Home Blog Page 20

पत्रकारांच्या हक्कांसाठी गर्जना : उत्तर महाराष्ट्र व जिल्हा कार्यकारिणीची १ फेब्रुवारीला जळगावात निवड

0

Loading

जळगाव (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी, अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेणारी आणि ग्रामीण पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख निर्माण केलेली गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र स्तरावरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर केली जाणार असून, संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी दिशा ठरविण्यात येणार आहे. ही बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी तसेच पत्रकारितेतील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, त्यांच्या प्रश्नांना एकसंघ आवाज देणे आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण आखणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. ही बैठक रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्यासह केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, केंद्रीय खजिनदार ललित खरे, तसेच केंद्रीय सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी, जोशीला पगारिया आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात सध्या वाढत असलेले दबाव, पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे, माहिती संकलनात येणाऱ्या अडचणी, तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. केवळ पदनियुक्तीपुरती मर्यादित न राहता, संघटनेच्या भावी कार्यपद्धती, आंदोलनात्मक धोरणे, संघटन विस्तार आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावी लढा कसा उभारता येईल, याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत. गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ही संघटना स्थापनेपासूनच निर्भीड भूमिका, स्पष्ट मांडणी आणि पत्रकार बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यामुळे ओळखली जाते. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्र व जिल्हास्तरावरील नव्या नेतृत्वाच्या निवडीकडे संपूर्ण पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह परिसरातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकारांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेची एकजूट, ताकद आणि पत्रकारितेच्या मूल्यांप्रती असलेली निष्ठा दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

पहिल्या हिमवृष्टीने वैष्णोदेवी परिसर झगमगला; निसर्ग, पर्यटन आणि भाविकांसाठी दिलासादायक संकेत

0

Loading

जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वसलेले यंदा पहिल्यांदाच बर्फाच्या पांढऱ्या चादरीत न्हाले आहे. गुरुवारी परिसरात पडलेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र अधिकच रमणीय झाले असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटकांनाही निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव मिळत आहे. थंड हवामान, स्वच्छ वातावरण आणि बर्फाच्छादित डोंगररांगा यांमुळे वैष्णोदेवी यात्रेला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. या हिमवृष्टीचा परिणाम केवळ रियासी जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता जम्मू प्रांतातील इतर भागांतही

जाणवत आहे. शुक्रवारी पहाटे येथे हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. घरांच्या छतांवर, झाडांवर आणि मोकळ्या जागांवर बर्फ साचल्याने परिसराचे सौंदर्य खुलले असून, काही ठिकाणी रस्ते बर्फाने झाकले गेल्यामुळे वाहतुकीवर मर्यादित परिणाम झाला. तरीही स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जम्मू प्रांतातील , , आणि या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवरही बर्फ पडल्याची माहिती असून, त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या घटकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, घोडे-खेचर मालक, फोटोग्राफर्स, दुकानदार तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांना येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. हिमवृष्टीमुळे काही भागांत रस्ते निसरडे झाल्याने आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून, उंचावरील भागात प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस हळूहळू वाढत गेला आणि उंच भागांत त्याचे रूपांतर हिमवृष्टीत झाले. या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, झरे आणि विहिरी पुन्हा प्रवाही होतील. भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता असून, फळबागा आणि भाजीपाला उत्पादनासाठी हे हवामान पोषक ठरणार आहे. पाऊस आणि हिमवृष्टीमुळे हवेत साचलेली धूळ व प्रदूषण कमी होऊन नागरिकांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही ही हिमवृष्टी महत्त्वाची मानली जात आहे. एप्रिल महिन्यात परिसरात घडलेल्या घटनेनंतर तसेच काही नैसर्गिक अडचणींमुळे राज्यातील पर्यटनावर परिणाम झाला होता, मात्र आता झालेल्या हिमवृष्टीमुळे पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. वैष्णोदेवी यात्रा करून परतणारे भाविक आणि हिवाळी पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांची संख्या वाढल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. जम्मू-काश्मीरबाहेरील राज्यांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी थंडीचा विचार करून जाड कपडे, जॅकेट, टोपी, हातमोजे आणि घसरण टाळणारे बूट वापरणे आवश्यक आहे. प्रवासापूर्वी हवामानाचा अंदाज आणि रस्त्यांची स्थिती तपासूनच नियोजन करावे. मधुमेह, रक्तदाब किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या भाविकांनी अधिक दक्षता घ्यावी. थंडीमुळे रक्तदाबात बदल होऊ शकतात, त्यामुळे औषधे वेळेवर घेणे, रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. सर्दी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा, गरम पाणी व पेये घ्यावीत आणि तब्येत बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. एकूणच, यंदाच्या पहिल्या हिमवृष्टीने माता वैष्णोदेवी परिसरासह संपूर्ण जम्मू प्रांत निसर्गसौंदर्याने नटला असून, पाणी, शेती आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. योग्य खबरदारी आणि नियोजनाच्या आधारे भाविक व पर्यटक सुरक्षितपणे या हिमानुभवाचा आनंद घेऊ शकतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या मैत्री, क्रीडावृत्ती व एकोप्याचा उत्सव : पाचोऱ्यात ‘शिक्षक क्रिकेट चषक–२०२६’चे आयोजन

