Home Blog Page 133

साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया – विक्रांत लाळे

1

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी  प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही.” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.
      “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.
      कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
     मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
      संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
     कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.
     कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
       १२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
      कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ – आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा‌ शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या‌ जन्मदिनी गुणगौरव केला.शाहीर साबळे, अमरशेख‌ आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी‌ शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८०‌ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
‌‌आमदार‌ डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.कार्यक्रमाला‌ शाहिरी‌ लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल‌ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन‌‌ बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे‌ यांनी केले. सुधीर‌ प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे‌‌ आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात‌, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरद्वारे प्रचार-प्रसार अभियान – जम्मू येथे भव्य आयोजन

0

Loading

पाचोरा – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने ‘देश विदेश अभियान’ अंतर्गत मोठ्या उत्साहात जम्मू येथे प्रचार-प्रसार अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश स्वामी समर्थांची शिकवण आणि अध्यात्मिक संदेश घराघरांत पोहोचवणे आहे. दि. १२ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.                 या अभियानांतर्गत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या माध्यमातून स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली लोकांपर्यंत अध्यात्माचा प्रसार व मानसिक शांतीचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश आहे. श्री वैष्णो देवी मातेच्या पवित्र स्थानाजवळ होत असलेल्या या अभियानाचे स्थानिक स्तरावर विशेष महत्त्व आहे.                  अभियानाच्या तयारीत स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच गुरुपीठाच्या प्रमुखांनी मोठी मेहनत घेतली आहे. श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने या अभियानासाठी एक खास समिती गठित केली आहे. या समितीत गुरुपीठाशी संबंधित अधिकारी, साधक, आणि प्रचारक यांचा समावेश आहे. त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधून कार्यक्रमाचे आयोजन सुनिश्चित केले आहे.                 अभियानाच्या दरम्यान विविध ठिकाणी स्वामी समर्थांचे प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत, ज्यामुळे लोकांना त्यांचा आध्यात्मिक मार्ग समजेल.                      श्री वैष्णो देवी मंदिर परिसरातील विशेष पूजन: जय माता दी आणि श्री वैष्णो देवी मातेच्या नावाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.                                                 या अभियानासाठी प्रमुख साधक, गुरुपीठाचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी स्थानिक आध्यात्मिक नेते आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.                                     संपूर्ण भारतातून भक्तांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. Contact Numbers: +917720010073, +917709107339, +919226046180 तसेच ईमेलद्वारे deshvidesh@gurupeeth.in येथे अधिक माहिती मिळू शकते.         इंस्टाग्रामवर @deshvideshabhiyan या हॅंडलद्वारे प्रचार अभियानाची सर्व माहिती आणि अपडेट्स शेअर केली जात आहेत. या माध्यमातून जागतिक स्तरावर भक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे.     ‘देश विदेश अभियान’ हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून फक्त अध्यात्माचा प्रचार नव्हे तर सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करण्याचा उद्देश साध्य होईल.      जय माता दी… श्री वैष्णो देवी मातेच्या आशीर्वादाने हे अभियान यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. या अभियानाच्या निमित्ताने जम्मू येथे एक अध्यात्मिक चैतन्य निर्माण होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे अभियान एका ऐतिहासिक सोहळ्याचे रूप धारण करेल.


दोंडाईचा श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – दोंडाईचा जि धुळे ता. २ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलांच्या एकात्मतेचा आणि सौभाग्याचे प्रतीक असलेल्या हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. राऊळ नगर येथील शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात संक्रांतीच्या निमित्ताने

पारंपरिक पद्धतीने तिळगूळ वाटप आणि विशेष भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
   समाजातील दिवंगत बांधवांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शितलताई राजेंद्र कोंटुरवार, प्रतिष्ठित समाजसेवक श्री. राजेंद्र कोंटुरवार, तसेच इतर प्रमुख

पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
    संक्रांत हा केवळ सण नसून समाजातील बंधुभाव वाढवण्याचा संदेश देणारा मंगल काळ असतो. या निमित्ताने महिलांसाठी विशेष सन्मान आणि भेटवस्तूंचे आयोजन करण्यात आले होते. महिला मंडळाच्या वतीने उपस्थित महिलांना “सनमाईकाईकाई” या आकर्षक पूजेच्या पाटांचे वितरण करण्यात आले. ही भेट केवळ स्मृतीचिन्ह नव्हे, तर समाजातील एकता आणि

