पाचोरा – आदरणीय आमदार आप्पासाहेब किशोर पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ, वैशालीताई—आपणांस एक नम्र पण ठाम आवाहन. शेतकऱ्यांचं अनुदान प्रकरण मागच्या वर्षी जसं धुमाळलं होतं, तसं ते अजूनही पूर्ण मिटलेलं नाही आणि त्याच दरम्यान आता नव्या अनुदानातही तसाच प्रकार उघडकीस येतोय ही खरी शोकांतिका. महसूल प्रशासनाने धडा घेतला असेल, पारदर्शकतेची भाषा बोलत असेल असा अंदाज होता; पण प्रत्यक्षात मात्र जुनं पानच पुन्हा वाचावं तसं सुरू झालेलं दिसतं आहे. तहसीलदार साहेब स्वतःला निष्पाप, निष्कलंक, पारदर्शकतेचे मोठे पुरस्कर्ते म्हणवतात, पण वस्तुस्थिती अगदी उलट आहे. उपोषणाच्या दिवशीपासून सन 2019 पासून ते आज पर्यंत अनुदान
प्राप्त शेतकऱ्यांची यादी आजतागायत पूर्ण केली नाही. स्पष्ट लाभार्थ्यांची यादी मागितली—दिली नाही. उपोषणावर बसूनही पीडीएफ मागितली—देण्यास तयार नाहीत. शेवटी माहिती अधिकारातून विचारलं तर कारणं दाखवून माहितीच नाकारली. मग हे कसला पारदर्शकपणा आणि कसली जबाबदारी? आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या नाकाखालीच आजही त्याच प्रकारचे घोळ सुरू असल्याचे पुरावे हातात आले आहेत. एका शेतकऱ्याच्या अवकाळी नुकसानभरपाईसाठी केवायसी करताना नाव त्या शेतकऱ्याचंच, पण आधार क्रमांक आणि बँक खाती मात्र कोणाच्यातरीचं! एवढा मोठा फरक चुकून होतो का? की आतूनच काहीतरी ‘सेटिंग’ आहे याचा मोठा संशय आहे. मागच्या घोटाळ्याची पुनरावृत्ती सुरू असल्याचा पक्का अंदाज यावरून येतो. आपल्याकडून अजूनही न्यायाचीच अपेक्षा आहे. तहसीलदार असो, प्रांताधिकारी असो किंवा कोणताही वरिष्ठ अधिकारी—खरं काय आहे हे जनतेसमोर आलंच पाहिजे. जाहीर सभांमध्ये घोषणा, पत्रकार परिषदेत मोठमोठ्या बाता—याने शेतकऱ्यांच्या जखमा भरत नाहीत. मागच्या प्रकरणातही काही गरीब नोकरदार, भरतीसाठी अभ्यास करणारे तरुण, सामान्य कुटुंबं—यांना ढाल बनवून काही अधिकाऱ्यांनी आपलेच जवळचे माणसं वाचवण्याचा खेळ खेळला. “खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे” ही म्हण तिथे अगदी खरी उतरली. विकासासाठी राजकारण नको, एकत्र या—असं बोललं जातं. पण शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला टाकणाऱ्यांवर कारवाईची वेळ आली की हेच तत्व कुठं गायब होतं? आज खरी वेळ आहे पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र उभे राहण्याची. शेतकरी अनुदानात होणारी ही हेराफेरी म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या रक्तावरचा घाव आहे. म्हणून एकच विनंती—सर्वपक्षीय पत्रकार परिषद घ्या. संबंधित महसूल अधिकाऱ्यांना खुलेपणाने समोर आणा आणि ऑन द स्पॉट फैसला करा. पुरावे आमच्याकडे आहेत, प्रकरण ताजं आहे आणि लोकांना खरं जाणून घ्यायचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांवरील अन्यायाचा हा फेरा मोडता येईल. गावागावच्या जनतेला एकच अपेक्षा—न्याय मिळावा आणि चुकीचे वागणाऱ्यांना वाचवू नये.
