Home Blog Page 26

पाचोऱ्यात नगरपालीकेत महायुतीची सत्ता आणि शहरात उभे राहणारे भव्य प्रोजेक्ट

0

Loading

पाचोरा- नगरपालिका निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीत महायुतीचे विरोधी पक्ष नावालाही शिल्लक नाहीत असे चित्र पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले किंबहुना तेवढी वस्तुस्थिती आहे कारण शेवटी पैसा आणि सत्ता या पुढे शहाणपण चालत नाही हे सर्वश्रुत आहे व ते मान्य करावंच लागेल
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाचोरा भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तर भाजप अशी चुरशीशी निवडणूक झाली या निवडणुकीत आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोघेही नगरपालिकेवर एकतर्फी बहुमत आले भाजपच्या जागा कमी आलेले असल्या तरी सभागृहात त्यांची विरोधी पक्ष म्हणून भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशा परिस्थितीत पाचोरा शहरात जे विकासाचे भव्य प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये पाणीपुरवठा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मागील स्वर्गीय बाबुराव आनंदा मराठे शॉपिंग कॉम्प्लेक्स,हुतात्मा स्मारकालगतचे गुलाब डेअरी चे शॉपिंग,पाचोरा नगरपालिका नूतन अति भव्य प्रमाणात अत्याधुनिक वास्तू उभारण्याचे काम, त्याचबरोबर जुना सरकारी दवाखाना व परिसर डेव्हलप करणे अशी महत्त्वपूर्ण अति भव्य प्रोजेक्ट उभारणे हे नवीन सभागृहासमोर महत्त्वाचे आहेत अर्थात ही कामे क्वालिटीची करायची असल्यामुळे आज तरी कामाची क्वालिटी चे काम करणारे एम एस पी & बालाजी ग्रुप सारखे नाव पाचोरा शहरात डोळ्यासमोर नाही हे जरी सर्व सत्य असले तरी ही संपूर्ण काम करत असताना सभागृहामध्ये एकजूट राहणे महत्त्वाचे आहे शिवाय विरोधी पक्ष असला तरी त्यांच्या देखील विचार महत्त्वपूर्ण आहे अशा स्थिती विकास कामांना विरोधी पक्षाला देखील विरोध करता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व कामांच्या मंजुरी केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त करावयाच्या आहेत शिवाय केंद्र- राज्य स्तरावरील विविध स्तरावरच्या परवानगी सोबतच आर्थिक मदत याकरिता निवडणूक जरी शिवसेना शिंदे गटाने व भाजपाने पाचोऱ्यात एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी केंद्र व राज्यस्तरावर महायुती असल्याने तिघेही पक्षांच्या गॉडफादरांकडून मनोमिलन व विकास कामांना विरोध नाही या तत्त्वावर शहर विकासासाठी एकत्रित राहावे लागणार आहे आणि हेच कटू सत्य आहे तरच पाचोरा शहराचा विकास होईल

आज दि.06/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात ठोस निर्णय घ्यावे लागतील. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. कुटुंबात तुमचे मत ग्राह्य धरले जाईल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद केशरी

वृषभ-आज स्थिर विचार आणि संयम उपयोगी पडेल. कामाच्या ठिकाणी बदल स्वीकारावे लागतील. खर्च नियोजन आवश्यक आहे. आरोग्याबाबत जागरूक रहा.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: ऑलिव्ह हिरवा

मिथुन-संवादातून आज अडचणी सुटतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रवास किंवा बैठकीचे संकेत आहेत. वेळेचे नियोजन ठेवा.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट पिवळा

कर्क-घरगुती बाबींमध्ये संयम ठेवावा लागेल. भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसेल. विश्रांती आवश्यक आहे.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: क्रीम

सिंह -आज आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतील. कामाच्या ठिकाणी संधी मिळू शकते. अहंकार टाळल्यास संबंध मजबूत होतील. पुढाकार घ्या.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी पिवळा

