Home Blog Page 32

जामनेर नगरपालिकेला नेतृत्वाचा ‘हॅटट्रिक’ मुकुट : सौ. साधनाताई गिरीष महाजन तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षा

0

Loading

जामनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड प्रक्रियेत आज जामनेर नगरपालिकेने ऐतिहासिक नोंद केली. जामनेर नगरपरिषदेस लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ. साधनाताई गिरीष महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर झाली असून सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होत नेतृत्वाचा मानाचा तुरा त्यांनी आपल्या माथी घेतला आहे. राजकीय संस्था, सामाजिक व व्यापारी क्षेत्रात निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. या सोबतच नगरपरिषदेत आणखी 5 नगरसेवक बिनविरोध निवडून येत, जामनेर शहरातील राजकारणात शांत, सुशासनाचा आणि एकमताचा संदेश देणारे चित्र आज पहायला मिळाले. जामनेर शहराने मागील दोन कार्यकाळात अनेक विकासकामांचे साक्षीदार होत सौ. साधनाताई गिरीष महाजन यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ असल्याचे आजच्या निवड प्रक्रियेतही स्पष्ट दिसून आले. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता मोहिम, महिलांसाठी विविध उपक्रम, नागरिक सुविधांचा विस्तार, नगरपरिषदेच्या प्रशासनात पारदर्शकता या अनेक विषयांत केलेल्या कामांमुळे त्यांच्या नेतृत्वाची छाप ठळक राहिली आहे. विकास आणि उत्तम प्रशासन हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू राहील, असे सविस्तरपणे सांगत त्यांनी पुढच्या काळात आणखी भरीव प्रकल्प राबवण्याचे संकेत आज दिले. बिनविरोध निवड होणे म्हणजे केवळ स्पर्धा नसणे असा अर्थ नसून, यात शहरातील सर्व पथकांचा एकमताचा आदर असतो. विरोधकांनीही सौ. साधनाताई गिरीष महाजन यांच्या नेतृत्वक्षमतेचा सन्मान राखत प्रतिस्पर्ध्याची नोंद दाखल न करणे म्हणजे लोकशाहीतील सौहार्द आणि सकारात्मक राजकीय संस्कृतीची जाणीव करून देणारी बाब आहे. राजकारणातील कटूता बाजूला ठेवत विकास प्राधान्य देणारे नेतृत्व शहराला लाभणे हेच खरे जामनेरकरांचे यश असल्याचा सूर शहरात उमटताना दिसला. सामाजिक संघटना, महिला गट, स्थानिक नागरिक, विविध व्यावसायिक संघटना यांच्यातही सौ. साधनाताई यांच्याविषयी अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. आज शहरभरातील कार्यकर्त्यांनी फटाके, गुलाल, पुष्पहार, आणि आनंदोत्सवाच्या शुभेच्छांनी साधनाताईंचा सत्कार केला. जामनेरच्या प्रगतीची दिशा कायम ठेवणारी सर्वसमावेशक लोकाधारित भूमिका हीच आमची प्रेरणा आहे, असे साधनाताई गिरीष महाजन यांनी प्रतिसाद देताना सांगितले. त्यांच्या नेतृत्वाची ‘हॅटट्रिक’ होत असताना नागरिकांनी दिलेला पाठिंबा हा आगामी काळातील जबाबदाऱ्या अधिक वाढवणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. परिणामी जामनेरचे राजकारण आज विकासाच्या समान सूत्राने बांधले गेले असल्याचा संदेश या निवडीमुळे स्पष्ट झाला आहे. या बिनविरोध निवडीचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे स्वागत होत असून जामनेर नगरपालिकेसाठी आगामी काळात कार्यक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक शासनाची नवी पायरी सुरू झाल्याचे शहरातून व्यक्त होत आहे. सौ. साधनाताई गिरीष महाजन यांच्यावरील विश्वासाने पुन्हा एकदा जामनेर शहराचा विकास अभिमानाने पुढे नेण्याची सुरूवात आज झाली असल्याचा आनंद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

