१. मेष (Aries): आज तुम्हाला नवी जबाबदारी मिळू शकते. कामात यश मिळेल. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. २. वृषभ (Taurus): प्रेमसंबंधात थोडे विसंवाद संभवतात. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. घरात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा. ३. मिथुन (Gemini): नवीन संधी चालून येतील. नात्यांमध्ये गोडवा राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. दिवस उत्साहवर्धक राहील. प्रवासाचे योग आहेत. ४. कर्क (Cancer): कामात मेहनत जास्त घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. मन शांत ठेवणे गरजेचे आहे. ५. सिंह (Leo): महत्त्वाची कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधात यश. ६. कन्या (Virgo): अचानक खर्च संभवतो. भावंडांशी मतभेद टाळा. सरकारी कामात विलंब होऊ शकतो. संयमाने काम घ्या. जुनी गोष्ट त्रास देऊ शकते. ७. तुला (Libra): व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. नवीन करार फायदेशीर ठरतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनःशांती मिळेल. ८. वृश्चिक (Scorpio): कामाचा ताण जाणवेल. थोडे भावनिक असाल. जोडीदाराशी संवाद वाढवा. आरोग्यावर लक्ष द्या. जुने मित्र भेटतील. ९. धनु (Sagittarius): नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन जीवनात स्थैर्य येईल. काही चांगले निर्णय घेण्याची संधी मिळेल. १०. मकर (Capricorn): प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. आर्थिक निर्णय सकारात्मक ठरतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
११. कुंभ (Aquarius): नवीन ओळखी लाभदायक ठरतील. एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. मन प्रसन्न राहील. अभ्यासात यश मिळेल. १२. मीन (Pisces): आरोग्यावर खर्च संभवतो. कामात अडथळे येतील. जवळच्या व्यक्तीची मदत होईल. शांतपणे निर्णय घ्या. सकारात्मक विचार ठेवा.
लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी खारघर (नवी मुंबई) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे भव्य लोकार्पण आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन म्हणजे समाजाच्या आत्मभानाचे, बांधिलकीचे आणि जिवंत आशेचे दृश्यरूप होत. मुंबईसारख्या जागेच्या तुटवड्याने ग्रासलेल्या महानगरात लेवे गुजर समाजाच्या ऐक्याने उभारलेली ही वास्तू म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर अनेक पिढ्यांच्या कष्टांची, निष्ठेची आणि समाजविषयीच्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे. ही वास्तू म्हणजे एखाद्या निव्वळ भिंतींचा समूह नाही, तर ती आहे एक विचार, एक भावना, एक संकल्पना – जी कुणा एका व्यक्तीच्या डोक्यात जन्माला आली आणि अनेकांनी ती आपल्या घामाच्या थेंबांनी प्रत्यक्षात उतरवली. ही कल्पना केवळ समाजासाठी होती. कोणत्याही एकट्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी नव्हे, कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नव्हे, कोणत्याही लोभस प्रपंचासाठी नव्हे – ही कल्पना होती संपूर्ण गुजर समाजाच्या उत्कर्षासाठी, एकत्रतेसाठी आणि सामाजिक योगदानाच्या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी. लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी भव्य मंदिराच्या उभारणीमागे असलेली कहाणी ही संघर्षाची आहे, कठोर मेहनतीची आहे, अपमान पचवून पुढे जाण्याची आहे. या कल्पनेला मूर्त रूप देणाऱ्यांनी अनेक घरांचे उंबरठे झिजवले. काहींनी स्वागत केले, काहींनी दुर्लक्ष केले, काही ठिकाणी अभिमानाने योगदान मिळाले, तर काहींनी उपहास केला. पण या सर्व अनुभवांची परिणती आज लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबईच्या एका गौरवशाली वास्तूमध्ये झाली आहे. त्यामुळे आज या प्रत्येक समाजहितैषी, स्वप्नवत विचारांच्या माणसाला त्रिवार वंदन करावेसे वाटते. यासाठी लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ त्या पद्धतीने रात्रंदिवस झटले, त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रेरित होऊन समाजाच्या घराघरात जाऊन देणग्या मागितल्या, लोकांना विश्वास दिला. हे काम सहजसोपं नव्हतं. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमीच अविश्वासाच्या सावलीत होते. “हे शक्य आहे का?”, “आपणच कशाला पुढे जायचं?”, “कुणी मदत करेल का?” – असे अनेक प्रश्न समोर उभे असतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजेच खऱ्या अर्थाने नेतृत्व. आणि या समाज मंदिराच्या उभारणीमागे असलेलं हे नेतृत्व हे शब्दशः नाव नोंदवण्यासारखं नाही, तर त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा हेच आजच्या समाजासाठी दीपस्तंभ आहे.आणि हा संपूर्ण भार उचलला समाजाच्या प्रत्येक घटकाच्या जोरावर लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळाने खारघरमध्ये तब्बल आठ कोटी रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू म्हणजे एकात्मतेचा पुतळा आहे. कोणी थोडे दिले, कोणी फार; कोणी स्वतःच्या वेळेचे योगदान दिले, कोणी श्रमदान केले, कोणी मनापासून समाजासाठी काहीतरी केले. हे कोणत्याही एका गटाचं किंवा व्यक्तीच नव्हतं. हे संपूर्ण लेवे गुजर समाजाचं कार्य होतं – आणि म्हणूनच ही वास्तू त्यांचं प्रतीक आहे. या वास्तूच्या उभारणीत केवळ देणगीदारांचेच नव्हे, तर कार्यकर्त्यांचे, दूरवर राहून धडपड करणाऱ्यांचे, समाजातून प्रेरणा देणाऱ्यांचे आणि ज्यांनी आडूनसुद्धा पाठिंबा दिला त्यांचेही श्रेय आहे. समाज कार्यामध्ये केवळ समोर दिसणाऱ्यांचेच नव्हे, तर पार्श्वभूमीत राहून काम करणाऱ्यांचे योगदान अधिक मोठं असतं. कारण ते कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर – “कुणी बघो की न बघो, आपण मात्र आपले काम करून जायचं.” कोणत्याही कार्यामध्ये चुका होतातच. पण त्या चुका केवळ त्या लोकांपासूनच होतात, जे काही तरी करण्याचा प्रयत्न करतात. हाताळणीच्या पातळीवर थोड्या चुका झाल्या असतील, संवादात तफावत राहिली असेल, पण या चुका हेतुपुरस्सर नव्हत्या – हे समजून घेणं ही सुद्धा समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. काम करणाऱ्यांच्या हातूनच चुका होतात जे काहीच करत नाहीत त्यांच्याकडे नव्हे तर जे करतात त्यांच्याकडे बोट ठेवण्यासाठीच हात मोकळे असतात. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या लढ्यापासून तर संत महात्म्यांचा इतिहास आद आहे समाजात काही नकारात्मक वृत्ती असतातच – त्या नेहमी दुसऱ्याच्या चुकांवर बोट ठेवतात, कोणताही सकारात्मक बदल डोळ्यांना खुपतो. पण म्हणून आपलं कार्य थांबायला नको. अशा लोकांकडे दुर्लक्ष करत समाजहितासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक घटकाला आपल्या कडून मनःपूर्वक सलाम. ही वास्तू म्हणजे संस्कृतीचा किल्ला आहे, समाजाच्या प्रतिष्ठेचा स्तंभ आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. येथे केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक सेवा, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, वृद्धसेवा अशा अनेक उपक्रमांची योजना आहे. त्यामुळे ही वास्तू म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी साकारलेले एक केंद्र आहे. समाज मंदिर ही संज्ञा येथे केवळ पूजास्थळ म्हणून वापरली गेलेली नाही, तर ती एक सर्वसमावेशक सामाजिक केंद्र म्हणून उदयास आलेली आहे. आज समाजात अनेक संस्था, ट्रस्ट, मंडळं कार्यरत आहेत. पण त्या केवळ नावापुरत्या असतात. त्यांच्या ध्येयधोरणांची दिशा अधांतरी असते. लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी उभारलेले खारघरमधील लेवे गुजर समाज मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधिलकी आहे, निष्ठा आहे, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे – इथे आत्मभान आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ज्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले ते सुद्धा केवळ एक कार्यक्रम नव्हता. ती स्मरणिका म्हणजे समाजाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा दस्तावेज आहे. यामध्ये समाजातील कार्यकर्त्यांचे योगदान, सामाजिक उपक्रमांची यशोगाथा, प्रेरणादायी लेख, समाजघटकांचे विचार – या सर्व गोष्टी नोंदविल्या आहेत. या स्मरणिकेचे संपादन केलेल्या मंडळींनी हे कार्य अत्यंत अभ्यासपूर्वक, चिकाटीने आणि नि:स्वार्थ वृत्तीने पार पाडले आहे. ही स्मरणिका म्हणजे नव्या पिढीला समाजाची जाणीव करून देणारे एक अमूल्य साधन आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ज्या मंडळींनी भूमी मिळवून दिली, बांधकामासाठी सहकार्य केले, अंतर्गत सजावटीपासून ते कार्यक्रमाच्या व्यवस्थेपर्यंत जीव ओतून काम केले – त्या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. त्यांना केवळ धन्यवाद देऊन विसरून चालणार नाही. त्यांच्या योगदानाची दखल ही समाजाची जबाबदारी आहे. कारण हे कार्य केवळ त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी नव्हते – ते एक सामाजिक कर्तव्य होते, ज्याला त्यांनी आनंदाने स्वीकारले.म्हणून भविष्यात समाजाच्या प्रत्येक गावात जेव्हा जेव्हा कार्यक्रम समाजाच्या स्तरावर आयोजित केले जातात त्या कार्यक्रमात लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांचा सत्कार होणे कर्मप्राप्त आहे खारघर येथे झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाले. पदाधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे नेतृत्व, आणि कार्यकर्त्यांचे समर्पण यामुळेच हा सोहळा केवळ एक समारंभ न राहता एक ऐतिहासिक पर्व ठरला. मंचावर विचार मांडणाऱ्या वक्त्यांनी समाजाला दिशा दिली, प्रेरणा दिली, आणि भविष्यातील वाटचालीचा आराखडा सुद्धा सादर केला. उपस्थितांच्या डोळ्यांत उत्साह होता, मनात अभिमान होता, आणि ओठांवर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा होती. कार्यक्रमाच्या समारोपाला एक घोषवाक्य उच्चारले गेले – “समाजासाठी समर्पण, संस्कृतीसाठी मंदिर, आणि एकतेसाठी सोहळा” – हे घोषवाक्य केवळ घोषवाक्य नव्हतं, तर हे लेवे गुजर समाजाच्या स्वाभिमानाचं स्फूर्तिवाक्य ठरलं. ते ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी होतं – समाधानाचं, स्वाभिमानाचं आणि सामूहिक प्रयत्नांच्या यशाचं. खारघरमधील ही वास्तू म्हणजे आजच्या समाजाला दिलेला एक आरसा आहे – जो सांगतो, की एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही. आजच्या फोडाफोडीच्या काळात ही वास्तू एकतेचा, समर्पणाचा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा स्तंभ ठरतो आहे. या कार्यामध्ये कोणाचं नाव असेल किंवा नसेल, त्याला महत्त्व नाही. महत्त्व आहे त्या भावनेचं – की मी समाजासाठी काहीतरी केलं, मी इतिहासाच्या निर्मितीचा भाग ठरलो. या साऱ्याचा विचार करता, हा संपादकीय लेख म्हणजे केवळ कौतुक नव्हे, तर एक प्रेरणागाथा आहे. समाजाने आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवत वर्तमानात एक आशावादी आणि सशक्त पाऊल उचललं आहे. आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी त्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात समाजबांधवांना त्रिवार मुजरा करावा लागतो – ज्यांच्या श्रम, श्रद्धा, निष्ठा आणि आर्थीक समर्पणातून ही गौरवशाली वास्तू साकारली गेली. Dhyeya News & सा. झुंज संपाद संदीप दा. महाजन, पाचोरा M0.73 8510 8510