धार्मिक संस्कृती जोपासण्याचे प्रतिक ठरली.
      या प्रसंगी श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शितलताई कोंटुरवार, श्री. राजेंद्र कोंटुरवार, समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग शिंपी, अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी मध्यवर्ती संस्थेचे प्रा. प्रकाश भांडारकर, माजी अध्यक्ष श्री. हरीदास जगताप, सेक्रेटरी श्री. चंद्रकांत कापुरे, सह सचिव श्री. राजेंद्र कोंटुरवार, तसेच अनेक समाजबांधव उपस्थित होते.
    महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या

यशस्वितेसाठी मेहनत घेतली.
अध्यक्षा: सौ. शितल राजेंद्र कोंटुरवार
उपाध्यक्ष: सौ. पुनमताई नरेंद्र साळुंखे
खजिनदार: सौ. रत्नाताई राजेंद्र चित्ते
महिला आघाडी, धुळे जिल्हा सचिव: सौ. सुरेखाताई मधुकर जाधव
कार्यकारिणी सदस्य: सौ. भाग्यश्रीताई चित्ते, सौ. संगीताताई पवार, सौ. मिनाक्षीताई पवार, सौ. सारीखाताई बाविस्कर, सौ. रेखाताई गवळे, सौ. ज्योत्स्नाताई सोनवणे, सौ. कल्पनाताई जाधव यावेळी उपस्थित महिलांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत हळदी-कुंकू लावण्यात आले आणि “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” हा संदेश देत गोडधोड पदार्थ वाटप करण्यात आले. महिलांनीपारंपरिक वेशभूषेत आणि हसतमुख वातावरणात एकमेकींशी संवाद साधला.
    महिला मंडळाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान दिले आहे. यंदाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण महिला मंडळाचे श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाजाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
   कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” या संक्रांतीच्या मंत्राने संपूर्ण सभागृह गाजून गेले.
    श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाला ध्येय न्युज & सा झुंज परिवार पाचोरा जि जळगाव तर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

“सहनशीलतेचा विजय!स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानच्या पाठबळाने सुतार दांपत्याचे गृहप्रवेश सोहळा संपन्न”

0

Loading

जळगाव – दि. ३ फेब्रुवारी २०२५ (सोमवार) गणेशनगर, सब-जेलच्या मागे राहणाऱ्या सुतार दांपत्याचा गृहप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत उद्ध्वस्त झालेले त्यांचे घर स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान, जळगाव आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुन्हा उभारण्यात आले होते. या नव्याने उभ्या राहिलेल्या घरात सुतार दांपत्याने आज पुन्हा स्वाभिमानाने प्रवेश केला.
गेल्या आठ दिवसांत प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली अनेक समाजसेवी कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत हे घर पुन्हा उभे केले. आर्थिक मदत, श्रमदान आणि बांधकाम साहित्य पुरवठा अशा विविध माध्यमांतून लोकांनी भरभरून सहकार्य केले. या सहकार्याचा सुंदर परिणामी आजच्या गृहप्रवेश सोहळ्याच्या रूपाने पाहायला मिळाला.
सोहळ्याच्या सुरुवातीला विधिवत पूजा व मंत्रोच्चाराने गृहप्रवेश विधी पार पडला. सुतार दांपत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. आपल्या नव्या घरात प्रवेश करताना त्यांना उभ्या समाजाचा आधार मिळत असल्याची जाणीव झाली. उपस्थितांनी त्यांना नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे प्रमुख ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “गरजू लोकांना आधार देणे ही केवळ जबाबदारी नाही, तर आपली नैतिक कर्तव्यही आहे. या कार्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने योगदान दिले आणि त्यामुळे हे घर उभारता आले. जळगावच्या नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.”
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विजय जोशी, देवेश शर्मा, किशोर पाटील, अरविंद देशमुख, परमवीर जाधव, हर्षल सिंकवाल, योगेश निंबाळकर, अमरनाथ ठाकूर, रवींद्र शिंदे, आयुष मणियार, पियुष मणियार, अमोल पाटील, युवराज जगताप, सुशील शिंदे, निखिल पोपट, निखिल पाचपांडे यांचे विशेष योगदान राहिले.
या भावनिक क्षणी सुतार दांपत्याने आपले मनोगत व्यक्त करताना अश्रूंनी डोळे भरले. त्यांनी सांगितले की, “घर उद्ध्वस्त झाल्यावर आम्ही निराधार झालो होतो. पण या प्रतिष्ठानने आणि समाजातील लोकांनी आम्हाला आधार दिला. आज आम्ही पुन्हा आमच्या घरात पाऊल ठेवत आहोत, ही आमच्यासाठी केवळ पुनर्बांधणी नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे.”
हा कार्यक्रम समाजाच्या एकजुटीचे आणि सहकार्याचे जिवंत उदाहरण ठरला. एकत्रित प्रयत्नांमुळे जे अशक्य वाटत होते, ते शक्य झाले. जळगाव शहराने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
हा ऐतिहासिक क्षण साजरा करताना उपस्थितांनी सुतार दांपत्याला शुभेच्छा दिल्या आणि नव्या जीवनाच्या प्रवासासाठी पाठिंबा दर्शवला.