पाचोरा – तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानातील अनियमितता, प्रशासकीय गोलमाल, माहिती देण्यास ना खूशी आणि आरोपींच्या बचावासाठी उभ्या राहणाऱ्या पद्धतीमुळे संपूर्ण महसूल प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात तहसीलदार विजय बनसोडे, त्यांच्याशी जवळीक असलेले काही व्यक्ती—त्यात आशिष काकडे व त्यांचे जवळचे नातेवाईक यांचाही समावेश—तसेच एवढा मोठा कोट्यावधीचा घोटाळा झाल्या नंतर आपल्या स्तरावरून कोणतीच भूमिकाच न घेणारे प्रांत अधिकारी भुषण अहिरे यांच्यावर शंकांचे सावट आणखी दाट झाले आहे. सर्वप्रथम धक्कादायक बाब म्हणजे माहिती अधिकारातून सत्य उघड व्हावे म्हणून शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनी मागितलेली माहिती देण्यास महसूल कार्यालयाने टाळाटाळ केली. २०१९ ते २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना किती अनुदान दिले गेले? कोणत्या नावांवर किती रक्कम जमा झाली? कोणाचे अर्ज का? प्रलंबित ठेवले गेले?या सर्वाची माहिती देणे बंधनकारकच नव्हे तर शासकीय आदेशानुसार असतानाही दिले गेलेले उत्तर सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे गोलमोल आणि दिशाभूल करणारे होते. करणे प्रविष्ट प्रकरण आणि मागितलेली यादी याचा काही संबंध नाही कारण ही यादी गुन्हा दाखल होणे किंवा घडण्याआधी सार्वजनिक झाली असती तर शेतकऱ्याचे रक्त पिणाऱ्या भामट्यांना व त्यांच्या पाठीराख्यांना ही संदेश मिळाली नसती शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याची सन्माननीय तहसीलदार बनसोडे साहेब जर सर्व काही माहीती पारदर्शक असेल तर माहिती द्यायला भीती कसली, हा प्रश्न संपूर्ण तालुका विचारत आहे. याच दरम्यान तहसीलदार विजय बनसोडे यांनी घेतलेली भूमिका आणखीच संशय वाढवणारी ठरली. एकीकडे ते स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत आहेत तर आपण या लोकांपुढे उघड चर्चा करण्यास किंवा जाहीर लोकदरबार घेण्यास कळू द्या माझी तहसीलदार चव्हाण के साहेब व आपल्या कार्यकाळात काय घडले काय दडले शेतकऱ्यांनी, पत्रकारांनी आणि नागरिकांनी अनेक वेळा आवाहन केले की, आपण निर्दोष असाल तर टाळाटाळ न करता आमच्या प्रश्नांना समोरासमोर उत्तर द्या, कॅमेऱ्यांसमोर बोला, अनुदान यादी जाहीर करा. पण या सर्व मागण्यांना फाट्यावर मारत त्यांनी शांतता आणि घुमजावच निवडला. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे अचानक फिर्यादी बनून त्यांनी स्वतःची स्वच्छता दाखवण्याचा प्रयत्न केला. “मी पीडित शेतकऱ्यांच्या बाजूने आहे” अशी स्वतःची भूमिका निर्माण केली गेली. तपास यंत्रणेकडून स्वतःकडे बोट वळू नये म्हणून ही एक पूर्वनियोजित वाट शोधण्याची पद्धत असल्याचा थेट आरोप आहे. या प्रकरणात तहसीलदार बनसोडे साहेबांचे निकटवर्तीय आशिष काकडे व त्यांच्या नातेवाईकांचे नावही सतत समोर येत आहे. कार्यालयात वारंवार उपस्थिती, काही फाइल्सशी संबंधित निर्णयांमध्ये हस्तक्षेपाचे आरोप, तसेच अनुदान प्रक्रियेशी संबंधित लोकांशी असलेली जवळीक यामुळे तेही संशयाच्या केंद्रस्थानी आले आहेत. या सर्व प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे काकडे याचा निलंबन आदेश बघितला तर त्यात निलंबनचे कारण नमूद केलेले नाही ही सर्वांत विचित्र आणि संशय वाढवणारी भूमिका आहे प्रांत अधिकारी भुषण अहिरे यांची. अनुदान घोटाळा महसूल कार्यालयाच्या अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर घडत असताना विभागीय पातळीवरील सर्वोच्च अधिकारी म्हणून त्यांनी अद्यापही एकही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यांनी चौकशी का सुरू केली नाही? जबाबदारांना निलंबित का केले नाही? अनुदान यादी जाहीर करण्याचे आदेश का दिले नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजही मिळालेली नाहीत. मौनामुळेच त्यांची भूमिका संशयात येते. नागरिक आता स्पष्ट विचारत आहेत—त्यांनी मौन कोणाच्या बचावासाठी ठेवले आहे? या सर्व घटनांदरम्यान एक गोष्ट स्पष्ट होते की सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न सतत होत आहे पाचोरा महसूल विभागाला माहीती अधि. अधिनियम -2005 चे कलम 8 (1) केव्हा व कुठे वापरले जाते व तसेच ते केव्हा कशासाठी वापरावे या संदर्भात प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे आर्थिक गुन्हा शाखेने याप्रकरणी मर्यादित आरोपी करून मे न्यायालयात जरी चार्जशिट दाखल केली पण भारतीय राज्यघटनेने दिलेले सर्वात मोठे संरक्षण म्हणजे न्यायव्यवस्था आजही जागी आहे. न्यायालयाचे दरवाजे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सदैव खुले आहेत आणि दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही न्यायदेवता सोडणार नाही, ही शेतकऱ्यांचे आंदोलक यांची ठाम भुमीका आहे. आज शेतकरी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे—२०१९ ते २०२५ पर्यंतची अनुदान यादी जाहीर करा,सर्वपक्षीय सर्व नेत्यांच्या साक्षीने लोकांसमोर जाहीर दरबार घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने उत्तर द्यावे, आणि तपास यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू द्यावे. या घोटाळ्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांचा घुमजाव, माहिती अधिकारात माहिती न देण्याची पद्धत, संशयितांशी असलेली जवळीक, फिर्यादी बनून सुटण्याचा प्रयत्न आणि प्रांत अधिकारी भुषण अहिरे यांची शांतता—या सर्वांनीच संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले आहे. शेतकरी आंदोलक यांचा एकच नारा स्पष्ट आहे— चव्हाणचे साहेबांच्या त शेवटच्या टप्प्यात 81 लाख मंजुरीचे व विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे साहेबांच्या काळातील शेतकरी अनुदानाचे व घोटाळ्याचे सत्य बाहेर आलेच पाहिजे, दोषी आणि त्यांना पाठीशी घालणारे सर्व उघडे पडलेच पाहिजेत, आणि शेतकऱ्यांचे हक्क पुन्हा मिळालेच पाहिजेत. कर नाही तर डर कशाला पहा काय दिले माहिती अधिकारात उत्तर
शेतकरी हितचिंतक,शेतकरी,शेतकरी पुत्र यांना विनंती आपणास ही बातमी योग्य वाटत असेल तर आपण आपल्या स्तरावर आपल्या गावातील परिसरातील सर्व ग्रुप वर व सोशल मीडियावर पाठवणेस विनंती
पाचोरा – शहरातील नगरपरिषद निवडणुकीचे मतदान यंदा शांत, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. सकाळपासूनच नागरिकांनी उत्साहाने मतदान केंद्रांकडे धाव घेतली. कुठेही गोंधळ नाही, पोलिस आणि कर्मचारी यांनी उत्तम समन्वय ठेवला, आणि नागरिकांनी लोकशाहीचा हक्क व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत मताधिक्याची नोंद केली. ध्येय न्यूज आणि झुंज वृत्तपत्रच्या प्रत्यक्ष पाहणीत शहरातील सर्वसामान्य मतदार यंदा मतदानाबाबत अधिक सजग आणि जबाबदार दिसून आला. “आपल्या शहराचा कारभार आपणच ठरवायचा” ही भावना सतत प्रकर्षाने जाणवत होती. पाचोरा शहरातील एकूण 59,084 मतदारांपैकी पुरुष 30,049, महिला 29,037 आणि इतर गटातील 6 मतदार आहेत. हे तिन्ही गट मिळून शहराचे लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ आहेत. पुरुष आणि महिलांचे प्रमाण जवळपास समान असल्याने निवडणुकीचा तोलही दोन्हीकडून सारखाच राखला जातो. यंदाच्या निवडणुकीत 40,660 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुषांनी 20,990, महिलांनी 19,664 तर इतर गटातील सर्व 6 मतदारांनी 100 टक्के सहभाग नोंदवला. पुरुषांचे मतदान किंचित जास्त असले तरी महिलांचा सहभागही महत्त्वाचा व निर्णायक राहिला. दुपारनंतर महिलांचे गटाने घराबाहेर पडणे दिसल्याने शेवटच्या दोन तासांत मतदानाचा वेग वाढल्याचे ध्येय न्यूजच्या पाहणीत स्पष्ट दिसून आले. निवडणुकीत 14 प्रभागांमध्ये मतदानाचे वेगवेगळे स्वरूप दिसले. काही भागांत सकाळीच मोठ्या रांगा दिसल्या, तर काही प्रभागांत दुपारनंतर अचानक वाढ झाल्याचे जाणवले. काही ठिकाणी वातावरण शांत, तर काही प्रभागात अत्यंत उत्साही होते—झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्यूजच्या टीमने या सर्व प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण केले. प्रभाग 1 मध्ये 65.06 टक्के मतदान झाले. मंद गतीने सुरू झालेला मतदानाचा टप्पा 11 नंतर वाढला. प्रभाग 2 मध्ये 71.31 टक्के मतदान झाले आणि हा प्रभाग शहरातील टॉप-5 मध्ये गणला गेला. प्रभाग 3 मध्ये 70.68 टक्के मतदान झाले आणि महिलांचा उत्साह विशेषत: उल्लेखनीय होता. प्रभाग 4 व 5 मध्ये अनुक्रमे 68.55 व 71.13 टक्के मतदान दिसले, तर प्रभाग 6 मध्ये केवळ 63.55 टक्के मतदान झाले. प्रभाग 7 मध्ये 68.19 टक्के मतदान आणि ‘इतर’ गटातील 4 मतदारांचे 100 टक्के मतदान नोंदले गेले. प्रभाग 8 मध्ये 68.69 टक्के मतदान, प्रभाग 9 मध्ये शहरातील सर्वात कमी म्हणजे 62.34 टक्के मतदान झाले. प्रभाग 10 मध्ये 68.25 टक्के मतदान शांततेत पार पडले, तर प्रभाग 11 मध्ये 69.41 टक्के मतदान झाले. प्रभाग 12 मध्ये 68.09 टक्के, प्रभाग 13 मध्ये तब्बल 79.88 टक्के—हा शहरातील सर्वाधिक मतदान झालेला उत्साही प्रभाग ठरला. प्रभाग 14 मध्ये 72.03 टक्के मतदान नोंदले गेले आणि विशेष म्हणजे येथे महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केले. संपूर्ण शहरात 68.82 टक्के मतदान नोंदले गेले. प्रभाग 13 सर्वाधिक तर प्रभाग 9 सर्वात कमी मतदानाचा प्रभाग ठरला. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान किंचित कमी असले तरी महिलांची मतदानातील जागरूकता आणि सक्रियता निवडणुकीतील निर्णायक घटक ठरणार आहे. इतर गटातील मतदारांनीही 100 टक्के मतदान करून लोकशाहीतील परिपक्वतेचा दाखला दिला. ध्येय न्यूज आणि झुंज वृत्तपत्र यांच्या संयुक्त पाहणीनुसार यंदा पाचोऱ्यातील नागरिकांनी मतदानाकडे केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही गंभीरतेने पाहिले. अनेक प्रभागांमध्ये मतदारांचे प्रमुख लक्ष स्थानिक विकास, व्यवहार्य आश्वासने आणि उमेदवारांच्या उपस्थितीवर केंद्रित होते. आर्थिक गोष्टींचा प्रभाव जाणवत असला तरी शहरातील मुस्लिम मतदारांचे मतप्रवाह हे संपूर्ण निवडणुकीचे अंतिम समीकरण ठरवणारा सर्वात निर्णायक घटक राहील, असे प्रत्यक्ष निरीक्षणात प्रकर्षाने दिसून आले. अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारसंख्या प्रभावी असल्याने त्यांची दिशानिर्देशित पसंती अंतिम निकालाकडे कलता तोल बदलू शकते—हे यंदाच्या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे राजकीय वास्तव ठरले आहे. या सर्व सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वपूर्ण प्रवृत्ती यंदा ठळकपणे जाणवली—निकाल कोणाच्याही बाजूने असला तरी मतदार मात्र गुंडगिरी, दादागिरी आणि अवैध धंद्यांच्या आधारावर दबाव निर्माण करणाऱ्या घटकांविरोधात स्पष्टपणे मतदान करण्याच्या मनस्थितीत होते. दहशतीमुळे अनेक नागरिक हे उघडपणे बोलत नसले तरी प्रत्यक्ष बुथपातळीवरील पाहणीत ते दबक्या आवाजातही “यावेळी गुंडगिरीला मत नाही” असे सांगताना ऐकायला मिळाले. स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भय वातावरण शहरात निर्माण व्हावे, ही भावना यंदा अनेक मतदारांच्या मनात आतून पेटलेली दिसली. निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांचा निर्णायक सहभाग. घरात अंतिम निर्णय प्रामुख्याने महिलाच घेत असल्याने त्यांच्या अपेक्षा, अनुभव, निष्ठा आणि उमेदवारांबाबतचा विश्वास हा अंतिम निकालावर मोठा परिणाम घडवणारा घटक ठरणार आहे. “कोण रोज दिसतंय, कोण काम करतं, कोण मुद्द्याला मुद्दा देते, कोण हाताशी येतं आणि कोण आर्थिकदृष्ट्या अधिक मदत करतं” या निकषांवर महिलांनी मतदानाचा वापर केल्याचे स्पष्ट आढळले. पाचोरा नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये सुनिता ताई (शिवसेना) आणि सुचिता ताई (भाजप) यांच्यात रोमहर्षक टक्कर पाहायला मिळत आहे. सुनीता ताई पाटील यांच्या बाजूने प्रचारातील सुबोध मांडणी दिसली, तर सुचिता ताई वाघ यांच्या प्रभाग निहाय मुद्द्यांना जोरकस प्रत्युत्तर देणारी टीम काही प्रमाणात मागे पडल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. माध्यमांचा पूरक आधार नसल्याने त्यांच्यावर काही मर्यादा जाणवल्या. एकंदर पाहता पाचोरा शहरातील मतदानाची टक्केवारी, महिलांचा उत्साह, मुस्लिम मतदारांचा प्रभावी हस्तक्षेप, गुंडगिरीविरोधातील मतदारांचा उभा राहिलेला विरोध, आर्थिक मुद्द्यांचे राजकारण, इतर गटाची जागरूकता आणि प्रभागनिहाय मतदानाचे वेगवेगळे उतार-चढाव—या सर्वांमुळे यंदाची निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची आणि निकालाच्या दृष्टीने अनिश्चित ठरली आहे. लोकशाहीची परिपक्वता आणि शहराच्या भविष्यासाठीचा दृष्टिकोन या निवडणुकीत स्पष्ट दिसून येतो. अंतिम निकालात या सर्व घटकांचा प्रभाव ठळकपणे उमटणार असून कोणत्या बाजूला लोकांचा निर्णायक कल आहे हे पाहणे आता सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे. “हे सगळं विश्लेषण जरी खरं असलं, तरी शेवटी राजकीय तोल संकट मोचक ‘जामनेरच्याजादुगारच्या हातातच’ आहे—असा संदेश मतदारांच्या पातळीवर स्पष्ट ऐकू येतो.”
