Home Blog Page 69

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 23 जुलै 2025 रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला गणवेश वाटप कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला नाही, तर त्यांच्या पालकांच्या मनातही संस्थेविषयी कृतज्ञतेची भावना जागृत झाली. सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षण संस्थांनी राबवलेले असे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गणवेश वाटप सोहळा ठरला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक आप्पासो. सतीश चौधरी, मयूर सराफ, योगेश जडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रुपेश पाटील आणि डॉ. नरेश गवांदे हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमात आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांमध्ये विजय कापड दुकानाचे संचालक अनुराग भारतीया, नेरी वाला ड्रेसेसचे संचालक रवी अग्रवाल, दर्शन एम्पोरियमचे संचालक ओम राठी आणि पी.सी. जैनचे संचालक विजयकुमार बडोला यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते मदत करून इतरांसाठी अनुकरणीय आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका ए. आर. गोहिल, आर. बी. तडवी, आर. बी. बांठीया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील आणि कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे जवळपास 200 गरजू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. हा प्रसंग अत्यंत भावनिक होता. अनेक विद्यार्थ्यांनी ही मदत म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात आत्मविश्वासाची आणि प्रेरणेची ठिणगी असल्याचे नम्रपणे सांगितले. गरिबीतून प्रगतीच्या दिशेने पावले टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मदत केवळ कपड्यांची नव्हे, तर आत्मसन्मानाची जाणीव करून देणारी ठरली. गणवेश वाटप करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. चेअरमन संजयनाना वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा पुरवणे हे संस्थेचे दायित्व आहे. गणवेश म्हणजे शिस्त, एकरूपता आणि आत्मविश्वास. तो विद्यार्थ्यांना सामाजिक स्तरापलीकडे जात समानतेची भावना देतो.” व्हाईस चेअरमन नानासाहेब जोशी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “संस्थेचा उद्देश फक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक भान ध्यानात घेऊन अशी उपक्रमशीलता जोपासणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे.” संचालक सतीश चौधरी, मयूर सराफ, योगेश जडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रुपेश पाटील, डॉ. नरेश गवांदे यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मांडले आणि संस्थेच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. उपस्थित उद्योजकांनीही आपली मते व्यक्त करताना सांगितले की, “व्यवसाय ही आपली उपजीविकेची साधने असली तरी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून आपण त्यात योगदान द्यावे, हीच खरी समाजसेवा होय. विद्यार्थ्यांना दिलेला गणवेश ही केवळ देणगी नव्हे तर त्यांच्या शिक्षणातील उभारी आहे.” मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्व मान्यवर व उद्योजकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. “संस्थेच्या ध्येयधोरणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला अग्रक्रम आहे. आजच्या या उपक्रमामुळे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रभावी आणि प्रवाही सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले. त्यांच्या सौम्य आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन एकात्मतेचा आदर्श प्रस्तुत केला. यामुळे “एकत्र येऊन केवळ शाळेचे नव्हे तर समाजाचेही हित साधता येते,” हा सकारात्मक सामाजिक संदेश समाजात पोहोचला. विद्यार्थ्यांनी गणवेश मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही मदत आमच्यासाठी केवळ कपड्यांची नव्हे, तर शिक्षणातील आत्मसन्मान आणि प्रेरणेची ओळख आहे.” या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. अशा उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असून, संस्थेच्या पुढाकारामुळे भविष्यात आणखी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळणार, याबद्दल पालक व नागरिकांमध्ये आश्वस्तता निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम केवळ गणवेश वाटपा पुरता मर्यादित राहिला नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मसन्मानाचे बीज रुजवणारा ठरला. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली मदत, संस्थेचा समर्पित दृष्टिकोन आणि शिक्षकांचा मायेचा स्पर्श या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला. या उपक्रमातून इतर शाळांनीही प्रेरणा घेऊन अशा उपक्रमांची मालिका राबवावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गो.से. हायस्कूलने दिलेला सामाजिक संदेश आणि विद्यार्थ्यांच्या मनात जागवलेला आत्मसन्मान हा या कार्यक्रमाचा खरा ठेवा ठरला आहे.

पाचोऱ्यात गुन्हेगारी वाढीचा गंभीर सवाल : डॉन स्टाईल व्हिडिओ व्हायरल, पोलिस व कायदा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