खारघर, नवी मुंबई – समाजसेवेच्या प्रेरणेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकार झालेल्या लेवे गुजर समाज मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आणि लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळा ३० मे २०२५ रोजी सायंकाळी खारघर येथे दिमाखात आणि हजारो समाजबांधवांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला. सुमारे ८ कोटी रुपये खर्चून उभारलेले हे समाज मंदिर म्हणजे लेवे गुजर समाजाच्या एकतेचा, प्रयत्नशीलतेचा आणि सामाजिक समर्पणाचा भक्कम पुरावा आहे. मुंबईसारख्या महानगरात असे भव्य समाज मंदिर उभारणे ही स्वतःमध्ये ऐतिहासिक कामगिरी असून, हे मंदिर समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एक आधारकेंद्र ठरणार आहे. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल) ) यांची उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख मंचावर भागवत विश्वनाथ पाटील (निंबोल) राजीव रघुनाथ पाटील, शांताराम महाजन (शिरपूर), नंदकिशोर भागवत महाजन (तांदळवाडी), रामभाऊ त्र्यंबक पाटील (निंबोल), अनिल श्रावण महाजन (वाघोदा), श्री किशोर जगन्नाथ पाटील (वाघोदा)अनिल दत्तात्रय पाटील (रावेर), बाळुभाऊ महाजन (लोणी), मनोज विनायक पाटील फोपनार किशोर भगवान चौधरी (पिंपरी नांदु), श्रीराम गरबड महाजन (अंतुर्ली), श्री गणेश राजाराम पाटील (दापोरा ),अरूण नारायण पाटील (दापोरा), किरण रविंद्र पाटील (निंमदड), एन. व्ही. पाटील सर (ऐनपूर), प्रविण गंभीर पाटील (जळगाव), संजय राजाराम चौधरी (अहिरवाडी), शरद तुकाराम महाजन (अंतुर्ली), प्रदीप गंभीर पाटील (कुभांरखेडा), आर. एन. महाजन जामनेर कर(संभाजीनगर), नंदलाल पाटील सर (गोरगावले) श्री विजय जगन्नाथ पाटील निंबोल,श्री विशाल गंभीर पाटील (केऱ्हाळा) डॉ संजय हरी पाटील (केऱ्हाळा) यांचा उपस्थितीत समाजाला दिशा देणाऱ्या विचारांचे आणि अनुभवांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर व श्री भागवत विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन झाले. आणि ,सुनील एकनाथ पाटील (कुंभार खेडा)श्री सहदेव पाटील (चहार्डी) व राजेंन्द्र लक्ष्मण पाटील (हिवरखेडा) यांनी संपादन केलेली ही स्मरणिका समाजाच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा दस्तावेज आहे. कार्यकर्त्यांच्या समर्पणभावनेपासून समाजप्रमुखांच्या प्रेरणादायी लेखनापर्यंत विविध पैलूंनी समृद्ध असलेली ही स्मरणिका समाजासाठी एक अमूल्य ठेवा ठरली आहे. सदर भुखंड मिळविणेसाठी श्री संजय मधुकर पाटील (वाघोदा) यांनी मदत केली. या इमारतीच्या बांधकामासाठी श्री भाऊराव आनंदा महाजन कर्की ,व श्री विनायक नारायण पाटील जामनेर श्री ईश्वर रघुनाथ पाटील (दापोरा) याचं विशेष सहकार्य लाभले,श्री गणेश पाटील इंटिरियर डिझाईनर (एरंडोल) यांनी कुठलाही मोबदला न घेता मदत केली.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेटाने आणि उत्साहाने पार पाडले. अध्यक्ष जी. एम. पाटील, उपाध्यक्ष मोहन मोतिराम पाटील, सभापती भागवत हरी पाटील, सचिव रोहिदास देवचंद चौधरी, खजिनदार सुनील तुकाराम महाजन, सुनिल एकनाथ पाटील यांचे नेतृत्व कौतुकास्पद राहिले. उपखजिनदार सुनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यकारी मंडळातील उपसभापती एन. एम. पाटील (परधाडे), उपसचिव के. टी. पाटील (दुसखेडा), श्री एल व्ही महाजन उपसचिव (वाघोदा), श्री राजेंद्र महाजन (उत्राण) श्री सुधाकर सिताराम पाटील (तादंलवाडी) श्री एम.डी.पाटील (एरंडोल)यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. सौ. क्रांती पाटील (जळगाव) आणि सौ. कविता महाजन (कल्याण) यांनी समालोचन करून कार्यक्रमास वैचारिक समृद्धी दिली. सौ. साधना राजेंद्र पाटील (हिवरखेडा), शैलाताई चौधरी (अध्यक्ष, माहेर महिला मंडळ, जळगाव), सौ.संध्याताई रविंद्र पाटील (उपाध्यक्ष) यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.समांरभ यशस्वीपणे पार करणेसाठी श्री पवन पाटील अहिरवाडी, श्री दिपक रविंद्र पाटील ह.मु खारघर (चांगदेव), श्री निळकंठ चौधरी वाघोदा व महेश महाजन अहिरवाडी , श्री महेश महाजन (तादंलवाडी) यांनी विशेष परिश्रम घेतले.उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात मंदिराच्या भविष्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. हे मंदिर केवळ धार्मिक विधींसाठी मर्यादित न राहता शैक्षणिक, आरोग्यविषयक, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, वृद्धांसाठी आधार सेवा यांसारख्या उपक्रमांचे केंद्र राहणार आहे. दिशा-दर्शन, आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, समाजजोडणी उपक्रम इत्यादींचा येथे सातत्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक, संभाजीनगर, पुणे व जळगाव येथील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून लेवे गुजर समाजबांधवांनी उपस्थिती लावली. एकमेकांना भेटण्याचा, सामाजिक बंध दृढ करण्याचा आणि भावनिक नाते घट्ट करण्याचा हा सुवर्णक्षण ठरला. एकात्मतेची आणि ऐक्याची भावना या कार्यक्रमातून उमटताना दिसली लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पार पडलेला हा लोकार्पण सोहळा म्हणजे समाजाच्या स्वाभिमानाचा, बंधुत्वाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेल्या सामूहिक पावलांचा प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी “समाजासाठी समर्पण, संस्कृतीसाठी मंदिर, आणि एकतेसाठी सोहळा” या घोषवाक्याचा गजर करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यकारी मंडळाच्या वतीने सर्व समाजबांधवांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन समाजाच्या स्वाभिमानात भर टाकल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
