Home Blog Page 49

स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा : मनमुक्त फाऊंडेशनचा ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा’ उत्साहात पार पडला

0

Loading

नवी मुंबई – स्त्रीशक्ती म्हणजे केवळ घरापुरती मर्यादित जबाबदारी नव्हे, तर समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी एक प्रेरणादायी शक्ती आहे, हे दाखवून देणारा एक ऐतिहासिक सोहळा नुकताच पनवेल येथे उत्साहात पार पडला. मनमुक्त फाऊंडेशनतर्फे शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरुची हॉल, पनवेल येथे “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा” या नावाने भव्य व वैभवशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची मूळ संकल्पना डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी मांडली होती. त्यांच्या विचारातून जन्माला आलेल्या या उपक्रमाला मनमुक्त फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी जोमाने उचलून धरले. स्थापनेपासूनच मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचा सन्मान या क्षेत्रांत फाऊंडेशनने केलेले उल्लेखनीय कार्य समाजात वेगळा ठसा उमटवत आले आहे. “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” हे संस्थेचे ध्येयवाक्य या कार्यक्रमातही प्रत्यक्ष जाणवले. या प्रेरणादायी सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवून स्वतःचा स्वतंत्र मार्ग तयार करणाऱ्या दहा महिलांचा सामूहिक गौरव करण्यात आला. घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने, आर्थिक मर्यादा आणि समाजातील दृष्टीकोन या साऱ्यावर मात करून या महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या अनेकांसाठी दीपस्तंभ ठरल्या आहेत. या सन्मानार्थींमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या नावांचा विशेष समावेश आहे. त्यांच्या प्रवासाने सिद्ध केले की स्त्रीशक्तीला कोणतीही चौकट थांबवू शकत नाही. सदर कृतज्ञता सोहळ्यास महाराष्ट्रातील नामांकित मान्यवर उपस्थित राहून महिलांच्या या यशगाथांना मानाचा मुजरा केला. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) या व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष वैभव प्राप्त झाले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित प्रेक्षकांच्या मनात स्त्रीशक्तीबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण झाला. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी मनमुक्त फाऊंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संचालिका अस्मिता कालन, मनिषा कुन्हाडे व मुक्ता भोसले यांच्या अथक परिश्रमामुळे हा दैदिप्यमान सोहळा यशस्वीपणे पार पडला, असे सर्वांनी एकमुखाने नमूद केले. समाजातील प्रत्येकाला आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या संकल्पनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. पराग कालन आणि दिव्या भोसले यांनी आकर्षक, सहज व भावनात्मक शैलीत केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी या सोहळ्याचे अनुभवताना स्त्रीशक्तीचा गौरव करण्याची ही योग्य संधी असल्याची भावना व्यक्त केली. सोहळ्याच्या अखेरीस डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात सातत्याने आयोजित करण्यात येतील. कारण, स्त्रीशक्तीचा गौरव करणे म्हणजे समाजाला प्रेरणा देणे आणि नव्या पिढीला आदर्श घालून देणे होय. पनवेल शहर या दिवसाचा एक ऐतिहासिक साक्षीदार ठरले. स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा अर्पण करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन उपस्थितांच्या पोशाखातून व बोलण्यातून घडले. या सोहळ्याने समाजातील प्रत्येकाला विचार करायला लावले की, स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून, समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी एक सशक्त शक्ती आहे.