कन्या-कामात शिस्त आणि अचूकता आवश्यक आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत दिनचर्या पाळा. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर हिरवा

तुळ-आज समतोल साधण्याचा प्रयत्न करा. भागीदारीतील निर्णय चर्चेतून घ्या. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. नातेसंबंध सुधारतील.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट निळा

वृश्चिक-आज धैर्य आणि अंतर्गत शक्ती वाढलेली जाणवेल. गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. वाद टाळल्यास फायदा होईल. संयम ठेवा.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनु -नवीन ज्ञान मिळवण्याचा दिवस आहे. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूलता आहे. उत्साह वाढलेला राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: जांभळा

मकर-कामाचा ताण जाणवला तरी परिणाम समाधानकारक मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ -नवीन कल्पना आणि संपर्क लाभदायक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर करडा

मीन-आज मन संवेदनशील राहील. आध्यात्मिक विचार वाढतील. कुटुंबाचा आधार मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पत्रकार दिनी पोलिस–प्रसारमाध्यमांचा सन्मानपूर्ण संवाद : पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गौरवपूर्ण उपक्रम

0

Loading

पाचोरा – मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्या मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथे छोटेखानी पण आशयपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. पत्रकारिता आणि प्रशासन, विशेषतः पोलीस प्रशासन यांचे नाते हे नेहमीच संवेदनशील, कधी संघर्षपूर्ण तर कधी सहकार्याचे राहिले आहे. समाजाच्या हितासाठी सत्य समोर आणण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर असते, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा मतभेद, टीका-टिप्पणी, कठोर लेखन किंवा कारवाईची वेळ येते. वर्षभरात प्रसारमाध्यमांकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका झाली असेल, काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले असतील किंवा एखाद्या घटनेवर कठोर शब्दांत लिखाण झाले असेल, तरीसुद्धा पत्रकार दिनाच्या दिवशी त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पत्रकारांचा सन्मान करण्याची भूमिका पाचोरा पोलीस प्रशासनाने घेतली आहे, हे निश्चितच उल्लेखनीय आणि गौरवास्पद मानले जात आहे. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखली जाणारी जबाबदारीची भूमिका आहे. सत्य मांडताना पत्रकारांना अनेकदा नाईलाजाने कठोर वास्तव लिहावे लागते, काही गोष्टींबाबत तडजोड करता येत नाही, तर काही प्रसंगी प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे अपरिहार्य ठरते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनालाही कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते आणि एखाद्या पत्रकाराच्या विरोधात कारवाई करावी लागली, तरी ती वैयक्तिक नसून कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतो. या दोन्ही बाजूंचा परस्पर नाईलाज समजून घेऊनही आपले ऋणानुबंध टिकवून ठेवणे, हेच परिपक्व लोकशाहीचे खरे लक्षण असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया घातला आणि समाजात जागृती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आजचे पत्रकार सामाजिक प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार, शोषण तसेच चांगल्या कामांची दखल घेत समाजासमोर निर्भीडपणे सत्य मांडत आहेत. अशा पत्रकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि संवादाचे पूल अधिक भक्कम करणे, हा पत्रकार दिन साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून हाच सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रसारमाध्यमे आणि पोलीस प्रशासन यांच्यातील नाते हे संघर्षापुरते मर्यादित न राहता संवाद, समन्वय आणि परस्पर आदरावर आधारित असावे, ही भूमिका या उपक्रमातून स्पष्टपणे पुढे येत आहे. समाजहितासाठी दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असून एकमेकांच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या समजून घेत पुढे जाणे काळाची गरज असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. या कार्यक्रमात पत्रकार बांधवांची उपस्थिती केवळ औपचारिक न राहता ती या ऋणानुबंधांना अधिक दृढ करणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल मानला जात असून यामुळे भविष्यातही पोलीस–प्रसारमाध्यमांमध्ये अधिक सुसंवाद आणि विश्वासाचे नाते निर्माण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, पाचोरा पोलीस प्रशासनाने हा स्तुत्य उपक्रम राबवला असला तरी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीनेही अशाच स्वरूपाचा उपक्रम केवळ मर्यादित न ठेवता तालुकास्तरावरील तसेच पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांना आमंत्रित करून व्यापक स्वरूपात राबवावा, अशी अपेक्षा ध्येय न्यूज व साप्ताहिक झुंज वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार दिनानिमित्त अशा उपक्रमांची व्याप्ती वाढल्यास पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील परस्पर समज, सुसंवाद आणि सहकार्य अधिक दृढ होईल.