पाचोऱ्यात ‘मुंबईचा वडापाव’ खेचतोय खवय्यांची गर्दी

0

Loading

पाचोरा – शहरातील छत्रपती संभाजी राजे चौक आता संध्याकाळी जणू खवय्यांची दरबार भरल्यासारखा दिसतो. भुयारी पुलापासून तर कॉलेज चौकापर्यंत हा रस्ता ‘खाऊगल्ली’ म्हणूनच ओळखू लागला आहे. आणि याच खाऊगल्लीत गेल्या पंधरा दिवसांपासून एक स्टॉल जोरदार लोकप्रिय होत आहे. नाव ऐकताच भूक वाढवणारं – “मुंबईचा वडापाव”! पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शेखर पाटील  आणि गाळण गावातील अमोल गायकवाड Mo. 7420888878 दोन तरुणांनी स्वतःची नोकरी सांभाळत रोज संध्याकाळी चार वाजल्यापासून हा वडापावचा स्टॉल सुरू केला. दिवसभराच्या कामानंतर त्यांनी मेहनत करून वेगळं काहीतरी करायचं ठरवलं आणि थेट मुंबईत मिळणारी अस्सल चव पाचोर्‍यात आणली. त्यांची ही धडपड आता खवय्यांच्या जिभेला इतकी भावली आहे की रोज संध्याकाळी या ठिकाणी जबरदस्त खवय्यांची रांग दिसते. या स्टॉलची खासियत म्हणजे इथली चव आणि स्वच्छता. इथे वडे आधी तयार करून ठेवले जात नाहीत. ग्राहकांच्या नजरेसमोरच ताजेतवाने वडे बनवले जातात. तीन चटकदार चटण्या, चांगल्या दर्जाचे तेल, मसाल्याची खास चव आणि स्वच्छतेला पूर्ण महत्त्व… त्यामुळे प्रत्येक घासाला ‘अस्सल मुंबईची झणझणीत चव’ मिळते. त्यामुळे एक वडा खाल्ला की ग्राहक दोन-तीन वडा पाव हमखास खाऊन जातो. विशेष म्हणजे इथे फक्त खाणारेच नाही तर पार्सलचाही धडाका असतो. रोज सहजपणे पन्नास ते शंभर वड्यांचे पार्सल नेले जाताना दिसतात. काहीजण स्वतः खाऊन मग घरीही वडापाव घेऊनच निघतात. एवढी गर्दी असल्यामुळे इथे वडा मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटे थांबावं लागतं. पण एवढं थांबल्यानंतर मिळणारी चव खवय्यांना इतकी आवडते की लोक प्रतिक्षा करूनही आनंदाने वडापाव खातानाच दिसतात. गर्दीत उभे असलेले लोक वडापावची चव, स्वच्छता आणि मुंबईसारखी झणझणीत चटणी याचं सतत कौतुक करताना ऐकू येतात. अनेक जण आपापल्या मित्रांना फोन करून “चल रे मुंबईचा वडापाव खायला” असं म्हणत त्यांना बोलावतात. काहींच्या चर्चेत तर पुढच्या वीकेंडला घरच्यांना घेऊन येण्याचाही प्लॅन ऐकू येतो. या ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीसोबत हा व्यवसाय सुरू करून दाखवल्यामुळे अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांची मेहनत, चिकाटी आणि चव यामुळे हा छोटासा स्टॉल आता पाचोर्‍यात चर्चेचा विषय बनला आहे. साधा वाटणारा वडा पाव आज त्यांच्या हातात ‘ब्रँड’ झाला आहे, आणि याच चवीमुळे ओळखही. सध्या मुंबईचा वडापाव हा पाचोर्‍यातील अनेक खवय्यांच्या संध्याकाळी ठरलेला ‘स्पेशल ब्रेक’ बनला आहे. जिभेला चव, डोळ्यासमोर स्वच्छता आणि खिशाला परवडणारी किंमत… एवढं सगळं एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. एकंदरीत… मुंबईची चव पाचोर्‍यात आली आणि खवय्यांनी तिला मनापासून दाद दिली!

कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगार भयभयीत ; पहाटेच्या सर्चमध्ये अनेकांना पोलीस ठाण्यात हजर