पत्रकार हल्ला – लोकशाहीवरील आघात आणि कायद्याच्या कठोरतेची अनिवार्यता

0

Loading

त्र्यंबकेश्वर येथे घडलेला पत्रकारांवरील हल्ला हा फक्त निवडक पत्रकारांवर केलेला हल्ला नसून, हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर थेट प्रहार आहे. पत्रकार हे समाजातील चौथा स्तंभ मानले जातात. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेनंतर समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवणारा आणि सामान्य नागरिकांपर्यंत सत्य पोहोचवणारा घटक म्हणजे पत्रकार. त्यामुळे पत्रकारांवर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीच्या प्रत्येक नागरिकावर झालेला हल्ला होय. ही घटना घडल्यानंतर तिचे पडसाद केवळ त्र्यंबकेश्वरपुरते मर्यादित राहिले नाहीत. नाशिक जिल्ह्याच्या पलीकडे, महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात आणि नंतर संपूर्ण देशभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. पत्रकार संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलने केली, निवेदनं दिली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही ठिकाणी राजकीय पक्षांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. आजची वस्तुस्थिती अशी आहे की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच पत्रकार या घटनेविरोधात आवाज उठवतात. संघटना एकत्र येतात, निषेध मोर्चे निघतात, निवेदनं दिली जातात, दोन-चार दिवस वातावरण पेटून उठतं. पण काही काळानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. हीच खरी शोकांतिका आहे. कारण पत्रकारांवरील हल्ल्यांचा मुद्दा कायमस्वरूपी आणि प्रभावी पद्धतीने सोडवला जात नाही. मी स्वतः या प्रकारच्या हल्ल्याचा बळी ठरलो असल्याने, या लढ्याचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या वाट्याला आला आहे. निषेध मोर्चे, निवेदनं,(स्थानिक स्तरावरील एक पत्रकार संघटना व त्याचे लाचार पत्रकार नसलेले परंतु त्याचे पदाधिकारी सोडले तर ) जवळ – जवळ देश व राज्यभरातील सर्वच पत्रकार संघटनांचं सहकार्य – या सगळ्याचा मला लाभ झाला. पण खरी लढाई न्यायालयीन पातळीवर लढावी एकट्याला लढावी लागली. “झुकेगा नाही साला” या ध्येयाशी प्रामाणिक राहिल्यामुळे मी लढा सुरु ठेवला आणि अखेरीस पत्रकार हल्ला कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल झाला. आज हा खटला निर्णयासाठी न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु या प्रवासात मला आणि माझ्या कुटुंबाला जी वेदना, मानसिक छळ आणि भीती सहन करावी लागली, ती शब्दांत मांडणे कठीण आहे. सर्वश्रुत असलेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे महसूल विभागात झालेला कोटयावधी रुपयाचा शेतकरी अनुदान घोटळा नुकताच मी उघडकीस आणला आज सदरचा गुन्हा आर्थिक गुना शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे परंतु मी आणि माझा परिवार आजही दहशतीच्या सावटाखाली जगत आहोत. पत्रकारांचे कार्य हे धोकादायक आहे. स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी, गुन्हेगारी टोळ्या, अवैध धंदे, राजकीय हितसंबंध यांच्या मागे धाडसी वृत्त संकलन करताना जीव धोक्यात घालावा लागतो. म्हणूनच शस्त्र परवाना ही सुरक्षा उपाययोजना पत्रकारांसाठी महत्त्वाची ठरते. परंतु सर्व काही योग्य कागदपत्रे असूनही माझा शस्त्र परवाना आजतागायत प्रलंबित आहे. विद्यमान जळगाव जिल्ह्यातील जिंल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इतिहास असलेल्या अवैध धंदेवाल्यांना शस्त्र परवाने दिले. पण माझ्यासारख्या पत्रकाराचा अर्ज मात्र अडवला. हा विरोधाभास अत्यंत वेदनादायी आहे. सत्यासाठी लढणाऱ्याला रोखले जाते आणि गुन्हेगारी इतिहास असलेल्यांना परवानगी दिली जाते, ही गोष्ट पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न निर्माण करते. महाराष्ट्रात २०१७ मध्ये “महाराष्ट्र मीडिया पर्सन प्रोटेक्शन अॅक्ट” लागू करण्यात आला. या कायद्यानुसार, पत्रकारांवर हल्ला केल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे प्रावधान आहे. कलमानुसार आरोपींना तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. तसेच संबंधित गुन्हा गंभीर स्वरूपाचा मानला जातो. पण प्रत्यक्षात या कायद्याचा परिणाम अत्यल्प ठरला आहे. कारण कायद्याचे स्वरूप पोचट, लवचिक आणि किचकट आहे. त्यात दिलेली शिक्षा गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्यास अपुरी आहे. उदाहरणार्थ, काही प्रकरणांत आरोपींना सहज जामीन मिळतो. पोलिसांची तपासणी सैलसर होते. खटले वर्षानुवर्षे न्यायालयात अडकून पडतात. परिणामी पत्रकारांवरील हल्ले थांबण्याऐवजी वाढलेच आहेत. त्र्यंबकेश्वरची घटना ही पहिली नाही. महाराष्ट्रातच मागील काही वर्षांत अनेक पत्रकारांवर हल्ले झाले. पुण्यातील नरेंद्र दाभोळकर यांचा खून, उस्मानाबादमधील पत्रकार बाळासाहेब खरात यांचा खून, मालेगावातील पत्रकार शाहिद शेख यांच्यावर हल्ला – या घटनांनी पत्रकारांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशपातळीवर तर चित्र अधिकच गंभीर आहे. मध्यप्रदेशातील पत्रकार संदीप शर्मा यांना वाळू माफियाने ट्रकखाली चिरडून ठार केले. उत्तर प्रदेशात पत्रकार विक्रम जोशी यांना गुंडांनी गोळ्या घालून ठार केले. या सगळ्या घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते – पत्रकारांच्या जीवाची किंमत अजूनही आपल्या समाजात आणि सत्ताधारी व्यवस्थेत तितकीशी मानली जात नाही. पत्रकार हल्ला कायदा हा केवळ दाखवण्यापुरता न राहता, प्रत्यक्षात गुन्हेगारांना भीती वाटेल असा असणे गरजेचे आहे. राज्य व केंद्रस्तरीय पत्रकार संघटनांनी विधिज्ञांना सोबत घेऊन सखोल चर्चा करून या कायद्यात बदल घडवणे अत्यावश्यक आहे. आज चाकू-तलवारींचा जमाना संपला आहे. गावठी कट्टे, पिस्तुलं, बंदुका यांचा सर्रास वापर होतो. अशा पार्श्वभूमीवर पत्रकारांना केवळ निषेध मोर्चे आणि निवेदनांच्या मर्यादेत बांधून ठेवणे हा अन्यायच आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी कायद्यात करणे गरजेचे आहे. पत्रकार जेव्हा वृत्त संकलनासाठी बाहेर पडतो, तेव्हा त्याचा धोका केवळ त्याच्यापुरता मर्यादित राहत नाही. त्याचे कुटुंबही भीतीत जगते. धमक्या, खोटे खटले, सामाजिक बहिष्कार या सगळ्याला कुटुंबाला सामोरे जावे लागते. म्हणूनच, पत्रकार हल्ला कायद्यामध्ये पत्रकारांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची तरतूद असावी. स्वतंत्र विमा योजना, सरकारी संरक्षण, विशेष आर्थिक मदत या बाबींचा विचार व्हावा. निश्चितच, प्रत्येक कायद्याला दोन बाजू असतात. या कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. कारण सत्यासाठी तयार झालेला कायदा जर असत्यासाठी वापरला गेला, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की कायदा कमकुवत ठेवावा. उलट, कठोर कायदा तयार करून त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी ठोस नियंत्रण यंत्रणा तयार करावी. लोकशाही जिवंत ठेवण्यात पत्रकारांची भूमिका अनन्यसाधारण आहे. जनतेचा आवाज पोहोचवणे, सत्तेची चौकशी करणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे – ही पत्रकारांची जबाबदारी आहे. म्हणूनच पत्रकारांवर हल्ला होणे म्हणजे प्रत्यक्षात लोकशाहीच्या पायाला धक्का बसणे होय. त्र्यंबकेश्वरची घटना ही याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की पत्रकार हल्ला कायदा सध्याच्या स्वरूपात अपुरा आहे. आजच्या परिस्थितीत पत्रकार हल्ला हा केवळ व्यक्तीगत घटना नसून संपूर्ण समाजावर आणि लोकशाहीवर झालेला घाला आहे. म्हणूनच पत्रकार हल्ला कायदा अधिक कठोर स्वरूपात बनवला जाणे अत्यावश्यक आहे. आरोपींना कठोर शिक्षा, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा तरतूद, जलदगती न्यायालयीन प्रक्रिया, गैरवापर टाळण्यासाठी नियंत्रण यंत्रणा – या बाबींचा विचार करूनच हा कायदा प्रभावी होईल. अन्यथा निषेध, मोर्चे आणि निवेदनांच्या पलीकडे पत्रकारांना खरी सुरक्षा मिळणार नाही. एकंदरीत, त्र्यंबकेश्वरसारख्या घटना हे समाजाला आणि सत्ताधाऱ्यांना दिलेले स्पष्ट इशारे आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा आणि त्याची शंभर टक्के अंमलबजावणी हा आता विलंब न करता उचलायचा पाऊल आहे. कारण पत्रकार वाचला तर लोकशाही वाचेल. – संदीप महाजन ( 73 8510 8510 ) पाचोरा जि. जळगाव