खरी कमाईतून जीवनशिक्षणाची शिदोरी; जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्काऊट-गाईडचा फन फेअर उपक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा -जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे स्काऊट-गाईड विभागाच्या माध्यमातून “खरी कमाई (फन फेअर)” हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून स्वयंरोजगार, व्यवहारज्ञान आणि जीवनकौशल्ये शिकविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागणी-पुरवठा यांचा समन्वय, उत्पादन-विक्रीची साखळी, खर्च-नफा यांचे प्राथमिक गणित, ग्राहकांशी संवाद आणि संघभावना या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पाचोरा शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक सुमितभाऊ पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे दोन्ही मान्यवरांनी विशेष कौतुक केले. लहान वयातच कष्टाची किंमत आणि स्वावलंबनाची जाणीव झाली तर आयुष्यभर त्याचा उपयोग होतो, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात किशोर बारावकर यांनी केले, तर सुमितभाऊ पाटील यांनी उद्योगशीलतेचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची सातत्याने पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या फन फेअरमध्ये स्काऊट-गाईडच्या एकूण १४ संघांनी सहभाग नोंदवला होता. मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ आणि गुलाब संघ या संघांनी आपापल्या स्टॉल्सद्वारे कल्पकतेचा ठसा उमटवला. स्काऊट मास्टर निवृत्ती तांदळे सर यांनी सर्व संघनायकांचा आलेल्या पाहुण्यांसमोर परिचय करून देत प्रत्येक संघाचा उपक्रमातील सहभाग सविस्तरपणे मांडला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आणि व्यवस्थापित केलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. कुठे पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, तर कुठे सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. पदार्थांची चव, सादरीकरण, स्वच्छता, दरनिश्चिती आणि ग्राहकसेवा या सर्व बाबींवर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले होते. आलेल्या पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत संघनायकांकडून पदार्थांबाबत चौकशी केली आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या फन फेअरला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यांनी ग्राहक म्हणून सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड,गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, चेतना पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, राधा शर्मा, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार, पुजा देसले, वंदना पाटील, मंदा पाटील, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, गणेश शिंदे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन किरण बोरसे सर यांनी केले.

राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना पाचोरा येथे अभिवादन

0

Loading

पाचोरा – येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी महिलांच्या सन्मान, स्वातंत्र्य व सामाजिक जडणघडणीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत तसेच महिला मुक्ती व स्त्री शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवली, तर राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श नेतृत्वाची घडण घडवून महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या मानवंदना कार्यक्रमात पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगरसेवक गणेशबापू पाटील, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजयभाऊ गोहील, पत्रकार संदीप महाजन, राहुल बोरसे, राजू पाटील, एस. ए. पाटील, विनोद पाटील, सुदर्शन महाजन, बाबाजी ठाकरे, सुनील महाजन, नगरसेवक बंटी हटकर, संतोष महाजन, कन्हैया देवरे, गणेश पाटील, विजय पाटील, माजी नगरसेवक ॲड. दीपक पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून समाजसुधारकांच्या विचारांना अभिवादन केले. महिलांना शिक्षणाची संधी मिळाल्याशिवाय समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही, हा संदेश सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कृतीतून दिला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच आजच्या काळात महिलांनी शिक्षण, सामाजिक क्षेत्र, प्रशासन आणि राजकारणात अग्रस्थानी राहून फुले दांपत्यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत महिलांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यात बजावलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारातून घडलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत, प्रत्येक आई ही आपल्या कुटुंबातील जिजाऊ असते, हा भावनिक संदेश उपस्थितांना देण्यात आला. या मानवंदना कार्यक्रमामुळे पाचोरा शहरात सामाजिक जाणीव जागृत झाली असून नव्या पिढीला स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आज दि.05/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज आत्मविश्वास वाढलेला राहील व कामात गती येईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ-आज संयम आणि स्थिरता महत्त्वाची ठरेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवट तपकिरी