पाचोरा (शिवाजी शिंदे) | हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला दिशा देणारा एक क्षण… आणि त्या क्षणात निर्णय घेणारा डॉक्टर जर आकाशात असला, तर तो देवदूतच! पाचोऱ्याचे सुपुत्र आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड यांनी एका उड्डाणादरम्यान हे अक्षरशः सिद्ध करून दाखवले. कोलकाता ते हैदराबाद दरम्यान इंडिगोच्या 6E334 या विमानात 55 वर्षीय एका सहप्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्राणांच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या या प्रवाशाच्या जीवनरक्षणासाठी डॉ. गरुड यांनी आकाशातच उपचार करून त्याचे प्राण वाचवले. या प्रसंगात डॉ. गरुड यांच्यासोबत असलेले डॉ. अमोल जाधव (दिशा डेंटल केअर) आणि डॉ. अतुल महाजन (माऊली हॉस्पिटल) यांनी देखील धावून जाऊन योग्य सहकार्य केले. या तिघांचाही हा अनुभव केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हे, तर मानवीतेच्या दृष्टिकोनातूनही विलक्षण ठरला. पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड, दिशा डेंटल केअरचे डॉ. अमोल जाधव व माऊली हॉस्पिटलचे डॉ. अतुल महाजन हे तिघे डॉक्टर आपल्या परिवारासह काही दिवसांपूर्वी सिक्कीम दौऱ्यावर गेले होते. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले दिवस, गिरिशिखरांमधून फिरताना आलेले अनुभव यांचे स्मरण करत करत शनिवार, 31 मे रोजी सकाळी 11 वाजता कोलकाता येथून इंडिगोच्या 6E334 विमानाने हैदराबादकडे प्रयाण केले. विमान काही मिनिटे हवेत झेपावले असतानाच, एका सहप्रवाशाला — वय अंदाजे 55 वर्षे — अचानक अत्यवस्थ वाटू लागले. तो आपल्या सीटवरून खाली पडला, व बेशुद्ध झाला. सुरुवातीला इतर प्रवासी घाबरले. परंतु या धावपळीच्या वातावरणात एक नाव शांततेने उभे राहिले — डॉ. सागर गरुड. डॉ. सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या प्रवाशाकडे धाव घेतली. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन शुद्धीवर आणण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी प्रवाशाच्या नाडीचा वेग, श्वासाची गती, आणि चेहऱ्यावरच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास केला. मात्र काही वेळातच त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. विमान आता पूर्ण उंचीवर झेपावले होते. डॉक्टरकडे हाताशी फक्त विमानातील एमर्जन्सी मेडिकल किट होते. तरीसुद्धा डॉ. गरुड यांनी वैद्यकीय ज्ञान, अनुभव आणि धैर्य यांच्या बळावर पुढचे 30 ते 40 मिनिटे त्या व्यक्तीच्या जीवनासाठी लढा दिला. रुग्णाच्या छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. उलट्यांचा त्रास वाढत होता. प्रवाशाचा चेहरा फाटलेला, श्वासोच्छवास अनियमित. अशा गंभीर परिस्थितीत डॉ. गरुड यांनी सलाइन, इंजेक्शन, आणि योग्य औषधांचा वापर करून स्थिती नियंत्रणात ठेवली. या काळात प्रवाशाचे कुटुंबीय पूर्णपणे गहिवरले होते. पत्नीने उघड्या आकाशात आसवं ढाळली, मुलांनी देवाला साकडं घातलं. मात्र, त्या काळजीच्या क्षणी देव दूताच्या रूपात डॉ. सागर गरुड यांनी जीवनदान दिले. या संकटात डॉ. अमोल जाधव आणि डॉ. अतुल महाजन यांनी मोलाचे सहकार्य दिले. आवश्यक ती साधने, मोजणीचे उपकरण, प्रवाशांना समजावणे, आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना धीर देणे — हे सर्व कार्य तंतोतंत केले गेले. या तिघांच्या उत्तम समन्वयामुळे विमानातील एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती नियंत्रणात आली. डॉ. गरुड यांची तात्काळ कृती पाहून विमान व्यवस्थापनाने हैदराबाद विमानतळावर एमर्जन्सी अलर्ट दिला. ॲम्बुलन्स आधीच पोहोचवण्यात आली. लँडिंग झाल्यानंतर रुग्णाला अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद येथे दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी डॉ. गरुड यांनी वेळेत दिलेल्या उपचारांचे कौतुक करून सांगितले की, “जर हे उपचार आकाशात मिळाले नसते, तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती.” विमानातील प्रत्येक प्रवाशाला हे समजल्यावर त्यांच्या डोळ्यांत कौतुक दाटून आले. कोणी हात जोडले, कोणी अश्रू पुसले. काहींनी डॉ. गरुड यांना “देवदूत”, “भगवंताचे रूप”, “खरे डॉक्टर” अशा शब्दांत गौरविले. हा क्षण केवळ वैयक्तिक समाधानाचा नव्हता, तर एक वैद्यकीय आणि मानवीतेचा विजय होता. हैदराबाद येथून परतल्यानंतर पाचोरा शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. डॉ. गरुड यांच्या मित्रमंडळींनी, सहकाऱ्यांनी, पेशंट्सनी आणि नागरी संस्थांनी त्यांचं मोठ्या कौतुकाने स्वागत केलं. पाचोऱ्यासारख्या ग्रामीण शहरातून आलेल्या डॉक्टरने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमठवणे हे नुसते अभिमानास्पदच नव्हे, तर प्रेरणादायीही ठरले. डॉ. सागर गरुड यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या गावी परत येऊन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. त्यांचे कार्य फक्त वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे, गरजूंसाठी मोफत तपासण्या, आणि सामाजिक जाणीवेतून राबवलेल्या अनेक उपक्रमांद्वारेही विस्तारले आहे. त्यांचा दृष्टीकोन असा आहे की, “रुग्ण कोण आहे, कुठला आहे, कोणत्या जात-धर्माचा आहे — हे महत्वाचे नाही; त्याचे प्राण वाचले पाहिजेत हेच खरी डॉक्टरकी!” या घटनेतून समाजाला एक मोलाचा संदेश मिळतो — संकट कुठेही येऊ शकते, पण तिथे जर सुसंवेदनशील, तत्पर आणि प्रशिक्षित व्यक्ती असेल, तर संकटांवर मात करता येते. डॉ. सागर गरुड हे त्याचे जिवंत उदाहरण ठरले. भारतीय वैद्यकीय संघटना (IMA), इंडिगो विमान कंपनी, तसेच हैदराबाद अपोलो हॉस्पिटल यांच्याकडूनही औपचारिक पत्राद्वारे त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेने हे सिद्ध केले आहे की, देवदूत हे आकाशातून उडत येत नाहीत — ते आपल्या आजूबाजूलाच असतात. फक्त त्यांना ओळखण्याची नजर लागते. डॉ. सागर गरुड हे त्या देवदूतांचे मूर्तस्वरूप ठरले आहेत.