श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक

0

Loading

पाचोरा – पा. तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव यांच्या वतीने स्व. आबासाहेब मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. गायत्री श्रीकृष्ण क्षिरसागर व कु. चेतना रणदीप हिरे यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर प्रथम सांघिक पारितोषिक पटकावण्याचा मान मिळवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ही राज्यस्तरीय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या विचारप्रगल्भतेला चालना देणारी आणि त्यांची अभिव्यक्तीशैली समृद्ध करणारी मंच म्हणून ओळखली जाते. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील कौशल्यसंपन्न वक्ते सहभागी झाले होते. कठोर परिश्रम, मुद्देसूद विचारमांडणी आणि प्रभावी सादरीकरण यामुळे कु. गायत्री क्षिरसागर आणि कु. चेतना हिरे यांनी निर्णायक मंडळाची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने माजी आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीपभाऊ ओं. वाघ, चेअरमन मा.नानासाहेब संजय ओ.वाघ यांच्या शुभहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यात श्री. गो. से. हायस्कूल स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा.दादासाहेब खलीलजी देशमुख, ज्येष्ठ संचालक व स्पर्धा प्रायोजक मा. बाबासाहेब विनय मधुकर जकातदार, ज्येष्ठ संचालक मा.अण्णासाहेब वासुदेव भिवसन महाजन, प्राचार्य मा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, करिअर कट्टा विभाग समन्वयक डॉ. माणिक पाटील, वादविवाद स्पर्धा समन्वयक प्रा. स्वप्नील भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर विचार मांडले आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मा. दिलीपभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक करताना स्पर्धेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “वक्तृत्व ही कला फक्त स्पर्धांपुरती मर्यादित नाही, तर ती जीवनातील यशस्वी प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य शब्दयोजना, प्रभावी सादरीकरण आणि आत्मविश्वास यामुळेच स्पर्धेतील विजेतेपद मिळते. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.”
स्पर्धेतील विजेते कु. गायत्री श्रीकृष्ण क्षिरसागर आणि कु. चेतना रणदीप हिरे यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, “या स्पर्धेसाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले. विषयाचा गाढ अभ्यास, यथोचित संदर्भांचा संग्रह, योग्य आवाजाचे चढ-उतार, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि प्रभावी संवाद कौशल्यावर विशेष मेहनत घेतली. आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी दिलेले योग्य दिशानिर्देश आणि अभ्यासक्रमातील ज्ञानाचा योग्य उपयोग करूनच आम्ही हे यश मिळवू शकलो.”
. यावेळी प्राचार्य मा. डॉ. शिरीष बी. पाटील यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करताना म्हटले की, “आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाच्या माध्यमातून आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली आहे. वक्तृत्व स्पर्धा ही केवळ भाषण देण्याची संधी नसून ती विचार व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मंच असतो. अशी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असते.”
उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना सांगितले की, “स्पर्धात्मक युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. वक्तृत्व हा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा आणि भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे.”
या स्पर्धेत मिळवलेल्या प्रथम पारितोषिकामुळे श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या शैक्षणिक वारशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, करिअर कट्टा विभाग समन्वयक डॉ. माणिक पाटील, वादविवाद स्पर्धा समन्वयक प्रा. स्वप्नील भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा आणि आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करावी. भविष्यातही अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.”
महाविद्यालयाने आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी विविध वक्तृत्व कार्यशाळा, संवाद कौशल्य प्रशिक्षण आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. यामुळे भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी अशा राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अखेरीस उपस्थित मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. बाबासाहेब विनय मधुकर जकातदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यश हे सातत्याने परिश्रम केल्याने मिळते. कठोर मेहनत आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कोणतीही स्पर्धा जिंकता येते. स्पर्धेत यश मिळवणे महत्त्वाचे असले, तरी स्पर्धेतून शिकण्याची प्रक्रिया अधिक मौल्यवान असते.”
हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला. या यशस्वी विद्यार्थिनींनी मिळवलेले हे गौरवचिन्ह पुढील अनेक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल आणि त्यांना वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देईल.

