Home Blog Page 101

“महामानवांच्या विचारांनी समतेचा दीप प्रज्वलित : पाचोऱ्यात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवात सांस्कृतिक रंगत”

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) — समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा दीप देणाऱ्या महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यातील संत गाडगेबाबा नगर परिसरात भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता गाडगेबाबा नगर येथील खुले मैदान हे प्रेरणादायी विचारांचे साक्षीदार ठरणार आहे.
जगाला शिक्षणाचा खरा मंत्र देणारे महात्मा फुले आणि जगाला मानवतेचा संविधानिक प्रकाश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी पाचोऱ्यातील तक्षशिला नगर व संत गाडगेबाबा नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. फुले-आंबेडकर यांचे कार्य व विचार केवळ जयंतीपुरते साजरे न राहता ते समाजमनात खोलवर रुजवण्यासाठी व त्यांच्या विचारांनी आजच्या पिढीला जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
कार्यक्रमात महामानव वेशभूषा स्पर्धा, कथा वाचन, कविता गायन, गीत सादरीकरण, अभिनय, वकृत्व यांसारख्या विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात पाचोरा शहरातील सर्व वयोगटातील महिला, पुरुष, युवक, युवती तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणार आहेत. सहभागी कलाकारांना त्यांच्या सादरीकरणाबद्दल सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी कोणतीही शुल्क आकारण्यात आलेली नाही. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपली नावे खालील संपर्क क्रमांकावर नोंदवावीत — आयु. किसन सुर्यवंशी सर (९७६६२५०९२१), सौ. संगिता साळुखे (८००७२७४०३३), अॅड. विनोद गायकवाड (९५९५७६०२००) आणि सौ. स्मिता भिवसने (८७६६९०६७००).
महामानवांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने केवळ बाह्य प्रदर्शन न करता, त्यांच्या अमूल्य विचारांचा प्रचार-प्रसार करून समाजात समता, बंधुभाव आणि बंधुत्वाची मुहूर्तमेढ रोवली जावी हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. फुले-आंबेडकरांनी दिलेला विचारधनाचा ठेवा समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचवण्याचा आणि समाजमनाला संविधानिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
महात्मा फुले यांचे कार्य पाहिले तर त्यांनी शिक्षणाच्या द्वारे बहुजन समाजाला उन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी स्त्रियांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी केलेले कार्य आजही समाजाला प्रकाशमयी दिशा देत आहे. दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारताच्या संविधानाची निर्मिती केली नाही तर त्यांनी मानवतेचा ध्यास घेऊन समतेचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा दीप समाजमनात प्रज्वलित केला. आजच्या काळात जिथे भेदभावाची छटा अद्यापही आढळते, तिथे फुले-आंबेडकरांच्या विचारांची अधिक गरज भासत आहे.
याच जाणीवेने, फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन अतिशय सचोटीने व तळमळीने करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभागी कलावंत विविध सादरीकरणांतून फुले-आंबेडकरांच्या संघर्षशील जीवनप्रवासाची, त्यागमय कार्याची व समाजक्रांतीची प्रेरणादायी गाथा लोकांसमोर उलगडून दाखवणार आहेत. महामानवांच्या विचारांची अमृतधारा जनमानसात पोहोचवण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम एक प्रभावी माध्यम ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनामागे ‘महामानव जयंती उत्सव समिती, संत गाडगेबाबा नगर, पाचोरा’ या समितीचे परिश्रम असणार आहेत. समितीने पाचोऱ्यातील प्रत्येक वस्ती, गल्ल्या, वाड्या आणि परिसरांमध्ये प्रचार व जनजागृती करून नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच सामाजिक सलोखा, बंधुभाव व समतेचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमाची संकल्पना उभी केली आहे.
या निमित्ताने, समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नष्ट करून सर्वांना संविधानिक हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, हा उद्देश बाळगण्यात आला आहे. आजच्या नव्या पिढीने महामानवांचा आदर्श समजून घेऊन तो आचरणात आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन व सामूहिक वंदनाने होणार असून त्यानंतर विविध वेशभूषा, गीत, कविता, नाट्य आणि वकृत्व सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली जाणार आहे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाला विशेष उर्जा देईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच समिती सदस्य, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन तन, मन व धनाने योगदान देण्याचे ठरविले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना आपले कौशल्य, आपली कला, आपला आवाज आणि आपली प्रतिभा महामानवांच्या चरणी अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या अनोख्या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने फुले-आंबेडकरांच्या कार्याची उजळणी होणार आहेच, पण त्यासोबतच समाजमनात वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. म्हणूनच केवळ साजरा करणे नव्हे, तर महामानवांच्या कार्याला जीवनाचा ध्यास समजून घेणे, हा या उत्सवाचा खरा गाभा आहे.तरी पाचोरा शहर व परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून, स्वतःचा सन्मान वृद्धिंगत करावा, समतेचा संदेश आपल्या जीवनात रुजवावा आणि महामानवांच्या विचारांचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित करावा, असे कळकळीचे आवाहन ‘महामानव जयंती उत्सव समिती, संत गाडगेबाबा नगर, पाचोरा’ तर्फे करण्यात येत आहे.

“कर्तृत्वाचा अमृतस्पर्श : नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्यसंधानाचा भव्य उत्सव”

0

Loading

पाचोरा ( सौ. शितल महाजन ) जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निखळ योगदान देत उत्तुंग प्रेरणास्थान ठरलेल्या नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा अमृत महोत्सव आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पाचोऱ्यातील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यंत उत्साही व सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न होणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन म्हणून, तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक सह ग्राहक चळवळीत सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नानासाहेब जोशी यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील शैक्षणिक, सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी हे पाचोरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय आणि श्रध्दास्थान असलेले नाव. कसे पाहिले तर त्यांनी अष्टपैलू क्षेत्रात कार्य केले आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याची छाप निर्माण केली आहे मात्र पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार केलेला आहे. केवळ व्यवस्थापनातील दक्षता नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांची निर्मिती, गुणवत्तापूर्ण शिक्षकवृंदाची नियुक्ती आणि शिक्षणसंस्थेच्या आर्थिक शाश्वततेची बांधिलकी यांनी त्यांनी पाचोऱ्यातील सहकारी शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उज्ज्वल जडणघडणच या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साजरी होत आहे. या अद्वितीय सोहळ्याचे समारंभाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष गौरव प्रदान करणार आहे. अमृत महोत्सव सत्काराचे मानकरी म्हणून क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते नानासाहेबांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गौरव ग्रंथ प्रकाशनाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. डी. कुळकर्णी यांच्या हस्ते साध्य होणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासो संजय गरुड आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांची मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या जीवन कार्यावर आधारित एक दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. “ज्ञानामृत” या शीर्षकाखाली सादर होणाऱ्या या ग्रंथाचे संपादन नानासो संजय ओंकार वाघ यांच्या मुख्य संपादकत्वाखाली संपन्न झाले आहे. प्रा. सी. एन. चौधरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली असून, प्रा. डॉ. वासुदेव वले आणि महेश कौंडिण्य यांनी सहसंपादक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे. या ग्रंथात नानासाहेबांच्या जीवनप्रवासाचे, त्यांच्या अष्टपैलू कार्यपद्धतीचे, सहकारी शिक्षण क्षेत्रासह जवळजवळ सर्वच क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी विचार मांडण्यात आले आहे
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नानासाहेब व्ही. टी. जोशी अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष भाऊसो दिलीप ओंकार वाघ, स्वागताध्यक्ष अॅड. दादासो महेश सदाशिवराव देशमुख, तसेच सदस्य म्हणून दादासो दुष्यंतभाई प्रवीणसागर रावल, बापूसो डॉ. बी. एन. पाटील, दादासो खलील दादामिया देशमुख, आणि आप्पासो सतीश नारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळ, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने या आयोजनात पूर्ण समर्पणाने सहभाग घेतला आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी केवळ शिक्षण संस्था चालविल्या नाहीत, तर शिक्षणाचे एक संस्कारीत आणि मूल्याधिष्ठित दर्शन घडविले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात शिक्षणाविषयी जागृती निर्माण केली. त्यांनी सहकार्याच्या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाशी जोडले. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिक्षण संस्थांनी गुणवत्तेच्या शिखरावर झेप घेतली आणि सामाजिक परिवर्तनात मोठे योगदान दिले आहे.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पाचोरा तालुक्यात एक स्फूर्तीचा आणि नवचैतन्याचा संचार झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे, शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान वाटतो आहे आणि पालकांमध्ये आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा विश्वास निर्माण झाला आहे.
नानासाहेबांच्या कार्यगौरवाच्या निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा, कष्टांचा आणि त्यागाचा सन्मान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पिढ्यानपिढ्या शिक्षण – आर्थीक – सामाजीक क्षेत्रात नवनवीन आदर्श निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमृत महोत्सव साजरा करताना नानासाहेब व्ही. टी. जोशी यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे कार्य करणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता, सचोटी, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आजच्या व्यवस्थापन क्षेत्रासाठी आदर्श ठरले आहेत.
“ज्ञानामृत” या गौरव ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा एक अमूल्य दस्तऐवज समाजापुढे सादर होणार आहे. त्यांच्या कार्याची ही प्रेरणामयी गाथा प्रत्येक वाचकाला नवे बळ आणि नव्या संकल्पाची उर्जा प्रदान करणार आहे.
२७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या या अमृत महोत्सव आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, एका कार्यसंस्कृतीचा, एका आदर्श नेतृत्वाचा आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या प्रगल्भतेचा अविष्कार ठरणार आहे.