पाचोरा – तालुक्यातील लोहटारच्या भूमीत जन्मलेल्या आणि समाजकारण, शिक्षण, सहकार व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अपूर्व कार्य करून अपार लौकिक प्राप्त केलेल्या कै. अण्णासाहेब शंकरराव गोटू महाजन यांना त्यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त स्नेहपूर्ण अभिवादन. मुळचे नामदेव पांडुरंग महाजन असलेल्या या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने शिक्षण घेत असताना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत समाजासाठी जगण्याची प्रेरणा मनात घट्ट रोवली. पुढे दत्तक विधानानंतर त्यांचे नाव शंकरराव गोटू महाजन झाले. 14 नोव्हेंबर 1912 रोजी जन्म घेऊन शिक्षणात उत्तम प्रावीण्य मिळवून त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली आणि शासन सेवेत नायब तहसीलदार, धरणगाव या पदावरही कार्य केले. परंतु दत्तक विधानानंतर त्यांनी शासन सेवा सोडण्याचा आणि पूर्णवेळ गावविकासासाठी स्वतःला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. गावाचा विचार प्रथम या तत्त्वाचे हे विलक्षण उदाहरण आजही प्रेरक वाटते. लोहटारमध्ये परतल्यानंतर ग्रामपंचायत स्थापन होताच गावकऱ्यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेवर अमोघ विश्वास ठेवत त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आणि आश्चर्य म्हणजे सलग 30 वर्षे ते बिनविरोध सरपंच राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात सार्वजनिक वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, माध्यमिक शाळा अशा अनेक सुविधा उभ्या राहिल्या. पुढे अण्णासाहेबांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांची जिल्हा लोकल बोर्डाच्या (आजची जिल्हा परिषद) सदस्यपदी निवड झाली. या काळात त्यांनी जिल्ह्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र लोहटारमध्ये आणण्याचा मान मिळवला. विचारांची प्रामाणिकता, नेतृत्वातील पारदर्शकता आणि लोकसंग्रहाची ताकद यामुळे ते जिथेही कार्यरत राहिले तिथे निवडणुका बिनविरोध होणे ही परंपराच बनली. त्यांच्या कार्यकाळात गांवातील दौलत बापुजी, मगन तात्या, बापु शेठ, रामदास अण्णा ,लालचंद कायठे, नाना पाटील, पुंडलिक अण्णा अशा सर्व जाती-धर्मातील ज्येष्ठांनी दिलेले सहकार्य हे त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचे प्रतिबिंब आहे. अण्णासाहेबांच्या कुटुंबात चार मुले व दोन मुली अशी आपुलकीची परंपरा लाभली. स्व. भिकाजी शंकरराव महाजन (उपशिक्षक), मोहन शंकरराव महाजन (उपशिक्षक), डॉ. जगदीश शंकरराव महाजन, स्व. जयवंत शंकरराव महाजन तसेच मुलींमध्ये स्व. शशिकला दत्तात्रय महाजन आणि सौ. प्रमिला नारायण चौधरी यांनीही त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेला. विशेषतः डॉ. जगदीश शंकरराव महाजन यांनी पाचोरा तालुक्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात केलेले कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल असे आहे. स्व.अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने डॉ जगदीश महाजन यांचे योगदान ग्रामपंचायतपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी लोहटार वि.का. सोसायटीचे चेअरमन, सुंदरबाई महालपुरे महाविद्यालयाचे चेअरमन (सन 2019 पर्यंत), पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन तसेच महाराष्ट्रातील नावलौकिक असलेल्या तात्कालीन फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन म्हणूनही कार्य केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा आजही कायम आहे. अण्णासाहेबांच्या प्रेरणेने त्यांची पुढची पिढी — नातवंडे व पणतवंडे — आर्थिक, शेती, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती. 5 डिसेंबर 1996 रोजी अण्णासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे विचार, कार्य आणि त्यांची विकासपर परंपरा आजही लोहटारच्या प्रत्येक घरात जिवंत आहे. एक साधा पण दूरदृष्टी असलेला माणूस आपल्या कर्तृत्वाने गावाचे भविष्य कसे बदलू शकतो याचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे अण्णासाहेब शंकरराव गोटू महाजन. 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त समाजहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकनेत्यास महाजन परिवार व झुंज वृत्तपत्र ध्येय न्यूज परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.