0

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा जि. जळगांव यांच्या वतीने शिक्षकांमधील क्रीडावृत्ती, मैत्रीभाव आणि मानसिक विरंगुळा जोपासण्यासाठी ‘शिक्षक क्रिकेट चषक–२०२६’ या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा–भडगांव तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत खेळाच्या माध्यमातून स्नेह, सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवावी, या उद्देशाने या स्पर्धेचे पर्व तिसऱ्यांदा आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांवर मोठा ताण येतो. दैनंदिन कार्यातून मिळणाऱ्या विरंगुळ्याचा आरोग्यदायी मार्ग म्हणजे खेळ. याच विचारातून ‘कार्यातून मिळावा विरंगुळा, छंद आपला जपूया’ या संदेशासह शिक्षक क्रिकेट चषकाची संकल्पना राबविण्यात येत आहे. क्रिकेटप्रेमी शिक्षकांना त्यांच्या खेळीचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, मैत्रीभाव अधिक दृढ व्हावा आणि शिक्षकांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य आशय आहे. ही तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा दिनांक २४ जानेवारी २०२६ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत एस. एस. एम.एम. कॉलेज मैदान, पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता होणार असून, अंतिम सामना व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा येथील मा. अध्यक्ष, मा. चेअरमन, मा. मानद चिटणीस, मा. व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू शिक्षकांचा उत्साह निश्चितच द्विगुणित होणार आहे. या शिक्षक क्रिकेट स्पर्धेमुळे शिक्षकांमधील आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रायोजक म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा तर आयोजक म्हणून टिचर्स क्रिकेट क्लब, पाचोरा ही जबाबदारी सांभाळत आहेत.

सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

0

Loading

भडगाव – येथील येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व जीवनप्रवासासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. कु. लावण्या महाजन हिने सादर केलेल्या मधुर स्वागतगीताने संपूर्ण सभागृहात प्रसन्न व मंगल वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजयजी अहिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून भडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेशजी शर्मा, कवी प्रा. खुशालजी कांबळे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक बी. तायडे, यांची  व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक नितीन सोनजे तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख किरण पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. शरद पाटील यांनी सुस्पष्ट व प्रभावी शब्दांत करून दिला. प्रास्ताविक करताना उपप्राचार्य संदीप सोनवणे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक शिस्त, कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत होणाऱ्या परीक्षा, शिक्षासूची व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध सूचनांची माहिती दिली तसेच महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम मांडले. प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक महेशजी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात ध्येय निश्चित करून योग्य दिशेने सातत्याने वाटचाल करण्याचा सल्ला दिला व शिस्त, कष्ट आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट केले. कवी प्रा. खुशालजी कांबळे यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन करत अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश दिला. शिक्षक मनोगतातून प्रा. रेखा कोसोदे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत शिक्षक, प्राध्यापक आणि महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य अजयजी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत येणाऱ्या काळात अधिक अभ्यास करून यश संपादन करा व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा असे प्रेरणादायी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुयोग झंवर यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनिल पाटील यांनी मानले. निरोप समारंभाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