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न : भविष्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य आर्थिक नियोजनाचा संदेश – चेअरमन नानासाहेब संजय वाघ

0

Loading

पाचोरा:- 30 जानेवारी २०२५ – महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे “आर्थिक साक्षरता कार्यशाळे” चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सीमा बाजी यांनी उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देत आर्थिक नियोजनाबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही कार्यशाळा ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे संपन्न झाली. करिअर कट्टा विभागाचे प्रमुख डॉ. माणिक पाटील यांनी या कार्यशाळेचे नियोजन आणि आयोजन केले होते.
आर्थिक साक्षरतेचे महत्त्व : सीमा बाजी यांचे मार्गदर्शन:- कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा बाजी यांनी उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, “शिक्षणाच्या मदतीने आपण साक्षर होतो, परंतु आर्थिक साक्षरता नसेल तर कमावलेली संपत्ती योग्य प्रकारे वाढवता येत नाही. आर्थिक साक्षरता ही केवळ गुंतवणुकीपुरती मर्यादित नसून, ती आर्थिक शिस्त, खर्चाचे व्यवस्थापन, भविष्यकालीन गरजांची आखणी आणि संपत्ती निर्माण करण्याच्या कौशल्यांशी निगडित आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पैसे कमविणे सोपे असले तरी, त्याचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक संपन्नता प्राप्त करून भविष्यातील संकटांना सक्षमपणे तोंड देता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आर्थिक शहाणपण अंगीकारले पाहिजे.”
त्यांनी आर्थिक नियोजनाच्या खालील पैलूंवर विशेष भर दिला :-
मिळकतीपेक्षा बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा :– केवळ कमाईवर भर न देता, मिळकतीतील ठराविक भाग नियोजनपूर्वक बचत करून गुंतवणुकीकडे वळवला पाहिजे.
योग्य गुंतवणूक पर्याय निवडा :– शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता किंवा इतर गुंतवणूक पर्यायांची योग्य माहिती घेऊन त्यात पैसे गुंतवावेत.
आपत्कालीन निधी ठेवा :– कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून कमीत कमी ६ महिन्यांचे उत्पन्न बँकेत किंवा लिक्विड स्वरूपात राखीव ठेवावे.
कर्ज आणि आर्थिक जबाबदारी यांचे योग्य नियोजन करा :– बँक किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज योग्य व्यवस्थापन करून वेळेत फेडणे महत्त्वाचे आहे.
कर (टॅक्स) नियोजन करा :– कर नियोजनाच्या मदतीने उत्पन्न कर आणि इतर वित्तीय बाबींचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त बचत करता येऊ शकते.
पेन्शन आणि निवृत्ती नियोजन :- दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी तरुण वयातच निवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी:- कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही आर्थिक साक्षरता उपयुक्त आहे. कारण फक्त उच्चशिक्षण मिळवून नोकरी किंवा व्यवसाय करणे पुरेसे नसते, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करून संपत्ती निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.”
उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी :- देखील आर्थिक साक्षरतेची गरज स्पष्ट करताना सांगितले की, “आजच्या काळात प्रत्येकाने आर्थिक नियोजन शिकले पाहिजे. भविष्यातील गरजा, आकांक्षा आणि जबाबदाऱ्या यासाठी सक्षम आर्थिक योजना तयार करणे हे सुजाण नागरिकाचे लक्षण आहे.”
कार्यशाळेचे महत्त्व आणि भविष्यातील उपक्रम
या कार्यशाळेच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापक यांना आर्थिक शिस्त, गुंतवणूक धोरणे आणि संपत्ती व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
करिअर कट्टा विभाग प्रमुख डॉ. माणिक पाटील :- यांनी कार्यशाळेचे नियोजन करताना सांगितले की, “आर्थिक साक्षरता हा विषय केवळ व्यावसायिक किंवा उद्योजकांसाठी मर्यादित नसून, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा नियमितपणे आयोजित करून, अधिकाधिक लोकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “महाविद्यालयाच्या वतीने भविष्यातही अशाच प्रकारच्या उपयुक्त कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक वित्तीय संकल्पनांची माहिती दिली जाईल.”
या कार्यशाळेचा समारोप करताना सीमा बाजी यांनी उपस्थितांना आर्थिक नियोजनासाठी काही व्यावहारिक टिप्स दिल्या आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. सहभागींनी या कार्यशाळेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी मागणी केली.
महाविद्यालयाच्या वतीने कार्यशाळेतील प्रमुख वक्ते सीमा बाजी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील आणि करिअर कट्टा विभागाचे प्रमुख डॉ. माणिक पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.
संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी अशा स्वरूपाच्या कार्यशाळेमुळे आर्थिक साक्षरतेचा संदेश महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे भविष्यात अधिक सुज्ञ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