चारधाम यात्रेच्या पूर्णत्वाचा पावन सोहळा : पाचोऱ्यात गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला सोहळा

1

Loading

पाचोरा – (झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्यूज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर मो. ९९२२६१४९१७) भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा संगम साधणाऱ्या पाचोऱ्यातील शिवनेरी नगर येथे दिनांक ४ मे २०२५ रोजी एक आगळावेगळा, अभूतपूर्व आणि पाचोरा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रथमच घडणारा पावन सोहळा संपन्न होणार आहे. गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला या तीन गोष्टींच्या संगमाने हा कार्यक्रम एक नव्या अध्यात्मिक व सांस्कृतिक अध्यायाचा आरंभ ठरणार आहे. दादासो अरुण मोतीराम पाटील आणि आईसो सरुबाई अरुण पाटील यांनी आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण संकल्प पूर्णत्वास नेला आहे. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, द्वारका, गंगासागर, जगन्नाथपुरी, काशीविश्वेश्वर, रामेश्वरम्, बद्रीनाथ, केदारनाथ, तसेच नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिर अशा सर्व पवित्र स्थळांची चारधाम यात्रा त्यांनी पूर्ण केली. या यात्रेचा सफल, निर्विघ्न समारोप करण्यासाठी आणि ईशकृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गंगापुजनाचा मंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चारधाम यात्रेच्या निमित्ताने गंगेचे पूजन करून पवित्रतेचा महिमा वाढवण्याचा आणि वडीलधाऱ्यांच्या पुण्यस्मृतीचे पूजन करण्याचा जो उपक्रम राबविला जात आहे, तो संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत ठरणारा आहे. कै. मोतीराम तान्हा पाटील, कै. नर्मदाबाई मोतीराम पाटील, कै. प्रविण रंगराव पाटील यांच्या पुण्यस्मृतींना अर्पण म्हणून हा पवित्र कार्यक्रम आरंभला गेला आहे. शिवनेरी नगर, कैलामाता मंदिराच्या पाठीमागे, महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे दिनांक ४ मे २०२५ रोजी या पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा आरंभ एक दिवस आधी, दिनांक ३ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या रविकिरण महाराज यांच्या किर्तन सोहळ्याने होणार आहे. किर्तनाच्या मधुर सुरावटीत अध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जा जागृत करून मुख्य कार्यक्रमासाठी भावमय वातावरण तयार होईल. गंगापुजनाच्या निमित्ताने गंगेच्या पावन प्रवाहाची, तिच्या जीवनदायी शक्तीची आणि तिच्या सदैव प्रवाही पुण्यतेची महती उलगडली जाणार आहे. वास्तुशांतीच्या माध्यमातून घरातील व परिसरातील सर्व वाईट शक्तींचा नायनाट करून सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित केली जाणार आहे. तर ‘पुस्तक तुला’ या अनोख्या उपक्रमाद्वारे ज्ञानार्जनाचे महत्व अधोरेखित करत, पुस्तकांचे पूजन होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आपल्या जीवनात आई-वडिलांच्या आशीर्वादाने व त्यांच्या सुसंस्कारांनी मिळालेल्या घडामोडींचे स्मरण करणे आणि भगवंताच्या चरणी आपल्या श्रद्धेची अर्पण करणे हा आहे. “पावन गंगा, पावन धाम, धन्य धन्य माता पिता चरण पूर्ण काम” या भक्तिरसपूर्ण ओळींमध्ये या सोहळ्याचा सार गुढलेला आहे. या भव्य सोहळ्याच्या निमंत्रक म्हणून निंबा मोतीराम पाटील, रंगराव मोतीराम पाटील, अरुण मोतीराम पाटील, वाल्मीक अरुण पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, कु. प्रणाली वाल्मीक पाटील, चि. अराद्य लक्ष्मण पाटील, सौ. निर्मलाबाई निंबा पाटील, सौ. मथुराबाई रंगराव पाटील, सौ. सरुबाई अरुण पाटील, सौ. वैशाली वाल्मीक पाटील, सौ. शितल लक्ष्मण पाटील, कु. देवांगी वाल्मीक पाटील, चि. पिनाक लक्ष्मण पाटील , चि. धृव हे सर्व कुटुंबीय समर्पित भावनेने निमंत्रक म्हणून पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमामुळे केवळ एक धार्मिक विधी साजरा होणार नाही, तर पाचोऱ्याचे अध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवही उजळून निघणार आहे. परंपरेचे आणि संस्कृतीचे जे धागे आपल्या जीवनात अतूट आहेत, त्यांना या निमित्ताने अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न होत आहे. या सोहळ्यात देवभक्ती, वडीलधाऱ्यांविषयीची कृतज्ञता, धर्मपरायणता, सामाजिक सलोखा आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या कष्टांना, संस्कारांना आणि जीवनातील त्यागाला अभिवादन करण्याचा हा एक आगळा विलोभनीय सोहळा आहे. आईवडिलांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आपल्या संततीसाठी जे स्वप्न उभे केले, त्या स्वप्नपूर्तीची आणि त्यांच्या कष्टांची ही साक्षांतिक भरभरून द्यायची आहे. त्यांच्या आठवणींना नमन करून गंगामातेच्या साक्षीने त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या सोहळ्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘पुस्तक तुला’ उपक्रम. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात वाचनसंस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. वाचनाने व्यक्तिमत्व घडते, विचारशक्ती प्रगल्भ होते आणि समाजात प्रगल्भ नागरिक घडतात. या पुस्तक तुला उपक्रमातून ज्ञानाचा सन्मान होणार असून, विविध ग्रंथांचे पूजन व तुला सोहळा होणार आहे. यातून वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यावर भर देण्यात येणार आहे. पाचोरा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, धर्मप्रेमी, वाचनप्रेमी आणि श्रद्धावंत नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला कार्यक्रमाचा सोहळा स्थळ : शिवनेरी नगर, कैलामाता मंदीराच्या पाठीमागे, महादेव मंदीराजवळ, भडगाव रोड, पाचोरा दिनांक : ४ मे २०२५, रविवार तर रविकिरण महाराज यांचे भावपूर्ण कीर्तन दिनांक : ३ मे २०२५, शनिवार वेळ : रात्री ८ वाजता स्थळ : वरील प्रमाणे असणार आहे. ज्या श्रद्धावानांनी आपल्या जीवनात धर्माचे, संस्कृतीचे, वडीलधाऱ्यांविषयीच्या कृतज्ञतेचे महत्व जाणले आहे, त्या सर्व भाविकांनी या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि या पावन क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आयोजकांनी केले आहे.