त्र्यंबक नगरातील पाणी साचण्याच्या समस्येवर आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांच्या पुढाकाराने ठोस उपाय; नागरिकांना मोठा दिलासा

0

Loading

पाचोरा – नगरपालिकाच्या नगराध्यक्ष सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते सुमित पाटील तसेच नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर परिसरात दीर्घकाळापासून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर प्रभावी तोडगा काढण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण कामाचा केंद्रबिंदू ठरले ते आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे, ज्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष उपस्थित राहून या समस्येच्या मुळावर घाव घातला. त्र्यंबक नगरातील तुळजाई शिक्षण पण संस्था शाळेच्या मागील बाजूस पावसाचे पाणी साचून राहत असल्याने परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. पावसाळ्यात थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत पाणी साचत असे, दुर्गंधी पसरत असे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये होती. या परिस्थितीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारी गांभीर्याने घेत आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून समस्येची नेमकी कारणे जाणून घेतली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा, अडथळलेला पाण्याचा प्रवाह आणि काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या नालींच्या दलेलांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. केवळ कागदी सूचना न देता प्रत्यक्ष काम उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रत्यक्ष उपस्थितीमुळे या ठिकाणी साचलेले पाणी पास करण्याचे काम हाती घेण्यात आले, नाल्यांतील गाळ आणि कचरा काढण्यात आला, नालींच्या दलेलांची दुरुस्ती करण्यात आली तसेच आवश्यक त्या ठिकाणी नव्याने नाली काढण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत काम दर्जेदार व्हावे आणि भविष्यात पुन्हा पाणी साचू नये यासाठी सतीशआबा चेडे यांनी प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले. काम सुरू असताना काही काळ नागरिकांना किरकोळ अडचणी सहन कराव्या लागल्या, मात्र दीर्घकालीन दिलास्यासाठी नागरिकांनी संयम दाखवत सहकार्य केले. सफाई व निचरा काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पाण्याचा निचरा सुरळीत झाला असून रस्ते आणि मोकळ्या जागा कोरड्या राहू लागल्या आहेत. यामुळे दुर्गंधी कमी झाली असून डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे नागरिकांकडूनही बोलले जात आहे. आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधा हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू असून त्र्यंबक नगरातील समस्या ही केवळ गैरसोयीची नसून आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारी होती. त्यामुळे ती तातडीने सोडवणे गरजेचे होते. प्रशासनाचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन ही समस्या मार्गी लावण्यात आली असून भविष्यातही परिसरातील निचरा व्यवस्था नियमितपणे तपासली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते सुमित पाटील आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला आवश्यक प्रशासकीय पाठबळ मिळाले, मात्र प्रत्यक्षात काम जमिनीवर उतरवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सतीशआबा चेडे यांच्या पुढाकारामुळे शक्य झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. एकूणच त्र्यंबक नगरातील तुळजाई शिक्षण पण संस्था शाळेच्या मागील भागातील पाणी साचण्याची समस्या निकाली निघाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाचोऱ्यात शासकीय कार्यालयांचा भोंगळ कारभार; नामफलक–ओळखफलक अभियानासह ‘कार्यालयीन वेळेत डबा खाणे’ या नव्या प्रवृत्तीवर तातडीची कारवाई आवश्यक

