Home Blog Page 42

कोजागरी पौर्णिमा : लक्ष्मी-इंद्र पूजन, रात्रभर जागरण व नवान्नाचा शुभारंभ

0

Loading

पाचोरा ( समाधान गुरुजी ) आश्विन महिन्यातील पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आश्विन शुक्ल पौर्णिमेला येणारी कोजागरी पौर्णिमा ही या वर्षी सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. या रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची विशेष पूजा केली जाते. कोजागरी या शब्दाचा अर्थच ‘जागरण करणारा’ असा आहे. या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे भक्त जागरण करून मंत्रोच्चार, भजन-कीर्तन व पूजापाठ करतात, त्यांच्यावर ती प्रसन्न होते. श्रद्धाळूंनी या दिवशी रात्री जागरण करून सुख, समृद्धी, आरोग्य व ऐश्वर्य यासाठी प्रार्थना करावी, अशी धार्मिक परंपरा आहे. या शुभ पौर्णिमेला घराघरांत लक्ष्मी व इंद्र पूजन केले जाते. पूजा संपल्यानंतर फुलांची अर्पण (पुष्पांजली) केली जाते. नैवेद्य म्हणून नारळाचे पाणी, पोहे, आटवलेले दूध इत्यादी पदार्थ अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय आणि उपस्थित भाविक यांनी प्रसाद ग्रहण करावा. पौर्णिमेच्या या पवित्र रात्री घरात किंवा मंदिरात जागरण केले जाते. भजन, कीर्तन, मंत्रोच्चार, श्लोक पठण यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. असे मानले जाते की लक्ष्मी माता या रात्री जागरण करणाऱ्या भक्तांच्या घरी येते आणि त्यांना आयुष्यभर सुख-समृद्धीचे आशीर्वाद देते. धार्मिक शास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमा ही केवळ लक्ष्मीपूजेसाठीच नव्हे तर कृषिप्रधान समाजात नवे धान्य वापरण्याच्या प्रारंभासाठीही महत्त्वाची आहे. या दिवसापासून नवान्न प्राशन सुरू करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांनी नुकत्याच कापणी केलेल्या ताज्या तांदुळाचा किंवा धान्याचा याच दिवशी प्रथम सेवन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. याला आग्रयण असेही म्हटले जाते. याच दिवसापासून कार्तिक महिन्यातील पवित्र स्नानाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. यंदा नवान्न पौर्णिमा मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याचे ओवाळन करण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीनुसार आई-वडील किंवा घरातील मोठी मंडळी ज्येष्ठ मुलाला दीपप्रज्वलन करून ओवाळतात आणि त्याच्या मंगलमय जीवनासाठी आशीर्वाद देतात. हे सर्व विधी पंचांगानुसार ठरवलेल्या मुहूर्तातच करावेत, असा शास्त्रार्थ सांगितला जातो. धार्मिक आख्यायिकेनुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीं लक्ष्मी माता आकाशातून पृथ्वीवर भ्रमण करते. जी घरे स्वच्छ, सजवलेली असतात, जिथे भक्त जागरण करून भजन-कीर्तनात रमलेले असतात, मंत्रोच्चार व पूजापाठ करतात, त्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होऊन स्थायिक होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी बहुतेक ठिकाणी संपूर्ण रात्रभर भक्तिभावाने जागरण केले जाते. काही ठिकाणी विशेष कीर्तन, जागरण सोहळे, सामूहिक भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केले जाते. याशिवाय आश्र्विन पौर्णिमेला पती-पत्नींनी एकत्र पूजन करून एकमेकांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीची प्रार्थना करणे शुभ मानले जाते. या दिवशी केलेला पूजाविधी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि येणाऱ्या काळातील आर्थिक व कौटुंबिक प्रगतीसाठी मंगलसूचक ठरतो, अशी भावना भक्तांमध्ये आहे. धर्मशास्त्रानुसार पंचांगात दिलेल्या तारखा व मुहूर्तांचा आदर करूनच कोजागरी पौर्णिमा, नवान्न प्राशन व ज्येष्ठ अपत्याचे ओवाळन करावे. ६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आणि ७ ऑक्टोबरला नवान्न प्राशन तसेच ज्येष्ठ अपत्य ओवाळण्याचा सोहळा पार पाडल्यास कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान प्राप्त होते, असा पारंपरिक विश्वास आहे. संदर्भ : पंचांग व धार्मिक परंपरा – श्री गजानन गुरु गोविंदराव कुलकर्णी                                    शब्दांकन – समाधान गुरुजी जारगाव ता. पाचोरा जि.जळगाव
Mo.- 9822588170