0

Loading

पाचोरा – पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच बस स्टॅड प्रकरणात, गोळीबार प्रकरणातील आरोपी शरद युवराज पाटील याला पोलिस स्टेशनमधून बाहेर नेताना आणि पोलीस वाहनात बसवत असताना तयार केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.त्यामध्ये दुर्लभ कश्यप डॉनसदृश शैली दिसून येते.
या व्हिडिओचा उद्देश काय आहे यावर चर्चा सुरु असून,हेच समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे साधन आहे. तरी देखील पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दाखल घेण्यात आली नाही आणि VDO काढणारे व प्रसारित करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्यात आली नाही अशाच स्वरूपाचं बस स्टँडवर मयत आकाश मोरे याने “तुम्ही हवेत गोळ्या मारतात आम्ही छातीवर गोळ्या मारतो ” या इंस्टाग्राम वर प्रसारित झालेल्या रिलची त्याचं वेळी दखल घेतली असती & “कोणी हवेत गोळ्या झाडल्या होत्या” हा रिल का? & कोणासाठी बनवण्यात आला होता ? कृष्णापुरी भागातील कोणते युवक & कधी पासुन? कोणाच्या टार्गेटवर आहेत? अल्पवयीन मुलांपर्यंत गावठी कट्टे व रिव्हाल्वर पोहचण्याचे व देण्याची यंत्रणा कोणती? यांचा गॉडफादर कोण?  या दिशेने तपास केला असता तर शिवाजी नगर मधील नातेवाईकाच्याच हातुन नातेवाईकाची हत्या झाली नसती आणि खरा मास्टर माईड व सर्व सुत्रे तेव्हाच समोर आले असते अजुनही वेळ गेलेली नाही बरेच काही मोठे रॅकेट समोर येऊ शकते कारण यापूर्वीही पत्रकार संदीप महाजन यांना याच शरद पाटील व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांव्दारे व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. या घटना सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत. त्यांची एवढी दहशत आहे की त्यांच्या अवैध धंद्यांना देखील कोणी कारवाई अथवा धाड टाकायची हिंमत करत नाही
या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात पिस्तोल विक्री करणारे व गुन्हेगारी रॅकेटच्या कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही कारवायांमध्ये अंमलबजावणी अपुरी किंवा त्रुटीयुक्त असल्याचे आरोप देखील होत आहेत.पिस्तूल कोठून आली आणि कुठून येतात व पाचोरा येथे कोण विक्रेता आहे आज पर्यंत त्यांनी पाचोरा शहरात किती पिस्तोल विक्री केल्यात याचा कोणताही तपास करण्यात आलेला नाही एवढेच नव्हे तर शरद युवराज पाटील हा आरोपी सहजपणे जामिनावर मुक्त होईल अशा पद्धतीने दोषारोपपत्र मांडल्याचे निरीक्षण नोंदवले जात असल्याची चर्चा आहे. कारण त्याच्यावर वेळोवेळी निघालेले न्यायालयीन समन्स व वॉरंटही पोलीसांकडून वेळेत बजावले जात नसल्याची बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल ते निर्दोष मुक्तता झाल्यावर सरकार तर्फे अपिलीय होणार नाही याची दक्षता घेतली जाते
या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी या गोळीबार प्रकरणी सखोल चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा सीआयडीमार्फत करावी. यातून कोणतेही मोठे गुन्हेगारी जाळे कार्यरत असल्यास ते उघडकीस येईल आणि भविष्यातील धोके टाळता येतील. विशेषबाब म्हणजे शरद युवराज पाटील सह काही आरोपी मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी पो स्टे मधील गंभीर गुन्ह्यांमध्येही संशयित आहेत, याची चौकशी युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे. बीड प्रमाणे पाचोऱ्यात देखील या गुन्हेगारांचे प्रति वाल्मीक कराड यासारखे गुन्ह्यांचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज सध्या तीव्रतेने जाणवते.
या प्रकरणात संलग्न असलेल्यांची गुन्हेगारी व अवैध धंद्यांची पार्श्वभूमी, त्यांचे स्थानीक पोलीस प्रशासनावर आर्थिक किंवा प्रशासकीय संबंध, पोलिसांवर असलेला प्रभाव, अशा बाबींची सखोल तपासणी केल्यासच सत्य बाहेर येऊ शकेल. काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. पोलिस व न्यायव्यवस्थेने यावर स्वखर्चाने आणि स्वतंत्रपणे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
गावठी कट्टे व रिवाल्वर या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व सभांमध्ये या विषयावर वेळो – वेळी चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे नुकत्याच पावसाळी अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही या प्रकारांवर लक्ष वेधले होते. मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नसल्याने प्रश्न उभा राहतो – नेमके पाणी कुठे मुरते आहे? यावर चक्क सत्ताधारी आमदारही आवाज उठवत असताना राज्य यंत्रणेची प्रतिक्रिया का संथ आहे, असा सवाल उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारकडे निवेदने व पुरावे सादर करत यावर तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बीड प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सारख्या पाचोर्‍यात देखील प्रति वाल्मीक कराड याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला व त्याच्या आश्र्याखाली असलेल्या गुंडांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, विशेष तपास व अवैध शस्त्रांचा शोध घेणारे मिशन लवकरात लवकर सुरू होणे काळाची गरज आहे. अन्यथा पाचोऱ्यात खुलेआम  रक्तपाताच्या घटनांची मालिका सुरूच राहणार आहे

आज दि.23/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
उभयचारी योगामुळे आज कार्यात मान्यता व आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल, पण खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे आज करिअरमध्ये प्रगती दिसू शकते, तथापि भावनिक अस्थिरता संभवते—त्या काळात शांतता राखावी.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
मानसिक तणाव असेल, तरी बुधादित्य योगामुळे संवादात सहजता व करिअरच्या संधी वाढतील.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा 