अट्टल गुन्हेगाराच्या टोळीचा पर्दाफाश; २.४५ लाखांच्या ४ मोटारसायकली हस्तगत

0

Loading

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा धागा पकडत स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने मोठी यशस्वी कारवाई करत एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेत असलेले आरोपी हे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात जळगाव, नाशिक व धुळे जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचे एकूण १३ प्रकरणे दाखल आहेत.या संपूर्ण प्रकरणात गुन्ह्याची सुरुवात झाली ती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा र.नं. १३४/२०२५ भादंवि कलम ३७९ (२) अंतर्गत. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी शोधण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्नशील होते. अशातच पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे एक अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा आपल्या साथीदारांसोबत मोटारसायकल चोरी करत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. भगवान करगळ यास प्रथम जळगाव फाटा, निफाड येथे शोधून काढण्यात आले. त्याचा पहिला साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड, ता. निफाड, जि. नाशिक) यास सटाणा येथून अटक करण्यात आली, तर दुसरा साथीदार दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यासही त्याच्या गावी शोधून ताब्यात घेण्यात आले.तिघांनाही अटक केल्यानंतर विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत या तिघांनी मिळून चाळीसगाव शहर व तालुका भागात चोरी केलेल्या तीन मोटारसायकलींची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या मोटारसायकली बाबत पुढील माहिती दिल्यानंतर सदर दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. पुढील तपासात असेही निष्पन्न झाले की, त्यांनी गुन्हा करताना आणखी एक दुचाकी वापरली होती, ती दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली. एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ज्यांची अंदाजे किंमत २ लाख ४५ हजार रुपये इतकी आहे. या आरोपींनी जे गुन्हे केले आहेत त्यामध्ये खालीलप्रमाणे प्राथमिक गुन्हे नोंदवलेले आहेतः
१) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गु.र.नं. १३४/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
२) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गु.र.नं. १३५/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
३) मेहुणबारे पो.स्टे.ला गु.र.नं. ८८/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
या सर्व गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना हेही लक्षात आले की आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक, व धुळे जिल्ह्यात जबरी चोरी, साधी चोरी, तसेच दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या एकूण १३ गुन्ह्यांची नोंद आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पूर्वी देखील त्यास अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यांतून अटक करण्यात आले होते. मात्र जामिनावर सुटल्यावर पुन्हा एकदा तो गुन्हेगारीकडे वळला आणि आपल्या साथीदारांसह मोटारसायकल चोरीचा कट रचून प्रत्यक्ष चोरी करून मोटारसायकलींना विकण्याचा उद्योग सुरू केला.चोरीस गेलेल्या मोटारसायकलची व आरोपींच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुप्त माहितीचे सूत्र नेटाने वापरून पोलिसांनी केवळ आरोपींना अटक केली नाही, तर चोरी गेलेली मालमत्ता ताब्यात घेऊन मूळ गुन्ह्यांशी संबंधित तिन्ही गुन्ह्यांमध्ये जोडणी केली आहे. सदर गुन्ह्यांची रचना व तपास यामध्ये पोलिसांचे नियोजन आणि कार्यक्षमता ठळकपणे दिसून येते.या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. कविता नेरकर, स्थानीक गुन्हे शाखा निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष कारवाईमध्ये पोउपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे, पोह. मुरलीधर धनगर, पोना. महेश पाटील, पोका. भुषण शेलार, पोका. सागर पाटील, पोका. मिलिंद जाधव, पोका. दीपक चौधरी, पोह. भारत पाटील (सर्व नेम. स्थागुशा जळगाव) यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला.या कारवाईमुळे केवळ एक मोठी चोरी उघडकीस आली नाही तर अट्टल गुन्हेगार व त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या पुढील कारवायांनाही मोठा लगाम बसला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या प्रयत्नामुळे चाळीसगाव व परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३४/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२) अन्वये कारवाई करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी पोलीस त्यांची कस्टडी घेऊन आणखी चोरीचे गुन्हे दाखल उघडकीस येतात का याचा शोध घेत आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी पोलिसांची तपास यंत्रणा दक्ष आणि सतर्क असल्यास कोणताही गुन्हेगार अटळपणे पकडला जातो. पोलिसांची ही शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध कार्यपद्धती भविष्यातही गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रभावी ठरेल, अशी नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या रखडलेल्या कामावर संतप्त जनतेचा सवाल : पाचोरा-परधाडे आणि परधाडे-भातखंडे मार्गावर मोठ्या बोर्डांचे आश्वासन, पण प्रत्यक्षात खड्डे आणि अपघात

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग ठरणारा पाचोरा-परधाडे आणि परधाडे-भातखंडे मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. या मार्गाच्या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, परंतु प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्ण आहे. फक्त खडी टाकून ठेवण्यात आली असून, त्यापुढे कोणतीही ठोस कृती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.
या संदर्भात पाचोरा पंचायत समितीचे मा. सभापती व भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस बन्सीलाल रामदास पाटील यांनी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी सदर रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बन्सीलाल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर फलक लावून संबंधित मार्गाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या फलकांवर मोठमोठी घोषणा देण्यात आल्या होत्या, आणि स्थानिक जनतेमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली होती. परंतु, निवडणूक संपताच या आश्वासनांची दिशा बदलली आणि प्रत्यक्षात रस्त्यावर फक्त खडी टाकून त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले. परिणामी, रस्त्यावर आधीच असलेले खड्डे अधिक भयानक झाले असून त्यामधून वाहनचालकांना जाताना गंभीर अपघातांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दररोज दुचाकीस्वार, शाळकरी मुले, वृद्ध आणि महिलांना या अपूर्ण रस्त्यामुळे जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या जाहिराती करतात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामे मात्र कागदावरच राहतात. सदर मार्गावर गेल्या काही आठवड्यांमध्ये ५ ते ६ लहान मोठे अपघात घडले असून काही नागरिकांना गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे.
हा मार्ग केवळ पाचोरा आणि परधाडे, भातखंडे या गावांसाठी महत्त्वाचा नाही, तर आसपासच्या अनेक गावांना शहराशी जोडणारा मुख्य संपर्क रस्ता म्हणूनही उपयोगात येतो. शेतीमाल वाहतूक, दैनंदिन प्रवास, शाळा आणि दवाखान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या रस्त्यावर अवलंबून असलेल्या जनतेसाठी हा रस्ता जीवनरेषेसारखा आहे. त्यामुळे या मार्गाचे काम रखडणे म्हणजे जनतेच्या जीवनावश्यक सुविधांवरच घाला आहे.
बन्सीलाल पाटील यांनी आपल्या निवेदनात पुढे स्पष्ट केले आहे की, जर संबंधित विभागाने तत्काळ ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले नाही, तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यांनी ठाम इशारा दिला आहे की, अशा परिस्थितीत लावण्यात आलेल्या मोठ्या घोषणाफलकांवर काळे फासण्याचा तीव्र आंदोलनात्मक निर्णय घेण्यात येईल. आणि अशा प्रकारच्या जनक्षोभातून उद्भवणाऱ्या परिणामांसाठी संपूर्ण जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील.
या निवेदनाच्या माध्यमातून बन्सीलाल पाटील यांनी प्रशासन आणि राजकीय जबाबदार पदाधिकाऱ्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की, विकासकामांमध्ये गती नसल्यास आणि जनतेच्या तक्रारी वेळेवर न सोडवल्यास सामाजिक असंतोषाला आळा घालता येणार नाही. त्यांनी संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून, याबाबत विभागाने ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या विषयावर स्थानिकांनी विविध माध्यमांतून आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत प्रशासनाची झोप मोडण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी याविरोधात एकत्र येऊन पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात मोर्चा काढण्याचेही नियोजन सुरू केले आहे.
या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, वाढत्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर लवकरच उपाययोजना केल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाचोरा तालुक्यातील विकासकामांच्या संदर्भात गेल्या काही काळात वारंवार अशा तक्रारी समोर येत आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांबाबत अनेक गावांमध्ये कामे रखडलेली आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि शासन यंत्रणेला या तक्रारी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे अधोरेखित होते की, केवळ निवडणुकीपूर्वी घोषणा करून विकासाचे फलक लावणे म्हणजे विकास नाही, तर प्रत्यक्षात वेळेत व गुणवत्तापूर्ण काम करून जनतेचा विश्वास जपणे हेच खरे लोकशाहीतील कार्य आहे.
बन्सीलाल रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी काळात रस्त्याचे काम पुन्हा सुरू होईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे – “खड्डे बुजणार कधी?” आणि “विकासाचे बोर्ड किती दिवस खांबावर लटकणार?
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटावा, आणि विकासाच्या घोषणांचा जमिनीवर उतरणारा ठोस प्रत्यय यावा – हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