आज दि.05/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषकामातील अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : लाल

वृषभआज आर्थिक स्थैर्य राहील. व्यवहारात सावधगिरी ठेवा. मित्रमंडळींचा आधार मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनसंवादातून नवे लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. शिक्षण करिअरमध्ये प्रगती होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयमाने काम करा. आरोग्य जपा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहनोकरीत व्यवसायात यश मिळेल. सामाजिक मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक बाजू मजबूत होईल. जुने प्रश्न सुटतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : निळा

तुळमहत्वाची कामे पूर्ण होतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. घरगुती वातावरण सुखकर राहील.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकआज अचानक खर्च होऊ शकतो. संयमाने निर्णय घ्या. नोकरीत तणावपूर्ण वातावरण संभवते.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : जांभळा

मकरकामातील प्रगती निश्चित आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक लाभ मिळेल. कौटुंबिक सौहार्द वाढेल. नवीन संधी उपलब्ध होतील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील चिंता दूर होईल. नोकरीत मान्यता मिळेल. प्रेमसंबंधात समाधान मिळेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : चांदीसारखा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

भडगाव सौ सु गी पाटील विद्यालयात पालक–शिक्षक सभेचे यशस्वी आयोजन

0

Loading

भडगाव – शहरातील पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित नामांकित सौ. सुमनताई गिरिधर पाटील माध्य. विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच जिजाऊ प्राथमिक विद्यालय या सर्व विभागांची संयुक्त पालक–शिक्षक सभा नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने पालकांनी हजेरी लावून आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती घेतली व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक सूचना मांडल्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्याध्यापक व प्राचार्य अजयजी अहिरे उपस्थित होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षिका सी. व्ही. बिऱ्हाडे, पर्यवेक्षक एस. एस. महाजन, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. पल्लवी पाटील व डॉ. अतुल देशमुख सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयजी अहिरे यांनी सविस्तरपणे केले. त्यांनी शाळेच्या मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, विद्यार्थी विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहिती पालकांसमोर ठेवली. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सविस्तर इतिवृत वाचन सभेचे सचिव प्रा. एल. के. वाणी यांनी सादर केले. गेल्या वर्षातील उल्लेखनीय यश, गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच शाळेच्या सर्व विभागांनी घेतलेले उपक्रम यांचा आढावा घेताना पालकांनी समाधान व्यक्त केले. पर्यवेक्षिका छाया बिऱ्हाडे यांनी मागील वर्षातील शैक्षणिक कार्याचा सखोल आढावा सादर केला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच चारित्र्य विकासासाठी शाळेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध नवीन योजनांचा परिचयही त्यांनी करून दिला. उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. सभेदरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. एन. एन. एम. एस. (National Means cum Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तिलक जडे याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच हुशु स्पर्धेत नाशिक विभागीय पातळीवर १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पात्र ठरलेल्या प्रतिभावान विद्यार्थी प्रतिक दाभाडे याचाही विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभामुळे सभेला एक वेगळेच औचित्य प्राप्त झाले. यावेळी प्रा. शरद महाजन, छाया बिऱ्हाडे, डॉ. पल्लवी पाटील व डॉ. अतुल देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि सहशालेय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी १० वी आणि १२ वी च्या परीक्षांमध्ये शाळेचा नेहमीच उत्कृष्ट निकाल राहिल्याचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशामुळे शाळेचे नाव सतत उज्ज्वल होत असल्याचे त्यांनी सांगितले. पालक–शिक्षक संघाची नव्याने निवडणूकही यावेळी पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदी मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उपाध्यक्षपदी डॉ. पल्लवी निकम, सचिवपदी प्रा. एल. के. वाणी, सहसचिवपदी गजानन सोनजे यांची निवड करण्यात आली. शासनाच्या धोरणांनुसार इतर सदस्यांची निवड देखील करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवे उपक्रम राबविता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न लाभले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. शरद डी. पाटील यांनी केले, तर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ही पालक–शिक्षक सभा फक्त माहिती देवाणघेवाण करण्यापुरती मर्यादित न राहता शाळा व पालक यांच्यातील सशक्त नातेसंबंध अधिक दृढ करणारी ठरली. पालकांनी शाळेच्या प्रशासनाची पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीबद्दल व्यक्त केलेले समाधान आणि शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेली पावले यामुळे संपूर्ण परिसरात या संस्थेच्या कार्याचे पुन्हा एकदा कौतुक झाले. अशा प्रकारे, सौ. सुमनताई गिरिधर पाटील विद्यालय समूहाने पालक–शिक्षक सहकार्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