कर्क
आज सर्जनशीलता व संवादाद्वारे करिअरमध्ये सकारात्मक हालचाल होऊ शकते; प्रवासही लाभदायक ठरु शकतो.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
उभयचारी योगामुळे आज नेतृत्वगुण स्पष्ट होतील, आर्थिक व प्रतिष्ठेत लाभ; परंतु संयम ठेवा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज विरोधाचा सामना करावा लागू शकतो, मात्र निर्णय विचारपूर्वक घेतल्यास तो मात शक्य आहे.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे, परंतु नात्यांमध्ये संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज मालव्य राजयोगामुळे आर्थिक उन्नतीची शक्यता आहे, परंतु खर्च नियंत्रणात ठेवावे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा 

धनु
आज संयमाने काम व प्रवासात प्रगती होईल; खर्च आणि मानसिक ताण नीट व्यवस्थापित करा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी 

मकर
आत्मपरीक्षणाचा पूर्णयोग उपलब्ध असून, धैर्याने घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायदे देतील.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
आज करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे; जुन्या योजना परिणामकारक ठरतील.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा 

मीन
राजयोग व शनि वक्री यांचे संयोग लाभदायक आहेत; आर्थिक तसेच भावनिक दोन्ही स्थैर्य राखायला हवे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर- २२० रक्तदात्यांचा सहभाग

0

Loading

पाचोरा – महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आणि जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व तालुक्याच्या वतीने एक उल्लेखनीय व समाजोपयोगी उपक्रम — भव्य रक्तदान शिबिर व महासंकल्प अभियान — उत्साहात पार पडले. या अभियानाचे आयोजन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर केवळ पाचोरा शहरापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार पिंपळगाव, भडगाव व नगरदेवळा या भागांपर्यंत करण्यात आला होता. या चार ठिकाणांवर एकूण २२० रक्तदात्यांनी आपल्या रक्तदातृत्वाचा ठसा उमटवून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपली. पाचोऱ्यात ५८, पिंपळगाव येथे ४५, भडगाव येथे ७५, तर नगरदेवळा येथे ४२ अशा प्रकारे रक्तदात्यांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी बनवले. या शिबिरासाठी पाचोरा येथे संजीवनी रक्तपेढी, जळगाव यांचे सहकार्य लाभले. तसेच नगरदेवळा येथील शिबिरासाठी भवर रक्तपेढीने रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला. दोन्ही संस्थांनी आपल्या अनुभवी वैद्यकीय पथकासह अचूकतेने व नियमबद्धतेने रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पाडली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व समारोपप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रत्येक रक्तदात्याचे मनोबल वाढवण्यासाठी दिलीप वाघ यांनी त्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, समाजकार्यासाठी असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नानासाहेब संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पाचोरा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, पिंपळगाव मंडळाध्यक्षा शोभाताई तेली, जिल्हा चिटणीस ज्योतीताई भामरे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष तुकाराम पाटील, माजी सभापती बन्सीबापू पाटील, अनिल धना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एन. सी. पाटील, मार्केट कमिटी सदस्य विजय कडू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपबापू पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद सोमवंशी, कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, शिवदास पाटील, माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, मुकेश पाटील, तालुकाउपाध्यक्ष शरद अण्णा, गोपाळ पाटील, योगेश माळी, पिंटू भामरे, व्ही.टी. जोशी, भागवत महालपुरे, प्रकाश एकनाथ पाटील, सतीश चौधरी, हरुण दादा देशमुख, योगेशदादा पाटील, भूषण वाघ, ललित वाघ, अॅड. दीपक पाटील, विनोद पाटील, पिंटू राजपूत, अॅड. अविनाश सुतार, गौरव वाघ, अजय अहिरे, गणेश पाटील, रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर, रणजीत पाटील, प्रा. डॉ. माणिक पाटील, हेमराज पाटील, प्रकाश चौधरी, भगवान मिस्तरी, धर्मराज पाटील, अनिल देवरे, सतीश देशमुख, संदेश पवार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, माणिक शिंदे, महादू कोकणे, प्रदीप वाघ, अली पेंटर, निवृत्ती सूर्यवंशी, डॉ. वासुदेव वले, राजेश माडोळे, प्रा. नितीन पाटील, विनोद महाजन, वसंत गिते, अविनाश सोमवंशी, शांतीलाल तेली, प्रा. अतुल सूर्यवंशी, प्रा. महेंद्र महाजन, निलेश पाटील, वसंत पाटील, महेश माळी, ललित पाटील, गणेश पाटील, प्रा. प्रदीप पाटील, कुलदीप पाटील, गोलू पाटील, महेश नेरपागर, मनोज पवार, उमेश माळी, बंटी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शवून समाजसेवेसाठी महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केले. विशेषतः रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर यांचा उल्लेखनीय सहभाग होता. माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत नाहीत तर त्यांनी आपले कार्यकर्तृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि झपाट्याने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे राष्ट्रीय स्तरावरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसाचा उपयोग केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न ठेवता, समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमातून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे.” या कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद करताना सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या आजारी व्यक्तीच्या जीवाला दिलेले हे रक्त म्हणजे जीवनदानच असते.” कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांची तपासणी, नोंदणी, प्रमाणपत्र वितरण आणि शिबिराचे व्यवस्थापन यासाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. अशा समाजोपयोगी आणि मानवतेची भावना जागृत करणाऱ्या उपक्रमामुळे पाचोरा परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हा उपक्रम पुढील काळातही वारंवार राबविण्याचे संकेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिले असून युवकांना समाजहिताच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार दिलीप वाघ व त्यांच्या नेतृत्वाखालील टीमचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून साकारलेली कृती म्हणून स्थानिक जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