आज दि.21/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – नवीन कामांची सुरुवात करण्यास योग्य दिवस. वरिष्ठांचा सहकार्य लाभेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – पैशांच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबात आपुलकी वाढेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – पांढरा

मिथुन – अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. कामातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – हिरवा

कर्क – आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – मोतीसारखा

सिंह – प्रतिष्ठा व मान वाढेल. नोकरीत किंवा व्यवसायात लाभदायक निर्णय होतील. प्रवासाचा योग संभवतो.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – सोनेरी

कन्या – जुने अडथळे दूर होतील. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पिवळा

तुळ – भागीदारीतून फायदा होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – पैशाच्या येणाऱ्या-जाणाऱ्या व्यवहारांमध्ये यश मिळेल. जुने अडथळे कमी होतील. नोकरीत समाधान मिळेल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – काळा

धनु – शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. धार्मिक कार्याकडे ओढ निर्माण होईल. प्रवास शुभ असेल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – केशरी

मकर – कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेशी संबंधित कामे पूर्ण होतील. मनात समाधान मिळेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – राखाडी

कुंभ – नोकरीत प्रगती होईल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. नवीन संधींकडे लक्ष द्यावे.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – आकाशी

मीन – आर्थिक प्रगती होईल. घरगुती सौख्य लाभेल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात आनंद मिळेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.20/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – उत्साहाने कामे पूर्ण कराल. अडथळे दूर होतील. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल काळ आहे.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – लाल

वृषभ – आर्थिक व्यवहारांमध्ये फायदा होईल. कुटुंबात शांतता राहील. मित्रमैत्रिणींकडून आधार मिळेल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – पांढरा

मिथुन – विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – हिरवा

कर्क – मानसिक शांती लाभेल. प्रवासाचा योग संभवतो. घरगुती वातावरण आनंददायी राहील.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – चंदेरी

सिंह – वरिष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल. आर्थिक प्रगती होईल. प्रतिष्ठा व सन्मान वाढेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – सोनेरी

कन्या – मेहनतीतून यश मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. अपेक्षित कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

तुळ – भागीदारीतून लाभ होईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. मित्रपरिवारात आदर वाढेल.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – जुनी समस्या दूर होईल. कामात गती येईल. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – काळा

धनु – शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होईल. प्रवास आनंददायी ठरेल. धार्मिक कार्याकडे ओढ निर्माण होईल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – केशरी

मकर – मालमत्तेशी संबंधित निर्णय अनुकूल ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडाल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – राखाडी

कुंभ – नोकरीत प्रगतीची संधी येईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – आकाशी

मीन – घरगुती सौख्य लाभेल. पैशांची आवक वाढेल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.19/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – आत्मविश्वासाने कामे पार पाडाल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – घरगुती सौख्य लाभेल. कुटुंबीयांचा आधार मिळेल. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – पांढरा