चोपडा येथे गुर्जर भवन पूर्णत्वाकडे — कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नांतून समाजाला मिळणार नवे भव्य व्यासपीठ

0

Loading

चोपडा ( मनिष महाजन, भाई कोतवाल रोड, चोपडा Mo.9766143638 ) शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. गुर्जर समाजाच्या दीर्घकाळच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत, नारायण वाडी परिसरात उभारण्यात आलेले भव्य ‘गुर्जर भवन’ आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आले आहे. अनेक वर्षांपासून समाजात प्रशस्त, सुसज्ज आणि आधुनिक सोयींनी युक्त असे स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी मागणी होत होती. अखेर कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे स्वप्न साकार झाले असून, लवकरच या भव्य भवनाचे लोकार्पण समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पाला आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांचे सक्रीय पाठबळ लाभले. त्यांच्या सोबतच माजी आमदार लताताई सोनवणे यांचे सहकार्यही या उपक्रमाच्या यशामध्ये निर्णायक ठरले. समाजासाठी केवळ इमारत उभारणे नव्हे तर एक असे व्यासपीठ उभे करणे, जिथे एकतेची भावना दृढ होईल, संस्कृती जपली जाईल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, या उद्देशाने हे कार्य पुढे नेण्यात आले. गुर्जर समाजाची चोपडा आणि परिसरात लक्षणीय संख्या आहे. विवाहसोहळे, मंगलकार्य, शोकसभा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम किंवा सामाजिक स्नेहमेळावे यासाठी योग्य, आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असे ठिकाण उपलब्ध नसल्याची कमतरता जाणवत होती. यामुळे समाजबांधवांना कार्यक्रमांच्या आयोजनासाठी अनेकदा आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्या ओळखून आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांनी आवश्यक निधीची जुळवाजुळव केली, शासकीय स्तरावर प्रयत्न केले आणि अल्पावधीतच या भव्य इमारतीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. गुर्जर भवन हे फक्त भिंतींचे बांधकाम नाही, तर समाजातील एकतेचे प्रतीक आहे. या इमारतीत प्रशस्त हॉल उभारण्यात आला असून, विवाह सोहळ्यांपासून ते विविध सामाजिक कार्यक्रमांपर्यंत सर्व उपक्रम सहज पार पाडता येतील, अशी सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक ध्वनीप्रणाली, आरामदायी बैठक व्यवस्था, आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामुळे भविष्यात हे भवन फक्त गुर्जर समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण चोपडा शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. या प्रकल्पाच्या यशामागे केवळ निधी उपलब्ध करून देणे एवढेच नाही, तर समाजातील एकतेसाठी सतत प्रेरणादायी नेतृत्वाची भूमिका हीही महत्त्वाची ठरली आहे. आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांनी पूर्वीपासूनच समाजाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रोत्साहन, आरोग्य सेवांसाठी केलेले प्रयत्न, पायाभूत सुविधांच्या उभारणीतील त्यांचा पुढाकार आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्यांना ‘कार्यसम्राट’ अशी उपाधी मिळाली आहे. गुर्जर भवनाच्या उभारणीतही त्यांचा हा नेतृत्वाचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. माजी आमदार लताताई सोनवणे यांचेही या प्रकल्पातील योगदान तितकेच लक्षणीय आहे. समाजातील महिला संघटनांना प्रोत्साहन देणे, शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांना हातभार लावणे आणि सामाजिक एकतेसाठी विविध स्तरांवर सातत्याने काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे गुर्जर भवन उभारणीस अधिक गती मिळाली. भवनाच्या उभारणीमुळे केवळ भौतिक सुविधा मिळतील असे नाही, तर समाजातील एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा मार्गही सुकर होईल. विवाहसोहळे, धार्मिक विधी, नामकरण समारंभ, स्मरणसभा यांसोबतच शैक्षणिक कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रे, कला-संस्कृतीचे सादरीकरण, विचारविनिमय सभा अशा विविध उपक्रमांसाठी हे भवन आदर्श ठिकाण ठरेल. समाजातील तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे, एकत्र आणणारे आणि नवनिर्मितीला चालना देणारे हे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या भव्य उपक्रमाबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. लवकरच होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. हा सोहळा केवळ इमारतीचे उद्घाटन नव्हे, तर समाजाच्या प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवकांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन या उपक्रमाचे स्वागत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चोपडा परिसरात गेल्या काही वर्षांत सामाजिक उपक्रमांसाठी योग्य पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, त्यात गुर्जर भवनाची भर विशेष उल्लेखनीय ठरणार आहे. सामाजिक सलोखा जपत, एकत्र येऊन प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा हे भवन पुढील पिढ्यांना देईल. आमदार प्रा. चंद्रकांतआण्णा सोनवणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या सहकार्यामुळे हे कार्य शक्य झाले, ही भावना आज समाजाच्या प्रत्येक घटकात व्यक्त होत आहे. भविष्यात या भव्य इमारतीतून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन, शिक्षणाचा प्रचार, तसेच समाजाच्या विविध गरजांनुसार उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा आहे. हे भवन गुर्जर समाजासाठी अभिमानाचे आणि संपूर्ण शहरासाठी उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