0

Loading

पाचोरा शहरातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये सध्या भोंगळ, विस्कळीत आणि नागरिकांना त्रासदायक ठरणारा कारभार उघडपणे दिसून येत आहे. शासकीय नियमांनुसार प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर स्पष्ट, वाचनीय व अद्ययावत नामफलक असणे, त्या फलकावर कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पदे व त्यांच्याकडे असलेले कामकाज नमूद असणे आवश्यक आहे. यासोबतच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टेबलावर त्यांची नेमकी ओळख पटेल अशी नावाची प्लेट अथवा ठोकळा असणे बंधनकारक आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ व त्यामधील जेवणाच्या सुट्टीचा कालावधी स्पष्टपणे नमूद असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आपले काम कोणाकडे आणि कोणत्या वेळेत करायचे आहे हे सहज समजू शकते. मात्र पाचोरा शहरातील बहुतेक शासकीय कार्यालयांत या मूलभूत नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर आवश्यक असलेले फलकच नसल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी फलक असले तरी त्यावरील माहिती अपुरी, जुनी किंवा अस्पष्ट स्वरूपाची आहे. अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पदे आणि त्यांच्याकडे असलेले कामकाज स्पष्टपणे नमूद नसल्यामुळे नागरिकांना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तासन्‌तास कार्यालयात भटकावे लागते. अनेक टेबलांवर नावाच्या प्लेट नसल्यामुळे समोर बसलेला अधिकारी किंवा कर्मचारी नेमका कोणत्या पदावर आहे हे कळत नाही आणि यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो. यामध्ये भर म्हणून पाचोरा शहरात शासकीय कार्यालयीन वेळेत एक नवी, चुकीची आणि अत्यंत आक्षेपार्ह प्रवृत्ती रुजू झाल्याचे दिसून येत आहे, ती म्हणजे निश्चित केलेल्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेऐवजी थेट कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच डबा खाणे. अनेक कार्यालयांमध्ये नागरिक सकाळपासून कामासाठी थांबलेले असताना अधिकारी किंवा कर्मचारी टेबलावर बसूनच जेवण करत असल्याचे दृश्य सामान्य झाले आहे. परिणामी कामकाज थांबते, नागरिकांना “थांबा”, “नंतर या”, “जेवण सुरू आहे” अशी उत्तरे दिली जातात आणि कार्यालयीन वेळ असूनही प्रत्यक्षात सेवा मिळत नाही. शासकीय सेवेत पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नामफलक, कामकाज फलक, टेबलवरील नावाच्या प्लेट्स, ओळखपत्रे तसेच निश्चित केलेल्या वेळेतच जेवणाची सुट्टी पाळणे या बाबी केवळ औपचारिकता नसून नागरिकाभिमुख प्रशासनाची मूलभूत तत्त्वे आहेत. कार्यालयीन वेळेत डबा खाण्याची सवय ही या तत्त्वांवर थेट आघात करणारी असून ती नागरिकांच्या वेळेचा, श्रमांचा आणि संयमाचा अपमान करणारी ठरते. याशिवाय ज्या विभागांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे त्या कार्यालयांतही त्याचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येते. गणवेश न परिधान केल्यामुळे नागरिकांना अधिकारी व कर्मचारी यांची ओळख पटत नाही. अनेक ठिकाणी गळ्यात ओळखपत्रे न लावल्याने ‘कोण अधिकारी आणि कोण कर्मचारी’ हा प्रश्न कायम राहतो. यामुळे गैरसमज, वादविवाद आणि कधी कधी अनावश्यक तणाव निर्माण होतो. या सर्व बाबींचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होत असून प्रमाणपत्रे, दाखले, नोंदी, तक्रारी, परवाने अशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व वेळेत सेवा मिळत नाही. परिणामी प्रशासनाबद्दल नाराजीची भावना वाढत असून शासकीय कार्यालयांविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. शासकीय कार्यालये ही जनतेची सेवा करणारी यंत्रणा असून ती लोकाभिमुख, शिस्तबद्ध आणि पारदर्शक असणे अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत नामफलकांचा अभाव, ओळखफलकांची कमतरता, ड्रेस कोड व ओळखपत्रांकडे होणारे दुर्लक्ष आणि कार्यालयीन वेळेत डबा खाण्याची वाढती प्रवृत्ती या अपेक्षांवर पाणी फेरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात तातडीने ‘नामफलक, ओळखफलक व शिस्तबद्ध कार्यालयीन वेळ पालन अभियान’ राबविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर नियमाप्रमाणे सुस्पष्ट व अद्ययावत फलक लावणे, प्रत्येक टेबलवर नावाची प्लेट बसवणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे गळ्यात लावणे, ड्रेस कोडचे काटेकोर पालन करणे, कार्यालयीन वेळा व जेवणाच्या सुट्टीचा कालावधी ठळकपणे दर्शविणे आणि निश्चित केलेल्या वेळेशिवाय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जेवणास सक्त मनाई करणे या बाबी प्राधान्याने अंमलात आणणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नियमित तपासणी व कठोर अंमलबजावणी केल्यासच या नियमांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. नागरिकांच्या सोयीसाठी असलेले हे नियम प्रत्यक्षात उतरले तर प्रशासनावरील विश्वास निश्चितच वाढेल, कामकाजात गती येईल आणि अनावश्यक गैरसमज व तणाव टळतील. त्यामुळे पाचोरा शहरातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्वरित सुधारणा करत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचे आदर्श उदाहरण निर्माण करणे ही काळाची नितांत गरज बनली आहे.

