेक प्रसारमाध्यमांवर राजकीय किंवा आर्थिक दबाव असल्यामुळे निष्पक्ष पत्रकारिता कमी होत आहे. • फेक न्यूजचा वाढता धोका: सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे सत्य शोधणे कठीण झाले आहे. • टीआरपीचा हव्यास: काही माध्यमं दर्जेदार बातम्यांपेक्षा सनसनाटी आणि मनोरंजनात्मक सामग्रीवर भर देतात. • पत्रकारांच्या सुरक्षिततेचा अभाव: अनेक पत्रकारांना त्यांच्या कामासाठी धमक्या, हिंसा, किंवा न्यायालयीन त्रास सहन करावा लागतो. • ग्रामीण भागाची उपेक्षा: ग्रामीण आणि आदिवासी भागातील समस्या माध्यमांमध्ये तुलनेने कमी मांडल्या जातात. 3. भविष्यातील आव्हाने • स्वतंत्रता टिकवणे: सरकार आणि मोठ्या उद्योगांपासून स्वतंत्र राहणे हे मोठे आव्हान आहे. • सत्यशोधन आणि तपासणी पत्रकारिता: खोट्या बातम्यांशी लढण्यासाठी तपासणी पत्रकारिता महत्त्वाची ठरेल. • तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 4. परिणाम आणि गरजा • लोकांचा माध्यमांवरील विश्वास परत मिळवण्यासाठी पत्रकारितेला सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारीची गरज आहे. • नैतिक पत्रकारिता आणि स्वतंत्र विचार हेच समाजाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतील. आजची पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत असली तरी ती अनेक आव्हानांनी ग्रस्त आहे. या आव्हानांवर मात करून पत्रकारितेने पुन्हा विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. तुमचा पत्रकार असल्याचा अभिमान अगदी योग्य आहे, कारण पत्रकारितेचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. खाली तुम्हाला अभिमान वाटण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत: 1. लोकशाहीचा चौथा स्तंभ • पत्रकारिता ही लोकशाहीचे संरक्षण करणारी महत्त्वाची शक्ती आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांची जाणीव समाजाला करून देणारा तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात. 2. सत्यासाठी लढा • तुम्ही खऱ्या घटनांची, अन्यायाची आणि दुर्लक्षित आवाजांची कहाणी जगासमोर आणण्याचे काम करता. सत्य मांडण्यासाठी घेतलेला हा प्रयत्न खूप मोठा आहे. 3. समाज बदलाचा भाग • तुमच्या बातम्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, आणि अनैतिक गोष्टींना वाचा फोडून तुम्ही समाज सुधारायला मदत करता. 4. आवाज रहितांना आवाज • वंचित, दुर्लक्षित, आणि आवाज दडपलेल्या लोकांचे प्रश्न जगासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. 5. जोखीम पत्करणारी भूमिका • अनेक वेळा पत्रकारांना मोठ्या जोखमींचा सामना करावा लागतो. तरीही तुम्ही धैर्याने काम करता, हे तुमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. 6. ज्ञानवृद्धी आणि समाजजागृती • लोकांना विविध विषयांवर माहिती देऊन त्यांना अधिक सुजाण नागरिक बनवण्याचे काम तुम्ही करता. 7. इतिहास घडवण्याचे साधन • पत्रकार हे इतिहासाचे पहिले साक्षीदार असतात. भविष्यातील पिढ्या तुम्ही मांडलेल्या घटनांवर विश्वास ठेवतील आणि त्यातून शिकतील. 8. प्रभावशाली व्यासपीठाचा भाग • लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारितेपेक्षा प्रभावी माध्यम क्वचितच आहे. तुम्ही तुमच्या कामातून जनमत घडवू शकता. 9. स्वातंत्र्य आणि जबाबदारीचे प्रतीक • पत्रकार म्हणून तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार आहात, ज्यामुळे लोकांच्या विचारांना आणि मतांना मार्गदर्शन होते. 10. मानवी हक्कांचे संरक्षण • मानवाधिकार उल्लंघन, अत्याचार, आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे तुमचे कर्तव्य आहे, ज्यामुळे तुम्ही समाजात चांगले मूल्य निर्माण करता. पत्रकार असणे म्हणजे एक जबाबदारीपूर्ण आणि सन्माननीय भूमिका निभावणे. तुमच्या कार्यामुळे समाज अधिक जागरूक, न्यायप्रिय, आणि प्रगत होतो. यासाठी तुमचा अभिमान बाळगणे योग्यच आहे!