‘धरमवीर’ जोडीची जिंल्हयात अफाट कमाल – आयुष प्रसाद आणि महेश्वर रेड्डी यांची भन्नाट कामगिरी

0

Loading

पाचोरा तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळा आता सगळ्यांच्या डोक्याला ताप देतोय. हे प्रकरण एवढं मोठं झालंय की गावकुसाबाहेरच्या लोकांनाही याची चर्चा ऐकू येते.हे दोघेही अधिकारी जर खरोखर भ्रष्ट असते तर हे शेतकरी अनुदान घोटाळ्याचे प्रकरण केव्हाच दडपून गेले असते. पण आयुष प्रसाद आणि महेश्वर रेड्डी या दोघांचा भ्रष्टाचाराशी दूरदूरचा संबंध नाही. उलट त्यांची प्रामाणिकता आणि कामाचा निखळ स्वच्छपणा यामुळेच हे प्रकरण आज उघडकीस आले असून तपास पुढे सरकत आहे. जिल्ह्याला अशा निखळ प्रामाणिक व निष्कलंक अधिकाऱ्यांची जोडी लाभल्यामुळेच या मोठ्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न कुणालाही करता आलेला नाही. त्यांच्या कार्यशैलीमुळेच शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला नाही आणि हा तपास आज प्रगतीपथावर पोहोचला आहे. या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी दोन नावं सगळीकडे ऐकू येतात – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी. लोक त्यांना ‘धरमवीर जोडी’ म्हणतायत.
ही जोडी म्हणजे जणू पराक्रमाची नवी गोष्टच. काहींवर कारवाई झटक्यात होते, काहींवर फक्त निलंबन, तर काहींवर काहीच होत नाही. कोणी म्हणतं, “यांचा हात असला की कोणावर किती पाऊल टाकायचं याचा अंदाज बरोबर येतो. कुणाला फुलांचा हार, कुणाला काटेरी झाड, तर कुणाला काहीच नाही – पण सगळं जरा मापात. मात्र त्यात पाप नाही “पण खरा अर्थ सगळ्यांना कळतो.
आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांचं नाव ऐकलं की कडक प्रशासन डोळ्यासमोर येतं. पण जळगाव जिल्ह्यातील लोक म्हणतात, “आपली ही जोडी तर मुंडे साहेबांपेक्षा एक पाऊल पुढेच गेलीय.” कडकपणाचं आणि मोकळेपणाचं अनोखं मिश्रण या दोघांच्या कारभारात आहे, असं गावकरी सहज सांगतात. कुणावर गुन्हा दाखल करायचा तर झटक्यात करतात, कुणावर फक्त निलंबन टाकतात, तर काहींना थांबवून ठेवतात. “उद्योगी बागायतदारासारखी” लोक म्हणतात – जशी कोणत्या झाडाला पाणी द्यायचं, कोणती झाडं छाटायची आणि कोणती तशीच सोडायची याचा अंदाज त्यांना आहे.
गावकऱ्यांत आणखी एक चर्चेचा मुद्दा जोर धरतो आहे — ही जोडी एवढी लोकप्रिय झालीय की जर कधी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत या दोघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं, तर विरोधकांची डिपॉझीट सुद्धा वाचणार नाही. एवढी लोकप्रियता मिळवलेले अधिकारी जळगाव जिल्ह्याला प्रथमच लाभले आहेत असे स्वाभिमानी लोक सहसा फारच दुर्मिळ असतात. ही जोडी इतकी सक्षम आहे की राजकीय लोकांचे पंटर म्हणून त्यांच्याकडे कुणी बघत नाही  प्रशासनात बसूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख ठेवली आहे यातूनच त्यांचा स्वाभिमान व सामर्थ्य आणि प्रभाव दिसून येतो.
पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळ्याचं प्रकरण तर सगळ्यांच्या तोंडी आलंय. आधी २.२० कोटींची चर्चा होती, आता लोक म्हणतात आठ-दहा कोटींपर्यंत आकडा जाईल. कुणावर आधीच गुन्हा दाखल झाला – अमोल भोई यांच्यावर. पण दुसरीकडे सारोळा येथील महसूल अधिकारी आशिष कडुबा काकडे यांच्यावर फक्त निलंबन झालं, गुन्हा दाखल झालाच नाही. लोक म्हणतात, “एकाला पोटाशी, दुसऱ्याला पाठीशी.” असे असले तरी या दोघे धरमविरच्या जोडीच्या कैचीतून कोणी सुटेल असे वाटत नाही
काकडे यांच्या निलंबनावर पण गावात चर्चा सुरू आहे. मालमत्तेची तपासणी, नातेवाइकांच्या खात्यांचा तपास अजून चालू असतानाच ३० सप्टेंबरला तडकाफडकी निलंबन झालं. लोकांना शंका येते की, “हे सगळं राजकीय दबावाखाली झालंय का काय?” निलंबन सहसा तपास पूर्ण झाल्यावर होतं, असं म्हटलं जातं. इथे उलटं झालं.
त्यात आणखी नवा मुद्दा – बनावट सह्या. काही लोकप्रतिनिधींच्या नावाने बनावट सह्या करून अनुदानाच्या कागदपत्रांना वैधता दिल्याचा आरोप आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बॅकफूटवर गेलेत. गावकरी म्हणतात, “आता नावं बाहेर आली तर बऱ्याच जणांचा पत्ता कट होईल म्हणून दोन्ही बाजू गप्प आहेत.”
तहसील प्रशासनाने केलेली चौकशी समितीही वादात सापडली आहे. शेतकरी आंदोलक पत्रकार संदीप महाजन यांनी ठामपणे सांगितलंय की, “ही समिती फक्त लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई करीता आणि मोठ्या माशांना सोडण्यासाठी होती जर ही चौकशी समिती खरोखर निष्पक्ष असती तर मोठ्या लोकांवरही कारवाई झाली असती.” पण ही समिती शासकीय – राजकीय दबावाखाली चालली आणि दोषींना वाचवलं जातय हे स्पष्ट दिसतय म्हणूनच या धरमवीरच्या जोडीने याप्रकरणी चिकित्सकपणे लक्ष देणे गरजेचे आहे
“दोघं अधिकारी एवढे प्रामाणिक की कुणी त्यांना राजकीय स्पेशली सत्ताधाऱ्यांचे पंटर म्हणायची हिंमत करणार नाही.” जर का ?”हेच दोघं लोकसभा निवडणुकीला दोघं मतदार संघात अपक्ष उभे राहिले तर विरोधकांची डिपॉझीट पण वाचणार नाही.” हे ऐकायला कौतुकासारखं वाटतं, ही वस्तुस्थिती असतांना दोघंही प्रशासनानं पारदर्शकता दाखवली पाहिजे. २०१९ पासूनची अनुदान यादी सार्वजनिक झाली पाहिजे. कोणावर गुन्हा आणि कोणावर फक्त निलंबन – यामागचं कारण स्पष्ट झालं पाहिजे. फॉरेन्सिक तपासणी करून बनावट सहींचा पर्दाफाश व्हायला हवा. चौकशी समिती खरंच निष्पक्ष आहे का, याचाही उलगडा झाला पाहिजे. असं झालं तर लोकांचा विश्वास परत येईल आणि या ‘धरमवीर’ जोडीला खऱ्या अर्थानं कौतुक मिळेल.
आजच्या पाचोरा न्यायालयीन सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आर्थिक गुन्हा शाखेनं नवा पुरावा मांडला, कोठडी वाढवली आणि पुढचा तपास स्पष्ट केला तर लोकांचीही अपेक्षा जिवंत राहील. पण जर सगळं पुन्हा जुन्याच पद्धतीनं झालं, तर उपरोध आणखी धारदार होईल.
लोकशाहीत प्रशासनावर विश्वास असणं गरजेचं आहे. आज लोक हसतायत, उपरोध करतायत, पण मनात खरा प्रश्न आहे – “खरा न्याय कधी मिळणार?” जर या प्रकरणात खरी पारदर्शकता दाखवली गेली, दोषींवर समान कारवाई झाली, तरच लोक उपरोध बाजूला ठेवून थेट कौतुक करतील. नाहीतर आजचं कौतुक हे फक्त गावकडचं टोकदार व्यंग राहील.