पाचोरा में मेहमान नवाज़ी का नया मानदंड स्थापित करता श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स

0

Loading

पाचोरा – शहर के जामनेर रोड क्षेत्र में स्थित श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स केवल एक व्यावसायिक उपक्रम नहीं है, बल्कि बेहतर सेवा, साफ-सफाई, सुव्यवस्थित प्रबंधन और अपनापन का उत्कृष्ट उदाहरण बनकर उभर रहा है। इस संस्थान की नई शाखा का भव्य शुभारंभ शनिवार, दिनांक 24 January 2026 को शुभ मुहूर्त में होने जा रहा है, जिससे पाचोरा शहर को एक आधुनिक, सर्वसुविधायुक्त और संस्कारों को संजोने वाला आदरातिथ्य केंद्र प्राप्त हो रहा है। सद्गुरु की कृपा तथा स्व. छत्तुमल बाच्छामल लालवाणी, स्व. फत्तुमल बाच्छामल लालवाणी एवं स्व. ईश्वरलाल फत्तुमल लालवाणी के आशीर्वाद से स्थापित श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स का नाम ही विश्वास, शांति और संतोष का प्रतीक है। लालवाणी परिवार ने मेहनत, ईमानदारी और सेवा-भावना के साथ इस रिसॉर्ट की संकल्पना को साकार किया है, जिसके लिए समाज में उनके प्रयासों की सराहना की जा रही है। शुभारंभ के अवसर पर श्री सत्यनारायण महापूजा का आयोजन किया गया है, जिससे इस उपक्रम को आध्यात्मिक आधार प्राप्त होगा। किसी भी नए कार्य की शुरुआत ईश्वर स्मरण और आशीर्वाद के साथ करने की परंपरा को निभाते हुए लालवाणी परिवार ने इस कार्यक्रम को धार्मिक वातावरण में संपन्न करने का निर्णय लिया है, जिससे यह आयोजन केवल उद्घाटन न रहकर श्रद्धा, संस्कार और समाजिक एकता का प्रतीक बनेगा। श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स की विशेषता यह है कि यहां सभी आवश्यक सुविधाएं एक ही स्थान पर उपलब्ध कराई गई हैं। प्योर वेज गार्डन एंड फैमिली रेस्टोरेंट के माध्यम से परिवारों के लिए स्वच्छ, शांत और गुणवत्तापूर्ण भोजन की सुविधा दी गई है, क्योंकि आज की तेज़ रफ्तार जिंदगी में शुद्ध शाकाहारी, स्वादिष्ट और भरोसेमंद भोजन हर किसी की आवश्यकता बन गया है, और इसी जरूरत को ध्यान में रखते हुए यहां गुणवत्ता को सर्वोच्च प्राथमिकता दी गई है। इसके साथ ही लॉजिंग एंड बोर्डिंग तथा AC और Non AC रूम्स की सुविधा उपलब्ध कराई गई है, जिससे बाहर से आने वाले मेहमानों के लिए यह एक सुरक्षित, आरामदायक और भरोसेमंद ठहराव स्थल सिद्ध होगा। साफ-सुथरे कमरे, उचित दर, सुरक्षित वातावरण और बेहतर सेवा के कारण श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स पाचोरा शहर में एक आदर्श निवास व्यवस्था के रूप में अपनी पहचान बनाएगा, ऐसा विश्वास नागरिक व्यक्त कर रहे हैं। विवाह समारोह, स्नेह मिलन, जन्मदिन, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक आयोजन तथा विभिन्न पारिवारिक कार्यक्रमों के लिए यहां विशाल और सुंदर लॉन्स की सुविधा उपलब्ध है, जहां सुव्यवस्थित व्यवस्था, आकर्षक सजावट और शांत वातावरण के कारण हर कार्यक्रम यादगार बन सकता है, और आने वाले समय में यह स्थान पाचोरा एवं आसपास के क्षेत्र के लिए प्रमुख आयोजन केंद्र बनने की पूरी संभावना रखता है। इस भव्य शुभारंभ समारोह में प्रमुख अतिथि के रूप में मा. किशोरआप्पा पाटील (आमदार : पाचोरा–भडगांव) उपस्थित रहेंगे, जिनकी उपस्थिति से इस उपक्रम को सामाजिक और राजनीतिक स्तर पर भी प्रोत्साहन मिलेगा। इस कार्यक्रम के निमंत्रक श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स समस्त लालवाणी परिवार हैं, जिन्होंने सभी नागरिकों से इस मंगल अवसर पर सस्नेह उपस्थिति दर्ज कराने का अनुरोध किया है। शुभारंभ कार्यक्रम सायं 07:00 PM से 10:00 PM तक आयोजित किया जाएगा, इसी समय अतिथियों के लिए स्नेहभोजन की व्यवस्था की गई है, जिसमें शुद्ध शाकाहारी, स्वादिष्ट और भरपूर भोजन परोसा जाएगा, तथा भोजन का समय भी सायं 07:00 PM से रात्रि 10:00 PM तक रखा गया है। कुल