गिरड (ता. भडगाव) या जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात १ जून १९५८ रोजी जन्मलेल्या शांताराम सुकदेव चौधरी सर यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, शिक्षण व समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. एका सर्वसामान्य शेतमजुराच्या घरात जन्मलेले चौधरी सर यांचे बालपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेले. घरात अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचे लहानपणीच निधन, आणि या सगळ्यांत त्यांच्या मातोश्री – स्वर्गीय रुखमाबाई चौधरी यांनी अत्यंत धैर्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार घेतला. अशा परिस्थितीत तीन मुली आणि दोन मुलांना शिक्षित करण्याचा महान कार्यभाग त्या मातोश्रींनी पार पाडला, ज्यामुळे शांताराम चौधरी सर यांना शिक्षणाची गंगा लाभली. श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गिरड येथील ‘जवाहर हायस्कूल’मध्ये झाले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक अडचणी, गरिबी, संसाधनांचा अभाव या गोष्टी आडव्या येत असतानाही त्यांनी शिक्षणाची गाठ सोडली नाही. अकरावी आणि बारावीचे शिक्षण पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ‘आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पाचोरा’ येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी त्यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथून अर्थशास्त्र विषयात एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर लातूर येथे जाऊन बी.एड. पूर्ण केले. एम.ए., बी.एड. झाल्यानंतर त्यांनी आपल्या मातृसंस्थेतच – श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे उपशिक्षक म्हणून कार्यारंभ केला. याच संस्थेत त्यांनी तब्बल तीस वर्षे सेवा करताना शिक्षक म्हणून केवळ अध्यापन नव्हे तर संस्कार, नेतृत्व, मार्गदर्शन या सर्व अंगांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. अध्ययन व अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करणे ही बाब चौधरी सरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे. विद्यालयीन कारकिर्दीत सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांनी १५ वर्ष कार्य केले. या कालखंडात वकृत्व, निबंध, वादविवाद, नृत्य, फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य, विचारप्रवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेमुळे शाळेला अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली. २००३ मध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार आणि मार्गदर्शक स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांनी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांना शिक्षक प्रतिनिधी संचालक म्हणून जबाबदारी दिली. पुढे नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वात त्यांनी संचालक मंडळात कार्य केले. या काळात शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. वरिष्ठ श्रेणीसाठी लागणारे ठराव, पदोन्नती, सोयीस्कर बदली अशा विविध समस्यांचे निवारण संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नेहमी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कर्मठ निष्ठा ठेवली. शैक्षणिक कार्यासोबतच श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर सामाजिक कार्यातही सक्रिय राहिले आहेत. पाचोरा शहर तेली समाज संस्थेचे ते पाच वर्षे संचालक आणि २०२२ पासून सचिव पदावर कार्यरत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, हे उपक्रम त्यांनी मनापासून राबवले. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात शैक्षणिक जागृती वाढली आहे. श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तसेच नाशिक विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी, मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने, उपोषणे केली, निवेदने दिली. आजही ते सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ग्राहक पंचायत – तालुकाध्यक्ष, माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संघ – सहसचिव, माजी विद्यार्थी संघ, एम.एम. कॉलेज पाचोरा – सहसचिव, पाचोरा शहर तेली अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. शैक्षणिक जीवनात वेळोवेळी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वासमोर नमते घेतले असून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्याच्या घटना ही त्यांच्या कार्याच्या परिणामकारकतेचे द्योतक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षक म्हणून, समाजसेवक म्हणून आणि नेतृत्वकर्त्या व्यक्तिमत्त्व म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्री नानासाहेब शांतारामचौधरी सर यांचे कुटुंब शिक्षणप्रेमी आहे. त्यांच्या पत्नी सौ सुनीता चौधरी यांनीही त्यांच्या कार्यात पाठिंबा दिला असून त्यांची मुले मुलगी कुमारी ऋतुशा व मुलगा मोहित हे बी. कॉम्प्युटर, एमबीए पूर्ण करून पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मुलांमध्ये संस्कार, विचार आणि आत्मविश्वासाचे बीज त्यांनी लहानपणापासूनच पेरले. श्री नानासाहेब शांताराम सर नेहमी सकारात्मक विचारांचा पुरस्कार करतात. “नेहमी चांगले विचार करा, आपले नेहमी चांगलेच होईल,” हा त्यांचा जीवनमंत्र आहे. आजच्या काळात अशा विधायक विचारसरणीचे नेतृत्व करणारे शिक्षक आणि समाजसेवक फार दुर्मिळ झाले आहेत. आज १ जून रोजी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, आणि निरंतर सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि अजूनही समाजासाठी, शिक्षणासाठी कार्य करण्याचे सामर्थ्य देवो, हीच प्रार्थना.
शब्दांकन श्री संदीप महाजन, पत्रकार संपादक – झुंज ध्येय न्यूज चैनल, पाचोरा
पाचोरा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित भव्य “बुद्धिजीवी संमेलन” आणि नव्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भव्य स्वागत सोहळ्याने पाचोरा शहरात राष्ट्रनायकांच्या स्मृतींना उजाळा देत नवसंघटनाचे आव्हान पुन्हा एकदा गगनावर पोहोचवले. भाजपा तालुक्याच्या वतीने शुक्रवार, दि. 31 मे 2025 रोजी महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिष्ठानाचा समरस संगम पाहायला मिळाला. या गौरवशाली कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पणाने झाली. सद्गुण, शौर्य आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर कार्यक्रमात वारंवार अनुभवास येत होता. त्यांच्या जीवनमूल्यांपासून प्रेरणा घेत नव्या पिढीला दिशादर्शन करण्याचा संकल्प सर्व स्तरांवरून जाणवला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “पाचोरा-भडगाव तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा पक्ष जनतेच्या आशेचे केंद्रबिंदू बनणार असून, आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा नवे शिखर गाठेल.” त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनबांधणीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. या विशेष “बुद्धिजीवी संमेलनात” प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ स्त्री म्हणूनच नव्हे तर एक कुशल प्रशासक, न्यायनिष्ठ शासक आणि धर्मनिरपेक्ष सामाजिक आदर्श म्हणून संपूर्ण भारतात आदरणीय स्थान प्राप्त केले.” त्यांच्या कार्यातील समतोलता, धार्मिक सहिष्णुता आणि जनहितार्थ घेतलेले निर्णय आजच्या काळातही राजकारणाला दिशादर्शक ठरतात, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले. भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी पक्षाच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसमोर आपल्या मनातील भावना अत्यंत आत्मीयतेने मांडल्या. त्यांनी सांगितले की, “पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह खांद्याला खांदा लावून काम करू. भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे, जो सर्वसामान्य जनतेला न्याय देतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि त्यावर त्वरित कृती करतो.” त्यांनी पक्षाला ‘नंबर वन’ बनवण्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखवला. कार्यक्रमात भाऊसाहेब डी. एम. पाटील, हिम्मत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दिलीपभाऊंच्या नेतृत्वाचे स्वागत केले. त्यांनी नव्या पर्वात भाजपाला स्थानिक स्तरावर अधिक सक्षम बनवण्यासाठी पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. त्यांच्या भाषणातून अनुभवी नेतृत्वाची आणि पक्षनिष्ठेची जाणिव व्यक्त झाली. या कार्यक्रमात पाचोरा भाजपा टीमच्या वतीने आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि विशेष सन्मानपत्र अशा विविध स्वरूपांचा समावेश होता. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दिलीपभाऊंचे स्वागत करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. .