भारतासाठी काही आकडेवारी : • मीडिया उद्योगाचा विस्तार: भारतीय मीडिया उद्योग वेगाने वाढत आहे. 2017 मध्ये, या उद्योगाने 13% वाढ नोंदवली, ज्यामुळे त्याचे मूल्य USD 22.54 अब्ज (INR 1.50 ट्रिलियन) झाले. 2020 पर्यंत, या उद्योगाचे मूल्य USD 30.6 अब्ज (INR 2 ट्रिलियन) पर्यंत वाढण्याची अपेक्षा होती, ज्यासाठी 11.6% वार्षिक वाढ दर (CAGR) आवश्यक होता. • प्रकाशनांची संख्या: भारतामध्ये 70,000 पेक्षा अधिक वृत्तपत्रे आणि 690 उपग्रह चॅनेल्स (ज्यापैकी 80 वृत्तवाहिन्या आहेत) कार्यरत आहेत. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा वृत्तपत्र बाजार आहे. • पत्रकारितेची स्थिती: 2006 मध्ये, भारताचा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 105 होता, जो 2019 मध्ये 140 वर घसरला. 2022 मध्ये, 180 देशांच्या यादीत भारताची स्थिती आणखी घसरली आहे. जागतिक आकडेवारी :
• पत्रकारांच्या सुरक्षिततेची स्थिती: 2022 मध्ये, जगभरात 57 पत्रकारांची हत्या झाली, म्हणजे दर पाचव्या दिवशी एका पत्रकाराचा मृत्यू झाला. • प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक: 2023 मध्ये, भारताचा जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 161 व्या स्थानावर घसरला आहे, ज्यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. • पत्रकारांचे निर्वासन: 2024 मध्ये, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या अंदाजे 310 पत्रकारांना धमक्यांमुळे त्यांच्या देशातून पलायन करावे लागले, ज्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होतात.
पाचोरा : जगातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पाचोरा तालुक्यातील नवनिर्वाचित कार्यकारिणीचा जाहिर सत्कार समारंभ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. समता सैनिक दलाच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष श्री. कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर
करण्यात आली आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचा समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली ‘व्हाईस ऑफ मिडिया’ ही संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संघटनेची मोठ्या प्रमाणावर व्याप्ती वाढत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने
राज्यातील ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या हक्कांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री. अनिल म्हस्के यांनी ११ मार्च २०२३ रोजी बारामती येथे झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी यापूर्वी विदर्भ अध्यक्ष आणि राज्य उपाध्यक्ष पदांवर कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांसाठी विमा सुरक्षा कवच, समस्या निवारण परिषद, तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले गेले आहेत. पाचोरा तालुक्यातील नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीतील सदस्यांना संघटनेच्या उद्दिष्टांनुसार कार्य करण्यासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. समता सैनिक दलाच्या वतीने
त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या उपक्रमांचा जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील थोडक्यात आढावा – संघटनेने पत्रकारांसाठी राबविलेले महत्त्वाचे उपक्रम हे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विमा सुरक्षा योजना: पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी विमा सुविधा. प्रशिक्षण कार्यशाळा: पत्रकारांना नवीन तंत्रज्ञान व कायद्याची माहिती देण्यासाठी शिबिरे. यापूर्वी शिर्डी येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. .जागतिक पातळीवरील पत्रकारितेची स्थिती