मिलाकर श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स पाचोरा शहर के विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाने वाला उपक्रम सिद्ध होगा, क्योंकि यह न केवल रोजगार सृजन करेगा बल्कि शहर की पहचान को भी नई ऊंचाइयों तक ले जाएगा और नागरिकों को बेहतर सुविधाएं प्रदान करते हुए सेवा और संस्कार की परंपरा को आगे बढ़ाएगा। जामनेर रोड पर स्थित यह नया केंद्र भविष्य में पाचोरा शहर का गौरव बनेगा, इसमें कोई संदेह नहीं है। इस भव्य शुभारंभ समारोह से संबंधित अधिक जानकारी के लिए संपर्क क्रमांक 9226715777 एवं 8888600933 उपलब्ध हैं, और सभी नागरिकों से अनुरोध है कि वे श्री साई मोक्ष रिसॉर्ट & लॉन्स, जामनेर रोड, पाचोरा में उपस्थित होकर इस शुभ अवसर के साक्षी बनें।

आज दि.23/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. कुटुंबातील सहकार्य लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिरतेचा आहे. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवाद कौशल्य आज उपयोगी ठरेल. नवीन माहिती किंवा प्रस्ताव मिळू शकतो. कामात गती येईल. मानसिक समाधान अनुभवता येईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क -भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. संयम ठेवल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह -आत्मविश्वास वाढलेला राहील. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडतील. वाद टाळल्यास मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे निर्णायक ठरतील. थोडा ताण जाणवू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखण्याचा दिवस आहे. सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधींचा विचार करा. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती साधता येईल. कामात स्थैर्य राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस साधारण पण सकारात्मक राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.22/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात पुढाकार घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. अडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस शांत आणि स्थिरतेचा आहे. नियोजन केल्यास कामे सुरळीत पार पडतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-आज विचारांची स्पष्टता वाढेल. संवादातून प्रश्न सुटतील. नवीन माहिती किंवा संधी मिळू शकते. मानसिक उत्साह टिकून राहील.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक बाबी संयमाने हाताळाव्या लागतील. घरगुती विषयांमध्ये समजूतदारपणा उपयुक्त ठरेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. शांतता लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आज आत्मविश्वास कामी येईल. जबाबदाऱ्या वाढल्या तरी योग्यरीत्या पार पाडाल. वाद टाळल्यास मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे लक्षात घ्यावे लागतील. ताण जाणवू शकतो पण मेहनतीचे फळ मिळेल. खर्चाचे नियोजन करा. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. सहकार्यामुळे कामे सुलभ होतील. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. दिवस समाधान देणारा ठरेल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन दिशा किंवा संधी दिसून येतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार फायदेशीर ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती होईल. कामात स्थैर्य जाणवेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना योग्य प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास दिवस सुरळीत जाईल.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. विश्रांती आणि शांततेकडे लक्ष द्या.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