पाचोरा में गंदे पानी की सप्लाई पर MIM पदाधिकारियों ने नगर परिषद को दिया ज्ञापन : अवाम की सेहत पर गंभीर खतरा

0

Loading

पाचोरा – शहर में इस वक़्त अवाम को बहुत ही संगीन और परेशान करने वाली पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। नल के ज़रिए जो पानी लोगों के घरों में आ रहा है, वो निहायत ही गंदा, बदबूदार और खराब है। उस पानी में कूड़ा-कचरा और मिट्टी साफ़ तौर पर देखा जा सकता है। इसी परेशानी को लेकर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (MIM) की पाचोरा तालुका और शहर शाखा की जानिब से नगर परिषद के चीफ एक्जीक्यूटिव ऑफिसर (CIO) को एक तफ्सीली याददाश्त पेश की गई, जिसमें जल विभाग की लापरवाही के खिलाफ फौरन कार्रवाई की मांग की गई है। इस याददाश्त में साफ़ तौर पर कहा गया है कि पिछले कई हफ़्तों से शहर के तक़रीबन हर हिस्से में लोगों को बहुत ही खराब, बदबूदार और सेहत के लिए नुकसानदेह पानी सप्लाई किया जा रहा है। इस पानी को किसी भी तरह से फ़िल्टर या साफ़ किए बगैर सीधा नलों में छोड़ा जा रहा है। ये वही पानी है जो लोग खाने, पीने, नहाने और दीगर घरेलू ज़रूरतों के लिए इस्तेमाल करते हैं। ऐसे पानी की वजह से सीधा असर लोगों की सेहत पर पड़ रहा है। इस गंदे और दूषित पानी की वजह से अवाम को दस्त, मलेरिया, डेंगू, स्किन डिज़ीज़, कॉलरा और टायफॉइड जैसे संगीन बीमारियों का सामना करना पड़ रहा है। ख़ास तौर पर बच्चे, बुज़ुर्ग और बीमार लोग ज़्यादा मुतास्सिर हो रहे हैं। बहुत सारे घरों में पूरे-पूरे खानदान बीमार पड़ गए हैं। सेहत की मौजूदा सहूलियतें पहले से ही नाकाफी हैं, और ऐसे में इस तरह के गंदे पानी ने हालत और बिगाड़ दी है। MIM के मुताबिक ये हालात एक किस्म की “जल आपदा” (Water Crisis) बन चुके हैं। इस परेशानी को देखते हुए MIM के ज़िला, तालुका और शहर के ज़िम्मेदारान ने मिलकर नगर परिषद के अफसरों से मुलाक़ात की और ये मांगें पेश कीं: जल विभाग को हिदायत दी जाए कि वो पूरे पानी सप्लाई सिस्टम की जांच करे। पानी फ़िल्टर करने वाले सिस्टम्स को तुंरत चेक करके उन्हें ठीक किया जाए। पानी की टंकियों और पाइपलाइनों की सफ़ाई करवाई जाए। लोगों को उनके घरों में सिर्फ़ साफ़, फ़िल्टर और पीने लायक पानी ही मुहैया कराया जाए। इस पूरे काम पर निगरानी रखने के लिए एक इंडिपेंडेंट कमेटी बनाई जाए जो लोगों से राय लेकर रिपोर्ट पेश करे। जिन लोगों की सेहत इस पानी की वजह से खराब हुई है, उनके लिए हेल्थ कैंप लगाकर फ्री इलाज मुहैया कराया जाए। इस मौक़े पर जो MIM ज़िम्मेदारान मौजूद थे, उनमें शामिल हैं : फहीम शेख (उपज़िला अध्यक्ष), सय्यद ताहेर अली (शहर अध्यक्ष), डॉ. अकील शेख (तालुका अध्यक्ष), अशफ़ाक खाटीक (कार्याध्यक्ष), हारून भाई बागवान (सामाजिक कार्यकर्ता), फारुख पिंजारी (सामाजिक कार्यकर्ता), तारिक सय्यद (सामाजिक कार्यकर्ता), सलीम गनी (मिस्त्री) और कई दीगर कार्यकर्ता। इस मौके पर फहीम शेख ने कहा, “हुकूमत और प्रशासन बार-बार अवाम की बुनियादी ज़रूरतों से मुंह मोड़ रहा है। पानी इंसान की बुनियादी हक़ है, और अगर टैक्स देने के बावजूद ज़हर जैसा पानी मिले, तो ये सरासर ज़ुल्म है।” शहर अध्यक्ष सय्यद ताहेर अली ने कहा, “मुल्क में आम आदमी बेहाल है। सिर्फ़ मीटिंग लेकर औपचारिकताएं पूरी करने से काम नहीं चलेगा। जब तक हमारी मांगें पूरी नहीं होतीं, हम चैन से नहीं बैठेंगे।” डॉ. अकील शेख ने कहा, “डॉक्टर होने के नाते हम देख रहे हैं कि पानी की वजह से किस तरह गांवों की सेहत व्यवस्था तबाह हो रही है। अगर इसी तरह हालात रहे, तो आने वाले दिन और भी खतरनाक होंगे।” अशफाक खाटीक ने तंज़िया लहजे में कहा, “इलेक्शन के दौरान पानी की बातें करके वोट लिए जाते हैं, लेकिन जब देने की बारी आती है, तो जहर जैसा पानी दिया जाता है।” MIM का ये कदम सिर्फ़ एक सियासी पहल नहीं, बल्कि पाचोरा की अवाम के हक़ में एक बुलंद आवाज़ है। अगर प्रशासन वक़्त रहते चेत नहीं पाया, तो ये मुद्दा बड़ा आंदोलन बन सकता है। आख़िर में, ये कहा जा सकता है कि पाचोरा की जनता आज साफ़ पानी के लिए तरस रही है। अगर अब भी सख़्त कदम न उठाए गए, तो अवाम का ग़ुस्सा फूट सकता है और प्रशासन को भारी पड़ सकता है।