उत्राण (ता. एरंडोल) येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील यांची सर्वानुमते निवड

0

Loading

उत्राण – गावाच्या सामाजिक सलोख्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे गावाच्या विकास कार्याला

अधिक गती मिळेल, तसेच स्थानिक न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.                                    २६ जानेवारी रोजी गावातील ग्रामसभेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ कुंभार होते, तर या विशेष बैठकीसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. सरपंच

कविता महाजन, उपसरपंच वाल्मीक ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा महाले, हरीश पांडे, गौतम खैरनार, योगेश महाजन, मनीषा वाघ, दिनेश सोनवणे यांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे कामकाज ग्रामसेवक मोरे आप्पा आणि लिपिक रमेश माळी यांनी पाहिले.                                             प्रभावीपणे कार्य करणाऱ्या तंटामुक्ती समिती या संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याने ग्रामसभेत

उत्साहाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी एकमुखाने हेमंत पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.       तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि गावातील कायदा व सुव्यवस्था

टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण जबाबदारीने कार्य करण्याचे आश्वासन दिले.         ते म्हणाले, “गावाच्या विकासात आणि सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यात तंटामुक्ती समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावातील तंटे आणि वाद स्थानिक पातळीवरच सोडवले गेले पाहिजेत. आम्ही ग्रामपंचायत व स्थानिक

नागरिकांच्या मदतीने हे उद्दिष्ट साध्य करू. आमच्या कार्यकाळात कुठलाही वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर न नेता सामंजस्याने सुटावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. गावातील बंधुभाव वाढावा, तसेच कोणताही तंटा भांडण न होता न्याय्य मार्गाने सोडवला जावा, हे आमचे प्रमुख ध्येय असेल.”.             तंटामुक्ती समिती गावातील सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित तंटे सोडविण्यासाठी कार्यरत असते. गावातील वाद न्यायालयात जाऊ नयेत, तसेच स्थानिक पातळीवरच त्यावर

सामंजस्याने तोडगा निघावा, यासाठी ही समिती प्रयत्नशील असते.                      या समितीच्या प्रभावी कामगिरीमुळे गावातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते. वादग्रस्त प्रकरणे स्थानिक पातळीवर सोडवली गेली, तर न्यायालयीन प्रक्रियेत जाणाऱ्या तक्रारींची संख्या कमी होते आणि ग्रामस्थांची ऊर्जा विकासात्मक

कार्यांसाठी वापरली जाते. यामुळे गावातील सामाजिक सलोखा टिकून राहतो.        ग्रामस्थांना विश्वास आहे की, हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढेल आणि कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता न्याय दिला जाईल. त्यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गावातील शांतता आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.      ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा देत, “गावाच्या न्यायव्यवस्थेला नवा आयाम मिळेल आणि सामाजिक सलोखा अधिक बळकट होईल,” असे मत व्यक्त केले.