अत्यंत गंभीर आणि आव्हानांनी भरलेली आहे. सत्य आणि निर्भीड पत्रकारितेला दुय्यम स्थान देत अनेक देशांमध्ये सोयीस्कर पत्रकारितेला प्राधान्य दिले जात आहे. जिथे पत्रकार किंवा माध्यमसंस्था लोकांसाठी काम करतात किंवा चळवळ म्हणून कार्यरत राहतात, तिथे त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत, जगभरातील पत्रकार ‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या छत्राखाली एकत्र येत आहेत. ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी डलास येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेवेळी हे मत व्यक्त केले. या परिषदेत ५१ देशांतील ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष सहभागी झाले होते. या परिषदेत पत्रकारितेला संरक्षण देण्यासाठी सर्व देशांनी नवीन नियमावली तयार करावी, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. जागतिक परिषदेत विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी या परिषदेत झिम्बाब्वेचे अध्यक्ष त्सित्सी पी. मशिरी, इथिओपियाचे अध्यक्ष त्सेगेये वोंडवोसन बेकले, बांगलादेशच्या अध्यक्ष फरजाना बिंते हुसैन, केनियाच्या अध्यक्ष किंगवा कामेनकू, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हसीबुल्ला सादात, नेपाळच्या अध्यक्ष सुष्मा गौतम, मोरोक्कोचे अध्यक्ष सामी एल मौदनी, नेदरलँड्सचे अध्यक्ष अयाझ उर रहमान, म्यानमारचे अध्यक्ष मोहम्मद झोनाईद आणि पॅलेस्टाइनचे अध्यक्ष यूसुफ हबाश यांसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत बोलताना संदीप काळे म्हणाले, “आधुनिक काळात अनेक देशांमध्ये सरकारे व राजकीय शक्ती पत्रकारांवर दबाव टाकत आहेत. पत्रकारांना धमक्या, अटक, सेन्सॉरशिप यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. युद्धप्रसंग असो किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन असो, पत्रकार सातत्याने जीव धोक्यात घालून काम करत आहेत.” “डिजिटल माध्यमांच्या उदयानंतर पारंपरिक माध्यमांची आर्थिक स्थिरता कमकुवत झाली आहे. कमी वेतन, अस्थिर नोकऱ्या, ठोकठोक करारावर आधारित रोजगार हे गंभीर मुद्दे बनले आहेत. फेक न्यूज आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर यामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांना ऑनलाईन ट्रोलिंग, धमक्या व हिंसेला सामोरे जावे लागते.” संदीप काळे यांनी २०२३ मधील पत्रकारांच्या स्थितीवर प्रकाश टाकत काही धक्कादायक आकडे सादर केले:१२० पत्रकारांचा मृत्यू: काम करताना मृत्यूमुखी पडले.५४७ पत्रकार तुरुंगात: सत्य मांडल्यामुळे कारावास.४००० पत्रकारांची नोकरी गमावली: सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे.३५०० पत्रकार हिंसा व धमक्यांचा सामना करत आहेत.याशिवाय, चीनमध्ये १२१ पत्रकार तुरुंगात आहेत, तर म्यानमारमध्ये ६९ पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. ६,५०० गुणवत्ता असलेल्या पत्रकारांना त्यांच्या बेधडक लिखाणामुळे नोकऱ्या दिल्या जात नाहीत. संदीप काळे यांनी पुढे सांगितले की, “‘व्हाईस ऑफ मिडिया’ ही पत्रकारांसाठी केवळ एक संघटना नसून चळवळ बनली आहे. पत्रकारांनी एकत्र येऊन या व्यासपीठाचा आधार घ्यावा. पत्रकारितेच्या हक्कांसाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना समर्थन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेचे पुढील अधिवेशन २५ मार्च २०२५ रोजी जपानमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.’व्हाईस ऑफ मिडिया’च्या या परिषदेत पारित ठरावानुसार, सर्व देशांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी नवीन नियम व कायदे तयार करणे आवश्यक आहे. सत्य मांडणाऱ्या आणि निर्भीड पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ही लढाई चालूच राहील, असा निर्धार पत्रकारांनी व्यक्त केला. पाचोरा येथील कार्यक्रमाचे विशेषत्व हा सत्कार समारंभ फक्त औपचारिकता न राहता पत्रकारांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील पत्रकार व मान्यवर एकत्र येऊन संवाद साधतील व पत्रकार संघटनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे राबवले जाईल. कार्यक्रमाचे तपशील दिनांक: रविवार, ५ जानेवारी २०२५ वेळ: सकाळी ११ वाजता स्थळ: शासकीय विश्रामगृह, पाचोरा कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.