मिथुन-संवादातून आज महत्त्वाची कामे साध्य होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवास किंवा बैठकीचे योग आहेत. वेळेचे नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट पिवळा

कर्क-घरगुती बाबींवर लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय टाळावेत. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. विश्रांतीसाठी वेळ काढा.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: शुभ्र

सिंह-आज नेतृत्वगुण प्रकट होतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास संबंध सुधारतील. संधी ओळखा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी

कन्या-कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिनचर्या सांभाळा. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर हिरवा

तुळ -आज समतोल राखणे आवश्यक आहे. भागीदारीतील निर्णय चर्चेतून घ्या. खर्च वाढू शकतो म्हणून नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात स्पष्टता ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट निळा

वृश्चिक-आज धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वाद टाळल्यास फायदा होईल. संयम आवश्यक आहे.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनु -नवीन विचार व योजना पुढे येतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. उत्साह जास्त राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: जांभळा

मकर-कामाचा ताण जाणवला तरी प्रगती दिसेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ -नवीन संपर्क लाभदायक ठरतील. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर करडा

मीन-आज मन शांत ठेवणे गरजेचे आहे. आध्यात्मिक विचार वाढतील. कुटुंबाचा आधार मिळेल. आर्थिक बाबतीत सावधपणा ठेवा.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पत्रकारदिनी गर्दी, पुरस्कारांची बाजारपेठ आणि पोटभरू पत्रकारितेचा उघडा चेहरा