मिथुन – विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत बदलाची शक्यता आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – हिरवा

कर्क – मानसिक तणाव कमी होईल. नवे काम हाती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रवासाचा योग संभवतो.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – चंदेरी

सिंह – वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – सोनेरी

कन्या – आज मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पिवळा

तुळ – व्यवसायात प्रगती होईल. भागीदारीतून फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – जुनी अडचण दूर होईल. कामात गती येईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – काळा

धनु – शिक्षणात प्रगती होईल. प्रवास आनंददायी ठरेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

मकर – मालमत्तेशी संबंधित कामांना गती मिळेल. वरिष्ठांचा आधार राहील. घरगुती निर्णय योग्य ठरतील.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – राखाडी

कुंभ – नवीन ओळखीमुळे फायदा होईल. नोकरीत चांगली प्रगती होईल. मित्रांचा आधार लाभेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – घरगुती वातावरण आनंदी राहील. पैशांची आवक वाढेल. आध्यात्मिक कार्याकडे झुकाव होईल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शिवकालीन रणरागिणींच्या स्मृती जागवणारा प्रेरणादायी सोहळा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात वार्षिक सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना आनंद दिला.

सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक-लेखक प्रवीण भोसले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिक्षणाचा उपयोग केवळ प्रमाणपत्रापुरता न राहता दैनंदिन आयुष्यात आणि आवडीच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवण्यासाठी करावा. शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप — असे म्हणताना इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या रणरागिणी डोळ्यासमोर येतात. मातोश्री जिजाबाई, महाराणी येसूबाई, ताराराणी, यलम्मा, पुण्यश्लोक अहिल्याबाई, विरांगणा रायबागन या स्त्रिया भावनांवर विजय मिळवत प्रत्येक आव्हानाला सामोरे जात होत्या. त्या स्वराज्यसेवक वीरांचा आधार होत्या आणि अप्रत्यक्षपणे स्वराज्यासाठी लढत होत्या. आजही स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. तुम्हीही त्यांचा आदर्श घ्यावा.”

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित एनएसजी कमांडो नरेश पवार यांनी आपल्या लष्करी अनुभवांची माहिती दिली. ते म्हणाले, “पठाणकोट हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कारवाया, पुंछ येथे बॉर्डरपार ऑपरेशन — सलग तीन वर्षे पाकिस्तानविरोधात कार्य करताना आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. नुकतेच यशस्वी झालेले सिंदूर ऑपरेशन जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन धाडसी महिला होत्या. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सैन्यदलासाठीही करता येतो, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.”

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत समाजकार्याचा पाया ठरावेत, या ध्येयाने कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “स्वराज्य हे शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले, संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. या यज्ञात असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म काय असतो हे जगाला कळाले. या इतिहासाचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये.”

संस्थेचे प्रमुख डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, “बारावीनंतर मुलींनी स्वावलंबी व्हावे, ही संकल्पना घेऊन मी डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूट सुरू केले. आज ते पॅरामेडिकल क्षेत्रात देशभरात महत्त्वाचे स्थान मिळवून आहे. कठोर शिस्तीमुळे अनेक मुली माझ्यावर बापासारखा विश्वास ठेवतात.” तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य देशातील विविध भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलची स्थापना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन रणरागिणी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. डॉ. अनुज अविनाश केसरकर, मुंबई (प्रथम क्रमांक – रोख रुपये ५,०००), प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे, ठाणे (द्वितीय क्रमांक – रुपये ३,०००), सुमिता अभिषेक पवार, मुंबई (तृतीय क्रमांक – रुपये २,०००), स्नेहल गोविंद चव्हाण, रत्नागिरी आणि हिमांशू विजय शुक्ल, जळगाव (उत्तेजनार्थ – प्रत्येकी रुपये १,०००) यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, युक्ता गोठणकर आणि आरती लोखंडे यांनी केले. आर्णा सुर्वे, साक्षी निर्मल, गौरव गायकवाड, समिक्षा बिळीगुदरी आणि साहिल धाकतोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

इतिहासाचा तेजस्तंभ : गजानन भास्कर मेहेंदळे

0

Loading

मुंबई – १७ सप्टेंबर २०२५ च्या रात्री इतिहासाचं एक पान जणू अश्रूंनी भिजलं. शिवचरित्रकार, इतिहासविद्येचे प्रगल्भ अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनाने मराठी समाजाची वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उंची काही काळासाठी मोडून पडल्यासारखी झाली. इतिहासाची वाटचाल, त्यातील गूढ दरवळ, वीरांच्या पराक्रमांचा सुगंध आणि सत्यशोधक वृत्तीची प्रदीर्घ यात्रा म्हणजे मेहेंदळे यांची जीवनकहाणी.

गजानन भास्कर मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी एका साध्या मराठी कुटुंबात झाला. शिक्षणकाळापासूनच त्यांना भूतकाळ अभ्यासण्याची गाढ ओढ लागली. महाविद्यालयीन अभ्यासादरम्यान साहित्य आणि इतिहास या दोन्ही शाखांतील प्रावीण्यामुळे त्यांचा पाया घट्ट झाला. पुढे संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणामुळे त्यांच्या संशोधनाला लष्करी दृष्टिकोन प्राप्त झाला, ज्यामुळे छत्रपतींच्या युद्धनीतीचा अभ्यास अधिक सखोल आणि प्रभावी झाला.