सोनचाफा सजलेला गड : बाबूराव कदम यांची ११ लाखांची घोषणा

0

Loading

नांदेड – इतिहासाच्या कुशीत विसावलेले पवित्र पाटणूर हे गाव आज नव्या प्रेरणास्थळी रूपांतरित होत आहे. “आपरंपार गड संस्थान पाटणूर” या संस्थेच्या माध्यमातून सुरु झालेल्या गड संवर्धन, पर्यावरण रक्षण व पर्यटन विकासाच्या एकात्म उपक्रमात आता निसर्गाचे नवे रंग खुलू लागले आहेत. पाटणूरच्या गडावर सुरु झालेल्या “सोनचाफा भिंत उपक्रमातून” गडावर व गडाभोवतालच्या परिसरात अनोखी सुवासिक झुळूक दरवळू लागली आहे. गडाच्या दोन्ही बाजूंनी जवळपास दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या वृक्षांची भिंत उभारण्यात आली असून, या भिंतीच्या माध्यमातून गडाचा संपूर्ण परिसर सुगंधी, नयनरम्य, पवित्र आणि भावस्पर्शी रूप धारण करणार आहे. गडावरील वातावरण आधीच आध्यात्मिकतेने भरलेले असताना आता निसर्गाचा हातभार लाभल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविक, पर्यटक व पर्यावरणप्रेमींना एक नव्याने ऊर्जा मिळणार आहे. हा अनोखा उपक्रम “आपरंपार गड संस्थान पाटणूर” या संस्थेच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे. संस्थेच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे या कार्यास योग्य दिशा लाभली असून, पुढील पाच वर्षांसाठी गडाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्याच प्रेरणेने सोनचाफा वृक्षसंवर्धनाच्या या अभिनव कल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले. गावातील अनेक तरुणांनी या उपक्रमात मनःपूर्वक सहभाग घेतला. विशेषतः “सेवा समर्पण परिवार” या संस्थेने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत मोठ्या प्रमाणात श्रमदान केले. गडाच्या पायथ्यापासून ते सर्वोच्च टोकापर्यंत सकाळी सहा वाजता हे स्वयंसेवक उपस्थित राहून वृक्ष लागवडीचे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम पार पाडत होते. त्यांच्या कष्टातून आणि समर्पणातून गडावर एक नवा इतिहास घडत आहे. सोनचाफा भिंत उपक्रमाचा शुभारंभही अत्यंत औपचारिक आणि भावनिक वातावरणात झाला. ज्येष्ठ समाजसेवक प्रा. राजाराम वट्टमवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली. याच कार्यक्रमात उपस्थितांचे मनोबल वाढवत, लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी गडाच्या विकास व संवर्धनासाठी ११ लाख रुपयांचा निधी जाहीर करून गडप्रेमींमध्ये आशेचा नवा किरण पेरला. “गडाचे नैसर्गिक पावित्र्य राखा, मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी बोलून उपस्थितांना भारावून टाकले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडाच्या पवित्र भूमीत अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. परमपूज्य रेवणसिद्ध आया महाराज, परमपूज्य गोपाळ महाराज, नरेंद्र चव्हाण, विठ्ठल पावडे, अशोक घोरबांड, बळवंत म्हस्के, नियोजन गुरु शिवाजी गावंडे, रमेश चित्ते, दिलीप माहूरे, अविनाश कदम, चंदा रावळकर, विठ्ठल फुलारी, नरसिंगा बतलवाड, प्रा. राजाराम वट्टमवार, पत्रकार ज्योती सरपाते, पत्रकार दीपक मठपती, दिगंबर देशमुख आदींची उपस्थिती या उपक्रमास बळकटी देणारी ठरली. कार्यक्रमात नरसिंगा बतलवाड यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. गडावरील पाण्याच्या अडचणीमुळे विहिरीसाठी जागा दान करून त्यांनी परोपकाराचा खरा आदर्श समोर ठेवला. त्यांच्या भूमीदानामुळे पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. तर परमपूज्य गोपाळ महाराज यांनी स्वतःच्या खर्चातून विहिरीचे खोदकाम करून या समाजोपयोगी कामात आपला सहभाग नोंदवला. या दोन्ही व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गड विकास उपक्रमासाठी खा. अशोकराव चव्हाण व मा. खा. रवींद्र चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले आहे. गडावर पाणी नेण्यासाठी लागणाऱ्या कामात त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. गड संवर्धन, पर्यावरणरक्षण आणि पर्यटन विकास या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करून राबवलेला हा उपक्रम केवळ पाटणूर गावापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रातील इतर गडांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. “आपरंपार गड संस्थान” व “सेवा समर्पण परिवार” यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे काम केवळ एक उपक्रम न राहता ते गडप्रेमींच्या श्रद्धेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा जागर ठरत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. त्यांनी प्रत्येक अतिथीची ओळख, उपक्रमाचे महत्त्व आणि भविष्यातील उद्दिष्टे यांची सुसंगत मांडणी केली. आभार प्रदर्शन अरविंद देशमुख यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, श्रमदान करणारे तरुण, गडसंवर्धनासाठी योगदान देणारे व्यक्ती, पत्रकार बांधव आणि गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामध्ये भावनांचा ओलावा होता, निसर्गाची सुंदरता होती आणि एकत्रित सामाजिक सहभागाचा उत्कृष्ट नमुना होता. पाटणूरचा ‘आपरंपार गड’ हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून आता एक प्रेरणास्थळ म्हणून उदयास येत आहे. हे कार्य केवळ संस्थात्मक उपक्रम न राहता, गावकऱ्यांच्या, स्वयंसेवकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती आहे. अशा संयुक्त कृतीतूनच आपल्याला नव्या महाराष्ट्राची निर्मिती करता येईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी या वेळी व्यक्त केला. पाटणूरचा गड आता सुगंधित व सशक्त होणार – या उपक्रमातून केवळ निसर्ग संवर्धनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा सुगंधही दरवळू लागला आहे.