0

Loading

६ जानेवारी आला की पत्रकारितेचे तथाकथित उत्सव सुरू होतात. शुभेच्छांचे फलक, सोशल मीडियावर फोटो, एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव आणि अचानक उगवलेली पत्रकारांची गर्दी—हे दृश्य आता नवीन राहिलेले नाही. वर्षभर बातम्यांत दिसणारी नावे मोजकीच असतात; पण पत्रकारदिनी आणि पाकीटे वाटप प्रसंगी मात्र पत्रकारांची संख्या दुपटीने-तिपटीने वाढल्यासारखी भासते. हे केवळ हास्यास्पद नाही, तर पत्रकारितेच्या मुळावर घाव घालणारे वास्तव आहे. आजची कटू वस्तुस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी बातम्या केवळ १० ते १५ ठराविक लोकांच्याच नावावर सातत्याने लागतात. उर्वरित अनेक जण वर्षभर कुठेच नसतात. मात्र दीपावली भेट, पाकीट वाटप, सत्कार समारंभ किंवा पत्रकार दिन आला की हेच चेहरे पत्रकार म्हणून पुढे येतात. पत्रकारिता ही जबाबदारी नसून संधी असल्यासारखी वागणूक दिली जाते. पत्रकारिता हा व्यवसाय नसून समाजसेवा असल्याचे आपण वर्षानुवर्षे सांगतो. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पत्रकारदिन , दिवाळी, पाकीट वाटप प्रसंगी पत्रकार जन्माला येतात. वर्षभर सामान्य माणसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दु:ख, कामगारांचे हाल, महिलांवरील अन्याय, प्रशासनातील भ्रष्टाचार याकडे दुर्लक्ष करणारे काही लोक ६ जानेवारीला & भेट वस्तु वाटप प्रसंगी मात्र व्यासपीठावर झळकतात. भाषणे करतात, सन्मान स्वीकारतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अदृश्य होतात. खरे पत्रकार ऊन-पावसाची पर्वा न करता बातमीसाठी उभे राहतात. धमक्या, दबाव, आर्थिक अडचणी, अपमान सहन करूनही सत्य मांडतात. पण त्यांची संख्या मर्यादित असताना, पोटभरू प्रवृत्तीची गर्दी वाढत चालली आहे. पत्रकारिता आता ओळखपत्र, प्रेस कार्ड, वाहनावरील स्टिकर किंवा सोशल मीडियावरील डीपीपुरती मर्यादित होत चालली आहे. या सगळ्यात सर्वात गंभीर आणि लाजीरवाणी बाब म्हणजे पत्रकारांच्या नावावर किंवा पत्रकार संघटनांच्या नावावर लायकी नसलेल्या व्यक्तींची पुरस्कार देणाऱ्यांची—खरे तर विकणाऱ्यांची—संख्या वाढत चालली आहे. पत्रकारितेशी काहीही संबंध नसलेले, समाजासाठी शून्य योगदान असलेले लोक केवळ पैशांच्या जोरावर किंवा ओळखीच्या आधारे पुरस्कार मिळवतात. हे पुरस्कार सन्मानाचे नसून व्यवहाराचे साधन बनले आहेत. जे पुरस्कार खऱ्या पत्रकारांच्या मेहनतीसाठी असायला हवेत, ते आज बाजारात विक्रीस ठेवलेल्या वस्तूसारखे वाटू लागले आहेत. यामुळे प्रामाणिक पत्रकारांचा अपमान तर होतोच, पण समाजाच्या नजरेत पत्रकारितेची किंमतही घसरते. “हा पण पत्रकार?” असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो आणि हीच पत्रकारितेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यात भर म्हणून ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली सुरू असलेली भंपक पत्रकारिता. अर्धवट माहिती, अप्रमाणित बातम्या, अफवा आणि केवळ प्रसिद्धीसाठी दिलेले ब्रेकिंग—यामुळे पत्रकारितेचा दर्जा रसातळाला गेला आहे. बातमीची खातरजमा, भाषेची शुद्धता, शिक्षणाची कमी या आशयाची जबाबदारी यांचा विचारच केला जात नाही. अनेकांना शुद्ध मराठी बोलता किंवा लिहिता येत नाही; तरीही पत्रकार असल्याचा आव आणला जातो. भाषा ही विचारांची शिस्त असते. जिथे भाषा गंडते, तिथे विचारही गंडतात. अशा अपुऱ्या भाषिक क्षमतेसह समाजाला दिशा देण्याचा दावा करणारी पत्रकारिता ही दिशाभूल करणारी ठरते. पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छा, फोटोसेशन आणि सत्कारांचा दिवस नसावा. तो आत्मपरीक्षणाचा दिवस असायला हवा. आपण वर्षभर काय केले? कुणासाठी उभे राहिलो? कुणाचा आवाज बनलो? सत्तेला प्रश्न विचारले का, की सोयीसाठी गप्प बसलो? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली गेली, तरच पत्रकारितेचा आत्मा जिवंत राहील. खऱ्या पत्रकारांना ओळख देण्याचा, बनावट पत्रकार, पुरस्कारविक्रेते आणि पोटभरू प्रवृत्तीला आरसा दाखवण्याचा हा दिवस ठरायला हवा. अन्यथा पत्रकारदिनी, दीपावली भेटीच्या वेळी किंवा पाकीट वाटपाच्या प्रसंगी जन्माला येणाऱ्या पत्रकारांची व पत्रकार संघटनेची संख्या वाढतच राहील आणि वर्षभर बातम्या मात्र मोजक्याच लोकांच्या नावावर राहतील. सोशल मीडियासाठीचा आशयही याच वास्तवाकडे निर्देश करतो—पत्रकारदिनी जन्माला येणारे, भेटवस्तू व पुरस्कारांवर जगणारे आणि ‘ब्रेकिंग’वर पोट भरणारे चेहरे वाढत असताना, वर्षभर सत्यासाठी उभे राहणारे पत्रकार आजही मोजकेच आहेत.