आज दि.04/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज नवीन कामात गती येईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. जुने अडथळे दूर होतील. नातेवाईकांशी सौहार्द वाढेल.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनप्रवासातून चांगले अनुभव मिळतील. शिक्षण करिअरच्या संधी वाढतील. मित्रांचा आधार मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. आरोग्याबाबत दक्ष राहा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वासाने कार्य यशस्वी होईल. समाजातील मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याकामातील प्रगती निश्चित आहे. आरोग्य चांगले राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळमहत्वाच्या निर्णयासाठी अनुकूल दिवस आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवी ओळख उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकसंयमाने काम करा. प्रवासात खर्च वाढेल. नोकरीत थोडे तणावपूर्ण वातावरण राहू शकते.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक कार्यात रस वाढेल. मित्रांच्या सहकार्याने प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतो.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरकार्यक्षेत्रात उत्तम यश मिळेल. वरिष्ठांची मदत लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत मान्यता मिळेल. घरगुती वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : चांदीसारखा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा : लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्यांचा मुद्दा चर्चेत; राजकीय सत्ताधारी व विरोधक बॅकफूटवर, मर्जीत समितीच्या भूमिकेवरही संशयाची सुई

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळ्याला दररोज नवे वळण मिळत असून प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत चालले आहे. आधीच कोट्यवधींच्या गैरव्यवहारामुळे जिल्हा तसेच राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात आता लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्यांचा मुद्दा समोर आला आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या यादीत काही लोकप्रतिनिधींच्या नावाने बनावट सह्या केल्याचे प्राथमिक संकेत मिळाल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. या नव्या उघडकीनंतर सत्ताधारी पक्ष तसेच विरोधक दोघेही बॅकफूटवर गेले असून जनतेत मोठी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घोटाळ्याचा प्रारंभिक अंदाज केवळ २.२० कोटी रुपयांवर थांबेल, असा होता; परंतु सध्या तपास करणाऱ्या विशेष आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दिलेल्या सूचनांनुसार हा आकडा 2.20 च्या पुढे जाऊ शकतो, असा गंभीर अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावाने अनुदान घेताना तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये काही लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्या करून दस्तऐवजांची वैधता वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय बळावला आहे. या नव्या घडामोडींमुळे राजकीय सत्ताधारी व विरोधी गटातील नेते मंडळींनी मौन बाळगणे पसंत केले आहे. यामुळे “कोणाचे नाव उघड होईल?” या भीतीने दोन्ही बाजू सावध भूमिका घेत असल्याचे दिसते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तहसील प्रशासनाने स्थापन केलेली मर्जीतील समिती (चौकशी समिती) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या समितीने काही निवडक व्यक्तींनाच दोषी ठरवले असून इतर काहींना निर्दोष ठरवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून, “ही चौकशी निष्पक्ष होती का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, या समितीच्या सदस्यांची व त्यांच्या निर्णय प्रक्रियेची देखील सखोल चौकशी व्हावी. दोषींना संरक्षण देण्यासाठी राजकीय दबावाखाली किंवा आर्थिक व्यवहारांच्या आधारे ही समिती कार्यरत होती का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संदीप महाजन यांनी असा आरोप केला आहे की, या समितीने केवळ कनिष्ठ कर्मचारी आणि काही निवडक व्यक्तींवर दोषारोप ठेवत मोठे सूत्रधार व राजकीय पाठींबा असलेल्यांना & समीती मधील सदस्यांना वाचवले. त्यामुळे या चौकशी अहवालाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर मर्जीतील समितीने जाणूनबुजून काहींना निर्दोष ठरवले असेल, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून या मोठ्या गैरव्यवहारात सह-आरोपी म्हणून तपासात सामील करावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. याशिवाय या प्रकरणात आधीच महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः तत्कालीन तहसीलदार चव्हाण के. यांच्या कार्यकाळात या अनुदान घोटाळ्याची पायाभरणी झाली असल्याचे समोर आले आहे. २०१९ पासून विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे यांनी शेतकरी अनुदान यादी सार्वजनिक न केल्यानेही संशय अधिक गडद झाला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार, बनावट सह्या, तसेच राजकीय दबावाखाली घेतलेले प्रशासनिक निर्णय यामुळे संपूर्ण महसूल व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष आर्थिक गुन्हे शाखा सध्या मोठ्या प्रमाणावर बँक व्यवहार, खातेवही, जमीन दस्तऐवज आणि शेतकऱ्यांच्या नावाने केलेल्या अनुदान काढण्याच्या प्रक्रियेचा तपास करत आहे. न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक अहवालात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप तपासायचे शिल्लक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आरोपींनी शेतकऱ्यांच्या नावाने लाखो रुपयांचे अनुदान काढून त्याचा गैरवापर केल्याची शक्यता प्रबळ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या काही माहिती देखील तपास यंत्रणेला मिळाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणात आधी अमोल भोई यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र सारोळा येथील महसूल अधिकारी आशिष कडुबा काकडे यांना केवळ निलंबन करून त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या निर्णयांमुळे “एकाला पोटाशी तर दुसऱ्याला पाठीशी” असा आरोप विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे यांच्यावर होत आहे. संदीप महाजन यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जालना पॅटर्न प्रमाणे हा निष्पक्ष तपास व्हावा, दोषींना वाचवण्याचे प्रयत्न रोखले जावेत, अशी मागणी केली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष विशेष आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर केंद्रित झाले आहे. विशेषतः लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर जाणार का आणि मर्जीतील समितीच्या कामकाजावर चौकशी होऊन तिला जबाबदार धरण्यात येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या नावाखाली झालेल्या या कोट्यवधींच्या गैरव्यवहारात खरे सूत्रधार कोण, राजकीय दबाव किती होता, आणि प्रशासनातील कोणती पातळी या खेळात सामील होती, हे लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनतेमध्ये सध्या प्रबळ भावना आहे की, या प्रकरणात फक्त लहान कर्मचाऱ्यांना बळी देऊन मोठ्या माशांना सोडले जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे दोषींना राजकीय छत्रछायेखाली वाचवले गेले, कुठेतरी पाणी मुरले तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभ्या झालेल्या लढ्याला मोठा धक्का बसेल. त्यामुळे विशेष आर्थिक गुन्हे शाखेने कोणाच्याही कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास आणखी व्यापक करून मर्जीतील समितीचा समावेश करून जबाबदारी निश्चित करावी, अशी संदीप महाजन यांची ठाम मागणी आहे.