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरात काही महिन्यांपासून वाढत्या चोरी, मारामारी, अवैध वाळू उपसा तसेच हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांमुळे नागरिकांना कायम दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठोस कारवाईची वर्षानुवर्षे मागणी होत होती, ती अखेर पूर्ण होताना दिसत आहे. पाचोरा पोलिसांनी शहरात पहाटे घेतलेल्या भव्य कोम्बिंग ऑपरेशनमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश नागरिकांना मिळाला. या कारवाईचे संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. आज, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.00 ते 6.30 या वेळेत शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तपास मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनचे नेतृत्व मा. SDPO बापु रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी केले. यामध्ये पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि तब्बल 22 कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण टीमने शहरातील गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक धाड टाकत संशयितांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन अभिलेखावरील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना शोधण्यात आले. त्यामध्ये शरीराविरुद्धच्या 8 गुन्ह्यांतील आरोपी, मालाविरुद्धच्या 3 गुन्ह्यांतील आरोपी, वाळू चोरीमध्ये सामील 7 संशयित तसेच 5 हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची तपासणी करून त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या इतर घटकांनाही इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर NBW (Non Bailable Warrant) व BW (Bailable Warrant) असलेल्या आरोपींवरही कारवाई करण्यात आली. नॉन बेलिबल वॉरंट असलेल्या खालील 5 आरोपींवर बजावणी करण्यात आली आहे— 1) सचिन ऊर्फ कालू मिस्त्री रा. बाहेरपुरा, RCC 54/13 2) दिगंबर श्रीराम भोसले रा. हनुमाननगर 3) रमेश भगवान मराठे रा. सारोळा 4) प्रकाश हिरे रा. गाडगे बाबा नगर 5) पल्लवी उर्फ कडुबाई राहुल पाटील रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच BW अंतर्गत दोन आरोपींवरही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहाटेच्यावेळेला नागरिक झोपेत असताना पोलिसांनी केलेली ही मोठी मोहीम अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली. मात्र यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष बोलून या कारवाईचे स्वागत केले. काही व्यापाऱ्यांनीही पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “गुन्हेगारांना खरा धक्का बसला पाहिजे, तरच शहर सुरक्षित राहू शकते”, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. या कारवाईबाबत शहरात पोलीस दलाबद्दल आदर आणि विश्वास अधिक वाढला आहे. विविध समाजघटकांनी SDPO बापु रोहन, पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन केले आहे. पाचोरा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देत अशा प्रकारची नियमित कारवाई होण्याची अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. पाचोरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरुवात झालेली ही मोहीम केवळ एक कारवाई नसून, गुन्हेगारांना स्पष्ट इशारा असल्याचे जाणकारांचे मत आहे. “सार्वजनिक सुरक्षितता हीच प्राधान्याची बाब असून, कायद्याच्या चौकटीत राहून शहरात शांतता राखण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील,” असा संदेश पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे मनोबल खच्चीकरण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आता या उपक्रमाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी शहरात पाहायला मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पाचोरा पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीविरोधात एक निर्णायक अध्याय ठरत असून, शहर गुन्हेमुक्त करण्यासाठी सकारात्मक पाऊल म्हणून तिचे स्वागत होत आहे.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक;जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

0

Loading

जळगाव – दिनांक 19 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): – जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, सावदा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, रावेर, एरंडोल, फैजपूर या १६ नगरपरिषदांच्या मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायत तिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 16 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना यानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे.जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीत जिल्हाधिकारी श्री. घुगे हे अध्यक्ष आहेत. याशिवाय या समितीत पोलिस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती इमारत पहिला मजला, आकाशवाणी चौक, जळगाव ) यांच्याकडे अर्ज सादर करावेत. प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरात निर्मिती खर्चाचे देयक, जाहिरातीचा पेन ड्राईव्ह / CD आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती सोबत जोडाव्यात, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी केले आहे.

आज दि.20/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना यश लाभेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवे कार्य सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अनुदान घोटाळ्यात पाचोऱ्यातील ग्राहक सेवा केंद्र चालकास अटक; पत्रकार संदीप महाजन यांच्या लढ्याला मिळत आहे यश – एक एक आरोपी अटक होण्याचे सत्र सुरू “Wait and watch”