तणावमुक्त आयुष्याचा मार्ग हसण्यात व चालण्यात – अशोक देशमुख

0

Loading

पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या समारोप समारंभात पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते व व्याख्याते अशोक देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरोगी, तणावमुक्त व सकारात्मक जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे विचार मांडले. आयुष्यात आनंदी व यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने खळखळून हसण्याची सवय लावली पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले. “माझा कोणी शत्रू नाही आणि मी कुणाचा शत्रू नाही” ही सकारात्मक वृत्ती मनाशी कायम बाळगल्यास जीवनातील अनेक अडथळे सहज पार करता येतात, असा संदेश त्यांनी दिला. दररोज सकाळी व संध्याकाळी किमान अर्धा तास चालणे, मनातल्या गोष्टी विश्वासू व्यक्तींशी मोकळेपणाने सांगणे, अपेक्षारहित व निर्व्यसनी जीवन जगणे यामुळे मनुष्य तणावमुक्त राहतो, नकारात्मक विचारांपासून दूर जातो आणि सकारात्मक कार्य त्याच्या हातून घडते, असे त्यांनी सांगितले. हे जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आत्मसात केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्हि. टी. जोशी होते. त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते, असे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भविष्यात यशस्वी होण्यासाठी सुदृढ मन, मस्तक आणि मनगट या तिन्हींच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचले पाहिजे. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यामुळे सकारात्मक मार्गाने आव्हानांना सामोरे जात स्पर्धेत उतरून यश मिळवावे आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी पै. हितेश अनिल पाटील यांनी बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 125 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील अनिल धना पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर ऋषिकेश लक्ष्मण चौधरी या विद्यार्थ्याची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित गीतगायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिमिक्री, डिश डेकोरेशन, नाटक आदी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयातील डॉ. छाया पाटील, डॉ. सुवर्णा पाटील व सपना रावते यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अतुल पाटील व सागर पाटील यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाल्याबद्दल, डॉ. शरद पाटील यांनी दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादर केल्याबद्दल, तसेच प्रा. वाय. बी. पुरी यांना असोसिएट प्राध्यापक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. जे. पी. बडगुजर यांची SQAAF कमिटीवर निवड झाल्याबद्दल व प्रा. किरण पाटील यांच्या वाणिज्य शाखेतील दोन क्रमिक पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दलही गौरव करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने वरिष्ठ महाविद्यालय विरुद्ध कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांची क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आली. या सामन्यात वरिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला. यानिमित्ताने वरिष्ठ महाविद्यालयाच्या विजयी संघाचे संघनायक प्रा. डॉ. माणिक पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे संघनायक प्रा. नितीन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. सुभाष तोतला, अण्णासाहेब दगाजी वाघ, डॉ. जयंतराव पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, आप्पासाहेब सतीश चौधरी, प्रकाश एकनाथ पाटील, योगेश दादा पाटील, आकाश वाघ, काकासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. सुनिता गुंजाळ, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव वले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माणिक पाटील, डॉ. अतुल सूर्यवंशी व प्रा. वैशाली बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. तडवी यांनी मानले. राष्ट्रगीताने या प्रेरणादायी समारोप समारंभाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!