आज दि.04/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात पुढाकार घ्यावा लागेल. निर्णय घेताना घाई टाळल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबातील चर्चा सकारात्मक दिशेने जातील.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद केशरी

वृषभ-आज मन स्थिर राहील आणि विचार स्पष्ट होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या नीट पार पडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्यासाठी नियमितपणा आवश्यक आहे.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: ऑलिव्ह हिरवा

मिथुन-संवाद कौशल्यामुळे आज कामे सोपी होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवास किंवा बैठकीचे योग आहेत. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट लिंबूसरी

कर्क -घरगुती वातावरणात शांतता राखणे आवश्यक आहे. भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत सावधपणा ठेवल्यास नुकसान टळेल. विश्रांतीला वेळ द्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: क्रीम

सिंह -आज आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास संबंध अधिक दृढ होतील. संधी ओळखा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी पिवळा

कन्या-कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारावर लक्ष ठेवा. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर हिरवा

तुळ -आज समतोल राखणे गरजेचे आहे. भागीदारीतील निर्णय चर्चेतून घ्या. खर्च वाढू शकतो म्हणून नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात स्पष्टता ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट निळा

वृश्चिक -आज धैर्य व आत्मविश्वास वाढेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वाद टाळल्यास फायदा होईल. संयम ठेवा.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनु -नवीन विचार व योजना आकार घेतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. उत्साह जास्त राहील. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: जांभळा

मकर -कामाचा ताण वाढला तरी प्रगती दिसेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थैर्य हळूहळू मजबूत होईल. सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ -नवीन संपर्क व कल्पना लाभदायक ठरतील. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर करडा

मीन-आज मन संवेदनशील राहील. आध्यात्मिक विचार वाढतील. कुटुंबाचा आधार मिळेल. आर्थिक बाबतीत सावधपणा आवश्यक आहे.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

नव्या आशेचा दीप पेटला कन्या शाळेच्या दारी,ज्ञान–संस्कारांची वाट दाखवी हातात जबाबदारी,अनुभव, अभ्यास, संवेदना एकत्र येती येथे, शिवाजी शिंदे प्राचार्य—शाळेच्या उज्ज्वल भवितव्याचे नवे स्वप्न साकारते येथे.

0

Loading

पाचोरा : नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा या शाळेच्या प्राचार्यपदी शिवाजी शिंदे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेच्या माजी प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली असून संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याची दखल घेत हा निर्णय घेतला आहे. शिवाजी शिंदे यांना शिक्षण क्षेत्रातील तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अध्यापनाचा अनुभव आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, नैतिक मूल्ये आणि जीवनोपयोगी कौशल्ये यांचा समतोल साधत त्यांनी अनेक विद्यार्थिनींच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीत स्पष्टता, समजूतदारपणा आणि विद्यार्थ्यांशी असलेली भावनिक जवळीक ही वैशिष्ट्ये कायम दिसून येतात. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीतही शिवाजी शिंदे यांची वाटचाल उल्लेखनीय आहे. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. व बी.एड. पदवी प्राप्त केली आहे.शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांचे ज्ञान विद्यार्थिनींसाठी तसेच समाजासाठी उपयुक्त ठरत आहे. शिवाजी शिंदे हे नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही कार्यरत असून संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रशासन, नियोजन व शैक्षणिक धोरणांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न तसेच शिक्षक–विद्यार्थी समन्वय यामुळे त्यांची ओळख एक सक्षम व दूरदृष्टी असलेले शैक्षणिक नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे. याचबरोबर शिवाजी शिंदे हे नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी आणि उत्कृष्ट निवेदक म्हणूनही परिचित आहेत. सामाजिक विषयांवर केलेले लेखन, साहित्यिक कार्यक्रमांतील सहभाग आणि प्रभावी निवेदनशैलीमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासू शिक्षक म्हणून सातत्याने वाचन, संशोधन आणि आत्मविकासावर त्यांचा भर राहिला आहे. प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कन्या विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक वाढ, आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब, विद्यार्थिनींसाठी नव्या संधी निर्माण करणे तसेच सुरक्षित व प्रेरणादायी वातावरण घडवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालय निश्चितच नवे शिखर गाठेल असा विश्वास पालक, शिक्षक व विद्यार्थी वर्गातून व्यक्त केला जात आहे. शिवाजी शिंदे यांच्या या नियुक्तीबद्दल शिक्षण क्षेत्र, सामाजिक संस्था, साहित्यिक, पत्रकार तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