0

Loading

पाचोरा : शेतकऱ्यांच्या नावावर शासनाकडून मंजूर झालेल्या २०२२ ते २०२४ या कालावधीतील पिकांच्या नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम बनावट खात्यांद्वारे हडप केल्याच्या प्रकरणाचा गुन्हेगारी पाळणा दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. या घोटाळ्यातील आरोपींची संख्या वाढत असून, आता पाचोऱ्यातील ग्राहक सेवा केंद्राचा चालक भूषण बापूराव पाटील (वय २५, अरिहंत नगर, पाचोरा) यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पाचोरा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत अनेकांच्या सहकार्याने झालेल्या या अफरातफरीने संपूर्ण प्रशासनाच्या प्रामाणिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अनुदान घोटाळ्याचा मूळ पाया पाचोरा तहसील कार्यालयात असल्याचे पुढे आले असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचण्याऐवजी शासकीय कर्मचारी व काही बाहेरील व्यक्तींनी संगनमत करून ते स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. पाचोरा तहसीलमधील निलंबित लिपिक अमोल भोई आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी गणेश चव्हाण यांनी अनेक बनावट शेतकऱ्यांच्या नावाने खाते उघडून त्यावर अनुदान वळवले असल्याचे उघड झाले आहे. हे दोघेही काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे स्वतःहून आत्मसमर्पण करून नंदुरबार सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणात जिल्ह्यामधील आणखी एक मोठ्या पदावरील अधिकारी म्हणजे सारोळा खुर्द येथील तत्कालीन तलाठी आशिष कडुबा काकडे यासदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. तोदेखील सध्या नंदुरबार सबजेलमध्ये अटकेत आहे. या सर्व आरोपींनी एकत्रितपणे बनावट शेतकऱ्यांची नावे तयार करून शासनाकडून मंजूर झालेल्या भरपाईची रक्कम स्वतःच्या व इतर खात्यांमध्ये वळवली. या अनुदान घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत ६०९ पेक्षा अधिक बनावट शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान वितरित झाल्याचे समोर आले आहे. या अफरातफरीत तब्बल २ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. गणेश चव्हाण याचे वडील हेमंत चव्हाण (४८), विजय पाटील (४८, सारोळा खुर्द) व हर्षल सपकाळे (२२, वडगाव आंबे) यांच्यासह आता पाचोऱ्यातील ग्राहक सेवा केंद्र चालक भूषण पाटीलची अटक झाल्यामुळे तपास अधिक गंभीर होत आहे. अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता असून, या प्रकरणात अनेकांचा सहभाग उघड होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकारी सह पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लढा देत असलेले पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन हे या प्रकरणातील मुख्य तक्रारदार आहेत. त्यांनी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचा अपहार होत असल्याची माहिती मिळताच विविध स्तरांवर तक्रारी केल्या. फक्त तक्रारीच नव्हे तर त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले. त्यांनी २०१९ पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदानाचा पारदर्शक तपास व्हावा, दोषींना तातडीने अटक व्हावी, संशयित समितीऐवजी आर्थिक गुन्हे शाखेकडून स्वतंत्र तपास व्हावा, आणि न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमावे, यांसारख्या मागण्या सातत्याने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, हे प्रकरण नागपूर हिवाळी अधिवेशनात उठवण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शेतकऱ्यांचा पैसा खाणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना एकही सूट नाही; चुकीला माफी नाही. नंबर सर्वांचा लागणारच, फक्त नंबर कितवा लागेल हे ठरवण्याचा फरक असेल.” पत्रकार संदीप महाजन यांनी प्रशासनाला स्पष्ट चेतावणी दिली आहे की,  घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि जे कोणी दोषी असतील त्यांचे निलंबनच नव्हे तर त्यांच्या मालमत्तेची जप्ती करावी आणि शेतकऱ्यांची हडप केलेली रक्कम त्यांना परत मिळवून द्यावी. त्यांचा हा लढा न्यायाच्या दिशेने महत्त्वाची पायरी मानला जात आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाची लूट करणाऱ्या या भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध समाजात तीव्र रोष निर्माण झाला आहे. प्रशासन आणि पोलिस तपासाच्या गतीमुळे या प्रकरणातील खरे आरोपी किती मोठ्या प्रमाणात सामील आहेत हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु या लढ्याला व्यापक रूप देण्यामागे पत्रकार संदीप महाजन यांचे धैर्य, तपशीलवार पुरावे गोळा करण्याची त्यांच्या पत्रकारितेतील बांधिलकी, आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी चालवलेला सातत्यपूर्ण संघर्ष, ही मोठी कारणे ठरत आहेत. सरकार आणि प्रशासनाने या प्रकरणात आणखी कडक पावले उचलल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल, हा घोटाळा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भ्रष्ट योजनेपैकी एक म्हणून इतिहासात नोंदला जाईल.