पाचोरा येथून गेल्या 18 वर्षापासून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे शा सकीय जाहिरात यादीत समावेश असलेले साप्ता.झुंज चा वर्ष 18 अंक क्र. 35 दि. 06 डिसे.2025 चा अंक आपणास सस्नेह सादर करीत आहे Dhyeya News & सा. झुंजसंपादक.. संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव (M.A.B.Ed) & Journalism *M0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510
पाचोरा – साइक्लिंग एसोसिएशन ऑफ इंडिया की ओर से ओडिशा राज्य के सांबळपुर में आयोजित राष्ट्रीय साइक्लिंग प्रतियोगिता में महाराष्ट्र की उभरती साइक्लिस्ट कु.मानसी किशोर महाजन ने अपनी अद्वितीय क्षमता, दृढ़ जिद और उत्कृष्ट प्रदर्शन के दम पर देशभर के प्रतिस्पर्धियों को पीछे छोड़ते हुए शानदार स्वर्ण पदक हासिल किया। 2 से 6 दिसंबर 2025 के दौरान ओडिशा साइक्लिंग एसोसिएशन द्वारा आयोजित 30वीं सीनियर, जूनियर और सब-जूनियर राष्ट्रीय साइक्लिंग प्रतियोगिता में मनासी ने 15 किलोमीटर इंडिविजुअल टाइम ट्रायल में प्रथम स्थान प्राप्त कर महाराष्ट्र का गौरव बढ़ाया। 2 दिसंबर 2025 को संपन्न हुई इस प्रतियोगिता में मनासी ने शुरुआत से ही प्रभावी गति, संतुलित नियंत्रण और आत्मविश्वास के साथ रेस पर पकड़ मजबूत बनाए रखी। देश के विभिन्न राज्यों से चयनित होकर आए सैकड़ों शीर्ष खिलाड़ियों की उपस्थिति में आयोजित इस उच्च दर्जे की प्रतियोगिता मे मानसी ने मात्र 00:24:29.881 मिनट में 15 किमी का अंतर पूरा किया। उनका औसत वेग 36.74 किमी प्रति घंटा दर्ज किया गया, जो सब-जूनियर आयु वर्ग के सर्वोच्च प्रदर्शन में गणला जाता है। मानसी मूलतः दूसराखेडा, तहसील पाचोरा, ह.मु. पुणे की निवासी हैं। वह दामोदर कृष्णा महाजन की पोती तथा किशोर दामोदर महाजन की पुत्री हैं। परिवार के प्रोत्साहन, कठोर मेहनत, अनुशासित अभ्यास और खेल के प्रति समर्पण के बल पर उन्होंने राष्ट्रीय स्तर की इस प्रतिष्ठित प्रतियोगिता में स्वर्ण पदक प्राप्त कर अपनी अद्वितीय क्षमता का भव्य प्रदर्शन किया। उनकी इस उपलब्धि से पाचोरा शहर सहित संपूर्ण महाराष्ट्र में हर्षोल्लास का माहौल है। सब-जूनियर गर्ल्स – 15 किमी इंडिविजुअल टाइम ट्रायल के अधिकृत परिणाम इस प्रकार हैं: स्वर्ण पदक – मानसी किशोर महाजन (महाराष्ट्र) समय: 00:24:29.881 मिनट, औसत वेग: 36.74 किमी/घंटा; रजत पदक – दीपिका फडतारे (कर्नाटक) समय: 00:25:50.505 मिनट; कांस्य पदक – सैखोम फ्लॉरेन्स देवी (मणिपुर) समय: 00:35:16.055 मिनट। प्रतियोगिता की शुरुआत से ही मनासी ने जिस दमदार तरीके से रेस पर नियंत्रण बनाए रखा, उसने विशेषज्ञों को भी प्रभावित किया। गति, साहस, स्टैमिना और रणनीति का संतुलित संयोजन साधते हुए उन्होंने प्रत्येक चरण में बढ़त कायम रखी और अंततः स्वर्ण पदक पर कब्जा जमाया। उनके इस शानदार विजय ने महाराष्ट्र के साइक्लिंग क्षेत्र में नई ऊर्जा का संचार किया है और युवा खिलाड़ियों के लिए वह प्रेरणादायक व्यक्तित्व बनकर उभरी हैं। सांबळपुर में आयोजित इस राष्ट्रीय स्पर्धा में देशभर से सैकड़ों खिलाड़ी उत्साहपूर्वक सहभागी हुए। कठिन ट्रैक, बदलते मौसम और तीव्र प्रतिस्पर्धा के बावजूद मनासी ने दिखाई हुई जिद, धैर्य और क्षमता की सर्वत्र प्रशंसा हो रही है। प्रशिक्षकों और साइक्लिंग संगठनों द्वारा मनासी को शुभकामनाएँ और बधाइयाँ प्राप्त हो रही हैं। मानसी की उत्कृष्ट उपलब्धि पर अखिल भारतीय गुर्जर परिषद की ओर से भी हार्दिक शुभकामनाएँ प्रदान की गई हैं। राष्ट्रीय अध्यक्ष एड. शांताराम महाजन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. सुरेशदादा पाटील, राष्ट्रीय सचिव संदीप महाजन आदि मान्यवरों ने मनासी को बधाई देकर उनके उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएँ व्यक्त की हैं। मनासी द्वारा प्राप्त यह स्वर्ण सफलता न केवल महाराष्ट्र का मान बढ़ाती है, बल्कि उनके आगामी खेल करियर में और भी बड़ी उपलब्धियों की आशा जगाती है। मेहनत, जिद