वात्सल्याची निःस्वार्थ सावली : डॉ. अपर्णा देशमुख यांचे कार्य म्हणजे पाचोऱ्याचा अभिमान – संदीप महाजन

0

Loading

जगातील सर्वात मोठा सन्मान म्हणजे न बोलता दिलेली मदत, आणि सर्वात मोठी मान्यता म्हणजे एखाद्याच्या जीवनात निःस्वार्थपणे मायेची सावली निर्माण करणं. आज जेव्हा पुरस्कार हे बाजारू आणि देखाव्याचं साधन बनत चाललं आहे, तेव्हा काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या कार्यातून पुरस्कारालाही प्रतिष्ठा देतात. पाचोरा शहराची कन्या, श्री गो.से.हायस्कूलची माजी विद्यार्थिनी, आणि पुणे नगरीत गेली १५ वर्षे निराधार, गोरगरीब, आजारी वृद्धांना मायेचं आश्रय देणाऱ्या उच्च शिक्षीत डॉ.अपर्णा अनिल देशमुख (एम एस सर्जरी पुणे) आभाळमाया वृध्दाश्रम पुणे यांना नुकताच राज्यस्तरीय गिरजाई सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला – आणि तो एकट्या अपर्णाचा गौरव नाही, तर संपूर्ण पाचोऱ्याच्या संस्कारांची आणि समाजाभिमुखतेची साक्ष आहे. सध्या पुण्यात सिंहगड रोड परिसरात स्थायिक असलेल्या डॉ. अपर्णा या ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ८१ ज्येष्ठ नागरिकांना मायेचं घर, उपचारांची सुविधा, स्नेहसंवाद आणि जीवनसंधान देत आहेत. केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवणं हा त्यांचा हेतू नाही – तर त्यापलीकडे जाऊन या उपेक्षित व्यक्तींना पुन्हा एकदा माणूस म्हणून समाजात जागा मिळवून देणं हे त्यांच्या कार्याचं केंद्रबिंदू आहे. या सेवाव्रती वाटचालीच्या मुळाशी आहे – त्यांचे वडील डॉ. अनिलदादा देशमुख यांचा प्रेरणादायी आदर्श, ज्यांनी पाचोऱ्यात सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) म्हणून प्रामाणिक सेवा दिली. त्यांच्या कुटुंबाचा माझा संबंध आमचे स्व. काका, माजी पशुवैद्यकीय उपसंचालक डॉ. जे. एल. महाजन यांच्या माध्यमातून अनेक वर्षांचा राहिला आहे. मी स्वतः श्री गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक असताना डॉ. अपर्णा या विद्यार्थिनी होत्या. परंतु आमच्यातील खरी जिव्हाळ्याची ओळख आणि बंध जुळला तो त्यांच्या लहान बहिणी अनघा देशमुख यांच्यामुळे – जी अत्यंत अष्टपैलू, गुणवान आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व आहे. या दोघी भगिनींमुळे आयुष्यात केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर कौटुंबिक स्तरावरही एक नातं तयार झालं – जे आजही स्मरणात राहिलं आहे. रोटरीसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये डॉ. अनिलदादांशी सातत्याने संपर्कात येत असतानाच त्यांच्या मुलींच्या प्रगल्भतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय वारंवार यायचा. आज जेव्हा डॉ. अपर्णा यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आलं, तेव्हा ते केवळ एका व्यक्तीचं यश राहिलं नाही. तो गौरव झाला – एका शाळेचा, एका शिक्षकाचा, एका कुटुंबाच्या संस्कारांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पाचोरा शहराच्या माणुसकीच्या इतिहासाचा. या पुरस्काराची गंमत म्हणजे, हे यश त्यांच्या मागे दौडणाऱ्या प्रसिद्धीच्या झगमगाटाने मिळालेलं नाही. हे यश मिळालं आहे शांत, संयमी, सेवाभावित, सतत झिजणाऱ्या हातांनी. आजच्या स्पर्धात्मक जगात कुणीतरी आपल्या वैद्यकीय पदवीच्या व्यावसायिक संधी नाकारून, शहरात राहून, थेट निराधार, उपेक्षित वृद्धांच्या सेवेसाठी स्वतःचं आयुष्य वाहतं करतो, हीच बाब मुळात थक्क करणारी आहे. त्यांचा ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ म्हणजे केवळ एक सेवा संस्था नाही – ती एक भावना आहे, एक आदर्श आहे आणि माणुसकीच्या पुनरुज्जीवनाचं ठिकाण आहे. या वृद्धाश्रमात राहत असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात जी शांती, ज्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे – ते कुठल्याही ट्रॉफीपेक्षा मोठं आहे. आज अनेक संस्था पुरस्कार विकतात. प्रतिष्ठेच्या नावाखाली बनावट कार्यक्रम रंगवतात. आणि असे पुरस्कार घेणारे मोठ्या अभिमानाने आपल्या केबिनमध्ये टेबलावर सदरचे पुरस्कार ठेवतात. विशेष बाब म्हणजे या पुरस्कारावर जे नाव असते त्यांचे शिक्षण आपल्या स्वतःच्या गेटवर उभे राहणाऱ्या वॉचमनच्या लायकी एवढेही नसताना अशा व्यक्तीच्या नाव त्या पुरस्कारावर असते आणि ही उच्च पदवीधर उच्च पदावर असलेली राजपत्रित अधिकारी मोठ्या अभिमानाने सदरचा पुरस्कार लोकांच्या देखाव्यासाठी ठेवतात. परंतु डॉ. अपर्णा यांचा सन्मान म्हणजे त्या सगळ्या बनावटपणाला फाटा देणारी तेजस्वी ज्योत आहे. त्यांच्या सन्मानामुळे समाजात एक महत्त्वाचा संदेश पोहोचतो – की अजूनही आपल्यात अशी माणसं आहेत, जी स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगतात. हा सन्मान म्हणजे त्या शिक्षकासाठीही सन्मान आहे, ज्यांनी कधीतरी त्या विद्यार्थिनीला संस्कार दिले. तो पालकांसाठीही अभिमानाचा क्षण आहे, ज्यांनी मुलींना मोकळं आकाश दिलं. आणि तो संपूर्ण पाचोऱ्यासाठीही गौरवाची बाब आहे, कारण डॉ. अपर्णा देशमुख या केवळ पुण्यात कार्यरत नाहीत – त्या पाचोऱ्यातून आलेल्या माणुसकीच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहेत. अशा सेवाव्रती कार्यासाठी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सन्मानाच्या संकल्पनेचा पुनर्जन्म आहे. आणि म्हणूनच हे यश केवळ “कुणाला पुरस्कार मिळाला?” एवढ्या पातळीवर न पाहता, “कसा मिळाला, कशासाठी मिळाला, आणि त्यातून आपण काय शिकतो” या दृष्टिकोनातून समजून घेणं आवश्यक आहे. या निमित्ताने आपण सगळ्यांनी समाजासाठी निःस्वार्थ काही देण्याचं व्रत घेतलं पाहिजे. कारण, ज्या व्यक्ती स्वतःसाठी काहीही मागत नाही, पण इतरांसाठी सर्वस्व देते, तीच खरी ‘सेवाव्रती’. आणि डॉ. अपर्णा देशमुख यांचं कार्य हीच त्याची सजीव उदाहरण आहे – प्रेरणादायी, सात्त्विक आणि माणुसकीचा सर्वोच्च उत्कर्ष गाठणारी वात्सल्याची सावली
आणि डॉ. अपर्णा देशमुख यांचं कार्य हीच त्याची सजीव उदाहरण आहे – प्रेरणादायी, सात्त्विक आणि माणुसकीचा सर्वोच्च उत्कर्ष गाठणारी वात्सल्याची सावली. कारण, सेवा ही केवळ देहाने नाही तर मनाने, बुद्धीने, आणि आत्म्याच्या गाभ्यापासून केली गेली पाहिजे. ती संख्येने नाही, तर संवेदनशीलतेने मोजली पाहिजे. पुरस्कारांनी आलेली प्रतिष्ठा ही क्षणभंगुर असते, पण कार्यातून मिळालेली लोकमनातील जागा ही शाश्वत असते. आणि ती जागा डॉ. अपर्णा यांनी ज्या निष्ठेने मिळवली आहे, ती कुठल्याही महालात नव्हे – तर वृद्धांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानात आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा उमललेल्या आशेच्या क्षणांत आहे. म्हणुन जग प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली व सुनंदन जी लेले जगप्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर यांच्या सारख्या मान्यवरांची डॉ.अपर्णा अनिल देशमुख (एम एस सर्जरी पुणे) यांच्या आभाळमाया वृध्दाश्रम पुणे येथे भेट हाच सर्वाच मोठा पुरस्कार आहे
आजची पिढी जर या कार्याकडे एक आरशासारखं पाहील, तर समाजाचा चेहरा नक्कीच अधिक प्रकाशमान होईल. म्हणूनच, अशा व्यक्तींच्या सन्मानाला केवळ बातमी म्हणून न मोजता, तो एक संस्कृतीचा प्रकाशस्तंभ म्हणून पाहणं – हीच खरी कृतज्ञतेची भावना ठरेल. आणि ही भावना समाजमनात रुजली, तर प्रत्येक गावात एक ‘आभाळमाया’ उगम पावेल – आणि हीच आपल्या महाराष्ट्राच्या मातीची खरी ओळख ठरेल.                                                                    .Sandip D Mahajan M.A. (Politics), B.Ed. (Marathi & History)
Dhyeya News & झुंज वृत्तपत्र  संपादक..
M0. 7588645907 /73 8510 8510 /94222 75807/