या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आयोजित बुद्धिजीवी संमेलनात विविध क्षेत्रातील विचारवंतांनी एकत्र येत समाजाच्या समोर असलेल्या आव्हानांवर मुक्त संवाद केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, धर्मनिरपेक्षता आणि न्यायदेवतेवर असलेली निष्ठा या मुद्द्यांवर विचारप्रवर्तन झाले. या मंचावरून महिलांच्या सक्षमीकरणावरही सशक्त भूमिका मांडण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे यांनी करताना या आयोजना मागील उद्देश, त्यातील ऐतिहासिक महत्त्व आणि पक्षशिस्तीचे सूत्र उलगडून सांगितले. सूत्रसंचालन माणिक पाटील यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष गोविंद शेलार यांनी करताना सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाला पाचोरा व परिसरातील भारतीय जनता पक्षाचे विविध पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये –पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची चेअरमन नानासाहेब संजय वाघ, माजी जि प सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलालभाऊ जैन, रमेश वाणी, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, माजी जि प सदस्य डी.एम. पाटील, भूषण पाटील, प्रमोद सोमवंशी, प्रदीप पाटील, वसंत गायकवाड, रशीद काहाकर, एन.सी. पाटील, शशी पाटील, शशिकांत वाघ, शोभाताई तेली, सरला पाटील, सुरेखा पाटील, शिवदास पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, सुदाम वाघ, अनिल धना पाटील, डॉ. शांतीलाल तेली, विजय कडू पाटील, पिंटू भामरे, सतीश चौधरी, मच्छिंद्र थोरात, प्रकाश चौधरी, वासुदेव महाजन, राजेंद्र झावरु पाटील, प्रवीण गुजर, अशोक मोरे, अजय अहिरे, पंडित तेली, सुनीता गुंजाळ, नीलिमा पाटील, सतीश देशमुख, दीपक पाटील, नितीन पाटील, फकीरा भाऊ गंगे, नंदू बापू सोमवंशी, शरद अण्णा पाटील, विजू काका पाटील, योगेश माळ, गोपाल पाटील, अविनाश दादा सोमवंशी, कुलदीप पाटील, मनोज पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, विचारांचे सखोल मंथन आणि नेतृत्वावरील विश्वासाचे अधिष्ठान स्पष्ट दिसून आले. यानंतर पाचोरा-भडगाव तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट आणि संगठितपणे उभा राहील, अशी भावना उपस्थितांमध्ये ठळकपणे दिसून आली. आगामी काळात भाजपाचा जनाधार अधिक विस्तारित होईल, असा विश्वास या कार्यक्रमाने पक्का केला.
पाचोरा – आज 31 मे 2025 रोजी शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवणारे आणि स्पष्टवक्तेपणाची ओळख निर्माण करणारे सीताराम पांडुरंग पाटील सर आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सन 1954 मध्ये जन्मलेल्या पाटील सरांनी आयुष्यभर ‘जे योग्य ते स्पष्ट’ म्हणण्याची भूमिका घेतलेली असून, त्यांच्या स्पष्ट भाषेची कडूनिंब व कारल्यासारखी कडवट चव लोकांनी शेवटी औषधासारखीच स्वीकारलेली आहे. शिक्षकी पेशातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक क्षेत्रात विस्तारलेला असून, अनेक संस्था व पदांवर त्यांनी कार्य केले आहे. पाटील सरांचे मूळ गाव पाचोरा तालुक्यातील पुनगाव असले तरी नोकरीनिमित्त ते पाचोरा येथे स्थायिक झाले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी 1974 ते 2012 पर्यंत सु. भा. विद्या मंदिर, पाचोरा येथे शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अखंड मेहनत घेतली. त्यांच्या अध्यापनशैलीत स्पष्टता, शिस्त आणि मूल्यशिक्षणाची ठाम भूमिका होती. याच शाळेत त्यांनी 2007 ते 2012 या काळात मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर समाजजीवनात सक्रिय सहभाग हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे. पाटील सरांनी पुनगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सलग 10 वर्षे भूषवले. या काळात गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी विविध योजनांची अंमलबजावणी केली. सहकार क्षेत्रातही त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्था ही त्यांनी स्थापन करून यशस्वीपणे चेअरमन पद सांभाळले. त्याशिवाय ते जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, पुनगाव यांचेही संचालक होते. राजकारणात त्यांनी राजकारणाचे पितामह स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांचे पाईक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवास सुरू केला कालांतराने स्वर्गीय आप्पासाहेब व वाघ परिवार वेळोवेळी जे जे जबाबदारी पक्षाची संघटनेची व निवडणुकीची देतील ती यशस्वीपणे सांभाळत त्यांनी तालुका अध्यक्षपद, तसेच ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट विचार, शिस्त आणि कार्यक्षम नेतृत्व ही त्यांची छाप राहिली आहे. शिक्षक संघटनेच्या माध्यमातूनही पाटील सरांनी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षपद, तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न प्रशासनदरबारी मांडले. त्यांच्या एकूण कार्यकाळात विशेष नोंद घ्यावी लागेल ती म्हणजे त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांच्या बोलण्यात कधीच मखलाशी नव्हती, जे योग्य वाटले ते त्यांनी कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट शब्दांत मांडले. त्यामुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्यांचा राग आला, पण पुढे त्यांच्या बोलण्यातील खरंचपणा, हितचिंतन आणि मार्गदर्शन समजून येत गेले. ते बहुउद्देशीय रेवे गुज्जर मंडळ, पाचोरा तालुका चे संचालकही राहिले असून या समाजघटकाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रत्येक स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवला. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेतला असता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येतात – शिक्षक, मुख्याध्यापक, सहकारी नेते, राजकारणी, संघटक आणि मार्गदर्शक. पण या सर्वांवर मात करणारा गुण म्हणजे त्यांची थेट बोलण्याची प्रामाणिक शैली, जी त्यांना आजच्या काळातही लोकांमध्ये विशेष स्थान मिळवून देते. 71 व्या वर्षात पदार्पण करताना पाटील सर अजूनही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असून नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी ‘ध्येय न्यूज – झुंज वृत्तपत्र’ परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. आता १ जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी त्यांचा सामना होईल. शुक्रवारी न्यू चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत पाच गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत सहा गडी गमावून फक्त २०८ धावा करता आल्या. त्यांच्याकडून साई सुदर्शनने ८० धावा केल्या. गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिलला फक्त एक धाव करता आली. त्याला ट्रेंट बोल्टने त्याचा बळी बनवले. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला कुशल मेंडिस हिट विकेटने बाद होत तंबूमध्ये परतला. त्याने साई सुदर्शनसोबत ३४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. यामध्ये मेंडिसने २० धावांचे योगदान दिले. त्यानंतर सुदर्शनला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली. दोघांमध्ये ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. सुंदरने ४८ आणि सुदर्शनने ८० धावा केल्या. त्याच वेळी रुदरफोर्डने २४, शाहरुख खानने १३ धावा केल्या. राहुल तेवतिया १६ आणि रशीद खान खाते न उघडता नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिशेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यापूर्वी, रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या सलामी जोडीने मुंबईला जलद सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. साई किशोरने या सामन्यात पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला जेराल्ड कोएत्झीकरवी झेलबाद केले. तो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा काढल्यानंतर बाद झाला. त्यानंतर रोहितला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. दोघांनी ३४ चेंडूत ५९ धावा जोडल्या. यादरम्यान सूर्यकुमारने २० चेंडूंचा सामना केला आणि ३३ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला. आता त्याच्या नावावर ३०२* षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. हिटमनने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूंमध्ये ४३ धावा जोडल्या. माजी कर्णधाराने ५० चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. तिलकने ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या आणि नमन धीर नऊ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या नऊ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने २२ धावा करून नाबाद राहिला तर सँटनर खाते न उघडता नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोरने प्रत्येकी दोन बळी घेतले तर मोहम्मद सिराजला एक यश मिळाले.