भडगाव RTO ऑफिसात भोगळ कारभार; पैसे न दिल्यामुळे कल्पेश माने यांचं कागदपत्र अपलोड नाही, महाजन आंदोलनाला सज्ज

0

Loading

पाचोरा – राज्यभर आरटीओ ऑफिस म्हटलं की एजंट, दलाली, पैसे घेणं-देणं हे आता अगदी नेहमीचं झालंय. कोणाकडून तरी पैसे खाल्ले तरच काम होतं, नाहीतर सरकारी ऑफिसात काम लटकतं, फिरवत ठेवलं जातं. असंच काहीसं पाचोरा तालुक्यातील कल्पेश माने या साध्या तरुणाच्या बाबतीत भडगाव आरटीओ ऑफिसात घडलं. कल्पेश माने यांनी कोणत्याही एजंटकडे न जाता थेट सरकारी ऑफिसात जाऊन लर्निंग लायसन्ससाठी कागदपत्रं दिली. कायदेशीर फी भरून, संगणक चाचणी देऊन सगळी कामं व्यवस्थित केली. त्यावेळी ऑफिसातील कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला एक महिन्यानंतर कायमस्वरूपी लायसन्ससाठी बोलावू”, असं सांगितलं. पण जेव्हा एक महिना झाल्यावर कल्पेश पुन्हा ऑफिसात गेले, तेव्हा त्यांना सतत “उद्या या, परवा या, चार दिवसांनी या” असं म्हणत फिरवत ठेवण्यात आलं. शेवटी तर असं सांगण्यात आलं की “तुमच्या लर्निंग लायसन्सची कागदपत्रं आम्ही सिस्टमवर अपलोडच केलेली नाहीत, आता पुन्हा लर्निंगला लागेल, पुन्हा एक महिना वाट बघा.” म्हणजेच पुन्हा फी भरा, पुन्हा वेळ द्या, पुन्हा चकरा मारा. हे सगळं एका साध्या युवकाला फक्त एजंटकडून पैसे न दिल्यामुळे करावं लागतंय, असं स्पष्ट दिसतंय. भडगाव आरटीओ ऑफिसात एजंटांचाराजाच सुरू आहे. त्यांच्या हाताखाली, ठराविक रक्कम भरली की काही तासांत काम होतं. कागदपत्रं अपलोड, डेट ठरवणं, लायसन्स देणं — सगळं एका झटक्यात. पण जो माणूस कायदेशीर मार्गाने, सरकारी ऑफिसात थेट येतो, तो मात्र “हरामाचा माल नाही दिला” म्हणून टेहळणीला लावला जातो. साधा नागरिक पैसे देत नाही म्हणून त्याला त्रास देणं, मुद्दाम काम न करणं, कागदपत्रं अपलोड न करणं, हे सरळसरळ भ्रष्टाचारचं काम आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी यावर जोरदार भूमिका घेत, भडगाव आरटीओ ऑफिसासमोर तंबू लावून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशा मोठ्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. तसेच ऑफिसात एजंटांचे जाळं थांबवावं, ड्रायव्हिंग स्कूलची आणि त्यांच्या वाहनांची तपासणी करावी, ग्राहकांकडून किती आणि कशासाठी पैसे घेतले जातात याची नोंद तपासावी, पावत्या मागाव्या, फिटनेसची कागदपत्रं तपासावीत अशाही मागण्या पुढे आणल्या आहेत. कल्पेश माने यांना तात्काळ कायमस्वरूपी लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संदीप महाजन यांनी दिला आहे. या आंदोलनाला वाहनधारक, तरुण विद्यार्थी, ड्रायव्हिंग लायसन्स घेणारे लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात असं बोललं जातंय. ही लढाई फक्त एका व्यक्तीची नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची आहे, असंही महाजन यांनी ठामपणे सांगितलं. आता भडगाव आरटीओ ऑफिसातील गैरप्रकार थांबणार का? की अजूनही दलालांच्या हातातच ऑफिस चालत राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.