दिल्ली में आयोजित 18वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के लिए भडगांव के सुनील पाटिल को सम्मानजनक आमंत्रण

0

Loading

दिल्ली के छत्रपति शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) में 21 से 23 फरवरी 2025 के बीच आयोजित होने वाले 18वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के लिए महाराष्ट्र के जलगांव जिले के भडगांव तहसील के बांबरुड गांव निवासी और भडगांव महाविद्यालय के पूर्व प्राचार्य सुनील बाबूराव पाटिल को विशेष आमंत्रण भेजा गया है। सरहद, पुणे और अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल के संयुक्त आयोजन में यह प्रतिष्ठित साहित्य सम्मेलन हो रहा है। इस सम्मेलन में पाटिल जी की उपस्थिति बेहद सम्मानजनक मानी जा रही है।
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का मराठी साहित्य के इतिहास में अत्यंत महत्वपूर्ण स्थान है। 71 साल पहले दिल्ली में हुए साहित्य सम्मेलन का उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ने किया था। उस समय सम्मेलन के अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी थे, जिन्होंने मराठी साहित्य को प्राचीन परंपरा और आधुनिकता का संगम प्रदान किया। अब 7 दशकों के बाद, एक बार फिर दिल्ली में मराठी साहित्य प्रेमियों के लिए यह भव्य आयोजन हो रहा है, जिससे साहित्यिक दृष्टिकोण को नई ऊंचाई मिलेगी।
प्राचार्य सुनील बाबूराव पाटिल मराठी साहित्य, शिक्षा और समाजसेवा के क्षेत्र में एक आदरणीय नाम हैं। भडगांव महाविद्यालय के पूर्व प्राचार्य के रूप में उन्होंने कई छात्रों को शिक्षा के माध्यम से सशक्त बनाया है। बांबरुड जैसे ग्रामीण क्षेत्र से आने वाले पाटिल जी ने अपनी मेहनत और लगन से साहित्य और शिक्षा के क्षेत्र में एक अलग पहचान बनाई है। उनके साहित्यिक, शैक्षणिक और सामाजिक योगदान को देखते हुए उन्हें इस सम्मेलन के लिए आमंत्रित किया गया है।
इस सम्मेलन का उद्घाटन भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों होगा, और सम्मेलन के अध्यक्ष के रूप में वरिष्ठ नेता एवं पद्मभूषण शरद पवार का चयन किया गया है। इस सम्मेलन में विविध विषयों पर चर्चा सत्र, साहित्य वाचन और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे।
विशेष रूप से “आनंदाची गोफळ” (आनंद का फल) विषय पर 22 फरवरी को होने वाली परिचर्चा आकर्षण का केंद्र होगी। इस सत्र में देशभर के प्रमुख साहित्यकार और विचारक भाग लेंगे और मराठी साहित्य के विभिन्न पहलुओं पर चर्चा करेंगे।
भडगांव तहसील के ग्रामीण क्षेत्र से आए प्रोफेसर पाटिल को दिया गया यह आमंत्रण न केवल उनका सम्मान है, बल्कि यह मराठी साहित्य से जुड़े हर व्यक्ति का गौरव भी है। उनके प्रतिनिधित्व के माध्यम से ग्रामीण महाराष्ट्र का साहित्यिक योगदान राष्ट्रीय स्तर पर रेखांकित होगा। उनके अनुभव और ज्ञान का इस सम्मेलन में बड़ा प्रभाव पड़ेगा।
साहित्य, संस्कृति और भाषा के संरक्षण के लिए साहित्य सम्मेलन हमेशा से एक महत्वपूर्ण मंच रहा है। दिल्ली जैसे देश की राजधानी में इस सम्मेलन का आयोजन मराठी भाषा के राष्ट्रीय प्रचार-प्रसार के लिए सहायक होगा। यह सम्मेलन मराठी साहित्यिक परंपरा को सहेजते हुए आधुनिकता के साथ जोड़ने का प्रयास करेगा, जो नई पीढ़ी को प्रेरणा देगा।
पूरा महाराष्ट्र और देशभर के साहित्य प्रेमी इस सम्मेलन का बेसब्री से इंतजार कर रहे हैं। भुतपूर्व प्राचार्य सुनील पाटिल जैसे गुणी व्यक्तित्व की उपस्थिति इस सम्मेलन को और भी प्रभावशाली और प्रेरणादायक बनाएगी। उनके योगदान से मराठी साहित्य की गरिमा और भी बढ़ेगी।
18वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन केवल एक साहित्यिक आयोजन नहीं, बल्कि यह मराठी भाषा के संरक्षण और गौरव का उत्सव है। प्राचार्य सुनील पाटिल को मिला यह सम्मान पूरे जलगांव जिले के लिए गर्व की बात है। उनकी भागीदारी मराठी साहित्य के इस सफर को नई दिशा देने में सहायक होगी, ऐसी उम्मीद की जा रही है।