लेवेगुजर भवन खारघर: विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आपलेच घर

0

Loading

पाचोरा – माझी मुलगी डॉ. कादंबरी संदीप महाजन हिने एमजीएम मेडिकल कॉलेज येथे फिजिओथेरेपीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून तिची इंटर्नशिप सुरू होती. शिक्षणाच्या प्रारंभापासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तिचा निवास कामोठे येथेच होता. मात्र एक जानेवारीपासून सदर रूम खाली करणे आवश्यक असल्याने अचानक निवासाचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे तिच्या इंटर्नशिपचे केवळ सात–आठ दिवस शिल्लक होते. एवढ्या अल्प कालावधीसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध निवास मिळवणे हे मोठे आव्हान ठरले. या काळात अनेक ठिकाणी रूमचा शोध घेतला, मात्र अपेक्षेप्रमाणे सुविधा कुठेच मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी भाड्याच्या अटी अत्यंत जाचक होत्या, तर काही ठिकाणी सुरक्षिततेबाबत समाधानकारक वातावरण नव्हते. मुलगी एकटी असल्याने हॉटेलमध्ये राहणेही सुरक्षित वाटत नव्हते. या सगळ्या परिस्थितीत पालक म्हणून मनात मोठी चिंता आणि अस्वस्थता होती. याच दरम्यान खारघर येथे गुजर मंडळावर मुलींसाठी निवासाची सुविधा असल्याची माहिती मिळाली. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तेथील व्यवस्थापक निळूभाऊ चौधरी (Mo.98199 18088 ) आणि महेश भाऊ (Mo 8169487076)यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ‘मंडळावर ठेवणे’ ही कल्पना थोडी संकुचित वाटली. मात्र एमजीएम मेडिकल कॉलेज खारघरजवळ असल्याने आणि केवळ दोन–तीन दिवसांचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने मुलीला तिथे ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या काही दिवसांतच आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. रेवे गुजर भवन खारघर येथील स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता, नियमबद्ध व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी असलेले अनुकूल वातावरण आणि आपुलकीची वागणूक पाहून मनापासून समाधान वाटले. विशेषतः मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून जाणवले वेळेचे काटेकोर पालन, जबाबदार व्यवस्थापन आणि एकूणच सकारात्मक शिस्त यामुळे पालक म्हणून मनाला मोठा दिलासा मिळाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था तसेच विविध स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस हे सर्व परिसरातच जवळ उपलब्ध आहेत. एखादी शैक्षणिक संस्था थोडी दूर असली तरीही सहज व सुरक्षित वाहन व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासाची कोणतीही अडचण भासत नाही. त्यामुळे अभ्यास, क्लासेस आणि इंटर्नशिप यांचा ताण न येता नियोजनबद्ध दिनक्रम ठेवणे सहज शक्य होते. तसेच आपल्या समाजातील मुले-मुली बाहेरगावी शिक्षणासाठी गेल्यानंतर सर्वात मोठी अडचण भासते ती जेवणाची. या दृष्टीने लेवेगुजर भवन खारघर येथे अन्न व आरोग्य व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. येथे घरगुती डब्याद्वारे दिले जाणारे Food & Health हे सकस, स्वच्छ, घरगुती आणि सात्विक स्वरूपाचे असून समाजाच्या खानदेशी चवीप्रमाणे आखलेला मेन्यू असल्याने मुलांना घरचीच आठवण होते. योग्य पोषण, आरोग्यदायी आहार आणि नियमित वेळेचे जेवण यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. खरं तर या अनुभवामुळे एकच खंत मनात राहिली की खारघर गुजर मंडळ सुरू झाल्यानंतर आपण सुरुवातीलाच मुलीला इथे का शिफ्ट केले नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो मांडताना कोणतीही औपचारिकता नाही, तर एका पालकाच्या मनातील प्रामाणिक भावना आहेत. आजच्या काळात, विशेषतः मुंबईसारख्या मेट्रो सिटी परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुरक्षित निवास ही सर्वात मोठी गरज आहे. अशा वेळी खारघर गुजर मंडळ ही केवळ निवास व्यवस्था नसून, ती विश्वासाची