और निरंतरता के बल पर हासिल की गई यह स्वर्ण छलांग देशभर के युवा खिलाड़ियों के लिए प्रेरणादायक सिद्ध होगी। Sambalpur National Championship: Manasi Mahajan’s Golden Leap; First Rank in India in the 15 km RaceThe National Cycling Championship organized by the Cycling Association of India in Sambalpur, Odisha witnessed a spectacular performance by Maharashtra’s emerging cyclist, Ku. Manasi Kishor Mahajan. With her exceptional skill, determination and consistent performance, she outshined competitors from across the country and clinched the prestigious gold medal. Held from 2 to 6 December 2025 by the Odisha Cycling Association, the 30th Senior, Junior and Sub-Junior National Cycling Championship became a memorable event as Manasi secured the first position in the 15-kilometre Individual Time Trial, bringing immense pride to Maharashtra. Manasi displayed strong control over the race right from the beginning, maintaining impressive speed, balance and confidence. Participating against hundreds of top cyclists selected from various states of India, she completed the 15 km distance in just 00:24:29.881 minutes. Her average speed was recorded at 36.74 km/h, which is considered an exceptional performance in the sub-junior category. Manasi hails from Dusra Kheda, Taluka Pachora, H.M.U. Pune. She is the granddaughter of Damodar Krishna Mahajan and daughter of Kishor Damodar Mahajan. With her family’s support, hard work, disciplined practice and dedication towards the sport, she achieved this remarkable success at the national level. Her victory has created an atmosphere of joy not only in Pachora but across Maharashtra. The official results of the Sub-Junior Girls – 15 km Individual Time Trial are as follows: Gold Medal – Manasi Kishor Mahajan (Maharashtra) Time: 00:24:29.881 minutes, Average speed: 36.74 km/h Silver Medal – Deepika Fadtare (Karnataka) Time: 00:25:50.505 minutes Bronze Medal – Saikhom Florence Devi (Manipur) Time: 00:35:16.055 minutes Manasi’s strong hold on the race from the very beginning impressed even the experts. With a perfect combination of speed, courage, stamina and strategy, she maintained her lead throughout and ultimately claimed the gold medal. Her splendid victory has infused new energy into Maharashtra’s cycling community, and she has become an inspirational figure for young athletes. Hundreds of cyclists from all over the country participated with great enthusiasm in this national event held in Sambalpur. Despite the challenging track, changing weather conditions and tough competition, Manasi’s determination and skill earned widespread praise. Coaches and cycling associations across the state have extended heartfelt congratulations to her. The Akhil Bharatiya Gurjar Parishad has also congratulated Manasi on her outstanding accomplishment. National President Adv. Shantaram Mahajan, Maharashtra State President Dr. Radheshyam Chaudhary, Dr. Sureshdada Patil and National Secretary Sandeep Mahajan conveyed their best wishes for her bright future. Manasi’s golden triumph has not only brought honour to Maharashtra but has also raised hopes for many more achievements in her future sporting career. Her success—achieved through hard work, determination and consistency—will continue to inspire young athletes across the country.