“बापाच्या घामाची किंमत कळणारा मुलगा – एका साध्या ड्रायव्हिंग स्कूल मालकाचे असामान्य संस्कार”

0

Loading

पाचोरा – हल्लीच्या यांत्रिक आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत, अनेकदा आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जिथे मुलं वडिलांच्या कमाईला हक्क समजतात आणि त्यांच्या कष्टांमागील किंमत जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. मात्र, या आधुनिक जगात आजही काही अशी कुटुंबं आहेत, जिथे संस्कार, कष्टाची जाणीव आणि जबाबदारी या मूल्यांचा प्रकाश झळाळत आहे. याचं एक प्रत्ययकारी उदाहरण नुकतेच एका साध्या, परंतु मनाने मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाबाबत पाहायला मिळाले.काल, एका अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या छ शिवाजी नगर भागातील रहिवासी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक अनिल नागणे यांच्याशी भेट झाली. पहिल्या भेटीतच त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिक हसू, कामाप्रती असणारी निष्ठा आणि जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेले कष्ट नजरेत भरले. त्यांचं काम हे व्यवसाय म्हणून असलं तरी, तो त्यांच्यासाठी पोटाची खळगी भरण्याचा एकमेव साधन होता. हे पाहून लक्षात आलं की, हा माणूस नावाने व्यवसायिक असला तरी मनाने एक संघर्षशील पिता, ज्या वडिलांनी आपल्या लेकरांसाठी स्वप्न उराशी बाळगली आहेत.चहाच्या कपासोबत सुरू झालेली सौम्य चर्चा हळूहळू खोलवर जाऊ लागली. आपली दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी बी.टेक आणि NEET ची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. बोलता बोलता ते म्हणाले, “मी स्वतःच्या हाताने गिअर बदलत कार शिकवतो, पण माझी मुलं याच गिअरवर चढून पुढे जावीत म्हणून प्रयत्न करतो.” त्या वाक्यातील अभिमान आणि आशेचा सूर अजूनही मनात घुमतोय.
तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांच्या मोठ्या मुलाचा फोन होता. काही साधी चौकशी केल्यानंतर वडिलांनी विचारले, “काय करतोयस बेटा?” त्यावर मुलाने उत्तर दिलं, “पप्पा, आज रविवार आहे म्हणून मी रूमवरच आहे. माझे सगळे मित्र थिएटरला चित्रपट पाहायला गेलेत.” यावर वडिलांनी हसत विचारलं, “मग तू का नाही गेलास?” मुलाचं उत्तर ऐकून क्षणभर गप्प झालो…
“पप्पा, त्या सिनेमा थिएटरचं तिकीट साडेतीनशे रुपये होतं. मला वाटलं, त्या पैशात दोन दिवसाचं जेवण निघेल, म्हणून मी रूमवरच राहिलो.”
हे उत्तर केवळ संवाद नव्हता, तो एक जीवनमूल्यांचा आरसा होता. अशा काळात जिथे वडिलांच्या घामातून आलेल्या पैशाचा मुलं बेधडक उधळपट्टीसाठी उपयोग करतात, बाईकचे सायलेन्सर फोडतात, ब्रँडेड शूज-टीशर्ट घालतात, त्याच जगात हा मुलगा साडे तिनशे रुपयांची किंमत पोटभर जेवणाशी करतो, हे नुसतं ऐकूनही अंगावर काटा आला.
त्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते सांगत होते, “मी आयुष्यभर शिकू शकलो नाही, पण माझी मुलं शिकून आपल्याच बापाचं आयुष्य बदलणार, एवढंच स्वप्न आहे.” ते शब्द मनात घुसले. आजही काही बाप आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचा संसार दुसऱ्या क्रमांकावर टाकतात, स्वतःच्या हौशी मागे ठेवून, लेकरांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार करतात.
मुलगा सध्या बी.टेक करत असून त्याने आपल्या वडिलांच्या कष्टांची जाणीव मनात घट्ट रोवली आहे. त्याचं हे वागणं कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. अशा उदाहरणांमधून समाजाला शिकायला हवं की, मोठं होण्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि कृतज्ञता ही खरी उंची ठरते.
आज समाजात अनेक पालक मुलांच्या मागे वाकून जात आहेत, त्यांना महागड्या मोबाईल्स, कपडे, गाड्या पुरवताना स्वतःच्या पायाखालची जमीन गमावून बसत आहेत. त्यात काही मुलं वडिलांचा अपमान करतात, त्यांचं शिक्षण संपवूनही त्यांना ‘अनपढ’ समजतात. पण इथे एका तरुणाने बापाच्या प्रत्येक रुपयाची किंमत ओळखून, एक आदर्श उदाहरण सादर केलं.
या प्रसंगातून हेही स्पष्ट होतं की, मूल्यं ही केवळ पुस्तकांत नसतात, ती घरातल्या रोजच्या वर्तनातून शिकवावी लागतात. त्या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाने आपल्या मुलांना शिकवलं नाही की “तू किती खर्च कर,” तर शिकवलं – “पैसा कसा वाचव.”
आज आपल्याला अशा पालकांचं आणि अशा मुलांचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे आदर्श प्रसंग समाजासमोर यायला हवेत, जेणेकरून इतर मुलांना, पालकांना प्रेरणा मिळेल.
हा अनुभव कोणत्याही ‘ब्रेकिंग न्यूज’पेक्षा मोठा होता, कारण यात संस्कार, प्रामाणिकपणा, कष्ट, आणि कुटुंबातील प्रेमाचं मूर्तिमंत दर्शन झालं. या छोट्याशा संवादातून एक मोठा संदेश साऱ्यांना मिळतो – की गरिबी म्हणजे मागे पडणं नव्हे, तर वडिलांच्या कष्टांचा आदर न करणं हे खऱ्या अर्थाने दिवाळखोरी आहे.
दोन माणसांचा हा संवाद माझ्या मनात कोरला गेला आहे. एक साधा ड्रायव्हिंग स्कूल मालक आणि त्याचा जबाबदार मुलगा… पण या दोघांच्या छोट्याशा संवादाने समाजात बदल घडवण्याची क्षमता आहे. त्या बापालाही सलाम आणि त्या मुलालाही – ज्याने बापाच्या घामाची किंमत ओळखली.