“अभंग गायनातून साकारली पंढरी – संतविचारांचा आणि विद्यार्थिनींच्या भक्तीचा महोत्सव” प्राचार्य डॉ. अर्चना पत्की : “संतांचे अभंग आजही आपल्याला मानसिक आधार देऊन योग्य मार्ग दाखवितात”

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”
संतांचे आगमन हे नेहमीच आनंद, मंगल आणि भक्तिभावाचे प्रतीक असते. सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी कामिका एकादशीच्या निमित्ताने श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कनिष्ठ महाविद्यालयात अशाच एक भक्तिपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळाला, जणू साक्षात विठ्ठलमाऊलीच भक्तगणांना दर्शन देण्यासाठी अवतरले.

या दिवशी महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाच्या वतीने आयोजित “अभंग गायन स्पर्धा २०२५” मध्ये एकूण ७१ विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदवून संतवाङ्मयाचा गोडवा आणि अभंगांची भक्तिरसाळ परंपरा रसिकांसमोर उलगडली.
“ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला, नामदेवांनी भक्तीचा गंध दरवळवला आणि तुकारामांनी भावनांचा महासागर उलगडला. आजच्या विद्यार्थिनी त्यांच्या अभंगांनी हेच तेज पुढे नेत आहेत,” असे विचार प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील संत परंपरा ही आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीची शिदोरी आहे. संतांचे अभंग आजही आपल्याला मानसिक आधार देतात आणि जीवनवाट दाखवतात. मराठी विभागाच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींना संतविचारांची खरी ओळख होते, हे विशेष कौतुकास्पद आहे.”

उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले, “आजच्या तरुण पिढीला भारतीय मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. विद्यार्थिनी अभंग गायनातून संतांचे विचार प्रभावीपणे सादर करत आहेत, ही काळाची गरज आहे.”

कला शाखेच्या प्रमुख डॉ. हिना शाह यांनी विद्यार्थिनींच्या पारंपरिक वेषातील सादरीकरणाचे विशेष कौतुक करत सांगितले, “विद्यार्थिनींनी केवळ गाणं सादर केलं नाही, तर त्यांच्या पोशाखातून, हावभावातून आणि भक्तिरसातून संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवलं.”

या स्पर्धेत कला, वाणिज्य आणि बॅफ शाखेतील विद्यार्थिनींचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विजयी विद्यार्थिनींचा प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. किरण जाधव (समाजशास्त्र विभाग) आणि प्रा. रिता खडगी (पर्यावरण शिक्षण विभाग) यांनी परखडपणे केले. अभंगांची निवड, सूर, लय, भावभावना आणि प्रस्तुती यांचा समग्र विचार करून गुणांकन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे रसाळ आणि सुसंवादी सूत्रसंचालन प्रा. नेहा भोसले (मराठी विभाग प्रमुख) आणि डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप पाटील यांनी अत्यंत मन:पूर्वक केले.

कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संतांच्या अभंगगायनातून पंढरपूरची ओढ, विठ्ठलमाऊलीचं स्मरण आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. ही स्पर्धा नव्हतीच – हा भक्तिरसात न्हालेला, संतविचारांनी भारलेला आणि विद्यार्थिनींच्या अभंगगायनाने पावन झालेला एक सुसंस्कृत सोहळा होता!

आज दि.22/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुम्हाला मेहनती कामांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे; आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा, परंतु जुन्या अडचणींना मात मिळेल.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
शुक्र गोचरामुळे आर्थिक व कौटुंबिक जीवनात समृद्धी वाटू शकते; परंतु कामाच्या दबावामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल 
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी

मिथुन
बुधादित्य योगामुळे कामात गती, आर्थिक लाभ आणि नव्या योजनांमध्ये स्थिरता मिळू शकते; तरीही मानसिक ताण जाणवू शकतो .
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
बुध–सूर्य युतीमुळे संवाद, प्रवास किंवा व्यावसायिक प्रयत्नांमध्ये प्रगती येईल; साधना आणि मार्गदर्शनाद्वारे मार्ग मिळेल .
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
राजयोगामुळे नेतृत्वगुण वृद्धिंगत होतील; आर्थिक व कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसेल, तर शारीरिक वा भावनिक ताणाचा सामना करावा लागू शकतो 
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
कामात विरोध किंवा अडचणी येऊ शकतात; निर्णय घेण्यापूर्वी संयम व सखोल विचार करण्याची गरज आहे 
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
शत्रूप्रभावामुळे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या, मात्र प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळू शकते .
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आर्थिक वाढ होईल, परंतु खर्च नियंत्रणात ठेवा — मध्यभागी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो 
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
केवळ काम किंवा प्रवासात यश न मिळता, तो ईमानदारीने वाट पाहण्याचा दिवस आहे; काही अडचणींचा सामना करावा लागेल .
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
शनि वक्रीमुळे संयम व धैर्य आवश्यक, परंतु दीर्घकालीन दृष्टीने निर्णय फायदेशीर ठरू शकतात 
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
करिअरच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे; जुनी गुंतवणूक व सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता दिसते 
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक व व्यावसायिक दोन्ही स्तरावर लाभासाठी योग असूनही, खर्च व भावना नियंत्रित करणे गरजेचे आहे .
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात पोलिस निरीक्षक बदलाच्या पार्श्वभूमीवर चर्चा; अनावश्यक हस्तक्षेप वाढल्याने चिंता व्यक्त

0

Loading

पाचोरा – शहर पोलीस ठाण्याचे माजी पोलिस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची नुकतीच बदली करण्यात आली असून या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि त्याचे पडसाद सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
एकीकडे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे पाचोरा बसस्थानकावर घडलेली अति गूढ आणि गंभीर स्वरूपाची गोळीबाराची घटना, ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने निर्णय घेत पवार यांची बदली केली असून, बदली आदेशातही “कायद्याची व सुव्यवस्थेची गरज” या कारणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.मात्र, या बदलाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी खाजगी पातळीवर याचे श्रेय स्वतःकडे घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या काही व्यक्तींनी माजी निरीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली होती, त्यांचं आता पोलीस ठाण्यात वारंवार विनाकारण येणं-जाणं वाढले असून, तासन्‌तास पोलीस ठाण्यात व पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांचा वावर दिसून येतो. “आमच्या आंदोलनामुळेच बदली झाली” अशा प्रकारचा टेंभा मारत पोलीस ठाण्यातील वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याचेही बोलले जात आहे.
दुसरीकडे, माजी निरीक्षक अशोक पवार यांच्या जागी नियुक्त झालेले विद्यमान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पदभार स्वीकारताच अष्टपैलू कार्यशैलीने जनतेचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विविध सकारात्मक उपक्रमांची चर्चा सर्वत्र होत असून, विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे कौतुकही होत आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरून चिंता व्यक्त होत आहे की, काही मंडळींच्या अशा अनावश्यक छटांमध्ये रंगलेल्या हस्तक्षेपामुळे पोलीस प्रशासनातील गटबाजी सारख्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी, अशा हस्तक्षेपांना त्वरित लगाम घालणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