पाचोरा – ३ डिसेंबर २००५… हा दिवस आमच्या कुटुंबाच्या जीवनात वेदनेची, पोकळीची आणि आठवणींचा अथांग सागर घेऊन आला. आज त्याच दिवशी अखेरपर्यंत कर्तव्यनिष्ठ, स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्तीने जीवन जगलेल्या आमच्या प्रिय वडिलांची—स्वातंत्र्यसैनिक आणि पाचोरा नगरपालिका प्रशासनातील निष्कलंक ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर)—यांची २० वी पुण्यस्मृती. वीस वर्षांचा कालखंड मोठा वाटतो, पण आदरणीय अण्णासाहेब यांच्या आठवणींचे तेज इतके उजळ आहे की आजही त्यांच्या पावलांची चाहूल, त्यांचा आदर्श आणि त्यांची शिकवण मनात तितक्याच सामर्थ्याने जिवंत आहे. वेळ पुढे सरकतो, पण त्यांचा प्रभाव कधीच कमी होत नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या आंदोलनात कित्येक तरुणांनी स्वतःला झोकून दिले आणि त्यात आमचे आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) हे धैर्याचे तेजस्वी उदाहरण ठरले. स्वातंत्र्य ही त्यांच्या दृष्टीने केवळ संकल्पना नव्हती—ती त्यांची श्रद्धा, त्यांचे ध्येय आणि त्यांचा श्वास होता. राष्ट्रासाठी संपूर्ण मन, श्रम आणि आयुष्य अर्पण करण्याची त्यांची तयारी अढळ होती शालेय जीवनातच ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना येरवडा कारावासात सहा महिन्यांची कठोर शिक्षा भोगावी लागली. हा तुरुंगवास त्यांच्यावरील ब्रिटिशांचा दंड नव्हता, तर त्यांच्या राष्ट्रभक्तीचा सन्मान होता. त्या सहा महिन्यांनी त्यांच्या मनातील देशप्रेम अधिक पक्के झाले आणि त्यांना स्वातंत्र्याचा अमूल्य अर्थ अधिक उमगला. आम्ही त्यांच्या तोंडून त्या काळातील प्रसंग ऐकताना जाणवायचं की संघर्ष ही त्यांची ओळख नव्हती—ती त्यांची वृत्ती होती. आदरणीय अण्णासाहेबांचा आवाज त्या आठवणींनी अजूनही कानात घुमतो. स्वातंत्र्यानंतर पाचोरा नगरपालिकेतील ऑक्ट्रॉय विभागाची धुरा त्यांच्या हाती आली आणि त्यावेळी या विभागात जबाबदारी, प्रामाणिकता आणि शिस्त या तीन गोष्टींची नितांत गरज होती. आदरणीय अण्णासाहेबांनी मात्र ही भूमिका मोठ्या दक्षतेने आणि निष्कलंक वर्तणुकीने पार पाडली. नियम म्हणजेच नियम—या तत्त्वावर ठाम राहणारे आदरणीय अण्णासाहेब कोणतीही तडजोड मानत नसत. कोणत्याही पदाचा, कुणाचाही प्रभाव त्यांच्यावर चालत नसे. कधी कुणावर अन्याय होऊ नये आणि पालिकेचे नुकसानही होऊ नये—ही त्यांची तडफदार भूमिका होती. आजही पाचोर्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक प्रेमाने म्हणतात, “अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) कडक होते, पण नेहमी न्याय देणारे होते.आणि भ्रष्टाचाराचा रूपया सुद्धा त्यांनी कधी घेतला नाही” ही एकच ओळ त्यांच्यासोबतचे अधिकारी,कर्मचारी,आणि व्यापार पेठ ही त्यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा सार सांगते. घरात मात्र त्यांचे व्यक्तित्व वेगळे होते—प्रेमळ, काळजीवाहू आणि मार्गदर्शक. शिस्त आणि संस्कार हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. ते म्हणायचे, “शिस्त ही माणसाची संपत्ती आहे आणि स्वाभिमान हा त्याचा मुकुट.” त्यांच्या या तत्त्वांनी आम्हाला आयुष्यभरासाठी मानसिक बळ दिले. त्यांच्या कडक शब्दांमागेही प्रेमाचा, काळजीचा आणि योग्य मार्गावर नेण्याचा उद्देश दाटलेला असायचा. ३ डिसेंबर २००५ रोजी आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) आमच्यातून निघून गेले, आणि त्या दिवसापासून घरातील प्रत्येक श्वासात त्यांची उणीव जाणवते. पण त्याचवेळी त्यांच्या आठवणींतील प्रकाश आमच्या जीवनाला दिशा दाखवतो. त्यांच्या शिकवणीमुळेच आज आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक कणखर उभे राहू शकतो. वीस वर्षे उलटली असली तरी त्यांचे मूल्य, त्यांची विचारसरणी, त्यांची कार्यनिष्ठा आणि त्यांची उपस्थिती आजही तितकीच स्पष्ट दिसते. फोटो पाहिला की आदर जागतो, त्यांचे शब्द आठवले की मन बळकट होते, त्यांनी दाखविलेला मार्ग आठवला की अडचणी नगण्य वाटतात. आज त्यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक कृतीला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला नतमस्तक होत आहोत. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या निर्भय देशभक्ताला, येरवडा कारावासाची शिक्षा धैर्याने सोसणाऱ्या वीराला, प्रशासनात निष्कलंक सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला, आणि कुटुंबाच्या मनात संस्कार, धैर्य आणि शिस्त निर्माण करणाऱ्या पिता-पुरुषाला आज आम्ही विनम्र प्रणाम करतो. त्यांची शिकवण म्हणजे आमची संपत्ती, त्यांचा वारसा म्हणजे आमची शक्ती, आणि त्यांची स्मृती म्हणजे आमचा दिशा-दर्शक तारा. आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही एवढेच म्हणतो— “आदरणीय अण्णासाहेब, आपण आम्हाला दिलेला संस्कारांचा वारसा आम्ही आयुष्यभर जतन करू. तुमच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नम्र श्रद्धांजली.”. – शब्दांकन – सौ.शितल संदिप महाजन (स्नुषा)