आणि सुरक्षिततेची हमी देणारी जागा आहे. याच अनुषंगाने व्यवस्थापक मंडळालाही नम्र विनंती करावीशी वाटते की इतकी मोठी इमारत उभारणे आणि त्याचे नियमित मेंटेनन्स करणे, तेही मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी, हे निश्चितच आव्हानात्मक आणि खर्चिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या समाजबांधवांच्या शिफारशीवरून तसेच आवश्यक तपासणी करून इतर समाजातील विद्यार्थिनींनाही रूम उपलब्ध करून देण्याचा विचार केला तर तो सर्वार्थाने सकारात्मक ठरेल. यामुळे रूमची उपलब्धता वाढेल, मंडळाच्या देखभालीस हातभार लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थिनींना विद्यार्थिनींचीच साथ मिळेल. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मुलींची संख्या अधिक असणे हे अधिक आश्वासक ठरते आणि सामूहिक राहणीमानातून परस्पर सहकार्य व आपुलकी वाढीस लागते. त्यामुळे गुजर बांधवांना आवर्जून सांगावेसे वाटते की आपल्या मुला–मुलींना इकडे–तिकडे असुरक्षित ठिकाणी ठेवण्यापेक्षा खारघर गुजर मंडळासारख्या आपल्या हक्काच्या, आपल्या माणसांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या ठिकाणी ठेवावे. हे मंडळ म्हणजे केवळ इमारत नसून, ते आपलेच घर आहे, ही भावना इथे काही दिवस राहिल्यानंतर ठळकपणे जाणवते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मंडळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून पालक आणि विद्यार्थिनी दोघांनाही मानसिक स्थैर्य देणारे आहे. खारघर गुजर मंडळ उभारणीसाठी ज्या दात्यांनी आर्थिक मदत दिली, ज्यांच्या मनात ही संकल्पना होती, ज्यांनी वेळ, श्रम आणि ऊर्जा खर्च केली, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्ञात–अज्ञात सर्वांनी जे सहकार्य केले, त्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. आज अनेक पालक निर्धास्तपणे आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पाठवू शकतात, यामागे या मंडळाच्या उभारणीमागील दूरदृष्टी, सामाजिक भान आणि सेवाभाव कारणीभूत आहे. अशा संस्थांची गरज भविष्यात आणखी वाढणार आहे. खारघर गुजर मंडळ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, समाजाने एकत्र येऊन उभ्या केलेल्या या सुरक्षित आश्रयस्थानी अनेक विद्यार्थिनींची स्वप्ने सुरक्षितपणे पूर्णत्वाकडे जात आहेत. या सर्व सेवाभावी हातांना शतशः प्रणाम.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!