पाचोरा – निवासी कोटेचा परिवार के लिए यह क्षण अत्यंत गर्व और खुशी का था जब परिवार की होनहार बेटी आर्किटेक्ट देवांशी हेतल जयेश कोटेचा ने देश की प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थाओं से अपनी उच्च शिक्षा सफलतापूर्वक पूर्ण कर घर वापसी की। इस खास मौके को यादगार बनाने के लिए परिवार ने परंपरागत रीति से ढोल-ताशों की धुन पर और फूलों की वर्षा के साथ उनका भव्य स्वागत किया। देवांशी, पाचोरा के प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र कोटेचा की पौत्री और हेतल एवं जयेश कोटेचा की सुपुत्री हैं। उन्होंने अपनी पांच वर्ष की आर्किटेक्चर स्नातक डिग्री नागपुर स्थित Priyadarshini Institute of Architecture and Design Studies से पूर्ण की है। इसके पश्चात उन्होंने दो वर्ष की परास्नातक डिग्री (मास्टर्स इन सस्टेनेबल आर्किटेक्चर) देश के प्रतिष्ठित केंद्रीय संस्थान School of Planning and Architecture, Vijayawada (SPAV) से प्राप्त की है। यह संस्थान भारत सरकार के अधीन कार्य करता है और वास्तुकला एवं पर्यावरण-संवेदनशील निर्माण क्षेत्र में देशभर में प्रसिद्ध है। शिक्षा पूर्ण कर घर लौटने पर देवांशी का स्वागत उनके चाचा निलेश कोटेचा, चाची नेहा कोटेचा और समस्त कोटेचा परिवार द्वारा उत्सवमयी माहौल में किया गया। ढोल-ताशों की गूंज और पाँवों के नीचे फूल बिछाकर उन्हें पारंपरिक सम्मान दिया गया। इस दौरान मोहल्ले, समाज, रिश्तेदारों और मित्रों का भी भारी उत्साह देखा गया। इस गौरवपूर्ण उपलब्धि के उपलक्ष्य में देवांशी एवं कोटेचा परिवार का एक विशेष सम्मान समारोह का आयोजन किया गया है। इस शुभ अवसर पर देवांशी का सत्कार श्री एवं सौ परिवार की ओर से दिनांक 31 मई को पाचोरा स्थित सर्वज्ञ होटल के कॉन्फ्रेंस हॉल में आयोजित किया गया है। कार्यक्रम के दौरान देवांशी के शैक्षणिक सफर की जानकारी, उनके अनुभवों की झलक और भविष्य की योजनाओं पर भी चर्चा होगी। साथ ही उनके इस सफलता के पीछे परिवार का सहयोग, उनके अथक प्रयास और समर्पण का सम्मान भी किया जाएगा। देवांशी ने एक साक्षात्कार में कहा, “यह सफलता सिर्फ मेरी नहीं, बल्कि पूरे परिवार की है। उनके सहयोग और विश्वास के बिना यह संभव नहीं होता।” कोटेचा परिवार ने इस अवसर को केवल पारिवारिक आयोजन तक सीमित न रखते हुए, इसे समाज के समक्ष प्रेरणादायक उदाहरण के रूप में प्रस्तुत करने का संकल्प लिया है। देवांशी कोटेचा आज की युवा पीढ़ी, खासकर बेटियों के लिए एक मिसाल बन रही हैं। उन्होंने कड़ी मेहनत, समर्पण और पारिवारिक समर्थन के सहारे वास्तुकला जैसे रचनात्मक और चुनौतीपूर्ण क्षेत्र में उल्लेखनीय सफलता प्राप्त की है। उनका यह शैक्षणिक और प्रेरणादायक सफर न केवल उनके परिवार के लिए, बल्कि पूरे पाचोरा नगर के लिए गर्व की बात है।
हरिद्वार – की पावन धरती पर 28 मई 2025 को गुर्जर समाज के आत्मगौरव और सांस्कृतिक परंपरा का साक्षात उत्सव बड़े ही भव्य और गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। गुर्जर धर्मशाला, हरिद्वार के प्रांगण में नव-निर्मित गुर्जर सम्राट मिहिर भोज सभागार और गुर्जर इतिहास एवं संस्कृति संग्रहालय का लोकार्पण समारोह हजारों गुर्जर बंधुओं की उपस्थिति में अत्यंत हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनने हेतु देशभर से समाज के प्रतिष्ठित प्रतिनिधि, नेता, सामाजिक कार्यकर्ता, न्यायविद, अधिकारी, किसान नेता और युवाओं ने सहभागिता निभाई। कार्यक्रम का सफल संचालन श्री अमित कुमार शिवपुर और श्री प्रवेश गुर्जर ने अत्यंत कुशलता और प्रभावी शैली में किया। कार्यक्रम की भव्यता और समाज की सक्रिय सहभागिता ने यह सिद्ध किया कि गुर्जर समाज आज अपनी ऐतिहासिक विरासत को सहेजते हुए आधुनिक युग में आत्मगौरव के साथ आगे बढ़ रहा है। इस लोकार्पण समारोह में डॉ. यशवीर सिंह (राष्ट्रीय अध्यक्ष, गुर्जर महासभा), अनन्त राम तंवर (राष्ट्रीय अध्यक्ष, गुर्जर समन्वय समिति), सुनीता बैंसला (आईआरएस, पूर्व प्रधान महानिदेशक, आयकर), सुखवीर सिंह जौनापुरिया (पूर्व सांसद), वीरेंद्र सिंह (पूर्व मंत्री), स्वामी यतिश्वरानंद (पूर्व मंत्री), प्रदीप चौधरी (पूर्व सांसद), प्रह्लाद गुंजल (पूर्व विधायक, राजस्थान), नैपाल सिंह कसाना (समाजसेवी), हिम्मत सिंह (किसान नेता, राजस्थान), पूर्व