२२ वर्षांनंतर जागृती विद्यालय पाचोरा — २००२-०३ बॅचचा सोनेरी क्षणांनी भरलेला स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा — काळ कितीही पुढे गेला, वर्षे कितीही सरली, तरी शाळेच्या आठवणी मनात कायम ताज्या राहतात. अगदी हाच अनुभव जागृती विद्यालय, पाचोरा येथील २००२-०३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा घेतला. रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नाथ मंदिर, जारगाव येथे आयोजित हा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा जुन्या आठवणींच्या गंधात, मैत्रीच्या ऊबेत आणि शिक्षकांच्या आशिर्वादात दणदणीत यशस्वी ठरला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि क्षणोक्षणी हा सोहळा अधिक रंगत गेला. या विशेष मेळाव्याची शान वाढली ती आपल्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर प्रेरणा देणाऱ्या मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीमुळे. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोकुळ पाटील सर, माजी मुख्याध्यापक राजेंद्र वाणी सर, आजी मुख्याध्यापक राजू सावंत सर, ज्येष्ठ शिक्षक डी.पी. पाटील सर, टी.आर. पाटील सर, आर.पी. बाविस्कर, नितीन वाघ सर, दिगंबर पाटील सर, देविदास पाटील सर, संजय वाघ सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी मोठा सन्मान ठरली. शिक्षकांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे धडे देत मनःपूर्वक आशीर्वाद दिले. अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्या जुना शाळेचा काळ पुन्हा अनुभवला. या मेळाव्याचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती. आज जीवनात विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असलेले हे सर्व विद्यार्थी या दिवशी फक्त ‘जुने विद्यार्थी’ म्हणूनच एकमेकांमध्ये मिसळले होते. कुणी डॉक्टर, कुणी पोलीस अधिकारी, कुणी उद्योजक तर कुणी शासकीय सेवेत काम करणारे—परंतु या ठिकाणी सर्व जण बालमित्रांसारखेच आनंदात एकत्र आले. त्यांनी आपल्या बावीस वर्षांच्या प्रवासातील अनुभव, संघर्ष, यशकथा आणि आठवणी सगळ्यांसमोर शेअर करत जुन्या दिवसांना उजाळा दिला. मेळाव्यात शाळेतील तासिका, पारंपरिक खेळ आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व जण बालकाळातील मित्रांसारखेच या खेळांत गुंतून गेले आणि संपुर्ण वातावरण हास्य-विनोदाने भारून गेले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पीएसआय श्री वाल्मिक एकनाथ महाजन यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथे पीएसआय पदावर गेल्याबद्दल सर्व मित्रांनी त्यांचे कौतुक करत जोरदार दाद दिली. त्याचप्रमाणे चेतन पाटील, मच्छिंद्र पाटील, वैभव पाटील, शशिकांत ठाकरे, गणेश देवरे, किशोर चौधरी, अपर्णा अहिरे, राकेश पाटील, संतोष सपकाळे, विजय सावळे, विश्वनाथ अहिरे, गुंजन सोनार, श्रीराम पवार, अलका वराडे, कुणाल देवरे, संजय अहिरे, रूपाली वाणी, श्याम ठाकरे, मुकेश सुतार, प्रज्ञा शिंदे, रवी सोनवणे, आदिनाथ पाटील, प्रशांत सोनवणे, महेश पाटील, योगेश देवरे, राहुल सोनवणे, सुरेश बागुल आणि ललिता ब्राह्मणे अशा अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समाधान पवार यांनी केले. तर पीएसआय वाल्मिक महाजन, संतोष सपकाळे, चंद्रकांत पाटील आणि प्रफुल ठाकरे यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करत शाळा, शिक्षक आणि मित्रांबद्दलचे भावविश्व उलगडले. या स्नेहमेळाव्यास मधुर खान्देश वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन आणि प्रवीण बोरसे यांची उपस्थिती विशेष ठरली. पत्रकार राहुल महाजन यांनी मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या एकतेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनाचा संपूर्ण भार समाधान पवार, प्रशांत चव्हाण, कन्हैया देवरे, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रफुल ठाकरे, समाधान पाटील, मनोज पाटील, उपेंद्र मगर, विकास ब्राह्मणे आणि सुवर्णा पाटील यांनी सांभाळत अखंड मेहनत घेतली आणि कार्यक्रम अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न केले. शेवटी, २००२-०३ बॅचच्या या स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले की शाळा फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्यभर जोडून ठेवणारा भावनिक धागा आहे. आनंद, आठवणी आणि मैत्रीने भारलेला हा दिवस सर्वांच्या मनात वर्षानुवर्षे ताजा राहणार आहे.

पाचोरा देशातील ‘गुन्हेमुक्त शहर’ जाहीर करावं

0

Loading

पाचोरा – सध्या राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलंय. अशावेळी अनेक शहरांत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केल्याच्या बातम्या झळकत आहेत. पण पाचोऱ्यात मात्र अशी कोणतीही कारवाई दिसली नाही. कारण एकच—इथे कारवाई करायला गुन्हेगारच नाहीत!