कश्मीर में हुए आतंकी हमले पर तीव्र प्रतिक्रिया : धर्म की आड़ में देश को तोड़ने की साजिश, लेकिन अब फैसला जनता को लेना होगा!

1

Loading

हाल ही में कश्मीर घाटी में पर्यटकों पर हुआ आतंकी हमला न केवल एक कायराना कृत्य था, बल्कि भारत की अखंडता पर किया गया सुनियोजित प्रहार था। देश के विभिन्न राज्यों से आए निर्दोष पर्यटक, जो घूमने गए थे, उन पर अंधाधुंध गोलियां बरसाकर आतंकवादियों ने मानवता को शर्मसार कर दिया। इस घटना के बाद देशभर में केवल दुख और निंदा नहीं, बल्कि तीव्र और उग्र प्रतिक्रियाएं देखने को मिलीं। सोशल मीडिया पर एक विशेष वाक्य आग की तरह फैल गया – “हमलावरों ने पहले धर्म पूछा, फिर गोलियां चलाईं।” यह वाक्य जितना चौंकाने वाला है, उतना ही सुनियोजित भी लगता है। यही वह वाक्य है जो आतंकवादियों और उनके प्रचारकों की मानसिक रणनीति को उजागर करता है – भारत में हिन्दू-मुस्लिम दंगों की चिंगारी भड़काने की साजिश।देश के कुछ कथित राष्ट्रभक्तों ने इस घटना का इस्तेमाल सीधे-सीधे पूरे मुस्लिम समाज को निशाना बनाने के लिए किया। सोशल मीडिया पर जहां सरकार और सुरक्षा पर सवाल उठाए जाने चाहिए थे, वहां “अगर AK-47 मिल जाए तो मुसलमानों को खत्म कर देंगे”, “इनकी दुकानों का बहिष्कार करो”, “इस धर्म के लोग ही देशद्रोही हैं” जैसी जहरीली भाषा का बोलबाला रहा। यह केवल भावनाओं का विस्फोट नहीं, बल्कि एक सोची-समझी रणनीति है, जो ठीक उसी तरह काम कर रही है जैसे आतंकवादी चाहते हैं।
हमलावरों ने धर्म पूछा या नहीं, इसकी कोई आधिकारिक पुष्टि अब तक नहीं हुई है, लेकिन यह अफवाह लोगों के मन में ज़हर बनकर घुल गई है। और यही इन हमलों का असली मकसद है – भारत की सामाजिक एकता को भीतर से तोड़ना। आतंकवादियों को मालूम है कि एक गोली से 5 लोग मरेंगे, लेकिन एक अफवाह से 50 करोड़ दिलों में नफरत भर दी जा सकती है।और दुर्भाग्य की बात है कि, आजकल खुद को राष्ट्रभक्त कहने वाले ही इस ज़हर को सोशल मीडिया पर सबसे ज्यादा फैलाते हैं। उन्हें लगता है कि देशप्रेम का मतलब किसी एक धर्म को गाली देना है। लेकिन सच्चाई ये है – आतंकवाद का कोई धर्म नहीं होता। उनकी जात, धर्म, वंश, पंथ सब ढके रहते हैं, क्योंकि उनका मकसद धर्म की रक्षा नहीं, बल्कि केवल और केवल विनाश होता है। उनकी पहचान सिर्फ एक होती है – आतंकी। और विडंबना ये है कि उनके हमलों में कई बार उन्हीं के धर्म के लोग मारे जाते हैं – लेकिन उस पर कोई बात नहीं करता।
आज सोशल मीडिया एक ऐसा हथियार बन गया है, जो बम और गोली से भी खतरनाक साबित हो रहा है। किसी भी हमले के बाद घटना की गंभीरता से ज़्यादा चर्चा होती है – पीड़ित का धर्म क्या था। और यही भारत को तोड़ने वाला सबसे घातक हथियार है – अंदर से सड़ांध पैदा करने वाला। सोशल मीडिया पर देशभक्ति की लहरें उठती हैं, लेकिन वही लोग चाइना की सस्ती चीजों के लिए कतार में खड़े दिखते हैं और फिर अगले दिन पाकिस्तान और भारत के मुस्लिमों के खिलाफ पोस्ट करते हैं।
आज चाइना की भूमिका पर कोई सवाल नहीं उठाता, जबकि सीमाओं पर हो रही घुसपैठ, आतंकियों को मिल रही तकनीकी सहायता, हथियारों की तस्करी और ड्रग्स नेटवर्क में चाइना की संदिग्ध भागीदारी को पूरी तरह नजरअंदाज किया जा रहा है। क्योंकि हमारे बाज़ार और उपभोग की मानसिकता उसी चाइना की चीज़ों पर टिकी है। ऐसे में उनके खिलाफ आवाज़ उठाना अपने ही आराम को चुनौती देना हो जाता है।
अब सवाल सरकार और सुरक्षा एजेंसियों पर भी है – क्या केवल “शोक व्यक्त करना” ही पर्याप्त है? यह समय है साहसी निर्णयों का, कठोर कदमों का और गुप्तचर तंत्र की विफलताओं को खुलकर स्वीकार करने का। आज भारत में हजारों करोड़ रुपये खुफिया तंत्र पर खर्च हो रहे हैं, फिर भी हमलावर अगर धर्म पूछकर गोलियां चला सकते हैं, तो यह हमारी आंतरिक सुरक्षा के लिए शर्म की बात है। सिर्फ गोली चलाकर आतंकवाद का खात्मा नहीं होगा, बल्कि उसके विचारों, उसकी अफवाहों, और उसके ज़हरीले अजेंडे को जड़ से मिटाना होगा – और यह काम जनता ही कर सकती है। अब फैसला हमें लेना है – क्या हम आतंकवादियों की मानसिक साजिश के मोहरे बनेंगे, या विवेक, इंसानियत और एकता के रास्ते पर चलकर देश को अंदर से मजबूत करेंगे?
आतंकी केवल बारूद से नहीं बनते, वे हमारे समाज में फैले धर्मद्वेष से जन्म लेते हैं। जब हम कहते हैं “यह मुसलमान है”, तब हम अनजाने में आतंकवादियों को वैचारिक बल दे रहे होते हैं। आतंकवाद को हराना है तो केवल गोलियों से नहीं, बल्कि दिल और दिमाग जोड़ने से होगा। देश को आज ज़रूरत है – निर्भीक नागरिकों की, निष्पक्ष नेतृत्व की, और मानवता की सच्ची भावना रखने वाले समाज की।आतंकवादियों का कोई धर्म नहीं होता – उनकी पहचान सिर्फ अमानवीयता होती है। अगर ये बात हर भारतीय के दिल में बैठ गई, तो कोई भी आतंकी संगठन भारत को हिला नहीं सकता। गोली की दिशा आतंकियों की ओर होनी चाहिए, लेकिन सोशल मीडिया की ज़ुबान देश के खिलाफ न चले – यही असली देशसेवा है, और यही असली लड़ाई।

‘नीलम मिसळ’चा थंड पाण्याचा माणुसकीचा घोट : कै. दिलीप मराठे यांचे सामाजिक भान आजही कायम