जस्टिस सुनील पंवार (पटना हाईकोर्ट), पूर्व जस्टिस ब्रह्म सिंह वर्मा (नैनीताल हाईकोर्ट), ओंकार सिंह (पूर्व सचिव, उत्तराखंड सरकार), रामशरण (पूर्व आईएएस), राव सुरेन्द्र सिंह तंवर (कैथल), सुरेश राणा, अशोक कुमार हंसापुर, नरेंद्र देढा के साथ-साथ कुरुक्षेत्र धर्मशाला व अन्य गुर्जर धर्मशालाओं के प्रतिनिधियों की गरिमामयी उपस्थिति ने समारोह की महत्ता को और बढ़ा दिया। सभागार का उद्घाटन समारोह समाज की एकता, जागरूकता और संगठनात्मक क्षमता का प्रतीक बना। यह भवन आधुनिक सुविधाओं से युक्त है और भविष्य में समाज के विविध कार्यक्रमों, संगोष्ठियों, सांस्कृतिक आयोजनों तथा विचार विमर्श हेतु एक सशक्त मंच के रूप में कार्य करेगा। इसके साथ ही ‘गुर्जर इतिहास एवं संस्कृति संग्रहालय’ की भव्य स्थापना समाज के इतिहास को एकत्र करने का एक महत्त्वपूर्ण प्रयास है। संग्रहालय में गुर्जर वीरों के चित्र, ऐतिहासिक दस्तावेज, दुर्लभ छायाचित्र, पुरातात्विक प्रमाण, ऐतिहासिक पत्रक और साहित्य का संग्रह बड़ी श्रद्धा और मेहनत से प्रस्तुत किया गया है। इस संग्रहालय में मिहिर भोज, बप्पा रावल, नागभट्ट प्रथम जैसे गुर्जर इतिहास के महान सम्राटों के चित्रों, शिलालेखों, लेखों और जीवन वृतांत को सुंदर रूप से प्रदर्शित किया गया है। समाज के सभी प्रतिनिधियों और आम नागरिकों ने इस संग्रह को देखकर गर्व की अनुभूति की और इसे नई पीढ़ी के लिए प्रेरणास्रोत बताया।इस लोकार्पण समारोह के अंतर्गत स्वर्गीय किरोड़ी सिंह बैंसला की स्मृति में रचित एक प्रेरणादायी पुस्तक का विमोचन भी मान्यवरों के करकमलों से संपन्न हुआ। यह पुस्तक समाज के लिए उनके संघर्ष, समर्पण और नेतृत्व क्षमता को उजागर करती है। इसके अतिरिक्त, गुर्जर समाज के ऐतिहासिक योगदान पर आधारित एक और शोधपूर्ण पुस्तक का विमोचन भी किया गया, जिसमें गुर्जरों की गौरवशाली गाथाओं को संकलित किया गया है। इसी अवसर पर स्वतंत्रता संग्राम सेनानी और महान क्रांतिकारी विजय सिंह पथिक को भी श्रद्धांजलि अर्पित की गई। वक्ताओं ने उनके विचारों, देशप्रेम और सामाजिक संघर्ष का स्मरण करते हुए उन्हें गुर्जर समाज का प्रेरणास्रोत बताया। इस आयोजन की विशेष बात यह रही कि इसमें उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश ,महाराष्ट्र जैसे विभिन्न राज्यों से हजारों की संख्या में समाजबंधु उपस्थित हुए। विशेषकर कुरुक्षेत्र धर्मशाला और अन्य गुर्जर भवनों के प्रतिनिधियों ने समाज के साथ जुड़कर अपने सहयोग की भावना प्रकट की। हरियाणा और राजस्थान से आए किसान प्रतिनिधियों ने भी समाज की एकजुटता पर प्रकाश डाला और कहा कि हमारा इतिहास ही हमारी ताकत है। इस समारोह में वक्ताओं ने समाज की वर्तमान स्थिति और भविष्य की दिशा पर भी गंभीरता से विचार रखे। उन्होंने बताया कि आज का युग ज्ञान, संगठन और आत्मगौरव का है। ऐसे समय में समाज को शिक्षा, रोजगार, राजनीतिक भागीदारी, और सामाजिक चेतना के माध्यम से सशक्त बनाना आवश्यक है। युवाओं से विशेष रूप से आग्रह किया गया कि वे अपने इतिहास को जानें, संगठन से जुड़ें, और समाज की मुख्यधारा में नेतृत्व की भूमिका निभाएं।मान्यवर अतिथियों ने अपने उद्बोधन में कहा कि यदि समाज को प्रगति करनी है तो उसे अपने अतीत से प्रेरणा लेकर वर्तमान को दृढ़ बनाना होगा। सभागार और संग्रहालय जैसे संस्थान समाज को नई दिशा देने का कार्य करेंगे। यह स्थान न केवल इतिहास का दस्तावेज होगा बल्कि यह युवाओं को दिशा देने वाला विचार केंद्र भी बनेगा।समारोह की समाप्ति पर आयोजक राहुल बैंसला (हरिद्वार) ने मंच से उपस्थित सभी अतिथियों, समाजबंधुओं, पत्रकारगण, आयोजक मंडल और स्वयंसेवकों का हार्दिक धन्यवाद एवं आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि इस सफलता का श्रेय सम्पूर्ण गुर्जर समाज को जाता है, जिनकी निष्ठा, सहयोग और संगठन भावना के कारण यह भव्य आयोजन संभव हुआ। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि भविष्य में भी समाज के गौरव को बढ़ाने वाले ऐसे आयोजन किए जाते रहेंगे।यह ऐतिहासिक दिन न केवल हरिद्वार के इतिहास में बल्कि समस्त गुर्जर समाज के गौरवशाली इतिहास में स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा। यह समारोह एक संदेश है कि जब समाज एकजुट होता है, तब इतिहास रचता है।