पाचोरा शहराची परिस्थिती कायमच शांत आहे. इथले साधे नागरिक, व्यापारी, पत्रकार—सगळेच स्वतःला सुरक्षित मानतात. पत्रकार तर एवढे सुरक्षीत आहेत त्यांना चौकात मारहाण करणे तर दुरच साधे तिरक्या नजरेने सुद्धा त्यांच्याकडे पाहण्याची कोणाची हिंम्मत होत नाही घरात घुसून मारामाऱ्या, दुकानदारांना धमक्या, हफ्ते उकळणे, गुंडांच्या टोळ्या फिरवणे, अवैध धंदे चालवणे, पोलीसांना भर बाजार पेठेत किंवा पोलीस स्टेशन मध्ये येऊन शिव्या देणे अशा गोष्टी सत्ताधारी असो की विरोधी राजकीय नेते असो राजकीय व शासकीय आर्शिवादाने पाचोरा शहरात असे प्रकार जवळजवळ ऐकूच येत नाहीत. त्यामुळे पाचोरा शहरात कोणावर पोलिसांनी कुठली कारवाई करावी, हा यक्ष प्रश्न आहे.त्यामुळे पोलिसांकडून जवळ-जवळ प्रेस नोट देणे किंवा गुन्हा दाखल च्या बातम्या प्रसार माध्यमांना, जिल्हा माहिती कार्यालयापर्यंत अथवा प्रशासनापर्यंत दिल्याच जात नाही
राज्यातल्या इतर शहरांमध्ये पोलिसांना दिवसरात्र गुन्हेगारांना पकडण्यासाठी पळावं लागतंय, पण पाचोरात मात्र अशा कोणत्याच बातम्या नाहीत. हे पाहून सहज म्हणता येईल
“अहो, पोलिस कारवाई कशी करणार? पाचोरा शहरात गुन्हेगारच नाहीत!”
कारण राजकीय मान्यवर व जळगाव पोलीस अधिक्षक यांच्यामुळे नांद्रा येथील अवैध धंद्याचा व उत्राण येथील वाळूच्या ठेक्या वरील रात्र दिवस बेटाईम चालणारे वाळूचे ओव्हर डंफर यांचा त्रास सोडला तर पाचोरा शहर व तालुक्यात अवैध धंदे नाहीत, गुंडगिरी नाही, धमक्या नाहीत, हप्ते नाहीत… त्यामुळे पोलिस आणि गुंड , अवैध धंदेवाले यांच्यातील ‘व्यवहार’ही नाहीत. म्हणूनच पोलीस – महसुल रॅकॉर्ड व कारवाई नुसार पाचोरा हे महाराष्ट्रात नाही, तर देशभरात असं एकमेव शहर म्हणता येईल जिथे रेकॉर्डवरील गुन्हेगार जवळपास नाहीतच.
जिल्ह्यात एक- दोन नव्हे तर तीन-तीन मंत्री असताना पाचोराचं हे सत्य राज्यच नव्हे तर केंद्र सरकारपर्यंत पोहोचावं, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. पण काही नागरिक उपरोधाने म्हणतात—
“हे सांगायला इथल्या पदाधिकाऱ्यांची लायकीच नाही!”
आजूबाजूच्या शहरांत निवडणुकीआधी गैंगवार, धाकधपका, पोलिसांचं अँक्शन असे प्रकार दिसतात; पण पाचोरात मात्र रात्री-दिवस शांतता. इथल्या लोकांमध्ये एकजूट आहे, भांडणं कमी आहेत, गुन्हेगारीला खतपाणी घालणारी जमीनच नाही. त्यामुळे गुन्हेगार पाचोरात यायला तयारच होत नाहीत.
म्हणून “सरकारनं पाचोरा शहराला देशातील ‘गुन्हेमुक्त आदर्श शहर’ घोषित करावं. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,डी वाय एस पी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करावे कारण इथली शांतता म्हणजे बाकीच्या शहरांसाठी धडा आहे.” शेवटी लोकांची चिमटा काढणारी टिप्पणीच सगळं सांगून जाते— राजकीय व पोलीस प्रशासनामुळे
“इथे गुन्हेगार नाहीत, गुंड नाहीत, अवैध धंदे नाहीत… मग पाचोरा शहराला गुन्हेमुक्त घोषणेचा मिळायलाच हवा

आज दि.19/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!