शेतकरी अनुदान घोटाळा : अमोल भोईवर गुन्हा दाखल करून निलंबन; आशिष काकडे फक्त निलंबित — आज पुन्हा न्यायालयीन सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष

0

Loading

पाचोरा : तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळ्याने आता नव्या घडामोडींना सुरुवात केली असून आज, ४ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपींची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे विशेष आर्थिक गुन्हे शाखेतर्फे (EOW) आरोपींना पुन्हा पाचोरा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अद्यापही अनेक महत्त्वाचे मुद्दे तपासात पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे आज न्यायालयात आरोपींना पुनश्च पोलीस कोठडी देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर आणखी काही नवे आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहितीही न्यायालयात दिली जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच तपासाच्या गतीवर आणि महसूल विभागाच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी अनुदान घोटाळ्यातील अमोल भोई यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र याच प्रकरणात सारोळा खु.येथील महसूल अधिकारी आशिष कडुबा काकडे यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई झाली असून अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली आहे. आशिष काकडे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही त्यांच्या मालमत्तेवर कोणताही आर्थिक बोजा का टाकलेला नाही, हा प्रश्न शेतकरी आंदोलक पत्रकार संदीप महाजन यांनी उपस्थित केला आहे. महसूल विभागाच्या अलीकडील हालचालींनीही या प्रकरणाला अधिकच वादग्रस्त स्वरूप दिले आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांनी तयार केलेली चौकशी समिती, काकडे यांचे तडकाफडकी निलंबन आणि त्यामागील राजकीय व प्रशासकीय दबावाची चर्चा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. निलंबन साधारणपणे तपासाची अंतिम पायरी मानली जाते, मात्र पूर्ण तपासाआधीच असे पाऊल का उचलण्यात आले यावर तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. या घोटाळ्याच्या प्राथमिक तपासात सुरुवातीला २.२० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा होती, पण आता प्रत्यक्षात हा आकडा तब्बल आठ ते दहा कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाच्या पूर्वीच्या कार्यकाळाशी, विशेषतः तत्कालीन तहसीलदार चव्हाण के. यांच्या काळातील शेवटच्या टप्प्यात झालेल्या अनुदान वाटपाशी या घोटाळ्याची पायाभरणी जोडली जात आहे. विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे यांनी २०१९ पासून आजतागायत शेतकरी अनुदान यादी सार्वजनिक न केल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. विशेष आर्थिक गुन्हे शाखा सध्या बँक व्यवहार, खातेवही, जमीन दस्तऐवज, शेतकऱ्यांच्या नावावर झालेली आर्थिक देवाणघेवाण आणि अनुदानाच्या नोंदींचा सखोल तपास करत आहे. तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक अहवालात या घोटाळ्याचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचे नमूद केले होते. आरोपींनी शेतकऱ्यांच्या नावावरून लाखो रुपयांचे अनुदान काढून त्याचा गैरवापर केल्याची शक्यता प्रबळ असल्याचेही सूचित केले होते. अजून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज तपासायचे आहेत आणि काही जबाब नोंदवायचे शिल्लक आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळेच आरोपींना पोलीस कस्टडी देणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले होते आणि न्यायालयाने मागील सुनावणीत आरोपींना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, शेतकरी व स्थानिक राजकीय वर्तुळात “फिर्यादीच खरे आरोपी आहेत का?” हा प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित केला जात आहे. अनेकांनी असा आरोप केला आहे की कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई होत असून मुख्य सूत्रधार अद्यापही सावलीत राहिले