संशोधनाची ओढ वाढत गेली आणि त्यांनी दुर्गदुर्गम प्रदेशांत पायी भटकंती सुरू केली. किल्ल्यांच्या भग्नावशेषांमध्ये श्वास घेऊन त्यांनी त्या शिळांच्या कुशीतील असंख्य कथांना शब्द दिले. त्यांच्या दृष्टीने गड हे केवळ खडकांचे ढिगारे नव्हते, तर राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक होते. एकदा, मालवणच्या एका दुर्गावर पाऊल ठेवत असताना, ते रात्रीच्या काळोखात गडाच्या भिंतीवर उभे राहिले. चंद्रप्रकाशात त्यांच्या डोळ्यांसमोर शेकडो वर्षे जुन्या युद्धांची झलक उमटली—शत्रूवर बुरुजावर पहारा देणाऱ्या सैनिकांचे श्वास, दरबारातील गुप्त चर्चा आणि देशभक्तांच्या गूढ संघर्षाचा आवाज. या अनुभवाने त्यांना जिवंत इतिहास समजून घेण्याची नवीन दृष्टी दिली, जी त्यांच्या लेखणीत स्पष्टपणे जाणवते.

त्यांच्या लिखाणात अद्भुत संगती होती—शास्त्रीय प्रामाणिकता आणि साहित्यिक अलंकारिकता. ते फक्त चरित्रकार नव्हते; ते एका युगाचे साक्षीदार होते. कागदोपत्री नोंदींमध्ये त्यांनी माणसांचे धडधडते हृदय शोधले, पुराव्यांच्या ढिगाऱ्यातून सत्याचा दीप प्रज्वलित केला आणि स्वराज्यगाथेच्या अंधाऱ्या वाटेवर रसिकांना तेजाचा मार्ग दाखवला.

त्यांच्या कार्याचा ठसा त्यांच्या ग्रंथांमधून स्पष्ट दिसतो. छत्रपतींचे चरित्र, शिवाजींची युद्धनीती, मराठा साम्राज्याची घडण, शिवकालीन समाजव्यवस्था, गड-दुर्गांचा इतिहास—या अभ्यासग्रंथांनी मराठी वाङ्मयात मैलाचा दगड गाठला. विशेषतः भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण या पाच खंडांच्या महत्त्वाकांक्षी मालिकेने भारतीय इतिहास अभ्यासात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या साहित्यकृतींनी अभ्यासकांना तसेच सर्वसामान्य वाचकांना भूतकाळ जवळून अनुभवण्याची संधी दिली.

मेहेंदळे यांच्या लेखणीतून शिवकाल सजीव झाला. त्यांच्या ग्रंथांमधील प्रत्येक प्रसंग जणू गडकोटावर फडकणारा भगवा ध्वज ठरला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरते मर्यादित न ठेवता, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भात उलगडले. शेतकरी, बुरुजावर पहारा देणारा सैनिक किंवा दरबारातील कारकून—सर्वांचे आयुष्य त्यांनी जिवंत केले.

त्यांच्या लेखनात परंपरेची प्रामाणिकता आणि आधुनिकतेची दृष्टिक्षमता एकत्र झाली होती. त्यांनी शिवचरित्राला भक्तिभावाच्या धुक्यात हरवू न देता, शास्त्रीय परिशीलनाच्या उजेडात मांडले. त्यामुळे त्यांच्या चरित्रलेखनशैलीने भावनिकता आणि विचारांची ज्वाला एकत्र प्रज्वलित केली. त्यांनी दाखवून दिले की इतिहास केवळ भूतकाळाचा पट नाही; तो वर्तमानाला दिशा देणारा दीप आहे.

त्यांच्या संशोधनाचा पाया सत्यशोधक वृत्ती होती. बखरींच्या भावनाप्रधानतेला त्यांनी प्रामाणिक पुराव्यांच्या कसोटीवर तोलले, दंतकथा व ऐतिहासिक तथ्य यातील फरक स्पष्ट केला. त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याविषयी असलेले अनेक गैरसमज दूर झाले आणि नव्या पिढीत स्वराज्याची जाणीव अधिक दृढ झाली.

वैयक्तिक प्रवासावर नजर टाकली, तर सुरुवातीला त्यांनी मराठी साहित्याचा अभ्यास करताना शिवचरित्राचे मोहक वलय अनुभवले. हळूहळू दुर्गदुर्गम गडांवर पाऊल ठेवून, जुन्या हस्तलिखितांचा अभ्यास करून, राजमुद्रांची छाप ओळखून संशोधनाला नवे वळण दिले. त्यांनी पायी भ्रमंती करून साधना केली, विद्यापीठांत व्याख्यानांद्वारे तरुणांना प्रेरित केले आणि गड-दुर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

इतिहास क्षेत्रापुरतेच त्यांचे योगदान मर्यादित नव्हते; त्यांनी इतिहास पत्रकारितेतही लक्षणीय लेखन केले. बहुभाषिक प्रावीण्यामुळे (संस्कृत, फारसी, इंग्रजीसह मराठी) प्राचीन साधनांचा सखोल अभ्यास केला, ज्यामुळे त्यांच्या ग्रंथांना व्यापक दृष्टिकोन आणि प्रामाणिकता लाभली.

गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या कर्तृत्वाला शैक्षणिक क्षेत्राने मानाचा मुजरा दिला. विविध विद्यापीठांनी त्यांना विशेष व्याख्यानांसाठी आमंत्रित केले. सांस्कृतिक संस्थांनी त्यांना सन्मानचिन्हे बहाल केली. महाराष्ट्र शासनाच्या शिवजन्मतिथी निश्चिती समितीत आणि बालभारतीच्या इतिहास पाठ्यपुस्तक मंडळात त्यांनी सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या ख्यातनाम संस्थेतही त्यांचे काम प्रतिष्ठेचे मानले जाते.

त्यांच्या साहित्यसंपदेला वाङ्मयीन क्षेत्रातून विशेष मान्यता मिळाली. मराठी साहित्य संमेलनांत व संशोधन परिषदांत त्यांना निमंत्रित केले जात असे. त्यांच्या ग्रंथांना राज्य शासन, साहित्य परिषद तसेच नामांकित विद्यापीठांनी गौरविले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, साहित्य परिषद सन्मानचिन्ह, पुणे विद्यापीठाचा संशोधन गौरव, तसेच इतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले.

कालानुक्रमिक ग्रंथसंपदेचा आढावा घेतला तर दिसते की, १९७०–८० च्या दशकात त्यांनी संशोधनास सुरुवात केली आणि पुढील दशकात पहिले महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित झाले. १९८० च्या दशकात त्यांचे ग्रंथ छत्रपतींचे चरित्र आणि शिवाजींची युद्धनीती प्रकाशित झाले, तर १९९० च्या दशकात त्यांनी मराठा साम्राज्याची घडण, शिवकालीन समाजव्यवस्था आणि भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण या पाच खंडांच्या भव्य मालिकेची पूर्तता केली. २००० नंतर त्यांनी गड-दुर्गांचा इतिहास व इतर संशोधनपर ग्रंथ प्रकाशित करून आपल्या कार्याला व्यापक समाजाशी जोडले. याशिवाय शेकडो संशोधनलेख आणि असंख्य व्याख्यानांद्वारे त्यांनी चार दशकांच्या प्रवासात इतिहासाला शास्त्रीय व सुलभ दुहेरी दृष्टी प्रदान केली.

सामाजिक परिणामाच्या दृष्टीने, त्यांच्या लेखनाने वाचनसंस्कृतीला चालना दिली, विद्यार्थ्यांना प्रामाणिक अभ्यासाची प्रेरणा मिळाली, संशोधकांना मार्गदर्शन झाले, आणि गडसंवर्धन चळवळीला नवे भान लाभले. त्यांच्या साध्या राहणी, अढळ चिकाटी आणि प्रामाणिक दृष्टिकोनामुळे ते रसिकांसाठी इतिहासाचे दीपस्तंभ ठरले.

गजानन भास्कर मेहेंदळे (१९४७–२०२५) हे मराठी इतिहास अभ्यासक व संशोधनप्रवर्तक होते, ज्यांना विशेषतः मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कार्यासाठी ओळखले जात असे. त्यांनी इतिहास, पत्रकारिता आणि सामरिकशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले, शिवचरित्रावर सखोल अभ्यास केला, अनेक ग्रंथ व शेकडो लेख लिहिले, तसेच दोन डझनांहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाच्या समित्या व बालभारतीच्या इतिहास पाठ्यपुस्तक मंडळात सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

इतिहासाच्या मूळ साधनांचा अभ्यास, लष्करी दृष्टिकोनातून स्वराज्याचा शोध, बहुभाषिक प्रभुत्व आणि साहित्यिक शैली यामुळे त्यांचे कार्य अद्वितीय ठरले. त्यांच्या निधनाने मराठी इतिहासविश्वावर मोठा आघात झाला आहे.

त्यांचे ग्रंथ, विचार आणि लेखनशैली मराठी मनाच्या सांस्कृतिक वारशात कोरलेले राहतील. आज त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना जाणवते की त्यांनी इतिहासाचा पायघड्या घालून आपल्याला आत्मभान दिले. भावी पिढ्यांसाठी त्यांचे ग्रंथ केवळ अभ्यासासाठी नव्हे, तर राष्ट्रभान जागवण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतील, मराठी मनाला आत्मविश्वास, अभिमान आणि प्रेरणा देत राहतील.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०९/२०२५ वेळ : १२:३३

आरीज बेग मिर्झा यांची जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती – कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