0

Loading

पाचोरा – शहर हे केवळ व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक चळवळींसाठी ओळखले जात नाही, तर येथील काही नावे अशी आहेत, ज्यांनी आपली सेवा, आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून समाजाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते – पाचोरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. दिलीप मराठे. & कैलासशेठ मराठे यांनी सार्वजनिक जीवनात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत स्व. दिलीपशेठ यांनी अनेक वर्षे राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा राजकीय प्रवास जितका ठाम आणि स्पष्ट होता, तितकीच त्यांची वैयक्तिक व पारिवारिक परंपरा देखील समाजाभिमुख होती. आज त्यांचे पुतणे आणि कुटुंबीय त्यांची ही परंपरा ‘नीलम हॉटेल’च्या माध्यमातून जपताना दिसून येतात.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात वसलेले ‘नीलम हॉटेल’ हे केवळ एक खाद्यगृह नसून पाचोऱ्याच्या खाद्यसंस्कृतीचे अविभाज्य अंग बनले आहे. या ठिकाणी मिळणारी मिसळ, रस्सावडा, गरमागरम भजी, कुरकुरीत कचोरी आणि विविध नाश्त्यांचे पदार्थ यांची चव इतकी खास असते की एकदा चाखले की पुन्हा पुन्हा या हॉटेलला भेट द्यावीशी वाटते. ग्राहक वर्गाचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, खवय्यांसाठी हे निलम हॉटेल म्हणजे एक खाद्ययात्रेचे प्रमुख स्थान झाले आहे. मात्र, या सर्व व्यवसायिक यशाच्या पलीकडे एक मोठी सामाजिक जाणीवदेखील दिसून येते — आणि ती म्हणजे ग्राहकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी थंड पाण्याची मोफत उपलब्धता.
सध्या उन्हाच्या झळा अंगाची लाहीलाही करतात. तापमान प्रचंड वाढल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. मात्र अनेक भागात सार्वजनिक पाणपोया बंद अवस्थेत आहेत. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे किंवा देखभाल अभावी त्या ‘दृष्टीआड आणि शिळोप्याच्या’ विषय बनलेल्या आहेत. या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मराठे कुटुंबीयांनी एक आदर्श निर्माण केला आहे. ‘नीलम हॉटेल’मध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या टेबलवर स्वतंत्र थंड पाण्याचा जार ठेवण्यात आलेला आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीस पाणी विचारण्याची किंवा वेटरची वाट पाहण्याची गरज राहत नाही. विशेष म्हणजे हेच पाणी नुसते ग्राहकांपुरतेच मर्यादित न ठेवता, हॉटेल बाहेरून येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी सुद्धा खुले ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पाचोऱ्यातील एक अत्यंत गजबजलेला भाग आहे. दुपारच्या वेळेस येथे रस्त्यावरून चालणाऱ्यांची संख्या मोठी असते. या गर्दीच्या वेळी कित्येक वेळा नागरिकांना तहान लागते, परंतु आसपास पाण्याची उपलब्धता नसते. हे ओळखून ‘नीलम हॉटेल’च्या प्रवेशद्वारावर थंड पाण्याचा मोठा जार ठेवण्यात आला असून ‘पिण्याचे पाणी’ अशी स्पष्ट सूचना लावण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही भेद न ठेवता, कोणतेही आर्थिक शुल्क न घेता पाण्याचा थंड घोट घेण्यासाठी अनेक जण येथे थांबतात. हे दृश्य म्हणजे केवळ सेवा नाही, तर माणुसकीचा खरा अर्थ काय असतो याचे सजीव उदाहरण आहे.
हॉटेल चालवताना व्यवसायिक दृष्टीकोन ही आवश्यक बाब असतेच, पण या व्यवसायात माणुसकी आणि सामाजिक भान जपणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. मराठे परीवारातील सदस्य विक्की हेच तत्व पाळत ग्राहकांसोबत नागरिकांच्या गरजांचीही काळजी घेतात. या निर्णयामागील प्रेरणा विचारली असता, त्यांनी सांगितले की, “पाण्याची तहान ही सर्वात मूलभूत गरज आहे. उन्हातान्हात एखाद्याला एखादा घोट थंड पाणी मिळालं, तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. आम्ही हे कर्तव्य म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून करत आहोत. आणि हीच आमच्या कुटूंबियांची शिकवण आहे”
आजच्या काळात अनेकदा आपल्या सोयीसाठी, आपल्या व्यवसायासाठी लोक समाजाचे भले विसरतात. पण पाचोऱ्यात ‘नीलम हॉटेल’ ही एक अशी जागा आहे जिथे माणुसकी अजूनही जिवंत आहे. अलीकडच्या काळात अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पाण्याची विक्री केली जाते, पाण्याच्या बाटल्यांवर जादा पैसे घेतले जातात. मात्र इथे पाणी केवळ एक सेवा म्हणून नव्हे, तर मानवतेचा धर्म म्हणून मोफत पुरवले जात आहे.
या उपक्रमाबाबत पाचोऱ्याचे स्थानिक नागरिकही विशेष कौतुक करत आहेत. “ह्या दिवसांत तहान लागली तरी रस्त्यात थांबून पाणी मिळणं कठीण झालं आहे. पण नीलम हॉटेलसमोर गेलं की थांबून पाणी प्यायला मिळतं. तेही थंड! आणि कुणी काही विचारत नाही. खूप समाधान वाटतं,” असे अनेकांनी सांगितले. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर हे कार्य ‘नित्य सेवा’ म्हणून गौरवले आहे.हॉटेलमध्ये दररोज शेकडो ग्राहक नाश्त्याकरिता येतात. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा हॉटेल व्यवसाय सुरु असतो. मिसळ व रस्सावडा हे इथले मुख्य आकर्षण असून त्यांच्या जोडीला कधी कचोरी, कांदाभजी, बटाटावडा अशा पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. परंतु ही खाद्यसेवा जशी महत्त्वाची आहे, तशीच ही ‘पाण्याची सेवा’ आता हॉटेलच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे.सध्याच्या काळात समाजात पाचोरा शहरात बोगस पत्रकार, त्यांच्यासोबत एका पत्रीकेवर न बोलता जाणारे विशेष म्हणजे मटणाचे जेवण असले तर तब्बल एक दिवस आधी उपाशी राहणारे पोटभरू रिकामटेकडे त्यांच्या हॉटेलवर तासंतास बसून राहतात ग्राहकांना त्रास देताना दिसतात. त्यांच्यासारख्या पोटभरुंना डावलून ‘नीलम हॉटेल’मध्ये मात्र जबाबदारीने आणि शांततेने हे कार्य सुरू आहे. ही जबाबदारी केवळ व्यवसायपुरती नाही, तर एक व्यापक सामाजिक बांधिलकी आहे. अनेक ठिकाणी ‘CSR’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत अशा सेवा दाखवण्याचा प्रयत्न होतो, पण इथे कोणताही गवगवा न करता ही जबाबदारी वर्षानुवर्षे निभावली जात आहे.
‘नीलम हॉटेल’ आणि मराठे कुटुंबीयांनी आज केवळ आपल्या हॉटेलचे नाव नाही, तर आपल्या परिवाराच्या मूल्यांचा वारसा आणि पाचोऱ्याच्या सामाजिक चेहऱ्याची उजळणी केली आहे. त्यांच्या या सेवाकार्याची नोंद स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि इतर व्यापाऱ्यांनी सुद्धा घेण्याची गरज आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून हे उदाहरण इतरांना सुद्धा प्रेरणा देणारे ठरावे.
शेवटी एवढेच म्हणता येईल की, उन्हाच्या झळा असोत किंवा समाजाच्या उदासीनतेची सावली, ‘नीलम हॉटेल’मधील पाण्याचा एक थंड घोट आणि मिसळचा एक गरम घास अनेकांच्या मनात एकच विचार जागवतो — “माणुसकी अजूनही जिवंत आहे!”