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भडगाव च्या प्राचार्य सुनील पाटील यांना सन्माननीय आमंत्रण

0

Loading

दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील बांबरुड गावचे रहिवासी आणि भडगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. सुनील बाबुराव पाटील यांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठित साहित्य संमेलनात पाटील यांचा सहभाग अत्यंत सन्माननीय मानला जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठी साहित्याच्या इतिहासात अत्यंत मोलाचे स्थान आहे. ७१ वर्षांपूर्वी दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी होते, ज्यांनी मराठी साहित्याला प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधणारी दिशा दिली. यंदा, ७ दशकांनंतर, पुन्हा एकदा दिल्लीतील मराठी साहित्यप्रेमींसाठी हा भव्य सोहळा आयोजित होत आहे, ज्यामुळे साहित्यिक दृष्टिकोनात नव्या उंचीची भर पडणार आहे.
माजी प्राचार्य सुनील बाबुराव पाटील हे मराठी साहित्य, शिक्षण, आणि समाजसेवा क्षेत्रातील एक आदरणीय नाव आहे. भडगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. बांबरुडसारख्या ग्रामीण भागातून आलेले पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना या साहित्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि पद्मभूषण शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, साहित्य वाचन सत्र, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल.
विशेषतः “आनंदाची गोफळ” या विषयावर २२ फेब्रुवारी रोजी होणारी परिचर्चा लक्षवेधी ठरणार आहे. या सत्रात देशभरातील मान्यवर साहित्यिक व विचारवंत सहभागी होऊन मराठी साहित्याच्या विविध अंगांवर चर्चा करतील.
सुनील पाटील यांचे प्रतिनिधित्व:
भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या प्रा. पाटील यांना दिलेले हे आमंत्रण फक्त त्यांचा सन्मान नाही, तर मराठी साहित्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे. त्यांच्या प्रतिनिधित्वामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे साहित्यिक योगदान राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, आणि साहित्यिक दृष्टिकोनाचा या संमेलनात प्रभाव पडेल, यात शंका नाही.
साहित्य, संस्कृती आणि भाषा संवर्धनासाठी साहित्य संमेलन नेहमीच महत्त्वाचे मंच ठरले आहे. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत हे संमेलन आयोजित होणे, मराठी भाषेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रचारासाठी उपयुक्त ठरेल. मराठी साहित्यिक परंपरा जपतानाच तिला आधुनिकतेची जोड देऊन नव्या पिढीला प्रेरित करण्याचे हे महत्त्वाकांक्षी प्रयत्न ठरणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील साहित्यप्रेमी या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रा. सुनील पाटील यांच्यासारख्या गुणी व्यक्तींची उपस्थिती हे संमेलन अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी बनवेल. त्यांच्या सहभागामुळे मराठी साहित्याच्या अभिजाततेला नवीन ऊर्जा मिळेल.
१८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फक्त साहित्यिक सोहळा नसून, ते मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि अभिमानाचा उत्सव आहे. प्रा. सुनील पाटील यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या सहभागामुळे मराठी साहित्याच्या यशस्वी प्रवासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!