0

Loading

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांची जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी ही घोषणा करताच जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आर्णी (जि.यवतमाळ) येथील माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले असून युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस पद त्यांनी भूषविले आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा दीर्घ अनुभव, लोकांशी असलेले थेट संवादाचे कौशल्य आणि संघटन मजबूत करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे जळगाव जिल्हा काँग्रेसला अधिकृत पत्र पाठवून या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त जिल्हा प्रभारीच नव्हे तर विधानसभा निहाय प्रभारी नेमणुकीचीही घोषणा करण्यात आली असून यामुळे पक्षाच्या कार्याला अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसची उपस्थिती ठळकपणे जाणवेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. नियुक्त्या पुढीलप्रमाणे झाल्या आहेत – चोपडा विधानसभा प्रभारी म्हणून बुलढाण्याचे संजय उमरकर यांची नियुक्ती झाली आहे. अमळनेर मतदारसंघाची जवाबदारी किशोर कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रावेरसाठी म.प्र.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते यांची निवड करण्यात आली आहे. भुसावळसाठी पक्षाचे आणखी एक सरचिटणीस रामविजय बुरुंगले यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव शहर व ग्रामीण भागासाठी नाशिकचे प्रकाश पवार यांना प्रभारी करण्यात आले आहे. एरंडोल विधानसभा प्रभारी म्हणून बुलढाण्याचे माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. चाळीसगावसाठी धुळ्याचे रणजितसिंग पवार प्रभारी राहणार आहेत. मुक्ताईनगरसाठी बुलढाण्याचे तुळशीराम नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तर पाचोरा व जामनेर विधानसभा क्षेत्राची थेट जवाबदारी आरीज बेग मिर्झा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक निवडणुका, विधानसभा निवडणुका तसेच पक्ष संघटन दृढ करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माहिती देताना सांगितले की, लवकरच नव्याने नियुक्त झालेल्या सर्व प्रभारींच्या बैठका आयोजित करून पुढील कार्यक्रम जाहीर केले जातील. तसेच प्रभारींचे जिल्हाभर दौरे होणार असून, कार्यकर्त्यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होईल. जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून संघटनात्मक अडचणी जाणवत होत्या. परंतु या नव्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून पक्ष पुन्हा एकदा सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आरीज बेग मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव काँग्रेस अधिक प्रभावीपणे काम करेल आणि कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळेल, असे मत अनेक वरिष्ठ नेत्यांनी नोंदवले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी केलेल्या या नियुक्त्या जिल्हाभर गाजत असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही आठवड्यांत होणाऱ्या बैठकीतून आगामी निवडणूक धोरण व संघटनवाढीचा मार्ग निश्चित केला जाणार आहे. काँग्रेसच्या जुने-नवे कार्यकर्ते यामुळे पुन्हा एकत्रित येऊन पक्ष अधिक बळकट होईल, अशी सर्वत्र चर्चा आहे.

पूरग्रस्तांसाठी मायेचा हात – पाचोर्‍यातून शिदोरी, ब्लँकेट व भांड्यांचे किट वाटप

0

Loading

पाचोरा : निसर्गाच्या कोपाला कोणीच आवर घालू शकत नाही. गेल्या काही दिवसांत पाचोरा शहर व परिसराने अशा कोपाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ढगफुटीसारख्या भीषण आपत्तीने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कोणी घर गमावले, कोणी संसारोपयोगी वस्तू, तर कोणी रोजच्या उदरनिर्वाहाचे साधन. हातात काहीही उरले नाही, अशा असहाय्य अवस्थेत अनेक कुटुंबे आजही उभे आहेत. पण या काळोखातही माणुसकीचा दिवा विझू दिला नाही, तर त्याला अधिक प्रकाशमान केले आहे. या परिस्थितीत समाजातील अनेक घटकांनी “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असे सांगत मदतीचा हात पुढे केला आहे. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता मदतकार्याचे सुसूत्र नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटावे, उद्याचा दिवस जगण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम उभा राहिला आहे. या उपक्रमाअंतर्गत ५० कुटुंबांना शिदोरी किट देण्यात येणार आहे. या शिदोरी किटमध्ये चहा पाव किलो, तेल एक किलो, साखर दोन किलो, आटा पाच किलो, मीठ एक किलो, तूरडाळ एक किलो आणि भात तीन किलो या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. एका कुटुंबाला सध्या जगण्यासाठी नेमके काय हवे आहे, याचा विचार करूनच ही निवड करण्यात आली आहे. या शिदोरी किटची किंमत ७५० रुपये असून, सर्व साहित्य पाचोर्‍यातील अमित प्रोव्हीजन येथून विकत घेण्यात येणार आहे. पुरामुळे संसार उघड्यावर आल्याने थंडीच्या काळात उबदार वस्त्रांची प्रचंड गरज भासत आहे. त्यासाठी या ५० कुटुंबांना प्रत्येकी दोन ब्लॅंकेट देण्यात येणार आहेत. एका ब्लॅंकेटची किंमत १४५ रुपये असून, ही वस्त्रे राम सेल्स ट्रेडिंग कंपनी, पाचोरा येथून विकत घेतली जाणार आहेत. रात्रीच्या थंडगार वाऱ्यात आईने मुलाला अंगावर घेऊन उब मिळवण्याची पाळी येऊ नये, यासाठी ही छोटीशी पण मायेची भेट दिली जाणार आहे. याशिवाय २० कुटुंबांना भांड्यांचे किट देण्याची योजना आखण्यात आली आहे. कारण फक्त पोटासाठी धान्य असून उपयोग नाही, ते शिजविण्यासाठी साधनेही लागतात. या किटमध्ये दोन मोठ्या थाळ्या, दोन लहान प्लेट, दोन वाट्या, दोन ग्लास, एक तांब्या, एक कढई, एक भगोना, एक मोठा चमचा आणि एक भात्या यांचा समावेश आहे. हे साहित्य नरुद्दीन ब्रदर्स, पाचोरा येथून विकत घेण्यात येणार असून, प्रति किटची किंमत अंदाजे ७५० रुपये आहे. हे किट म्हणजे नुसती भांडी नाहीत, तर संसार पुन्हा उभारण्याचा एक छोटा पण महत्त्वाचा पाया आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी प्रति हेड कॉन्ट्रीब्युशन दोन हजार रुपये (२०००/-) ठेवण्यात आले आहे. आपली माणुसकी व्यक्त करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या योगदानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासाठी फोन पे द्वारे योगदान स्वीकारले जात असून, त्यासाठी क्रमांक आहे – ८३०८६२१५९० (नाव – हर्षद किशोरकुमार संघवी). आपल्या योगदानाचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर शेअर करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे, जेणेकरून पारदर्शकतेने हे काम पार पाडता येईल. आज एका कुटुंबाच्या हातात अन्नधान्याची पिशवी पोहोचली, त्यांच्या अंगावर दोन ब्लॅंकेट चढली, स्वयंपाकघरात पुन्हा भांडी खडखडू लागली – तर त्यांचे डोळे पाणावतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील, तर माणुसकीच्या उबदार स्पर्शाने उमटलेले आनंदाश्रू असतील. या मदतीतून पीडित कुटुंबांना केवळ वस्तू मिळणार नाहीत, तर समाज अजूनही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा विश्वासही मिळणार आहे. “आज तुम्ही मदतीचा हात पुढे कराल, उद्या देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल,” या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. संकटाच्या या काळात, पाचोर्‍यातील नागरिकांनी दाखविलेला सहभाग नि:स्वार्थी सेवाभावाचा आदर्श आहे. प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण उजळावा, हीच या प्रयत्नामागची खरी प्रेरणा आहे.