शेत पाणंद रस्त्यांबाबत आमदार किशोरआप्पा पाटील आक्रमक

0

Loading

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. या विषयावर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांना जाब विचारत रस्ते कामांची गंभीरता अधोरेखित केली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान, शेतातील पोहोच सुविधा आणि शेतीमाल वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि त्यांच्या मानसिकतेवर होत असल्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले. त्यांनी अधिवेशनाच्या अर्ध्या तासाच्या चर्चेत या विषयावर प्रश्न उपस्थित करत शासनाच्या हलगर्जी धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकरी हा सरकारचा भोगवटादार असून त्याच्याकडून शासन दरवर्षी शेतसारा घेत असते. त्यामुळे त्याला मूलभूत सुविधा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, मातोश्री शेत पाणंद योजना, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध माध्यमातून मंजूर झालेल्या कामांना केवळ काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे, तांत्रिक अडचणीमुळे किंवा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेळेवर मंजुरी मिळत नाही आणि ती कामे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, यामुळे शासनाचा नुसता आर्थिक नुकसानच नाही तर शेतकऱ्यांचाही प्रचंड मानसिक त्रास होत आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भडगाव व पाचोरा तालुक्यातील परिस्थितीचे वास्तव अधिवेशनात मांडताना सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघात जवळपास 250 शेत पाणंद रस्त्यांची कामे शासन स्तरावर मंजूर झाली आहेत. मात्र, या पैकी फक्त 50 कामेदेखील पूर्ण झालेली नाहीत. ही कामे का रेंगाळली आहेत, त्यामागची अडथळ्यांची कारणे काय आहेत याचे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात मागितले. विशेष म्हणजे 10 शेतकऱ्यांपैकी 9 शेतकरी रस्त्यासाठी सकारात्मक सहमती देतात, मात्र केवळ एका शेतकऱ्याच्या विरोधामुळे संपूर्ण रस्ता थांबतो, ही गोष्ट शासनाने गांभीर्याने घ्यायला हवी. मनरेगाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांत मजुरांची उपलब्धता, कमी रोजंदार आणि आवश्यक यंत्रसामुग्रीचा अभाव यामुळे देखील कामे रखडतात. मनरेगाच्या अंतर्गत सध्या 300 रुपयांची रोजंदारी आहे, जी अत्यंत अपुरी असून शेतमजूर स्वतःच्या शेतीत 500 रुपये रोजाने काम करतो, मग तो शासकीय कामात का येईल? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या धोरणात सुधारणा करून मनरेगामध्ये रोजंदार वाढवण्याची मागणी केली. रस्ते कामे जेसीबी व पोकलँड सारख्या यंत्रांच्या सहाय्याशिवाय शक्यच नाहीत, परंतु शासन अद्याप ही कामे केवळ मजुरांकडूनच करवून घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण योजनेच्या स्वरूपावर, नियमांवर आणि अंमलबजावणी प्रक्रियेवर पुन्हा विचार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात वेगळी, स्पष्ट व शेतकऱ्यांच्या हिताची नियमावली तयार करून शासनाने ती तात्काळ अंमलात आणावी अशी मागणी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ठामपणे केली. त्यांनी सांगितले की अनेक वेळा 1 किलोमीटर रस्त्याला जिल्हा स्तरावर मंजुरी मिळते, पण जेव्हा रस्ता 2 ते 2.5 किलोमीटरचा असतो तेव्हा तो थेट शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवावा लागतो आणि तेथेच तो फायलीच्या ढिगात अडकतो. परिणामी रस्त्यांची कामे रखडतात. यात सुधारणा करून अशा लांब रस्त्यांची जिल्हा पातळीवरच मंजुरी देण्याचे धोरण राबवावे असे त्यांनी सूचित केले. अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी थेट मंत्री भरत गोगावले यांना उद्देशून विचारले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 100% रस्ते पाच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार? 250 किलोमीटरची कामे चार वर्षांपूर्वी मंजूर असून आजही 10 – 20 किलोमीटर कामे पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यपद्धती कितपत परिणामकारक आहे हे स्पष्ट होते. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत, सरकारने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि प्रत्यक्षात अंमलात येईल अशी धोरणात्मक निर्णय प्रक्रिया स्वीकारावी. पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने शासनाने मस्टर बंद केल्याने 15 जूनपासून सर्व रस्ते कामे थांबलेली आहेत. यामुळे अजूनही कामे लांबणीवर पडणार असून, शेतकऱ्यांची हताशता वाढत आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावर उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, शेत पाणंद रस्त्यांसाठी सर्वच शेतकरी तयार होत नाहीत. अनेकदा एका-दोन शेतकऱ्यांचा विरोध असतो आणि त्यामुळेच रस्त्यांचे काम थांबते. अशा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने वेगळी भूमिका घ्यावी लागेल. यासाठी शासन सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी योग्य तो विचार करत असून लवकरच रस्त्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, विरोधकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, त्यांनी सरकारकडून वेळकाढूपणाच्या धोरणावर टीका केली आहे. या चर्चेमुळे शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. शासनाने या प्रश्नावर वेळ न घालवता निर्णय घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होईल. प्रत्येक शेतकऱ्याचा शेतात पोहोचण्याचा रस्ता असणे ही केवळ सुविधा नव्हे तर त्यांच्या हक्काची बाब आहे. त्यामुळे शासनाने सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधत, स्पष्ट नियोजन राबवत, आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणा करत, शेत पाणंद रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, हीच या संपूर्ण प्रश्नाचा सार्थ आणि प्रभावी समारोप होऊ शकतो.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!