आहेत. काही CSC सेंटर चालक तसेच सारोळ्याशी संबंधित युवकांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा आहे. आज होणाऱ्या सुनावणीत विशेष आर्थिक गुन्हे शाखा आणखी कडक भूमिका घेणार का, याकडे शेतकरी, नागरिक, राजकीय वर्तुळे आणि प्रसार माध्यमांचे लक्ष लागले आहे. तपास पूर्ण होण्याआधी घेतलेले प्रशासनिक निर्णय, विशेषतः निलंबनाची घाई, तपासाच्या निष्पक्षतेवर परिणाम करू शकते, अशी भीती आंदोलक शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनीही स्पष्ट केले की, जालन्याच्या धर्तीवर पाचोरा येथील शेतकरी अनुदान घोटाळ्याचा तपास व कारवाई झाली पाहिजे तेथील जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या पद्धतीने रॅकेट बाहेर आणली तसेच पाचोरा येथील राकेट देखील उघड होणे गरजेचे आहे “सत्य बाहेर आलेच पाहिजे. खरे दोषी कोण आहेत हे स्पष्ट होऊन त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. महसूल विभागातील कारभारावर संशयाची सुई फिरत असताना तपास जलद आणि निष्पक्ष व्हावा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.” आता जिल्ह्याचे सर्व लक्ष ४ ऑक्टोबरनंतर होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीच्या निर्णयावर आहे. विशेष आर्थिक गुन्हे शाखा आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी आणखी मुदत मागणार का, किंवा तपासात नवे आरोपी उघड होणार का, यावरच पुढील कारवाई ठरणार आहे. शेतकरी अनुदानाच्या नावाखाली झालेला कोट्यवधींचा घोटाळा पूर्णपणे उघडकीस येऊन खरे सूत्रधार शिक्षा भोगतील का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सुनावणीकडे खिळले आहे.

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश

0

Loading

मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकाने दिल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत ( मॅन्युअल) अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सौ सु. गी. पाटील विद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सन्मान सोहळा

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय व ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सीनियर सिटीजन जनकल्याण संस्था, भडगाव येथील सदस्य विशेषतः उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्या साहेब अनिल पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब गुलाबराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान का करावा यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “वृद्ध आणि अनुभवी व्यक्ती हे खऱ्या अर्थाने देशाची संपत्ती आहेत. त्यांचे ज्ञान, अनुभव व जीवनमूल्ये ही पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना आदराने वागवले पाहिजे.” यानंतर उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानित ज्येष्ठ नागरिकांमध्ये सी. आर. पवार, मोरसिंग राठोड, के. डी. वाघ, अशोक केदार, एस. डी. पाटील, अरुण पाटील, दयाराम वाघ, लक्ष्मीबाई महाजन, सरलाबाई महाजन, गोविंदा महाजन यांचा समावेश होता. त्यांचा सन्मान होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या वडीलधाऱ्यांना मानाचा मुजरा केला. मंचावर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षिका सौ. सी. व्ही. बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, कार्यालय अधीक्षक डी. एस. सोनवणे, तसेच प्रथमेश जोशी, आनंद बागुल, चेतन पाटील, शितल साळुंखे, अशोक तायडे आणि डी. पी. पाटील उपस्थित होते. या मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सोनजे यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन शरद महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांना यामधून कुटुंबातील वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना जोपासण्याचा संदेश मिळाला. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या संस्कारांची आणि अनुभवांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून दिसून आला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!