पाचोरा तालुक्यातील ढगफुटी आपत्तीग्रस्त गावांमध्ये प्रशासनाचे युद्धपातळीवरील मदतकार्य

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुक्यात 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शिंदाड, सातगाव डोंगरी, निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे आणि खडकदेवळा या गावांवर मोठे संकट कोसळले. मुसळधार पावसामुळे झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर जनावरांचे व घरांचे नुकसान झाले आहे. मा. विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात या आपत्तीचे गंभीर चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या मते, नुकसानाचे प्रमाण इतके व्यापक आहे की पंचनाम्यानंतर आणखी मोठे नुकसान स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या आपत्तीत मानवी जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब असली तरी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा कणा मानल्या जाणाऱ्या जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार एकूण 1879 जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली आहेत. त्यामध्ये 90 मोठी व 128 लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली तर सात दुधाळ जनावरे गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतीकामासाठी आधार ठरणारी 23 मोठी व 41 लहान ओढकाम करणारी जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पोल्ट्री व्यवसायातही प्रचंड नुकसान झाले असून तब्बल 1572 कोंबड्या वाहून गेल्या, त्यापैकी 1050 कोंबड्यांचा अद्याप मागमूस लागलेला नाही. याशिवाय 25 पाळीव डुकरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. फक्त जनावरेच नव्हे तर शेकडो कुटुंबांचे घरकुल उद्ध्वस्त झाले आहे. आकडेवारीनुसार 56 कच्ची घरे पूर्णपणे कोसळली, 248 कच्ची व 25 पक्की घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय 32 झोपड्या व 54 गोठ्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे घराविना व जनावरे गोठ्याविना उघड्यावर पडली आहेत. गावोगावी पूराचे पाणी शिरल्याने शेतजमिनी व उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. मात्र पिकांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याने त्याची संपूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही. दरम्यान, शिंदाड व पिंपळगाव हरेश्र्वर महसूल मंडळातील 11 गावांमध्ये 648 घरांचे पंचनामे काल दि.18 सप्टे. रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण झाले आहेत. शेतीचे पंचनामे कालपासून सुरू झाले असून, अतिरिक्त 20 कर्मचारी यांची टीम आज पुन्हा पंचनाम्यासाठी पाठवण्यात आली आहे. नुकसान मोठे असल्याने पंचनाम्याला वेळ लागत असला तरी कोणत्याही परिस्थितीत आज व उद्या सर्व पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. शेतकरी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे. या आपत्तीग्रस्त भागात पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि महसूल विभागातील संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र अथक परिश्रम घेत आहे. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल कर्मचारी, जिल्हा प्रशासन, तसेच पोलीस विभाग यांच्या समन्वयातून बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि त्यांना अन्न, पाणी, ब्लँकेट्स व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कुटुंबांना शाळा, मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकही प्रशासनासोबत मदतीसाठी धावून आले आहेत. गावोगावी मदतकार्याची चळवळ उभी राहिली असून आपत्तीग्रस्तांना आवश्यक साहित्य पुरवले जात आहे. शासनाकडून पंचनाम्यानंतर अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे व त्यानंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय होईल. मात्र आताच्या घडीला गावकऱ्यांसमोरचा प्रश्न उद्याच्या जगण्याचा आहे. घर, जनावरे व शेतीचा आधार गमावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या डोळ्यांत हतबलतेचे अश्रू दाटले आहेत. पाचोरा तालुक्याच्या इतिहासात ही ढगफुटीची घटना भीषण आपत्ती म्हणून नोंदली जाणार आहे. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे मानवी जीव वाचला असला तरी झालेल्या प्रचंड आर्थिक व नैसर्गिक नुकसानीतून सावरण्यासाठी शासन व समाज या दोघांचीही सामूहिक मदत गरजेची आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!