पाचोऱ्यात वाढणाऱ्या असंतुष्ट प्रवृत्तींचा अघोरी खेळ : सामाजिक सौहार्दतेला लागलेली वावटळ

0

Loading

पाचोऱ्याची ओळख एकेकाळी सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक समृद्धीने नटलेली होती. परंतु गेल्या काही वर्षांत या शहरात एक विचित्र पण लक्षणीय मानसिकता बळावत चालली आहे – ती म्हणजे दुसऱ्यांच्या वादविवादात नाहक उडी घेऊन तो वाद उगाचच पेटवत ठेवण्याची आणि त्यातून विकृत आनंद मिळवण्याची. काही विशिष्ट असंतुष्ट प्रवृत्तीची मंडळी अशा प्रकारच्या वागणुकीचा सातत्याने अवलंब करत असून, सामाजिक शांतता आणि सौहार्द याला मोठे नुकसान पोहोचवत आहेत.
या प्रकारच्या प्रवृत्तींविषयी माझा वैयक्तिक अनुभवही काहीसा कडवट आहे. समाजात कार्यरत असताना अनेक वेळा मतभेद होणे स्वाभाविक आहे, पण हे मतभेद जेव्हा ठरवून भडकवले जातात, तेव्हा त्याचा सामाजिक परिणाम खूप गंभीर होतो. माझा आणि अनिल महाजन यांच्यात झालेला मतभेद असो किंवा स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याशी झालेला शाब्दिक वादविवाद, या प्रत्येक प्रसंगात अशा विकृत प्रवृत्तींचा हस्तक्षेप प्रकर्षाने जाणवला.
हे लोक कोणत्याही मतभेदात तटस्थ राहण्याऐवजी त्यात जाणीवपूर्वक हवा घालतात. जणू काही त्यांचा उद्देशच तो वाद अधिकाधिक खोलवर नेण्याचा असतो. कोणाच्याही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक वादात स्वतःला मध्ये घालून, माहितीचे अर्धवट किंवा चुकीचे रूपांतर करून, दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या गोष्टी सांगणे – हे त्यांच्या ‘सामाजिक डावपेचाचे’ मूळ स्वरूप आहे. त्यांच्या दृष्टिकोनात समाधान मिळवण्याचा मार्ग हा दुसऱ्यांच्या भावनिक, सामाजिक किंवा राजकीय अस्थैर्यातूनच जातो, हेच दुर्दैव.
या असंतुष्ट प्रवृत्तींची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे – या लोकांकडे स्वतःचे कोणतेही सर्जनशील योगदान नाही. ना कोणती सामाजिक बांधिलकी, ना कोणते विधायक कार्य. मात्र दुसऱ्यांच्या यशस्वी उपक्रमांवर आपले नाव चिकटवणे, खोट्या श्रेयगाथा तयार करणे, आणि अशा मार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची त्यांची पद्धत आहे. कार्यक्रम कोणाचा असो, यामध्ये सहभागी होऊन त्याच्या यशात आपली पताका फडकवण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांची ‘ओळख’ बनली आहे.
नुकत्याच एका वृत्तपत्र वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तर नेत्याचे भाषण सुरू असताना, मुद्दाम टिंगलटवाळी करणे, स्टेजवर बसायची लायकी नसल्याने खाली बसून अधुन – मधून कधी काही बोलायची गरज नसताना मुद्दाम बडबड करून उपस्थितांचे व नेत्याचे लक्ष विचलित करणे, हा या लोकांच्या ‘खास अभिनयाचा’ भाग होता. हे वर्तन म्हणजे केवळ अशिष्टपणाच नव्हे तर समाजाच्या गंभीर प्रसंगातील एकप्रकारचा अवमानच म्हणावा लागेल.
त्यांचे रोजचे व्यवहार एखाद्या दुर्दशाग्रस्त ‘रणनीती’सारखे असतात. कोणाचा काटा काढायचा? कोणती मैत्री बिघडवायची? कोणाच्या मनात कोणाबद्दल गैरसमज निर्माण करायचे? या प्रश्नांच्या उत्तरातूनच त्यांच्या ‘व्यवसायिक’ दैनंदिनतेचा आरंभ होतो. यातूनच ते स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहतात.
या साऱ्या सृष्टीत एक विशेष बाब प्रकर्षाने जाणवते – या लोकांना हे फार छान माहीत असतं की “सत्य घरात बसून सिद्ध होतं, तोपर्यंत असत्य गावभर हिंडून आलेलं असतं.” आणि म्हणूनच हे लोक सतत अशा खोट्या गोष्टी पसरवतात. स्पष्टच बोलायचं झालं, तर “पतिव्रता स्त्री आपलं पावित्र्य शांतपणे घरात बसून सिद्ध करत असते, पण त्या दरम्यान छिनाल गावभर हिंडून आपल्या विकृतीचा डंका पिटत असते.” हीच त्यांच्या मानसिकतेची झलक आहे – की शांतपणे सत्य बोलणाऱ्याला कोणी ऐकत नाही, पण खोटं रंगवून ओरडणारा लगेच लोकांचे लक्ष वेधतो.
अशा प्रवृत्तींमुळे पाचोऱ्यासारख्या सामाजिक समजूतदारपणाच्या शहरात गैरसमज, वाद, आणि मानसिक अशांतता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. विशेषतः जे लोक स्वतः वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत, त्यांनाही या अफवांचा, खोट्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. हे म्हणजे तुमच्या घरात दिवा लावून कोणी तरी बाहेरून विझवून जातो आणि त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो, अशी गत. अर्थात अखेर स्पष्टच बोलायचे झाले तर यांना स्वतःच्या प्रयत्नांनी पोरग जन्माला घालता येत नाही दुसऱ्याच्या नावाने कंडोम लावायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा गावभर सांगायचे मी केलं अशाच प्रवृत्ती पाचोऱ्यात जास्त फोफावत आहे
हे लोक दोन्ही गोटात वेगवेगळ्या भूमिका साकारतात. एका बाजूला सहानुभूती दाखवतात, दुसऱ्या बाजूला चुगल्या करतात. एका मित्रसमूहात चहा घेतात आणि दुसऱ्या गटात नावे ठेवतात. कोणतेही नाते हे प्रामाणिकतेवर आणि विश्वासावर टिकलेले असते. पण अशा प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांमुळे मैत्री, स्नेह, सहकार्य या सगळ्या संकल्पना निरर्थक वाटू लागतात.
यांचा विकृत आनंद मिळवण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या वादातून हशा पिकवणे. सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली ढोंग करणे. दुसऱ्याच्या नावाने कामे सुरू करून त्याचे श्रेय स्वतःकडे वळवणे. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे – स्वतः काही निर्माण न करता दुसऱ्यांच्या नावाने ‘कंडोम’ लावून स्वतःच्या समाधानासाठी तो उपक्रम सार्वजनिक करणे. ही विचारांची अधःपात झालेली अवस्था आहे.
या साऱ्या प्रकारांमुळे जे खरे कार्यकर्ते, सामाजिक जाण असलेले व्यक्ती आहेत – त्यांची दिशाभूल होते. खऱ्या कार्याची किंमत कमी होते आणि खोट्यांच्या जाहिरातींना प्रसिद्धी मिळते. म्हणूनच अशा लोकांना समाजात गांभीर्याने न घेता, त्यांच्यापासून मानसिक आणि सामाजिक अंतर राखणे हीच खरंतर शहाणपणाची गोष्ट आहे.
म्हणूनच आजची गरज आहे – प्रत्येक सुजाण नागरिकाने या प्रवृत्तींना थारा देऊ नये. सामाजिक एकोपा, सौहार्द, आणि समजूतदारपणा टिकवण्यासाठी अशा लोकांच्या कुटील डावांचा विरोध करावा लागेल. खरं काम करणाऱ्याला साथ दिली पाहिजे आणि खोट्यांचे भांडाफोड करणे ही सामूहिक जबाबदारी प्रत्येकाची आणि प्रत्येक पक्षात बनली पाहिजे.
कारण हे केवळ एका व्यक्तीचे, एका कार्यकर्त्याचे किंवा एका पक्षाचे नुकसान नाही – हे संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याचे, विश्वासाच्या नात्यांचे आणि सार्वजनिक समजुतीचे नुकसान आहे. अशा असंतुलित, विकृत आणि विक्षिप्त मानसिकतेच्या विरोधात एकजुटीने उभे राहणे हेच खरे सामाजिक बळ आहे.
पाचोऱ्यात सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी, खरी मूल्यं जोपासण्यासाठी, आणि भावनिक सचोटीने काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, समाजाने आता या प्रकारांना नकार द्यावा लागेल. नकारात्मकतेचा नायनाट केल्याशिवाय विधायकतेचं रोप लावता येत नाही.
आणि म्हणूनच, या असंतुष्ट, नाहक वादविवाद घडवणाऱ्या, आणि दुसऱ्याच्या श्रमाचं श्रेय लाटणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने “दुरून सलाम” ठोकावा, आणि खरी साथ द्यावी त्या व्यक्तींना – ज्यांचं अस्तित्व कामात आहे, नाट्यात नाही.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!